नमस्कार मंडळी. मंडळी मिपा आज आठव्या वर्षात पदार्पण करीत आहे आज हे एक सदस्य म्हणुन लिहितांना मिपाच्या चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार म्हणुन मला मनापासून अतिशय आनंद वाटत आहे. मिपाच्या समृद्ध अशा प्रवासात मी मिपाच्यासोबत या क्षणापर्यंत सोबत आहे, त्याचाही खुप आनंद वाटत आहे. मिपाच्या सुरवातीला गणेशचतुर्थीच्या रात्रीच्या बारा वाजता निरोप आला ’मास्तर, मिपा सुरु झालंय. लवकर आयडी घ्या आणि लिहा’ मंडळी गेल्या सात वर्षात क्वचितच मी मिपापासून दूर राहीलो असेल. जमेल तसं लिहिलं आपण लोकांनी प्रतिसाद दिला कौतुक केलं. प्रसंगी टीका केल्या, भांड्लो. मिपा म्हणजे माझ्या कुटुंबातला एक भाग झाला आणि मी मिपाच्या कुटुंबाचा. मिपानं मला अनेकदा मुड व्यवस्थित नसल्यावर लेखांच्या माध्यमातुन मानसिक आधार दिला. कधी खो खो हसवलं, कधी रडवलंही, कधी विचार करायला लावला, काही गोष्टी शिकवल्या, काही विसरायला लावल्या. आज असे अनेक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत.
मिपानं एक ओळख नसलेला मोठा मित्र परिवार दिला. कधी कोणाशी खूप बोलावं वाटलं. कधी कोणाच्या लेखनातला अनुभव आपला वाटला. माझे आणि मिपापरिवाराचं एक ऋणानुबंध निर्माण झाले. आभासी जगाशी फ़ारसा संबंध ठेवू नये, विश्वास टाकु नये, नेट डिसकनेक्ट केलं की संपलं, अस समजणारा मी मिपाच्या जगात रुमुन गेलो आहे. आणि आज खुप आनंदी आहे.
मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
काय आपणही असाच विचार करता ? :)
प्रतिक्रिया
29 Aug 2014 - 10:32 am | प्रचेतस
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
मिपाने जालीय मित्रांबरोबरच खर्या आयुष्यातही असंख्य मित्र मिळवून दिले. मिपाकरांसोबत बर्याच नवनवीन ठिकाणी भटकंती करता आल्या, उत्तम लेखन वाचता आले.
मिपाचे खूप खूप आभार.
29 Aug 2014 - 10:39 am | चौकटराजा
एका खंग्री माणसाला जरासे " मुक्त" व्यासपीठ हवे होते. तिथे सर्वानीच मुक्तपणे व्यक्त व्हावे असे स्थापकाना वाटत होते. आजही हे व्यासपीठ मुक्तच आहे. माणूस व जनावर यातील फरक विचारानी व्यक्त होणे हा आहे.प्राणीही आपला राग, प्रेम व्यक्त करीत असतो. आपणही तो व्यक्त करावा पण माणसाच्या पातळीला येऊन.हीच अपेक्षा वर्धापन दिनाच्या निमित्ताने.
29 Aug 2014 - 11:08 am | विलासराव
+११
29 Aug 2014 - 11:13 am | संजय क्षीरसागर
मालक, टेक्निकल टीम आणि मंडळाला हार्दिक शुभेच्छा विथ धन्यवाद!

आणि मुलानं काल पूर्ण केललं हे पेंटींग
29 Aug 2014 - 11:39 am | गवि
फार सुंदर..
29 Aug 2014 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा ! क्या बात है.
-दिलीप बिरुटे
29 Aug 2014 - 2:15 pm | शिद
मस्तच आहे चित्र. एक नंबर. *good*
29 Aug 2014 - 6:47 pm | यशोधरा
अतिशय सुरेख पेंटींग. खूपच आवडलं.
29 Aug 2014 - 9:27 pm | सुधीर
लै शुभेच्छा. :) माझ्याही... माझ्यासारख्या वाचनमात्र मिपाकराला मिपानेच चार शब्द लिवायला, अभिव्यक्त व्हायला शिकीवलं. त्यामुळे मिपाचे आणि मिपाकरांचे ऋण कधीही न फिटणारे आहेत. मिपा उत्तरोत्तर प्रगती करो आणि मिपा परिवार वृद्धिंगत होहो ही मनापासूनची सदिच्छा!!
