राजच्‍या अटकेमागील 'राज'कारण

विकी शिरपूरकर's picture
विकी शिरपूरकर in काथ्याकूट
24 Oct 2008 - 8:49 pm
गाभा: 

मनसे नेते राज ठाकरे यांच्‍या अटकेच्‍या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्‍या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्‍या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्‍या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या चर्चेचे गु-हाळ फिरणार आहे, ते राज यांच्‍या अटकेमुळे नेमका फायदा कुणाचा या मुद्याभोवती.

ठाकरी शैलीतून आणि शिवसेनेच्‍या आक्रमक मुशीतून तयार झालेल्‍या राज यांच्‍यासाठी अशा प्रकारची अटक तशी फारशी नवी नाहीच. यापूर्वीही त्‍यांनी अनेक आंदोलने केले आहेत. आणि त्‍यांनाच काय खुद्द बाळासाहेबांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे. तर महाराष्‍ट्रालाही त्‍यांच्‍या अटकेनंतर होणारी निदर्शने नवीन नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना अटक झाल्‍यानंतर हे सर्व होणार हे राज्य सरकारलाही ठाऊक होतेच.

शिवसेनेतून बाहेर पडल्‍यानंतर आणि महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केल्‍यानंतर अगदी पहिल्‍याच सभेतून राज यांनी 'मराठी बाणा' हेच आपल्‍या पक्षाचे प्रमुख ध्‍येयधोरण राहील हे जाहीर केले होते. त्‍यामुळेच त्‍यांनी 'मी महाराष्‍ट्राचा... महाराष्‍ट्र माझा' ही घोषणाही दिली. आणि त्‍यानुसार मुंबईत असलेली उत्तर भारतीय आणि बिहारींची मक्‍तेदारी मोडीत काढण्‍यासाठीचे आंदोलन चालविले. त्‍यामुळे त्‍यांना उत्तर भारतीय नेत्‍यांची नाराजीही ओढवून घ्‍यावी लागली. म्‍हणूनच वारंवार त्‍यांच्‍या अटकेची मागणी केली गेली.

गेल्‍या 19 ऑक्‍टोबर रोजी रेल्‍वे भरती परीक्षेच्‍या वेळी मनसैनिकांनी उत्तर भारतीयांना दिलेला चोप ही काही नवीन घटना नव्‍हती. यापूर्वी गेल्‍या दोन-अडीच वर्षात तशा अनेक घटना घडल्‍या आहेत. मग इतक्या दिवसांनंतर आताच राज यांना अटक का केली गेली? हा देखिल सध्‍या चर्चेचा प्रमुख मुद्दा आहे.

राज्याच्‍या राजकारणात राज ठाकरे हे नाव गेल्‍या काही दिवसांपासून वेगाने पुढे येत आहे. त्‍यामुळे आगामी निवडणुकांमध्‍ये 'मराठी बाणा' हा निवडणुकीचा मोठा मुद्दा ठरण्‍याची शक्‍यता आहे. हे कॉंग्रेस आघाडी सरकारला निश्चितच परवडणारे नाही. या शिवाय केंद्रातही कॉंग्रेसप्रणित संपुआ आघाडीचेच सरकार आहे. या सरकारमध्‍ये समाविष्‍ट असलेले बरेचशे घटक पक्ष हे उत्तर भारतातील आहेत. त्‍यात लालूंचा राजद आणि अमरसिंग व मुलायम सिंह यांचा समाजवादी पक्षही आहे. या पक्षांच्‍या पाठिंब्यावरच संपुआने आपले सरकार टीकवून ठेवले आहे. त्‍यामुळे राज यांच्‍या अटकेसाठी या पक्षांचा केंद्रावर दबाव वाढू लागल्‍याने त्‍यांची अटक झाली आहे.

