१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील.
हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते. आता तिघेही नाहीत व त्यांच्या पुढील पिढ्या राजकारणात आहेत. देवीलालांचा मुलगा ओमप्रकाश चौतालासुद्धा २०००-२००४ या काळात मुख्यमंत्री होता. मागील वर्षी ओमप्रकाश चौताला व अजय चौतालाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगवासाची शिक्षा झाली. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत परंतु कायद्याने ते निवडणुक लढवू शकत नाहीत. ओमप्रकाश चौतालाचा दुसरा मुलगा अभय चौताला आपल्या भारतीय राष्ट्रीय लोकदल या पक्षाची धुरा सांभाळत आहे. भाजप हा हरयानातील प्रमुख पक्ष कधीच नव्हता. भाजप कधीच दुसर्या क्रमांकावरील पक्ष देखील नव्हता. परंतु आता अचानक भाजप तिथला प्रमुख पक्ष बनला आहे. कारण अर्थातच मोदीलाट. हरयानात भाजपकडे चेहरा नाही. तरीसुद्धा या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष बनेल असं दिसतंय.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार हरयानात भाजपला ९० पैकी ३३ जागा (३८% मते), भारतीय राष्ट्रीय लोकदलाला २८ जागा (२२% मते), काँग्रेसला १६ जागा (१६% मते), भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला १० पैकी ७ जागा व काँग्रेसला १ जागा मिळाली होती.
महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. हे अत्यंत बदनाम झालेले सरकार आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. महाराष्ट्रात या सरकारविरोधात तीव्र जनभावना आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने भाजप्-शिवसेना युती तुटली तर त्याच कारणाने काँग्रेस्-राष्ट्रवादी आघाडी तुटली. त्यामुळे हे चारही पक्ष एकमेकांविरूद्ध लढत आहेत. यातला ५ वा कोन आहे मनसे. एकंदरीत महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या १५१ जागांच्या हट्टामुळे भाजपला युती तोडावी लागली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे सहकारी पक्ष वार्याची दिशा ओळखून भाजपबरोबर गेल्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. आता सामनातून व जाहीर सभातून रोज भाजपसहीत या सर्व पक्षांना शिवसेना झोडपत आहे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे.
कालच इंडियाटीव्ही-सी व्होटर ने आपले सर्वेक्षण प्रसिद्ध केले. त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३, सेनेला १८, राकाँला ४ व काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या.
हे निकाल खालील संकेतस्थळावर आहेत.
http://www.indiatvnews.com/politics/national/india-tv-tracking-poll-hung...
कोणत्याही सर्वेक्षणाचे अंदाज कधीच १०० टक्के बरोबर येत नाहीत. परंतु त्यातून जनतेचा कल दिसतो. वरील सर्वेक्षणावरून असे दिसते की दोन्ही राज्यात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून दोन्हीकडे भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरेल. दोन्ही राज्यात सत्ताधारी काँगेसच्या पराभव होणार असून दोन किंवा अधिक पक्षांनी एकत्र आल्याशिवाय नवीन सरकार बनणार नाही.
निवडणुकीला अजून १२-१३ दिवस आहेत. अजून मोदींनी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. त्यांच्या झंझावाती सभांनी भाजपसाठी निश्चितच सकारात्मक बदल घडेल. परंतु बहुमत मिळण्यासाठी त्यांच्या सभांचा उपयोग होईल का ते १९ ऑक्टोबरलाच ठरेल.
आज 'झी'चे सर्वेक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे १०-११ ऑक्टोबरला जी सर्वेक्षणे येतील त्यात बराचसा अचूक अंदाज आलेला असेल.
प्रतिक्रिया
2 Oct 2014 - 9:15 pm | नानासाहेब नेफळे
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राकाँ
असा क्रम असेल.
3 Oct 2014 - 1:51 pm | श्रीगुरुजी
भाजप पहिल्या क्रमांकावर व मनसे पाचव्या क्रमांकावर असणार हे नक्की. २, ३ व ४ वर नक्की कोण असेल ते सांगता येणे अवघड आहे. दुसर्या क्रमांकावर राकाँ नक्कीच नसेल.
2 Oct 2014 - 11:04 pm | पिवळा डांबिस
काय हो? ह्याला काय संभाळून पिणं म्हणतात का? :)
तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!! :)
अवो म्हारास्ट्रात हा भजनसुत कुठे आला?
2 Oct 2014 - 11:45 pm | नानासाहेब नेफळे
'सब भूमी गोपाल की, जय बोलो हरी नाम की' हे गुर्जींचे आवडते भजन असावे.
3 Oct 2014 - 1:54 pm | श्रीगुरुजी
आधीच्या परिच्छेदातील काही वाक्यांची नक्कल नवीन परिच्छेदात चिकटवताना जरा दुर्लक्ष झाले. एकदा लेख प्रकाशित झाल्यावर नंतर संपादित करण्याची सोय नसल्याने ते वाक्य तसेच राहिले.
3 Oct 2014 - 10:15 pm | पिवळा डांबिस
हा धागा वाचायच्या लगेच आधी तुमचा तो धागा वाचल्याकारणाने जरा थोडी गंमत केली, इतकंच!:)
राग नसावा...
3 Oct 2014 - 10:34 pm | दशानन
>>तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!!
=))
3 Oct 2014 - 2:11 pm | श्रीगुरुजी
काल झी-२४ तास/तालिम चे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांचे अंदाज खालीलप्रमाणे -
भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१.
सी-व्होटर व तालिम या दोघांनीही भाजपला अनुक्रमे ९३ व ९० जागांचा अंदाज दिला आहे. शिवसेनेसाठी सुद्धा दोघांचा अंदाज अनुक्रमे ५९ व ६१ जागांचा आहे. पण इतर पक्षांसाठीचे त्यांचे अंदाज पूर्ण वेगळे आहे. सी-व्होटरने काँग्रेससाठी ४० जागांचा अंदाज दिला आहे तर तालिमने काँग्रेसला तब्बल ७२ जागा दाखविल्या आहेत. राकाँला सी-व्होटरने ४७ तर तालिमने ३८ आणि मनसेला सी-व्होटरने २७ तर तालिमने फक्त ६ जागांचा अंदाज दिला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा येणार यावर दोन्ही सर्वेक्षणांचे एकमत आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल तर मनसे ५ व्या क्रमांकावर असेल यावर देखील दोघांचे एकमत आहे. भाजप-सेनेच्या बाबतीत दोन्ही सर्वेक्षणांचे अंदाज जवळपास सारखे आहेत. परंतु इतर ३ पक्षांच्या बाबतीत दोघांचे अंदाज खूप वेगळे आहेत.
निकालानंतर दोनच शक्यता (खरं तर तीन) दिसतात. भाजप+शिवसेना परत एकत्र येऊन भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू शकतील. परंतु उद्धव ठाकर्यांचा इगो आड आला तर ते एकत्र येणे अवघड आहे. भाजपबरोबर तुटलेली युती शिवसेनेने खूपच जिव्हारी लावून घेतलेली आहे. त्यात भर म्हणून इतर सहकारी पक्ष भाजपबरोबर गेले. त्यामुळे शिवसेनेचा विलक्षण त्रागा व थयथयाट सुरू आहे. आपल्याला सोडून कोणी बाहेर गेला तर ते शिवसेनेला सहन होत नाही व त्या व्यक्तीवर ते विलक्षण तुटुन पडतात व अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. त्यामुळे शिवसेना सोडून गेलेले सहसा सेनेत परत येत नाहीत कारण ते परत येऊ नयेत अशी व्यवस्था शिवसेनेनेच केलेली असते. भुजबळ, राणे, गणेश नाईक, राज ठाकरे इ. मोठे नेते सेना सोडून गेल्यानंतर याच कारणामुळे कधीही परत आले नाहीत. याउलट इतर पक्ष विलक्षण लवचिक आहेत. त्यामुळे त्या पक्षात ये-जा सतत सुरू असते. सध्या सेनेने भाजपला आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू ठरविले आहे. त्यामुळे निकालानंतर शिवसेनेचा ताठा कायम राहिला तर कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही. यदाकदाचित शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर सेनेला भाजपची मदत लागेल. हे ओळखून निकालानंतर सर्वांनीच आपले व्यक्तिगत इगो बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
दुसरी शक्यता म्हणजे शिवसेना+काँग्रेस्+राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे. ही शक्यता अगदीच कमी वाटते कारण मुख्यमंत्री कोणाचा यावर एकवाक्यता होण्याची सुतराम शक्यता नाही.
भाजप्+राकाँ ही युती अशक्य आहे. किंबहुना भाजप काँग्रेस किंवा राकाँची मदत घेणे अशक्य आहे.
तिसरी शक्यता म्हणजे कोणालाच स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्याने राष्ट्रपती राजवट लावून ६ महिन्यांनी पुन्हा निवडणुक घेणे. बहुतेक पक्ष या प्रस्तावाला अनुकूल नसतील.
एकंदरीत २ गोष्टी अधोरेखित होताहेत. शिवसेनेच्या सहभागाशिवाय कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही हे नक्की आणि कोणत्याही सरकारसाठी मनसेच्या मदतीची गरज नाही हे पण नक्की.
3 Oct 2014 - 3:23 pm | नानासाहेब नेफळे
राज्यात काँग्रेसची प्रतिमा स्वच्छ आहे, हे ओपिनियन पोलवरुन दिसते. पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व, काँग्रेसच्या एकाही मंत्र्यावर पंधरा वर्षात मोठे आरोप नाहीत. आदर्श प्रकरणात राज्याचे फार नुकसान झाले नाही व त्यात सर्व पक्ष सेनाधिकारी गुतले असल्याने थेट काँग्रेसकडे आरोप येत नाही. काँग्रेसने चव्हाणांना स्टार प्रचारक करुन फक्त सोनियांच्या सभा घ्याव्यात ,तरुणांमध्ये राहुल गांधीविषयी निगेटीव मत आहे.
राज्यात योग्य प्रयत्न केल्यास काँग्रेस ८५ जागा जिंकू शकेल व राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या मदतीने सत्ता स्थापण करु शकेल.
खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्यात आहे ,कागदी वाघाच्या फुकाच्या डरकाळ्या चालू आहेत.
5 Oct 2014 - 12:37 pm | माझीही शॅम्पेन
अहो गुर्जी ज्या ठाम पणे तुम्ही गोष्टी मांडता त्याच कौतिक वाटत राव .. पण अगदी काही महिन्यांपुर्वी पुर्वी
"मोदी पंतप्रधान होणार नाहीत , अस्थिर लोकसभा येऊन 2017 ला मोदी पंतप्रधान होतील"
अस काहीस म्हटल होत तेंव्हा सुधा कवतिकच वाटल होत बर..
5 Oct 2014 - 8:46 pm | श्रीगुरुजी
२०१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होईल परंतु बहुमतापासून बराच लांब राहील. २०१४ सुरू झाल्यावर परिस्थितीत खूप बदल झाला. भाजपने बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उ.प्र., महाराष्ट्र इ. राज्यात नवीन मित्रपक्ष मिळवून स्वतःच्या व रालोआच्या मतात भर घातली. त्यामुळे व माध्यमे आणि राजकीय पंडीतांच्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठी मोदी लाट आल्याने भाजपला स्पष्ट बहुमत मिळून मोदी पंतप्रधान झाले. जर रालोआला २५० किंवा त्याच्या पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान न होता अडवाणी किंवा सुषमा स्वराजांना संधी मिळाली असती.
3 Oct 2014 - 2:22 pm | सुनील
क्लिंटन यावर लेख लिहिणार आहेत काय? लिहिल्यास उत्तम.
3 Oct 2014 - 2:37 pm | श्रीगुरुजी
मी त्यांच्याच लेखाची आतुरतेने वाट पहात आहे.
3 Oct 2014 - 5:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
प्रूथ्विराज चव्हाणांना पुढे करून कॉन्ग्रेस सर्वात जास्त जागा जिंकेल असे दिसते आहे. तब्बल १५ वर्षांनी सत्ता मिळण्याचा चान्स विरोधकांना होता. सेना नेत्यांचे ईगो व राज्य भाजपाचे लिंबु टिंबु नेतृत्व त्यास कारणीभूत होय.
मनसेची ती ब्ल्यु प्रिंट एवढी मोठी आहे की ती वाचून पूर्ण होईस्तोवर निवडणूक संपेल.पण अनेक तरूणांना मनसे आशावादी वाटते. राष्ट्रवादीचे नेते निवडणूकीनंतर पक्षाचे नामकरण तालुकावादी कॉन्ग्रेस करतील असे हे विनोदाने म्हणतात.आमचा अंदाज-
कॉन्ग्रेस
भाजपा
शिवसेना
राष्ट्रवादी
तुमचे ते दलित रिपब्लिकन्,डेमोक्रॅट्स वगैरे
3 Oct 2014 - 5:56 pm | श्रीरंग_जोशी
आपल्या राज्यात निवडणुक असल्याने हरयाणामधील निवडणुकांकडे फारसे लक्ष दिले नव्हते.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी लिहिले होते की विविध निवडणुकपूर्व अंदाज व्यक्त करणार्यांनी तोंडघशी पडू नये म्हणून भाजप व रालोआला हातचे राखून जागा वर्तवल्या होत्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतही मला असेच वाटत आहे. या अंदाजांवर लोकसभा निवडणुकीच्या चुकलेल्या अंदाजंचा प्रभाव पडल्यासारखा वाटत आहे. सेना व भाजपच्या जागांमध्ये फारसा फरक असणार नाही व दोहोंमध्ये प्रथम क्रमांकासाठी चुरस असेल असा माझा अंदाज आहे.
भाजपच्या युती तोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी व मनसे यांची अस्तित्वासाठीची लढाई सोपी झाली.
१९९९ च्या निकालांनंतर उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर सत्ता नको या धोरणापायी भाजपने नकळत राष्ट्रवादीच्या प्रगतीला हातभार लावला. १९९९ ते २००४ या काळात राष्ट्रवादीला राज्यातली सत्ता मिळाली नसती तर कदाचित आज ते अस्तित्वातही नसते.
3 Oct 2014 - 6:08 pm | दुश्यन्त
झी २४ तासच सर्वे हास्यास्पद आहे.खासकरून विभागवार जागा गंडलेल्या आहेत. शिवसेनेला मुंबई, ठाणे, कोकणात अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा दाखवल्या आहेत.भाजपलाही विदर्भात फक्त १९ जागा दिल्यात. कॉंग्रेस एन्सीपीवर लोकांचा प्रचंड राग आहेच मात्र राज्य भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व गुजराथी शहा आणि मोदी ठरवणार काय? राज्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष असेल. निवडणुकीनंतर सेना भाजप एकत्र येवून सरकार बनवू शकतात. सेनेने शंभरी ओलांडली तर सेना+ माणसे+ छोटे पक्ष (शेकाप वगैरे) एकत्र येवूनही सरकार बनू शकतात मात्र जास्त शक्यता शिवसेना-भाजप अशीच आहे.
