महाराष्ट्र विधानसभा निवडणूका २०१४ च्या अनुषंगाने मला पडलेले काही प्रश्न. तुम्हाला या प्रश्नांवर काय वाटते आणि तुमचे अंदाज काय असतील हे जाणून घ्यायला आवडेल. सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट :)
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
उत्तरे शक्यतो युती आघाड्यांची घोषणा होण्याअगोदर द्यावी ही विनंती. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री कोण होईल यावर चर्चा चालू राहू शकते.
प्रतिक्रिया
16 Sep 2014 - 10:26 pm | आदूबाळ
क्लिंटनभौ व्हेर आर यो?
माझे अंदाजः
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
--> होईल. पंचवीस वर्षांचा लिप्ताळा महिन्यात तोडणार नाहीत.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
--> भाजपच्या.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
--> भाजपला. उद्धोयुगातली सेना काय पटत नाय ब्वा.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
--> एकत्र.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
--> नाय देणार.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
--> हो, वाटतं.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
--> देवेंद्र फडणवीस
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
--> त्यांच्या नाड्या थंड होतील.
17 Sep 2014 - 1:30 am | खटपट्या
आमचा एक उलट प्रश्न श्री मुटके यांसी - सर्व अंदाज बरोबर आले तर गिफ्ट मिळणार कि एक अंदाज बरोबर आला तरी मिळणार
17 Sep 2014 - 5:12 am | धर्मराजमुटके
उत्तर वर दिलेच आहे.
सर्वाधिक बरोबर अंदाज वर्तविणार्यास माझ्याकडून एक सरप्राईज गिफ्ट.
17 Sep 2014 - 10:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लिंटनसेठ जिथे असाल तेथून लवकर परत या...! :)
माझे अंदाजः
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
शंभर टक्के होईल. वेगवेगळे लढण्याचा दम कोणात नाही.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
सेना आणि भाजप अशा दोघांमधे विखुरल्या जातील.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
आपलं मत भाजपाला जाण्याची शक्यता. सेनेचं उद्ध्व नेतृत्त्व मला टील एंड पर्यंत पटणार नाही.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्र.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
शप्पथ लै कंटाळलो या सरकारला. बदल हवा आहे. (वाटल्यास पुढच्या वेळी वाटल्यास पुन्हा हेच आले पाहिजेत असे म्हणेन. पण बस अब सहा नही जाता)
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
हो. किती दिवस एकमेकांच्या कुबड्या वापरायच्या आणि महाराष्ट्रात असे किती पक्ष आहेत की जर हे बहुमतात नै आले तर दुसरे येतील.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
चिठ्ठ्या काढा पण देवेंद्र फडनीस नको. (जास्त हुशार माणूस सिष्टीममधे काही करु शकत नाही)
मतदार आणि मिपावर प्रतिसाद लिहिणारे चंचल असतात यांच्या मताची ग्यारंटी नसते, माझंही तसंच आहे.
-दिलीप बिरुटे
(चंचल मिपाकर आणि मतदार)
16 Sep 2014 - 10:34 pm | विनोद१८
अगदी तसेच होवो.
16 Sep 2014 - 10:38 pm | विलासराव
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
मी.
16 Sep 2014 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
मग मंदिराच्या डब्बल-ट्रिप्पल रोलचे काय ?
16 Sep 2014 - 10:47 pm | टवाळ कार्टा
मग कारभार शासकिय होइल :)
16 Sep 2014 - 10:50 pm | विलासराव
डॉनमधला तो अधीकारी आनी स्मगलर आठवा.
16 Sep 2014 - 11:39 pm | काळा पहाड
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? होईल.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? भाजप
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. उद्धोजी हे एककल्ली, अननुभवी आणि अपरिपक्व आहेत. सेनेकडे चांगले सोडा, नेतेच कुठायत?
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? छे!
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? होय
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस. अॅक्च्युअली बाबा, पण त्यांचा पक्ष चुकला.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? भोपळा
17 Sep 2014 - 12:35 am | श्रीरंग_जोशी
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
काही सेनेच्या काही भाजपच्या
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
सेनेला. कारण उद्धव यांचे धोरणी व दूरदर्शी नेतृत्व. राज्यात व केंद्रात सत्ता नसतानाही त्यांनी पक्षाला व्यवस्थित सांभाळले. मुख्य म्हणजे निवडणुकींतील लाभ डोळ्यापुढे न ठेवता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार लढा दिला. गेल्या दशकात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कुणीच एवढे लढले नाही. शिवाय राज्य सरकारची धोरणे राज्यातच ठरायला हवी.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र (ते वेगळे लढल्यास महायुतीचे अधिक नुकसान करतील. जसे १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत घडले.)
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही देणार
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? उद्धव ठाकरे
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? गेल्या खेपेपेक्षा कमीच
17 Sep 2014 - 4:11 am | रमेश आठवले
जर भाजपा आणि शिवसेना भांडले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर पुढील पर्याय निर्माण होऊ शकतात.
