मंडळी,
स्मार्ट्फोन विकत घेण्याचे ठरत आहे. एका बाजुला बजेट (१०,००० च्या आत) आणि दुसरीकडे कार्बन, मायक्रोमेक्स ते
samsung असा brand and model selection चा नुसता घोळ झाला आहे.
ड्युअल सिम, ५ इन्च किंवा अधिक स्क्रीन, Android OS अश्या माफक (!) अपेक्षा आहेत. फेसबुक थोडेफार वापरले जाइल.
आणि हो, नेट वर काहि कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्विस विषयी फार वाईट अनुभव वाचले.
काहि मार्गदर्शन करा की राव.
प्रतिक्रिया
31 Aug 2014 - 10:35 pm | सुहास झेले
मोटो ई
31 Aug 2014 - 11:03 pm | दादा कोंडके
नोकिआ एक्स प्लस पण बरा वाटतोय.
लगे हाथ मी सुद्धा विचारून घेतो.
बजेटः १८ ते २३ हजार
ओएसः अँड्रॉइड (कीटक्याट)
प्रोसेसरः स्नॅपड्रॅगन लेटेस्ट
रॅमः कमितकमी २जीबी (मस्ट)
कॅमेरा: कमितकमी १२ एमपी (फूल एचडी रेकॉर्डींग मस्ट)
स्क्रीनः कमितकमी ७२० पी
एक्स्पँडेबल मेमरी: ३२ जीबी मायक्रोएसडी कार्ड
सॅमसंग आणि नोकिया नसावेत.
अॅसूस, लिनोवो, सोनी, मोटरोला, वनप्लस वन, एचटीसी चालेल.
1 Sep 2014 - 12:12 am | मुक्त विहारि
पण मित्रांच्या सल्ल्याने
लीनोव्हा के-९०० घेतला.
इंटरनेट चालू आहे.
मोबाईल फोटो काढू शकतो.(मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही.पण मित्रांनी काढलेले फोटो लई भारी आले आहेत.)
आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणाला.
आणि हेडफोन लावून गाणी व्यवस्थित ऐकू येतात.
(मैत्रीणींचे फोटो व्यवस्थित दिसतात, हा अजून एक प्लस पॉइंट...)
1 Sep 2014 - 8:48 am | vikramaditya
पण लिनोवा कितिला घेतला? म्हणजे खिसे चाचपुन बघतोय हो...
सर्वांना धन्यवाद. अजुन काही माहितीच्या प्रतीक्षेत.
2 Sep 2014 - 10:33 pm | मुक्त विहारि
मला ९०० सौदी रियाल म्हणजे अंदाजे, १४,४००/- (+/- १०० रु.) ला पडला.
आनि, मला मुविच म्हणा...
साहेबगिरी फार पुर्वीच सोडली आहे.सध्या रोजंदारीवर राबत आहे....
3 Sep 2014 - 10:15 am | vikramaditya
माहितिबद्दल धन्यवाद. अहो सगळ्या साहेबांचे दिवस सध्या कठीण आहेत....
1 Sep 2014 - 10:38 pm | दादा कोंडके
पण हे मॉडेल लाँच होउन एकावर्षापेक्षा जास्त काळ झालाय. मोबाइल इंडस्ट्रीत दोन महिन्यापेक्षा जुनं मॉडेल घेउ नये आणि कमित दिड महिना तरी झाला असावा (जेणे करून रिविव्ज उपलब्ध असतील) असं माझं मत आहे.
24 Sep 2014 - 3:16 pm | आशु जोग
मी एक पण फोटो नाही काढला.माझ्यात ती कला नाही.
आणि तुमचे काय ते अँड्राईड आहे, असे मित्र म्हणाला
तुम्ही खूपच साधे आहात हेच सांगायचे आहे ना ! :)
11 Oct 2014 - 11:41 pm | मुक्त विहारि
पण...
