साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्या काही दिवसांपासून भारतीयच नव्हे तर विदेशी प्रसार माध्यमांमध्येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्या स्फोटात संशयित आरोपी म्हणून. प्रखर राष्ट्रवादी विचार, शब्दांना असलेली धार आणि परखड वक्तृत्वशैली असलेली ही साध्वी. संन्यास स्वीकारण्यापूर्वी प्रज्ञासिंह भाजपच्या माध्यमातून विधानसभेवर जाण्यास इच्छुक होती. मात्र तिच्यातल्या जहाल हिंदुत्ववादी विचारांनी तिला तुरुंगात आणून पोचविले. संन्यास घेण्यापूर्वी मध्यप्रदेशातील एका भाजपच्या नेत्यासोबत प्रज्ञाचे प्रेमही जुळले होते. मात्र दुर्दैवाने ते यशस्वी होऊ शकले नाही आणि त्यानंतर तिने संन्यास स्वीकारला.
प्रज्ञाने संन्यास स्वीकारल्यानंतर तिचे नाव बदलून साध्वी पूर्णचेतनानंदगिरी झाले. मात्र संन्यास स्वीकारल्यानंतरही तिला या सांसारिक संकटांचा सामना करावाच लागला आणि मालेगावमध्ये गेल्या 29 सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक करण्यात आली.
प्रज्ञाच्या आयुष्याची जितकी पाने उलटली तितक्या नवीन गोष्टी समोर येतात. एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा प्रवास म्हणजेच प्रज्ञा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपला प्रज्ञाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले, असले तरीही तिचे भाजपसोबत जुने संबंध आहेत. हे अनेकदा सिध्द झाले आहे.
मूळची मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातल्या लहार या गावात जन्मलेली आणि मोठी झालेली प्रज्ञा लहानपणापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार आहे. शालेय जीवनात ज्युदो आणि कराटेंमध्ये तरबेज असलेली प्रज्ञा इतर खेळांमध्येही तरबेज आहे. तिने खेळांमध्ये अनेक पदक व करंडक पटकाविले आहेत. महाविद्यालयीन जीवनात मुलींची छेड काढणा-या अनेकांना तिने धूळ चारली आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बी.पीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील ठाकूर चंद्रपालसिंह हे देखिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे वैद्य आहेत. लहार या गावाच्या नगर कार्यवाह पदाची जबाबदारीही त्यांनी संघात असताना सांभाळली आहे. चार बहिणी आणि एक भाऊ असलेली प्रज्ञा सर्वांत मोठी होती.
अभाविपची पूर्ण वेळ कार्यकर्तीः घरातूनच संघाच्या विचारांचे संस्कार असल्याने शैक्षणिक जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आली. लहार गाव सोडून ती भोपाळला आली. तेथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करताना ती विद्यार्थी परिषदेची संघटन मंत्री होती. उज्जैनमध्येही तिने काही दिवस अभाविपचे काम केले. 1992 ते 1997 पर्यंत ती विद्यार्थी परिषदेत होती.
विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करताना त्यातून विकसीत झालेल्या नेतृत्व गुणाचा फायदा प्रज्ञाने करून घेतला. 1997 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सोडल्यानंतर तिने भाजपमध्ये सक्रीय काम सुरू केले. 1998 मध्ये विधानसभा निवडणुकींपूर्वी भिंड जिल्ह्यातील मेहगावमधून उमेदवारी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले. 1999 मध्ये तिने 'जय वंदे मातरम' या संघटनेचे काम सुरू केले.
या सर्व प्रवासात तिचे भाजपच्या एका तरुण नेत्यासोबत प्रेमही जुळले मात्र त्यात अपयश आल्यानंतर तिने पुन्हा लग्नाचा विचार न करता सन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून जूना आखाड़ाच्या पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद यांचे शिष्यत्व स्वीकारून तिने 2006 मध्ये संन्यास स्वीकारला. त्यानंतर एक जहाल प्रवचनकार म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली. साध्वी प्रज्ञा यांचे प्रवचन साध्वी ऋतंभरा यांच्या सारखेच जहाल असते.
प्रतिक्रिया
27 Oct 2008 - 9:52 pm | भास्कर केन्डे
व्वा विकी साहेब!
आपणही सामिल झालात! ही माहिती लातूरच्या एकमता पासून ते पाश्चात्य देशांतल्या सर्व वृत्तापर्यंत सगळीकडे छापून आलेली असल्याने त्यात काही विषेश वाटले नाही.