१.दोघांनाही १४४ जागा एकट्याने मिळणार नाहीत.
२. निवडणुकी नंतर दोघांच्या आमदारांची बेरीज १४४ च्या जवळ पोचली,तर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र येतील. ज्या पार्टीची सदस्य संख्या जास्त असेल त्या पार्टीचा मुख्य मंत्री होईल.
३. जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे. पण शिवसेनेचे आस्तित्वच धोक्यात येईल. ही पार्टी फक्त महाराष्ट्रात आहे आणि तिला घडवणारे बाळासाहेब आता नाहीत. उद्धव यांनी राजकारणात कधी रस दाखविला न्हवता आणि ते घराणेशाही पद्धतीने शिवसेना प्रमुख झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध त्यांचा तुल्यबल चुलतभाऊ आहे.
म्हणून उद्धवने भाजपाशी नमते घेणे शिवसेनेच्या हिताचे आहे.
17 Sep 2014 - 5:52 am | हुप्प्या
मोदी लाटेमुळे भाजपाला आत्मविश्वास आला आहे असे वाटते. पण तो अती होऊन गर्वाचे घर खाली येऊ नये. दोन्ही पक्ष आपल्या हिताकरता भांडत असले तरी एक मतदार म्हणून मला हे निराशाजनक वाटते. आघाडीच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार, वशिलेबाजी, गलथानपणा, अंदाधुंद इतकी उघड दिसत असताना, निवडणुकांना वेळ थोडाच राहिला असताना, सत्ताधारी लोकांची लक्तरे वेशीवर टांगायच्या ऐवजी आपापसातल्या लाथाळ्या बघाव्या लागणे क्लेषकारक आहेच. पण अशाने मतदार "मग काँग्रेसच बरी" म्हणून पुन्हा काँग्रेसकडे वळेल आणि पुन्हा हेच दादा बाबा बोकांडी बसतील अशी भीती आहे. तशात भाजपाविषयी भटजी आणी शेटजींचा पक्ष असे अभिप्राय अनेक संकेतस्थळी वाचायला मिळाले आहेत त्यामुळे ह्या मतदानाला नको ते जातीय वळण लागू शकेल.
शिवसेनेने मुंबईत काय दिवे लावले आहेत ते सगळ्यांना दिसतेच आहे. त्यामुळे युती सत्तेवर आल्यावर अगदी सोन्याचा धूर निघेल असे आजिबात नाही. पण निदान खाणारी तोंडे बदलतील. नवी बांडगुळे रुजायला थोडा वेळ लागेल. निदान तोवर काहीतरी बरे दिसेल अशी आशा.
१. युती अगदी तुटली नाही तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणे शक्य आहे.
२. मित्रपक्ष हे नगण्य पक्ष आहेत. त्यांच्या समर्थनाचा तसा काही फायदा नाही. युतीला शेतकरी, दलित असल्या गटांमधे प्रातिनिधित्व असल्याचा दावा करता येतो इतकेच. त्यातले आठवले म्हणजे अत्यंत गाळीव नग आहे.
३. भाजपाला मत. कारण शिवसेनेने इतकी वर्षे मुंबईत सत्ता असून काहीही नवे करुन दाखवलेले नाही. तोच भ्रष्टाचार, तीच गुंडगिरी. अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही मला शिवसेना कधी मनापासून आवडली नाही. घराणेशाही, गुंडगिरी ह्यात शिवसेना काँग्रेसच्या तोडीची आहे.
४. एकत्र.
५. राष्ट्रवादी वा काँग्रेस कुणालाही मत देण्याची इच्छा नाही.
६. हो.
७. देवेंद्र फडणवीस आले तर बरे. पण तावडे वा पंकजा मुंडेही चालतील. ठाकरे नकोत.
८. निवडणुकीनंतर मनसेत खास दम नसेल
17 Sep 2014 - 8:50 am | पिंपातला उंदीर
१९९९ आणि २००४ मध्ये याच दळभद्री पणाने युती ने सत्ता गमावली . मी भाजप आणि मोदी भक्त नाही . असलोच तर टीकाकार आहे . पण महाराष्ट्र पुरत बोलायचं झाल्यास आघाडी सरकार ला बदलण्याची नितांत गरज आहे . मग भले युती असो वा तिसरी आघाडी . साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर . मोदी , उद्धव , शहा यांना याची जाणीव असेल हि अपेक्षा
17 Sep 2014 - 10:35 am | विवेक्पूजा
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - होईल
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप. सेनेची अरेरावी, मारधाड पटत नाही.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? सध्य परिस्थितीत नक्किच नाही.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? शक्यताच नाही.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? मनसेचा प्रभाव वाटत नाही.