या सर्व गोष्‍टींच्‍या मागे आगामी निवडणुकाही आहेत. हे विसरून चालणार नाही. राज यांना अटक करण्‍यामागे विलासराव देशमुख सरकारने 40 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक सरकारने केलेल्‍या राजकीय खेळीची पुनरावृत्ती केली आहे. उत्तर भारतीय राज्‍यांमध्‍ये राज ठाकरे हा एक गुंड असल्‍याची प्रतिमा हिंदी चॅनल्‍सनी आधीच करून ठेवली आहे. त्‍यामुळे राजला अटक करण्‍याची करामत महाराष्‍ट्रातील कॉंग्रेसच्‍या सरकारने करून दाखविली हे दाखवून उत्तर भारतातील राज्‍यांमध्‍ये कॉंग्रेसची प्रतिमा उजळ करण्‍याचाच प्रयत्‍न केला आहे. राज्‍यातील अमराठी भाषिकांमध्‍येही राज्‍य सरकारच्‍या कार्यकुशलतेचा यामुळे ठसा उमटण्‍यास मदत होणार आहे. आगामी निवडणुकांमध्‍ये या राज्‍यांमध्‍ये राजच्‍या अटकेचे श्रेय घेण्‍यासाठी अनेक जण पुढे येतील हे आताच स्‍पष्‍ट दिसू लागले आहे.

या एकाच घटनेमागे कशीकशी राजकीय खेळी केली गेली हे आता आणखी स्‍पष्‍टच सांगायचे झाले, तर राज हे शिवसेनेतून बाहेर आले आहेत. त्‍यामुळे शिवसेनेच्‍या विचारधारेला समांतरच त्‍यांच्‍या पक्षाची विचारधारा असेल हे स्‍पष्‍टच आहे. राज्‍यात शिवसेनेचा दबदबा ही कॉंग्रेससाठी कायमच डोकेदुखी ठरली आहे. राजच्‍या निमित्ताने त्‍यावरचं औषधच सरकारच्‍या हाती आलं आहे. म्‍हणूनच राज ठाकरेंचे जहाल भाषण, प्रक्षोभक वक्‍तव्‍य आणि भय्यांना दिलेला चोपही गेल्‍या अनेक दिवसांपासून आघाडी सरकार त्‍यांच्‍यावर कारवाई न करता एकप्रकारे खपवूनच घेत होते. यानिमित्ताने राजना 'मोठे करा' हीच भूमिका या पक्षाने घेतली होती. राज मोठे झाले तर शिवसेनेच्‍याच मतांवर त्‍याचा परिणाम होईल आणि 'डिव्‍हाईड अ‍ॅण्‍ड रूल' ही खेळी करणे सोपे होईल हा त्‍यामागे उद्देश होता.

राज यांना अटक केल्‍याने आणि काहीवेळ तुरुंगात ठेवल्‍याने ते मराठी जनतेचे 'हिरो' ठरतील हे देखिल कॉंग्रेस जाणून होती. मात्र राज हिरो ठरावेत हाच त्‍यांचा उद्देश होता. कारण त्‍यामुळे दोन्‍ही सेनेतील मते विभागले जाऊन फायदा कॉंग्रेसचाच होईल, असा डाव राजकारणाच्‍या सारिपाटावर खेळला गेला आहे.

चाळीस वर्षापूर्वीच्‍या इतिहासाची पुनरावृत्ती

आधीच सांगितल्याप्रमाणे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी तत्‍कालीन वसंतराव नाईक सरकारने जी खेळी केली होती. तिच विलासराव सरकारने खेळली आहे. त्‍यावेळी मुंबईत मिल कामगारांच्‍या चळवळी अतिशय मोठ्या प्रमाणावर चालत असायच्‍या आणि या चळवळींचे नेतृत्‍व डाव्‍यांच्‍या हाती असे. त्‍यामुळे साहजिकच राज्‍याच्‍या राजकारणातही डाव्‍यांचे प्रचंड वर्चस्‍व होते. तत्‍कालीन विधानसभेत 70 ते 72 जागांवर डाव्‍यांचे वर्चस्‍व राहत असे.

कॉंग्रेसचा सर्वाधिक मोठा प्रतिस्‍पर्धी असलेल्‍या या डाव्‍यांच्‍या वर्चस्‍वाला पहिल्यांदा शह दिला तो शिवसेनेने. सेनेने कामगारांचे नेतृत्‍व केल्‍याने बाळासाहेबांच्‍या माध्‍यमातून डाव्‍यांना संपविण्‍याचा खेळ वसंतरावांनी खेळला. आता देशमुख त्‍याच पावलावर पाऊल ठेवून शिवसेनेची ताकत कमी करू पाहत आहेत.

