इतिहास मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन कसे करेल ?

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in काथ्याकूट
3 Aug 2014 - 11:28 am
गाभा: 

I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. - Manmohan Singh

नुकतच मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू लिखीत 'The Accidental Prime Minister' पुस्तक वाचून झाल . बारू हे केवळ सिंग यांचे माध्यम सल्लागार नव्हते तर ते सिंग यांच्या अंतर्गत वर्तुळातले एक महत्वपूर्ण अधिकारी होते . २००४ ते २००९ या काळात सिंग यांच्यासोबत त्यांनी खूप जवळून काम केले आहे . UPA-2 च्या काळात जेंव्हा रोज भ्रष्टाचाराचे नवनवीन सुरस कथा कानावर यायच्या तेंव्हा विरोधकांनी सिंग यांची तुलना आपल्या मुलांच्या दुष्कृत्याकडे डोळेझाक करणाऱ्या धृतराष्ट्राशी करायला सुरुवात केली . यापूर्वी एकदा यशवंत सिन्हा यांनी सिंग याना शिखंडी ची उपमा दिली होती . पण बारू यांनी या आपल्या एके काळच्या बॉस ची तुलना भीष्म या व्यक्तिरेखेशी केली आहे . चुकीच्या पक्षात असलेला एक अत्यंत प्रामाणिक , विद्वान माणूस . भीष्माच्या आयुष्याची जरी शोकांतिका झाली असली तरी ते महानायक होते . मनमोहन सिंग यांच्या बद्दल असे म्हणता येईल का? . स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर ज्या काही थोड्या लोकांनी आपला न पुसणारा ठसा उमटवला आहे त्यात सिंग यांचे नाव नक्की येईल . १९९१ मध्ये देश आर्थिक गर्तेत सापडला असताना नरसिंह राव यांच्यासोबत सिंग यांनी हा आर्थिक शकट सांभाळला . इतकेच नव्हे तर या देशातल्या लाखो तरुणांना जागतिकीकरणाचे फायदे होतील अशी धोरण राबवली . दुर्दैवाने ज्या लोकाना या चे सर्वाधिक फायदे झाले तेच लोक आज त्यांच्यावर प्रच्छन्न टीका करताना दिसतात . दुसऱ्या महायुद्धात अविस्मरणीय विजय मिळवून दिल्यानंतर चर्चिल यांनी लोकांनी सार्वत्रिक निवडणुकीत घरी बसवलं होत . बर्यापैकी सरकार चालवून पण वाजपेयी यांच्यापेक्षा सोनियांना लोकांनी २००४ मध्ये पसंती दिली होति. लोकशाहीत जन मानसाचा अंदाज येणे कठीणच . आणि त्यात पण भारतासारख्या खंडप्राय , बहुविध , बहुभाषिक देशात तर अजूनच अवघड .

मनमोहन यांच्या कारकीर्दीच्या दोन बाजू आहेत अस मला वाटत . अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू . आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक . पण जेंव्हा विरोधक मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन करतात तेंव्हा सरसकट त्यांच्या १० वर्ष पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला मोडीत काढतात . पण हे खरे आहे का ? UPA-१ च्या काळात विकासदर ९ % वर पोहोंचला होता . सरकार साम्यवाद्यांच्या पाठीम्ब्यांवर असताना पण अमेरिकेसोबत अणुकरार करताना सिंग यांनी राजकीय धाडस दाखवून त्याना फाट्यावर मारल .( देशात तो पर्यंत काही भागात का होईना साम्यवाद्यांचे वर्चस्व होते त्याला ओहोटी लागण्याची प्रक्रिया तिथून सुरु झाली असे माझे निरीक्षण . चूभू द्या घ्या . या पतनाची सुरुवात करण्याचेश्रेय सिंग यांना द्यावे का ? )

२००९ मध्ये कॉंग्रेस ने जो विजय मिळवला आणि स्वतःच्या जागा मध्ये भर घातली त्याचे श्रेय बारू पूर्णपणे मनमोहन यांना देतात . यासंबंधी चे एक छान उदाहरण त्यांनी पुस्तकात दिले आहे . 'द हिंदू ' या दैनिकाच्या विद्या सुब्रमन्यम यांनी ग्रामीण तसेच मुस्लिम जनतेला प्रश्न केला होता . तुमच मत कुणाला ? त्यावर त्यांनी एकमुखाने उत्तर दिले होते . ' सरदार को '. ते सर्व जण सिंग याना नेक आदमी संबोधत असतो . सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते . विरोधक कायम सिंग यांच्यावर उत्तम अर्थ तज्ञ पण वाईट राजकारणी म्हणून टीका करायचे . पण नंतर दिग्विजय सिंग म्हणाले तसे सिंग यांच्यातल्या चलाख राजकारण्याकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले . सिंग हे राजकारण करण्यात पारंगत होते हे अमान्य करण्यात काही अर्थ नाही . १० वर्ष पक्षांतर्गत विरोधक , सत्ताबाह्य केंद्र , विरोधक यांना तोंड देऊन सरकार चालवणे काही खायचे काम आहे का ?