17 Sep 2014 - 2:24 pm | अक्षरमित्र
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होणार नाही. वेगवेगळे लढतील. शिवसेना वेगळे होण्याची घोषणा सर्वप्रथम करेल.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
काही सेनेच्या बाजूने काही भाजपाच्या.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
सेनेला करणार.
भाजप हा योग्य पर्याय आहे हे माहित आहे, शिवसेना गुंडापुंडांची संघटना होती हे मान्य तरीही उद्धव ठाकरेंसाठी भावनिक मुद्द्यांवर सेनेला मतदान करणार. फक्त नंतर उद्धवबरोबर आदित्याचेही पाय दाबावे नाही लागले म्हणजे मिळविली.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्र. हे चोर फार हुशार आहेत.
पण धरणांना नव्या पद्धतीने पाणीपुरवठा करु शकणार्यांना स्वतंत्र लढावेसे वाटते जे मला वाटते योग्य आहे.
जर शिवसेना स्वतंत्र लढली तर राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल. नंतर सेना किंवा भाजप किंवा काँग्रेस कोणालाही पाठींबा देईल. ते शिवाशिव पाळत नाहीत.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
कोणालाही नाही.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
होय. प्रत्येकाचे खरे वजन एकदा कळलेच पाहिजे. जर स्वतंत्र लढले तर शिवसेना भाजपपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. नंतर युतीचा पर्याय आहेच.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
उद्धव ठाकरे
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
काहीच नाही. आमच्या वयाच्या पोरांची लग्न होऊन दोन दोन पोरे झाली त्यांना पण अ़़जून निळी प्रिंट येत नाहिये. वर यांच्याकडे रिपोर्ट मागायची सोय नाही. पाच वर्षाने विचारा म्हणतात.
19 Sep 2014 - 11:27 am | धर्मराजमुटके
जिंकलस मित्रा ! तोडलस, फोडलस. तुझा पहिला अंदाज तरी बरोबर आला आहे असे वाटतेय. ही बातमी पहा.
19 Sep 2014 - 5:46 pm | अक्षरमित्र
मी काहीही तोडल नाहीये. पण एक अंदाज बरोबर आलाय तेव्हा बक्षीस तयार ठेवा. ठाकरे विल बी नेक्स्ट सीएम. बाळासाहेबांना जे जमल नाही ते उद्धव करुन दाखवणार.
19 Sep 2014 - 6:28 pm | कपिलमुनी
त्यांना व्ह्यायचं असता तर कोणी अडवलं नव्हता !
सीएम ना होणा हे बाय चॉईस होता
20 Sep 2014 - 12:16 pm | समीरसूर
कालची रात्रीची बातमी. युतीवर एकमत. युती होणारच. युतीशिवाय दोघांना पर्याय नाही. अहंगंड राजकारणात फारसा उपयोगात येत नाही हे भाजप आणी शिवसेना दोन्ही पक्ष जाणतात. शिवसेनेची ताकत भाजपमुळे आहे हे ठाकरेंना माहिती आहे आणि महराष्ट्रात शिवसेनेला अजूनही किंमत आहे हे भाजपला माहिती आहे. युती तोडण्याचा मूर्खपणा ते कदापि करणार नाहीत यात शंका नाही.
17 Sep 2014 - 2:47 pm | प्रसाद गोडबोले
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
>>> युती होणार हे नक्की . आमच्या अंदाजे शिवसेना भाजप १५०-१२० अशी मांडवली होईल .
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
>>> बहुतेक सगळे शिवसेनेच्या बाजुला राहतील असा अंदाज आहे .
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण
>>> नोटा. आमचे मत शिवेन्द्रराजे भोसले ह्यांनाच :) अर्थात ते भाजप शिवसेनेच्या बाजुला आले किंव्वा अपक्ष उभेराहिले तर ... पण तशी शक्यता नाही . म्हणुन नोटा !
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
>>> एकत्रच लढणार
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
>>> नोटा.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
>>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
>>> देवेन्द फडणवीस .
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
>>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !
17 Sep 2014 - 3:48 pm | दुश्यन्त
१) सेना भाजप एकत्रच लढतील. मात्र भाजपने ताठा सोडून द्यावा. निम्म्या जागा शिवसेना देणार नाही आणि तेच बरोबर आहे.
२) दोघे वेगवेगळे लढले तर भाजपचे जास्त नुकसान होईल. सेनेकडे संघटन आणि कडवे सैनिक जास्त चांगले आहे.
३) कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढो अगर स्वतंत्र लोक त्यांना घरी बसवणार आहेत.
४) उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. महायुतीत तेच राज्यभर सर्वमान्य होईल असे नेते आहेत. भाजपकडे स्व मुंडे होते आता काही प्रमाणात गडकरी आहेत मात्र ते केंद्रातच राहतील. फडणवीस हुशार असतील मात्र ते किंवा तावडे किंवा खडसे/ मुनगुण्टिवार यांना दरवेळेस मोदी-शहा यांना विचारून वागावे लागेल. पृथ्वी बाबा किंवा अशोक चव्हाण सोनियांकडे चकरा मारत तसाच प्रकार होईल.राज्याचे निर्णय राज्यातच घेतले जावेत.उद्धव यांना संधी मिळायला हवी. काहीही असो बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी सेना नुसती सांभाळली नाही तर वाढवली पण आहे. याचबरोबर सेना भाजप २.५/२.५ वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतील ही पण एक शक्यता आहे.
५) आत्ताच्या घडीला मनसेने आपल्या जागा राखल्या किंवा १० पर्यंत जरी आमदार आणले तरी ती त्यांच्यासाठी समाधानाची बाब ठरेल. कारण लोकसभेतली त्यांची संशयास्पद भूमिका, वडा -सूप वाद, मनसेला मत= कॉंग्रेसला मदत हे सूत्र, नाशकातला कारभार यामुळे त्यांना ओहोटी लागलेलीच आहे. फार काही मिळवता नाही आल तरी आहे ते गमावले नाही तरी त्यांना पुढे (२०१९ ला) त्याचा फायदा होवू शकतो.
.
कॉंग्रेस राष्ट्रवादीचा भ्रष्ट, अनागोंदी कारभार, दडपशाही, सत्तेची गुर्मी याला लोक वैतागले आहेत. जनता आघाडीला घरी बसवणार यात शंका नाही. सेना भाजपने याचा किती लाभ घ्यायचा हे त्यांच्यावर अवलंबून आहे.
17 Sep 2014 - 3:51 pm | बॅटमॅन
युतीला जागावाटपात जागा कमी पडत असतील तर शेजारच्या राज्यातल्या जागा भाड्याने घ्या.
- निवडणूक आयोग.
17 Sep 2014 - 4:05 pm | नाव आडनाव
कालंच आठवले एका मुलखतीत म्हणत होते - जागा आम्हाला पण कमि मिळायला नको आणि त्याना पण. तेंव्हा मला पण असंच वाटलं होतं कि आठवले बहुतेक हा ब्रेकिन्ग विचार मांड्तात कि काय - टोटल जागा २८८ नाहि तर महा युतितील प्रत्येक पक्षांच्या अपेक्षित जागा जितक्या आहेत त्याच्या बेरजे इतकि करा :)
17 Sep 2014 - 9:59 pm | आदूबाळ
आठवले आहेत ते. अशक्य काही नाही.
17 Sep 2014 - 3:58 pm | दुश्यन्त
साली साडेसाती पण साडेसात वर्षात जाते पण हे आघाडी सरकार १५ वर्षापासून डोक्यावर बसले आहेत . सेना भाजप ने हि संधी दवडली तर सलग ४ टर्म मिळवतील हे दरोडेखोर +१
18 Sep 2014 - 1:51 pm | प्यारे१
सक्तमजुरी कधी कधी वेगवेगळी भोगायची असते. मत देऊन गुन्हा केलाय ना? भोगायच्या शिक्षा!
18 Sep 2014 - 9:10 pm | पुतळाचैतन्याचा
हेला १४ वर्षाचा वनवास असे नाव.
17 Sep 2014 - 4:03 pm | मदनबाण
१ शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ? - युती ही दोन्ही पक्षांची गरज आहे.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ? - काही सेनेच्या तर काही भाजपच्या
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या. भाजप.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ? एकत्र
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ? नाही. पाण्या ऐवजी ** पिण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनी जरुर मद द्यावे.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ? नाही, कमळाबाई आणि धनुष्यबाण एकत्र असल्याने फरक पडतो म्हणुन.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ? देवेंद्र फडणवीस.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ? आधी ब्लू प्रींट मधे काय आहे ते सांगा.मग कळेलच प्रभाव पडतो की नाही. तारिख जवळच आहे म्हणा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले
17 Sep 2014 - 4:13 pm | दुश्यन्त
जर दोघेही हरले आणि कोन्ग्रेस व इतर यांचे सरकार आले तर भाजपा हे नुकसान सहन करू शकेल, कारण ते केंद्रात आणि इतर राज्यात सत्तेवर आहेत आणि येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची सत्ता न येणे हे मोदी-शहा यांना सुद्धा परवडणारे नाही. केंद्रात सत्ता आल्यावर महाराष्ट्र/ हरयाणा निवडणुका म्हणजे त्यांची मोठी टेस्ट आहे. महाराष्ट्र गमावले तर त्यांची पण मोठी नाचक्की होईल. उत्तरेत पोटनिवडणुकांत काय झालेय ते आपण पाहतोच आहे. तसेच मोदींना राज्यसभेत अजून बहुमत नाही, ते मिळवायचे असेल तर एक एक राज्ये एनडीए'कडे आणावी लागतील. महाराष्ट्र गमावणे सेना भाजप दोघांना परवडणारे नाही.