3 Oct 2014 - 6:09 pm | दुश्यन्त
सेना+ मनसे+ छोटे पक्ष (शेकाप वगैरे) एकत्र येवूनही सरकार बनू शकतात
4 Oct 2014 - 6:18 am | रमेश आठवले
या सर्वे मुळे येत्या दहा बारा दिवसातील मोदींच्या भाषणांच्या परिणामांचे मुल्यमापन करण्यासाठी महत्वाचा असा baseline data मिळाला आहे.
4 Oct 2014 - 5:02 pm | चौकटराजा
शिवसेनेवर टीका टाळून भाजपा शिवसेननेला हे दाखवून देणार की तुम्ही रिजनल पार्टीच आहात. तेंव्हा जास्त्य हुस्श्यारी करायची नाय. राज ठाकरेंचे काय सांगावे ? त्यानीच सर्वांची मोठी फसवणूक केल्याची भावना मला अनेकानी बोलून दाखविली आहे. भ्रष्टाचारावर ते कमी बोलतात .शासकीय गोंधळाची उदाहरणे देतात पण पुराव्यासह भ्रष्टाचार सिंद्ध करणारी कोणतीही यंत्रणा त्यांचाकडे नाही शिवसेनेकडेही नाही. आपण काही पुरावे समोर आणले तर आपलेही पुरावे येतील अशी भीति त्याना( दोघाना) वाटत असावी. भाजपाला पूर्ण बहुमत अशक्य आहे. पण भाजपाचा आलेख उत्तरोत्तर भारतासह महाराष्ट्रात वाढता राहील.बाकी माय मराठी म्हाराष्ट्र भवानी आई माताभगिनी अशा शब्दानी १४४ जागा मिळणे जसे भावाना अशक्य तसे सतत शाहू आंबेडकर, फुले असे बडबडून १४४ जागा कॉग्रेस व राका ला ही अशक्य ! लोकाना
कांदा व बटाटा इतका महाग का याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही. ( खरे उत्तर असे आहे की त्या भावाला कांदे बटाटे सहज विकत घेणारा एक नव श्रीमत मध्यमवर्गीय समाज वाढतो आहे ! )
4 Oct 2014 - 10:19 pm | रमेश आठवले
आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची खालील आशयाची मुक्ताफळे ऐकली किंवा वाचली आहेत.
-कावळे पळाले शूर मावळे उरले
-कुतुबशाही- आदिलशाही यांचा विमोड करू
-ते औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकून आमच्या पाठीत खंजीर खुपसतात
- मतांच्या वाघनखाने विरोधकांचे कोथळे बाहेर काढतील- वगैरे
यावरून उधोजीराव आणि शिवसैनिक हे कोणत्या जमान्यात वावरत आहेत या विषयी संभ्रम निर्माण होतो.
4 Oct 2014 - 11:45 pm | शिद
अगदी अगदी.
हि आजची बातमी: ५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू.
महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलायाचं सोडून हे कागदी वाघ पोकळ डरकाळ्या मारत आहेत. सेनेच्या बाळ राज्यांचं पण तोंड हल्ली भलतंच सुटायला लागलं आहे.
4 Oct 2014 - 11:47 pm | शिद
सेनेच्या बाळ राज्यांचं पण तोंड हल्ली भलतंच सुटायला लागलं आहे.
4 Oct 2014 - 5:15 pm | वेताळ
जागा आरामत जिंकेल. मनसे,रिपब्लिक,स्वाभिमानी व इतर सरकार स्थापनेला भाजपाला मदत करतील. कॉग्रेस महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष असेल. सेना आपल्या फुटणार्या मावळ्याना सांभाळावे कसे ह्यात दिवस काढेल.राकॉ ह्याना आत्मपरिक्षण करण्यास ५ वर्षाचा वेळ मिळेल.
5 Oct 2014 - 5:48 am | हुप्प्या
शिवसेना बहुधा जास्त दुखावली गेली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या भाषणात भाजपावर जरा जास्तच टीका असते. भाजपाचे सर्व उच्चपदस्थ नेते युती तुटल्याचे दु:ख व्यक्त करतात पण आता प्रचाराला लागतो. आघाडी हा जास्त मोठा प्रतिस्पर्धी आहे असे आवर्जून सांगतात. त्यांच्या बोलण्यात शिवसेनेवर फार टी़का नसते. कदाचित लोकांना भाजपाची पद्धत जास्त आवडेल. वेळ इतका कमी असल्यामुळे शिवसेना आपल्या प्रचारात आपण काय करू, सद्य सरकारने काय दिवे लावले ह्यावर भर द्यायला हवा. भाजपा कसा वाईट हे सांगून काँग्रेस व राकॉचाच फायदा होण्याची शक्यता.
5 Oct 2014 - 10:29 am | वेताळ
ठाकरे कुटुंबियांचे नोकर चालवतात काय असा प्रश्न पडला आहे. मिलिंद नार्वेकर हा उध्दव ठाकरेचा खाजगी सचिव व संजय राऊत हा सामना संपादक ह्याना किती अमर्याद अधिकार आहेत ह्याची कल्पना येत नाही. जो जो शिवसेनेतुन बाहेर पडतो तो तो मिंलिदबद्दलच बोलत बाहेर पडतो. इकडे संजय राऊत महाराष्ट्र पौराणिक काळात असल्यासारखे टुकार सीग्रेडचे अग्रलेख लिहुन डोके भडांवुन सोडतात.
5 Oct 2014 - 10:36 am | पिवळा डांबिस
आणि खुद्द श्री. उद्धव ठाकरे यांची भाषणे/पत्रकारपरिषद/ मुलाखती (गेल्या दोन आठवड्यामधील) यू-ट्यूबवर पाहिली...
हसावं की रडावं हे कळेना!!!
:) की :(
5 Oct 2014 - 11:49 am | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी हेच म्हणते. ४०-५० वर्षापूर्वीची बाळासाहेबांच्या सभा, असलाच प्रकार होता.त्यांचे चाहते(आमचे "हे" ही त्यात) त्याला चौफेर टोलेबाजी,खरपूस समाचार म्हणत.
अर्थकारण्,शेतीचे प्रश्न,बेरोजगारी,नोकर्या हे सगळे सत्ताधार्यांनी पाहून घ्यायचे.
5 Oct 2014 - 3:24 pm | दुश्यन्त
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.भाजपवाले त्यांचे बिभीषण म्हणून समर्थन पण करत आहेत. हरियानात डीपी यादव (नितेश कटाराचा खुनी विकास यंदाचा पिता) हा गुंड, बाहुबली अमित शहाण्बरोबर सतेज शेअर करत फिरतो आहे. भाजपला सत्तेची हाव आहे मात्र आव असा की आमच्यासारखेच शुद्ध कुणीच नाही.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
5 Oct 2014 - 10:56 pm | काळा पहाड
चालू दे.
5 Oct 2014 - 8:37 pm | श्रीगुरुजी
>>> मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
-१
भाजपच्या जन्मापासूनच (एप्रिल १९८० पासून) महाराष्ट्रातील भाजपचा जनाधार शिवसेनेच्या तुलनेत जास्त होता. १९८० च्या निवडणुकीत भाजपचे स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागातून १२ आमदार निवडून आले होते. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ. सर्व भागातून भाजपचे १-२ आमदार निवडून आले होते. शिवसेना ज्या मुम्बई-ठाणे भागाला स्वतःचा बालेकिल्ला समजते, त्या भागातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता तर भाजपचे २-३ आमदार जिंकले होते. त्याच निवडणुकीत राज्यात शिवसेनेला ० जागा मिळाल्या होत्या.
अगदी १९८५ च्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे १६ तर शिवसेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता. १९८९ मध्ये भाजपशी युती झाल्यानंतरच महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार झाला व जास्त आमदार निवडून यायला सुरूवात झाली. शिवसेनेला फक्त मुंबई-ठाण्यातील थोड्या मराठी बहुल भागात अस्तित्व होते तर भाजपला त्याच काळात महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडातरी जनाधार होता.
5 Oct 2014 - 8:54 pm | श्रीगुरुजी
बादवे, या निवडणुकीत विनोदमूर्ती केजरीवाल व त्यांचा पक्ष कोठे आहे? प्रचाराच्या गंभीर वातावरणात त्यांच्या मर्कटलीला वातावरणातला ताण हलका करतात. अरविंद, वी मिस यू.
5 Oct 2014 - 10:46 pm | नानासाहेब नेफळे
समानशिले व्यसनेशू सख्यम् असा प्रकार नाही ना गुरुजी तुमचा!
5 Oct 2014 - 9:17 pm | दुश्यन्त
तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे शरद पवारांच्या पुलोदमध्ये होता.
6 Oct 2014 - 2:14 pm | श्रीगुरुजी
>>> तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे शरद पवारांच्या पुलोदमध्ये होता.
१९८५ मध्ये भाजप, जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व शेकाप या ४ पक्षांनी एकत्र येऊन पुलोद बनविले होते. भाजपचे १९८० मध्ये फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते तर १९८५ मध्ये पुलोदमध्ये राहून १६ आमदार निवडून आले होते. त्यामुळे पुलोदमुळे भाजपला फक्त ४ जागांचा फायदा झाला होता.
5 Oct 2014 - 10:53 pm | नानासाहेब नेफळे
1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय.
6 Oct 2014 - 2:23 pm | श्रीगुरुजी
>>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय.
साफ चूक. १९८० मध्येच भाजपचे फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. कोणाचीही कृपा नसताना फक्त स्वबळावर भाजपच्या दोन आकडी जागा होत्या. पुलोदमुळे त्यात फक्त ४ जागांची भर पडली.
सेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते कारण इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला अजिबातच जनाधार नव्हता. शिवसेनेला घेतले असते तर तेव्हा सुद्धा मायभवानीची आण, मर्द मराठा, शूर मावळे असले इतिहासकालीन शब्द वापरून शिवसेनेने ४०-५० जागांचा हट्ट धरला असता आणि त्यापैकी जेमतेम १-२ जण निवडून आले असते. पवार व इतर पक्ष हे ओळखून होते म्हणूनच अजिबात जनाधार नसलेल्या शिवसेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते. त्यावेळी रागावलेल्या शिवसेनेचा स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आला होता. शिवसेनेला पुलोदमध्ये ने घेण्याचा निर्णय योग्य होता हे शिवसेनेच्या कामगिरीवरून सिद्ध झाले होते.
बादवे, भाजप पवारांच्या किंवा इतर कोणाच्याही कृपेने २ आकड्यात गेला नव्हता. डिसेंबर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इतर सर्व पक्षांचे अक्षरशः पानिपत झाले होते. देशात काँग्रेसला ४१४ जागा व महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४३ जागा मिळाल्या होत्या. जेमतेम ३ महिन्यात मार्च १९८५ मध्ये विधानसभेची निवडणुक होती. याही निवडणुकीत सर्व पक्षांचे व आपल्या पक्षाचे सुद्धा पानिपत होईल व स्वतंत्र लढलो तर काँग्रेसला कमीतकमी २५० जागा मिळतील व इतर सर्व पक्षांना एक आकडी जागा मिळतील हे ओळखून पवार व इतर ३ पक्ष एकत्र येऊन पुलोद स्थापन केले होते. त्यामुळे मतांचे विभाजन टळून काँग्रेसला १६० व पुलोदला १०४ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी एकत्र येणे ही सर्व विरोधी पक्षांच्या अस्तित्वाची गरज होती. जशी भाजपला गरज होती, तितकीच गरज पवारांना व जनता पक्षालाही होती. त्यामुळे कोणीही कोणाच्या कृपेवर नव्हते.
6 Oct 2014 - 2:50 pm | नानासाहेब नेफळे
राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली.
२०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.
6 Oct 2014 - 4:57 pm | llपुण्याचे पेशवेll
अहो आण्णा आणि कंपनीने त्या दाढीवाल्या रामदेव बाबाची लाट पळवली. :-) बाकी चालूद्या.
6 Oct 2014 - 5:19 pm | नानासाहेब नेफळे
काँग्रेसविरोधी लाटेचा दाढीवाल्याला फायदा झाला.
6 Oct 2014 - 5:20 pm | llपुण्याचे पेशवेll
खिक्क्
6 Oct 2014 - 7:11 pm | प्रदीप
२०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.
म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार जी लाट केजरीवाल आणि कं. ने आणली, तिचा त्या केजरीवालच्या पक्षालाच अजिबात फायदा न होता, भाजपला झाला!! क्या बात है!!
काँग्रेस पक्षही अशाच धुंदीत पुढील काही काळ राहो, म्हणजे त्याचा नायनाट तो पक्ष स्वतःच करील, अशी त्या गणरायाच्या च्ररणी प्रार्थना करून, 'घाशीराम' मधील एक तराना येथे उर्धृत करतो:
तनाना तनाना तनाना धीं तनन देरे ना, एक तेचि नाना,
धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब तनाना...
तेव्हा आम्ही सर्व तनाना आहोत, साहेब! आपण एक तेचि नाना!!
6 Oct 2014 - 9:07 pm | श्रीगुरुजी
>>> राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली.
नाना, जरा अभ्यास वाढवा हो. तुमचा इतिहास-भूगोल अगदीच कच्चा आहे. मॅट्रीकच्या परीक्षेत किती मार्क पडले होते हो तुम्हाला या विषयात?
उगाच नेहमीप्रमाणे काहीच्या काही फेकू नका. राम मनोहर लोहिया १९६७ मध्येच गेले. आणिबाणी १९७५-७७ या काळात होती. १९७७ ला आणि नंतर १९८० ला कुठुन आले लोहियांचे आंदोलन? तुम्ही प्रत्येक धाग्यावर फेकाफेकी करता आणि तुमची फेकाफेकी उघडकीला आली की माती खाता. या धाग्यावरही तुम्ही माती खाल्लीत.
>>> २०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.
केजरीवालांच्या लाटेचा केजरीवालांना फायदा न होता भाजपला कसा झाला हो? आपल्या लाटेवर स्वार होऊन निदान केजरीवाल तरी जिंकायला हवे होते ना?