29 Aug 2014 - 12:00 pm | आतिवास
अभिनंदन, धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
29 Aug 2014 - 12:14 pm | धर्मराजमुटके
खरे म्हणजे शुभेच्छा द्यायला किंवा एकूणच जास्त औपचारीक वागायला आवडत नाही. स्वतःच्या वाढदिवसाला कोणी शुभेच्छा दिल्या तरी अवघडायला होतं. ( काय करणार शिव्या खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही ! )
मिपावर एवढी वर्ष पडीक आहे म्हणजे शुभेच्छा बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेतच.
तरी पण लोकलाजेस्तव शुभेच्छा !
29 Aug 2014 - 12:21 pm | चिगो
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. लगे रहो, मिपा आणि मिपाकर्स..
संक्षींनी टाकलेलं चित्रही अत्यंत सुंदर आहे.. :-)
29 Aug 2014 - 12:23 pm | सुहास झेले
समस्त मिपाकरांना शुभेच्छा...मिपा असेच बहरत राहो अशी श्री गजानना चरणी प्रार्थना :)
29 Aug 2014 - 12:35 pm | अविनाशकुलकर्णी
मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले
29 Aug 2014 - 12:36 pm | अविनाशकुलकर्णी
मिपा वर धागे काढण्या मजा काहि औरच आहे.. मी २०० धागे गुंफले मी. पा. वर.. फुल २ धमाल..किति उडाले ते आठवत नाहि..२०० मात्र राहिले....समस्त मिपाकरांना शुभेच्छा.
29 Aug 2014 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका, तब्यतीला सांभाळा किती दगदग कराल :)
धागे किती उडाले पेक्षा राहिले किती...हा धागे राहिल्याचा ,जो आनंद आपल्या चेह-यावर दिसतो त्याचा शप्पथ मला हेवा वाटतो.
-दिलीप बिरुटे
(अविकाकांच्या मिपावारिल शिल्लक लेखनाचा फ्यान) ;)
29 Aug 2014 - 1:24 pm | अविनाशकुलकर्णी
धन्यवाद..बिरुटे साहेब
29 Aug 2014 - 12:36 pm | विवेकपटाईत
मिपाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.. आमच्या सारख्या शेंकडो अज्ञानी लोकांना लेखकू बनविण्याचे मह्त्त कार्य मिपा असेच करत राहो ही अशा.
29 Aug 2014 - 1:02 pm | बबन ताम्बे
मिपाला वर्धापन दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा
29 Aug 2014 - 1:29 pm | मधुरा देशपांडे
अनेक शुभेच्छा :)
29 Aug 2014 - 2:10 pm | शिद
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच श्री चरणी प्रार्थना.
समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
|| गणपती बाप्पा मोरया ||
29 Aug 2014 - 3:02 pm | सस्नेह
हे मुक्त माध्यम आम्हासारख्या कुणीच नसलेल्याना कुणीतरी बनवण्यासाठी असेच हजार वर्षे बहरत राहो !
29 Aug 2014 - 3:06 pm | बॅटमॅन
मिपाला शुभेच्छा!!! तर्री अजून खंग्री होवो आणि मिपा कायमच राहो. आमीन!!!!
29 Aug 2014 - 3:10 pm | मनीषा
मनःपूर्वक शुभेच्छा !
....आणि धन्यवाद
29 Aug 2014 - 3:19 pm | कंजूस
इथे डुंबण्यात मजा येते .
29 Aug 2014 - 3:52 pm | मदनबाण
सर्व मिपाकर तंत्रज्ञ,संपादक मंडळ आणि मिपाकर मंडळी यांचे अभिनंदन !
एका मराठी मंचावर इतक्या विविध क्षेत्रातली मंडळी एकत्र येउन सातत्याने विविध विषयांवर लिखाण करत आहेत,आणि सर्वांना आनंद देत आहेत. :) माझ्या पाहण्यात तरी इतका मुक्त-मोकळा आणि सुरेख मंच जालावर कुठेही उपलब्ध नाही.
हा धागा पाहिल्यावर मी माझा सदस्य कालावधी पाहिला, ६ वर्ष ६ महिने... या काळात मिपा आणि मिपाकरांनी मला भरभरुन दिले, आणि त्या बद्धल मी मिपा आणि मिपाकरांचा मनःपूर्वक आभारी आहे.
