मंडळी,
स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते
samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे.
ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल.
आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले.
काहि मार्गदर्शन करा की राव.
प्रतिक्रिया
3 Sep 2014 - 1:26 am | श्रीरंग_जोशी
मी गेल्या २० महिन्यांपासून ब्लॅकबेरी झेड १० वापरतोय. अत्यंत समाधानी आहे. त्याचा चतुरकळफलक फारंच खास आहे. सुरक्षेबाबत ब्लॅकबेरीला तोडच नाही. मी ब्राऊझिंग बरेच करत असल्याने बॅटरी मात्र फार चालत नाही. दिवसभर अजिबात रिचार्ज न केल्यास संध्याकाळी बॅटरी संपून फोन बंद पडतो.
माझा सगळा अनुभव अमेरिकेतल्या वापराचा आहे. भारतात आलो होतो तेव्हा केवळ वायफायला जोडला होता. फोन म्हणुन वापरला नाही.
मी पुण्यात ब्लॅकबेरीची शोरूम बाहेरून पाहिली. प्रत्यक्ष भेट देऊन विविध फोन्सचा डेमो घेऊ शकता.
3 Sep 2014 - 5:41 am | कंजूस
एक चांगला कळफलक नोकिआने आशा २१० मध्ये जाता जाता टाकला आहे (होता). परंतृ तो तद्दन सामान्य फोन आहे. त्यात वायफाइ आहे पण हॉटस्पॉट नाही .एक बैकप म्हणून वापरता आला असता .
24 Sep 2014 - 3:27 pm | आशु जोग
हॉटस्पॉट ?
3 Sep 2014 - 9:44 am | प्रशांत
१२००० पर्यंत बजेट असेल तर moto-G बेस्ट..
Redmi 1S हा एक पर्याय चांगला वाटतो.
६००० मधे 1.6 GHz quad-core Qualcomm Snapdragon 400 processor, 1GB ram, Display 4.7 1280 x 720 display with 312 ppi, 8 MP camera (080p video recording)
6 Sep 2014 - 8:56 pm | vikramaditya
A536
बजेट मध्ये बसतो आहे. काय म्हणता?
6 Sep 2014 - 9:09 pm | मुक्त विहारि
माझ्या कडे ३ लीनोवा आहेत.
सगळे उत्तम चालत आहेत.
मुवि
6 Sep 2014 - 10:27 pm | श्रीरंग_जोशी
लिनोवो + इनोवा = लिनोवा
मला क्षणभर वाटले की मुविंनी तीन तीन इनोवा गाड्या घेतल्या. अन काही मिपाकरांना घेऊन ते कट्ट्याला ऐनवेळी टांग देणार्या आळशी मिपाकरांना त्यांच्या घरून जबरदस्तीने उचलून गाड्यांमध्ये कोंबताहेत.
असे चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले :smile: .
8 Sep 2014 - 12:05 am | मुक्त विहारि
कट्ट्याला ऐनवेळी टांग देणार्या आळशी मिपाकरांची यादी बरीच मोठी आहे.
9 Sep 2014 - 8:07 pm | कंजूस
विंडोज फोनचे ब्राउजर डेटा फार खातात का? ओपेरा अथवा डॉल्फिन टाकता येतो/चालतो का ?कारण आजपासून दोन कंपन्यांनी १५५ रुपयात १जिबी मिळणारा डेटा ५१२ एमबी कमी केलाय.
9 Sep 2014 - 9:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ते तुम्ही फोन कसा कॉन्फिगर करता त्याच्यावर अवलंबुन आहे. जर का तुम्ही कुकिज स्टोअर करुन ठेवत असाल तर ती वेब्साईट परत वापरताना कमी डाटा वापरला जातो. फोनचा स्वतःचा ब्राऊसर स्टोअर मधल्या अॅप पेक्षा चांगला आहे. बाकी ऑपेरा इझ अ डेड ब्राऊझर, नो आयड्या अबाऊट डोल्फिन.
10 Sep 2014 - 4:34 pm | काळा पहाड
शाओमी एमाय ३ माझ्याकडे आहे. झकास फोन आहे.
10 Sep 2014 - 4:49 pm | मदनबाण
झोलोचा विंडोज फोनचा काल रिव्हू वाचला, ठीक ठाक वाटला.