बाह्य सत्ताकेंद्र हि भारतीय राजकारणाची खासियत बनत चालली आहे का ? गोविन्दाचार्यानी वाजपेयी यांना 'मुखवटा ' म्हणून संबोधले होते . सिंग यांच्या पंतप्रधान पदाची कारकीर्द सोनिया यांच्या सावली खाली गेली हे नाकारण्यात अर्थ नाही . अनेक धोरण निव्वळ पक्ष संघटनेच्या (पक्षी -सोनिया ) आग्रहामुळे राबवावी लागली . सोनिया वरचा स्वयंसेवी संस्थांचा प्रभाव बहुश्रुत आहे . मंत्री मंडळातले अनेक ज्येष्ठ सदस्य प्रणव मुखर्जी , अर्जुन सिंग हे आपले reporting थेट सोनियांना करायचे . अनेक लोकांच्या मते राहुल गांधी यांनी जेंव्हा राजकारणाच्या गुन्हेगारीचे विधेयक 'nonsense' म्हणून फाडून फेकला होते तेंव्हा तरी आत्म सम्मान दाखवून सिंग यांनी राजीनामा द्याला पाहिजे होता . पण सिंग यांनी त्यावेळेस आपल्या पदाला चिकटून राहणेच पसंद केले

२००९ नंतर आणि नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात मनमोहन सिंग यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर हल्ले झाले . सरकार ची धोरण , भ्रष्टाचार , अकार्यक्षमता यांच्यावर होणारी टीका हि बर्याच अंशी स्वाभाविक असली तरी त्यानिम्मिताने मोठ्या लोकांवर अतिशय घाणेरडी वैयक्तिक टीका करण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात रुजला हि खरी घातक बाब . म्हणजे सिंग हे एका 'बाई ' चे ऐकतात म्हणून त्यांच्यावर टीका करणारे लोक मी पाहिले आहेत . त्यांना सत्ताबाह्य केंद्र हा मुद्दा महत्वाचा वाटत नसून एक पुरुषासारखा पुरुष एका बाई चे कसे मुकाटपणे ऐकतो हा मुद्दा महत्वाचा वाटायचा . सर्वात धक्कादायक म्हणजे काही स्त्रिया पण हा मुद्दा हिरीरीने मांडायच्या . मनमोहन सिंग आणि सोनियांची आक्षेपार्ह morphed photograph सगळ्यांनीच पाहिली आहेत . इतिहासातले स्थान वैगेरे राहूच दे पण या देशाच्या अर्थकारणाला कायमचे वेगळे वळण देणाऱ्या सिंग यांचा सरसकट एकेरी आणि मन्नू वैगेरे उल्लेख करणे कितपत योग्य आहे .

देशातील बहुतांश जनसमुदाय हा फारवेळ कुठल्याच लाटेखाली राहत नाही . कदाचित अजून काही वर्षांनी नकारात्मकते चे ढग विरून सिंग यांचे वास्तविक मूल्यमापन हा देश करेल हि अपेक्षा . इतिहास च माझे खरे मूल्यमापन करेल असे विधान करण्यामागे हाच मनमोहन सिंग यांचा उद्देश असेल कदाचित .

प्रतिक्रिया

मनमोहन सिंग यांचे मूल्यमापन होईल तेव्हा होईल. पण सध्याच्या वातावरणात मिपावर तुमच्या लेखाचं वेगळंच मापन होण्याची शक्यता आहे. कदाचित हा लेख अजून एक-दीड वर्षांनी आला तर थोडे जमिनीवर येऊन लोक प्रतिसाद देतील. आत्ताच्या घडीला चिखलफेकच होईल असे वाटते.

वाचनखूण साठवली आहे. दोनेक वर्षांनी सविस्तर प्रतिसाद देईन. तोपर्यंत भविष्यकाळ डॉ. सिंग यांचे चित्रण कसे रंगवतोय हे पहायला पाहिजे.

सुहास..'s picture

4 Aug 2014 - 1:50 pm | सुहास..

सहमत !!! स्वॅप्सशी !!

( मेल्यावर बघा कसे उमाळे येतील ते )

सामान्यनागरिक's picture

11 Aug 2014 - 4:23 pm | सामान्यनागरिक

मला खात्री आहे की जर मनमोहन सिंग यांनी आपले चरित्लिहीतेले तर आणि त्यात खुल्लम खुल्ल लिहीले तर बरीच धक्कादायक माहिती बाहेर पडेल ! चरित्र न लिहीण्यची करंगळी चिरुन शपथ घेण्यास त्यांणा भाग पाडले गेले असावे.

तिमा's picture

3 Aug 2014 - 12:16 pm | तिमा

लेख विचार करायला लावणारा आहे. सर्वसामान्य नागरिकाला अजूनही, मनमोहन यांच्याविषयी व्यक्तिगत आदर आहे.पण एरवी तोंड न उघडणारे मनमोहन, नटवरसिंगांवर मात्र लगेच भाष्य करतात, याचे आश्चर्य वाटते. खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही. इतक्या बुद्धिमान माणसाला आपण घटनाबाह्य काम करत होतो याची जाण नसावी हे खेदकारक आहे. स्वतः प्रामाणिक असताना त्यांनी सोनियांची दादागिरी का चालवून घेतली आणि आत्मसन्मानासाठी वेळीच राजीनामा का दिला नाही, हेच तर मोठे कोडे आहे आणि त्याचे कारण प्रत्येक सुजाण नागरिकाला जाणून घेण्याची इच्छा आहे.

नितिन थत्ते's picture

3 Aug 2014 - 7:20 pm | नितिन थत्ते

>>खुद संजय बारु व आता नटवरसिंग सांगतात की, पीएमओ मधून फायली सोनियांकडे जात होत्या. हे सर्वस्वी खोटे असेल असे वाटत नाही

सोनिया गांधींना सरकारी फायली वाचून त्यातले काही आकलन होत असे असा गंभीर आरोप इथे केला जात आहे. ;)

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 7:30 pm | प्यारे१

आँ????????

थत्ते चाचा काय हे?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Aug 2014 - 9:36 am | माईसाहेब कुरसूंदीकर

उगवत्या सूर्याला नमस्कार. नटवरांनी साथ सोडली,बारूनी सोडली.आता नितिन.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Aug 2014 - 6:55 am | llपुण्याचे पेशवेll

त्याना कळत नसेल. पण त्यांनी ठेवले होते ना सल्लागार समितीत एनजीओवाले.
कदाचित म्हणूनच मनमोहन मनातून संपूर्ण उतरले. तसेही युपीए-१ कसे आले हेच मोठे कोडे आहे मला.

