जम्मूतील हिंदूंकडून महाराष्ट्रातील हिंदूंनी बोध घ्यावा !

सनातन's picture
सनातन in काथ्याकूट
25 Oct 2008 - 9:21 am
गाभा: 

जम्मूतील हिंदूंनी हिंदुस्थानातील चळवळीचे नेतृत्व करावे, हे आव्हान समस्त हिंदूंना अभिमानास्पद वाटावे, असेच आहे. एक दिवसाच्या लाक्षणिक संपाने व १२ तासांच्या बंदने जनजीवन किती विस्कळीत होते, याची जाणीव समस्त हिंदु प्रजेला आहे. अमरनाथ जमीन प्रकरणी जम्मू व परिसरात बंद, मोर्चे, संचारबंदी व गोळीबार हे सर्व तब्बल दीड महिना चालू होते.

परिसर बेचिराख झाला होता. दैनंदिन आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत, तर मनुष्य त्वरित शरण येतो; मात्र जम्मूतील लढवय्या हिंदूंनी दीड महिना हे यज्ञकुंड धगधगत ठेवले. भविष्य काळात लढा देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढले आहे. जम्मूतील हिंदूंची लढावू वृत्ती हिंदुस्थानातील हिंदूंना प्रेरणादायी ठरली पाहिजे. हिंदूंनी जम्मूतील बातम्या घरात बसून पहाण्यापेक्षा स्वत: एकत्र येऊन धर्मभेद्यांचा व अतिरेक्यांचा सामना प्रत्यक्ष संघटित होऊन व रस्त्यावर येऊन केला पाहिजे. जम्मूतील हिंदूंची प्रापंचिक घडी सुरळीत होण्यासाठी त्यांना अन्यत्रच्या हिंदूंनी विश्रांती द्यावी आणि निदान महाराष्ट्रात तरी राष्ट्रद्रोही व धर्मद्रोही कारस्थाने हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

25 Oct 2008 - 9:45 am | धोंडोपंत

१००% सहमत.

पण ते महाराष्ट्रातील पुचाट नेत्यांना आणि चामडीबचाव राजकारण करणार्‍यांना कसे कळणार?

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.)

विकि's picture

25 Oct 2008 - 11:11 am | विकि

धर्म व्यक्तिगत असावा .सार्वजनिक जीवनात धर्म नसावा असे मानणार्‍यांपैकी आम्ही आहोत. तसे न करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.

असली चर्चा इथे नको. धर्म आणि हक्कासाठी लढा ह्यात गल्लत नको.
वेताळ

प्राजु's picture

25 Oct 2008 - 8:49 pm | प्राजु

धर्म हा फक्त स्वतःपुरताच ठेवावा.. हक्काचा लढा हा मानवतेच्या दृष्टीने केवळ निधर्मी असावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सनातन's picture

26 Oct 2008 - 4:19 pm | सनातन

‘Dharma (Righteousness) is that which accomplishes the three tasks of keeping the social system in an excellent condition, bringing about the worldly progress of every living being and causing progress in the spiritual realm as well.’ - Shri Shankaracharya

टारझन's picture

27 Oct 2008 - 1:26 am | टारझन

हिंदू आम्ही ही आहोत ... पण हक्काचा आणि हिंदूत्वाचा बळेच संबंध लाऊन प्रक्षोभक धागे काढू नयेत ..
शंकराचार्य तसेही डोक्यात जातात ... त्यांच्या विचारांमुळे आणि अवतारामुळेही .. ( हे माझे वैयक्तिक मत आहे) ..

असले धागे उडवून लावावेत, अशी मी संपादकांना विनंती करतो. मिसळपाव वर आता माध्यमांचं लक्ष असतं असले धागे मिसळपावच्या प्रतिमेला नाहक काळिमा फासू शकतात ... पलिकडे अजुन एक असाच धागा काढून असाच काहीसा बालीशपणा केला आहे.

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

धमाल नावाचा बैल's picture

27 Oct 2008 - 6:00 am | धमाल नावाचा बैल

टारझना, वरती मिपा संपादक सनातनी धोंडोपंताचा पहिलाच प्रतिसाद बघीतला नाहीस का? तुला मला असले धागे उडवावेसे वाटून काही फायदा नाही संपादकमंडळ के हात बहुत लंबे होते है!

बैलोबा
---
फल ज्योतिष तसेच सनातनी धार्मिक इ.इ. नावाखाली निष्पाप जनतेला लुबाडणार्‍यां भोंदूंना आम्ही फाट्यावर मारतो!

