गाभा:
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो.
तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का?
मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि
मुहूर्त का पहिला जातो?
खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का?
(हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.)
साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का?
(प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.)
भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का?
या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?
प्रतिक्रिया
7 Sep 2014 - 5:01 pm | दादा कोंडके
+१००
7 Sep 2014 - 6:03 pm | टवाळ कार्टा
२०० +
7 Sep 2014 - 5:57 pm | जेपी
हम्म मियां बिवी राजी तो क्या करेगा मुहुर्त पाजी,
बाकी ठरल्यावेळेला किती लग्न पार पडतात हे मिपावरच्या आत्मालात माहित.
7 Sep 2014 - 6:34 pm | अविनाशकुलकर्णी
मला यातले काही कळत नाही ..
मला पण..
पण आमचे लग्न टिकले..
बाकि केंव्हा आहे आपले लग्न?
7 Sep 2014 - 6:41 pm | पैसा
सुमुहूर्त सावधान!
7 Sep 2014 - 6:54 pm | दिपक.कुवेत
पूढिल परीस्थीती टाळता येते का ह्यावर विचार व्हायला हवा.
7 Sep 2014 - 7:22 pm | पैसा
नेमकं काय म्हणायचंय तुला? पुढील संकट असं म्हणायचंय का?
8 Sep 2014 - 6:39 pm | दिपक.कुवेत
तुला कळलं ना?? मग झालं तर.....
7 Sep 2014 - 7:45 pm | पिंगू
मुहूर्त टळला काय, साधला काय.. पुढचे संकट कधी टळतयं... :D
7 Sep 2014 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का ?
राशिचक्रामधे बारा राशी असल्यामुळे प्रत्येक राशीत काही नक्षत्र असतात आणि माणसाच्या जन्मकुंडलीमधे राशीत काही ग्रह असतात तेव्हा कोणती कृत्य कोणत्या नक्षत्रांवर करावी एवढाच तो अर्थ. काही नक्षत्र ही पुण्यकारक आणि काही पापकारक असतात असे म्हणतात म्हणुन मुहुर्त पाहावे असे म्हटल्या जाते. मुहुर्त हा नावराशीवरुन ठरवल्या जातो. (थोतांड आहे, हे विसरु नये)
मुहुर्त म्हणजे 'थोडा काळ, थोडे क्षण ''जी कृत्य काही विशिष्ट नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या नक्षत्रांच्या ज्या देवता असतील त्याच देवता असणार्या मुहुर्तांवर कार्य केल्यास कार्यसिद्धी होते'' एवढाच मुहुर्ताचा अर्थ. (बरोबर का बुवा)
माणसाच्या जन्मापासून ते त्याची माती होईपर्यंत मुहुर्त पाहिले जातात. अगदी चोर चोरी करण्यासाठीही मुहुर्त पाहुनच जातो असे म्हणतात. असो.
>>>> मुहूर्त का पहिला जात ?
कार्य सिद्धीस जाण्यासाठी.
>>>>> खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का?
मुहुर्तावर लग्न लागले नाही तर काहीही नुकसान होत नाही.. (लग्नामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान होतं, कोण बोललं रे ते) मुहुर्त चुकला तर काहीही विपरीत होत नाही. माणसांच्या स्वभावामुळे एकमेकांचं जास्त नुकसान होतं असं मला वाटतं
>>> साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का ?
साखरपुड्याचा विधी हा मुला मुलीचा विवाह ठरला आहे हे पाहुण्या रावळ्यात बातमी जावी म्हणुन केलेला विधी म्हणजे साखरपुडा. (व्वा सर वा) साखरपुड्याला हळद लावल्याचे अजून पाहिलेले नाही, पण लग्नात हळदीचे कारण मला वाटतं जुन्या काळी त्वचा टवटवीत दिसावी यासाठीचे कोणती साधनं नव्हती म्हणुन हळद वापरल्या जात असावी. हळ्दीनं कसं माणुस लै भारी दिसतो एवढाच तो अर्थ, तेव्हा हळद लावल्याने आणि न लावल्याने काही फरक पडत नाही. (हळद लावली नै तर लग्न झाल्यासारखे वाटत नाही )
>>> भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का ?
भारतीय संस्कृतीत खुप गोष्टी आहेत आता त्या प्रत्येकाला किती महत्वाच्या वाटतात त्यावर त्याचे महत्व अवलंबुन आहे.
अजून काही विचारायचे असल्यास जरुर विचारा. उद्या सुट्टी आहे, भरपूर मदत करतो.
-दिलीप बिरुटे
7 Sep 2014 - 8:38 pm | माम्लेदारचा पन्खा
फक्त तुमच्या अंगभूत गुणांवर आणि तुमच्या पार्टनरच्या समजूतदार विचारांवर लग्नाचे यश अवलंबून असते. बाकी नशिबाचा भाग अलाहिदा....
फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते तर इतके घटस्फोट झाले नसते !