रमेश आठवले's picture

3 Aug 2014 - 9:21 pm | रमेश आठवले

सोनियाने बहाल केलेले पद स्वीकारताना त्यांना आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कदाचित कल्पना नसावी. पण काही काळा नंतर सोनियाच्या हातातली बाहुली म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यावर ही पदाचा मोह त्याना सुटला नाही हे खरे.

नानासाहेब नेफळे's picture

3 Aug 2014 - 12:56 pm | नानासाहेब नेफळे

मोदी तरी काय करत आहेत, ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली, संघाच्या कार्यालयातून आदेश निघताच नेमणूका व निर्णय होत आहेत. हे कोणती घटनादत्त कामं करत आहेत...
मनमोहन सोनियांना विचारुन काम करत होते, तिथे मोदी मोहन भागवतांच्या क्लिअरन्सची वाट पहात असतात,मोडस ऑपरेंडी तीच आहे.

लाखमोलाचा प्रतिसाद ......!!!!!!

मृत्युन्जय's picture

4 Aug 2014 - 11:07 am | मृत्युन्जय

नगरसेवकपदी निवडुन आलेले लोक बघता संघाच्या लोकांची खरेचे " ती " लायकी आहे असे वाटत नाही. आता त्यांनी एक किंगमेकरची भूमिका वठवली आहे ही गोष्ट वेगळी.

प्रतापराव's picture

7 Aug 2014 - 5:55 pm | प्रतापराव

कसले किंगमेकर नि कसले काय संपूर्ण भारतात मोदींची हवा होती. लोकांनी विकासासाठी मोदींना मत दिले इथे संघ कसा काय किंगमेकर बनला. बर्याच तरुणांना संघ नावाची एखादी संघटना आहे हे हि माहित नाही. हा सारा मोदींचा करिष्मा आहे. संघाचा पाठींबा पूर्वीपासून भाजपला आहे कधी एवढे बहुमत मिळाले होते का ? म्हणतात न यशात अनेक भागीदार असतात नि अपयश एकट्याचेच असते तसला प्रकार आहे.

एक स्पष्टवक्ता..'s picture

4 Aug 2014 - 12:17 pm | एक स्पष्टवक्ता..

मोहन भागवत आणि सोनिया गांधी ह्यांमध्ये खूप फरक आहे … मुळात मानला तर… मानाय्चाच नसेल तर विषयच संपला….
मोहन भागवत कोणत्याही घराण्याच्या आशीर्वादाने आलेले नाहीत… आपण संघाच्या एकंदरीतच स्ट्रक्चरचा अभ्यास करावा….
(आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे…)

नानासाहेब नेफळे's picture

4 Aug 2014 - 12:42 pm | नानासाहेब नेफळे

प्रश्न भागवत वा गांधींच्या कॅलिबरचा नाही, प्रश्न आहे घटनाबाह्य सरकार चालवण्याचा ....
मनमोहन सिंगना आरोपिच्या पिंजर्यात उभे करताना मोदींना सूट द्यायची व कारण सांगायचे कि मोहन भागवत तथाकथित राष्ट्रवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत. हे असे चालणार नाही.

एक स्पष्टवक्ता..'s picture

4 Aug 2014 - 12:50 pm | एक स्पष्टवक्ता..

मुळात जेंव्हा आपण एखाद्याचा जेंव्हा सल्ला घेतो (कि जो समाजाबद्दल जागरूक आहे) आणि ती व्यक्ती जर त्या पात्रतेची असेल तर त्या विचारण्यावर आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं….
माझ्या माहितीनुसार एक्स्पर्ट अ‍ॅडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही….

विटेकर's picture

6 Aug 2014 - 10:55 am | विटेकर

धर्मसत्तेचा(पक्षी सन्यस्त / व्रतस्थ लोक )राजसत्तेवर अन्कुश ही भारतातील परंपराच आहे.
इतिहासात अशी अनेक उदाहरणे दिसतील.
१. अगदी प्राचीन उदाहरण - वेन राजा , हा अन्यायकारी राजा जेव्हा प्रजेला त्रास देऊ लागला तेव्हा साधु-संतानी चक्क त्याला मारले, त्याच्याच शरीरापासून पृथुची निर्मिती झाली. आणि मग पृथुने राज्य केले.
२. अगदी राक्षसांच्या राज्यात देखील शुक्राचार्यांची महती होतीच.
३. श्रीरामाचा राज्यभिषेक झाल्यावर श्रीरामाने उद्घोषणा केली की मी दंड्नीय नाही, तेव्हा वसिष्ठांनी त्याच्या मस्तकावर आपल्या धर्म दंडाने थोपटले आणि सांगितले, तू चक्रवर्ती आहेस पण धर्मदंडाखाली दंडनीय ही आहेस.
४. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त
५. विद्यारण्य स्वामी - हरीहर बुक्क
६.समर्थ रामदास - शिवाजी महाराज
७.अगदी अलिकडच्या काळात - महात्मा गांधी - काँन्ग्रेस
८. जे.पी. - जनता पार्टी
तेव्हा सत्ताबाह्य सत्ताकेन्द्र असणे नवीन नाही . मध्ययुगीन अंधकाराच्या काळात देखील भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी आमची संतमंडळीच लोकान्चे खरे राजे होते.. मुस्लिम आणि ब्रिटिश शासन असले तरीही !
या देशाची संस्कृती आणि परंपराच अशी आहे की सत्ताकारणाने इथले जनमत बदलत नाही ! या देशाच्या समाजकारणाची नाडी धर्माच्या हातात आहे .... आणि धर्माला ग्लानी जरुर येते .. तो नष्ट होत नाही !!
म्हणून तर
युनान मिश्र रोमा सारे मिटे जहां से
कुछ् हम ही है की हस्ती मिटती नही हमारी

तेव्हा जेवढा सल्लागार निस्पृह आणि विरागी , तितके शासन चांगले हा सरळ सरळ नियम आहे.
सत्ता कोणाचे येवो आथवा जावो .. भारतीय मानसिकतेत बदल घडवायचा असेल तर समाजकारण करावे लागते आणि असाच माणूस भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनतो. सत्तापिपासू लोकांना भारतीय त्यांची योग्य जागा दाखवतातच ! फक्त वेळ लागतो..... It's big fat white elephant .. it moves very slowly , you can not make him to run !