17 Sep 2014 - 7:42 pm | विवेकपटाईत
महाराष्ट्राच्या निवडणुका आधीचा गदारोळ पाहून समर्थ वचन आठवले:
'
ज्या युती किंवा आघाडीतल्या दलांना हे कळेल ते सत्तेवर येतील.
17 Sep 2014 - 7:43 pm | विवेकपटाईत
२. काही उग्रस्थिती सांडावी काही सौम्यता धरावी
17 Sep 2014 - 7:58 pm | शिद
युती होईल, वेगळं लढण्याची दोघांची ही तेव्हढी ताकद नाही व परीस्थिती देखील.
खोबरं तिथं चांगभलं. ज्यांचे आमदार जास्त तिकडे मोर्चा वळवतील.
बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही.
एकत्रच लढतील...जाऊन जाऊन जाणार कुठं? घड्याळ शेवटी हातातचं घालवं लागतं.
नो. नेवर.
वाटतं तर खरं पण आपल्या वाटण्याने काय होणार आहे. तसं झालं तर त्यांना त्याची औकात तरी कळेल की कोण किती पाण्यात आहेत ते?
उद्धोवजी ठाकरे नको पण दुसरा समर्थ असा पर्याय पण उपलब्ध नाही.
ह्या निवडणूकीत राजसाहेबांनी थंड घेऊन उमेदवार उभे नाही केलेत तर बरे होईल. उगाच युतीची मतं फुटतील व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होईल ते वगळं.
17 Sep 2014 - 8:02 pm | सुहास पाटील
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
>>> युती होणार हे नक्की . जर युती झाली नाहीच तर मात्र शिवसेनाचा भ्रमानिवास होईल
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
>>> जो जास्त पैसे देईल त्याचा बाजूने
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण
>>> अर्थात भाजप फक्त मोदिमुळे !
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
>>> एकत्रच लढणार. कोनात दम नाही वेगळे लढ्याचा
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
>>> नोटा.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
>>> होय . कोणत्याच पक्षाने दुसर्या पक्षाच्या पाप पुण्यात वाटणीदार कशाला व्हा ? निवडणुक स्वतंत्र पणे लढवा अन नंतर युत्या करा.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
>>> सांगू शकत नाही
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
>>> जर राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तर काही सांगता येत नाही , एरव्ही ह्यांना मागच्या वेळे इतक्या जागा मिळाल्या तरी नशीब !
17 Sep 2014 - 8:13 pm | दुश्यन्त
@शिद: बहूजन विकास आघाडी (हितेंद्र ठाकुरांची पार्टी) कारण खांग्रेसला मत देणं ह्या जन्मात तरी शक्य नाही.
बहुजन विकास पार्टी कॉंग्रेसलाच सपोर्ट करते. लोकसभेत पालघरमध्ये कॉंग्रेसने आपला उमेदवार मागे घेवून बविआच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता.
17 Sep 2014 - 8:22 pm | शिद
हो खरंय. पण ह्या वेळी चित्र कदाचित वेगळं असेल. लोकसभेच्यावेळी काँग्रेसने उमेदवार मागे घेतला खरा पण बविआ बरोबर प्रचारासाठी नाही उतरले.
पण त्यामागे बरंच अर्थकारण होतं. गंदा है पर धंदा है ये.
17 Sep 2014 - 8:59 pm | भाते
१. दोघांनाही युती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
२. ज्या मडक्यात पाणी जास्त असेल, तिकडेच कावळे जमणार ना!
३. माझे मत सेनेला असेल. भाजपा वाल्यांचा विदर्भ वेगळा काढायचा डाव आहे. सेनावाले त्यांच्याबरोबर (युती करणार) असतील तर ते नक्कीच ह्याला विरोध करतील. नाहीतर, एकटे भाजपावाले मुंबईसुध्दा वेगळी करायला पुढेमागे बघणार नाहीत.
४. भांडू दे त्यांना आपसात. गरज पडल्यास शेवटी एकत्र येतीलच ते!
५. कोणालाही नाही. १२/१२/१२ हि तारीख दिली होती महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्यासाठी यांनी. सध्या २०१४ मध्ये सुद्धा टाटा आणि अंबानी सोडले तर बाकी सर्व ठिकाणी सलग २४ तास वीज कायम आहे हे अशक्य आहे (रविवार आणि सणवार सोडुन).
६. अशक्य. कोणताही पक्ष अशी हिंमत करणार नाही.
७. महायुतीमध्ये नक्की होणारा चालेल.
८. २०१९ च्या निवडणुकीत मनसे हा पक्ष अस्तित्वात नसेल.