हा मंच असाच बहरलेला राहो आणि त्यात अनेक उत्तम मंडळींची भर पडो हीच सदिच्छा व्यक्त करतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vigneshwara Ashtotra Shatanama
29 Aug 2014 - 4:14 pm | प्यारे१
मि पा ला वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज या ठिकानी मी सगळ्या मंडळांचे आभार ह्याठिकानी माणतो.
मंडळांमध्ये
संस्थापक मंडळ,
सल्लागार मंडळ,
संपादक मंडळ,
कंपू मंडळ,
अॅण्टीकंपू मंडळ,
आण्टी मंडळ,
मिपा मित्र मंडळ,
मि पा डूख धरु मंडळ,
माचिसमित्र मंडळ,
तेल, तूप मित्रमंडळ,
अवांतर मित्र मंडळ,
भ्रमण मित्र मंडळ,
खादाडी मित्रमंडळ,
व्हॉट्सॅप, चेपु मित्र मंडळ,
उगाच्च खवट्पणा मित्रमंडळ,
उगाच्च विरोधक मित्र मंडळ,
शुद्ध्लेखन (हे असंच ल्ह्यायचंय) आग्रहधरु मित्रमंडळ
मिपाशेफ मित्र मंडळ,
ह्या आनि अशाच अणेक मंडळांचा समावेश आहे.
पुण्हा एकदा आभार्स.
आणि
गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
29 Aug 2014 - 4:39 pm | प्यारे१
शुद्ध्लेखन लेखाच्या शीशर्काणुसार आहे ह्याची कृपया णोंद बिरुटे सरांनी घ्यावी. ;)
29 Aug 2014 - 9:09 pm | मुक्त विहारि
+ १
30 Aug 2014 - 10:50 am | तुषार काळभोर
अनाहिता मंडळ!
30 Aug 2014 - 2:57 pm | प्यारे१
आण्टी मंडळ लिहीलंय. ;)
29 Aug 2014 - 4:17 pm | पिंगू
मिपाला शुभेच्छा.. मिपाने कितीतरी मित्र दिले आणि मिपा माझ्या जालीय आयुष्यातील मोलाची गोष्ट आहे.
29 Aug 2014 - 4:56 pm | गोरख कालेकर
मिपाला वर्धापनदिनानिमित्त हर्दिक शुभेच्छा...
29 Aug 2014 - 5:08 pm | एसमाळी
सात वर्ष झाली मिपा चालु होऊन ? बराच उशीर केला मी येण्यास.असो मिपा परिवाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
29 Aug 2014 - 5:31 pm | किसन शिंदे
मिपाला वर्धापनदिनाच्या भरपूर शुभेच्छा!!
गेल्या चार वर्षात मिपाने असंख्य मित्र दिले, त्यातले काही अगदी सुख-दु:खाच्या गोष्टी वाटून घेण्याइतपत जीवाभावाचे झाले. त्याचबरोबर बर्याच वर्षांची गडकोट भटकंतीची मनातली सुप्त इच्छाही याच मित्रांच्या सोबतीने करायला मिळाली.
थोडं काही गमावलं असेनही कदाचित पण खुप काही कमावलं आहे मिपाच्या सानिध्यात.
29 Aug 2014 - 5:33 pm | अजया
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.नुसतेच जालीय नाही तर जीवलग बनुन गेेलेल्या सख्या ही मिपाचीच देणगी.आपल्या माणसाचे आभार मानत नाहीत ,म्हणून आमचे वाचन विचार पाकृंसह जगणेच समृृध्द करणार्या मिपासाठी काय पन!!
29 Aug 2014 - 5:37 pm | दिपक.कुवेत
खर्या अर्थाने ईथे बहरता येतं आणि लाख मोलाचं म्हणजे शाळा सुटल्यावर जी मराठि लिहायची सवय सुटलेली असते ती ईथे नुसतीच पुर्ण होत नाहि तर अवर्णनीय असा आनंद देउन जाते. मिपा असचं उत्तओरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.
29 Aug 2014 - 5:48 pm | कापूसकोन्ड्या
मिपा एक मित्र आणि मी उपकृत आहे.
काथ्याकुटे रचिला पाया कट्टा झालासे कळस
मी २०१०/१०१२ मध्ये रियाध सौदी अरेबिया इथे नोकरीनिमित्त होतो. एकटा असताना त्या वाळवंटात मिपा साथीला होता. थोडेफार लेखन केले. पण वाचनच जास्त. झपाटून टाकणारे जयंतराव कुलकर्णी यांचे युद्ध पट पुन्हा पुन्हा वाचले.
