गाभा:
नमस्कार,
सध्या शालेय निबंध लेखन कसे करावे ? या धाग्याच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे.
आमरिकेत सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report असे काही प्रकार आहेत असे कळले. त्या शिवाय इतरही शालेय लेखन कौशल्याचे प्रकार असल्यास त्या बद्दल आधीक माहिती हवी आहे.
* या धाग्यावरील आपले प्रतिसाद मराठी विकिप्रक्ल्पातून वापरले जाऊ शकतात त्यामुळे ते प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
* प्रतिसादांसाठी अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद
प्रतिक्रिया
8 Oct 2014 - 8:23 am | श्रीरंग_जोशी
अवांतरासाठी क्षमस्व, परंतु एक सूचना मांडाविशी वाटली.
नेहमीच्या वापरात नसणार्या संज्ञा वा संकल्पनांचा उल्लेख करताना त्यांच्यावर त्यावेळी उपलब्ध असणार्या सर्वोत्तम संस्थळाचा दुवा दिल्यास त्या विषयाशी संबंधीत नसणार्यांनाही किमान कल्पना येईल.
उदा.
बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.
8 Oct 2014 - 9:56 am | माहितगार
दुव्यांसाठी धन्यवाद. मला स्वतःस कल्पना नाही आणि मला इंग्रजी विकिपीडियावरची माहिती सुद्धा पुरेशी वाटली नव्हती म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे टाळले.
२०१६ पर्यंत शालेय परिक्षेतील उत्तरांसोबत संदर्भही उधृतकरावे लागतील असे काहीसे वाचण्यात आले त्या बद्दलही जाणकारांनी माहिती दिल्यास सर्वांनाच उपयूक्त होईल असे वाटते.
8 Oct 2014 - 9:44 am | कंजूस
श्रीरंग जोशींनी दिलेल्या लिंकवरून या दोन प्रकारच्या लेखनप्रकाराबद्दल कळले मुलांचा हुन्नर, आवड, प्रामाणिकपणा आणि ध्येपूर्तीसाठी किती कष्ट घेऊ शकतात हे जाणण्याच्या या कसोट्या आहेत असं वाटतं आहे.
8 Oct 2014 - 9:58 am | माहितगार
+१ सहमत
बूक रिपोर्ट ची संकल्पना खासच वाटते आहे. मुलांना वाचनाशी व्यवस्थीत जोडते.