जे ज्ञान मला नाही, त्यात मी लक्ष घालत नाही.पण ते ज्ञान कुणाकडे असेल ह्याचा शोध घेतो, त्याचे शिष्यत्व पत्करतो आणि तो गुरु जे काही सांगेल ते मान्य करतो.अद्याप तरी आमच्या कुठल्याच गुरुंनी मला कधी दगा दिलेला नाही (हे त्यांचे मोठेपण) आणि मी पण माझ्या कुठल्याच गुरुंना कधी दगा दिलेला नाही.(हा माझा क्रुतज्ञपणा).
ह्या स्मार्ट-फोन बाबतीतच नाही तर संगणका बाबतीत पण हीच स्थिती आहे.आता ह्या स्वभावाला तुम्ही साधेपण ही म्हणू शकता किंवा योग्य गुरु कसा शोधावा? आणि त्याचे शिष्यत्व कसे पत्करावे? याचे ज्ञान मला झालेले आहे असेही म्हणू शकता.
तुमची आणि आमची जास्त ओळख नाही पण कदाचित समोरासमोर गाठ पडलीच तर, तुमचे ज्ञान आणि गूण बघून मी तुमचे पण शिष्यत्व घेईन.
कुणीतरी म्हटलेच आहे....
आधी गुरु बघावा नेटका मग शिष्यत्व घ्यावे न कचरता.
न वय, न लिंग, न जात, न धर्म आड येई गुरुमाऊलीच्या.
1 Sep 2014 - 12:12 pm | इरसाल
सोनी चा टी टु अल्ट्रा किंवा टी थ्री घ्या २४ के चा आसपास आहेत किंमती. मी सध्या टी टु अल्ट्रा वापरतोय फक्त रॅम १ जीबी आहे नी कॅमेरा १३ एम्पी.
1 Sep 2014 - 10:40 pm | दादा कोंडके
स्पेक्स छान वाटताहेत. रॅम मात्र २जीबी असायला हवी होती असं वाटलं. बाकिचे रिविव्ज वाचून बघतो.
8 Sep 2014 - 6:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
www.91mobiles.com
एका झटक्यात सर्व मॉडेल्स कंपेअर करा आणि मग ठरवा
24 Sep 2014 - 1:50 am | आशु जोग
नोकिआ एक्स प्लस - नॉट गूड
टू बोअरींग
1 Sep 2014 - 9:23 am | योगी९००
थोडे बजेट वाढवले तर MI3 हा एक उत्तम option आहे. १४०००/- रुपयांमध्ये Samsung S5 किंवा LG G2 च्या जवळपास जाणारा फोन आहे.
नाहीतर Motorola E हाच बेश्ट आहे.
1 Sep 2014 - 9:33 am | स्वप्क००७
Varil 2 phone cha pan vichar karava
Tasech xiaomi redme 1s hi changala aahe
1 Sep 2014 - 9:35 am | स्वप्क००७
Lenovo hava titka mala avadala nahi mala software madhe kahi truti adhalun aalya
1 Sep 2014 - 9:55 am | तुषार काळभोर
मोटो ई मध्ये ५मेपि फिक्स्ड फोकस कॅमेरा आहे, त्यामुळे जवळचे फोटो (मॅक्रो/एखाद्या कागदाचा फोटो) घेता येत नाहीत. तसेच फ्लॅश व समोरचा कॅमेरापण नाही.
अॅसुस झेनफोन ४ (४५०) हा एक चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्टवर ७हजाराला उपलब्ध आहे. लाँच व्हायच्या आधी प्री-ऑर्डर केला होता. आज डिलीवरी होईल असा सकाळी मेल आलाय.
इंटेल अॅटम १.२ ड्युअल कोर, १जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज, ८ मेपि ऑटोफोकस कॅमेरा फ्लॅश सहित, समोरचा .३ मेपि व्हिजिए कॅमेरा, गोरिला ग्लास३, इ.
काही उणीवा: १७५० मीअॅची बॅटरी, त्यामुळे जास्त बॅकअप नाही, गोरिलाग्लास स्क्रॅच रेझिस्टंट आहे, पण 'काच' असल्याने त्याला क्रॅक नाही जात, तर खळ्ळ्-खट्याक होते.
बघू.. आज घरी गेल्यावर वापरून पाहतो...
