स्ट्फ्ड कांदा पूरी आणि जीरा-आलू

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
14 Aug 2014 - 11:17 pm

साहित्य जीरा-आलू:

१२-१५ छोटे बटाटे (बेबी पटेटोज)उकडून, सालं काढून घेणे
१ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून हळद
दीड टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपुड
१ टीस्पून जीरेपूड
मीठ चवीनुसार
१ टेस्पून लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथींबीर

पाकृ:

बटाट्यांना काट्याने टोचे मारून घ्यावे.
पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्‍याची फोडणी करावी.
त्यात उकडलेले बटाटे, मीठ व सुके मसाले घालून परतून घ्यावे.
झाकून एक वाफ काढावी.
त्यात शेवटी लिंबाचा रस व चिरलेली कोथींबीर घालून एकत्र करावे.

साहित्य स्टफ्ड कांदा पूरी:

नेहमीप्रमाणे पुर्‍यांसाठी कणिक भिजवतो तशी भिजवून घ्यावी.
१ छोटा कांदा बारीक चोचवून/ चिरून घ्यावा.
१/२ टीस्पून हळद
दीड टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१ हिरवी मिरची बारीक चिरलेली
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर

पाकृ:

एका भांड्यात कांदा, हिरवी मिरची, कोथींबीर, हळद, लाल तिखट, धणेपूड, मीठ व चिरलेली कोथींबीर एकत्र करावे.
कणकेची छोटी पारी लाटून त्यावर एक चमचा कांद्याचे सारण घालावे.
सर्व बाजूंनी नीट बंद करुन, दाबून हलक्या हाताने जाडसर पूरी लाटावी.
तेल गरम करायला ठेवावे.
तेलात पूरी सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यावी.
चिरलेला कांदा असल्यामुळे पुर्‍या जास्तं फुगत नाही.

गरमचं सर्व्ह कराव्यात.
तुम्ही ह्या पुर्‍या चहा, चटणी, सॉससोबत सर्व्ह करु शकता, मी जीरा-आलूसोबत सर्व्ह केल्या आहेत :)

नोटः

वरील प्रमाणेच कणकेऐवजी मैदा भिजवून त्यात हे सारण भरावे व मंद आचेवर तळावे.
खुसखुशीत कांद्याची कचोरी तयार, पण फार टिकत नाही लगेच संपवाव्या लागतात.
थोड्या हेवी असतात म्हणून नाश्त्याला सर्व्ह करता येतात.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

14 Aug 2014 - 11:22 pm | राघवेंद्र

एकदम मस्त!!!

किसन शिंदे's picture

14 Aug 2014 - 11:48 pm | किसन शिंदे

तुमच्या पाककृतीचा धागा उघडला की सरळ मुख्य फोटोवर जाऊन फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा, बस्स या पलीकडे मी काहीही करत नाही!! :)

शिद's picture

15 Aug 2014 - 2:30 pm | शिद

असेच म्हणतो.

जबरा दिसताहेत पुर्‍या व जिरा-आलू. तोंपासू.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2014 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेहमीप्रमाणेच जीवघेणी पाकृ आणि फोटो !

मुक्त विहारि's picture

15 Aug 2014 - 12:11 am | मुक्त विहारि

झक्कास...

मधुरा देशपांडे's picture

15 Aug 2014 - 12:14 am | मधुरा देशपांडे

इथे आम्ही रोज जेवायला काय करायचं अशा गहन प्रश्नात असतो आणि ही सतत नवीन नवीन पदार्थ टाकते. त्याचे तेवढेच भारी फोटो टाकते. त्रास आहे नुसता.
पाकृ बद्दल बोलायलाच नको. नेहमीप्रमाणेच.

सस्नेह's picture

15 Aug 2014 - 10:40 am | सस्नेह

रोज उठून वेगळे काय करायचे हा ज्वलंत प्रश्न आहे.
सानिकातैला सलाम्स !

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2014 - 2:28 pm | प्रभाकर पेठकर

आपल्याला काय काय करता येतं, शिवाय अशा पाककृतींपैकी आपल्याला आवडलेल्या, साध्या सोप्या पाककृतींची एक यादी बनवायची आणि तारखेनुसार लिहून ठेवायची. लागोपाठच्या दिवशी साधारण एकाच प्रकारच्या भाज्या येणार नाहित एव्हडी काळजी घ्यावी. म्हणजे चारपाच दिवस बटाटा, मिश्र भाजी, पालेभाजी, दह्यातल्या भाज्या अशी मांडणी नाही करायची. दोन सारख्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये एका आठवड्याचे तरी अंतर ठेवायचे. भाज्यांचे ३० ते ४५ प्रकार सहज करता येतात. रोज उद्या काय करायचं हे त्या यादीत आदल्या दिवशी पाहून तयारी करून ठेवायची. रोज नवी भाजी, नवा पदार्थ. घरचेही खुष आणि आपल्यालाही मेंदूला जास्त ताण द्यावा लागत नाही.