राजला नकारात्‍मक प्रसिध्‍दीचाही फायदा

हिंदी माध्‍यमांनी आणि चॅनल्‍सने सुरूवातीपासूनच राज ठाकरे हा एक गुंड असल्‍याचेच दाखविले. राजला अटक केल्‍यानंतरही 'राजपर पुलीसकी नकेल', 'राजपर कसा शिकंजा', 'राज के गुंडोंका महाराष्‍ट्र मे हंगामा' अशाच आशयाच्‍या बातम्‍या येत राहिल्‍या. या बातम्‍यांमुळे अनेक वर्षांपासून राजला ओळखणारा मराठी माणूस साहजिकच दुखावला गेला. तर दुस-या बाजूला उत्तर भारतीय नेते पक्षभेद विसरून एकत्र आल्‍यानंतरही महाराष्‍ट्रातील पक्षांनी राजला गुन्‍हेगार ठरविल्‍याने राजबद्दलची सहानुभूती वाढली आहे.

राजच्‍या अटकेनंतर त्‍याचे राज्‍यभर उमटलेले पडसाद पाहता या प्रकरणातून अनेक अर्थी फायदा करू पाहणा-या कॉंग्रेसच्‍या हाती काय येईल हे येणारा काळच सांगणार आहे.

प्रतिक्रिया

विकास's picture

24 Oct 2008 - 9:08 pm | विकास

या आशयाच्या बातम्या आणि विश्लेषण माझ्याही वाचनात आले आहे. शिवसेना ही सुरवातीस वसंतसेना (वसंतराव नाई़कांच्या अप्रत्यक्ष पाठींब्यावर चाललेली म्हणून)आहे असे म्हणले जायचे ते बर्‍याचदा आधीपण वाचले आहे.

जरी या बातमीत आणि "वसंतसेना" गृहीतकात तथ्य असले तरी त्यात असा एक सूर येतो की जणू काही पुर्वी बाळासाहेब आणि आता राज हे त्यांचे राजकीय अस्तित्व एखाद्या बांडगुळासारखे राहून मोठे करू शकले.

त्यांचे राजकारण आवडो अथवा न आवडो (आणि तेच इतरांच्या बाबतीतही लागू होऊ शकेल), जेंव्हा ते स्वतःला टिकवतात ("सस्टेन" करतात) तेंव्हा त्यांच्या स्वकर्तुत्वावर ते झालेले असते, कुणाच्या निष्क्रीय राजकारणामुळे नाही असे वाटते. वरील विश्लेषणात अजून एक गृहीत आहे की राज सर्वत्र निवडणूकीसाठी उमेदवार उभे करून सेना-भाजपाची मते फोडणार आहे किंवा किमान तसा प्रयत्न करणार आहे. आणि बाळासाहेब अथवा भाजपाचे जे कोणी सुज्ञ राजकारणी नेते असतील ते, हे निवांत ऐकत बसतील आणि राज पण स्वत:ची वाजवीपेक्षा किंमत वाढली असे समजून निवडणूकांचे राजकारण स्वतःच्या सध्याच्या कुवतीच्या बाहेर खेळेल...

मला जरी राज ठाकर्‍यांची प्रत्येक "कृती" आवडली नसली (त्याच्या मागचे कारण मान्य असून) तरी त्याचे "राजकीय गुरू" बाळ ठाकरे आहेत हे जाणून घेतले, तर इतकेच म्हणावेसे वाटते की हा "बाळ"कडू मिळालेला राज काही कच्च्या गुरूचा चेला नाही...

कशिद's picture

24 Oct 2008 - 9:48 pm | कशिद

राजला नकारात्‍मक प्रसिध्‍दीचाही फायदा

हे मात्र खर आहे

कलंत्री's picture

24 Oct 2008 - 10:00 pm | कलंत्री

आपले विश्लेषण सत्याच्या जवळ जाणारे वाटले. माझ्यामते या खेळात देश, प्रामाणिकपणा आणि उदारमतवाद हरणार आहेत.

