सेव द डील्स डॉट इन

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
11 Sep 2014 - 11:11 pm
गाभा: 

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)

****************

आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे.....

फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!!

व्वा! चक्क १६५०/-चा फायदा!! किती मजा येईल नाही?
विशेष म्हणजे कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे व्हावुचर देणार्‍याचे किती सारे कनेक्शन्स असतील नाही?

म्ह्टले कोण असेल हा, ह्या घोर कलियुगात इतका फायदा करुन देणारा?
अशा या दानशुर कर्णाची अवश्य भेट घेतलीच पाहीजे, असे मनात ठरवून त्याचे नाव व पत्ता शोधु लागलो.

वेब साईट आहे www.savethedeals.in सेव द डील्स डॉट इन
आणि साईट बनवणारा आहे Eviano Digital S.L.U.
अरेच्चा! S.L.U. अशी कोणत्या प्रकारची कंपनी असते?

Eviano Digital S.L.U. चा जरा अजून शोध घेतला तर...

या शोधात Wrong deal and money deduction आणि Cheating असे नको ते शब्द दिसायला लागलेत.
पुढे जावून कंझुमर कंप्लेंट्च्या लिंक मध्ये बर्‍याच जणांची फसवणुक झाल्याचे लिहीले आहे.

Fraud Site extorting money from people,

But unlike other website, this one does not show how much its going to deduct and neither did it ask for OTP. Transactions without OTP are fraudulent.

Viola Wickman सारखे विदेशी लोकही फसले आहेत!

anbujeev लिहितात
ALWAYS use virtual credit cards for phishy websites for safe play.

देवच जाणे खरे खोटे काय आहे, पण या दानशुर कर्णाची अवश्य भेट घेतलीच पाहीजे, आणि त्यासाठी हवा आहे त्याचा पत्ता!

**************

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.

प्रतिक्रिया

काउबॉय's picture

11 Sep 2014 - 11:14 pm | काउबॉय

तर आशा इमेल्स कमी होतात.

तुषार काळभोर's picture

13 Sep 2014 - 1:47 pm | तुषार काळभोर

त्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं. खोटं काहीही दिसलं नाही.
फसवणुकीचा गाजावाजा करतात ते आंधळेपणाने क्लिक करणारे लोक. डोळे आणि डोकं उघडे असले तर वेबसाईटवर खाली केलेला उल्लेख वाचता येतो.
(हा उल्लेख स्पष्ट नाही/लहान नाही/जाहीर नाही, असे म्हणताना किती *टर्म्स & कंडिशन्स अप्लाय असे उल्लेख स्प्ष्ट/मोठे/डोळ्यात भरणारे असतात, हा कृपया विचार करावा.)

But unlike other website, this one does not show how much its going to deduct

हा जो उल्लेख तुम्ही केला आहे, तो थोडा चुकीचा वाटतो.

(फोटो दिसत नसल्यास फोटोची लिंक https://lh6.googleusercontent.com/-58Ou43CBtXg/VBP7bLjEVxI/AAAAAAAABPs/n...)

***मी त्या वेबसाईटचा मालक/सदस्य/लाभार्थी/हितचिंतक कोणीही नाही. पण कुणीही कसलीही शहानिशा न करता 'आग लागली...आग लागली" असे बोंबलत पळत सुटला, तर मला राहवत नाही. आग लागलेली नाहिये, हे मला सांगावसं वाटतं.

गुगलवर सर्च केल्यावर तक्रारी करणारे मिळतात, पण फोरम्सवर लिहिणारं भारतीय पब्लिक गाजावाजा करणारं असतं. विचार न करता, माझं नाव कुठेतरी ऑनलाईन झळकणार, या उन्मादात काहीही लिहिणारं असतं. (अपवाद नक्कीच असतात, पण नियम सिद्ध करण्यापुरते!)

आयुर्हित's picture

14 Sep 2014 - 1:51 pm | आयुर्हित

खोटं काहीही दिसलं नाही?
अरेच्चा, असे कसे झाले?

जे मला दिसले ते आपण पाहीलेले दिसत नाही!
परत एकदा सर्व मुद्दे पहावे, हिच नम्र विनंती.

सुबोध खरे's picture

14 Sep 2014 - 10:46 am | सुबोध खरे

अर्थशास्त्राचा पहिला नियम
पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही
तो फक्त खिसे बदलतो.
बाकी काय लिहिणे?
जन सुज्ञ आहेतच.

विजुभाऊ's picture

17 Sep 2014 - 1:22 pm | विजुभाऊ

अर्थशास्त्राचा पहिला नियम
पैसा निर्माण होत नाही आणि पैसा नष्ट होत नाही

अरे बापरे. हे काय नवीनच. पैसा निर्माण होतो. तसे नसते तर प्रॉडक्टीव्हीटी आणि जी डी पी या टर्म्स आल्याच नसत्या.
पैसा उत्पादीत होतो. मालमत्ता सुद्धा निर्माण होते.

काळा पहाड's picture

17 Sep 2014 - 1:31 pm | काळा पहाड

मालक, पैसा उत्पादीत केला तर बाकीच्या पैशाची किंमत त्या तुलनेत कमी होते. म्हणून तर पैसे छापले की त्या करन्सी ची किंमत कमी होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2014 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

दादागिरी करता आली की छापलेल्या पैश्यामागे काय मुद्दल आहे हे गुपीत ठेवता येते... अंकल सॅमने त्याच्या गेल्या कित्येक दर तिमाहीच्या मागे "क्वांटिटेटीव्ह इझींग" करता छापलेल्या अब्जावधी डोलरच्या नोटांसाठी काय मुद्दल ठेवले आहे हे "गुपीत ऑफ द मिल्लेनियम" आहे (की नाही) ?

आदूबाळ's picture

14 Sep 2014 - 12:03 pm | आदूबाळ

SLU म्हणजे स्पेनमधली सिंगल पर्सन कंपनी. Sociedad Limitada Unipersonal.

ही प्रस्तुत कं कशीही असो, पण तमाम slu वर शंका घ्यायचं कारण नाही.