टारझन's picture

27 Oct 2008 - 2:21 pm | टारझन

तुला मला असले धागे उडवावेसे वाटून काही फायदा नाही संपादकमंडळ के हात बहुत लंबे होते है!
अरेच्च्या .. हे तर माझ्या लक्षातच आले नाही !!! झकास ....

फल ज्योतिष तसेच सनातनी धार्मिक इ.इ. नावाखाली निष्पाप जनतेला लुबाडणार्‍यां भोंदूंना आम्ही फाट्यावर मारतो!

हे तर लै आवडले , आम्ही असे कृतीतुनही सिद्ध केले आहे, भुत-भविष्य-नाडी ई.ई. जोरावर भितीदाखवुन लुच्चेगिरी करणार्‍यांना आम्ही चौकात फाट्यावर बडवतो .

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

विकि's picture

26 Oct 2008 - 11:04 pm | विकि

कृपया मराठीत लिहा. आपल्याला तर काय कळले नाही.

सुक्या's picture

27 Oct 2008 - 9:07 am | सुक्या

शंकराचार्यांनी धर्मा ची व्याख्या इंग्रजीत केली होती हे पाहुन जरा नवलच वाटलं. बाकी धर्म / जात या गोष्टीत मी जरा मागासलेला आहे. (मला त्याचे किंचीतही वाइट वाटत नाही).

(निधर्मी) सुक्या
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विजुभाऊ's picture

29 Oct 2008 - 1:15 pm | विजुभाऊ

सनातन भौ
कृपया जर जमत असेल तर माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या
१) जन्माने हिन्दु असणे म्हणजे पुण्यवान असणे हे खरे आहे का?
२) ज्याना केवळ जन्मामुळे अन्यधर्मात जावे लागले आहे त्यानी हिन्दु झाल्यावर त्याना कोणत्या जातीत प्रवेश मिळतो
३) माझ्या सारख्या सदस्याच्या घरात दोन पेक्षा अधीक धर्माच्या व्यक्ती रहतात( त्या सर्व व्यक्ती घरातील सदस्य आहेत. त्या घरातील नव्या सदस्याने कोणता धर्म स्वीकारावा
४) मूळ हिन्दु धर्म कोणी स्थापन केला? त्यातला सर्वमान्य धर्मग्रन्थ कोणता?

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सनातन's picture

29 Oct 2008 - 1:48 pm | सनातन

thax a lot 4 ur comment ..i want 2 cover d ground about d meaningful meaing of Hindu
Hindu -
'Hin' means to remove and 'du' means darkness. In other words, any one who takes efforts to remove the darkness of spiritual ignorance, that is, a seeker, is a 'Hindu'

now let me know whether u get d anser or not?

छोटा डॉन's picture

29 Oct 2008 - 2:27 pm | छोटा डॉन

तुम्ही जे काही लिहता त्यावर कदाचित मतभेद असतील पण कॄपया आपण लेखन अथवा प्रतिसाद "मराठीतच" देण्याचा प्रयत्न करावा याबद्दल दुमत नसावे ...
शुद्ध मराठीच हवे असा अट्टाहास अजिबात नाही पण ते मराठीच असावे हा आग्रह मात्र आहे.
कोणत्याही विषयावर कुणालाही खास "मराठीतुन लिहता, बोलता, वाचता यावे व त्यावर मराठीत चर्चा घडावी" असा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.
लेख लिहताना मराठी जर उत्तम जमत असेल तर प्रतिसाद असे इंग्रजीमध्ये का ?

कृपया ह्या विनंतीचा सन्मान करावा. धन्यवाद !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Oct 2008 - 2:21 pm | llपुण्याचे पेशवेll

अजून एक या आंदोलनामधे एकाही राजकीय नेत्याला उभे न केल्यामुळेच ते यशस्वी झाले. नाहीतर काँग्रेसचे धोरणच हे आहे की घोंगडे भिजत ठेवायचे.
(आत्ताचीच विलासरावांची भूमिका बघा कशी नि:संशय संदिग्ध आहे ते.)
पुण्याचे पेशवे

अभिरत भिरभि-या's picture

29 Oct 2008 - 2:35 pm | अभिरत भिरभि-या

अमरनाथ प्रकरण जम्मूतल्या क्षोभाचे तात्कालिक कारण जरी ठरले तरी मुळात हा क्षोभ आर्थिक मुद्द्यांवर होता. काश्मिरच्या लाडामुळे जम्मुच्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष गेले ५० वर्षे होत होते. हरेक बाबतीत काश्मिरचा वरचष्मा होता. काश्मिर प्रकरणाला असणारे आंतरराष्ट्रीय महत्व बघता केंद्र सरकारची भूमिका बोट्चेपीच होती. हा लाव्हा अमरनाथ प्रकरणामुळे बाहेर पडला