नशिब राज मुख्यमंत्री होणार असे मत बाहेर आले नाही. नाही तर किणी प्रकरण, जॅक्सन प्रकरण यांचीच पुनरावृती होत राहील असे माझ्या एका मित्राचे मत आहे.

सखाराम_गटणे™'s picture

24 Oct 2008 - 10:47 pm | सखाराम_गटणे™

तुमची मी बर्‍याच प्रतिक्रीया मी वाचल्या.

मला काही प्रश्न पडत आहेत.
१. सध्या जी सरकारे देशात आहेत, त्यामुळे खरोखरच देश जिकंत आहे का?

२. तुम्हाला देश जिकंणे म्हणजे काय अभिप्रेत आहे?

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

कलंत्री's picture

25 Oct 2008 - 8:10 am | कलंत्री

आपण प्रांतवाद वगैरे जो काही करत असतो त्याला लगाम लागला पाहिजे. त्यात राज ठाकरे यांचे बिहारी परीक्षार्थी मुलांना मारहाण करणे आले, लालू फक्त बिहारी लोकांचीच भरती करत असतील तर ते आले, शरद पवार भारतीय कृषीमंत्री असूनही फक्त पुण्यातच राहत असतील आणि राज्याच्या राजकारणाचाच आचार / विचार करत असतील तर तेही आले, बिहारी रेल्वेमंत्री फक्त बिहारच्या रेल्वेचाच विचार / विकास करत असतील तर तेही आले.

थोडक्यात भारताचाच विचार करुन धोरण, प्रयत्न करणारे लोक आले पाहिजे असा विचार झाला पाहिजे.

आजचा सर्वच प्रयत्न पाहिला तर सिंहासन चित्रपटाची आठवण येते.

सखाराम_गटणे™'s picture

25 Oct 2008 - 8:32 am | सखाराम_गटणे™

>>>आपण प्रांतवाद वगैरे जो काही करत असतो त्याला लगाम लागला पाहिजे.
एकदम मान्य

पण प्रांतवाद करतात त्याचे काय? त्याचे काय करायचे?

----

तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

मयुरेशवैद्य's picture

24 Oct 2008 - 11:06 pm | मयुरेशवैद्य

देश वगैरे काही हरत नाही, आपण पाकिस्तानाशी युध्द करत नाहीओत.
माझ्यामते या खेळात देश, प्रामाणिकपणा आणि उदारमतवाद हरणार आहेत << राजकारणात हे अस काही उरलं आहे का ?
किणी प्रकरण समजू शकतो .. पण "जॅक्सन प्रकरण" काय आहे ? पैसे सगळेच कमवतात !

असो , आज जर राज मुख्यमंत्री नाही झाला .. तर एकतर पुन्हा हिच काँग्रेस-राष्ट्रवादी. किंवा युती. गेल्या काही वर्षात कॉंग्रेसचा अनुभव आपण घेतला आहे. युतीची ५ वर्षाची "ठोकशाही"/ खंडणीशाही पाहून झाली आहे. अण्णा हजारे काही निवडणूक लढवात नाहीत .. अश्यावेळी पर्याय आहे का कोणी राज व्यातिरिक्त ? असल्यास सांगा.

कलंत्री's picture

25 Oct 2008 - 8:25 am | कलंत्री

प्रिय मयुरेश,

सध्या दोन / तीन दिवसापासून तुमच्याच विचाराच्या रोखावर / दिशेवर विचार करत आहे. तुम्ही तरुण असाल ( २५च्या आसपास) आणि या वयात असे आदर्श नकळतच मनाची पकड घेतात. मी सुद्धा रामजन्मभुमीचा समर्थक होतो. नंतर राजकारण्यानी कसा आपला उपयोग करुन घेतला हे लक्षात आले. लालजी / प्रमोदजी यांना लाख धन्यवाद.

आपल्या राजकारण्याची एक शासक परंपरा आहे. उदा.यशंवतराव, मोरारजी, कन्नमवार, वसंतदादा इत्यादी. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनही यशवंतरावाचे मुंबईत घर नाही हा त्यांच्या आदर्शाचा पूरावा आहे.

आज मनोहर जोशी, छगनराव, राणे, पवार, देशमुख यांची संपत्ती, व्यवसायाचे जाळे नक्कीच १००० कोटीच्या आसपास असेल असे ऐकतो.