6 Oct 2014 - 9:20 pm | नानासाहेब नेफळे
माफ करा ,लोहिया नव्हे जयप्रकाश नारायण. जेपी मुवमेंट असे वाचा.क्षमस्व.
ADMIN उपरोक्त माझ्या कमेंटमध्ये लोहिया ऐवजी जयप्रकाश नारायण असे करावे.
5 Oct 2014 - 11:04 pm | दुश्यन्त
http://jagatapahara.blogspot.com/2014/10/blog-post_4.html
८० च्या दशकातील शिवसेना भाजप आणि पवार यांच्या राजकारणाचा आढाव घेणारा भाऊ तोरसेकर यांचा लेख वाचनीय आहे.युतीचा फायदा सेनेपेक्षा भाजपलाच जास्त झाला हे त्यांचे निरीक्षण आहे.
.
आजही शिवसेनेचे संघटन मुंबई,ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात बर्यापैकी मजबूत आहे.बहुरंगी लढतीत शिवसेनेलाच या भागात जास्त फायदा होईल. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात चारही पक्षांना जवळपास सारखी संधी आहे (कॉंग्रेस एनसीपीला जर जास्त आहे). विदर्भात प्रामुख्याने भाजप कॉंग्रेस मध्येच लढत होईल.
6 Oct 2014 - 9:04 am | श्रीरंग_जोशी
विदर्भाबाबत जरा असहमत.
पश्चिम विदर्भात व पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात सेनेचे चांगले बस्तान आहे. गेल्या तीनही लोकसभा निवडणुकांत सेनेने चांगले यश मिळवले. परंतु विधानसभांमध्ये मात्र सेनेला तेवढे यश मिळाले नाही. या भागांतील शेतकर्यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.
बाकी भाजपवर टिका करण्यामागे सेनानेतृत्वाची अशी रणनीती असू शकते.
गेल्या पंचवीस वर्षांपासून युती असल्यामुळे दोन्ही पक्षांची स्वतःचे स्वतंत्र व दोघांचे मिळून एकत्रित असे मतदारगट आहेत. केंद्रात भाजपचे बहुमत असणारे (रालोआ) सरकार नुकतेच आले असल्याने त्यांना त्याचा नैसर्गिक फायदा मिळून एकत्रित गटाची बहुतांश मते भाजपला मिळू शकतात. याउलट १९९९ सालानंतर सेनेजवळ राज्याची सत्ता नव्हती व केंद्रातही महत्त्वाचे खाते नव्हते. त्यामुळे एकत्रित मतदारगटाची मते स्वतःकडे वळवायची असल्यास भाजपवर टिका करणे क्रमप्राप्त आहे.
लोकसभा निवडणुकीतील उत्तुंग यशामुळे भाजपचे मतदार सुखावले असले तरी भाजप व त्यांच्या मातॄसंघटनेबद्दल कडवटपणा बाळगणारे अनेक मतदारगट आपल्या राज्यात आहेत. त्यांच्या जोरावरच काँग्रेस व राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकांतील निर्णायक यश अवलंबून होते. इतर कुणाला काहीही वाटो या मतदारगटाला भाजपचे आघाडीवर पोचणे आवडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर कुणालाही मतदान केल्याने भाजपचे नुकसान होण्याऐवजी लाभच होणार आहे. या मतदार गटाने सेनेला मतदान केल्यास दोहोंसाठीही विन-विन परिस्थिती बनू शकते.
हे सर्व अंदाज किती बरोबर आहेत ते १९ तारखेला स्पष्ट होईल किंवा संमिश्र निकाल येऊन नेमके काहीही स्पष्ट होणार नाही.
6 Oct 2014 - 2:53 pm | श्रीगुरुजी
भाउ तोरसेकर काही काळ 'सामना'त होते. त्यामुळे शिवसेनेविषयी त्यांना ममत्व वाटणे स्वाभाविक आहे. सेनेचा भाजपला फायदा झाला असे त्यांचे वैयक्तिक मत असले तरी आकडेवारीचे निष्कर्ष बरोब्बर उलटे आहेत.
शिवसेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला. १९६७, १९७२, १९७८ व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. नाही म्हणायला १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडीक आमदार म्हणून निवडून आले होते. तो एकमेव अपवाद. शिवसेनेचे अस्तित्व फक्त ठाणे व मुंबईतल्या काही ठराविक भागात होते. ठाणे/मुंबईच्या बाहेर शिवसेनेला अस्तित्व नव्हते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर व महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट होती. महाराष्ट्रात त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे ४८ पैकी ३९ खासदार निवडून आले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसशी युती केली होती व मुंबईत २ जागा लढल्या होत्या. इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट असून, मुंबईत लढत असून व इंदिरा काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पडले होते. त्यामुळे मुंबईत सुद्धा सेनेला फारसे अस्तित्व नाही हे सिद्ध झाले.
१९८० च्या एप्रिलमध्ये गुढीपाडव्याला भाजपची स्थापना झाली. लगेचच दीड महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक झाली. त्यात शिवसेनेचे शून्य व भाजपचे स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. आपला बालेकिल्ला समजला जाणार्या मुंबई/ठाण्यात सुद्धा शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. याउलट भाजपने मुंबईत २, ठाण्यात १, कोकणात १, पुण्यात २, मराठवाड्यात १, विदर्भात ३-४ ठिकाणी आपले आमदार निवडून आणले होते. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजपला, १४ वर्षे जुनी असलेल्या सेनेपेक्षा, जास्त भागात व तुलनेने जास्त पाठिंबा आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते.
नंतर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडीक मुंबईतून भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. जर शिवसेना भाजपपेक्षा जास्त मजबूत होती तर मग का ते भाजपच्या चिन्हावर लढले?
नंतर १९८५ मध्ये पुलोदमध्ये सामील झाल्यावर भाजप आमदारांची संख्या १२ वरून १६ वर गेली तर शिवसेनेने पहिल्यांदाच खाते उघडून त्यांचा फक्त १ आमदार निवडून आला होता. मुंबई/ठाण्याला आपला बालेकिल्ला समजणार्या सेनेला तिथल्या ५० हून अधिक जागांपैकी फक्त एका जागेवर जिंकता आले होते. शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते. भाजपचीही फार मोठी ताकद नव्हती, पण भाजपला शिवसेनेच्या तुलनेत जास्त जनाधार होता व भाजपला महाराष्ट्राच्या सर्व भागात कमीअधिक प्रमाणात जनाधार होता.
१९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्यावर सेनेच्या आमदारांची संख्या १ वरून ५२ वर गेली तर भाजप १६ वरून ४२ वर पोहोचला. हे स्पष्ट आहे युती झाल्यामुळे सेनेला भाजपच्या तुलनेत दुप्पट फायदा झाला. सेनेने तब्बल १८३ जागा लढवून फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने १०५ जागा लढवून ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००४ पर्यंत हेच चित्र दिसले. भाजपच्या तुलनेत कितीतरी जास्त जागा लढवून सेना जेमतेम ८-१० जागा जास्त मिळवायची.
२००९ मध्ये तर हेही चित्र फिरले. तब्बल १६९ जागा लढून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ जागा लढून भाजपने ४६ जागा मिळविल्या. म्हणजे १९७९-८० मध्येही सेनेच्या तुलनेत भाजपला जास्त पाठिंबा होता आणि २००९ मध्ये तीच परिस्थिती होती.
मागील आठवड्यात २-३ वृत्तपत्रात, १९९० पासूनच्या निवडणुकातील सेना-भाजप मतांची टक्केवारी आली आहे. १९९० पासून सातत्याने हे दिसले आहे की भाजप जिथे लढतो त्या मतदारसंघात भाजपच्या मतांची टक्केवारी ही शिवसेना ज्या ठिकाणी लढते त्या मतदारसंघांच्या तुलनेत किमान ५ टक्क्यांनी जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा की जर समोरे शिवसेनेचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार सेनेच्या विरोधात काँग्रेस-राकाँला मते देतात आणि समोर भाजपचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार काँग्रेस-राकाँऐवजी भाजपला मते देतात.
याचे निष्कर्ष असे की (१) शिवसेनेच्या तुलनेत भाजपला जास्त मतदारांची पसंती आहे आणि (२) भाजपने शिवसेनेच्या तुलनेत जास्त जागा लढविल्या असत्या तर युतीचे जास्त आमदार निवडून आले असते.
अशा परिस्थितीत भाजपने जास्त जागा मागणे हे तार्किक आहे आणि आपल्याला भाजपपेक्षा जास्त पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही जास्त जागा लढणार हा शिवसेनेचा भ्रम आहे.
असो. घोडामैदान जवळ आहे. दोघेही आता स्वबळावर लढत आहेत. ज्या पक्षाला दुसर्या पक्षापेक्षा कमी जागा मिळतील त्याने निमूटपणे दुसर्याची ताकद मान्य करावी.
5 Oct 2014 - 11:24 pm | दशानन
तुम्ही कधी हरियाणा (NCR नाही) फिरला आहात?
6 Oct 2014 - 12:44 pm | दुश्यन्त
राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.
6 Oct 2014 - 3:00 pm | श्रीगुरुजी
>>> राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही.
राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्या व त्यांचा पाठिंबा घेणार्या राज ठाकर्यांची विश्वासार्हता किती?
>>> मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.
हे नुसते हवेतले अंदाज आहेत.
>>> अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको.
एवढे असूनसुद्धा महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेसला का वारंवार सत्तेवर आणले?
>>> महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.
फारच थोड्या लोकांना शिवसेना किंवा मनसे हे पर्याय जवळचे वाटू शकतील.
13 Oct 2014 - 10:36 am | पिवळा डांबिस
नसतील, राज ठाकरे हे ब्रम्हदेवाची वाणी नसतीलही, पण त्यानी उपस्थित केलेला प्रश्न अगदी योग्य आहे...
जर महाराष्ट्रातील जनता दिल्लीहून येणार्या आदेशावर नाचणार्या मुख्यमंत्र्यांना कंटाळली असेल तर भाजपाला मत देऊन आजच्या काळात त्या परिस्थीतीत कसा बदल घडणार आहे ते सांगा!!!!
भाजपाच्या कुठल्याही स्टेट लिडरची आज मोदी-शहांच्या समोर विरोधात काही बोलायची टाप नाही!
कशाला उगाच मत द्यायचं लोकांनी भाजपाला?
13 Oct 2014 - 10:45 am | नानासाहेब नेफळे
पिडांकाका ,प्रश्न असा आहे कि महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या ताब्यात कशाला द्यायचा? एक कुटुंब राज्याचं भवितव्य ठरवणार?
पश्चिम महाराष्ट्रात बारामती प्रा लि कंपनीने संपुर्ण सहकार, बँकींग, एज्युकेशन इ ई ची वाट लावली .
राज्याचा कारभार राष्ट्रीय पक्षांकडे असल्यास कुणा एकाच्या नव्हे तर लोकप्रतिनीधींच्या निर्णयाने राज्य चालेल.
13 Oct 2014 - 11:12 am | अर्धवटराव
मुळात मोदि, शाह वगैरे महाभाग महाराष्ट्राचं वाईट काबरं करतील? या आर्ग्युमेण्टला काय बेस आहे? महाराष्ट्राचं वाईट मराठी नेत्यांनी आपल्या राज्याचं लॉबींग व्यवस्थीत न केल्यामुळे झालं असेल तर आपल्या अहंकारापायी एका पक्षात एकत्र नांदु न शकणारे ठाकरे महाराष्ट्राचं काय कपाळ लॉबींग करतील? दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का? स्वतः महाराष्ट्राने आपल्याच विदर्भ वगैरे अंगांचं काय भरीत करुन ठेवलं आहे हे आपण बघतोच आहोत. मुंबईचं काय केलय मराठी बाण्याने? (जे आवश्यक होतं करण्यासारखं ते दोन दशकांपुर्वी झालय करुन. त्यानंतर काय? ) सगळ्या गुज्जु भायांना विकत घेऊ शकणारी मराठी उस कारखानदारी ( व तत्सम) श्रीमंती अशी नांगी का टाकते आहे? कुठल्याही बाण्याची बात करता गुजराथ जर अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?
13 Oct 2014 - 6:51 pm | प्यारे१
असे कैच्या कै प्रश्न विचारु नका.
भावना आणि त्याही 'मराठीच भावनाच अत्यंतच महत्त्वाच्याच आहेतच'.
(उ/औपरोधिक लिहीलं आहे. क द लो अ.)
मराठी माणसाला सातत्यानं न्यूनगंडामध्ये रहायला लावून, त्यांना इतर काही न करता केवळ भाषिक राजकारण करायला भाग पाडल गेलं. आजही तसंच होतंय.
13 Oct 2014 - 9:40 pm | पिवळा डांबिस
_/\_
मग प्रश्नच मिटला...
14 Oct 2014 - 1:40 am | डॉ सुहास म्हात्रे
अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?
हे आवडले ! *OK*6 Oct 2014 - 12:45 pm | दुश्यन्त
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.
6 Oct 2014 - 12:56 pm | नानासाहेब नेफळे
JNPT बंदर ,नवी मुंबईचा विमानतळ, कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था ,जैतापूरचा दीड लाख कोटींचा अणु उर्जा प्रकल्प राज्याला काँग्रेसच्या केंद्र सरकारने दहा वर्षात पाच लाख कोटींचे प्रकल्प दिले व या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण?
(संपादित)
6 Oct 2014 - 3:08 pm | श्रीगुरुजी
>>> या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण?
मोठ्या अपेक्षेने यांना राज्याने साथ दिली ,तर हे भाजपचे लोक खाल्ल्या ताटातच हागण्याची तयारी करत आहेत.
मोदी हे पंतप्रधान असल्याने त्यांचा उल्लेख करताना अनादर दाखवू नये असे मी पूर्वी सांगितले होते. पण तुमच्यात सुधारणा नाही. असो.
मोदींनी महाराष्ट्रातील कोणकोणते प्रकल्प कॅन्सल/शिफ्ट केले त्याची यादी व पुरावे आहेत का?
बादवे, खाल्ल्या ताटात *** करणे ही तुमच्या पक्षाची परंपरा आहे, भाजपची नाही. शेतकर्यांना मोफत वीजेचे आश्वासन देऊन निवडणुक जिंकल्यावर "अशी आश्वासने पाळायची नसतात" असे हसतमुखाने सांगणारेच तुम्ही वर लिहिलेले कृत्य करतात.
6 Oct 2014 - 3:04 pm | श्रीगुरुजी
इंदिरा गांधींच्या काळात सर्व निर्णय त्या एकट्या घ्यायच्या. गेली १० वर्षे कोण निर्णय घेत होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याविषयी आनंद शर्मांचे मत ऐकायला आवडेल.