गवी चे ''मृत्यु लेख आणि भयकथा" अप्रतिम. गवीनी केलेले घुबडाचे बाळंतपण तर खूप एन्जॉय केले.
यकूचे लेख पण 'सर्किट आणि सर्कॅस्टिक वाटायचे (सादात माँटो विषयी,आणि परिक्रमा.
विश्वास ठेवा, यकु ची बातमी वाचून मी एकटा रियाध मध्ये खुप रडलो. कुणाचा कोण पण फक्त दोन चार वेळा चॅटिंग काय केले, तो आपला होउन गेला. अजुनही लिहिताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. असो
पाककृती उल्लेखा करावाच लागेल.सोत्रीचे पेयप्रशन धरून पाककृती जर विदाउट फोतो असेल तर पहीले कल्ला 'फोटू' चा आणि शाहाकारी लोकांनी विचारलेले यात बटाटा...... घालू का?
प्रावासवर्णन तर उत्तमच. (कित्येक प्रवासवर्णनातले फोटो माझ्या डेस्कटॉपवर विराजमान झाले.)
आणि उत्कर्षबिंदू म्हणजे कट्टा. आणि त्यांचे फोटो.
सर्वात अर्क म्हणजे चरच्ररीत मिसळीवरच 'कट किंवा तर्री' म्हणजे प्रतिसाद. तो कटकारस्थानातला कट पण आणि तर्री तला पण. अत्यंत आवश्यक.
एक खोड अशी जडली की, सेलेब्रिटि लेखकांचे अपवाद वगळता मी तर प्रथम प्रतिसाद पाहतो.
मिपा असेच दिवसेंदिवस प्रगती करो अशी त्या जगनियंत्याला प्रार्थना.
सर्व संस्थापकांचे, सम्पादकांचे टेक्निशियन लोकांनी या लश्करच्या भाकरी भाजल्या बद्दल धन्यवाद.
29 Aug 2014 - 6:12 pm | जुइ
मिपाला अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद!!!
29 Aug 2014 - 6:22 pm | क्रेझी
सर्वप्रथम मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुम जिओ हजारो साल..साल के दिन हो पचास हजार हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना.
आजचा मिपाचा लोगो खुपच सुंदर आहे, अष्टविनायक आणि मिपाचे आठ विभाग ह्यांची कल्पक मांडणी आवडली.
29 Aug 2014 - 6:28 pm | जेपी
आमच्या समस्त लातुरकडाकडन शुभेच्छा.
जेपी फ्राम लातुर
29 Aug 2014 - 9:08 pm | मुक्त विहारि
आहेस कुठे?
29 Aug 2014 - 6:47 pm | यशोधरा
मिपाला अनेकानेक शुभेच्छा!
29 Aug 2014 - 6:48 pm | बाबा पाटील
पण मिपा मुळ मालक विसोबा खेचर उर्फ तात्या अभ्यंकर यांनाही कुणीतरी बोलवा रे.सध्या ते थोबाड पुस्तकावरील ओसरीमध्ये व्यस्त आहे.
29 Aug 2014 - 7:32 pm | विकास
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा. मराठी मधे एक अतिशय सक्रीय सोशल मेडीयम तयार करून आणि त्यावर सातत्याने (न कंटाळता + वेळ काढून) काम करण्याबद्दल मालकांचे आभार!
29 Aug 2014 - 7:59 pm | पैसा
मिपा अन मिपा परिवाराला धन्यवाद अन हार्दिक शुभेच्छा!
29 Aug 2014 - 8:31 pm | मूकवाचक
मिपाला वर्धापन दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा!
29 Aug 2014 - 8:42 pm | आयुर्हित
मिपा आणि मिपाकरांना वर्धापनदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा.
आणि
समस्त मिपाकरांना व त्यांच्या कुटूंबियांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
|| गणपती बाप्पा मोरया ||
29 Aug 2014 - 9:09 pm | मुक्त विहारि
मिपा अन मिपा परिवाराला धन्यवाद अन हार्दिक शुभेच्छा!