17 Sep 2014 - 9:08 pm | श्रीगुरुजी
>>> १. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होईलच अशी १०० टक्के खात्री नाही. परंतु युती तुटण्यापेक्षा युती होण्याचीच जास्त शक्यता आहे. शिवसेनेने कितीही डरकाळ्या मारल्या तरी महाराष्ट्रात भाजपच्या तुलनेत शिवसेनेला कमी जनाधार आहे हे उद्धव ठाकरे जाणून आहेत. त्यामुळे युती करणे ही भाजपपेक्षा शिवसेनेची जास्त गरज आहे. इतके दिवस केंद्रात सत्ता येण्यासाठी मदत हवी या कारणासाठी भाजपने शिवसेनेची मुजोरी सहन केली होती. परंतु आता केंद्रात शिवसेनेची गरज नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी फारकत घेण्याची भाजपची इच्छा होती. ती संधी आता आली आहे. शिवसेनेने जागा वाढवून दिल्या नाहीत तर भाजप उर्वरीत मित्रपक्षांशी स्वतंत्रपणे युती करून निवडणुक लढवेल. शिवसेना १५ वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने अस्वस्थ आहे. अजून ५ वर्षे सत्तेबाहेर राहण्याची सेनेची तयारी नाही. शिवसेनेसाठी महाराष्ट्र हे एकमेव राज्य सत्ता देऊ शकते. याउलट भाजप केंद्रात व इतर अनेक राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिले तरी भाजपला चालण्यासारखे आहे, पण ते शिवसेनेला परवडणारे नाही. शिवसेनेत राहून सत्ता मिळत नाही हे लक्षात आल्यावर राणे व इतर अनेक जण काँग्रेसमध्ये गेले. या निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तर तसेच होईल. त्या तुलनेत भाजपची स्थिती मजबूत आहे. आता शिवसेनेने आगाऊपणा करून युती तोडली तर सत्ता मिळणार नाहीच. पण २०१७ मध्ये मुम्बई, ठाणे, कल्याण्-डोंबिवली अशा अनेक महापालिकेतून शिवसेना सत्तेबाहेर जाईल. शिवसेनेचा प्राण मुम्बई महापालिकेच्या पोपटात आहे. तीच हातातून गेली तर शिवसेना कायमची संपेल हे ठाकरे नक्कीच ओळखून आहेत.
>>> २. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
सर्वजण भाजपच्याच वळचणीला येतील. कारण महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपचा जनाधार सुरवातीपासूनच जास्त आहे. १९८० मध्ये भाजप स्थापनेनंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर १२ जागा मिळविल्या होत्या. याउलट १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसशी युती करूनसुद्धा शिवसेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. तसेच १९८० विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. १९८५ मध्ये सुद्धा शिवसेनेला स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आणता आला होता.
>>> ३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
भाजपला. कारण भाजपकडे प्रगल्भ नेतृत्व व विचारधारा आहे. शिवसेनेकडे फक्त बेजबाबदार ताकद आहे. शिवसेनेकडे आर्थिक, आंतरराष्ट्रीय, सामाजिक असे कोणतेही धोरण नाही. शिवसेना हा तसा बेभरवशाचा व बर्यापैकी विश्वासघातकी पक्ष आहे. मराठी, मराठी घोषणा देऊन शिवसेनेने प्रत्यक्षात अनेक अमराठी व्यक्तींनाच पुढे आणले आहे. त्यामुळे भाजपलाच मत देणार.
>>> ४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
या दोन लुटारू टोळ्या एकत्रच लढणार.
>>>५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
कोणालाही नाही. मी या जन्मात किंवा कोणत्याही पुढील जन्मात या देशद्रोह्यांना कधीही मत देणार नाही.
>>> ६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
होय
>>> ७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
खरं तर अविनाश धर्माधिकारींनी पुढील मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे.
>>> ८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
शून्य. २००९ मध्ये युतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी काँ-राकाँ च्या आशिर्वादाने मनसेने अवतार धारण केला होता. त्या निवडणुकीत युतीचे ३८ उमेदवार पाडल्यानंतर (व त्याआधी लोकसभेत युतीचे १०-१२ उमेदवार पाडल्यानंतर) मनसेचे अवतारकार्य पूर्ण झाले. आता २०१४ च्या निवडणुकीनंतर मनसे निजधामाला जाईल.
17 Sep 2014 - 9:41 pm | पिवळा डांबिस
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होईल
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
जर वेगवेगळे लढले तर दोघेही सरकार स्थापू शकत नाहीत. अशावेळेस त्यांचे मित्रपक्ष हे त्यांचे मित्रपक्ष रहाणार नाहीत. ते दुसर्यांबरोबर सत्तेच्या वळचणीला जातील.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
दोघांनाही नाही, कारण मुळातच या युतीला मत दिलं नसतं! :)
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्र. पण जरी वेगवेगळे लढले तरी निवडणुकीनंतर सत्ता मिळायची शक्यता निर्माण झाल्यास परत एकत्र येण्याइतका लवचिकपणा (किंवा सत्तालोलुपता म्हणा) या दोघांकडेही आहे.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
दोघांनाही नाही. एकत्र नाही, स्वतंत्रपणेही नाही... :)
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
लई ब्येस! बघूयात तरी कोण किती पाण्यात आहे ते!! :)
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
अंदाज करता येत नाही त्यामुळे पास...
