भारतातील १० वैशिष्ठपुर्ण बाबी

पारस's picture
पारस in काथ्याकूट
16 Aug 2014 - 7:17 pm
गाभा: 

१. "India" हे नाव "Indus" ह्या नदीमुळे पडले आणि सिंंधु व हिंंदु एकञ येउन " हिंंदुस्तान".
२. बुध्दिबळ हा खेळ भारतात उदयास आला.
३. बीजगणित, ञिकोणमिती आणि कलनशास्ञ हे विषय भारतात निर्माण झाले.
४. संख्या मुळ पद्धत आणि दशांश पद्धत भारतात तयार झाल्या.
५. जगातले पहिले ग्रेनाइट मंदिर Brihadeshwara मंदिर, तनजावूर , तामिळनाडु येथे आहे. ८० टनाच्या एका
ग्रेनाइट दगडापासुन त्याचा कळस बांधला आहे.
६. सापशिडी हा खेळ १३ व्या शतकात कवी संत ङ्यानदेव Gyandev यांनी तयार केला आणि त्याचे खरे नाव मोक्षपट
आहे. त्यामध्ये शिडीचा उपयोग केलातर स्वर्गाचे तसेच सापाने गिळल्यावर नर्काचे दार भेटते असा समज असे.
७. जगामधले सर्वात उंची वरचे क्रिकेटचे मैदान चैल, हिमाचल प्रदेश येथे आहे. ते डोंगरची सपाटि करुन १८९३
मध्ये बांधले आहे. ते समुद्रसपाटी पासुन २४४४ मीटर उंच आहे.
८. ७०० व्या शतकात जगातील सर्वात मोठे विद्यापीठ तक्षशीला येथे निर्माण झाले.
तेथे जगातुन १०५०० पेक्शा जास्त विद्यार्थी १६० पेक्शा जास्त विषयांचा अभ्यास करायाचे.
९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली.
१०. १८९६ मध्ये भारत हा जगामध्ये एकमेव देश होता की जिथे हिरे सापडायचे.

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

17 Aug 2014 - 3:45 am | खटपट्या

चांगली माहिती.
शून्याचा शोध भारतात लागला.

>>>९. नौकावाहन आणि नौकापरिवहन हि कला ६००० वर्षांपुर्वी सिंधु नदीच्या खोर्‍यात जन्माला आली

नौकानयन या कौशल्यात मानव आफ्रिका खंडातून बाहेर पडला तेव्हाच अथवा त्याही आधी सुरुवात झाली असावी. संदर्भासाठी श्री इस्पिकचा एक्का यांनी लिहिलेली लेखमालिका वाचावी. (मोबाइल वरून दुवा देता येत नाहीये.)

कवितानागेश's picture

17 Aug 2014 - 1:21 pm | कवितानागेश

इथे गमभन वापरुन ज्ञानदेव हा शब्द dnyaanadev असं कळफलकावर टाईपकरुन लिहिता येतो.

दादा कोंडके's picture

17 Aug 2014 - 2:19 pm | दादा कोंडके

ते पुष्पक विमान तेव्हडं राहिलं की!

सामान्यनागरिक's picture

18 Aug 2014 - 12:23 pm | सामान्यनागरिक

सापशिडी भारतात उदयास आली मग सापशिडीचेआंतर राष्ट्रीय सामने का नाहीत ?
जरा क्रीडाधूरीण या कडे लक्ष्य देतील का?

प्रचेतस's picture

18 Aug 2014 - 2:17 pm | प्रचेतस

७ व्या शतकात का ७०० व्या शतकात?

चिगो's picture

19 Aug 2014 - 8:35 pm | चिगो

आणि ते ७वे शतक ख्रिस्तपुर्व का इसवी सन? तसेच १८९६पर्यंंत हिरे फक्त भारतात सापडायचे हेपण नक्की का? नौकावहनाबद्दल आधीच लिहीलंय.. 'सिंधु'चा उच्चार 'हिंदु' असा करायचे म्हणे मध्यपुर्वेतले लोक म्हणून सिंधुपलीकडे राहणारे ते 'हिंदू' आणि तो प्रदेश 'हिंदूस्थान'.. (आसामात अहोमिया भाषेत 'स'चा उच्चार 'ह' असा होतो..)

माहिती संकलनासाठी धन्यवाद..

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 Aug 2014 - 10:16 am | कैलासवासी सोन्याबापु

हीरे माहिती बरोबर आहे,