29 Aug 2014 - 9:13 pm | दशानन
मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
माझ्या जालिय व व्यक्तिगत जीवनामध्ये मिपाबद्दल माझ्या मनात नेहमीच एक आदराचे स्थान होते व आहे. आज मी जो पण काही आहे, त्यात फार मोठा वाटा मिपाचा व मिपावरील सृह्द मित्रांचा आहे.
अशीच प्रगती होत राहो!
29 Aug 2014 - 9:15 pm | अनुप ढेरे
वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
29 Aug 2014 - 10:05 pm | एस
हे मिपा गेले बरेच दिवस माझी फोटोग्राफीवरील बडबड सहन करतेय त्याबद्दल धन्स हो मालक! :-)
या गराड्यात मज्जा आहे हो तुमच्या... :-)
29 Aug 2014 - 11:18 pm | अत्रुप्त आत्मा
मला व्यक्त होण्यास,सर्वाधिक वाव दिलेल्या मि.पा.ला __/\__

घालायची मज्जा सर्वाधिक इथेच आहे*. 

तसेच.. येथील सर्व आय.डी आणि आय.ड्यांना(सुद्धा! :D ) अनेकानेक धन्यवाद! लहानपणचा धुडगुस
=============
*आणि स्मायल्या टाकण्याचिही
30 Aug 2014 - 1:50 am | खटपट्या
सर्व मिपा कुटुंबियांना शुभेच्छा !!
30 Aug 2014 - 2:27 am | प्रभाकर पेठकर
आखाती प्रदेशात मराठी बोलणं, वाचणं आणि लिहीणं जवळ जवळ दुरापास्त असतानाच भाचीच्या सांगण्यावरून मनोगतावर दाखल झालो. मनोगताने मराठी लिहायला, वाचायला, संवाद प्रस्थापित करायला एक व्यासपिठ उपलब्ध करून दिले. तात्यांसारखा मित्र दिला. पुढे तात्या मनोगतातून बाहेर पडले आणि त्यांनी हे, मिसळपाव, संस्थळ सुरु केले. तात्यांच्या निमंत्रणानुसारच मिसळपाववर आलो आणि इथलाच होऊन गेलो. इथेही अनेक मित्र मिळाले. चांगले विचार वाचावयास, व्यक्त करण्यास मिळाले. तात्यांच्या 'लेखन-स्वातंत्र्याच्या वेडापायी' अनेकदा मिपाचा दर्जा घसरायचा, माझे ह्यावर तात्यांशी वाद व्हायचे पण तात्यांचा स्वतंत्र्य आग्रह आणि हे संस्थळ तात्यांच्या मालकीचे आहे हा माझा विचार मला नेहमीच माघार घ्यायला लावायचा. जे कांही लेखन मी इथे केलं त्याने मला स्वतःला समाधान दिलं आणि त्यासाठी मी तात्यांचा नेहमीच ऋणी राहीन.
मालक निलकान्त, मिपाकर तंत्रज्ञ मंडळी, संपादक मंडळ आणि मिपाकर सदस्य ह्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा..!
उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.
30 Aug 2014 - 5:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>उद्याउठून माणूस चंद्रावर कायम वास्तव्यासाठी जाईलही,.... मी मिपावरच असेन.
क्या बात है !
-दिलीप बिरुटे
30 Aug 2014 - 6:35 am | अर्धवटराव
मिपा... मित्रा... माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला आपलं म्हटल्याबद्दल अनेकानेक धन्स रे. आठाव्या वर्षात पदार्पण केलस. किती कोवळं वय तुझं. पण.. पण किती भारी प्रगल्भता... आणि ति सुद्धा किती अवखळ...एखादा तुफानी निर्झर जणु. असाच नांदत रहा मित्रा. तुला उदंड आयुष्य लाभो. तृषार्तांची तहान भागवायची तुझी शक्ती उदंड वृद्धींगत होवो.
हॅप्पी बड्डे मित्रा...
30 Aug 2014 - 11:05 am | गौरव जमदाडे
!!! सर्व मिपा परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!!!
30 Aug 2014 - 11:33 am | रुमानी
मिपाला वर्धापन दिनाच्या खुप खुप..शुभेच्छा!!