भारतात या क्षणाला लाखो अतिरेकी उजळ माथ्याने फिरत आहेत. पण सगळी कडे बोल्-बोला कोणाचा तर या साध्विचा. तिच्या ऐवजी एखादी सलीमा अथवा पुर्वोत्तरातली माया डिसुझा असती तर एका तरी वृत्तपत्राने या घटनेची दखल घेतली असती का? अशा हजारो घटना मुस्लीम तसेच ख्रिस्ती अतिरेक्यांकडून घडत असतात त्याची चर्चा मांडताना आपणाला कधी पाहिले नाही. मग या वेळीच का? या साध्विवरील आरोप सिद्ध होईपर्यंत तरी तिला अरोपी प्रमाणे वागणूक न देण्याची माणुसकी आपण दाखवावी असे वाटते.
त्या साध्वीच्या घरावर काल छापा टाकला. त्यात काही मिळाले नाही म्हणे. बिच्चारे पोलिस! देशविरोधी कारवायांसाठी बक्कळ पुरावे कोण-कोणत्या घरा मोहल्ल्यात मिळतात हे माहित असूनही त्यांना "आदेश" नसल्याने तिकडे नजर टाकायलाही जमत नाही. या केस मध्ये मात्र भरपूर भांडवल मिळू शकते म्हणून काँगेसी तसेच तथाकथित सेक्युलरवाल्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही असे दिसत आहे.
आपणही त्यात मागे राहिला नाहीत याबद्दल आपले अभिनंदन!
आपला,
(डोळस) भास्कर
27 Oct 2008 - 10:02 pm | अनामिका
श्री भास्कर यांच्याशी पुर्णपणे सहमत.
या विषयावर लेखण्या झिजवणार्यांची आता मुळिच कमतरता भासणार नाही.
केतकरांचे सुपुत्र अजुन शांत कसे या विचाराने मी त्रस्त आहे.
"हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व" असे मानणारी आणि हिंदु म्हणवुन घेण्यात अजिबात लाज न बाळगणारी
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
28 Oct 2008 - 10:54 am | शैलेन्द्र
केतकरांचे सुपुत्र अमेरिकेतिल निवडणुकीवर पिंका टाकतायेत...
28 Oct 2008 - 7:09 pm | चारुदत्त
भास्कर मला वाटत वीकीन्नी हा विषय ईथे चर्चेला यावा म्हणुन ही माहिती परत दिली.
28 Oct 2008 - 7:31 am | कोदरकर
भारतामधे सर्वत्र धार्मीक संघर्ष हवा आहे त्यांनी खुशाल 'हिंदु अतिरेकी' असे संबोधन करावे. कारणांचा शोध घ्या जरा...आपल्यामधेही काही सापडेल शिरपुरकर...
28 Oct 2008 - 8:02 am | अनिल हटेला
भास्कर आणी अनामीका शी पूर्णपणे सहमत !!
फक्त आरोप केले आहेत,
दूध का दूध पानी का पानी होउ देत
तोपर्यंत आपण तीला दोषी मानु नये ,इतकीच माफक अपेक्षा....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
28 Oct 2008 - 10:08 am | वेताळ
कोणत्याही दहशतवादी कृत्याचा आम्ही जाहिर निषेध करतो.
प्रज्ञाबाई ना साध्वी संबोधु नये.संन्याशाला जातपात,कुंटुब,राजकिय पक्ष व संसार असे कोणतेच पाश नसतात.संन्यास स्विकारताना ते स्वःताचे श्राध्द देखिल घालतात.पण ह्या बाई तर सभाचे फड जाहिररित्या गाजवत होत्या.(हे माझे वैयक्तिक मत आहे)
आरोप सिध्द होत नाहीत तो पर्यंत त्याना चांगली वागणुक मिळाली पाहिजे.
वेताळ
28 Oct 2008 - 11:03 am | शैलेन्द्र
मुळात हा हिंदुत्ववादी भंपक्पणाही ति्तकाच धोकादायक आहे. १५० वर्षांच्या सुधारणेने कमावलेले सारे गमावुन बसु यांच्या नादाला लागलो तर..
28 Oct 2008 - 12:16 pm | सन्जय येवले
IF WE CANT DO ANY THING FOR OUR RELIGION DONT DO BUT IF ANY BODY DO THAT THAN DONT ENTERFAIR LIKE THIS AND DONT PUT YOUR COMENTS BECAUSE WE HAVE NO RIGHT FOR THIS
28 Oct 2008 - 2:01 pm | शैलेन्द्र
हा धर्म आमचाही आहे, आणि म्हणुनच आम्हि बोलनार..
या साध्वी दोषी नीर्दोष ते मला माहित नाहि. पण जर त्या दोषी असतिल तर त्यांना तसच वागवल पाहिजे.
28 Oct 2008 - 3:39 pm | विकि
इंग्रजीत काय लिहीलय कळल नाही बुवा.
तात्यां मिपा ला भाषांतरकाराची गरज आहे.