>>> महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.
निवडणुक प्रचारासाठी सभा घेणे यात काय अगतिकता आहे? इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, वाजपेयी इ. सर्व जण पंतप्रधानपदावर असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेत असत. ते सर्व जण अगतिक होते का?
6 Oct 2014 - 3:13 pm | दुश्यन्त
कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. येणारा संपूर्ण आठवडा मोदी एका दिवशी ३-४ सभा घेत फिरणार आहेत. आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत.
6 Oct 2014 - 3:20 pm | श्रीगुरुजी
>>> कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत.
असं कोण म्हणालं? काही पुरावे आहेत का?
>>> पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत.
इतरांचं बघा जरा. भाजपच्या नेत्यांच्या नावाचा व जातीचा जाहीर उल्लेख सुरू आहे. मोदी व शहा यांचे सतत अपमानास्पद उल्लेख करून गुजराती व मराठी यांच्यात काड्या घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, शहांचं नाव आदिलशहा, कुतुबशहा इ. जोडण्याचे असभ्य प्रकार सुरू आहेत.
>>> आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत.
साफ चूक. आधीचे पंतप्रधानसुद्धा भरपूर सभा घेत असत. जितके राज्य मोठे तितक्या सभा जास्त. महाराष्ट्र हे आकाराने दुसर्या क्रमांकाचे राज्य असल्याने इथे सभा जास्त होणारच. जर गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडणुक असती तर एकच सभा पुरेशी होती.
6 Oct 2014 - 3:18 pm | उदयन
इंदीरा गांधींजीची तुलना कुठे तुम्ही १०० दिवस पुर्ण करणार्या श्री मोदी यांच्याशी करत आहेत ?
6 Oct 2014 - 4:12 pm | पुण्याचे वटवाघूळ
आर यू सिरियस? आपले बारामतीचे साहेब केंद्रातून संरक्षणमंत्रीपदावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर नरसिंह राव सरकारमध्ये कोण संरक्षणमंत्री होते? विश्वनाथ प्रताप सिंगांची बदली अर्थमंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात केली त्यापूर्वी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात कोण संरक्षणमंत्री होते? १९८० ते १९८३ या काळातही इंदिरा गांधींनी स्वतः संरक्षण मंत्रालय सांभाळले होते. नंतर वेंकटरामन संरक्षणमंत्री झाले.
बाय द वे, राजीव गांधींनी सुध्दा एक बजेट सादर केले होते.त्यावेळी ते अर्थमंत्रीही होते. नेहरू पंतप्रधान असताना तेच परराष्ट्रमंत्रीही होते.आणि अर्थ किंवा परराष्ट्र ही खाती संरक्षणापेक्षा कमी महत्वाची आहेत असे अजिबात नाही.
तेव्हा उगीच काहीतरी माहित नसताना वाटेल ते फेकू नका.
6 Oct 2014 - 4:14 pm | पुण्याचे वटवाघूळ
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक किती फ्रिक्वेन्सीने होते याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला?
6 Oct 2014 - 4:17 pm | उदयन
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
6 Oct 2014 - 4:27 pm | पुण्याचे वटवाघूळ
ब्रिक शिखर परिषद, संयुक्त राष्ट्र बैठक, शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटी, आणि भविष्यात होणारी जी-२० देशांची शिखर बैठक इत्यादी तुम्हाला पिकनिक वाटत असेल तर तुम्हाला एकूणच गोष्टींची किती जाण आहे याची खात्री पटते. तुमच्यासारख्यांचा प्रतिवाद करण्यात वेळ व्यर्थ घालवला ही चूकच झाली म्हणायची. असो.
6 Oct 2014 - 4:39 pm | उदयन
नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत
एके ठिकाणी ब्रिक जी -२० सारख्या बैठकींना जायचे आनि दुसरी कडे युनोत जाउन "असे गृप झालेच नाही पाहिजे जी-ऑल असायला हवे" सारखे वक्तव्य करायचे याला म्हणतात विरोधाभास आता कोणत्या प्रकारे भारत जी-२० मधे स्थायी सभासद पद मागणार ? जिथे तुम्ही युनोत हे गृप नकोच म्हणुन म्हणतात तिथे हा विरोधाभास कसा करतात
?
6 Oct 2014 - 5:26 pm | पुण्याचे वटवाघूळ
आणि त्या चंदनाबरोबरच १ बिलिअन डॉलर्सची क्रेडिट लाईन कशी विसरलात? १ बिलिअन डॉलर्स पुरेसे आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण मधल्या काळात विशेषतः माओवाद्यांची कटकट चालू असताना नेपाळ भारतापासून दुरावून चीनकडे झुकत होता आणि आपल्याला ते परवडणारे नाही म्हणून अशी थोडीफार कन्सेशन देणे भाग आहे. अर्थात मोदी नेपाळला पिकनिकला गेले असे तुम्हाला वाटत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशी अजिबात अपेक्षा नाही.
6 Oct 2014 - 5:36 pm | उदयन
नेपाळ माओवाद्यांनाकडुन उलट लोकशाही कडे झुकला आहे प्रचंड यांचा पराभव झाला हे त्याचे लक्षण आहे. बाकी राहिले चीन कडे झुकाव जगातल्या सगळ्याच राष्ट्रांना चीनची नियत आनि त्यांचा साम्राज्यवाद माहीत आहे. उगाच आपले पालुपद मांडायचे म्हनुन काहीही ठिगळ लावत जाउ नका.
असो तुम्हाला या गोष्टी अजिबात कळत नाहीतच म्हणुन कैच्याकै ठिगळे जोडणे चालु आहे. एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ? हे पैसे कुठुन आले हे सांगायचे नाही म्हणजेच खोटेच बोलायचे निवडणुक मधे पण खोटे आनि नंतर देखील तेच.. तुम्ही त्यांचाच कित्ता फिरवत आहे हे दिसुन येत आहे
6 Oct 2014 - 5:44 pm | पुण्याचे वटवाघूळ
एक तर पंतप्रधानांचे परदेश दौरे म्हणजे पिकनिक म्हणण्याइतकी तुमची याबाबतीतली समज आहे.मनमोहन पंतप्रधान असतानाही त्यांच्या परदेश दौर्यांविषयी असे कोणीही म्हणाले नव्हते-- अगदी कट्टर मोदी समर्थक सुध्दा. दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?
मोदी आपली तिजोरी रिकामी आहे असे म्हणत इतर देशांमध्ये मदत मागायला कधी गेले होते? मोदी पंतप्रधान झाल्याचा शॉक तुम्हाला सहन झालेला नाही याबद्दल तुमच्याविषयी सहानुभूतीच आहे. तरीही असले काहीतरी कैच्याकै बरळू नका.
6 Oct 2014 - 6:14 pm | उदयन
नीट वाचा आधी "दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?" हे विधान मी कुठे केले ????? कैच्याकै ठिगळे लावायचीत..? जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...
तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .
6 Oct 2014 - 6:21 pm | पुण्याचे वटवाघूळ
ठिक आहे ते तुम्ही नाही दुष्यंत यांनी म्हटलेले आहे. मी लावलेल्या ठिगळांविषयी दिलगिरी. आता तुम्ही लावलेल्या ठिगळांविषयी खुलासा करा---
१. इथे तुम्हीच म्हणता त्याचा अर्थ हा की पंतप्रधानांचे परदेश दौरे ही पिकनिक असते.
२. तुम्ही इथे म्हटल्याप्रमाणे मोदी आमची तिजोरी रिकामी आहे असे म्हणत कुठे आणि कधी गेले होते?
आहेत काही उत्तरे? नसतील तर स्वतःची लावलेली ठिगळे निमूटपणे मान्य करा.
6 Oct 2014 - 6:32 pm | उदयन
पहिल्या १० दिवसातच सांगितलेले आहे कृपया त्या वेळेचे वर्तमानपत्र वाचुन घ्यावे. मी हवेत कधीच काहीच लिहित नाही हे तुम्ही श्रीगुरुजी यांना देखील विचारु शकतात . सरकारची तिजोरी मोकळी आहे काँग्रेस ने घोटाळे करुन तिजोरी रिकामी आहे मला ती तिजोरी आधी भरावी लागणार मग विकासाची कामे करावी लागणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले आहे.
राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते उलट अदानी तिथुन वीज निर्मित करणार होता त्याचे देखील संदर्भ असतील. पण नेपाळवाल्यांनी अडानीला अजुन तरी दाद दिली नाही आहे.. बहुतेक नंतर देखील होउ शकेल ती गोष्ट वेगळी. राहिले अमेरीकन दौरा . तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल. अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते. ज्या एफडीआय ला भाजपाने विरोध केला त्यामुळे मागील सरकार मधे विदेशी गुंतवणुक झाली नाही हवी तितकी . त्याच एफडीआयचे गाजर मोदींनी अमेरिकन कंपन्यांना दाखवले. आणि गुंतवणुक थोडीफार पदरात पाडुन घेतली. जर तेच गाजर दाखवायचे होते ते भारतात बसुन देखील दाखवता आलेच असते . शेवटी त्यांना पैसाच कमवायचा आहे.
बहुतेक आता तुम्हाला मी काय सांगतोय ते कळले असे ही शेवटची अपेक्षा ठेवतो :)
6 Oct 2014 - 7:00 pm | पुण्याचे वटवाघूळ
नेपाळसाठी १ बिलिअन डॉलर्स ही मोठी रक्कम असली तरी भारतासाठी ती तितकी मोठी रक्कम नाही हे समजून यायला अडचण येऊ नये. विशेषतः कधीच हवेत न बोलणार्यांसाठी. १ बिलिअन डॉलर्स म्हणजे सुमारे ६१०० कोटी रूपये.आणि ही रक्कम मोठी की नेपाळबरोबर संबंध सुधारणे अधिक महत्वाचे हा निर्णय घेण्याची पात्रता तुमच्यापेक्षा कोणाही भारतीय पंतप्रधानाकडे (अगदी चरणसिंग-चंद्रशेखर-देवेगौडा सुध्दा) अधिक आहे/होती याविषयी नक्कीच खात्री आहे.
उदयन हे काय मानतात यावर भारताची परराष्ट्रनिती अवलंबून नाही ही किती सुदैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही हवे ते माना हो भारतातल्या जनतेने आपली पसंती मोदींना दिली आहे त्यामुळे तुम्ही काय मानता ही बाब पूर्ण गौण आहे.
कमाल आहे.मग या न्यायाने कुठच्याच अमेरिकन अध्यक्षांबरोबर कसलीच चर्चा करू नयेत की कसलेही करारमदारही करू नयेत.मुळात अध्यक्षांच्या टर्ममध्ये पहिल्या २२ महिन्यातच मिड-टर्म निवडणुका होतात. त्यापूर्वीचे दोनेक महिने तरी त्यातच जातात. म्हणजे अध्यक्षांची टर्म सुरू झाल्यापासून मिडटर्म निवडणुकांपर्यंतही तशी दिडेक वर्षच की.मिडटर्म निवडणुका होतात ना होतात तोच आणखी सव्वा-दिड वर्षात अध्यक्षीय निवडणुकांसाठी प्रायमरी सुरू होतात. मग प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका.तेव्हा तुम्ही लावत आहात त्याच न्यायाने अमेरिकेत काहीच व्हायला नको. अर्थातच परराष्ट्रसंबंधांमध्ये अमेरिकेत (आणि भारतातही) बर्याच अंशी सरकार कोणत्या पक्षाचे आहे त्याचा फार फरक पडत नाही हे तुमच्यासारख्या पिकनिकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा नाहीच. बिल क्लिंटन आणि बुश वेगळ्या पक्षांचे नेते होते तरीही बुश यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध क्लिंटन यांच्या काळात होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले हे कोण लक्षात घेतो?
मी म्हणतो की पी.एम.ओ आणि उदयन यांच्यात डायरेक्ट हॉटलाईनच प्रस्थापित करावी.म्हणजे कसे पंतप्रधानांना नक्की काय निर्णय घ्यावा याविषयी तज्ञ मार्गदर्शन डायरेक्ट उदयन यांच्याकडूनच होऊ शकेल.
:)
6 Oct 2014 - 7:18 pm | उदयन
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही ;)
ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी .
सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. हेच काय ते अच्छे दिन होते. ( आता लिहु नका की केंद्रा कडुन आदेश आले आहेत की चोख प्रत्युतर द्यावे. सरकार कोणाचे ही असो आपले सैनिक चोख प्रत्युतर देतच असते. केंद्राच्या आदेशाची वाट बघत नाही कारण तो आधीच पब्लिसिटी स्टंट न करता पिएमओ यांनी दिलेलेच असतात ) फक्त आताचे सरकार टिव्हीच्या कॅमेरावर सांगत असते की आदेश दिलेला आहे कैच्याकै बोलायचे म्हणुन बोलतात
6 Oct 2014 - 9:28 pm | पुण्याचे वटवाघूळ
तुम्ही कितीही आक्रस्ताळेपणा केलात तरी २०१९म्पर्यंत मोदीच पंतप्रधान राहणार आहेत. तेव्हा इनो घ्या. बरं असतं प्रकृतीला.
15 Oct 2014 - 9:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत.
15 Oct 2014 - 9:26 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद वाचले.
ब्रिक्स, युनो आणि ईन ऑल आंतरराष्ट्रीय संबध सांभाळायसाठी करायला लागणार्या गोष्टी पिकनिकमधे मोडतात? सर्वसमावेशक असा एक मंच हवा म्हणुन जी-ऑल ची मागणी केली तर कुठे काय बिघडलं?
फिगर ऑफ स्पीच नावाची गोष्ट सर्व भाषांमधे अस्तित्वात असते. अयोग्य कारणांमधे खाल्ला गेलेला पैसा परत गोळा करायचाय असा अर्थ नसु शकतो?
पंतप्रधान भारताचे आहेत का भाजपाचे?
मग पंतप्रधानांनी स्वतः बंदुक रणगाडे घेऊन लढायला जावं अशी तुमची अपेक्षा आहे का? पंतप्रधान त्यावर बोलतं नाहीत? मग पाकिस्तानशी आता चर्चा नाही असं कोणं म्हणाल बॉ? सैन्याला फ्री हँडचे आदेश काय आकाशवाणी होऊन मिळाले का?
आंतरराष्ट्रिय संबध ही प्रचंड नाजुक गोष्ट असते. एक चुकीचा शब्द प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करु शकतो. आपलं हित जपतानाच आपले हितचिंतक वाढवणे, आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सहकारी मिळवणे ही काय सोपी गोष्ट वाटली का? त्यासाठी आर्थिक मदत, इन्फ्रस्ट्रक्चर, लष्करी मदत अश्या स्वरुपात मदत करावीच लागते.