30 Aug 2014 - 12:14 pm | दिव्यश्री
मिपाला वर्धापन दिनाच्या अनेक शुभेच्छा .!!! :)
30 Aug 2014 - 12:45 pm | तुषार काळभोर
मिपाचे ॠण व्यक्त करता येणे शक्य नाही. मिपासाठी उत्तम लिहिता यावं, उत्त्म ते वाचता यावं, कधी कडाक्याचं भांडण व्हावं, पुन्हा चलो यार गले मिलो अशी भावना उभी राहावी, वास्तव जगाबरोबर याही जगाची उत्त्म ओळख व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी आणि मिपानं हे सर्व केलं आहे. मिपानं मला आजच्या क्षणापर्यंत जो लाखमोलाचा आनंद दिला आहे, त्या मिपा व्यवस्थापनाचा, संपादकांचा आणि सर्व मिपाकरांचा, वाचकांचा मी आभारी आहे, मिपाच्या पुढच्या वाटचालीला मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
30 Aug 2014 - 5:36 pm | माहितगार
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयाय लेख्न व्हावे हि शुभेच्छा.
30 Aug 2014 - 5:38 pm | माहितगार
उपरोक्त सर्वच धन्यवाद आणि शुभेच्छांना आमचा +१ + मिपाच्या अद्याप लिहीत्या न झालेल्या वाचकांकडूनही त्यांच्या आवडीच्या विषयानुसार मिपावर उत्तरोत्तर अधीकाधीक लेखन व्हावे हि शुभेच्छा.
30 Aug 2014 - 7:05 pm | अनिता ठाकूर
मिपाला वर्धापन दिनानिमित्त अनेकानेक शुभेछा!
31 Aug 2014 - 1:17 am | डॉ सुहास म्हात्रे
मिपाला ८ व्या वर्धापनदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा~!
रोज मराठीत (व्हर्च्युअल) गफ्फा वाचायला आणि हाणायला यासारखे दुसरे मराठी संस्थळ नाही !!
31 Aug 2014 - 2:18 pm | माम्लेदारचा पन्खा
या निमित्ताने मिपाच्या जन्माचा आणि वाढीचा एक तक्ता नवीन मेम्ब्रांसाठी कोणी प्रकाशित करू शकेल काय?
सं मं इकडे लक्ष देईल काय ?
31 Aug 2014 - 2:25 pm | कवितानागेश
वरच्या सगळ्यांशी सहमत. :)
'शुभेच्छा' हा इतका एकच शब्द मिसळपावबद्दलच्या भावना व्यक्त करायला पुरेसा नाही.
31 Aug 2014 - 4:54 pm | पोटे
छान
1 Sep 2014 - 8:43 am | प्रमोद देर्देकर
!मि. पा. ला हार्दिक शुभेच्छा!
1 Sep 2014 - 9:34 am | श्रीरंग_जोशी
मिपाबद्दलच्या भावना शब्दांत मांडणे कठीण आहे.
हा वृक्ष असाच बहरत राहो व माझ्यासारख्या अनेकांना त्याची छत्रछाया मिळत राहो.
1 Sep 2014 - 9:45 am | ज्ञानोबाचे पैजार
मि.पा. ला हार्दिक शुभेच्छा.
खरच... मिपाबद्दलच्या भावना शब्दांत मांडणे कठीण आहे.
पैजारबुवा,
1 Sep 2014 - 6:23 pm | सुहास..
बुवांशी सहमत !!
1 Sep 2014 - 5:50 pm | सूड
बालिशपणा करायला, भांडायला, मनमोकळं बोलायला, भटकायला, माहित असलेलं सांगायला आणि नसलेलं माहित करुन घ्यायला...अशा अनेक गोष्टींसाठी मित्रमंडळ मिळालं ते इथंच. काळे आणि पांढरे येवढंच स्वभावविशेष समजणार्या माझ्यासारख्याला ग्रे शेड्स बघायला शिकता आलं ते इथंच!! कचाकचा भांडलो, धुडगूस घातला, देव जाणे काय काय केलं चार वर्षात...लिहायला बरंच आहे पण सुचतही नाही आणि थांबवतही नाहीये.
असो, मिपा आणि त्यामुळे मिळालेल्या मित्रपरिवाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा आणि आभार!! :)
1 Sep 2014 - 6:24 pm | मंदार दिलीप जोशी
खूप खुप शुभेच्छा
:)
2 Sep 2014 - 10:02 pm | खेडूत
आपल्या मिपा ला बहरत रहाण्यासाठी खूप शुभेच्छा !!
5 Sep 2014 - 7:33 pm | केदार-मिसळपाव
शुभेच्छा..