त्यात राज यांनीही पैसे मिळविले तर खरेच काही बिघडत नाही. लालूनी सुद्धा चारा घोटाळा इतक्याच रक्कमेचा असावा असे वाचल्याचे स्मरते.

मला वाईट याचेच वाटते की तुमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते हे मान्य करतात. आशा आहे आपलेही माझ्यासारखेच वयाचा ४२/४३ ला मतपरिवर्तन न होवो. कॉग्रेस, शिवसेना, भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा वापर करुन असे स्वार्थीलोक पुढेच जात असतात.

संभाजीने आपल्या तारुण्यात काही चुका केल्या पण आपला शेवट मात्र दैदिप्त्यमान असा केला तसेच राजचे होवो.

शेवटी आपला हा देश हजोरो वर्षाच्या परंपरेने, भातृभावाने आपल्यापर्यंत आला आहे. त्यात आजच्या विषवल्लीने याचा घात होऊ नये अशीच माझी कळकळ आहे. बाकी खुदा गवाह है....

आवशीचो घोव्'s picture

25 Oct 2008 - 9:14 pm | आवशीचो घोव्

फारच छान प्रतिक्रीया

इनोबा म्हणे's picture

24 Oct 2008 - 10:42 pm | इनोबा म्हणे

नशिब राज मुख्यमंत्री होणार असे मत बाहेर आले नाही.
का होऊ नये? मला तरी राज मुख्यमंत्री व्हावा असे मनोमन वाटते. अर्थात त्याकरिता अजून बराच वेळ आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मयुरेशवैद्य's picture

24 Oct 2008 - 11:29 pm | मयुरेशवैद्य

शिवसेनेने १००% मराठी माणासाचं (योग्य ) राज कारण केलं असतं तर आज ना उद्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात आलीही असती कदाचित. पण हिंन्दूत्वाच्या नावाखाली त्यांनी पक्ष देशपातळीवर नेण्याचा अतिशय टुकार प्रयत्न केला. देशभर तर पसरले नाहीतच महाराष्ट्रातही तोंडावर आपटलेत. शिवसेनेने मराठी माणसाला "गृहीत" धरलं.

गेली अनेक वर्ष मनपा मध्ये सत्तेत असुनही, त्यांना भैय्यांचा अन्धिकॄत झोपड्या पाडताही आल्या नाहीत आणी नवीन होणार्‍या रोखताही आल्या नाहीत. ही मंडळी इथे जितकी वाढतील तितकीच आपली व्होटबँक कमी होत जाईल हे ही त्यांच्या लक्षात आलं नाही ?

आज मुंबईत मराठी माणसाचं प्रमाण अमराठींच्या तुलनेने कमीच आहे. अश्यावेळी ज्या आक्रमक पद्धतीने राज ने मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे, त्याबद्दल त्याला दाद द्यावीच लागेल. त्यातच "आम्ही महाराष्ट्राबाहेर जाणार नाही" हे ही स्पष्ट केले आहे. आणी ही गोष्ट महाराष्ट्रासाठी चांगलीच आहे. कारण उद्या महाराष्ट्राच्या कोणत्याही मुद्दयावर मनसेला, आपली कर्नाटकची मत , आपली ऊ.प मधली मतं, आपली बिहारची मत इ.इ ची काळजी नसेल. ह्या असल्या इतर राज्यांच्या मतांच्या चिंतेमुळेच इतर पक्ष महाराष्ट्राची बाजू मांडण्यात कमी पडतात-किंवा मांडतच नाहित. मनसेच्या बाबतीत असले काही "political compulsions" नसतील आणी ह्याचा फायदा पुढे महाराष्ट्राला नक्कीच होईल असे वाटते.
अर्थात, जर का ह्यावेळीस मराठी मतं मनसे -शिवसेने मध्ये फुटलीत, तर मात्र कठीणंच आहे.

मयुरेश वैद्य

झंडू बाम's picture

25 Oct 2008 - 4:11 pm | झंडू बाम

शिवसेनेने १००% मराठी माणासाचं (योग्य ) राज कारण केलं असतं तर आज ना उद्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रात आलीही असती कदाचित. पण हिंन्दूत्वाच्या नावाखाली त्यांनी पक्ष देशपातळीवर नेण्याचा अतिशय टुकार प्रयत्न केला. देशभर तर पसरले नाहीतच महाराष्ट्रातही तोंडावर आपटलेत. शिवसेनेने मराठी माणसाला "गृहीत" धरलं.