9 Oct 2014 - 8:08 pm | lakhu risbud
अचं कचं ,अचं कचं उगी हां !
आपन ना पुडच्या वेली ना मोदि अंकल ना भाषन ना तुमच्या कडून लिउन घैला सांगू हां !
6 Oct 2014 - 5:18 pm | दुश्यन्त
महिन्यातून एकदा कोण म्हणताय. सरकार येवून ४ महिने उलटले.कुठे आहात?
6 Oct 2014 - 5:25 pm | उदयन
भक्त मिडीयाने त्या मुद्द्याची चर्चाच केली नाही परंतु युनोत त्या मुद्याची नक्कीच चर्चा होईल
समजा तुम्ही मिपावर एक गृप बनवला आणि दुसर्या ग्रुप चे सभासद घ्यायच्या प्रयत्नात आहेत
आणि दुसरी कडे मिपाच्याच अॅडमिन ला सांगत आहे की असे गृप बनने हानिकारक आहे हे बंद करा.
आता तुम्ही परत गृप चे सभासद कोणत्या तोंडाने मागायला जाणार आहे.. ते ग्रुपवाले घेतील का ?
परराष्ट्रनिती सुषमा स्वराज यांनाच सांभाळु द्यावी ही कळकळीची विनंती मोदीसाहेबांना करत आहे
15 Oct 2014 - 1:57 am | निनाद मुक्काम प...
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला?
हे आवडले
मागे एकदा एका धाग्यावर लिहिले होते मोदी विरोधकांना कुठून कुठून शोधून मुद्दे काढावे लागतात , पण त्याची अवस्था खोदा पहाड निकाला चुहा , म्हजे म्हणी मध्ये ओरीजनल चुहा असेच आहे ,
हा शहा ह्यांचा चुहा नाही आहे.
6 Oct 2014 - 2:26 pm | दुश्यन्त
श्रीरंग जोशींशी सहमत!
...या भागांतील शेतकर्यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.+१
उद्धव ठाकरेंनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला होता. उद्धव बोलायला शामळू वाटतात, वक्तृत्व प्रभावी नाही वगैरे चर्चा होतात मात्र संघटन कौशल्य चांगले आहे. एखादा असता तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे झुकून जागावाटपात गप्प राहिला असता मात्र सुरुवातीला १६९ वरून १६० आणि नंतर १५१ अश्या जागा दिल्यावर आता याख्ली येणार नाही असे रंगशारदामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले होते. सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत.
6 Oct 2014 - 3:10 pm | श्रीगुरुजी
>>> सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत.
हो का? पण भाषणातून "मायभवानीची शपथ, मर्दमराठा, शूर मावळे, अमक्याचा कोथळा बाहेर काढला, तमक्याला गाडले" अशीच वाक्ये फक्त ऐकू येतात आणि त्यात वेगळेपण काहीच नाही कारण शिवसेना जन्मापासून हेच बोलत आली आहे.
6 Oct 2014 - 3:15 pm | दुश्यन्त
शिवछत्रपतींची साथ तर आता भाजपला पण घ्यायला लागत आहे. शिवसेनेने व्हिजन डोक्यूमेंट देवून सुरुवात तरी केली आहे.
6 Oct 2014 - 3:24 pm | श्रीगुरुजी
शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक पक्ष वापरतो. भाजपने वापरले तर त्यात वावगे काय?
आणि शिवसेनेचे व्हिजन डॉक्यूमेंट एवढे प्रभावी असेल तर शिवसेनेचे नेते त्यावर बोलण्याऐवजी प्रत्येक भाषणातला ९० टक्क्यांहून अधिक वेळ भाजप व मोदींना शिव्या देण्यात का वाया घालवित आहेत?
6 Oct 2014 - 3:22 pm | उदयन
वृत्तपत्रात पहिल्याच पानावर मोदींचा चेहरा असलेली भाजपाची जाहीरात पाहण्यात आली
"घेउन शिवरायांचा आशिर्वाद चला मोदी संगे" असे काहीतरी होती
इतक्या मोठ्या पानावर फक्त मोदीच होते. ज्यांच्यानावाने मत मागत आहेत ते "शिवराय" यांचा छोटासा देखील फोटो कुठेच दिसत नाही ? यावरुन भाजपाची वृत्ती आनि व्यक्तिकेंद्री राजकारण ( जे गांधीं नावावर गावभर ढोल वाजवत होते) दिसुन येते
6 Oct 2014 - 4:33 pm | ऋषिकेश
शिवसेनेच्या काही जाहिराती पाहिल्या.
बहुतेक सर्वच पक्षांच्या जाहिराती दिसत असतात. या जाहिरात युद्धात नेमका मेसेज अतिशय मनस्वीपणे व बटबटीतपणा टाळून पोचवणार्या शिवसेनेच्या जाहिराती सर्वात प्रभावी वाटत आहेत.
====
एका मुलाखतीत आदित्य ठाकरेचे बोलणे किमान राहुल गांधींपेक्षा नक्कीच उजवे वाटले (आणि उद्धव ठाकरे, तसेच गडकरी-फडणवीस यांच्यापेक्षाही )
मुंबईतील लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेतला तर तिथे भाजपाला व त्यांच्या समर्थकांना वाटतेय तितकी ही लढाई सोपी जाणार नाहीये. मुंबई (शिवसेना वि काँग्रेस वि भाजपा), प. महाराष्ट्र (राकॉ वि स्वाभिमानी/भाजपा वि काँग्रेस), नाशिक/खानदेश (शिवसेना वि राकॉ वि कॉ वि मनसे), कोकण (शिवसेना वि काँग्रेस) अशा मुख्य लढती होत असताना
निव्वळ मराठवाडा (तिथेही मुंडे नाहित पण सिंपथी वेव्ह आहे असे समजु) व विदर्भ (गडकरींचा अर्थपूर्ण सहभाग गृहित धरू) यांच्या जोरावर विधानसभा मिळवता येणार नाही.
6 Oct 2014 - 4:41 pm | उदयन
राहुल जर नसता तर मोदींना निवडणुक कठिण गेली असती. त्यामुळे राहुलची तुलना कोणत्याच नेत्यांबरोबर करणे चुकिची आहे
6 Oct 2014 - 5:38 pm | उदयन
गुरुजी हे घ्या.. जरा बघा तथ्ये काय आहेत ते. इतका तुमचा गुजरात मागे कसा. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?
7 Oct 2014 - 6:52 pm | उदयन
गायबले ?
सत्य परिस्थिती दाखवली की भक्तगण गायब होतात. ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने . उत्तरच नाही त्यावर कुणाचे
10 Oct 2014 - 7:18 am | अनुप ढेरे
आकडे रँडम आहेत त्या जाहिरातीतले.
'
त्याच गुजरात मॉडेलनी १०पैकी ७ सीटा दिल्या होत्या बहुदा
6 Oct 2014 - 6:02 pm | प्रसाद१९७१
भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन.
त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर.
अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी.
6 Oct 2014 - 8:57 pm | श्रीगुरुजी
>>> भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर.
शिवसेनेच्या वळचणीखालून कधीतरी बाहेर पडणे आवश्यक होते. २०१४ ची विधानसभा निवडणुक ही त्यासाठी सर्वोत्कृष्ट संधी होती. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे शक्य दिसत नाही. पण तरीसुद्धा दोघातला खरोखर मोठा कोण हे निकालानंतर नक्कीच ठरेल आणि भविष्यात परत युती झाली तरी त्यात असमान जागा वाटप होणार नाही हे नक्की.
जर दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहत असतील आणि एक भाऊ दुसर्यापेक्षा वेगाने प्रगती करीत असेल तर ते वेगळे होणे स्वाभाविक आहे आणि वेगळे होणेच योग्य. वेगळे झाल्यामुळे कमी वेगाने जाणार्या भावाची वेगाने जाणार्या भावाबरोबर फरपट होणार नाही व जास्त वेगाने जाणार्या भावाला संथ चालणार्या भावामुळे रेंगाळत रहावे लागणार नाही. युतीच्या बाबतीत हेच होणे स्वाभाविक होते.
>>> अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी.
१९ ऑक्टोबरला ठरेल निर्णय योग्य होता का चुकीचा. युती टिकली असती तर युतीला नक्कीच २०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या, पण भाजपला शिवसेनेची मुजोरी सहन करीत कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली असती. आता स्वबळावर कोणालाच बहुमत मिळणार नाही, परंतु भाजपचे जे काही आमदार निवडून येतील ते स्वबळावर असतील. त्यामुळे स्वबळाचाही नक्की अंदाज येईल व भविष्यात सेनेच्या मुजोरीसमोर झुकण्याची गरजच नाही.
14 Oct 2014 - 3:07 pm | प्रसाद१९७१
अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा विचार आहे का?
प्रार्थमिकता शप, अप, छ्भु, नारा ह्यांचे राज्य संपवण्याची ठेवायला पाहीजे होती. ते देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्वाचे होते. भाजप चा मुख्यमंत्री आहे का शिवसेनेचा महत्वाचे नव्हते.
देश पक्षाच्या आधी येतो हे कळत नाही का?
14 Oct 2014 - 9:21 pm | श्रीगुरुजी
आपली ताकद सेनेपेक्षा जास्त असताना भाजपने का दुय्यम भूमिका घ्यावी हाच मुख्य प्रश्न आहे. नारा, छभु इ. चे राज्य संपवायचे ही प्राथमिकता आहेच, परंतु भाजपने पडते घेऊनच ही प्राथमिकता प्रत्यक्षात येईल आणि भाजपने एकटे लढले तर ही प्राथमिकता प्रत्यक्षात येणारच नाही हे कशावरून?
सेनेबरोबर युती तोडल्याचे भाजपला आज हायसं वाटलं असेल. २५ वर्षे ज्या पक्षाबरोबर युती होती त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात आपल्याविषयी इतका विखार भरलेला असेल याची भाजपला कल्पना नव्हती. आज तर प्रत्यक्ष मोदींच्या वडीलांचा उद्धार करेपर्यन्त सेनेची मजल गेली. आता बहुमत मिळालं नाही तरी सेनेचं जोखड खांद्यावरून कायमचं उतरलं याचा भाजपला नक्कीच आनंद होईल.
15 Oct 2014 - 10:23 am | प्रसाद१९७१
सेनेचे जोखड खरच उतरले का? निवडणुक झाल्यावर त्यांच्याशीच युती करावी लागणार.
आणि केंद्रात तो बिनकामाचा मंत्री कशाला ठेवला आहे मोदींनी, त्याला पहीला हाकलून द्यायला पाहीजे.
16 Oct 2014 - 1:12 pm | श्रीगुरुजी
गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून मोदींनी स्वतःची व भाजपची प्रतिमा उंचावली आहे. एकीकडे मोदींना अफझलखानाची उपमा देताना व मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देताना, त्याच मंत्रीमंडळात तुमचा मावळा कसा या अडचणीत आणणार्या प्रश्नाला शिवसेनेकडे उत्तर नाही. दुसरीकडे गीते स्वतःहून गेले तर उत्तम अन्यथा त्यांना न काढता आपण सूडबुद्धी ठेवत नाही अशीच मोदींनी प्रतिमा निर्माण केली आहे. गीते मंत्रीमंडळात असल्याने भाजपला काहीच अडचण नाही परंतु शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे.
जर महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळून भाजपचे सरकार स्थापन झाले तर काही काळाने दिल्लीत शिवसेनेत फूट पडून सेनेचे बहुसंख्य खासदार भाजपत सामील होतील किंवा पक्षादेश झुगारून मोदींना पाठिंबा देतील. गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून भाजपने शिवसेनेसाठी आपले दार अजूनही थोडेसे उघडे ठेवलेले आहे.
6 Oct 2014 - 9:11 pm | श्रीगुरुजी
आता उद्धव ठाकर्यांना मोदींचे मंत्रीमंडळ ही अफझलखानाची सेना वाटत आहे. या अफझलखानच्या सैन्यात आपलाही एक मावळा आहे याचे त्यांना विस्मरण झालेले दिसतेय.
6 Oct 2014 - 10:56 pm | नानासाहेब नेफळे
तुम्हाला नाही ना झाले विस्मरण?
मग काढा ना त्या गितेला मंत्रिमंडाळातून, का भीती वाटतेय मराठी मते जाण्याची?
7 Oct 2014 - 11:27 am | श्रीगुरुजी
त्यांना मंत्रीमंडळातून काढल्याने मराठी मते का जातील? गीते एकटेच अखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात असा तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय. मंत्रीमंडळात इतर अनेक मराठी मंत्री आहेत. मोदींना शिव्या देताना शिवसेनेचच हसं होतंय. त्यांची जीभ अगदी सैल सुटली आहे, पण सत्तालोभामुळे दिल्लीत व मुंबई/ठाणे महापालिकेत भाजपशी संबंध तोडायची तयारी नाही.
मोदींनी अत्यंत प्रगल्भपणा दाखवून, शिवसेनेवर अजिबात बोलणार नाही, असे सांगून केवळ २-३ वाक्यात भाजप आणि शिवसेनेत किती फरक आहे ते दाखवून दिलंय. शिवसेनेचे व मनसेचे सर्व नेते भाजपविरूद्ध कमालीचा थयथयाट व त्रागा करत असताना दोघांनाही मोदींनी अनुल्लेखाने मारून आपली प्रगल्भता दाखवून दिली. अर्थात यातून सेनेच्या व मनसेच्या नेत्यांना प्रगल्भता येण्याची सुतराम शक्यता नाही.
7 Oct 2014 - 10:06 pm | काळा पहाड
गुरुजी, एक सल्ला आहे.
जॉर्ज बर्नार्ड शाँच एक वाक्य असं आहे: “Never wrestle with pigs. You both get dirty and the pig likes it.” डुकरांशी कुस्ती खेळू नका. तुम्ही दोघेही घाणीने तर माखालच, आणि डुकराला तेच आवडतं.
दुसरं जॉर्ज कार्लिनचं एक वाक्य असं आहे: “Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience.”
मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं आणि मग ते तुमच्यावर अनुभवाने मात करतात.
बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.
10 Oct 2014 - 7:04 pm | प्रतापराव
वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी लोकांच्या म्हणी दिल्या आहेत छान आहे पण हा धागा काथ्याकुट मध्ये आहे काथ्याकुट होणारच आपल्या आवडत्या पक्षावर टीका झाली म्हणून खचून जावू नका काळा पहाड.. . चार नेत्यांचे चार समर्थक आपल्या पक्षाची बाजू मांडणारच. आता नेतेच पातळी सोडून एकमेकांवर शिव्यागाळ करतात तर मिपाकरांनी काय घोडे मारलेय...