:) मी हेच करतो, फक्त तारखेनुसार लिहायची कटकट नको म्हणून एक्सेल वापरून यादी रँडमाईज केली आहे.

मधुरा देशपांडे's picture

15 Aug 2014 - 9:27 pm | मधुरा देशपांडे

मी पण नेहमीच यादी बनवते. आदूबाळ म्हणाले तसेच एक्सेलमध्ये. पण कधी भाज्यांची उपलब्धता (त्यात इकडे मिळणार्या मर्यादित भाज्या), घरात सगळे साहित्य असणे, आणि तेवढा वेळ नसणे अशा किंवा इतर काही कारणांमुळे यात गडबड होते. अर्थात मिपाचा पाक़कृती विभाग सुद्धा असतोच मदतीला. :)

रुपी's picture

15 Aug 2014 - 1:32 am | रुपी

फोटोतूनच उचलून खाविशी वाटत आहे.

नेहेमीप्रमाणेच (सानिकाताई आणि इतर ५-६ बल्लवाचार्यांच्या पाककृतींना करतो तसं) आधी वाचनखूण साठवून टाकली! मग चवी-चवीने पाककृती वाचली, पाककृतीही फर्मासच!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Aug 2014 - 5:10 am | अत्रुप्त आत्मा

मार डाला...... (हल्ला.. ;) ...) मार डाला......

अजया's picture

15 Aug 2014 - 7:55 am | अजया

लै भारी,कांदा पुरी !!

कविता१९७८'s picture

15 Aug 2014 - 8:12 am | कविता१९७८

आत्ताच फस्त करावी असं वाटतय

स्पंदना's picture

15 Aug 2014 - 9:05 am | स्पंदना

कांदापुरी!! नविनच!!
मस्त फोटो. बटाटे काय सुरेख रंगावर तळलेत!

पोटे's picture

15 Aug 2014 - 2:39 pm | पोटे

छान

स्वाती दिनेश's picture

15 Aug 2014 - 2:49 pm | स्वाती दिनेश

एकदम टॉप!
स्वाती

आदूबाळ's picture

15 Aug 2014 - 3:53 pm | आदूबाळ

:-o

काय जबरदस्त पाकृ!

मयुरा गुप्ते's picture

16 Aug 2014 - 1:45 am | मयुरा गुप्ते

सानिकाताई, भारीच दिसतेय डिश. कांद्याची पुरी हा जरा नविनच प्रकार बघतेय.
सुंदर सादरीकरण.

-मयुरा

कांदापुरी व बाळ्बटाट्यांची भाजी असे वेगवेगळे पदार्थ ऐकले होते. इथे ते एकत्र बघून छान वाटले. फोटूत शोभून दिसतायत.

मस्त दिसतेय ही कांदापुरी :-)

मस्तच सानिका... पुरी आणि बटाट्याची भाजी.. fav combination.
फोटोही अप्रतिम. :)

दिपक.कुवेत's picture

16 Aug 2014 - 12:34 pm | दिपक.कुवेत

झकास फोटो आणि फोटो. जीरा आलु एकदम फक्कड!!!

आज काहीही खुस्पट न काढता जीरा आलू आणि नुस्त्या पुरीचा (श्रावणा चं कै नै, सकाळी सकाळी कांदा नको म्हणून) आस्वाद घेतो.

आवडली पाकृ.

सुहास झेले's picture

16 Aug 2014 - 7:22 pm | सुहास झेले

अल्टीमेट .... :)

एस's picture

17 Aug 2014 - 8:59 pm | एस

तो शेवटचा फोटू काढून झाल्यावर तुम्ही या खाद्यपदार्थांचं काय करता बरं? ;-) नै म्हंजे आम्ही फार्फार्फार म्हणजे फार्रच भुकेले आहोत हो. गेल्या दोन वर्षांत काहीसुद्धा (तुमच्या हातचं) खाल्लं नाहीये. आम्हांला द्या हो ह्या कांदापुर्‍या आन् जिरेबटाटा. देणार ना? प्लीज प्लीज प्लीज. ताईमाईअक्का... द्या ना! शेजारधर्म म्हणून द्या! :-P :-))

इशा१२३'s picture

19 Aug 2014 - 1:18 pm | इशा१२३

कांदा पुरी मस्तच..मी केली नाहिये आधि करुन बघेन.आणि जिराआलु काय फोटो आहे.सुरेख...

पैसा's picture

20 Aug 2014 - 3:30 pm | पैसा

मस्तच! पुरी आणि बटाट्याची भाजी हे नेहमीच्या ओळखीचे पदार्थ नवे कपडे घालून मस्त दिसताहेत!

मदनबाण's picture

22 Aug 2014 - 1:19 pm | मदनबाण

वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisis

दिल्लीत पराठे वाल्या गल्लीत हा प्रकार फार फेमस आहे.
तेथे फक्त पुरीला पराठा म्हनतात इतकेच