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
सत्ता मिळणं अशक्यच, पण तिच्या मताला महत्व मिळण्याइतपत आमदार निवडून येतील असं मला वाटतंय!
(हा फक्त माझा अंदाज आहे, याचं समर्थन करण्यास कंपनी जबाबदार नाही!!!)
:)
18 Sep 2014 - 2:24 am | अर्धवटराव
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
--> युती होईल.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
--> जास्त करुन भाजपाच्या बाजुने.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
--> भाजपला. महाराष्ट्रात केंद्रविरोधी सत्ता येणे राज्याच्या हिताचं नाहि. गुज्जु भाया आधिच तंगड्या अडवतय.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
--> बहुतेक वेगवेगळे. शरद पवारांनी युतीच्या पारड्यात सत्ता टाकण्याची सुपारी घेतली आहे असा दाट संशय आहे मला.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
--> राष्ट्रवादीला.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
--> नाहि. युती, काँग्रेस आणि रा.वा. अशी लढत व्हावी असं वाटतं. सध्या केंद्रातल्या विरोधीपक्ष राजकारणाचा अवकाश व्यापायला राज्यात जास्तीत जास्त नॉन काँग्रेस पक्षांना बळ मिळावं असं वाटतं.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
--> थोरले पवार काका दिल्ली सोडुन महाराष्ट्रात परत यावे असं वाटतं. पृथ्वीराजबाबांची एक गांधी घराण्याची निष्ठा सोडली तर तेही काहि वाईट नाहित. नितीन गडकरी म्हणालो असतो पण ते सी.एम. मटेरीअल नाहित. त्यांनी तडफेने आपल्या खात्यांचा कारभार निपटावा हेच उत्तम.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
--> फार कमि. १० जागा म्हणजे डोक्यावरुन पाणि.
18 Sep 2014 - 2:39 am | श्रीरंग_जोशी
१९९५ च्या विधानसभा निवडणुकीच्या महिना दीड महिना अगोदर वृत्तपत्रात इंकाँने दिलेली जाहिरात आठवते. त्यात स्व. बाळासाहेब व स्व. प्रमोद महाजन यांचे फोटो होते.
बाळासाहेबांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "भाजपा अधाशी आहे."
महाजनांच्या फोटोखाली त्यांचे विधान लिहिले होते. "बाळासाहेबांचे गणित कच्चे असावे, नाही तर त्यांनी असे म्हंटले नसते."
सर्वात खाली महाराष्ट्रासाठी एकच सक्षम पर्याय, इंकाँ असे काहीसे लिहिले होते :-).
18 Sep 2014 - 1:58 pm | समीरसूर
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युती होणारच. दोघांनाही सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते कुठलीच रिस्क घेणार नाहीत. त्यांना ते परवडणार नाही.
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
हा प्रश्नच येणार नाही कारण युती होणारच आहे.
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
असे जर घडले तर माझे मत भाजपलाच असेल. थोडीफार सभ्यता शिल्लक असलेला एकमेव पक्ष आहे तो. शिवाय गुंडगिरी वगैरे जास्त नाही या पक्षात.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
एकत्रच लढतील. वेगवेगळे लढून त्यांना आधीच झालेला शक्तिपात अजून वाढवण्याची इच्छा नसणार असे वाटते. राष्ट्रवादीची काही चाल असली तर बहुधा वेगळे लढून मग जो कोणी सत्तेत येईल त्याला टेकू देऊन सत्तेचा मलिदा हादडायचा अशी असू शकेल. पवारसाहेब सत्तेसाठी अल कायदा किंवा बोको हरामशी देखील हातमिळवणी करू शकतात यात अजिबात शंका नाही. पण तसे केल्यास त्यांची आणि राष्ट्रवादीची आधीच रसातळाला गेलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल आणि कदाचित पुढच्या खेपेला राष्ट्रवादीचे अस्तित्व संपलेले असेल. शिवाय भाजप आणि शिवसेना असला डोईजड पक्ष भागीदार म्हणून घेणार नाही आणि घेतला तर त्यांची विश्वासार्हता संपेल. या सगळ्या जांगडगुत्त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रच निवडणूक लढवतील यात शंका नाही. त्यांना दुसरा पर्यायच नाही. राष्ट्रवादीला तर अजिबातच नाही. बेगर्स आर नॉट चुझर्स...
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि नाही ?