यात थोडी दुरुस्ती करतो. शिवसेनेने नव्हे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला गृहित धरले. मी म्हणेल तेच खरे, ही त्यांची शैली. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभणारीच आहे. पण पुढे पुढे शिवसेना श्रीमंतांच्या दावणीला बांधली गेली. मराठी माणसाचे हित बाजूला पडले. शिवसेनेचा कार्यकारी प्रमुख निवडतानाही पक्षाच्या पुढील वाटचालीचा विचार केला गेला नाही. खरे तर राज हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार शोभतात. पण उद्धव यांचा हट्टीपणा आणि अनेक संधीसाधूंचे राजकारण यामुळे राज यांच्याऐवजी उद्धव या अतिशय थंड व्यक्तीकडे ते पद सोपविण्यात आले. या घटनेपासून शिवसेना लोकांच्या मनातून उतरत गेली.

भास्कर केन्डे's picture

25 Oct 2008 - 12:05 am | भास्कर केन्डे

कारण त्‍यामुळे दोन्‍ही सेनेतील मते विभागले जाऊन फायदा कॉंग्रेसचाच होईल, असा डाव राजकारणाच्‍या सारिपाटावर खेळला गेला आहे.
-- हे मत बर्‍याच वृत्तपत्रात सुद्धा आले आहे. जर दोन्ही सेना हुशार असतील तर त्यांनी आता विवाह गाठ बांधून एकत्र येण्यात त्यांचे शहानपण आहे ... युती अथवा एकाच झेंड्याखाली. जर असे झाले तर काँगेसकडून दुखावला गेलेला मराठी माणूस सेनांच्या बाजूने जाऊ शकतो व काँग्रेसच्या बाबतीत त्यांचेच दात त्यांच्या घशात असे होऊ शकते. बघू यात कोण काय करतात ते.

बाकी कलंत्री साहेब म्हणतात ते काही पटले नाही. कारण आपल्या देशात प्रामाणिकपणा आणि उदारमतवाद राजकारणात जिंकल्याची (असतील तर) खूपच तुरळक उदाहरणे आहेत. राज्यकर्त्यांनी अशा डावांची हीन पातळी केव्हाच गाठलेली आहे. जर देशाचे भले करायचे असेल तर दिल्लीवाल्यांना अगोदर हाकलले पाहिजे.

आपला,
(तटस्थ) भास्कर

ऋषिकेश's picture

25 Oct 2008 - 6:34 pm | ऋषिकेश

युती अथवा एकाच झेंड्याखाली. जर असे झाले तर काँगेसकडून दुखावला गेलेला मराठी माणूस सेनांच्या बाजूने जाऊ शकतो व काँग्रेसच्या बाबतीत त्यांचेच दात त्यांच्या घशात असे होऊ शकते

म्हणजे काय होईल? तर युती सत्ता मिळवेल!!!... एकदा युतीने सत्ता मिळवली की प्रश्न सुटतील असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते का?

काँग्रेस काय, भाजप काय, राष्ट्रवादी काय , शिवसेना काय आणि मनसे काय... सगळे निवडणूक जिंकेपर्यंतचाच विचार करणारे पक्ष. तसेच त्या पक्षांचे नेतेहि. निवडणुकांपलिकडे जाऊन त्यांचे धेय्ये-धोरणे काय असतील, कार्यक्रम काय असतील याचा मागमुस नाहि.

जो निवडणुकींपुर्वी जाहिरनामा निघतो त्यातहि धेय्यापेक्षा खर्‍या-खोट्या कर्तुत्त्वाचाच मारा असतो.