7 Sep 2014 - 9:05 pm | टवाळ कार्टा
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
बाकी ते "शष्प" म्हणजे काय?? "घंटा" अस्सा मुम्बैच्या भाषेतला अर्थ माहीत आहे :)
7 Sep 2014 - 9:11 pm | माम्लेदारचा पन्खा
बऱ्याच दिवसांनी वापरात आणलाय ....बरं वाटलं
8 Sep 2014 - 12:50 pm | बॅटमॅन
शष्प म्हणजे गवत.
http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+shaShp...
त्यामुळे वरिजिनल अर्थ *ट असावा असा अंदाज आहे. पण येस, घंटा हा प्रतिशब्द चपखल बसतोच. :)
7 Sep 2014 - 9:28 pm | मुक्त विहारि
तर इतके घटस्फोट झाले नसते !
+ १
7 Sep 2014 - 10:28 pm | पैसा
लेख लिहिताना रविवारचा मुहूर्त का धरलास? प्रतिक्रिया कमी येतात!
माझी मते:
१) साखरपुडा आणि हळद लावणे यात खास धार्मिक विधी नसतो. त्या दोन्ही प्रथा आहेत. हिंदू कायद्यानुसार पाणिग्रहण, सप्तपदी आणि कन्यादान हे तीन विधी झाले तर लग्न पूर्ण होते. त्यात साखरपुडा आणि हळद लावण्याचा उल्लेख नाही.
२) जगात एकूण लोकसंख्येच्या १५-१६% हिंदू असतील. बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.
8 Sep 2014 - 12:04 am | भिंगरी
[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.]
मला नेमके हेच वाटते,पण आता तर असं ऐकलं आहे की सिंहस्थामुळे मधल्या वर्षभरात मुहुर्तच नाहीत पण मग जगभरात लग्नच होणारच नहीत का?
8 Sep 2014 - 12:36 am | जेनी...
अग्गं बै ... तर हे टेन्शन हाय वै तुला ???
7 Sep 2014 - 10:48 pm | नानासाहेब नेफळे
मिपावरचा प्रसिद्ध काथ्याकूट ,टॉपगिअर्ड फिलॉसॉफर यांचा, आपण जरुर वाचावा . http://www.misalpav.com/node/26743
8 Sep 2014 - 4:44 am | चित्रगुप्त
वाचा: भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf
आणि यावरील २००८ चा मिपा-धागा:
http://www.misalpav.com/node/3866
8 Sep 2014 - 6:40 am | अत्रुप्त आत्मा
विवाह मुहुर्ताच्या निमित्ताने..!
"सावधाना'चा मुहूर्त !
8 Sep 2014 - 9:58 am | भिंगरी
शंका समाधान झाले.
धन्यवाद!
9 Sep 2014 - 11:40 am | सुहास पाटील
विवाह लागताना भटजी आपला ओरडून सांगत असतो "सावधान" "सावधान" पण नवरा नवरी आणि घरच्यांना ते कळत नाही.
9 Sep 2014 - 2:46 pm | बॅटमॅन
ते आजवर फक्त एकट्याला कळालं आणि तो उसेन बोल्टपेक्षा वेगाने लग्नमंडपातून पळाला होता.
9 Sep 2014 - 3:16 pm | नानासाहेब नेफळे
त्याच्या वाग्दत्तवधुचे काय झाले हो पूढे?
तो पळुन गेला ईतकेच ऐकवतात फक्त.
9 Sep 2014 - 3:23 pm | प्यारे१
झालं हो लग्न तिचं. त्याच मांडवात. होता एक राखीव खेळाडू. तेव्हाच्या प्रथेनुसार वधूनं पण स्विकारलं होतं.
थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८० वर्षांनी कुणीतरी विचारणार असं म्हणून.
असो!
9 Sep 2014 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले
कुणाला समजावताय प्यारे ?
कशाला उगाच वेळ आणि एनर्जी वाया घालवता ?
10 Sep 2014 - 10:03 am | अत्रुप्त आत्मा
@थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८० वर्षांनी ""कुणीतरी"" विचारणार असं म्हणून.>>> =)) .. =)) .. =))
9 Sep 2014 - 5:39 pm | सूड
>>सिंहस्थामुळे मधल्या वर्षभरात मुहुर्तच नाहीत
हे एक चांगलं झालं. *mosking*
22 Sep 2014 - 4:09 pm | प्रकाश घाटपांडे
भिंगरी आपल्याला या वर काही माहिती खालील लिंकवर मिळेल
यंदा कर्तव्य आहे? भाग ६
22 Sep 2014 - 8:34 pm | फुंटी
साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात अडकण्याआधीच एक पाउल आहे..खर तर सध्या साखरपुडा मोठा थाटात म्हणजे जवळपास लग्नाच्या तोडीस तोड केला जातो.उपवर मुलगा मुलगी भेटून लग्न ठरेपर्यंतचा काल हा तसा धोकादायक असतो...लग्न तुटण्याचे प्रकार या काळात जास्त होऊ शकतात...यामुळे लग्नानंतरच्या तडजोडीची तयारी म्हणून सर्व लोकांसमोर साखरपुडा केला जातो.