काही प्रश्न (कृ. ह. घेणे)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
14 Sep 2014 - 11:30 am
गाभा: 

काही काळापूर्वी ऐक जाहिरात दिसायची टीव्हीवर,
क्रिकेटच्या ऐका सामन्यात ऐक कप्तान हजर आहे व दुसर्या संघाकडून कप्तान जाहीरच होत नाही,
बिनकप्तानाची टीम काय जिंकणार ? असा सवाल विचारला जातो आणि मतदान अमुक ऐका पक्षाला कराच असे
सांगितले जाते. या विधानसभा निवडणुकीत, तो संघ बिना कप्तानच मैदानात उतरणार असे दिसते !

पूर्वी गणिताच्या पेपरात ऐक प्रश्नप्रकार असायचा, कि अमुक अमुक काम करयाला, तमुक काल लागतो,
तर त्याकामाच्या काहीपट काम करायला किती कालावधी लागेल ते सांगा. त्याचप्रमाणे,
जर ब्लूप्रिंट छापायला काही अमुक वर्षे, तर ब्लूप्रिंट आधारित नवनिर्माण करायला किती दशके लागतील ?

ऐका दिवंगत नेत्याच्या कन्येने सांगितले कि 'मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण नाही, कारण, अद्याप 'त्या'
उंचीपर्यंत मी पोहोचले नाही', कशी काय मोजतात बर ती उंची ? बर उंची नसेल तर उंची वाढवायची ओषधे उपलब्ध आहेत का ?

जसे पवित्र नदीत स्नान केल्याने पापे धुतली जातात अशी सर्वसामान्य लोकात श्रद्धा आहे, तशीच
आपणच वेळोवेळी भ्रष्ट म्हणून आरोपिलेले, नेते पक्षबदल करून आपल्या पक्षात आल्यावर, त्यांची पापे धुतली जावून पवित्र होतात, अशी काही राजकीय पक्षातील समर्थकांची श्रद्धा असते का ?

सध्या चर्चेत राहिलेले आरक्षण, वटहुकुम काढून अमलात आणले जरी, तरी 'येत्या सरकारने त्याचे कायद्यात रुपांतर करावे' असा भूसुरुंग येत्या सरकारसाठी तर या सरकारने पेरून ठेवला नाही नं ?

ज्यांच्यावर टीका केली व महापालिका ताब्यात घेतली, त्यांच्याच मदतीने ती ताब्यात ठेवली, तर इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळेपणा तो काय ? अडीच वर्षात हिशेब काय मागता ? पाच वर्षांनी मागा ! असे म्हटले कि झाले, म्हनजे रस्ते खराब का ? कचरा का उचलला जात नाही ? पाण्याची बोंब का ? अशे प्रश्न सुद्धा पाच वर्ष ढकलता येतात.

मग आम्हालाच म्हणून जाब का विचारता ? त्यांनी काय दिवे लावले हे का नाही विचारात ? असे म्हटले कि दुसर्याने गाढवपणा केला म्हणून माझाही गाढव्पानाकडे दुर्लक्ष करा, असे म्हणण्या सारखे आहे. अरे दुसर्याने गाढवपणा केलेला म्हणूनच तर तुला मत दिले - असे म्हणण्याची सोय नाही.

त्यांनी एवढ्या वर्षात केलेला ब्याकलोग, आम्ही एवढ्यातच कसा भरून काढणार ? असे सांगत राहायचे. पण त्यांना जेवढी वर्षे दिली, तेवढ्याच वर्षांनी येवून तुम्हाला विचारावे का ? असा प्रश्न पडतो.

श्रीमंत महानगरपालिका वर्षानुवर्षे तुमच्या ताब्यात, तरी रस्त्यांचा बोजवारा उडाला, डेंगू व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापन यावर अडचण सांगितली कि लगेचच राज्य/केंद्र सरकार, याकडे (आपला विरोधी कुठे त्याप्रमाणे) बोट दाखवायचे का ? महान मराठी संस्कृती स्वाभिमान वै ची टिमकी वाजविणे ठीक, पण शेवटी ढोकल्याचेच 'शहा'णपण गाठीशी घेऊन मैदानात यावे लागणार ना ?

धरणभरण्याच्या विविध पद्धती, किंवा मी सांगितलेल्याप्रमाणे मत नाही दिले तर 'पाणी कट', अश्या टगेगिरीतून वेळ मिळाला, कि लोकांना, शेतीला पाणी वैगरे सारख्या किरकोळ गोष्टीकडे वेळ मिळणार का ? कि लावासा सारखे आणखी किती प्रकल्प आपण उभारू शकतो ? अश्या महान थोर विचारात आपले जाणते-जेष्ठ कृषीतज्ञ गुंतून बसणार ? मग भलेही हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या वैगरे शुल्लक बाबी त्यांचे लक्ष विचलित करू नाही शकणार का ?

