युपीच्या कामगाराचा मारहाणीत मृत्यु.....

ब्रिटिश टिंग्या's picture
ब्रिटिश टिंग्या in काथ्याकूट
29 Oct 2008 - 4:52 pm
गाभा: 

मंडळी,

नुकतीच मटामध्ये ( http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3651344.cms ) ही बातमी वाचण्यात आली.
धरमदेव राय या युपीच्या कामगाराचा काही मराठी तरुणांची केलेल्या मारहाणीत मृत्यु झाला. धरमदेव अन् त्याच्या साथीदारांची काही मराठी तरुणांबरोबर बाचाबाची झाली अन् त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
काल-परवा घडलेल्या राहुल राज प्रकरणात आरोपीकडे गावठी कट्टा होता अन् त्याने पिस्तुलाच्या आधारे सामान्य जनतेला धमकावल्याने त्याचे एन्काउंटर करण्यात आले हे समर्थन पटण्याजोगे आहे......परंतु आजच्या ह्या घटनेचे काय समर्थन देणार? केवळ बाचाबाची झाल्यावर जीव जाण्याइतपत मारहाण करावी?
तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्राचा बिहार होत आहे?

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2008 - 4:55 pm | llपुण्याचे पेशवेll

ज्या अर्थी त्या मजूराला नाव पत्ता विचारून मारहाण करण्यात आली त्या अर्थी मला हा पूर्ववैमनस्यातून झालेला प्रकार वाटतो. अकारण पराचा कावळा केला जात आहे..
पुण्याचे पेशवे

विजुभाऊ's picture

29 Oct 2008 - 5:01 pm | विजुभाऊ

ती बातमी पूर्णपणे वाचायला हवी होती.
त्या माणसाशी बसण्याच्या जागेवरुन काहीतरी वादावादी झाली.
त्याने गुर्मीत काहितरी उत्तर दिले. आणि तो उत्तर भारतीय आहे असेही म्हणाला किंवा बोलण्याचा सूर इतराना तुच्छ लेखण्याचा असावा. लोकांची भैय्यालोकांबद्दलची चीड उफाळून आली.
मुम्बैत लोकलमधल्या उतारुंमध्ये अशी बोलाचाली बरेचदा होते.त्या उतारु बरोबर आणखी इतर तीन जण त्याच्याच गावातले लोक होते त्याना लोकानी काही केले नाही. ते देखील; भय्येच होते.
मराठीच्या मनसे आन्दोलनाचा आणि या प्रकाराचा काही संबन्ध आहे असे वाटत नाही
झाला तो प्रकार अत्यन्त वाईट झाला.
झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

मदनबाण's picture

29 Oct 2008 - 5:15 pm | मदनबाण

झाला तो प्रकार अत्यन्त वाईट झाला.
सहमत..
त्याने गुर्मीत काहितरी उत्तर दिले.
का ?हीच बिहारी वृत्ती त्याला नडली !!!
परिणामः-- बिहारी नेत्यांना बोंबाबोंब करायला आणि गरळ ओकायला नवीन मुद्दा सापडला.

मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2008 - 5:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकलमधे बसण्याच्या जागेवरुन झालेल्या भांडणाचा शेवट एखाद्याचा जीव जाऊन व्हावा हे वाईट आहे.
पण त्याला मराठी विरुद्ध युपी / बिहारी असे स्वरुप दिले की, माध्यमांना खाद्य आणि आपले मराठी रक्त सळसळ करायला विषय पुरे होतो. मग पुन्हा अस्मिता, महाराष्ट्राने आता शांततेचे धोरण सोडावे, मराठी माणसाने रस्त्यावर यावे, असे सुरु होते. तेव्हा असे मात्र कोणत्याही निमित्ताने होऊ नये असे 'आम' नागरिक म्हणून वाटते.

तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्राचा बिहार होत आहे?

सततच्या जात,धर्म, भाषा, आणि प्रांत वादाचे विषय वाचून मिसळपावचा बिहार होतो आहे, असे वाटते ;) ( ह. घ्या )

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

29 Oct 2008 - 5:38 pm | छोटा डॉन

लोकलमधे बसण्याच्या जागेवरुन झालेल्या भांडणाचा शेवट एखाद्याचा जीव जाऊन व्हावा हे वाईट आहे.

सहमत आहे. कधीही वाईटच ...
हे लोक पण साले येड्या *** आहेत, काही झालं की अंगात उसनं आवसान आणुन लगेच हाणामारी, गेला ना आता जीव.
ह्याची भरपाई कशाने होणार ?
ऐन पंचविशीतला कष्ट करुन खाणारा तरुण (मग तो भैय्या, नेपाळी, पाकीस्तानी वा कुनीही असो आम्हाला त्याचा फरक पडत नाही, माणुस होता हे महत्वाचे ) जर ऐन दिवाळीत असा गेला तर त्याच्यावर अबलंबुन असणार्‍या घरच्यांवर काय परिस्थिती ओढावली आहे ह्याच्या नुसत्या कल्पनेने काटा येतो अंगावर ...
शिवाय आता ह्याचे राजकारण होऊन त्याचे मॄत्युपश्चात जे काही धिंडवडे निघणार आहेत ते वेगळेच ...
माणुस दोषी होता का नाही ते ठाऊन नाही पण "मारुन टाकण्याइतका" नक्कीच नसला पाहिजे ...
असो. हा तारुण्याचा, अस्मितेचा व काहीतरी जगावेगळे पॄव्ह करण्याची दुर्दम्य इच्छा असण्याचा कैफच काही और असतो ...

सततच्या जात,धर्म, भाषा, आणि प्रांत वादाचे विषय वाचून मिसळपावचा बिहार होतो आहे, असे वाटते ( ह. घ्या )

ह. न घेता सहमत आहे ...
गेले २-३ दिवस जे काही वाचतो आहे त्याने डोक्याची मंडई झाली. कशासाठी वाद चाल्ला आहे देव जाणो ...
हे धागे वाचायचा सुद्धा तिटकारा आला आहे ...
तरीसुद्धा हे पटकन कंट्रोलमध्ये आणणार्‍या संपादकमंडळाला आभार ...

अवांतर : हे धागे उडवण्यापेक्षा जर संबंधीत सदस्यांना एकदाच "समज" दिली तर वारंवार ही परिस्थीती ओढावणार नाही हे आमचे वैयक्तिक मत ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....