गंडलेल्या वाघाची कहाणी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
11 Oct 2014 - 10:28 am
गाभा: 

कोमेजून थकलेल्या वाघा येते ग्लानी,
मरमर मरे रोज, कोण विचारींना पाणी,
रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही,
अफझलखानात रमले सम्राट, वाघा स्कोपच नाही
सांगायाचे आहे, या कवितेतून मला,
गंडलेल्या वाघाची कहाणी तुला,

आटपाट बम्बैजंगली गर्दी झाली भारी,
बाहेरच्या जनावरांनी केली घुसखोरी,
रोजरोज सम्राट तेंव्हा त्वेषानिया बोले,
पण कृतीतून दाखवायचे राहूनीया गेले,
जमलेचं नाही त्यावेळी त्यांना जरी,
म्हणे यावेळी न्याय ते देणारच खरी,

ओरबाडलेल्या रस्त्यांवरून मारू मग फेरी,
डेंगूवाल्या मच्छरांच्या त्यात सरीवर सरी
विकेन तो सारे जंगल, लाडक्या कॉनट्राक्टरला
गंडलेल्या वाघाची कहाणी तुला,

असा कसा कागदी सेनापती देव वाघांना देतो,
हा वरून विरोध करी, पण आतून सेटिंग लावून घेतो,
आयुष्य माझे सगळे गेले यातच निसटून ,
पळवे मला नुसता हा पोकळ इतिहासातून,
जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे,
नजरेत तुमच्या काही अनोळखी दिसे,
बम्बैजंगलातून वाघ हरवेल का हो,
नंतर वाघ तुम्हा आठवेल का हो,
दाखविली मी या कवितेतून कला,
गंडलेल्या वाघाची कहाणी तुला... ला ला ला....

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

11 Oct 2014 - 11:25 am | राजाभाउ

मस्त जमली आहे

स्पार्टाकस's picture

11 Oct 2014 - 9:02 pm | स्पार्टाकस

सॉलीड हाणले आहेत. मस्तं!

पुतळाचैतन्याचा's picture

13 Oct 2014 - 1:42 pm | पुतळाचैतन्याचा

कोणालाही कमी लेखू नका...महाराष्ट्राचे राजकारण एवढे सोपे नाही...पृथ्विबाबा पण महापालिका निवडणुकी आधी असेच बोलले होते...

प्यारे१'s picture

13 Oct 2014 - 5:47 pm | प्यारे१

>>> पृथ्विबाबा पण महापालिका निवडणुकी आधी असेच बोलले होते...

ते पण राजकारणच होतं. :)

सविता००१'s picture

13 Oct 2014 - 3:17 pm | सविता००१

भारी...

श्रीगुरुजी's picture

13 Oct 2014 - 9:05 pm | श्रीगुरुजी

या कवितेचे शीर्षक "गंजलेल्या वाघाची कहाणी" असे हवे होते.

चौकटराजा's picture

14 Oct 2014 - 5:01 am | चौकटराजा

या कवितेचे शीर्षक ( इतिहासातच )"रंगलेल्या वाघाची कहाणी" असे हवे होते.

"मत्सराला प्रेमाची रिप्लेसमेण्ट द्यायला हवी. प्रकाश आला की अंधार आपोआप जातोच"

हो बरोबरच, जसे कि विकास आला कि बेगडी अस्मिता दूर होते, नोकरी व्यवसायाच्या संधी आल्या प्रादेशिक संकुचितपणा बाजूला पडते, दगडं मारायला हात मिळत नाही. अरे नुसत्या वडापावच्या गाड्या लावून, महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेणार का ? का हफ्ते मागून राज्याचे उत्पन्न वाढवणार सेनापती ?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

*OK*

विवेकपटाईत's picture

18 Oct 2014 - 8:21 pm | विवेकपटाईत

नखं नसलेल्या वाघाची कहाणी किंवा वाघाचे कातडे ओढलेल्या .... ची कहाणी.