5 Sep 2014 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा अगदी व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी आपली व्यस्त नोकरी सांभाळून हा नसता उपद्याप मिपाचे मालक नीलकांतला सांभाळावा लागतो. आणि तेही हौस म्हणुन. अनेकदा मिपावर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की आम्ही नीलकांतला तो कोणत्या अवस्थेत आहे म्हणजे नोकरीच्या ठिकाणी व्यस्त आहे की आराम करतोय की वैयक्तिक कामात व्यस्त आहे ते सर्व विसरुन फोन करुन एसेमेस करुन परेशान करतो. मिपावर येरर आला आहे प्लीज पाहा आणि मिपा लवकर व्यवस्थित सुरु करा. मालकही न कंटाळता रिप्लाय करतात 'एका तासात करतो, काम सुरु आहे, स्प्याम आयडी, व्हायरस, दृपल येरर, ब्याकप, वेगवेगळ्या सुविधा अशा कितीतरी गोष्टी मालक सांगत असतात. खरं तर कारणं काहीही असोत आणि त्या अडचणी कितीही मोठ्या असोत मिपा सतत चालु असलं पाहिजे, असं आपल्याप्रमाणे मलाही वाटत असतं, तेव्हा आमचा हा त्रास सहन करुन वाचकांसाठी मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्दल नीलकांतसेठचे मनापासून आभार.
अरे हो, किरकोळ कामासाठी प्रशांतलाही आम्ही त्रास देतो. 'हे परिचयाचे आहेत यांचा आयडी अप्रुव्ह करा, अमुक करा आणि धमुक करा, असे म्हणुन प्रशांतलाही त्रास देत असतो तेव्हा प्रशांतसेठचेही मनःपूर्वक आभार.
सदस्य येतील आणि जातीलही मिपा मात्र अव्याहत सर्वांसाठी सतत असेच बहरत असले पाहिजे. पुन्हा एकदा मिपाच्या दमदार वाटचालीला भरभरुन शुभेच्छा....!
-दिलीप बिरुटे
6 Sep 2014 - 8:06 am | तुषार काळभोर
मालक,
सर्व टेक्निकल सपोर्ट टीम,
संपादक मंडळ,
सर्व जुणे-जाणते आणि नवे-नेणते सदस्य,
या सर्वांचे आभार...
तुम्हा सर्वांमुळे या जीवाचा हापिसातला वेळ (आणि बॅण्डविड्थ) सार्थकी लागते...
मिपा उत्तरोत्तर बहरत जावो.....
27 Aug 2025 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपा मालक नीलकांत तंत्रज्ञ प्रशांत, संपादक, साहित्य संपादक, मिपाकर वाचक यांना मिपा वर्धापन दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...!
च्यायला म्हणता म्हणता मिपाबरोबर इथे आयुष्याची वीस वर्षाचा प्रवास. माय गॉड... मोठा काळ. लब यू & Thanks all मिपा.
-दिलीप बिरुटे
28 Aug 2025 - 3:33 pm | गवि
+१
28 Aug 2025 - 11:10 pm | स्वधर्म
मिपा हे एक चांगलं म्हणजे जिवंत संकेतस्थळ म्हणून खूप आवडते. माझेही सदस्यत्व जुने आहे. सर्व चमूला खूप धन्यवाद आणि शुभेच्छाही!
28 Aug 2025 - 8:01 pm | अभ्या..
हायला, इतकी वर्षे झाली?
ह्याप्पी बर्डे मिपा.
बघता बघता १३-१४ वर्षे झाली राव सदस्यत्त्वाला.
मिपावर्धापन दिन आठवला की आठवतं तसं सुरुवातीला गणपती म्हणजे मिपावर मी केलेलं बॅनर असायचंच. किती बॅनर्स केली वर्धापनदिनाची कुणास ठाउक. नेमकी गणपतीत मला कामं असायची आणि हे बॅनर प्लस गणेश लेखमाला आणि लगेच दिवाळी अंकाचे कव्हर ही कामे नीलकांत कसे करुन घ्यायचा माझ्याकडून ही एक कथाच आहे. ऐन वेळेपर्यंत माझे काम तयार नसायचे. झाले के ते मेल कर मग नीलकांत,प्रशान्त जो कुणी असायचा उपलब्ध तो बिचारा पब्लिश करायचा. बिरुटे मास्तरांना मात्र काहीही केले मी त्याचे कौतुक असायचे. बाकी इतर कोणही असु दे, योग्य जागी दुर्लक्ष्याने मारणारा हा खमक्या माणूस कायम माझ्यामागे उभा असायचा. नीलकांताने तर कीती सांभाळून घेतलं त्याची मोजणीच नाही.