प्रतिक्रिया

नियमीत मिपावर येत जा.मंजे असे प्रश्न पडणार नाही.
आणी मीच पयला आणी एकमेव की काय?

पैसा's picture

14 Sep 2014 - 8:43 pm | पैसा

यांची उत्तरे कधीच मिळणार नाहीत भाऊ! किंवा उत्तरे माहित असतात सगळ्यांनाच पण बोलणे अडचणीचे असते.

सवडीनुसार याचा उहापोह नक्कीच केला जाईल.

विलासराव's picture

16 Sep 2014 - 8:54 pm | विलासराव

जसे पवित्र नदीत स्नान केल्याने पापे धुतली जातात अशी सर्वसामान्य लोकात श्रद्धा आहे, तशीच
आपणच वेळोवेळी भ्रष्ट म्हणून आरोपिलेले, नेते पक्षबदल करून आपल्या पक्षात आल्यावर, त्यांची पापे धुतली जावून पवित्र होतात, अशी काही राजकीय पक्षातील समर्थकांची श्रद्धा असते का ?

पवीत्र नदीत नाही तर अंतरंगात डुबकी मारल्याने पापे धुतली जातात. पटत असेल तर डुबकी मारा, नसेल तर नका मारु.
बाकी पास.

"बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।"
असं काहीसं तुम्हाला म्हणायचे आहे का हो ? मग असे आत्मपरीक्षण सर्व भक्तांनी, सैनिकांनी, राजे, सेनापती, राव आणि रंक सर्वांनीच केले पाहिजे. आपल्यात आला म्हणजे पवित्र, विकासपुरुष, नाहीतर भ्रष्टाचारी, ढोंगी ?

विलासराव's picture

17 Sep 2014 - 10:23 am | विलासराव

"बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय।"
असं काहीसं तुम्हाला म्हणायचे आहे का हो ?

अगदी नेमके.

मग असे आत्मपरीक्षण सर्व भक्तांनी, सैनिकांनी, राजे, सेनापती, राव आणि रंक सर्वांनीच केले पाहिजे. आपल्यात आला म्हणजे पवित्र, विकासपुरुष, नाहीतर भ्रष्टाचारी, ढोंगी ?

हे माझ्या हातात नाही त्यामुळे पास.
बाकी आपली मर्जी.

सुहास झेले's picture

16 Sep 2014 - 10:11 pm | सुहास झेले

जगदंब... जगदंब !!

पगला गजोधर's picture

17 Sep 2014 - 10:22 am | पगला गजोधर

जगदंब... जगदंब !! आता तर उत्तरेकडील पोटनिवडणुकीनंतर तर १६५ खाली आपन तर शेटल व्हणार न्हाय, न्हाय म्हंजी न्हाय. बाकी निवडणूक फॉर्मलीटी हाय, जेवढे उमेदवार देवू तेवढ्या शिटा गावल्याच पाहिज्जे ! असं तर कोनी म्हणत तर नसल ? कोण आहे रे तिकडे !…

फारच बॉ प्रश्न पडतात तुम्हाला !
सगळेच प्रश्न सोडवता येत नाहीत. बरेच सोडून द्यावे लागतात.

वेल्लाभट's picture

17 Sep 2014 - 5:28 pm | वेल्लाभट

अभ्यास करून असो, कॉपी करून असो, पेपर फोडून असो किंवा आणखी कुठल्या प्रकारे असो..... पास होईल तो हुशार !

पगला गजोधर's picture

17 Sep 2014 - 5:53 pm | पगला गजोधर

"अभ्यास करून असो, कॉपी करून असो, पेपर फोडून असो किंवा आणखी कुठल्या प्रकारे असो..... पास होईल तो हुशार !"

त्या ऐवजी
"परीक्षा दिल्यानंतर", अभ्यास करून असो, कॉपी करून असो, पेपर फोडून असो किंवा आणखी कुठल्या प्रकारे असो..... पास होईल तो हुशार !

परीक्षा देण्याच्या आधीच, जर मी १६५ मार्कांचे प्रश्न अटेम्ट करणार, त्यात मी १६५ मार्क मिळवणारच आहेत तर मीच मार्कलिस्ट छापून, मीच मॉनीटर म्हणून जाहीर करून नाचण्यासारखे आहे.