जेवणाची चव

कहर's picture
कहर in काथ्याकूट
17 Sep 2014 - 9:04 am
गाभा: 

लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.

काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"

बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले
bazar

प्रतिक्रिया

जीन्स घातली होती का? नायतर फाऊल आहे. नुस्ती म्यानिक्यूर्ड नखं असून काय उपेग?

शिद's picture

17 Sep 2014 - 4:52 pm | शिद

काही नाही सेंचूरी नोंदवायला आलेलो.

बाकी चालू द्या.

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2014 - 1:44 pm | टवाळ कार्टा

;)

सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती

सैल टि-शर्ट घालून हातगाड्यांवरच भाजी घेवू शकता येते...तुम्ही दाखवलेल्या फोटोतल्या बाजारात नाही. ;)

बाकी नक्की जळजळ कश्याबद्दल आहे?
१) घट्ट जिन्स घालण्याबद्दल?
२) सैल टि-शर्ट घालण्याबद्दल?
३) हातगाडीवरुन भाजी विकत घेण्याबद्दल?
४) भैय्याकडून भाजी विकत घेण्याबद्दल?
५) मोबाईल कानाशी धरून बोलता बोलता भाजी विकत घेण्याबद्दल?
६) ड्रेसला शोभेल अशी नेलपोलीश लावली होती म्हणून?
७) तर्जनीचे नख मोठे वाढवल्यामूळे व ते नख भाजीत न खुपसल्यामूळे?

इ. इ. आणखी काही कारणं असतील तर तसं कळू देत.

भाजीखरेदीला असे कपड़े घालून जायचे नाही मग त्यांनी नेमके करावे तरी काय ?

हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज यांची आणि दिपिकाची चर्चा का चालूए? काय कामं नैत का लोकांना? बरेचदा आपल्यापर्यंत खरी माहिती येत नाही मग कशाला टैम वेस्टायचा? च्यामारी! घालू द्या की कोणाला काय घालायचय ते! शेवटी बाईनं घरी भाजी पोळी केली ना? मग झालं तर! किती ते लक्ष लोकाकडे! आपण भारतीय लोक्स आपल्या कामाच्या लीस्टपेक्शा दुसर्‍याकडे जास्त लक्ष देतो का?

हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज यांची आणि दिपिकाची चर्चा का चालूए?
चर्चा होणारच आज्जे... ;) कारण 'दीपिकानं जे दाखवलं तेच तर दिसलं'

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?

हम्म...आजकाल तू लैच फेमस हून र्‍हायलायस. घालू दे की तिला जे घालायचय ते! बहुतेक मला माझ्या आजूबाजूला असे प्रकार बघून सवय झालीये.

ऋतुराज चित्रे's picture

20 Sep 2014 - 12:41 pm | ऋतुराज चित्रे

शॅरोन स्टोनचा 'तो सीन आठवला.

मराठे's picture

17 Sep 2014 - 8:21 pm | मराठे

वा: दिवस सार्थकी लागला.

एक आईवरील कविता आवश्य एकदा तरी ऐकावी अशी -
http://www.youtube.com/watch?v=vXdolSi0DMY

भाजी शिळी झाली वादावादीमध्ये.

भेंडी शुद्धीवर येण्याचा जोक आठवला.

कवितानागेश's picture

18 Sep 2014 - 4:36 pm | कवितानागेश

सांगा की.

प्यारे१'s picture

18 Sep 2014 - 7:05 pm | प्यारे१

बाकी तो फोटो आटपाडी तालुक्यातल्या एखाद्या आठवडी बाजारातला असावा.
(गेलाबाजार डखांबे बुद्रुक, शिरगाव किंवा हुमगाव पण चालेल) जिथं सैल टीशर्ट आणि घट्ट जीन्स अजूनही बहुधा दुकानातल्या पुतळ्यालाच घातली जात असावी.

मुक्त विहारि's picture

19 Sep 2014 - 12:16 am | मुक्त विहारि

प्रतिसाद एका पेक्षा एक....

आनन्दिता's picture

19 Sep 2014 - 12:25 am | आनन्दिता

नौवारी घालुन केलेलं आणि सहावारी घालुन केलेलं. असं ही वेरिएशन जेवण्याच्या चवीत आणता येतं हे ज्ञान आज मिळालं.

"ती हिंगाची जादा चिमुट" असला धागा वाचल्याचं स्मरतंय.. तो शोधुन त्यावर प्रतिसाद टंकावा का बरें.. ??? :) :)

इशा१२३'s picture

20 Sep 2014 - 10:34 am | इशा१२३

अय्या आनन्दिता होत काग अस?माझ्याकडे भा़जी आणायला मीच जाते आणि पंजाबी ड्रेस(सलवार कमीज काहिहि म्हणा)घालून जाते.नउवारि नाहि अन जिन्सहि नाहि.पण भाज्यांना काहि पंजाबी चव येत नाहि.यायला हवी पंजाबी ड्रेस
घातल्यावर हो कि नै... :tongue:

आनन्दिता's picture

21 Sep 2014 - 12:37 am | आनन्दिता

हो ..
इतके जुजा मिपाकर छातीठोक पणे सांगतायत म्हणजे ते तस्स्सच असणार भौतेक!

"तुमच्या कपड्याला चव आहे बरं का" असा नवा वाक्यप्रचार मराठीत आणण्याचा ठराव मांडण्यासाठी मिपाकर लौकरच ' बसणार ' आहेत. :) :)

रवीराज's picture

21 Sep 2014 - 12:19 pm | रवीराज

नौवारी घालुन केलेलं आणि सहावारी घालुन केलेलं.

वाचुन अंमळ मजा वाटलेी, म्हणजे स्वयंपाकात मसाल्याप्रमाणे हेपण टाकतात का ?

कहर's picture

19 Jul 2018 - 2:39 pm | कहर

तीन वर्षांपूर्वी