राजचे विचार कितीही पटले/पटले नाहित तरीही तो मुख्यमंत्री होऊन काहिहि बदल करु शकेलसे वाटत नाहि. राजसारख्या 'नेत्या'पेक्षा महाराष्ट्राला नरेंद्र मोदिंसारख्या 'कार्यकर्त्या'ची (नरेंद्र मोदींच्या विचारांचे अनुकरण करणारा नव्हे तर शासकीय कार्य करणारा अश्या अर्थाने म्हणतोय) गरज आहे असे वाटते. बडबड कमी आणि कृती जास्त

-(कार्यप्रधान) ऋषिकेश

इनोबा म्हणे's picture

25 Oct 2008 - 6:45 pm | इनोबा म्हणे

कृती करण्याकरिता आधी संधी मिळायला हवी ऋषीकेशराव!
स्वत राज ठाकरे ही नरेंद्र मोदींच्या विकास कामांची स्तुती करतात आणि असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला हवा असे उद्गार ही त्यांनी पुण्यातल्या एका सभेत काढले होते. आजपर्यंतच्या राजकर्त्यांनी काय दिवे लावले ते माहीत आहे ना सर्वांना, मग राज ठाकरेंना एकदा संधी द्यायला काय हरकत आहे. संधी न देताच त्यांच्यावर टिका करणे माझ्या मते योग्य नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

ऋषिकेश's picture

25 Oct 2008 - 7:03 pm | ऋषिकेश

केवळ संधी द्यायला काहिच हरकत नाहि .. आजपर्यंत आपण अनेकांना संधी दिली त्यात हा एक.. याविषयी आपल्याशी सहमत...
मात्र.. केवळ संधी द्यावी या उद्देशाने असेल तर ठिक.. मात्र त्यामागे जर फार अपेक्षा असतील आणि अपेक्षाभंग झाला तर समाजात न्यूनगंड तयार होतो (आठवा गिरणी संप.. नेत्यांकडून अपेक्षा ठेवल्या आणि शेवट केवळ निराशा पदरात पडली.. त्याचे दूरगामी परीणाम वगैरे)बर्‍याच वर्षांनी राजने अशी "आशा" जाग्रुत केली आहे..

राजला एक संधी द्यावी यात चुक काहिच नाहि.. मात्र त्याने ठोस कार्यक्रम दिला तर मनापासून मत द्यावेसे वाटेल. तुर्तास कोणाचाहि काहिच कार्यक्रम नसल्याने कोणालाहि मत द्यावेसे वाटत नाहि

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

आवशीचो घोव्'s picture

25 Oct 2008 - 9:19 pm | आवशीचो घोव्

राजसारख्या 'नेत्या'पेक्षा महाराष्ट्राला नरेंद्र मोदिंसारख्या 'कार्यकर्त्या'ची (नरेंद्र मोदींच्या विचारांचे अनुकरण करणारा नव्हे तर शासकीय कार्य करणारा अश्या अर्थाने म्हणतोय) गरज आहे असे वाटते. बडबड कमी आणि कृती जास्त.

कार्य करण्यासाठी सत्ता हवी. मनसे हे फक्त अडिच वर्षांचे बाळ आहे.

स्वामि's picture

25 Oct 2008 - 1:35 am | स्वामि

राज सेना सोडणार हे राणेला आधि पासुन माहित होते.म्हणुन त्याने घाइघाइत सेना सोडलि.मराठिचा मुद्दा कधि आणी कसा पेटवायचा ते या दोघाच आधिच ठरले होते.याचा फायदा घेउन राणेला विलासरावाचि गोचि करायचि होति.म्हणुन तो एवध्या आरामात विलासरावाला धमकावत होता.पवारांचा यात फायदाच होता.काहि न करता काँग्रेसचि वाट लागताना बघायच सुख त्यांना मिळालं.यातुन मार्ग काढण्यासाठि देशमुखांनि उद्धवचि मदत घेतलि.

मयुरेशवैद्य's picture

25 Oct 2008 - 3:59 am | मयुरेशवैद्य

हे कळलं नाही.

१) राजच्या सेना सो़डण्यामुळे राणेंना काय फायदा झाला ?
२) यातुन मार्ग काढण्यासाठि देशमुखांनि उद्धवचि मदत घेतलि.

