उत्तम सर्व्हर कोणता?

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
18 Oct 2008 - 3:19 am
गाभा: 

राम राम मंडळी,

गेले काही दिवस मिपा वारंवार बंद पडत आहे. काल रात्रीही ते बराच वेळ बंदच होते.

नीलकांतला विचारले असता तो त्याचे कारण मिपाचा सर्व्हर बरोबर नाही असे सांगतो..

गेले काही दिवसांपासून तोदेखील अगदी खूप प्रयत्न करत आहे परंतु मिपाचे बंद पडणे सुरूच आहे..

सबब, या चर्चापस्तावाद्वारे मी असे विचारू इच्छितो की सर्वात उत्तम सर्व्हर कोणता? त्याला किती पैसे पडतात? कुठल्या कंपनीचा घ्यावा जो मिपाच्या सध्याच्या सर्व्हरसारखा वारंवार बंद पडणार नाही!

मला या सगळ्याबद्दलची काहीच तांत्रिक माहिती नाही. कुणी सांगू शकेल काय?

तात्या.

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

18 Oct 2008 - 4:06 am | कलंत्री

समदुखी.

जैनाचं कार्ट's picture

18 Oct 2008 - 9:09 am | जैनाचं कार्ट (not verified)

डेडीकेटेड सर्वर घ्या तात्या !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विसोबा खेचर's picture

18 Oct 2008 - 9:12 am | विसोबा खेचर

डेडीकेटेड सर्वर घ्या तात्या !

म्हणजे काय? त्याला किती पैशे पडतात? तो घेतल्यास मिपाचे हे असे वारंवार बंद पडणे थांबेल का?

असो, सांगतो नीलकांताला..

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

18 Oct 2008 - 9:28 am | जैनाचं कार्ट (not verified)

त्याला किती पैशे पडतात? तो घेतल्यास मिपाचे हे असे वारंवार बंद पडणे थांबेल का?

जरा महाग पडेल पण काही त्रास होणार नाही.... !

* खर्च जरा जास्तच आहे व त्यासाठीच म्हणतो आहे वेगळा अर्थ लावू नका !

गुगल ऍड घ्या / अथवा जाहीराती सुरु करा... प्रथम पानावर नको असेल तर अधी मधी... साईडला कोठे तरी थोडी फार ऍड चालू राहीली तर थोडीफार रक्कम हाती येऊ शकते, सेवेसाठी चालू केलेल्या साईटस / सरकारी साईट ह्याच मुळे बंद पडतात कारण उद्देश चागला पण फंड कमी हा प्रकार होतोच. जर ऍड नको असेल तर वर्गणी चालू करु शकता काही ना काही तरी करावेच लागेल... कारण ज्या वेगाने सदस्य वाढत आहेत त्या वेगाला तुमचा सर्वर (होस्टींग) सपोर्ट नाही करु शकणार... मिसळपाव चे रेटींग (साईट रेटींग ) मागील दोन महीन्यात दोन लाखाने वर आले आहे मी काय म्हणतो आहे हे तुम्हाला कळेलच काही दिवसात !

बाकी, आपले दुश्मन काय कमी नाही आहेत... दोन चार काऊर्लस सोडले / साईटकॉपी लावले तर आपले शेयर होस्टीगं बोंबलतं ! हा अनुभव आहे !

बघा विचार करुन !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विसोबा खेचर's picture

18 Oct 2008 - 9:49 am | विसोबा खेचर

गुगल ऍड घ्या / अथवा जाहीराती सुरु करा... प्रथम पानावर नको असेल तर अधी मधी... साईडला कोठे तरी थोडी फार ऍड चालू राहीली तर थोडीफार रक्कम हाती येऊ शकते, सेवेसाठी चालू केलेल्या साईटस / सरकारी साईट ह्याच मुळे बंद पडतात कारण उद्देश चागला पण फंड कमी हा प्रकार होतोच. जर ऍड नको असेल तर वर्गणी चालू करु शकता काही ना काही तरी करावेच लागेल...

विठोबाच्या अन् लालबागच्या राज्याच्या कृपेने तूर्तास तरी अशी वेळ आलेली नाही... :)

मिसळपाव चे रेटींग (साईट रेटींग ) मागील दोन महीन्यात दोन लाखाने वर आले आहे मी काय म्हणतो आहे हे तुम्हाला कळेलच काही दिवसात !

हो, हे मात्र खरे आहे! दिवसेंदिवस मिपावर होणारे हिट्स आणि युनिक व्हिजिट्स ची संख्या अत्यंत जोमाने वाढते आहे..!

बाकी, आपले दुश्मन काय कमी नाही आहेत... दोन चार काऊर्लस सोडले / साईटकॉपी लावले तर आपले शेयर होस्टीगं बोंबलतं ! हा अनुभव आहे !

हम्म! खरं आहे! साला आमच्या फाटक्या तोंडामुळे आमचे हितशत्रूही अगदी चिक्कार आहेत..! :)

असो, देख लेंगे... :)

साला नाहीच परवडलं तर उद्या कुणा भल्या पैशेवाल्या माणसाच्या हाती मिपा विनामूल्य सुपूर्द करेन, जो ते जिवाभावाने सांभाळेल आणि वाढवेल! :)

आम्ही मुलगी सुखाने सासरी गेल्याचा अनुभव घेऊ आणि तृप्त होऊ! :)

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल, जीवभावे..!