माझ्या मते भाजपला सर्वाधिक जागा मिळतील पण त्या ७० च्या घरात असतील ते राष्ट्रवादीची नि इतर छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेवून सरकार बनवण्याची शक्यताच जास्त वाटतेय. भाजपा-७०, शिवसेना-४५,कॉंग्रेस-६५ राष्ट्रवादी-५४ मनसे-१५ बाकी इतर.
7 Oct 2014 - 9:23 am | चौकटराजा
अफझल खान हा दिल्लीहून कसा काय आला .....? बर आला तर तो भेट घ्यायला मिठी मारायला आला होता ना ? इथे तर
२५ वर्षाची मिठी सैल झालेली दिसतेय.
7 Oct 2014 - 1:50 pm | पैसा
ही इथली शिवीगाळ बघता क्लिंटनसारखे लोक निवडणुकांबद्दल काही लिहितील असं वाटत नाही! =))
7 Oct 2014 - 3:45 pm | अजया
=))
8 Oct 2014 - 2:13 pm | श्रीगुरुजी
सट्टेबाजांचा अंदाज
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bookies-predic...
8 Oct 2014 - 11:41 pm | श्रीगुरुजी
बुकींचा स्वतःचा पूर्ण अंदाज
9 Oct 2014 - 12:59 pm | श्रीगुरुजी
हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे,
हा त्यावरील सविस्तर लेख
http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15959/1/maharashtra-assembly-el...
हे आकडे खरे होतील की खोटे यावर माझे काहीही मत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
10 Oct 2014 - 3:19 pm | विजुभाऊ
हे आकडे भाजप प्रणीत आहेत
10 Oct 2014 - 10:12 pm | श्रीगुरुजी
कालपासून अनेक सर्वेक्षणांचे आकडे आले आहेत.
हे कालच्या सर्वेक्षणांचे आकडे
आणि हा त्यावरील लेख
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bjpallies-154-seats-electi...
10 Oct 2014 - 10:36 pm | श्रीगुरुजी
काल 'झी २४ तास' च्या दुसर्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल
- भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३
आताच पाहिलेल्या २ सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.
(१) एबीपी-नेल्सन
भाजप - १२०, शिवसेना - ६७, काँग्रेस - ४६, राष्ट्रवादी - ३६, मनसे - ८
(२) इंडिया टीव्ही
भाजप : १३२-१४२, शिवसेना : ५२-६२, काँग्रेस : ३८-४८, राकॉं : ३३-४३, मनसे : ७-१३
आतापर्यंत जे अंदाज आहेत त्यांच्यामुळे गोंधळ अजूनच वाढलेला आहे. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल व मनसे हा सर्वात लहान पक्ष असेल हा समान मुद्दा आहे. मात्र एकूण जागांचा अंदाज खूप गोंधळात टाकणारा आहे.
भाजपला मिळणार्या जागांचा अंदाज ९६-१५४ इतक्या मोठ्या कक्षेमध्ये आहे. शिवसेना ३८-६७ हीदेखील मोठी कक्षा आहे. काँग्रेस २५-६३ आणि राकाँ १६-४३ हा देखील खूप मोठा फरक आहे. सर्वांनीच मनसेला २० च्या आत जागा दिल्यामुळे मनसे अदखलपात्र पक्ष आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात जागांचा अंदाज काढणे अत्यंत अवघड झाले आहे.
10 Oct 2014 - 10:41 pm | श्रीगुरुजी
हरयाना राज्यासाठी खालील अंदाज आजच प्रसिद्ध झाले आहेत.
१) एबीपी-नेल्सन
भाजप - ३६, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - ३३, काँग्रेस - १६, इतर - ५
(२) इंडिया टीव्ही
भाजप - ३४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २७, काँग्रेस - १९, इतर - १०
हरयानात काँग्रेसचा दारूण पराभव निश्चित दिसतो व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. भारालो व भाजप मध्ये कमालीची चुरस दिसते. बहुमतासाठी किमान ४६ जागांची गरज आहे. काँग्रेस, भाजप व भारालो यापैकी कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तर ४६ चा आकडा पार होतो. परंतु असे होण्याची शक्यता शून्य आहे.
अगदी अशीच परिस्थिती डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीत निर्माण झाली होती. हरयानादेखील दिल्लीप्रमाणे राष्ट्रपती राजवटीकडे निघाला आहे असे दिसत आहे.
11 Oct 2014 - 11:10 am | क्लिंटन
हरियाणामध्ये भाजपला इतक्या जागा सर्वेक्षण देत आहे याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे.महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्ये भाजपपुढचा मोठा प्रश्न म्हणजे राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाचा अभाव.पूर्वी सूरज भान हे पक्षाचे तसे बऱ्यापैकी मोठे नेते होते तरीही राज्यपातळीवर नेतृत्व देऊ शकत नव्हते.सुषमा स्वराजही अंबाल्यातून हरियाणा विधानसभेवर निवडून जात.त्या राज्यात थांबल्या असत्या तरी राज्यात पक्षाला नेतृत्व मिळाले असते.पण १९९० च्या दशकाच्या सुरवातीलाच त्या केंद्रीय राजकारण्यात गेल्या आणि राज्यापासून दूरच गेल्या.१९९६ मध्ये भाजपने बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पक्षाशी युती करून निवडणुक लढवली होती.त्यावेळी रामविलास शर्मा यांचे नेतृत्व राज्यात येईल असे दिसत होते.पण २००० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव अनेक वर्षे कुठेच नव्हते.मागच्या वर्षी ते प्रदेशाध्यक्ष झाले.वाजपेयी सरकारमधील मंत्री आय.डी.स्वामी २००४ आणि २००९ मध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आणि वाढत्या वयामुळे सक्रीय नाहीत. बाकी नाव घ्यावा असा कोणीच नेता पटकन डोळ्यासमोर येत नाही. विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरचा चेहरा मतदारांपुढे ठेवावा लागतो.लोकांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावाने मते दिली.परत विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याच नावाने मते देतील का हा प्रश्नच आहे.
10 Oct 2014 - 10:52 pm | श्रीगुरुजी
वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे मानले तर खालील शक्यता आहेत.
(१) भाजप + शिवसेना
असे होण्याची अगदी थोडीशीच शक्यता आहे. या दोन पक्षातील वितुष्ट इतके विकोपाला गेले आहे व विशेषतः शिवसेनेचा अहंकार इतका तीव्र आहे की हे दोघे पुन्हा एकत्र यायचे असतील तर शिवसेना जवळपास अशक्य अशा अटी पुढे ठेवेल व त्यामुळे ते एकत्र येणार नाहीत.
(२) भाजप + राष्ट्रवादी किंवा भाजप + काँग्रेस - अशी युती होण्याची शक्यता शून्य आहे.
(३) काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना - मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार व कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या मुद्द्यांवरून प्रचंड भांडणे होऊन अशी आघाडी प्रत्यक्षात येणार नाही. तसेच काँग्रेस शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी व अमराठीविरोधी पक्षाबरोबर आघाडी करण्यास नक्कीच कचरेल. विशेषतः शिवसेनेच्या उत्तर भारतीय व बिहारींविरूद्ध असलेल्या भूमिकेमुळे व २०१५ मध्ये होणार्या झारखंड व बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस शिवसेनेबरोबर आघाडी करणार नाही.
(४) जर भाजप १४५ च्या खूप जवळ पोहोचला (१३० पेक्षा जास्त) व मनसेला १५ च्या आसपास जागा असतील तर कदाचित ते दोघे एकत्र येऊ शकतात. परंतु उद्धवप्रमाणेच राज ठाकरेचा अहंकार अत्यंत तीव्र आहे व तो अत्यंत बेभरवशाचा असल्यामुळे अशी युती झाली तरी ती टिकणार नाही.
(५) त्यामुळे जर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन वर्षभरात पुन्हा निवडणुक होईल.
10 Oct 2014 - 11:53 pm | नानासाहेब नेफळे
माझा अंदाज
भाजप ९० ९५
शिवसेना ७० ७५
काँग्रेस ५० ५५
राष्ट्रवादी ३५ ४०
आरपीआय रासप स्वा शे १५ १७
मनसे १० १५
ईतर १५ २०
11 Oct 2014 - 12:25 pm | क्लिंटन
वेगवेगळी सर्वेक्षणे भाजपला २८-३०% मते देत आहेत.चौरंगी-पंचरंगी लढतीत २८-३०% मते २८८ पैकी ११०-१२० जागा नक्कीच देऊ शकतील.त्यातही भाजपची मते ही अधिक concentrated असतात त्यामुळे तेवढीच मतांची टक्केवारी असूनही पक्ष जास्त जागा मिळवू शकतो.मला वाटते की शिवसेनेने काही अक्षम्य चुका केल्या आहेत त्याचा फायदा भाजपला मिळून भाजप ११०-१२० जागा मिळवू शकेल.
१. युती तुटल्यापासून शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच लक्ष्य बनवत आहे.राज ठाकरेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य बनवित आहेत पण त्याचबरोबर मोदी हे पण टार्गेट आहेतच. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीही शिवसेनेपेक्षा भाजप आणि मोदींवरच टिका करत आहेत. त्यामुळे असे चित्र हळूहळू उभे राहत आहे की ही निवडणुक विधानसभेची असली तरी आघाडी सरकारच्या कामावरील मत यापेक्षा नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे असे स्वरूप येत आहे. असे स्वरूप येणे भाजपसाठी चांगलेच आहे.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांच्या मतांना एकवटायला भाजप हाच मोठा पर्याय उभा राहिला आहे. इतर पक्षांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही मोदी हे मोठे शत्रू वाटतात असे लोकांना वाटले तर ते चुकीचे ठरू नये.
२. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे तुकडे करणार इत्यादी गोष्टी शिवसेनेला दर निवडणुकीच्या वेळी आठवतात तशा यावेळीही आठवल्या आहेत.या सगळ्या गोष्टी बोलायला शिवसेनेबरोबरच राज ठाकरेही आहेतच. इतकेच काय तर नारायण राणेही रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईतून हलविणार इत्यादी गोष्टी बोलत होते. नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे हे धृवीकरण करण्यात या मंडळींनीच हातभार लावला आहे.एकतर स्वत: नरेंद्र मोदींनी तसे होणार नाही असे जाहीरपणे सांगितले.स्वतंत्र विदर्भावर मोदींनी सांगितल्यानंतरही संभ्रम होता.पण पक्षाच्या जाहिरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही.तसेच गेल्या १-२ दिवसात पक्षाचे स्वतंत्र विदर्भवादी वाचाळवीर थोडे शांत आहेत. या सगळ्यातून एकतर शिवसेनेच्या मुद्द्यातील हवा बरीच कमी झाली आणि या निवडणुकीला विनाकारण मराठी विरूध्द गुजराती असे स्वरूप दिले गेले आहे आणि ते दिले भाजपने नाही तर शिवसेनेने.निदान मुंबईत बोरीवली,पार्ले, घाटकोपर,मुलुंड या भागातून एकगठ्ठा गुजराती मते भाजपला मिळतील याची व्यवस्था शिवसेनेने त्यातून करून ठेवली आहे.
३. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देणे ही उध्दव ठाकरेंची अक्षम्य चूक आहे असे मी म्हणेन.चार-पाच महिन्यांपूर्वीच लोकांनी नरेंद्र मोदी या एका नावावर भरभरून मते दिली होती.कदाचित एप्रिल-मे इतका नसेल पण नरेंद्र मोदी या नावाचा दबदबा अजूनही लोकांमध्ये आहेच.त्यामुळे खास शिवसेना स्टाईल शिवराळ भाषेत नरेंद्र मोदींना अशी उपमा दिल्यामुळे मोदींविषयी सद्भावना असलेल्या निदान काही लोकांची मते भाजपलाच मिळतील अशी व्यवस्थाही उध्दव ठाकरेंनी करून ठेवली आहे.
४. निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार अशा स्वरूपाच्या बातम्या कालपरवापासून येऊ लागल्या आहेत.यातून शिवसेना-मनसेच्या पारंपारिक मराठी मतदारांमध्ये संभ्रम वाढणार आहे हे नक्की.मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी थोडेफार "तगडे" उमेदवार दिले आहेत. उदाहरणार्थ दहिसरमध्ये मनसेकडून माजी महापौर शुभा राऊळ विरूध्द शिवसेनेकडून विनोद घोसाळकर, मागाठाणेमधून मनसेकडून प्रवीण दरेकर विरूध्द शिवसेनेकडून (२००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दरेकरांना चांगली टक्कर दिलेले) प्रकाश सुर्वे, दिंडोशीत मनसेकडून शालिनी ठाकरे विरूध्द शिवसेनेकडून महापौर सुनील प्रभू, वांद्रे पूर्व मधून मनसेकडून शिल्पा सरपोतदार विरूध्द शिवसेनेकडून प्रकाश (बाळा) सावंत इत्यादी.मुळातच या दोन तुल्यबळ उमेदवारांमधील निवडणुक आणि त्यात हे नंतर एकत्र आले तर काय हा संभ्रम. अशा वेळी या दोन पक्षांना मानणाऱ्या मराठी मतांमध्ये उभी फूट पडून त्याचा फायदा इतरांना मिळायची शक्यता जास्त. तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त.राज ठाकरेंचा उत्तर भारतीय विरोध आणि शिवसेनेचा गुजराती विरोध यातून हे दोन समुदाय हे दोन्ही पक्ष ज्याला विरोध करत आहेत त्या पक्षाकडे--भाजपकडे वळायची शक्यता जास्त. मुंबई परिसरात अमराठी मतांची संख्या बरीच आहे आणि या परिसरात शिवसेना-मनसे यांच्यात मतविभागणी होणार असेल तर भाजपची वाट आणखी सोपी होईल.काही प्रमाणात कॉंग्रेसलाही याचा फायदा होईलच.