28 Oct 2008 - 3:39 pm | विकि
इंग्रजीत काय लिहीलय कळल नाही बुवा.
तात्यां मिपा ला भाषांतरकाराची गरज आहे.
28 Oct 2008 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणीतरी म्हटलंय वर भाषांतर करा म्हणून हा माझा एक प्रयत्न.
IF WE CANT DO ANY THING FOR OUR RELIGION DONT DO BUT IF ANY BODY DO THAT THAN DONT ENTERFAIR LIKE THIS AND DONT PUT YOUR COMENTS BECAUSE WE HAVE NO RIGHT FOR THIS
सर्व अक्षरे कॅपिटल असल्यामुळे हे ओरडून बोलणे आहे.
जर आपण आपल्या धर्मासाठी काही करु शकत नसलो तर करुन को, पण कोणीही शरीर ते करत असेल तर त्यात अशाप्रकारे गोराप्रवेश करून को आणि तुमच्या प्रतिक्रिया टाकून को कारण आपल्याला असं करण्याचा हक्क नाही.
आणि अशाप्रकारे मिपाचं शुद्धलेखनविषयक धोरण ठरलं.
अतिअवांतरः असं म्हणतातच, भाषांतर हे सुंदर स्त्रीप्रमाणे असतं, सुंदर असतं तेव्हा प्रामाणिक नसतं आणि प्रामाणिक असतं तेव्हा सुंदर नसतं. मी प्रामाणिक भाषांतराचा प्रयत्न केला आहे.
28 Oct 2008 - 5:23 pm | अवलिया
आपला प्रामाणिक प्रयत्न सुंदर झाला आहे.
28 Oct 2008 - 6:27 pm | विकि
कोणितरी म्हटलय कशाला मी म्हटलय माझे नाव लिहायचे होते ना?
29 Oct 2008 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> कोणितरी म्हटलय कशाला मी म्हटलय माझे नाव लिहायचे होते ना?
अहो राग मानू नका, "उत्तर द्या" या लिंकवर मी मूळ इंग्लीश प्रतिसादात क्लिक केलं तेव्हा तुमचं नाव विसरले आणि नंतर संपादीत करण्याआधीच त्यावर प्रतिसाद आला. माझ्या विस्मरणशक्तीवर राग नका धरु.
(विस्मरणशील) अदिती
28 Oct 2008 - 6:41 pm | वेताळ
IF WE CANT DO ANY THING FOR OUR RELIGION DONT DO BUT IF ANY BODY DO THAT THAN DONT ENTERFAIR LIKE THIS AND DONT PUT YOUR COMENTS BECAUSE WE HAVE NO RIGHT FOR THIS
असे म्हणुन तुम्ही दहशतवादाचे समर्थन करता आहात. असे मुस्लिम दहशतवाद्या बद्दल एकादा मुसलमान म्हणाला तर तुम्ही लोक त्याला टोचुन माराल.बाष्कळपणाची वाक्ये करणे थांबवा. कोणतेही दहशतवादी कृत्य भ्याडपणा आहे.दहशत्वाद्याला व त्याचे समर्थन करणारयाला दया दाखवण्यात काही अर्थ नाही.
वेताळ
28 Oct 2008 - 7:13 pm | चारुदत्त
हाच विषय पुढे करुन ईथे वैयक्तिक मते लिहित आहे.
१) प्रज्ञासिंह ची बाईक जी या स्फोटात वापरली असे म्हणतात, ती वर्षभर आधीच विकली होती
२) स्फोट घडवायचा तर केवळ हे २,३ जणांचे काम नाही त्यासाठी एका मोठ्या गटाद्वारे योजनापुर्वक अमलबजावणी करावी लागते सोबत स्थानिक लोकांची मदत. परंतु असल काही दिसत नाही.
३) सेक्युलर वाद्यांचे कान मुस्लिम दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी त्याला समतल "हिंदु दहशतवाद" असे ऐकायला आत्यंतिक आसुसलेले होते, यापुर्वीही कित्येक वेळा घटना घडल्याबरोबर कोणतीही शाहनिशा न करता स्वनामधन्य न्याय करुन व एका विशिष्ट व्यक्ति, संस्था याना दोषी ठरवुन सगळे खापर हिंदुत्ववादी संघटनांवर फोडण्याचा एक कुटील डाव असतोच तोच डाव त्यानी परत साधला. यात नवल ते काय.
४) कोणत्याही हिंदु संघटनानी या स्फोटाची जबाबदारी घेतली नाही.