नानासाहेब नेफळे's picture

6 Aug 2014 - 11:19 am | नानासाहेब नेफळे

भारत देश प्रजासत्ताक आहे, धर्मसत्ता वगैरेच्या भ्रमातून बाहेर यावे.आपण ऐकविसाव्या शतकात आहोत मध्ययुगात नाही.
एका विशिष्ट धर्माला राष्ट्रीय धर्म घोषीत करुन इतर धर्मीयांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतुन वगळणार्या संघटनेच्या मार्गदर्शनाची गरज भारतातसारख्या प्रजासत्ताक देशाला नाही ,अर्थात अशा संघटनेकडे आश्रीत म्हणुन राहीलेले लोक त्यांचेच सल्ले ऐकणार व लोकशाहीला व्यवस्थेला दरकिनार करणार, यात नवे ते काय!

विटेकर's picture

7 Aug 2014 - 3:59 pm | विटेकर

काय खर बोलता होत तुम्ही .. साला लक्षात च आले नाही आपण एकविसाव्या शतकात आहोत ते !
तुमची मळमळ मात्र अगदी अर्वाचीन काळातील वाटते ..

विवेकपटाईत's picture

16 Aug 2014 - 7:16 pm | विवेकपटाईत

मला वाटते धर्म शब्दाचा अर्थ आपल्याला कळला नाही आहे. धर्म शब्दाचा अर्थ देवतेची पूजा करण्याची पद्धती नव्हे अपितु
आपल्या धर्मात धर्म शब्दाचा अर्थ मानवाने जे धारण केले आहे ते. अर्थात मनसा वाचा कर्मणा व्यवहार ज्याच्या माध्यमातून मनुष्य आपल्या कर्तव्याचे पालन करतो.
मनु ने धर्म के दस लक्षण सांगितले आहे:

धृति: क्षमा दमोऽस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह: ।
धीर्विद्या सत्‍यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‌ ।। (मनुस्‍मृति ६.९२
( धैर्य , क्षमा , संयम , चोरी न करणे , शौच ( स्वच्छता ), इन्द्रियांना वश मध्ये ठेवणे , बुद्धि , विद्या , सत्य और क्रोध न करणे.)
राजाला वरील धर्माचे पालन करणे आवश्यक होते. अन्यथा त्याला पदच्युत करण्याचा अधिकार जनतेला होता.

नानासाहेब नेफळे's picture

8 Aug 2014 - 9:14 am | नानासाहेब नेफळे

एक्सपर्ट अँडव्हाईस घेणे घटनाबाह्य नाही

मोहन भागवत व आरेसेस एक्स्पर्ट आहेत ह्याचा कोणता विदा आपल्याकडे आहे? मोहन भागवत /संघ हिंदु हिंदुत्व वगैरेच्या व्याख्या करतात, इतर कुठल्या क्षेत्रात त्यांचे एक्सपर्टाईज आहेत? भाजपसारखा राजकीय पक्ष असताना अर्थ विज्ञान तंत्रज्ञान सहकार ई ई प्रत्येक क्षेत्रातल्या तज्ञ व्यक्ती व संस्था असताना ,आम्ही आरेसेसकडून एक्सपर्ट एडव्हाईस घेतो असे सांगणे याचे दोन अर्थ निघतात, मोदी सरकार दूधखुळे आहे अथवा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ईमानेइतबारे काम करणारे गुलाम आहेत.

एक स्पष्टवक्ता..'s picture

8 Aug 2014 - 9:27 am | एक स्पष्टवक्ता..

हे बघा आता विरोधाला विरोधंच जर करायचा असेल तर विषयच संपला…. मुळात हा असा साला घेण्यात चुकीचं काय आहे हेच मला नाहीये समजत… जर तो सल्ला चुकीचा निघाला तर शंका काढण्यात अर्थ आहे असं माझं स्पष्ट मत आहे….
आणि उरला विषय एक्सपर्टाईचा …. आत्तापर्यंत ह्या देशातले बहुतांश निर्णय हे एक्सपर्टाईज वर विसंबूनच घेतले गेले ना?? काय झालं त्यांचं …. आणि रा.स्वं.संघाइतकी शिस्तबद्ध संघटना आपल्या देशात तरी नाही. जिथे जिथे आपली सरकारी (प्रशिक्षित) यंत्रणा नाही जाऊ शकत. तिथे जाऊन ते त्यांची मदतच करतात… थोडेसे डोळे किलकिले जरी करून बघितलेत ना तरी वस्तुस्थिती समजेल… पण अडचण काय झालीये माहितीये… साठ वर्षाच्या मूर्ख आणि बिनडोक सरकारमुळे "दुधखुळे" आणि "गुलाम" हे दोनच शब्द आपल्याला (इथे फक्त तुम्हाला असे म्हणायचे नाही कृगैन) इतके अंगवळणी पडलेत… कि पोह्यावर शेव घालावी तसे हे शब्द आपण शिपडत असतो…. असो… कावीळ झालेल्याला काय सांगावं जग पिवळं नाही म्हणून…. \

एक स्पष्टवक्ता..'s picture

8 Aug 2014 - 9:28 am | एक स्पष्टवक्ता..

कृपया "साला" च्या ऐवजी "सल्ला" असं वाचावं

नानासाहेब नेफळे's picture

8 Aug 2014 - 9:51 am | नानासाहेब नेफळे

ठीकाय मग, मनमोहन गांधी घराण्याचा एक्सपर्ट एडव्हाईस घेत होते व मोदी संघाचा घेतात, घटनाबाह्य कुणीच नाही यावर तरी शिक्कामोर्तब करुयात!