असो. ते दिवस गेले. तेंव्हाचे मित्र संसार, नोकर्या, मुलेबाळे ह्यात गुंतली. आमचेही तसेच झाले. सोलापूरहून वेळ काढुन पुणे कट्ट्याला येणारा मी पुण्यात आल्यावर एकही कट्टा अटेंड करु शकलो नाही. बिका, वल्य्या, किसना, गणा, धन्या, वप्या, बॅट्या, सुडक्या, गुरुजी, पन्नास, गिर्जा, अन्या, गणेशा, मिका, पशा, नाखुकाका, बाप्या, नितीन, प्रसाद, प्रशांत गाढवे, (चौराकाका, तात्या, मोडक, यक्क्या आणि मोहिते कसं विसरायचं तुम्हाला :( )एकसे बढकर एक नग राव. कालपरवापर्यंत भेटायचे, बोलायचे, भांडायचे, चिडायचे, खायचे प्यायच्जे, निदान व्हाटसापवर तरी तोंड दाखवायचे.
असो....
लै माणसे दिली राव मिपाने. मित्र पण दिले. काही कारण नसताना शत्रुत्व बाळगणारे दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही गोष्टीची एकच बाजू न बघता बाकी पैलू बघायचा दृष्टीकोन दिला.
थ्यान्क्स अ लॉट मिपा आणि नीलकांता.
जिओ....
28 Aug 2025 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभ्याशेठ, कलाकाराच्या कलेवर आपलं पहिलं प्रेम. मीपाची लै चित्र तुम्ही काढली. लंबर एक कलाकारी त्यात होती. अक्षर कलाकारी, रंगसंगती, लै भारी. कलाकार ज्या आवडीने हे सगळं करतो ते आपल्याला लै आवडतं. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा फडके खांडेकरांनी घातलेला वाद निरर्थक नव्हता, हे मला कायम पटतं. एखादा कलाकार ज्या सौंदर्याला, विचाराला, अभिव्यक्त करतो त्या सर्व कलेचं आपल्याला लै कौतुक. आपली कलाकारी आवडायची. म्हणून ते कौतुक. मिपा संस्थापक म्हणायचे आपलं प्रेम जिल्बीवर आचा-याशी भांडण असले तरी चालतं. आपलं कधी भांडण झालं नाही, हे बरं झालं.
'अरे, घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पीठी. तसं तसं माझं गानं पोटातून येतं व्होटी' कसं येतं यार हे सगळं कलाकारांच्या ओठी त्याचं कायम कौतुक वाटतं. आपल्या दैनंदिन आयुष्यात ही सगळी कलाकार मंडळी रंग भरते, आपले दोन क्षण सुखाचे जातात. कोणी कविता करतं, त्यातल्या ओळी आपल्याला आवडतात. आपण त्याचे चाहते होतो. कोणी शायरी केली की त्या ओळी आपल्याला आवडतात. कोणी सुंदर कथा सांगितली की वाह असे सहजोद्गार बाहेर पडतात. सुंदर मैफिल असली की हात आपोआप दाद द्यायला वर येतात. कोणी महिलेनं अंगणात सुंदर रांगोळी काढलेली दिसली की चाललो आपण मागे मागे सॉरी म्हणजे त्या रांगोळीचं कौतुक वाटतं असं.
तर, हल्ली अशा कलाकारांच्या प्रेमात पडायचं नाही असं मनोमन ठरवले आहे. आपण पडलो असे हे भोळेभाबडे. कलेचे रसिक. आपल्याला लोक हर्ट करतात. अर्थात आपले स्वभावही आता नीट राहिले नाहीत. आपण एखाद्या लेखकाचे चाहते असतो व्यक्तीगत त्याची विचारांची दुनियादारी आपले सुर जुळत नाहीत. आपण कोणाचे तरी फॅन असतो तो काही तरी वेगळा वाटायला लागतो. आपलं वय, आपली आवड-निवड वाढती वयपरत्वे इकडे-तिकडे व्हायला लागली आहे. जमत नै ये आता हे सगळं.
अभ्याशेठ बसू एकदा गप्पा मारायला.
-दिलीप बिरुटे