येथे रोकडा भेटेल..! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
28 Oct 2008 - 12:52 am
गाभा: 

काय मंडळी, कसं वाटतंय मिपाचं मुखपृष्ठ?

साला, इतर कुठल्या संस्थळाचं मुखपृष्ठ इतकं श्रीमंत आहे काय? हज्जार रुपिया अने काजू मिठाई, अने सुको मेवो! :)

सू बोले छे? :)

असो,

हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना...! :)

मिपा व्यवस्थापनाकडून सर्वांना एक हजार सहाशे पंचाऐशी रुपये सप्रेम भेट! कृपया स्वीकार करावा! :)

आपला,
(पैसेवाला) तात्या.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

28 Oct 2008 - 1:07 am | प्राजु

आवडलं हे लक्ष्मी पूजन..
जपून ठेवा हे रूपये मी भारतात आले की घेईन ते पाकिट.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

28 Oct 2008 - 1:33 am | भास्कर केन्डे

अहो प्राजूताई, ते स्पेसिमन घेऊन काय करणार. तात्या तुमच्या स्वागतासाठी अख्खा शेअर बाजार नाही तर रिझर्व बँक विमानतळावर आणतील. फक्त फर्मान सोडून तर बघा. दिवाळ सणाला न्हाई म्हणनारेत का काय तात्या?

तात्या, बरोबर ना?

आपला,
(लक्ष्मीभक्त) भास्कर

मानस's picture

28 Oct 2008 - 1:14 am | मानस

हे लक्ष्मीपूजन सर्व मिपाकरांना मालामाल बनवो हीच शुभकामना

असेच म्हणतो ..... लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा

टारझन's picture

28 Oct 2008 - 2:17 am | टारझन

तात्या अंमळ इनोव्हेटिव आहात तुम्ही , हाबिणंदण.. तशेच शुभेच्छा !!!

अवांतर : आज पर्यंत चार देशांची चलनं वापरली, पण भारतिय रुपयांच्या नोटा दिसायला जशा दिमाखदार (तो माणूस सोडला तर) आहेत , तसे ना डॉलर, ना पौंड ना शिलींग्स ..... डॉलर तर अक्षरश: रद्दी वाटतो.

(रुपयाभिमानी)
टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
आम्ही जालिय दशमुर्खांना फाट्यावर मारतो, तेंव्हा अरे बघता काय सामिल व्हा

ऋषिकेश's picture

28 Oct 2008 - 6:54 pm | ऋषिकेश

आज पर्यंत चार देशांची चलनं वापरली, पण भारतिय रुपयांच्या नोटा दिसायला जशा दिमाखदार आहेत , तसे ना डॉलर, ना पौंड

सहमत :) +१

नोट खरी की खोटी कशी ओळखावी हे इथे बघा

-(भारतीय नोटप्रेमी) ऋषिकेश

चतुरंग's picture

28 Oct 2008 - 3:01 am | चतुरंग

मिपा रो मुखपृष्ठ घनो चोखो लागे!
लक्ष्मीपूजा करने इत्तो रोकडो लायो कै? घनो पैसो हे कै थारे पास? इत्तो पैसो कै करे तू? थोडा म्हने भी दे ना!
तात्या म्हारो दोस्त है, मिपा म्हारो जिगररो टुकडो है! ;)

चतुरंग

येडा खवीस's picture

28 Oct 2008 - 8:30 am | येडा खवीस

काय हो तात्या निदान खर्या नोटा तरी स्क्यान करुन लावायच्या ना....मोठ्या आशेने बघत होतो

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 9:28 am | सखाराम_गटणे™

धन्यवाद,

अवांतरः सगळ्या नोटांचे क्रमांक ००००० आहेत.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

वेताळ's picture

28 Oct 2008 - 9:54 am | वेताळ

तुम्हालाही लक्ष्मीपुजनाच्या शुभेच्छा. माझा पत्ता मी मेल करेन. त्यावर खरया नोटा पाठवुन देणे.
वेताळ

सुक्या's picture

28 Oct 2008 - 11:41 am | सुक्या

लक्ष्मीपुजनाच्या शुभेच्छा. मी माझा बँक अकाउंट नंबर पाठवतो. नोटा डायरेक्ट अकाउंट मधे जमा करा. पोष्टेज चा खर्च नको.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विकि's picture

28 Oct 2008 - 12:24 pm | विकि

१ आणि २ रुपयाची नोट राहीली की ? लग्नात,बारशात आहेर द्यायला उपयोगी पडली असती.

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 12:45 pm | विसोबा खेचर

बाकी काय पण म्हणा, बापू मूळचे गुज्जूभाई असल्यामुळे नोटेवर मात्र अगदी हसतमुख, देखणे अन् स्मार्ट दिसतात! :)

आपला,
मोहनदास अभ्यंकर.

अवलिया's picture

28 Oct 2008 - 3:04 pm | अवलिया

आमच्याकडुन छोटीशी भेट.. जागतिक चलन.

सुनील's picture

28 Oct 2008 - 3:29 pm | सुनील

तात्या एक आणि दोनाच्या नोटा सरकारने चलनातून बाद नाही केल्यात अजून!

लक्ष्मीपूजनाची ही आयडिया मात्र भन्नाट!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

१.५ शहाणा's picture

28 Oct 2008 - 4:14 pm | १.५ शहाणा

बाकी काय पण म्हणा, बापू मूळचे गुज्जूभाई असल्यामुळे नोटेवर मात्र अगदी हसतमुख, देखणे अन् स्मार्ट दिसतात! Smile
रुपयाचे अवमुल्य ते याच मुळे दुसर्‍या कुणाचा फोटु आजुन मिळाला नाही

खुसपट's picture

29 Oct 2008 - 12:26 am | खुसपट

सर्व मिपाकरांना दीपावली शुभेच्छा !
एक पडलेला साधा प्रश्न....अमेरीकन लोक ( स्वतःला खरे अमेरीकन समजणारे ) संपत्ती वाढावी म्हणून कुठली पूजाप्रथा पाळतात?
खुसपट (राव)