५. सीमेवर गोळीबार चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात काय करत आहेत म्हणून हाकाटी इतर सगळ्या पक्षांनी केली.अशा प्रकारचा प्रचार ही एक दुधारी तलवार असते. कालपासून सीमेवरील गोळीबार थंडावला आहे, भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे--त्यांनी एक गोळी मारली तर तुम्ही तीन गोळ्या मारा हे आदेश होते हे महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे. तसेच लंडनमधील एका वर्तमानपत्रात असेही आले आहे---"The volume and intensity of India’s return fire is much higher than the usual calibrated response the Pakistanis have come to expect." याचा अर्थ आजपर्यंत भारत अशा आगळिकींना हातचे राखून प्रत्युत्तर देत असे पण यावेळी आपण जोरदार उत्तर दिले आहे. अर्थातच सामान्य मतदार मत देण्यापूर्वी लंडनमधील वर्तमानपत्रे वाचायला जाणार नाही.पण सीमेवर शांतता किमान मतदानापर्यंत टिकत असेल आणि पाकिस्तानकडून गोळीबार बंद होत असेल (एका अर्थी पाकिस्तानने माघार घेतली असेल) तर ते मतदारांना नक्कीच समजते. हा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये यायची खरं म्हणजे फारशी गरज नव्हती.पण तो आणला कोणी? शिवसेना-मनसे आणि कॉंग्रेसने.बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजपला नाही झाला (किंवा असा फायदा उठवायचा प्रयत्न भाजपकडून झाला नाही) तर नवलच.
एकूणच काय की विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवायला स्थानिक चेहरा लागतो हा माझा अत्यंत आवडता hypothesis आहे. या फ्रंटवर निवडणुक लढविली गेली असती तर भाजप नक्कीच अडचणीत आला असता. पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. अर्थातच भाजपला लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यश मिळेल असे मला स्वत:ला नक्कीच वाटत नाही.तरीही ११०-१२० जागांपर्यंत जायला हरकत नसावी.
11 Oct 2014 - 12:44 pm | सव्यसाची
क्लिंटन सर,
तुमच्या विश्लेषणाची वाट पाहत होतोच. धन्यवाद !
11 Oct 2014 - 1:13 pm | शिद
+१००
क्लिंटन साहेब, तुमच्याकडून देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अंदाजांवर एखादा लेख येऊ द्या.
11 Oct 2014 - 1:06 pm | श्रीगुरुजी
विश्लेषणाशी बहुतांशी सहमत!
शिवसेनेच्या मनात भाजपविषयी इतका विखार भरला असेल याची २५ सप्टेंबर पूर्वी अजिबात कल्पना नव्हती. आपले वाढते सामर्थ्य ओळखल्यामुळेच भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा लढवायच्या होत्या. त्यामुळेच सुरवातीला भाजपने १३५+१३५+१८ असे सूत्र आणले होते. कालांतराने भाजप १३०+१४०+१८ इतका खाली आला. शेवटी १२५+१४५+१८ या सूत्रावर भाजप तडजोडीला तयार झाला असता. परंतु उद्धमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. १५१ च्या पेक्षा खाली यायची सेनेची तयारीच नव्हती. मोदींची लोकप्रियता, भाजपचे वाढलेले सामर्थ्य, भाजपच्या बाजूने वळलेले जनमत, भाजपच्या बाजूने असलेला सर्व मित्रपक्षांचा कल, आपले घटलेली ताकद या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला १५१ जागांचा हेका सेनेने चालूच ठेवला व त्यामुळे शेवटी भाजपला वेगळा मार्ग धरावा लागला.
युती तुटली ही संधी समजून त्यानुसार आपली ताकद वाढवायची संधी सोडून सेनानेते भाजप व मोदींवर आणि मोदींचा उजवा हात असलेल्या अमित शहांवर तुटुन पडले. त्यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून रोज त्यांचा उद्धार सुरू झाला. स्वत:ची व्हिजन, आघाडी सरकारची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, स्वतःच्या विकासाच्या योजना इ. वर जनतेला सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचे वर्णन करण्यात व त्या घटनांची सांगड भाजपशी घालून त्यांना व्हिलन ठरविण्यातच सेनेचे बहुतांशी वेळ वाया घालविला. निव्वळ भाजप नव्हे तर इतर मित्रपक्षांवरही सेनेने तोंडसुख घेऊन भविष्यात ते आपल्याला मदत करणार नाहीत अशीच व्यवस्था करून ठेवली. त्याचे परीणाम सेनेला भोगावे लागणार आहेत.
वास्तविक १२५+१४५+१८ हे सूत्र भाजपवर उपकार केल्यासारखे व आपण फार मोठा त्याग करत असल्यासारखे दाखवून सेनेने स्वीकारायला हवे होते. या सूत्रात सेनेची मोठ्या भावाची भूमिका कायम राहिली असती व स्वतःच्या ताकदीची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. तसेच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवत असल्याने कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा मिळविण्याची संधी देखील मिळाली असती. कमी जागांवर तडजोड करताना महत्त्वाची मंत्रीपदे सेनेला घेता आली असती. परंतु आता स्वबळावर लढताना जर भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या (सर्वेक्षणाचे हेच अंदाज आहेत), तर आमची ताकद जास्त आहे हेच आम्ही सांगत होतो हे भाजपला सांगण्याची संधी मिळेल आणि आपल्या मोठ्या भावाची भूमिका सेना कायमची घालवून बसेल.
>>> पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला.
युती तुटल्यापासून सेनेने व्हाट्सअॅप व इतर माध्यमातून "मुंबई केंद्रशासित करणार, विदर्भ तोडणार, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुम्बईतून हलविले, इतर अनेक संस्था मुम्बईतून हलविणार" इ. अफवा सोडायला सुरूवात केली. त्या अफवांचे निराकरण करायला राज्यातील नव्हे तर केंद्रातील कणखर नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रत्यक्ष मोदींनाच महाराष्ट्रात येऊन या अफवांचे निराकरण करावे लागले. त्यात भर म्हणून मोदींची तुलना अफझलखानाशी, अमित शहांची तुलना आदिलशहाशी करून सेनेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवून ठेवली.
सेनेने सुरवातीपासूनच अत्यंत चुकीची पावले टाकली. भविष्यात पश्चाताप करून उपयोग होणार नाही. भाजपने सुरवातीपासूनच अत्यंत प्रगल्भ व संयमी धोरण ठेवून आपली मोट व्यवस्थित बांधली. सेनेचा व्यक्तिगत अहंकार, स्वतःच्या ताकदीविषयी अत्यंत अवास्तव व भ्रामक कल्पना, प्रचाराची असभ्य पातळी इ. मुळे सेनेला जोरदार फटका बसणार आहे.
11 Oct 2014 - 1:26 pm | नानासाहेब नेफळे
खोटे बोलायचं सोडा गुरुजी, मोदींनी राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही .गुजरातच्या सीएम आनंदीबेन इथे येऊन महाराष्ट्र भिकारी करणार्याची भाषा करतात त्यावर नरेंद्र मोदींनी एकही शब्द काढलेला नाही .विदर्भाविषयी भाजपच्या नेत्यांची एकवाक्यता नाही, एकंदर भाजपच्या सत्तापिपासु भुमिकेला साजेसं त्यांचं वर्तन चालू आहे.
11 Oct 2014 - 3:39 pm | प्रदीप
पूर्वी (म्हणजे ह्याच एकदोन धाग्यांच्या दरम्यान) तुम्ही अनेक आस्थापने (उदा. रिझर्व बँकेची काही खाती), काही सध्या कार्यरत असलेल्या गैर सरकारी कंपन्या, तसेच काही इथे होऊ घातलेली सरकारी आस्थापने महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहेत, अशी हाकाटी केली होतीत. बराच आग्रह श्रीगुरूजींनी केल्यावर एकदोन भुरकट दुवे दर्शवलेत, ज्यातून असे काहीच सिद्ध झाले नाही.
गैरसरकारी कंपन्यांचे म्हणाल तर, काही ठोस माहिती द्यावी. आणि मुख्य म्हणजे, जिथे असणे फायदेशीर आणि/अथवा कमी कटकटीचे असेल, तिथे ती जातील. त्यात गैर काय आहे?
13 Oct 2014 - 7:14 am | हुप्प्या
प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्याचे हित बघतो असे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य ह्याबाबतीत मागे होते. पण पुढे ते बदलू शकेल. पण मुंबई व अन्य शहरे उद्योगाची केंद्रे आहेत. बाकी राज्यांनी इथे येऊन ह्या उद्योगांना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण देणे, त्याकरता लालूच दाखवणे हे काही भाजपाप्रणित नाही. बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांनी असे मार्केटिंग केले आहे. त्यात काही चूक नाही. निरोगी स्पर्धा असेल तर प्रत्येक राज्य आपापल्या परीने त्या स्पर्धेत उतरणारच. आणि त्यात जो उत्तम सेवा, सुखसोयी पुरवेल तो जिंकणार हा जगाचा नियम आहे. भाजपाने ह्याविरुद्ध काही करावे अशी अपेक्षा चुकीची आहे. गुजराथचे मुख्यमंत्री उद्योगांनी आपल्या राज्यात यावे म्हणून आमिषे दाखवत असतील तर त्यांची इच्छा महाराष्ट्र भिकारी व्हावा हा जावईशोध कसा लावला बुवा? एखाद्या बँकेने गिर्हाईक पटवायला एखादी चमकदार जाहिरात केली तर त्यांची अशी इच्छा असते का की त्यांच्या प्रतिस्पर्धी बँकेने भिकारी व्हावे? नाही, दुसर्या बँकेने तोडीस तोड उत्तर दिले तर तसे होणार नाही.
विदर्भ वेगळा असावा अशी भाजपाची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात मोठी राज्ये तोडून छोटी राज्ये बनवण्याची अनेक उदाहरणे दिसतात. उलट उदाहरण एकही नाही तेव्हा भाजपाने वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले तर काही आकाश कोसळत नाही. विदर्भ वेगळा करणे म्हणजे भारताचा लचका तोडून पाकिस्तान बनवला तशातला काही प्रकार नाही. छोट्या राज्याचे फायदे आहेतच. जनतेचा कल विचारात घेऊन तसे केले तर काही बिघडत नाही.
निदान भाजपाचे लोक (फडणवीस वगैरे) उघडपणे "होय, आम्ही वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहोत" असे सांगत आहेत. त्यात पाठीत खंजीर खुपसण्याचा काही प्रकार नाही. ह्या भूमिका खुल्या आहेत. लोकांना ते इतके खुपले तर त्यांना मते मिळणार नाहीत. अर्थात हा त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल असे वाटत नाही. बाकी बर्याच समस्या आहेत ज्याबद्दल ते काय करणार हे लोकांना जास्त जिव्हाळ्याचे असेल. शिवसेना वा बाकी पक्षांनी त्याविरुद्ध आकांडतांडव करु नये.
11 Oct 2014 - 2:10 pm | नानासाहेब नेफळे
नवीन सर्वेनुसार भाजपाला २८९ जागा मिळण्याचा अंदाज.
16 Oct 2014 - 8:52 am | चौकटराजा
तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त. सचाचा पहिला सिक्सर !
17 Oct 2014 - 9:40 am | ऋषिकेश
बरेच दिवसांनी क्लिंटनसोबत शतप्रतिशत सहमत व्हायची वेळ आली :)
11 Oct 2014 - 12:30 pm | श्रीगुरुजी
क्लिंटनसाहेब,
बर्याच दिवसांनी तुमचे सविस्तर विश्लेषण वाचायला मिळाले. त्याबद्दल आभार! आता निवडणुक संपेपर्यंत नियमित लिहित चला. तुमच्या स्वतःच्या अंदाजाची अजूनही वाट पहात आहे.
12 Oct 2014 - 10:01 pm | श्रीगुरुजी
काल अजून २ मतदानपूर्व सर्वेक्षणांचे निकाल प्रसिद्ध झाले.
(१) दैनिक "सकाळ्"च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल.
भाजप - ९४, शिवसेना - ६१, राष्ट्रवादी काँग्रेस - ५९, काँग्रेस - ५१, मनसे व इतर - २३
(२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात खालील परिस्थिती असेल.
भाजप - १२०-१२५, शिवसेना - ५८-६३, राष्ट्रवादी काँग्रेस - ३५-४०, काँग्रेस - ३८-४३
(२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार हरयानात खालील परिस्थिती असेल.
भाजप - ३८-४४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २८-३४, काँग्रेस - १२-१६
13 Oct 2014 - 8:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन फार कमी आहे. मुळचे नौटंकी पळपुटे झाडुवाले विधानसभा लढवणार आहेत का? नसतील तर ठिके उगाचं मतं खाऊन जायचे.
13 Oct 2014 - 8:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बाकी यंदा युती आणि आघाडी दोन्ही गंडल्यामुळे त्रिशंकु परिस्थिती होणार असं वाटतयं.
13 Oct 2014 - 2:20 pm | श्रीगुरुजी
काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांच्या पहिल्या दोन सर्वेक्षणांची व तिसर्याची तुलना करूया.
(१) सर्वेक्षण क्र. १, प्रसिद्धीची तारीख - ०२/१०/२०१४
भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१.
(२) सर्वेक्षण क्र. २, प्रसिद्धीची तारीख - ०९/१०/२०१४
- भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३
(३) सर्वेक्षण क्र. ३, प्रसिद्धीची तारीख - १२/१०/२०१४
- भाजप : ११०, शिवसेना : ५२, काँग्रेस : ६८, राकाँ : ३९, मनसे : ७, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : १२
१० दिवसांत भाजपच्या जागा ९० वरून ११० झालेल्या दिसताहेत, तर काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ७२, नंतर ६३ आणि आता ६८ असा वरखाली होताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ३८, नंतर ४० आणि आता ३९ असा वरखाली होताना दिसतोय, पण आकडे जवळपास स्थिर आहेत. शिवसेनेच्या बाबतीत सुरवातीच्या ६१ जागांवरून ५७ आणि आता ५२ जागांचा अंदाज आहे. तीनही सर्वेक्षणात मनसेला एक आकडी जागा (६-९) दर्शविल्या आहेत.
डिस्क्लेमरः हे आकडे खरे आहेत की खोटे, चुकीचे ठरतील का बरोबर, पक्षपाती आहेत का निष्पक्षपाती याविषयी माझे काहीही मत नाही.
13 Oct 2014 - 2:45 pm | श्रीगुरुजी
गेल्या ३-४ दिवसात अनेक वाहिन्यांनी आपापल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्याचा सारांश,
- भाजपला दैनिक "सकाळ" ने ९४ जागांचा अंदाज दिला आहे. इतर दोन सर्वेक्षणांमध्ये भाजपला १५२-१५४ जागांचा अंदाज दिला आहे. यांच्याव्यतिरिक्त इतर ७ सर्वेक्षणांमध्ये भाजप १०५-१४२ च्या दरम्यान जागा मिळवेल असा अंदाज आहे.