मुळात फक्त आणि फक्त गांधी घराण्यामुळे एक्सपर्टाईज मिळतो?? हा एक कळीचा प्रश्न आहे. गांधी ह्या नावाऐवजी जर जोशी, जाधव अशी नावं असती तर कोणी कुत्रं तरी वार्याला उभं राहिलं असतं का? समजत नाहीये कि समजून घ्यायचं नाहीये हेच कळत नाहीये नानासाहेब…

चित्रगुप्त's picture

10 Aug 2014 - 10:40 pm | चित्रगुप्त

.... आत्तापर्यंत कोणतीही गोष्ट घडली (विशेषतः आपत्ती) तर सगळ्यात आधी संघ तिथे पोहोचतो शासन नव्हे…
याचे उदाहरण मी बघितले आहे. मी रहातो, त्या दिल्लीजवळच्या फरिदाबाद स्टेशनावर काही वर्षांपूर्वी मध्यरात्री फार मोठा रेल्वे अपघात झाला. सर्वात आधीतर आसपासच्या झोपडपट्टीतल्या लोकांनी यथेच्छ लूट केली (नंतर पोलिसांना घरा-घरातून सूटकेसा वगैरे सापडल्या) नंतर पहाटेपासून संघाच्या कार्यकर्त्यांनी मदतकार्य सुरू केले. गंमत म्हणजे टीव्ही वरील बातम्यात उघड दिसत असूनही संघाच्या कार्याचा उल्लेखही केला गेला नाही.

खटपट्या's picture

11 Aug 2014 - 12:09 am | खटपट्या

आता माळीन मध्ये देखील संघ कार्यकर्ते दिसतायत पण कोणतेही चैनेल त्यांचा उल्लेख करताना दिसत नाही.

नानासाहेब नेफळे's picture

11 Aug 2014 - 12:24 am | नानासाहेब नेफळे

संघाचे लोक आपत्तीकाळात काम करायला जातात कि जाहीरात? जर कामच करत असतील तर जाहीरात होत नाही म्हणुन का रडगाणे गावे ?
एका राष्ट्रवादी "संघटनेने राश्ट्रकार्याची प्रसिद्धीच झाली नाही हो !" ,अशी आरोळी ठोकण्यात काय अर्थ आहे?

प्रसिद्धी नको पण अनुल्लेख हि नको.
(मी काही संघाचा कार्यकर्ता किंवा प्रचारक नाही. पण रोजच्या बातम्यांमध्ये संघाचे लोक दिसत होते)
जे आहे ते आहे. नाकारून काय उपयोग. बाकी कोणत्या संघटनेचे लोक हे काम करत असतील तर त्यांचाही उल्लेख आला पाहिजे.

विटेकर's picture

11 Aug 2014 - 2:03 pm | विटेकर

लाखातले एक बोल्लात !
या निमित्त तुमचा शनवारवाड्यावर सत्कारच करायला हवा !
हे कसले राष्ट्रवादी ? हे तर जाहीरात वादी !
अशी जाहीरात करतात आणि छुप्या मार्गाने सत्ता हस्तगत करतात... यांचे कशाला करायला हवयं कोड कौतुक ? असतील जात आपत्ती निवारणासाठी , त्याचे काय विशेष !
पण काय आहे ना , भोळ्या भाबड्या जनतेला कळतच नाही हो, कर्तृत्ववान ( आणि तो ही त्यागी घराण्यातील )राजपुत्राला निवडून द्यायचे सोडून एका संघाच्या प्रचारकाला निवडून दिले ?
पण नानासाहेब , तुम्ही एक काम कराच... कसं करुन महाराष्ट्रात तरी चड्डीवाले लोक सत्तेवर येणार नाहीत असं पहा !
भोळ्या भाब्ड्या जनतेसाठी तुम्ही एवढे कराचं !
अहो हे लोक राजधानी मुंबई हून नागपूरला नेतील हो !
वाचवा !

नुकतेच घडलेले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आता माळीण साठी एखादे हजार कोटींचे प्याकेज येऊ द्या. तेथे राष्ट्रवादी आणि आय कान्ग्रेसवाले लगेच पोचतील. मग काय होईल हे सर्वांना माहीत आहेच !

प्रतापराव's picture

7 Aug 2014 - 5:44 pm | प्रतापराव

नानासाहेब नमो हे संघाचे ऐकत असतील असे वाटत नाही.संघाच्या पुढे हो हो करून ते स्वताचेच अजेंडे राबवणार नि संघाच्या तोंडाला पाने पुसणार. ते कर्तुत्ववान नेते आहेत भाजपला जो विजय मिळाला तो मोदींमुळे संघामुळे नाही. हे सार्यांना चांगलेच ठावूक आहे.

नानासाहेब नेफळे's picture

8 Aug 2014 - 8:53 am | नानासाहेब नेफळे

मोदी स्वयंभू नेते नाहीत,ते पक्के संघिष्ट आहेत. संघाच्या आदेशावरुन त्यांची कार्यपद्धती ठरते .मंत्रीमंडळासारख्या महत्वाच्या बाबीत संघाच्या पदाधिकार्यांशी उघड चर्चा कशासाठी चालली होती?
ज्यांना मंत्रीपद हवे होते ते दिल्ली संघमुख्यालयात कशासाठी जात होते? लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली.
मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता.मनमोहन व मोदी रीमोटकंट्रोल्डच आहेत ,त्यामुळे किंगमेकर वगैरे उपमा आरेसेसला देताना सोनिया गांधी घटनाबाह्य सरकार चालवतात असा आरोप करणे हे' आपला तो बाब्या' या प्रकारच्या मानसिकतेचे लक्षण आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2014 - 9:56 am | डॉ सुहास म्हात्रे

नेफळेसायेब, हे दोनही नेते रिमोट कंट्रोलने नियंत्रित आहेत हे (केवळ वादासाठी) मानल्यावरही खालील वस्तूस्थिती नाकारणे जरा कठीणच आहे.

