"अखेर सेना-भाजप युती तुटली?" अश्या आशयाची बातमी मटा च्या वेबसाईट झळकली आहे, थोडक्यात खालीलप्रमाणे मजकूर आहे.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ज्या युतीची मुहूर्तमेढ रोवली होती, ती शिवसेना-भाजप युती तुटल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या महासंग्रामात हे दोन्ही पक्ष स्वबळावर रणांगणात उतरणार आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी हा गुंता वाढतच गेला, नेत्यांचे 'इगो' आड येत गेले, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत गेल्या आणि या खेचाखेचीचं पर्यवसान युती तुटण्यात झालं. सेना-भाजपची २५ वर्षांपासूनची दोस्ती तुटल्याच्या बातमीनं राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे."
आता खरंच जर असे झाले तर ? (कल्पना करा), राजकीय समीकरण कसे कसे असेल ?
* सर्व पक्ष अपने दमपे
* (भा ज प + म न से + उर्वरित धार्जीन महायुती घटक) वि (कॉ + राकॉ + इ ) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
*(भा ज प + राकॉ ) वि (कॉ (शि से बरोबर छुपी युती )) वि (शि से + उर्वरित धार्जीन महायुती घटक)
* किंवा दुसरे काही पर्मुटेशन कॉम्बीनेशन
प्रतिक्रिया
23 Sep 2014 - 9:47 pm | टवाळ कार्टा
=))
तसे असे असते तर माईसाहेबांनी सं.मं. ला पत्र टाकले असते
इतकी साधी चूक कशी करता राव...ते पण डुआयडी घेउन झाल्यावर ;)
24 Sep 2014 - 10:14 am | विटेकर
टाळ्या
24 Sep 2014 - 10:47 am | काळा पहाड
किती वेळ लागतोय त्याला? आता माईसाहेब पण पत्र लिहीतील की नाही बघाच तुम्ही.
24 Sep 2014 - 2:16 pm | हाडक्या
एक शंका.. माईसाहेब 'अनाहिता' मध्ये आहेत काय ?
23 Sep 2014 - 11:57 am | प्रसाद१९७१
युती मोडत वगैरे काही नाही. जमेल तितके पदरात पाडुन घ्यायचा प्रयत्न चालू आहे.
23 Sep 2014 - 12:22 pm | सुनील
थोडक्यात, वाकेन पण मोडणार नै, असेच ना? ;)
23 Sep 2014 - 1:49 pm | काळा पहाड
माझ्या डोक्यात एक आयडीया आलिये. शिवसेना १५०, भाजप १२४ आणि मित्रपक्ष १४ हा फॉर्म्युला कसा वाटतो?
24 Sep 2014 - 1:27 am | हाडक्या
मिपा वाचतेत बहुतेक हे लोकं.. तुमची सूचना डोक्यावर घेतलीये बघा.. ;)
23 Sep 2014 - 3:55 pm | विटेकर
आssssssssssssssss हे !!
अजून युतीत जीव आहे ..!!
23 Sep 2014 - 4:00 pm | दुश्यन्त
आजच्या घडामोडी (सेना भाजप नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद) पाहता युती होणार हे नक्की. आजच जगवटप पण ठरेल. शिवसेना 150, भाजप 124, घटक पक्ष 14 (किंवा 150/126/12) असा फॉर्मुला ठरल्याचे कळतेय. सेना भाजप एकत्र लढले तर कॉंग्रेस राष्ट्रवादी (हे एकत्र लढोत की स्वतंत्र) यांचे मात्र जोरदार पानिपत होणार हे निश्चित.
23 Sep 2014 - 6:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
वा.सेना-भाजपाचे सर्वच युवा नेते भलतेच जल्लोषात दिसत होते गेले काही दिवस.आता समीकरण ठरले आहे बहुतेक.
रूसवे-फुगवे आता गेले असतील अशी अपेक्षा करूया.स्वतंत्रपणे निवडणूका लढल्या असत्या तर 'कौन कितने पानीमे' कळले असते पण आता 'झाकली मूठ' आहे.
कॉन्ग्रेस्,राष्ट्रवादीचे दादा,बाबा,आबा आता काय करतात बघुया.
24 Sep 2014 - 10:46 am | पोटे
कमळं नैव बाणं नैव सेनाभाजप नैव च
शेट्टी आठवलें बलिं दद्यात मोदी दुर्बलघातकः
24 Sep 2014 - 2:03 pm | विटेकर
हे काय लिहिलतं तुम्ही पोटे ?
मोदिना देवत्व बहाल केले? कुठे फेडाल ही पापे ?
नायक नही खलनायक है यह असा तुम्हीच कन्ठरव करत होता ना ?
24 Sep 2014 - 3:26 pm | पोटे
देव ? हा स्वतंत्र श्लोक आहे..
