गाभा:
१. त्याला किमान लिहिता वाचता यावे
२. एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी.
३. एखादी तरी परभाषा निदान समजावी
४. रोजचे वर्तमानपत्र वाचत असावा असे किमान शंका यावी असे वर्तन असावे.
५. एक तरी फोटो टिळाविरहित, पांढरे कपडे नसलेला, शर्टाचे वरचे बटण उघडे नसणारा आणि त्यातून सोन्यःची चेन न दाखवणारा असावा
६. आजूबाजूचे समर्थक वरील बाबींशी किमान संबधित असावेत
प्रतिक्रिया
5 Oct 2014 - 6:54 pm | जेपी
वरील बाबीबद्दल आपल्याला कायबी आशेप नाय. *wink*
उमेदवाराने एकतर नोटा द्याव्या नायतर आमी NOTA वापरु
5 Oct 2014 - 9:53 pm | नाव आडनाव
"आशेप नाय."
ओ पयले जेपी साहेब, अवो सायबाले / मॅडमले आवडत नाय वो असुद्द भासा. असं असुद्द लिवु नका, आन ते बी पयले असतांना :)
5 Oct 2014 - 7:47 pm | माम्लेदारचा पन्खा
चांगलाच निघेल कशावरुन ? नारळासारखं अस्तय त्ये बेनं !
5 Oct 2014 - 8:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी
म्हंजे ? मह्या डोक्यातनी त ह्या प्रेश्नानंच झाकट पल्डेल हाय भाऊ!!!, मले जरासक खुल्लं करुन सांगजा बरं बयाजवार थुमाले म्हानावचं का व्हय थे . :)
5 Oct 2014 - 9:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
किमान पदविका /पदवी हा निकष लागु व्हायला हवा. हल्ली बहुतेक ज्यांना शिक्षणात गती नाही आणि घरी जमीन विकुन आलेला पैसा आहे ते लोकं स्कॉर्पियो उडवत राजकारणात उतरत आहेत. किमान राजकारणात जायचं म्ह्णुन तरी शिकतील.
5 Oct 2014 - 10:44 pm | काळा पहाड
माझ्या कसल्याही अपेक्षा नाहीत. सगळे च चोर आहेत.
5 Oct 2014 - 11:07 pm | अन्या दातार
तुम्ही अजूनही उमेदवारांबद्दल अपेक्षा बाळगून आहात?
5 Oct 2014 - 11:10 pm | पैसा
शिकून फार तं आयटीत नोकरी पकडतेत लोकं. शिकून का व्हनारे?
6 Oct 2014 - 12:53 am | खटपट्या
:)
6 Oct 2014 - 10:11 am | सुधीर
कुठल्याही गंभीर स्वरुपाचा गुन्हा नसावा. ही पहिली अट.
वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचे स्वरूप आणि स्तावर जंगम मालमत्तेत मेळ असावा. अशी माफक अपेक्षा.
अशा माहितीचा अंदाज इथून घेता येऊ शकेल.
http://103.23.150.139/VSAffidavits/VS2014.aspx
6 Oct 2014 - 11:54 am | विजुभाऊ
आणखी माफक अपेक्षा........
प्रचार करताना
सेनेच्या उमेदवाराने " दळभद्री " हा शब्द वापरू नये
भाजप च्या उमेदवाराने " जनादेश" हा शब्द वापरू नये
राष्ट्र वादी च्या उमेदवाराने " सहकाराच्या माध्यमातून" हा शब्द वापरू नये
कोग्रेस च्या उमेदवाराने " जातीयवादी शक्तिंना दूर ठेवण्यासाठी" हा शब्द वापरू नये
मनसे च्या उमेदवाराने " परप्रान्तीय" हा शब्द वापरू नये
6 Oct 2014 - 12:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
हे जरा जास्तच होतय बर का विजू.
उमेद्वाराच्या भाषणात 'साहेब्,मॅडम्,गांधी,नेहरू,वाजपेयी,सम्राट' हे शब्द असू नयेत असे सुचवते.
6 Oct 2014 - 2:14 pm | विक्रान्त कुलकर्णी
आणखी महाराष्ट्र मागे- पुढे, करुन दाखविले-वरुन दाखविले, शिक्षण्-सम्रुद्धी, रस्ते, पाणी, वीज वगैरे पण नको.. वीट आलाय सगळ्याचा..