6 Sep 2014 - 8:53 pm | vikramaditya
फोन वापरलात का? कसा आहे?
8 Sep 2014 - 2:06 pm | तुषार काळभोर
it may not be the best phone in the world, but its the best phone at this price.
आणि झेनफोन ५ (१० हजारवाला) जास्त चांगला आहे. एकतर ३०% जास्त प्रोसेसर स्पीड आणि दुप्पट रॅम. स्क्रीनसाईझ ५"
वजन जास्त वाटते, पण अॅसूसने बिल्ड क्वालिटी मस्त दिलिये.
सर्वात चांगली गोष्टः कॅमेरा खरंच चांगला आहे. कॅमेर्यामध्ये काही चांगले फीचर्स दिले आहेत.
बॅटरी: ३जी डाटा चालू ठेऊन सलग वापरः कॅमेरा, प्ले-स्टोअर, इंटरनेट ब्राउझिंग, मेसेजिंग, इत्यादी:
(सलग- म्हणजे सलग-) अंदाजे ६ तास.
सर्वसाधारण वापरः ३जी डाटा चालू ठेवून, अधून मधून वरील गोष्टी वापरणे: अंदाजे १०-१२ तास
३जी डाटा आवश्यकतेपुरता चालू करणे व सर्वसाधारण वापरः ८ तासानंतर ५०%
काल रात्री १००% चार्जिंग झाल्यावर (१० वाजता) चार्जिंग बंद केलं, ३जी डाटा चालू ठेवला, स्क्रीन लॉक करून ठेवून दिला. सकाळी ६ वाजता ८५% होता. (८ तासात १५%)
1 Sep 2014 - 9:56 am | vikramaditya
कंपन्यांचे फोन म्हणे रिपेअर होतच नाहीत. डिलर सरळ सांंगतो कि नवा घ्या. हा भयानक प्रकार आहे.
Use and Throw..संस्क्रुती बळावत चालली आहे.
मोटोरोलाची सर्विस कशी आहे काहीच अंदाज नाही.
1 Sep 2014 - 10:07 am | कंजूस
शुभेच्छा. मीपण सध्या याच विवंचनेत आहे. मारकुटी नसलेली, कमी चारा खाणारी, भरपूर विनातक्रार कसदार दुध देणाऱ्या गाईच्या शोधात.
1 Sep 2014 - 10:19 am | स्वप्क००७
Xolo pan changala aahe
Minimum 8 gb cha phone ghya karan upcoming android version la jast internal memory lagnar aahe
Gharachya jawal service center asel asa mobile baghun ghya
1 Sep 2014 - 10:27 am | पैसा
माझ्या मुलीसाठी मोटो ई घेतला आहे. २ महिन्यात त्याच्यावर कॉलेजच्या बॅगेत वह्या पडल्यामुळे स्क्रीनला तडा गेला. आता त्या स्क्रीनची किंमत १८०० आहे. फेकून द्यायचा पण जिवावर आलाय. गोरिला ग्लास इ. बकवास आहे. सांभाळून वापरावा लागेल. मात्र इतर स्पेसिफिकेशन ठीकठाक आहेत. १०००० बजेटमधे मोटो जी पण येऊ शकेल.
मी स्वतःसाठी कार्बन, मायक्रोमॅक्स, मॅक्स यांचे फोन वापरले. साधारण एक वर्ष वापरून ठेवून देते. सगळे चालू आहेत अजून. चार-साडेचार वर्षापूर्वीचा सॅमसुंग गॅलॅक्सी पण चालू आहे. महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन चोरीला गेले किंवा रिपेअरीला आले तर हळहळत बसण्यापेक्षा जरा कमी किंमतीचे घेणे मला श्रेयस्कर वाटते. सॉफ्टवेअर सुद्धा एकसारखे नवे येत असते त्यामुळे कोणताही मोबाईल एखादे वर्ष वापरणे म्हणजे डोक्यावरून पाणी.