५) प्रज्ञासिंह हीने गुन्हा केलाच असेही कुणी म्हटले नाही. कारण जोपर्यंत ती व्यक्ति दोषी म्हणुन सिद्ध होत नाही तोपर्यंत ती निर्दोष आहे हीच सगळ्या हिंदुत्ववाद्याची संयमी भुमिका दिसतेय. तसेच तीला आताच दोषीही ठरवले नाही. न्यायव्यवस्था स्वता:चे कार्य करेल हा विश्वास.
६) मुद्दा राहिला ती अभाविपशी, भाजपाशी संबधीत होती. हा भुतकाळ झाला त्यामुळे ती या संघटनांशी संबधीत आहे हे नाकारण्याचा पुर्ण अधिकार त्याना आहे.
७) यथाअवकाश चौकशीतुन खरे काय ते समोर येइलच, पण सेक्युलर मिडिया तोपर्यंत तोंडसुख घेण्याची संधी कशी सोडणार.
८) जेंव्हा मुस्लिम दहशतवाद्यान्नी बॉम्बस्फोट केलेले सिद्ध झाले तेंव्हा स्वनामधन्य सेक्युलर मसिहा अर्जुनसिंह, अमरसिंह, लालु, मुलायम तसेच सामान्य मुस्लिम समाज व संघटना या एकमुखाने मुस्लिम दहशतवादी व संशयाखाली योग्य पुराव्यानीशी अटक केलेल्याना आधीच निर्दोष म्हणुन उलट त्याविरुद्ध प्राणपणाने लढणार्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यापर्यंत यांची मजल जाउ शकते. असला प्रकार कोणतीही हिंदु संघटना करीत नाही हा वाखाणण्यासारखा फरक लक्षात घ्यावा.
९) जर खरेच प्रज्ञासिंह हिने भावनेच्या व सुडाच्या भरात हे कृत्य केले असेल तरी असल्या कृत्याला कोणी हिंदु संघटना समर्थन देणार नाही, कारण असली दहशतवादी व्रुत्ती ईथल्या समाजाची नाहीच.
१०) मुस्लिम दहशतवादाला प्रतिक्रिया द्यायचीच तर ती समाज देइलच व दिलीही आहे. मागे ठाण्याच्या रंगायतन मधे सनातन संस्थेच्या दोन कार्यकर्त्यानी बॉम्ब्स्फोट केला परंतु त्यात कुणीही जखमी किंवा जीवीतहानी झाली नाही. शिवसेनाप्रमुख तर सरळ म्हणतात हिंदुन्नी असले फुसके स्फोट करु नये.
एकंदरीत काय निवडणुका जवळ आल्यात. काँग्रेसची व सपाची व्होटबँक सगळ्यात जास्त खासदार देणार्या उत्तरप्रदेशात मायावतीनी पळवली. ती व्होटबँक परत खेचण्यासाठी असली तुष्टीकरणाची निर्लज्ज चढाओढ सुरु झाली आहे. त्यासाठी कोणतीही हिन पातळी गाठण्याचे प्रकार आपण बघतोच आहोत तसेच अणूउर्जा करार, सोनिया व एकंदरीत या सरकारचे अपययश हे काही मते मिळवुन देणार नाहीत याची पुर्ण खात्री काँग्रेस व सपाला आहे. मग देशाची कोण कशाला चिंता करतो. दाढी खाजवा अन मते मिळवा हे जुने तंत्र परत वापरायचे. या प्रकाराने जरी तात्पुरता फायदा झाला तरी भविष्यात नुकसानकारक आहे तसेच दहशतवादाला कोणत्याही छुप्या व उघड मार्गाने समर्थन करणे हे दुधारी शस्त्र कधीही त्यांच्यावरच उलटु शकते हे लक्षात घेतले तर ठीक नाहीतर माझा भारत महान आहेच.
"जग भित्र्याला भिववते आणि भिवविण्यार्याला भिते "
28 Oct 2008 - 8:44 pm | भास्कर केन्डे
अगदी मुद्देसूद व संयमी उत्तर. पण काही मंडळी ज्या प्रकारे प्रज्ञासिंहला अतिरेकी ठरवून बसली आहे व येथे सुद्धा तसे थोड्या फार प्रमाणात होताना दिसत आहे त्यांना हे झेपेल असे वाटत नाही.
28 Oct 2008 - 7:11 pm | ऋषिकेश
साध्वी प्रज्ञासिंह इंग्रजी "हि" आहे का मराठीतली "ही"?
फोटु बघून प्रज्ञासिंह वाटतो आणि साध्वी असल्याने प्रज्ञासिंह वाटते! ;)
नक्की ते प्रकरण काय आहे?
-(साध्वी प्रज्ञासिंह कोण? हे विचारणारा) ऋषिकेश
28 Oct 2008 - 10:50 pm | स्वामि
हेच भंपक तत्व सेक्युलरवाले आळ्वत असतात ना!घ्या मग आता.