Xolo Win Q900s :- 1.2GHz quad-core Qualcomm Snapdragon 200 (MSM 8212) alongside 1GB of RAM and Adreno 302 GPU.
अधिक इकडे :- Xolo Win Q900s With Windows Phone 8.1 up for Pre-Order at Rs. 9,999
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Alibaba's record IPO covered entire deal in 2 days: Sources
10 Sep 2014 - 6:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
झोलो माफक किंमतीमधे चांगले फोन देतं हे मान्य. पण स्नॅपड्रॅगन २०० आणि अॅड्रिनो ३०२ अनुक्रमे खुप जुने सी.पी.यु. आणि जी.पी.यु. आहेत. (९,९९९ साठी खरचं चांगलं कॉन्फिग आहे पण).
13 Sep 2014 - 8:47 pm | मदनबाण
पण स्नॅपड्रॅगन २०० आणि अॅड्रिनो ३०२ अनुक्रमे खुप जुने सी.पी.यु. आणि जी.पी.यु. आहेत.
खरंय ! पण विंडोज फोन घ्यायचा असेल तर तो नोकिया घ्यावा अशा मता पर्यंत आलो आहे, कारण मायक्रोसोफ्टचची फक्त नोकियासाठीच असलेली सॉफ्टवेअर्स दुसर्या ब्रांडमधे मिळणार नाही. नोकिया ५३० ला फ्रंट कॅमेरा नाही व शिवाय फ्लॅश सुद्धा नाही हा त्याचा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. हल्ली तर सेल्फीचे वेड जाम पसरले असताना मोबाईल मधे फ्रंट कॅमेरा न देण्याची चूक मायक्रोसोफ्ट ने का केली ते कळाले नाही. सेल्फीची इतकी क्रेझ आहे की त्यामुळे लोकांचे जीव सुद्धा गेले आहेत आणि जात आहेत. मध्यंतरी वाचलेल्या काही बातम्यां मधे एक टुरिस्ट कपल सेल्फी काढण्याच्या नादात डोंगराच्या कड्यावरुन खाली पडुन मरण पावले त्यांचा लहान मुलगा मागे राहिला. :( एकाने बंदुक डोक्याला लावुन सेल्फी काढण्याच्या नादात चुकुन कॅमेरा क्लीक करण्याच्या जागी बंदुकीचा ट्रिगर दाबला !
बाकी मुली या सेल्फी काढण्याच्या नादात सगळ्यात पुढे असाव्यात ! असालाच पागलपणा करणार्या एका नमुन्याचे तिच्याच वडीलांनी केलेले चित्रण :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mona Re Bombay Vikings
13 Sep 2014 - 10:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असला वाय.झेड. पणा केल्यावर फळ भोगायला लागणारच की.
बाकी नोकिया घेऊन टाका बिंधास.
14 Sep 2014 - 4:49 pm | तुषार काळभोर
माइक्रोसॉफ्ट फ्रंट camera देत नाही
14 Sep 2014 - 5:58 pm | मदनबाण
माइक्रोसॉफ्ट फ्रंट camera देत नाही
हॅहॅहॅ... हा गैर समज कसा काय झाला बाँ ? ;)
बाकी नोक्या ७३० ची वाट पाहतो आहे, दिवाळीच्या आधी लॉन्च होइल अशी शक्यता वाटते. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू चीझ बडी है मस्त मस्त... ;) { Mohra }
9 Oct 2014 - 11:05 am | मदनबाण
बाकी नोक्या ७३० ची वाट पाहतो आहे, दिवाळीच्या आधी लॉन्च होइल अशी शक्यता वाटते.
झाला एकदाचा लॉन्च !
Lumia 730 now available for purchase in India
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15
15 Sep 2014 - 9:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पैलवान भौ....लुमिआ ७२० ला आहे फ्रंट कॅमेरा.
10 Sep 2014 - 7:12 pm | काउबॉय
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्याट्रि तपासा.