- शिवसेनेला एका सर्वेक्षणात ३८, इतर २ सर्वेक्षणात ४५-४७, एका सर्वेक्षणात ६७ व इतर ६ सर्वेक्षणात ५०-६३ जागा दाखविल्या आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसला २ सर्वेक्षणात १६-१७, एका सर्वेक्षणात ५९, एका सर्वेक्षणात ४५-५० व इतर ६ सर्वेक्षणात ३३-४३ जागा दाखविल्या आहेत.
- काँग्रेसला २ सर्वेक्षणात २५-३०, एका सर्वेक्षणात ६८ व इतर ७ सर्वेक्षणात ३८-५२ जागा दाखविल्या आहेत.
- मनसेला सर्वाधिक २१, सर्वात कमी ७ व इतर सर्वेक्षणात १०-२० जागा दिल्या आहेत.
ढोबळमानाने बहुतेक सर्वेक्षणांनुसार खालील अंदाज दिसतो.
भाजपः १०५-१४२, शिवसेना: ५०-६३, काँग्रेसः ३८-६२, राष्ट्रवादी काँग्रेसः ३३-४३, मनसे: १०-१२
13 Oct 2014 - 5:38 pm | सौंदाळा
गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज कोण कोण असावेत या निवडणुकीला?
राणे पिता/पुत्र, पृथ्वीराजबाबा??
13 Oct 2014 - 8:38 pm | श्रीगुरुजी
राणे पितापुत्रांपैकी पुत्र धोक्यात आहेत. पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार. अजितदादा, भुजबळ, राणे हे नक्कीच निवडून येणार. आघाडी सरकारमधील बहुतेक हेवीवेट निवडून येतील, परंतु लाईटवेट धोक्यात आहेत.
13 Oct 2014 - 8:44 pm | नानासाहेब नेफळे
फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत.
गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल.
13 Oct 2014 - 9:02 pm | श्रीगुरुजी
>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत.
हे सर्वजण आपापल्या मतदारसंघातून आरामात निवडून येतील. वाहिन्यांनी फक्त मोदी, राज व उद्धव यांचीच भाषणे बहुतेक वेळ दाखविली. त्यामुळे इतर जण वाहिन्यांवर फारसे दिसलेच नाहीत.
>>> गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल.
गडकरी कशाला तोंड लपवतील? ते उघडउघड प्रचार करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ८० हून अधिक सभा घेतलेल्या आहेत.
13 Oct 2014 - 10:44 pm | नानासाहेब नेफळे
मोदी, राज आणि उद्धव, शरद पवारच नाहीत, तर अनेक पक्षातले दुसर्या फळीतले नेते जसे की अजीत पवार सुप्रीया सुळे छगन भुजबळ पृथ्वीराज चव्हाण आर आर पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्याही सभा झाल्या आणि त्या लक्षणीय ठरल्या परंतु भाजपचे दुसर्या फळीतले नेते गायब होते ,कारण त्यांच्याकडे बघुन भाजपचे मतदान घटेल अशी भीती भाजपला वाटते. तावडे खडसे निवडुन येतील का याविषयी साशंकताच आहे .हे म्हणे राज्यात सक्षम सरकार देणार...
13 Oct 2014 - 9:31 pm | हाडक्या
याबद्दल सध्या थोडी ५०/५० अवस्था म्हणता येईल. कारण राष्ट्रवादीने आपला उमेदवार खाली बसवला आहे आणि उंडाळकरांना (कॉ. चे गेल्या वेळचे आमदार, या वेळी अपक्ष ) पाठिंबा जाहीर केला आहे. याला काटशह म्हणून पृथ्वीराजबाबा यांनी स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारास (अघोषित) माघार घेण्यास तयार केले आहे.
थोडक्यात, काँग्रेसच्याच दोन (आजी-माजी) नेत्यांमध्ये दुरंगी लढत आहे आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे काही सांगता येत नाही.
13 Oct 2014 - 10:59 pm | निशदे
श्रीगुरुजी, हे सर्व सर्वेक्षणाचे आकडे एका वेगळ्या प्रतिसादात अपडेट कराल का प्लीज?
14 Oct 2014 - 9:04 pm | सुहास..
गुर्जी , हा धागा आपण भाजपाच्या प्रचारासाठी काढला होता अशी प्रत्येक पदो-पदी जाणीव होते आहे !!
बाकी चालु द्यात ..
13 Oct 2014 - 6:27 pm | सामान्यनागरिक
कॉन्ग्रेस नक्की वरती येणार ! राकॉं ची संगत सोडल्यानेच त्यांची अर्धी पापे धुतली गेली. अर्थात कॉन्ग्रेस धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे अशातला भाग नाही. पण ’प्रतिमा’ आणी आचरण हे राकॉं चे अगदीच वाईत आहे.
आणि पृथ्वीराज बाबांनी नक्की पूर्ण विचार करुनच हाय कमांडला आघाडी तोडण्यास भाग पाडलेले आहे. नक्की फायदा होणार त्याचा !
13 Oct 2014 - 8:11 pm | दुश्यन्त
शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. राज्य भाजपकडे चेहरा नाही आणि त्यांचे संघटन पण मजबूत नाही. मोदींची तीच तीच भाषणे ऐकून लोक पण आता समजून चुकले आहेत. आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही.
13 Oct 2014 - 8:58 pm | श्रीगुरुजी
>>> शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात.
शिवसेनेचा ९० टक्के प्रचार भाजप व मोदींविरोधात होता. उद्धव ठाकर्यांच्या भाषणात अफझलखान, वाघनखे, कोथळा, औरंगजेब, शिवाजी महाराज, दिल्लीश्वर हेच शब्द पुन्हा पुन्हा येत होते. प्रत्येक भाषणात ते अफझलखानच्या वधाचा प्रसंग रंगवून सांगत होते. २१ व्या शतकातल्या निवडणुकीत १७ व्या शतकातील प्रसंग वारंवार सांगून त्यांनी काय मिळविले? एकंदरीत शिवसेनेने अत्यंत नकारात्मक व असभ्य पातळीवर जाऊन प्रचार केला.
पु.ल.देशपांड्यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" या गाजलेल्या पुस्तकात वर्तमानात जगण्याचे नाकारून कायम इतिहासात रमणार्या "हरितात्या" या व्यक्तीचे चित्रण आहे. शिवसेना व उद्धव ठाकर्यांच्या रूपाने हरितात्या जिवंत आहेत याची खात्री पटली.
>>> आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला.
"तुम्ही गुजरातमध्ये सुद्धा गुंतवणुक करा" असे आनंदीबेन पटेलांचे शब्द होते. या वाक्यातील "सुद्धा" हा शब्द समजला असेल तर या वाक्यात काहीही वावगे वाटणार नाही.
कोस्टल डिफेन्स अॅकॅडमी हे चुकीचे नाव आहे. "मरीन पोलिस अॅकॅडमी" हे खरे नाव आहे. ही अॅकॅडमी गुजरातमध्ये नेली हा आरोप धादांत खोटा आहे हे पूर्वीच पुराव्यासहीत लिहिले आहे. माझे पूर्वीचे प्रतिसाद वाचा म्हणजे कळेल.
हिरे बाजार गेली अनेक दशके सुरतमध्येच आहे. भारतातला बहुसंख्य हिर्यांचा व्यवसाय हा सुरतमधूनच होतो. डायमंड कटिंग, हिर्यांना पैलू पाडणे हा गुजरातमधील हा प्रचंड मोठा व्यवसाय असून मोदींनी मुख्यमंत्री झाल्यावर या व्यवसायातील कामगारांना त्यांच्या गावातच अखंड ३-फेज वीज उपलब्ध करून दिली होती व त्यामुळे कामगारांना आपल्या गावात राहूनच काम करता येऊ लागले. हिरे व्यवसाय मुंबईतून गुजरातला नेला ही एक लोणकढी थाप आहे.
>>> मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली.
मोदींशी अफझलखानशी तुलना करणे (इति उद्धव ठाकरे), युती तोडणार्यांना आम्ही भांडी घासायला लावू असे बोलणे (इति संजय राउत), अफझलखानाप्रमाणे मोदींचे थडगे महाराष्ट्रात बांधू (इति प्रेम शुक्ला) हा नकारात्मक प्रचार होता. मोदींनी आपण शिवसेनेवर टीका करणार नाही असे जाहीररित्या सांगून एक अत्यंत स्वागतार्ह व संयमी भूमिका घेतलेली असताना शिवसेनेचा भाजपला लक्ष्य करून नकारात्मक प्रचार सुरूच राहिला. २७ सप्टेंबरपासून शिवसेना सातत्याने भाजपला लक्ष्य करीत होती. अनेक दिवस गप्प राहिल्यानंतर शेवटी ८-९ ऑक्टोबरला अमित शहांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली. भाजपने सुरूवात केलेली नव्हती. किंबहुना १०-११ दिवस भाजप गप्प होता. शेवटी त्यांचाही संयम सुटला व प्रत्त्युत्तर दिले गेले.
>>> अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही.
१९ तारखेला कळेलच कोणाची किती ताकद आहे ते.
13 Oct 2014 - 10:51 pm | नानासाहेब नेफळे
शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते.
ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!!
14 Oct 2014 - 12:39 pm | दुश्यन्त
१९ तारखेला सगळच कळणार आहे. बाकी या सर्व्हेत नीट विभागवार पाहिलं तर किती झोल आहे ते समजून येते. मराठवाड्यात शिवसेनेला २ तर राष्ट्रवादीला १ जागा 'झी २४ तास' वाले देत आहेत ? शिवसेना एकट्या परभणीतच दोन जागा जिंकेल बाकी जिल्ह्यात पण जागा राखेल/ वाढवेल. तीच बाब एनसीपीची भाजपला बीडमध्ये मुंडे यांची सहानुभूती कामाला येईल पण बाकी ठिकाणी एवढे सोपे नाही. विदर्भ सोडला तर भाजपचे ग्राउंड नेटवर्क किती मजबूत आहे हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून तर मोदींना २५+ सभा घ्याव्या लागल्या.संघ पण यावेळेस लोक्सभेसारखा उत्साही नाही. २००९ ला मनसेच्या हवेमुळे मराठी मते मोठ्या प्रमाणात विभागली त्यामुळे मनसेचे १३ आमदार आले पण सेना-भाजपचे त्याहून जास्त पडले तशी परिस्थिती आता नाही. प्रचार थांब्ल्यावरचे महत्वाचे तास, आणि मतदानाच्या दिवशी आपला मतदार घराबाहेर काढणे यासाठी शिवसेनेकडे खास करून मुंबई-ठाणे-कोकण मराठवाडा याठिकाणी चांगले नेटवर्क आहे.रस्त्यावर उतरणारे, लोकांशी कनेक्टेड असणारे सैनिक ही सेनेची जमेची बाब आहे. युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही.कॉंग्रेसची पण स्वतःची अशी काही मते असतात ती अजिबात हलत नसतात. आघाडी तुटल्याने कॉंग्रेसचा फायदा झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचार, दादागिरीचे जास्त आरोप आहेत. कॉंग्रेसमध्ये नारायण राणेंचा अपवाद सोडल्यास तसे फारसे नाही. राणेंना तोंडदाखलं प्रचारप्रमुख केल मात्र चेहरा पृथ्वीबाबांचाच पुढे केला याचा फायदा कॉंग्रेसला होईल म्हणजे त्यांच्या जागा घटतील पण फार नाहीत. कॉंग्रेस ६० च्या आसपास राहील. लोकांचा जास्त राग एनसीपीवर आहे त्याचा त्यांना फटका बसेल. एनसीपीचे बदनाम चेहरे (विजय गावित, बनरव पाचपुते, कथोरे, सावकारे) भाजपात आल्याने नाही म्हटल तरी त्यांना पण याचा फटका बसेल. सेनेकडे जे बाहेरून लोक आले त्यांत (दीपक केसरकर, उदय सामंत, अनिल बाबर, राम पंडागळे ) लोकांची प्रचंड नाराजी असलेले फारसे दिसत नाहीत.
14 Oct 2014 - 9:24 pm | श्रीगुरुजी
>>> युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही.
युती असताना सेनेला भाजपचा जो जबरदस्त फायदा होत होता तो आता होणार नाही. भाजपमुळेच १९९० मध्ये सेनेची आमदारसंख्या १ वरून ५२ झाली होती.
14 Oct 2014 - 12:47 pm | दुश्यन्त
शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते.
ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! +१
शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल.
14 Oct 2014 - 12:59 pm | नानासाहेब नेफळे
ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे याचा अर्थ भाजप हा मिडीयाचा वापर करुन फुगलेला पक्ष आहे ,आजपर्यंत सेनेचा त्यांना फायदा व्हायचा आता तो होणार नाही..
14 Oct 2014 - 8:57 pm | श्रीगुरुजी
>>> ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे
भाजपकडे ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता नाही हा जावईशोध लावल्याबद्दल अभिनंदन!
14 Oct 2014 - 9:07 pm | श्रीगुरुजी
>>> शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!!
बाळासाहेबांच्या आदरापोटी शिवसेनेवर टीका करणार नाही असे सांगून मोदींनी स्वतःला व भाजपला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले व शिवसेनेचे नेते त्यांच्यासमोर किती खुजे आहेत हे दाखवून दिले.
>>> शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की.
शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात वाढला हा एक भ्रम आहे व शिवसेनेच्या नेत्यांनी जाणूनबुजून हा भ्रम पसरविला आहे. मी मागील एका प्रतिसादात शिवसेना व भाजपची युतीपूर्वी जी ताकद होती त्याची सविस्तर माहिती देऊन युतीपूर्व काळात शिवसेनेला मुंबईबाहेर कणभरही स्थान नव्हते व त्याच काळात भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्व होते हे दाखवून दिले आहे. माझे आधीचे प्रतिसाद वाचा म्हणजे तुमचे गैरसमज दूर होतील.
>>> राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत.
आयात नेते सर्व पक्षात आहेत. शिवसेनेने कोकणात केसरकर राकाँकडून आयात केले तर पर्वतीत सचिन तावरेसुद्धा राकाँकडून आयात केला. सेनेचे सर्व २८६ उमेदवार पाहिले तर त्यात अनेकजण आयात केलेले आहेत हे दिसेल. राकाँ व काँग्रेसने सुद्धा अनेक नेते इतर पक्षातून आयात केले आहेत.
>>> बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का?
भरपूर आहेत. उद्या कोणत्याही बूथवर जाऊन बघा.
>>> मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते.
चांगला विनोद आहे.
>>> आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल.
गैरसमज आहे. सेना, मनसे, राकाँ हे गुजरात्यांविरूद्ध अत्यंत विखारी प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत गुजराती मतदार त्यांना चांगलाच धडा शिकवतील. बघा १९ तारखेला.