हे स्वतंत्र लढले तरी माझे मत शक्यतो भाजपलाच जाणार. या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली काय किंवा स्वतंत्र लढवली काय, भाजप+शिवसेना मैदानात असल्यावर माझे मत भाजपलाच जाणार. कारण वर नमूद केलेच आहे. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार असतील तर मग त्यातल्या त्यात बर्या (म्हणजे कमी भ्रष्ट, कमी गुंड, कमी माजोर्डा) उमेदवाराला मत देणार. कुठल्याही परिस्थितीत (म्हणजे अपरिहार्य परिस्थिती, जसे की आजारपण, अचानक बाहेर जावे लागणे, इत्यादी सोडून) मतदान करणार.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
नाही. सत्तास्थापनेसाठी जी मारामारी आणि घोडेबाजार होतील ते भयानक असतील.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
खरं म्हणजे कुणीच दमदार नेता नाहीये. तरी पण नितीन गडकरी व्हावेत असं वाटतं.
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
फारसा नाही. मनसेला १० च्या आतच जागा मिळतील असे वाटते. खरं म्हणजे या पक्षाचं नाव 'ब्लूप्रिंट निर्माण सेना' असंच ठेवलं पाहिजे. राज ठाकरे कमालीचा वाचाळ माणूस आहे. जे बोलतो त्यातलं अर्धा टक्का देखील कृतीत आणत नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा हा पक्ष थंड असतो. काही ठोस कार्यक्रम हाती घेत नाही. 'टोल'धाडीमध्ये मनसेला बराच आर्थिक फायदा झाला असावा. नाहीतर रस्ते, वीज, पाणी, शेतकर्यांचे प्रश्न, वाहतूक, इत्यादी गंभीर विषय असतांना टोलसारखा कमी महत्वाचा प्रश्न त्यांनी इतक्या 'धडाडीने' हाताळला नसता आणि स्वभावाप्रमाणे सोडून दिला नसता.
18 Sep 2014 - 5:49 pm | अविनाशकुलकर्णी
राष्ट्रवादीला मत नाहि..सारे सामाजिक वातावरण नासवले या पक्षाने..
18 Sep 2014 - 9:04 pm | पुतळाचैतन्याचा
१. शिवसेना भाजप युती होईल काय ? कि ते वेगवेगळे लढतील ?
युति होनरच
२. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर त्यांचे इतर मित्रपक्ष कोणाच्या बाजूने उभे राहतील ?
वरिल उत्तरामुळे प्रश्न गैर लागु. तरि पन भा ज प
३. जर सेना भाजप वेगवेगळे लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? तुमच्या उत्तराच्या समर्थनार्थ कारण द्या.
जैतापुर वर राज्यचे भवितव्य अवलम्बुन आहे म्हनुन भा ज प ला मत.
४. राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र लढतील की वेगवेगळे ?
वेगळे लढतिल.
५. जर राष्ट्रवादी व काँग्रेस स्वतंत्र लढले तर तुम्ही कोणाला मत द्याल ? द्याल कि ंइमि?
मि कराड दक्शिन च मतदार आहे म्हनुन प्रुथ्विराजान मत.
६. वरीलपैकी चारही पक्षांनी स्वतंत्रपणे लढावे असे तुम्हाला वाटते काय ?
नाहि.
७. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते ?
प्रुथ्विरज चव्हान
८. मनसे या निवडणूकीत कितपत प्रभाव पाडू शकेल ?
नाहि.
19 Sep 2014 - 11:45 am | माईसाहेब कुरसूंदीकर
राज्यापुढील आव्हाने पाहिली तर पृथ्वीराज चव्हाणच राज्याला तारून नेऊ शकतील असे वाटते.शिकलेला,व्यवस्थित तार्किक बोलणारा,जातिय्,धार्मिक उन्मादाविरोधात असणारा असा राजकारणी राज्यास लाभावा हे आमचे सुदैव.
19 Sep 2014 - 12:01 pm | काळा पहाड
१. बर्याच अंशी सहमत. विशेष करून बिल्डरांना बुच लावायचा प्रकार भयंकर आवडला.
२. तरी सुद्धा भाजप चे सध्याचे सगळे मंत्री शेटजी भटजी आहेत आणि बहुजनांना तिथे थारा नाही असं यांच्याच सहकारी पक्षानं म्हटलंय. हा जातियवाद नव्हे? याचा निषेध बाबांनी केल्याचं काही ऐकले नाही.
19 Sep 2014 - 12:10 pm | योगी९००
शिवसेना-भाजप यांची २५ वर्षांची युती दोन्ही पक्षांच्या हट्टामुळे संपुष्टात आली अशी झी वर बातमी आहे.
मा. स्व. बाळासाहेब आणि स्व. मुंडे-महाजन यांच्यापैकी एक जरी कोणी असायला हवा होता असे वाटले.
19 Sep 2014 - 2:49 pm | शिद
इ-सकाळ वर आलेलं ह्याच संदर्भातील सर्वेक्षण
19 Sep 2014 - 2:52 pm | सौंदाळा
अभिजीत पवार उभा राहणार आहे का विलेक्षनला?
लई हवा करत असतो सध्या