आता अॅण्ड्रॉईड चा कंटाळा आला. त्यात किटकॅटला इंटर्नल मेमरी खूप लागते असे दिसते. तसेच फोन रूट केला नाही तर मेमरी कार्डवर सगळी अॅप्स इन्स्टॉल करायला येत नाहीत आणि मुख्यतः कार्ड फक्त डेटासाठी वापरता येते असे ऐकले. जाणकारांनी प्रकाश पाडावा. त्यामुळे आता पुढचा फोन विंडोज्/फायरफॉक्स ओएस वाला घ्यायच्या विचारात आहे.
1 Sep 2014 - 10:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पैसातै खालची पोस्ट वाच विंडोज फोन घेणार असाल तर :)...!!!!
4 Sep 2014 - 9:38 pm | मदनबाण
महागडे २०-२५ हजाराचे फोन घेऊन चोरीला गेले किंवा रिपेअरीला आले तर हळहळत बसण्यापेक्षा जरा कमी किंमतीचे घेणे मला श्रेयस्कर वाटते.
अगदी असेच मलाही वाटते. :)
आता अॅण्ड्रॉईड चा कंटाळा आला.
ह्म्म... मला देखील, आणि इतर अनेकांना देखील आला असावा.
त्यामुळे आता पुढचा फोन विंडोज्/फायरफॉक्स ओएस वाला घ्यायच्या विचारात आहे.
विंडोज ८.१ चा रिव्ह्यु बर्यापैकी चांगला आहे...नोकियाचा लुमिया सिरीज घ्यायचा झाल्यास डेटाकार्ड सर्वात जास्त क्षमतेच्या क्लासचे घ्यावे. फायरफॉक्स म्हणशील तर ते आपल्याकडे लॉन्च झाले आहेत आणि मला वाटतं स्नॅपडीलवर अव्हेलेबल आहेत.परंतु अजुन १-१.५ वर्षतरी मी फायरफॉक्स वापरण्याच्या विचार करणार नाही,कारण त्या ओएसच्या बर्यापैकी सुधारीत आवॄत्या या काळात येतील. सध्या तरी लो-एंड हार्डवेअर मधे स्मार्ट फोनचा अनुभव मात्र तुम्हाला घेता येइल.
फाफॉ मोबाइल बद्धल अधिक इकडे :- Spice launches Firefox OS phone Fire One Mi FX1 for Rs 2,299
आता वळुया सॅमसंगकडे... यांचे अॅन्ड्रॉइड ओएस असलेले फोन बाजारात आधी पासुन आहेत्,पण त्यांचा मार्केट मधला हिस्सा मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे, लवकरच ते यावरती विचार करतील असे दिसते.त्यात टायझेन {Tizen} ओएस असलेल्या मॉडल्सचा समावेश देखील असेल. पण सर्वात आधी त्यांना त्या फोनसाठी भरपुर अॅप्स बनवावी लागतील.{ते काम चालु आहेच म्हणा} कारण अॅन्ड्रॉइडवरुन अजुन लोक हलत नाहीत त्याच्या मुख्य कारणांपैकी एक हे अॅप्स आहेत. शिवाय जर संपूर्ण ओएसचा लुक आणि फिल फॅक्टर जर युजर्सना सारखा वाटला तर ते पटकन टायझेनवर शिफ्ट होतीलच असे नाही.
आता जरा वेगळ...
ज्या २ ओएस मला फोनसाठी जास्त आकर्षक वाटत आहेत त्या आहेतः-
१} ubuntu ओएस फॉर फोन { अधिक इकडे :- http://www.ubuntu.com/phone }
२} Sailfish OS { अधिक इकडे :- https://sailfishos.org/ }
या दोन्ही ओएस मला जास्त पुढे जातील असे वाटते { Tizen पेक्षा सुद्धा ! यांना योग्य बळ मिळाल्यास तर नक्कीच}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com
4 Sep 2014 - 10:02 pm | पैसा
पण ubuntu ची वाट बघून कंटाळा आला. त्यांना पुरेसे पैसे मिळत नाहीयेत बहुधा त्यामुळे डेव्हलपमेंटचं काम रखडलंय. बाकी विंडोज सुद्धा फार प्रेमाने घ्यावे असे नाही. पण अँड्रॉईडला काहीतरी पर्याय हवा हे खरं.
फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून ती वेब बेस्ड आहे असं दिसतंय. आपल्याकडे नेटवर्कची बोंब बघता सगळं अवघडच आहे. आमचं ब्रॉडबँड दर १५ दिवसांनी एकदा बंद पडतं. मग कुठलं वाय फाय अन काय!
9 Sep 2014 - 11:17 am | मदनबाण
फायरफॉक्सच्या रिव्ह्यु वरून ती वेब बेस्ड आहे असं दिसतंय. आपल्याकडे नेटवर्कची बोंब बघता सगळं अवघडच आहे. आमचं ब्रॉडबँड दर १५ दिवसांनी एकदा बंद पडतं. मग कुठलं वाय फाय अन काय!
हा फोन वापरायला इंटरनेट कनेक्शन ऑन लागते असा जर समज झाला असेल तर ते तस नाही. अधिक इकडे :- https://www.mozilla.org/en-US/firefox/os/
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
9 Sep 2014 - 3:30 pm | पैसा
मिपावर यायचं तर फोन ब्राऊझर आणि ब्रॉडबँड तरी चालू नको? =))
9 Sep 2014 - 3:34 pm | मदनबाण
हो, हे मात्र खरं आहे ! ;)
खिडकी वापरकर्ता व्हावे का ? या विचारात मी सुद्धा आहे... जरा थांबुन विचार करावा म्हणतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
23 Sep 2014 - 4:44 pm | धर्मराजमुटके
Jolla Smartphone भारतात लाँच झाला आहे. कुणीतरी पटकन विकत घ्या आणि मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज.
सध्या तरी तो snapdeal.com वरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत रु १६४९९.०० फक्त.
23 Sep 2014 - 5:03 pm | मदनबाण
वाह... चला म्हणजे ज्या Sailfish OS चा मी वरच्या प्रतिसादात उल्लेख केला होता ती आता आपल्या इथेही उपलब्ध झाली तर ! :)
अधिक इथे :- Jolla's Sailfish OS-Powered Smartphone Launched at Rs. 16,499
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
23 Sep 2014 - 7:50 pm | मदनबाण
मला त्याचा रिव्यू सांगा प्लीज.
घ्या... रिव्हू हजर आहे ! ;)
प्राईज टॅगच्या मानाने डिस्प्ले क्वालिटी जरा कमी आहे... फोन शिकण्यासाठी बर्यापैकी वेळ द्यावा लागेल. :) ऑव्हरऑल कॉनफिगरेशन पहाता १५ K च्या आत हा फोन द्यायला हरकत नव्हती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
1 Sep 2014 - 10:30 am | स्वप्क००७
Nokia x he fail model aahe tumhi tyavar whatsapp hi vyavasthit install karu shakat nahi
Jar tumhi custom rom che chahate asal tar nokia x gheun root karun custom ron install karu shakta
1 Sep 2014 - 10:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ल्युमिआ सिरिज पण विचारात घ्या. मी स्वतः लुमिआ ७२० वापरतोय. सिक्युरिटी साठी उत्तम फोन आहे. तसचं वापरायलाही सोपा आहे. बॅटरी लाँगॅटीव्हिटी चांगली आहे. मला ३जी वर दोन दिवस फोन चार्ज केला नाही तरी चालतो. (वापर मध्यम). शिवाय नोकिया म्हणजे दणदणीत बॉडी. पडला झडला तरी काही होत नाही.
तुमच्या बजेट मधे लुमिआ ६३० बसेल.
1 Sep 2014 - 10:58 am | अनुप ढेरे
६३० ला ५१२ रॅम आहे. कमी वाटते ती. कोणी वापरतं का हा फोन? किंवा नोकीआ-विंडोसचा ५१२ रॅम वाला दुसरा फोन? पर्फॉर्मन्स कसा आहे?
1 Sep 2014 - 12:18 pm | पैसा
मायक्रोमॅक्सचा विंडोज फोन येतो आहे आणि तो १०००० च्या आसपास असेल असं ऐकलं.
http://www.microsoft.com/en-in/news/Press/2014/Jun14/MicromaxintroducesC...