24 Sep 2014 - 3:28 pm | पोटे
http://www.mtmobile.in/regular/details.php?storyid=0§ion=mumbai
लबाड भगव्यांमधुन लहान पक्ष फुटले.
व्यापारी हु मै .... प्रचिती आली.
24 Sep 2014 - 4:42 pm | विटेकर
भगवा लबाड आणि हिरवा सोवळा का?
24 Sep 2014 - 5:08 pm | हाडक्या
असहमत विटुकाका..
प्रतिसाद कोणाकडून आलाय त्यावरून जरी आपले उत्तर आलेले असले तरी आपण असहमत.
इथे भगवा (पक्षी: भाजप वा शिवसेना वा युती जे अभिप्रेत असेल ते गृहित धरतोय.)
भगवा लबाड आणि हिरवा महालबाड असेल हो. म्हणून भगव्याची लबाडी ही लबाडीच आहे, ती सोवळी होत नाही.
त्या अनुशंगाने बोलावे.
अर्थात वरच्या पोटेंच्या प्रतिसादातला भाजपद्वेष्टा रोख मान्य नाहीच.. परंतु जर छोट्या घटक पक्षांना बेसावध ठेवून गुंडाळायची युतीची इच्छा असेल तर ती लबाडीच.
(तटस्थ) हाडक्या
24 Sep 2014 - 6:04 pm | नानासाहेब नेफळे
सहमत ,सत्तेच्या लोभापायी ध चा मा करणार्यांचेच वैचारीक वंशज या बीजेपीत आहेत, ते शेट्टी जानकरांना फार काही जागा देतील असे वाटत नाही.
24 Sep 2014 - 6:46 pm | पोटे
छोट्या घटक पक्षांना बेसावध ठेवून गुंडाळायची युतीची इच्छा असेल तर ती लबाडीच..
...
सहमत.
गीर्वाणवाणीमध्ये मी हेच लिहिले आहे.
24 Sep 2014 - 6:53 pm | काळा पहाड
अहो ते हिरवे नाहीयेत, ते निळे.
25 Sep 2014 - 4:41 pm | शिद
दिल्लीतून निरोप आला, ‘युती तोडा!’
25 Sep 2014 - 6:13 pm | आजानुकर्ण
दिल्लीतून निरोप येणे ही तर खास काँग्रेजी परंपरा आहे ना! तिची लागण इतरांनाही झाली वाटतं.
25 Sep 2014 - 6:17 pm | पिंपातला उंदीर
नागपुरातून निरोप यायचे हे माहित होत . आता दिल्ली मधून पण यायला लागले
25 Sep 2014 - 8:48 pm | नानासाहेब नेफळे
नागपुर टु मुंबई व्हाया दिल्ली.
26 Sep 2014 - 9:58 am | विटेकर
उगी उगी नानासाहेब !
आणु या हं आपण नागपूरहून निरोप आणू !!
असा त्रागा नायं करायचा....
26 Sep 2014 - 10:15 am | काळा पहाड
ते गंडलंय.
28 Sep 2014 - 9:03 pm | श्रीगुरुजी
>>> दिल्लीतून निरोप आला, ‘युती तोडा!’
ही बातमी कोणत्या वृत्तपत्रात आली आहे ते तर बघा ना आधी.
'भाजप नरमला', 'शिवसेनेच्या ठाम भूमिकेमुळे भाजप बॅकफूटवर', 'बाणराव टेचात, कमळाबाई पेचात', 'भाजप स्वतःच्या चक्रव्यूहात अडकला', 'उद्धव ठाकर्यांच्या आक्रमतेमुळे भाजप जमिनीवर', 'भाजप दोन पावले मागे', 'भाजपची घड्याळाला किल्ली', 'सेनेचा भाजपला आवाSssज', ...
२५ तारखेला युती समाप्त झाली. त्याआधी २-३ आठवडे मटा मध्ये बातम्यांचे वरीलप्रमाणे मथळे होते. भाजपविरूद्ध शिवसेनेची सुपारी घेतल्यासारखे मटा मथळे देत होता. त्यामुळे "दिल्लीतून निरोप आला, ‘युती तोडा!’" या मटामधील मथळ्याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
25 Sep 2014 - 8:34 pm | चैदजा
आता पोपट पण मेला, आणि कावळा देखिल मेला !!!!!
25 Sep 2014 - 9:49 pm | काउबॉय
पूर्ण अनपेक्षित.... आता जनता काय करेल ?