एका बाजूला दहा वर्षे केंद्रसरकारमध्ये सत्ताधारी असणारा आणि प्रशासन व भ्रष्टाचारावर काबू ठेवण्यात असफल झालेला आणि शिवाय निवडणूक निकाली पद्धतिने हारलेला नेता (आता हे केवळ विरोधी नव्हे तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही मान्य केले आहे) आणि दुसर्‍या बाजूला विकासाचे राजकारण करत (हे काँग्रेसच्या केंद्रिय सरकारनेच त्याच्या अनेक खात्यांनी गुजरात सरकारच्या अनेक उपक्रमांना दिलेल्या पारितोषींकांच्या व्दारा मान्य केले आहे) सतत चारदा निकाली बहुमताने निवडून आलेला नेता... यांची खरं तर तुलनाच होऊ शकत नाही.

तरीही, एक सावध नागरीक म्हणून नविन नेत्याला योग्य तो काळ (साधारण वर्षभरतरी) दिल्यावरच नविन नेत्याच्या पात्रते-अपात्रतेबद्दल काही म्हणणे शक्य होईल, हा समतोल विचार होईल.

केवळ आपल्या पक्षाच्या विरोधी पक्षाचा नेता आहे म्हणूण लगेच त्याच्या नावाने शंख करण्यापेक्षा, जो नेता देशाचे (म्हणजे पर्यायाने आपणा सर्व नागरिकांचे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचे) भले पाहतो त्याला संधी आणि पाठिंबा देण्याची सारासारबुद्धी दाखवण्याची जबाबदारी स्वतःला सुजाण आणि विचारवंत समजणार्‍या नागरिकांवर आहे, नाही का ?

अजून महत्वाचे:

केवळ विरोधी पक्षाचे काम आहे म्हणून देशाच्या भल्या कामाला आंधळेपणाने विरोध करण्यापेक्षा आणि आपल्या पक्षाच्या नाकर्तेपणावर पांघरुण घालण्यापेक्षा; स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना "तसे किंवा त्यापेक्षा जास्त चांगले काम का केले नाहीत" हे विचारण्याचा सुजाणपणा आणि धमक जेव्हा लोक दाखवू लागतिल तेव्हाच देशाचे (आणि पर्यायांने लोकांचे) भले व्हायला सुरुवात होईल.

नानासाहेब नेफळे's picture

10 Aug 2014 - 9:46 pm | नानासाहेब नेफळे

बर्याच अंशी सहमत, परंतु फक्त मोदीच विकास करतात असे काही नाही.इतरही अनेकजण चांगली कामं करत असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2014 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

जे कोणी खरोखर चांगले काम करतात त्या सगळ्याचेही कौतूक करायलाच पाहिजे ! एकाचे अपयश झाकण्यासाठी इतरांचे पाय ओढण्याने काय साधणार आहे ? जगात चांगले काम करायचा मक्ता फक्त एकाच पक्षाला / व्यक्तीला आहे हाच विचार बुद्धीमत्तेच्या कमतरतेचे लक्षण नाही काय ? मग चांगले काम करणार्‍याचे पाय ओढण्यापेक्षा त्याला संधी आणि मदत करणेच शहाणपणा नाही काय ?

तसेच खूप संधी मिळून असफल झालेल्या आणि आताच संधी मिळालेल्यांची तुलना करणे शास्त्रिय विचार नसून केवळ राजकीय कांगावा असतो हे वाचकांच्या ध्यानात येणार नाही असे समजणे म्हणजे (अ) "वाचकांना अक्कल नाही असे समजणे" किंवा (आ) "आपल्याला कमी समज आहे हे न उमजणे" या दोन पर्यायांपैकी एकच असते. त्यांतला कोणता पर्याय खरा आहे हे समजणे मात्र प्रत्येकाच्या बुद्धीमत्तेवर अवलंबून आहे.

कांगाव्यांच्या उदाहरणांनी भारताचा गेल्या सहा शतकांचा इतिहास खच्चून भरलेला आहे. तरीही प्रत्यक्षात परिणाकारक काम न करता कांगावाखोरपणा करत तुंबडी भरणार्‍यांना पाठिंबा देण्याने आपण आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे नुकसान करून घेत आहोत हे कळण्याची समज-उमज अजुनही काही भारतियांत नाही असेच खेदाने म्हणावे लागते.

भारतासारख्या विशाल देशाचा विकास कोणी एकच माणूस करणे शक्य नाही. तसा मोदींनी दावा केल्याचे मला तरी आढळले नाही. उलट पायाला स्पर्श करणे वगैरे सारख्या प्रथा बंद व्हाव्या असे म्हणणाराही हाच पहिला नेता भारताने पाहिला. त्याविरुद्ध एकाच कुटुंबातील मोजक्या माणसांकडे भारत गहाण असल्यासारखे वागणार्‍या आणि त्यांच्या घरी झाडूवाल्याचे काम करायला तयार असल्याची माध्यमांत उघडपणे जाहिरात करणार्‍या पाठीराख्यांची मोठी फौज आहे हे अख्ख्या भारताला माहीत आहेच.

आता भारताला गरज आहे ती फक्त बोलबच्चन न राहता, जनतेची दिशाभूल न करता आणि स्वतःच्या / बगबच्च्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता, खरोखरच खरेपणाने काम करणार्‍या नेत्याची... अर्थात अश्या लोकशाही नेत्यालाही त्याच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक स्तरांच्या कार्यकर्त्यांची गरज असतेच. पण लायक नेत्याविना कार्यकर्ते म्हणजे केवळ स्वर्थाकरिता एकत्र आलेल्या बाजाबुणग्यांची फौज बनते... आणि मग ज्या फौजेने रक्षण करायचे तीच लूट्मार करू लागते !