1 Sep 2014 - 12:26 pm | अनुप ढेरे
मायक्रोमॅक्सबद्दल खूप टोकाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. ते फोन लॉटरी आहेत. चालले तर खूप भारी नाहीतर लगेच खराब असं काहीसं वाटतय. त्यामुळे त्याच्या वाट्याला मी तरी जाणार नाही.
1 Sep 2014 - 1:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
७२० ला पण ५१२ च रॅम आहे. विंडोज फोन मेमरी युसेज साठी ऑप्टिमाईझ केलेले असतात. त्यामुळे ५१२ एम.बी. रॅम मा़झ्या वापरासाठी तरी चिक्कार होतो.
7 Sep 2014 - 11:21 pm | रवीराज
१.७ जीबीची अस्फाल्ट ८ ऐअरबोर्न न अडखळ्ता चालते.
7 Sep 2014 - 11:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी ८.१ अपग्रेड केला आहे. झक्कास आहे. सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे.
9 Sep 2014 - 11:17 am | मदनबाण
सिस्टीम सिक्युरिटी मस्त आहे.
म्हणजे ? यावर अधिक प्रकाश टाकावा.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
9 Sep 2014 - 2:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे वाचा. भाषांतर करुन नंतर टाकीन.
https://expertcentre.nokia.com/en/articles/news/Pages/Enhanced-security-...
9 Sep 2014 - 2:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आणि वॉलेट वर पण चांगल्या सिक्युरिटी मेजर्स आहेत.
9 Sep 2014 - 2:33 pm | मदनबाण
ओक्के... वाचतो. धन्स !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!
9 Sep 2014 - 12:08 pm | अमित मुंबईचा
रॅम कमी आहे पण त्यांचे सॉफ्टवेर अशी बनवली आहेत की रॅम वर जास्त भर नाही पडत नाही, सगळे गेम्स चालतात. मी स्वतः लुमिया ५२० दीड वर्ष झाली वापरतोय. अजुन तरी काही त्रास नाही.
1 Sep 2014 - 11:15 am | vikramaditya
व्यक्तिशः गेली १० वर्ष नोकियाचे फोनच वापरले आणि I have been a Nokia loyalist.
पण आता ते Microsoft मध्ये तडमडल्यामुळे (and knowing their track record), I am skeptical about Nokia.
1 Sep 2014 - 12:36 pm | धर्मराजमुटके
स्मार्टफोन खरेदी, गाडयांची खरेदी किंवा एकूणच खरेदी हा विषय हा जालावर नेहमीच चघळला जाणार विषय आहे. त्यामुळे मिपावर "खरेदीबाबत मार्गदर्शन" असा एक वेगळा विभाग बनवावा काय ? फोनबद्दल तर दर महिन्याला धागे निघत असतात. ते एकाच ठिकाणी ठेउन वेळोवेळी तिथेच अपडेटस देता येतील काय ?
1 Sep 2014 - 1:05 pm | कंजूस
नोकिआ एक्स सिअरिजचे फोन्स अॅनड्रॉइड (अर्धवट ) ओएसचे आहेत (होते). विंडोज नाहीत. ते फेल गेले आणि ते आता अधिकृतरित्या बंद केलेत.
2 Sep 2014 - 5:05 pm | धर्मराजमुटके
ब्ल्याकबेरी झेड ३ वापरतय का कोणी इथे ? आता स्पेशल बिबिएम प्याकेजशिवाय नेट आणि इमेल वापरता येतात का त्यात ३जी कनेक्शन वापरुन ?
2 Sep 2014 - 10:22 pm | भाते
करवंद झ३ मध्ये १० प्रणाली आहे. यात पुर्वीप्रमाणे बीबीएम आणि नेटसाठी वेगळे पैसे भरावे लागत नाही. तुम्ही रोजच्या वापरात १,२जीबीला जे पैसे देता त्यावरूनच तुम्हाला झ३ वापरता येईल. बाकी झ१० वापरणारे मिपाकर श्रीरंग तुम्हाला सांगतीलच.