110 MAH सरासरी वापरात 13 तास चालते या हिशोबाने किमान 330++ MAH कैपेसिटी हवीच बाकी प्रोसेसर ram मेमरी मधे थोडे उन्नीस- बीस झाले हरकत नाही ब्याट्रि मात्र तगड़ी हवीच
10 Sep 2014 - 7:36 pm | कंजूस
धन्यवाद कैप्टन. कुकिजचे समजले. बैटरी काढता येण्यासारखी असेल तर कमी एमेच चालेल. जादा बैटरी जवळ ठेवायची आणि घरी असताना गलुकोज /सेलाइन (चार्जिँग) चालूच ठेवायचे. मोठा लेख मिपावर चढवता आला पाहिजे. त्यासाठी RAM किती पाहिजे?
10 Sep 2014 - 7:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपा वापरायला ५१२ लै जास्त झाला :)...!! बॅटरी काढायची सोय ल्युमिआ ला नाही. आणि त्याची आवशकताही नाही. बॅटरी बँक घ्यायची. तसं पण ल्युमिआ ची बॅटरी लाँगॅटिव्हिटी खुप चांगली आहे.
11 Sep 2014 - 4:45 am | कंजूस
dhanyawad धन्यवाद !
16 Sep 2014 - 7:17 pm | कंजूस
सेल्फी फोटो काढण्यासाठी front camera हवाच हे ठीक आहे. पण जर का कैमरा बटण असेल तर गरज नाही. कारण मागचा चांगल्या कैमराचे शटर दाबणे खरोखरच सोपे आहे. हा माझा अनुभव आहे. कपेसिटिव टच बटण वापरणे फारच त्रासदायक ठरते.
17 Sep 2014 - 3:47 pm | मदनबाण
कंजूस मामा, अहो फ्रंट कॅमेरा असला की तुम्हाला तुमचा चेहरा मोबल्याच्या स्क्रीनवर पाहता येतो,आणि त्यामुळेच सेल्फीची क्रेझ वाढली आहे. हवे तसे चेहर्याचे अविर्भाव करुन फोटो काढणे फ्रंट कॅमेरा असल्यास अधीक सोपे पडते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'मुक्त जलसंचारा'वर चीनने डोळे वटारले
16 Sep 2014 - 8:20 pm | कंजूस
लुमिया ५२५मध्ये कैमरा बटण आहे. सेल्फीसाठी योग्य असा २८एमएम फोकल लेंथचा मागचा कैमरा आहे. ऑटोफोकस आहेच. फ्लैश नाही म्हणून फारसे बिघडत नाही कारण सेल्फी फोटो बाहेरच्या उजेडात काढले जातात.
16 Sep 2014 - 8:24 pm | कंजूस
लुमिया ५२५मध्ये कैमरा बटण आहे. सेल्फीसाठी योग्य असा २८एमएम फोकल लेंथचा मागचा कैमरा आहे. ऑटोफोकस आहेच. फ्लैश नाही म्हणून फारसे बिघडत नाही कारण सेल्फी फोटो बाहेरच्या उजेडात काढले जातात.
17 Sep 2014 - 4:18 pm | कंजूस
सेल्फी दोन प्रकारचे असतात असा माझा समज आहे. एकात तोंडं वेडीवाकडी केलेले आणि दुसऱ्यात आपण कुठे आहोत हे दाखवण्याचे.. पहिल्यासाठी पाचपन्नास काढायला भरपूर वेळ मिळतोच परंतू दुसऱ्या प्रकारात स्पोर्ट अडवेंचर(राफ्टींग, स्काय डायविँग, रॉक क्लायमिंग इत्यादी) करतांना चांगल्या आठ एमपिचा फोटो मिळाला तर फार उत्तम आणि वेळ अजिबात दवडून चालत नाही. जर का असाच एक कैमरा फ्रंटलाही पाहिजे तर मोबाइलची किंमत वाढते (लुमिया ७३०) यापेक्षा बटण देणे योग्य आहे. आता नवीन क्रेझ आली आहे. कैमरा आपल्याभोवती फिरवून दहा पंधरा सेकंदाचा व्हिडीओ काढायचा. मला एकल प्रवासात बटणवाला (आणि दोरी लावता येणारा)नोकिआ X2 00 5mp फार उपयोगी पडतो.