आनंदाची गोष्ट अशी की भारतीय जनात बराच काळ बोटेच काय पण पूर्ण हात पोळल्यावर का होईना वरचे सत्य हळू हळू समजू लागली आहे अशीच लक्षणे आहेत. अर्थात भारताचे भले करण्यात अनेकांचे अयोग्य वैयक्तिक हितसंबंध दुखावले जाणार यात काही शंका नाहीच, तेव्हा असे सगळे लोक कांगावा करणारच नाहीत असा समज करून घेणे वास्तवाला धरून होणार नाही हेही सत्य आहेच !

असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2014 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

कपाटातून ओघळलेली अजून काही हाडे...

UPA pressured me to drop names from CAG reports: Vinod Rai

विटेकर's picture

11 Aug 2014 - 2:11 pm | विटेकर

"लिस्ट तिथे फायनल झाली व मोदीने फक्त सही केली."

इतक्या महत्वाच्या प्रसंगी आपण तिथे उपस्थित होता.. हे वाचून आमचे डोळे पाणावले , आपल्याबद्दलच्या आतीव आदराने आणि स्नेहाने आमचे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आहेत..कधी एकदा तुमचा सत्कार करतो असे झाले आहे ..
नानासाहेबांच्या सत्कारासाठी ताबडतोब समिती स्थापन करावी अशी मी मिपा व्यवस्थापनाला विनंती करतो..
नानासाहेब ...
.
.
.
..
.
नानासाहेब ,
तोपर्यन्त आमच्यासाठी आपल्या चरणांचे zerox इथे डकवावे .. अशी मी तुम्हांला नम्र विनंती करतो...

( भावविभोर ) विटेकर

ज्यांची नगरसेवकपदी निवडून यायची लायकी नाही त्या संघाच्या पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन करुन मंत्रीमंडळाची निवड केली,

कॉण्ट्रॅडिक्ट्स विथ

मोदींचा करिष्मा असेल, परंतु तो उभा करण्यात संघ महत्वाच्या भूमिकेत होता.

हेन्स प्रूव्हड!!

नानासाहेब नेफळे's picture

18 Aug 2014 - 7:35 pm | नानासाहेब नेफळे

या न्यायाने गोबेल्सही जर्मनीचा लोकशाही मार्गाने निवडून आलेला नेता होता असे तुम्ही म्हणाल.....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Aug 2014 - 2:39 pm | निनाद मुक्काम प...

मोदी ह्यांनी अनधिकृत बांधकामे गुजरात मध्ये तोडली त्यात काही मंदिरे सुद्धा होती ह्यामुळे संघाच्या इतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर भरपूर शिव्याशाप दिले तेथे मोदिनी दुर्लक्ष केले.
संघ कधीही भांडवल शाहीचा पुरस्कर्ता नव्हता.
मोदिनी मात्र भांडवल शाहीतर्फे समाजात सुब्बता आणून सत्ता जिंकण्याचा मूलमंत्र संघाला दाखवून दिला .
हा मूलमंत्र आधीच्या भाजप नेत्यांना म्हणजे अडवाणी , वाजपेयी महाजन ह्यांना कळला असता तर मंदिर मुद्दा न उकरत केवळ पल्लेदार भाषणे देत त्यांनी सत्ता मिळवण्याचे मनसुबे रचले नसते
गुजराती जनतेने तीनवेळा मोदींना सत्ता संघामुळे नाही तर त्याच्या कार्यामुळे दिली हेच मध्य प्रदेश व गोव्याच्या बाबतीत म्हणता येईल.
संघाचे मार्गदर्शन नेहमीच भाजपला होते
पण मोदींना संघाचा नाही तर अदानी व अंबानी चा दलाल असण्याचा आरोप होणे ह्याचा अर्थ नेफळे साहेबांना कळला

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्थमंत्री आणि UPA-१ चे पंतप्रधान म्हणून एक दैदिप्यमान बाजू.

हे श्रेय अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग याना जितके आहे त्यापेक्षा जास्त त्यावेळचे पंतप्रधान राव यांना आहे. ज्या "दैदिप्यमान" किंवा "धाडसी" सुधारणांचे निर्णय त्या काळात घेतले आणि राबवले गेले ते (एक्झेक्युटीव्ह सत्ताकेंद्राच्या) पंतप्रधानाच्या निर्णयाशिवाय आणि सक्रिय पाठिंब्याशिवाय शक्य नव्हते.

आणि भ्रष्टाचार , अकार्यक्षमताचे आरोप आणि कळसूत्री बाहूल म्हणून हेटाळणी पदरात पडलेली UPA-2 कारकीर्द . एकदम २ टोक .
जेव्हा तेच किंवा तसेच निर्णय घेण्याची जबाबदारी पंतप्रधान म्हणून अंगावर पडली तेव्हा मनमोहन निर्णय पक्षाघाताची (डिसिजन पॅरॅलिसिस) ची शिकार झाले. एवढेच नव्हे तर "मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणे आणि त्याच्याकडून भ्रष्टाचार न होण्याची काळजी घेत लोकोपयोगी कामे करून घेणे" हे पंतप्रधानांचे मुख्य कर्तव्य करण्यात ते असमर्थ ठरले. म्हणजे "शासक म्हणून असलेल्या कार्यक्षमतेचा / पात्रतेचा अभाव" ही अपकिर्ती त्यांना स्विकाराविच लागेल.

त्यांच्या कार्यकालात पंतप्रधानावर नियंत्रण ठेवणारे अशासकिय सत्ताकेंद्र होते हे मान्य करूनही; मनमोहन यांच्या सारख्या विव्दानाला त्याचा अर्थ आणि त्यामुळे त्यांच्यावर येणारी अधिक जबाबदारी कळली नसावी हे म्हणणे त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान होईल. हे सत्य जमेस धरूनही मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार याबातीतची शासकिय व नैतीक जबाबदारी पंतप्रधान म्हणून त्यांच्यावर होती हे त्यांना माहित असणारच. पण त्यांनी अश्याबाबतीत शासकिय तर सोडाच पण नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी कोणतेही ठाम पाऊल उचलल्याचे दिसले नाही... केवळ शक्य तेवढे मौन पाळणे पसंत केले. अश्या कृतींमुळे त्यांच्या अग्रक्रमसूचीत इतर काही गोष्टी देशाच्या हितसंबंद्धांच्या वरच्या जागी होत्या हेच सूचीत होते.