टारझन's picture

25 Oct 2008 - 8:28 pm | टारझन

राज सेना सोडणार हे राणेला आधि पासुन माहित होते.म्हणुन त्याने घाइघाइत सेना सोडलि.मराठिचा मुद्दा कधि आणी कसा पेटवायचा ते या दोघाच आधिच ठरले होते.याचा फायदा घेउन राणेला विलासरावाचि गोचि करायचि होति.म्हणुन तो एवध्या आरामात विलासरावाला धमकावत होता.पवारांचा यात फायदाच होता.काहि न करता काँग्रेसचि वाट लागताना बघायच सुख त्यांना मिळालं.यातुन मार्ग काढण्यासाठि देशमुखांनि उद्धवचि मदत घेतलि.

=)) =)) =)) =)) =)) काहिहि ...

बाकी वरिल सगळ्या प्रतिसादांवरून असं लक्षात येतं की आपल्या इथं क्रिकेट आणि राजकारण ह्यातले आपण मुरलेले लोणचे असल्यासारखा प्रत्येक जण बोलत असतो . ... वाचतोय .. बाकी चालू च्या ...

आम्हाला राज ठाकरेंना मत देण्यात दुमत नाही, आतापर्यंत सगळे सारखे , त्यात आपल्या हक्काचा वापर करायचा म्हणून बोगस मतदान केल्याचं आठवलं .. यंदा मनसे .. चियर्स ...

टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
अरे बघता काय सामिल व्हा

कोदरकर's picture

25 Oct 2008 - 5:08 am | कोदरकर

अस्मिता हा मुद्दा राज्यासाठी चांगला आहे.
तुलना करता येत नाही पण काहीशा अश्याच वातावरणात 'मोदी' जन्म झाला.
महाराष्ट्र कणखर करायचा असेल तर 'राज' ला पर्याय नाही.
राणे यांची फजिती महाराष्ट्र पाहतोच आहे.
विलासराव १० 'वर्षा' च्या जॅकपाट वर समाधानी आहेत
बाळासाहेब, शरदराव निवॄत्त होताहेत
ऊध्दवला भाजप साथ सोडता येणार नाही.
ऊध्दव दिल्लीत राज महाराष्ट्रात असे 'मराठी'करण जमायला हवे होते.

स्वामि's picture

25 Oct 2008 - 8:13 pm | स्वामि

राजचे आंदोलन हे देशमुख सरकार साठि डोकेदुखि ठरणार हे राणेंना माहित होतं.आणि राणेंच्या आजारावर एकच उतारा आहे आणि तो म्हणजे शिवसेना.यात शरद पवारांचि ** राजचि प्रसिद्धि बघुन आगिच्या भक्षस्थानि पडलि.म्हणुनच हे आजचे वि . हिं. प. च्या कार्यालयावर हल्ला प्रकरण.

धोंडोपंत's picture

25 Oct 2008 - 10:20 pm | धोंडोपंत

आजची परिस्थिती पाहता, राज ठाकरे यांच्या अटकेमुळे सर्वसामान्य मराठी माणूस मनसेकडे वळला आहे असे वाटते.

विविध संकेतस्थळांवर ज्या प्रातिनिधिक चाचण्या घेण्यात आल्या त्यात येत्या निवडणूकीत मतदान कुणाला कराल? या प्रश्नाला बहुतेकांनी मनसेला असे उत्तर दिलेले आहे.

मिसळपाववर झालेल्या चाचणीतही ८४ टक्के जणांनी मनसेला पसंती दिलेली आहे .

राज ठाकरे यांच्या प्रत्येक आंदोलनाला जनतेची प्रचंड सहानुभूती आहे. याचे कारण ते लोकांच्या मनातले बोलत आहेत.

पुढील प्रत्येक आंदोलन आणि अटक राज ठाकरे यांना सत्तेच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाईल याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही.

आमच्या त्यांना शुभेच्छा.

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

स्वामि's picture

25 Oct 2008 - 10:54 pm | स्वामि

राणेंवर सहारा प्रकरणात जे आरोप झाले त्यांचि माहिति देशमुखांच्या आशिर्वादाने बाहेर आलि.माणिकराव गावित नावाचे एक मिनिस्टर जेंव्हा आदिवासिंच्या भेटिला गेले त्या वेळि उद्धव तेथे आल्या नंतर अधिकार्यांनि गावितांकडे ढुंकुनहि न बघता उद्धवला सलाम ठोकले.