24 Sep 2014 - 12:04 am | सँम
गेल्या सहा महिन्यापासून karbonn a18+ वापरतोय. त्यात १.३ ghz dual core processer, 512 mb ram, jellybean ४.२, ५ inch sreen, wifi hotspot, ५ mp camera, ०.३ mp front camera असे फिचर्स आहेत . अगदी उत्तम चालतो . महत्वाचे सर्व अॅप्स सुरळीत चालतात . camera quality avreage आहे पण हा मला फक्त 3000 रूपयांत मिळाल्यामुळे त्या बद्द्ल काही तक्रार नाही . . . .
9 Oct 2014 - 11:45 am | पैसा
कार्बन चे खरेच दणकट फोन आहेत. व्हॅल्यू फॉर मनी. मी परवाच नवीन विंडोज फोन कार्बन टिटानियम विंड डब्लु४ घेतला. २ दिवस झाले. बॅटरी अजून ५०% हून जास्त शिल्लक आहे. सध्या तरी त्याच्यावर प्रयोग चालू आहेत आणि अँड्रॉईडपेक्षा बराच चांगला वाटतोय.
http://www.snapdeal.com/product/titanium-wind-w4/1241433329#bcrumbSearch...
11 Oct 2014 - 11:17 pm | मदनबाण
मी परवाच नवीन विंडोज फोन कार्बन टिटानियम विंड डब्लु४ घेतला. २ दिवस झाले. बॅटरी अजून ५०% हून जास्त शिल्लक आहे. सध्या तरी त्याच्यावर प्रयोग चालू आहेत आणि अँड्रॉईडपेक्षा बराच चांगला वाटतोय.
मी Nokia Lumia 730 घेतला ! :)
फोनचा थोडक्यात रिव्ह्यु देतो :-
१} एक्सलंट फोन विथ ब्रिलियंट ओएस
२) ग्रेट ओलेड एचडी डिस्प्ले
३}फोन विथ एक्सलंट टच फिल
४} इट्स अ फास्ट फोन विथ नो लॅग
५} गुड बॅटरी सपोर्ट { निदान माझ्या वापराला तरी पुरुन उरते}
जाता जाता :- एन्ड्रोइड वरुन विंडोजवर शिफ्ट झाल्यावर मला वाटत नाही की मी परत कधी एन्ड्रोइड वर शिफ्ट करेन. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धक्कादायक : आर आर पाटलांची हाच तो वादग्रस्त व्हिडिओ
24 Sep 2014 - 3:34 pm | शिद
सोनी एक्स्पीरिया E3 स्मार्टफोन लाँच
1 Dec 2014 - 8:03 pm | श्रीगुरुजी
७-८ हजारापर्यंतचा एखादा चांगल्या क्वालिटीचा स्मार्टफोन सुचवाल का?
मोटो-ई हा एक पर्याय आहे. अजून काही पर्याय आहेत का?
1 Dec 2014 - 9:43 pm | मराठीच
लेनोवो A seriesचा 536 व 328 बघा.नोकिया ल्युमिआ 535.
मायक्रोमॅक्स युनाईट चांगला आहे.पण मोटो Eचे स्पेक्स जास्त चांगलेत.मोटो घेण्यास हरकत नाही.
1 Dec 2014 - 10:03 pm | हुकुमीएक्का
अँड्रॉइड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे त्याची बाकी Specifications सुद्धा नक्की पहावी. कारण नंतर कळतं की एक Feature कमी पडले. बॅटरी बॅकअप चांगला मिळावा यासाठी शक्यतो जास्त mah ची बॅटरी असलेला फोन घ्यावा. मग तो कोणत्याही ब्रँडचा का असेना. सध्या मार्केटमध्ये Samsung, Karbonn, MOTO, आणि अजून एक कंपनी ZOLO सुद्धा आली आहे. झोलो चे फोन्स पण छान आहेत पण "झोल" पण जास्त आहेत असे वाटते. *biggrin* शक्यतो Sony, Samsung, Micromax या कंपन्यांचे फोन चांगली features देत आहेत.
18 Jun 2015 - 6:06 pm | जादू
विंडोज् ओएस वाला फोन घेण्याचा विचार आहे.
लावाचा विंडोज्१ फोन बद्दल काय मत आहे. ४०००/- फोन आहे.
Specifications चांगले आहे.