26 Sep 2014 - 9:21 am | चौकटराजा
माझा असा अंदाज आहे की....मुख्यमंत्री भाजपाचा होईल असे काहीतरी करायचे , मुख्यमत्री राष्ट्रवादीचाच होईल अशीच मागणी अप्रत्यक्ष रित्या होईल असे करीत राहायचे हे भाजपा व राका चे अगीदर पासून आपापसात ठरलेले असावे. आता काँग्रेस व शिवसेना याना आपली खरी ताकद महाराष्ट्रात आपण ताठ्याने वागावे इतकी आहे का हे कळेल. तसेच शरद पवार व मोदी यांच्यात काही वैयक्तिक करिश्मा आहे किंवा कसे हे ही कळेल. शिवसेनेकडे उद्धव शिवाय कोणीही नाही बोलायला.काँग्रेसकडे ही सगळी वानवाच आहे. मुके मनमोहन व कागद वाचणार्या म्याडम काय करणार ? सर्वात जास्त जागा राका ला मिळाल्या वा भाजपाला मिळाल्या तर मुख्यमत्रीपद आता हक्काने दोघानाही अनुक्रमे कॉग्रेसकडे व शिवसेनेक्डे मागता येईल. आमची शिवसेनेबरोबर ची मैत्री चालूच राहील असे भाजपाने म्हटलेलेच आहे. व जातीयवादी
शक्तीना सत्तेपासून दूर ठेवण्याचे परमपवित्र कर्तव्य करायला राकॉ. आणि कॉ. नेहमीच सज्ज असतील.प्रश्न 'वर्षा'वर कुणी
राहायचे याचाच असणार आहे.
26 Sep 2014 - 10:03 am | विटेकर
आता खरी गंमत आहे ती जनतेची ! नक्की कुणाला मत द्यायचे हे ठरेपर्यंन्त निवडणूक संपून देखील जाईल.
सर्वांनी नाटो पर्याय निवडला तर ?
माझी फक्त एकच प्रार्थना आहे, राष्ट्रवादी नको, रामदास आठवले देखील मुख्यमंत्री चालतील.
भाजप - शिवसेनेला आता कळून चुकेल की कौन कितने पानी मे ! आता आघाडीची थोडी कमी मानहानी होईल.
हाय , राज तुम्हारा चु़क्याच ! आत्ता तुम्ही ब्याटिंगला असता तर लै मजा आली असती ! तुम्ही हिट वि़केट औट झालाय!
आता तुम्हाला एकच पर्याय आहे ... काका मला वाचवा !
26 Sep 2014 - 10:37 am | चौकटराजा
रामदास बुवा झाले मुख्यमंत्री तर रोज मोदींचे प्राईम टाईम मधे एक भाषण ठेवायचे लगोलग रामदास आठवलेंचा पंचरंगी प्रोग्राम. सह्याद्री वाहिनीचा जीर्णोद्धार होईल मग !
26 Sep 2014 - 10:17 am | बाळ सप्रे
मोदींचा करीश्मा अजून असल्याने भाजपला सर्वाधिक फायदा होईल असा अंदाज आहे. सेनेला केंद्रातीलही मंत्रीपदे सोडावी लागून हेही नाही तेही नाही अशी अवस्था होण्याची शक्यता वाटते. आघाडी नसली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी जनतेच्या रोषाला बळी पडतील. राजला कदाचित मतविभागणीमुळे लॉटरी लागू शकेल.
26 Sep 2014 - 10:50 am | पिंपातला उंदीर
राज्यातील २७ ते ३० प्रतिशत मराठा समाज जर राष्ट्रवादी च्या मागे एकवटला तर या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी सगळ्यात मोठा लाभार्थी ठरू शकतो
26 Sep 2014 - 10:51 am | उडन खटोला
महाराष्ट्रातील तमाम गड कील्ले प्रेमींना खुषखबर ... निवडणुक निकालानंतर शिवसेना अध्यक्ष पुन्हा फोटोग्राफी साठी संपूर्ण वेळ देणार. परत एकदा हॅलिकॉप्टर मधुन सुंदर नजारे टिपण्यासाठी ... कारण इतर काही कामच नसणार हे आधीच त्यांना कळलं आहे ...
28 Sep 2014 - 10:26 pm | हुप्प्या
आता प्रचाराला थोडाच वेळ उरला आहे त्यामुळे उमेदवार आता प्रचाराच्या लढाईत पूर्णपणे उतरले असतील. निदान त्या उमेदवारांनी तरी आपल्या पूर्वीच्या सहकारी पक्षाला दोष देण्यात वेळ न घालवता आपण निवडून आलो तर काय काम करणार ते सांगावे अशी अपेक्षा आहे. कारण मतदाराला युती का फुटली वा आघाडी का तुटली ह्यात फार स्वारस्य नसेल. त्याला आपल्या दैनंदिन आयुष्यात काय बदल सुधारणा होणार ह्यात रस असणार.
कुणी आपापल्या मतदारसंघात काय प्रकारचा प्रचार चालू आहे ह्याचा अनुभव सांगेल का?