लालबागच्या राजाचा विजय असो...

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

18 Oct 2008 - 9:58 am | जैनाचं कार्ट (not verified)

:)

येथे बघा मिसळपाव ची प्रगती !
http://www.alexa.com/data/details/traffic_details/misalpav.com

तीन महीन्यात झालेला बदल
सध्या = 213545,02818 ( रेटींग )
पुर्वी = 343127810,36855 ( रेटींग )

राजाचा विजय असो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

ब्रिटिश's picture

18 Oct 2008 - 10:11 am | ब्रिटिश

मिपा जस तूमच तस आमच बी हाय तात्या
बिन्दास वर्गनी चालू करा न आमाला सहभागी करून झ्या

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

या पर्यायापेक्षा मिपाचा पब्लीक इश्यु काढू या.
बुक बिल्डींग चालू करा आजच.

घासू's picture

18 Oct 2008 - 1:00 pm | घासू

तात्यासाहेब काहिही चि॑ता करु नका. राजा आपल्या पाठीशी आहे.

मिपाभक्त
घासू

अमिगो's picture

18 Oct 2008 - 3:57 pm | अमिगो

http://www.bluehost.com ट्राय कराय ला हरकत नाही.
अर्थात राजे म्हणतात तसे जरा महाग असला तरी डेडीकेटेड सर्व्हर घेणे कधिही उत्तम त्या साठि www.rackspace.com चा विचार करु शकता.

आमिगो
If you are not following the stock market, you are missing some amazing drama!!!

वाचक's picture

18 Oct 2008 - 8:35 pm | वाचक

Canaca.com माझा स्वताचा अनुभव चांगला आहे खूपच - पण माझी वैयक्तिक साईट असल्यामुळे लोड काहीच नाहीये :)

कलंत्री's picture

18 Oct 2008 - 11:06 pm | कलंत्री

संगणकाची तशी माहिती नाही.

मिपाची मुख्य समस्या काय आहे? माहिती ( डॅटा ) जास्त आहे की येणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे? माहितीचे हस्तांतरण करणे सोपे असायला हवे. येणार्‍या लोकामुळे होत असेल तर आपण असा स्मृतीकोष घ्या की एकाच वेळेस कमीत कमी १००० लोक मिपावर असले पाहिजे. ( महाराष्ट्राची मराठी लोकसंख्या १ कोटी -> १००० लोक म्हणजे हिशोब करत रहा).

मिपाने सर्वसामान्य मराठीकरांना आपलेसे केले आहे त्यांना आता दुर करण्याचा विचार करु नका. पाहिजे तर.... आपका हुकुम सर आखोपर रहेंगा....

दत्ता काळे's picture

19 Oct 2008 - 12:45 pm | दत्ता काळे

मिपा जस तूमच तस आमच बी हाय तात्या
बिन्दास वर्गनी चालू करा न आमाला सहभागी करून झ्या - ब्रिटिश
हे मला जास्त योग्य वाटत!
मला बी घ्या त्यात.

दिपु दि ग्रेट's picture

20 Oct 2008 - 12:13 pm | दिपु दि ग्रेट

शक्यतो भारतातिल होस्टिंग कंपनी घ्यावी

http://www.znetindia.com/
आणि

http://www.scubez.net/

ह्या काहि कंम्पन्या स्वस्त्तात डेडिकेटेड सर्बर देतात !!! आणि मला वाटत सम्स्या BANDWIDTH ची आहे तिक्डे BANDWIDTH पण जास्त आहे !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Oct 2008 - 5:34 pm | घाशीराम कोतवाल १.२

तात्या मला वाटत तुम्हि ऍड चालु करा खरच कारण वर्गणी परवड्णार नाही बर मला मिपा चा सर्व्हर बघयला मिळेल काय?
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

जैनाचं कार्ट's picture

23 Oct 2008 - 5:40 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>>>बर मला मिपा चा सर्व्हर बघयला मिळेल काय?

हो,
जवळच आहे !
हा घ्या पत्ता - Orem, Utah 84097 United States !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बेसनलाडू's picture

24 Oct 2008 - 1:35 am | बेसनलाडू

सध्याची माहिती हे दर्शविते:
IP Address 67.220.196.18
Host www.misalpav.com
Location US, United States
City Los Angeles, CA 90017
लॉस एन्जेलिस, कॅलिफोर्निया येथे सर्वर असल्याचे दिसते. जैनांना यूटाहमध्ये कुठून मिळाला, कळले नाही.
तसेच आय् पी पत्ता बदलल्याचे दिसते. आधी हा पत्ता ७२.५२... असा काहीतरी होता, असे अंधुकसे आठवते. त्यावेळी सर्वर मिशिगन राज्याच्या राजधानीत लॅन्सिंग येथे होता, असे आठवते. असो.
(संशोधक)बेसनलाडू

घाशीराम कोतवाल १.२'s picture

23 Oct 2008 - 5:45 pm | घाशीराम कोतवाल १.२

नाय राव मी मुंबईत असतो मला कस जमल तिथ जायला
माफि असावी
राग नसावा लोभ असावा
मी आता तसा कोतवाल नाही बरं?

विकास's picture

24 Oct 2008 - 1:54 am | विकास

http://www.hostgator.com पण चांगली कंपनी आहे.