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Oct 2008 - 3:06 pm | बिपिन कार्यकर्ते

जम्मूतल्या आंदोलनात हिंदूंबरोबर स्थानिक मुसलमानपण सहभागी झाल्याचे आठवते. एनडीटीव्ही वरील एका चर्चेत जम्मूतील मुसलमानांचा एक प्रतिनिधी सामिल झाला होता.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Oct 2008 - 3:03 pm | बिपिन कार्यकर्ते

माननिय सनातन,

मी अजून पर्यंत आपल्या कोणत्याही धाग्यावर मतप्रदर्शन केले नाही पण आपले सगळे धागे वाचले जरूर आहेत. मूलतः मी धार्मिक असलो तरी, सनातनी नाही आणि टोकाचे धार्मिक विचार मला पटत नाहित. असो. आज राहवले नाही म्हणून प्रतिसाद देतोय.

आपले धागे आणि त्यावर आपण वेळोवेळी आपण स्वतः लिहिलेल्या प्रतिक्रिया वाचून मला काही प्रश्न पडले आहेत. ते असे:

०१. आपला मूळ धागा उत्तम रित्या मराठीत टंकलेला असतो. पण आपले प्रतिसाद बहुतांशी इंग्रजी मधे असतात. आपण मूळ धागा कुठूनतरी 'कट-पेस्ट' करून इथे टाकता का? तसे असेल तर आपण मिपाचे त्या बाबतीतचे धोरण वाचले आहे का? वाचले असेल तर आपले लिखाण त्या धोरणांत बसते असे आपल्याला वाटते का?

०२. आपण वेळोवेळी जे लिहिता ते सत्य असेल नसेल (त्या बाबतच चर्चा अपेक्षित आहे) पण ते विचार तर्कसंगत असतात असे आपल्याला वाटते का? मी मुद्दाम हा प्रश्न विचारायचे कारण आपला वरचा हिंदु शब्दाची फोड करून त्याचा अर्थ देणारा प्रतिसाद वाचला. हिंदु या शब्दाची सर्वमान्य व्युत्पत्ति आपल्याला माहिती आहे का?

हिंदु हा शब्द 'सिंधु' या शब्दाच्या अरबी उच्चारावरून आला आहे असे मानले जाते. मूळात ज्याला आपण हिंदु धर्म म्हणतो तो एक चौकटीबद्ध धर्म नसून एक जीवनपद्धती आहे. त्यात अनेक उपांग आहेत. निरनिराळे पंथ आहेत. अगदी शास्त्रांमधे सुध्दा 'सांख्यां'सारखे निरीश्वरवादी तत्वज्ञान आहे. थोडक्यात अथ पासून इति पर्यंत सगळ्या विचारधारांना सामवून घेऊन या जीवनपध्दतीची बैठक मांडलेली आहे. तर असे हे सगळे असताना, आपण जो हिंदु शब्दाचा अर्थ 'हिन' आणि 'दु' अशी फोड करून लावला आहे, ये बात कुछ हजम नही हुई. किंवा म्या पामराला ते बाउंसर गेलं असणार.

जमल्यास 'योग्य' प्रतिसाद द्या.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Oct 2008 - 3:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदु शब्दाचा अर्थ 'हिन' आणि 'दु' अशी फोड करून लावला आहे, ये बात कुछ हजम नही हुई. किंवा म्या पामराला ते बाउंसर गेलं असणार.

नशीब, हीन+तू = हिंदू नाही म्हणालेत! ;-)

अवांतरः कॉपी-पेश्टची शंका मलाही आलीच होती. भाऊ-बहीण .... ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Oct 2008 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते

आता माझा तर्क ऐका...

हिन = हीन === तुच्छ किंवा तत्सम
दु = इथे दुबईमधे 'दु' नावाची एक टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनी आहे. आपले मिपावरचे एक माण्णीय सदस्य तिथे काम करतात.

म्हणजे हिंदु या शब्दाचा अर्थ 'अतिशय बेक्कार सेवा देणारी एक दूरसंचार सेवादाती संस्था' असा होतो. माझ्या मते हेच बरोबर आहे. कोणाला पटत नसेल तर, _____ (तुम्हाला माहीती आहे पुढे मी काय म्हणणार होतो.)

अवांतरः भाऊ - बहिण + थोर माणसांचे विचार नेहमीच जुळतात. :)

बिपिन कार्यकर्ते