उत्तम शासकाच्या गुणधर्मसूचीत शैक्षणिक आणि बौधिक पात्रता महत्वाची असते, पण प्रशासकीय आणि नैतिक पात्रता त्यापेक्षा खूप वरच्या जागी असणे आवश्यक असते. मनमोहन यांच्या कारकिर्दीत त्यांच्या अग्रक्रमसूचीत या विकल्पांची जागा उलटी झालेली दिसते.

त्यामुळे कारणांच्या बाबतीत मतभेद असले तरी इतिहासात, "एक विद्वान (अ‍ॅकॅडेनिशियन) असलेला चांगला नोकरशहा (ब्युरोक्रॅट) पण शासन करण्यात असफल व सत्तेतून केव्हा पायउतार व्हावे हे ठरवण्यात असमर्थ ठरलेला शासक" अशीच त्यांची नोंद होईल.

पिंपातला उंदीर's picture

3 Aug 2014 - 3:09 pm | पिंपातला उंदीर

@इस्पिकचा इक्का उत्तम विश्लेषण . पण याच निकषावर UPA-1 च यश आणि २००९ मधील मनमोहन सिंग यांनी कॉंग्रेस ला सार्वत्रिक निवडणुकीत मिळवून दिलेलं यश याची पण कारण मीमांसा तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल

मृत्युन्जय's picture

4 Aug 2014 - 11:58 am | मृत्युन्जय

मला वाटते युपीए १ च्या कार्याबद्दल एकुणच लोकांना फार कमी माहिती आहे. कारण ठळक यश असे कदाचित त्यांच्या वाट्ञाला आले नाही. २जी स्कॅम मात्र गळ्यात पडला. व्यक्तिशः मला वाटते २जी स्कॅम जेवढा मोठा बनवला गेला तेवढा मोठा तो नव्हताच. त्याचे खरे स्वरुप लोकांसमोर आणि न्यायिक अधिकार्‍यांसमोर आणण्यात युपीए २ ला अपयश आले आणि त्यानंतरच्या एकुणच गोंधळात संपुर्ण उद्योगजगतातली विश्वासार्हता त्यांनी गमावली. मिळकत करात रिट्रोस्पेक्टिव्ह बदल केले गेले जे सर्वमान्य पद्धतीच्या विरुद्ध आहे. त्यामुळे विश्वासार्हता अजुन गंडली. ही २ मुख्य अपयशे युपीए १ ची आहेत. शिवाय युपीए १ बरेच कसरती करण्यातच गेले. जे काम केले ते कदाचित लोकांपर्यंत पोचलीच नाहित. त्यामुळे त्यांनी काही चांगली कामे केलीच असतील तर ती झाकोळली गेली. त्यामुळे युपीए १ च्या चांगल्या कामगिरीवर कोणी प्रकाश टाकला तर बरे होइल.

युपीए २ ने अर्थातच निलाजरेपणाची आणि कुशासनाची कमाल गाठली होती. त्यामुळे इतिहास ममोंना कसे लक्षात ठेवील याबाबत फारश्या शंका नाहित.

माझ्या अल्प माहितीनुसार युपीए १ चे यश
१. जी डी पी > ८%
२. कृषी उत्पनात लक्षणीय वाढ झाली होती
३. फिस्कल डेफिसिट खूप कमी झाले होते. बहुधा ४ % पेक्षा कमी.
४. औद्यागिक आणि भांडवल वृद्धी दुप्पट झाली होती
५. रुपया वधारला होता.

बाकी मनरेगा,कर्ज माफिसारख्या सारख्या योजना होत्या ज्या काहींच्या मते अतिशय चांगल्या तर काहींच्या मते अतिशय वाईट होत्या.

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Aug 2014 - 1:01 pm | पुण्याचे वटवाघूळ

हे युपीए-१ चे यश की युपीए-१ च्या काळात दिसलेले रिझल्ट्स? जर युपीए-१ इतके चांगले आणि सक्षम होते तर युपीए-२ च्या काळात इतकी अनागोंदी का माजली? तुम्ही जे म्हणत आहात ते यश वाजपेयी-३ सरकारच्या चांगल्या धोरणांचे रिझल्ट युपीए-१ च्या काळात लागले होते आणि त्याचे श्रेय फुकट युपीएने लाटले होते.युपीएपेक्षा एन.डी.ए ने सरकार आणि अर्थव्यवस्था नक्कीच चांगली सांभाळली होती.

इतकी अनागोंदी का माजली?

हाच प्रश्न मलाही पडलाय. पण युपीए ने जवळपास ६-७ वर्षे प्रगती (तेही २००८ नंतरच्या जागतिक मंदीत) केली याचे सर्व श्रेय वाजपेयी सरकारला देणे मला पटत नाही. फार तर पहिल्या दोन वर्षांचे देता येईल.

बाकी २जी स्कॅम आणि मिळकत कराबद्दल ११०% सहमत.

बाकी २जी स्कॅम आणि मिळकत कराबद्दल ११०% सहमत.

सत्तेवर असलेले पंतप्रधान आपली पाच वर्षाची मुदत पूर्ण करतात आणि नंतर बहुमताने निवडून येतात असे १९६२ नंतर पहिल्यांदाच घडले होते .

हे नाही समजलं. २००९ मध्ये कॉग्रेसला बहुमत होतं???

पिंपातला उंदीर's picture

3 Aug 2014 - 3:12 pm | पिंपातला उंदीर

@अनुप ढेरे थोडी mistake झाली . कॉंग्रेस ने २०० चा पल्ला ओलांडला आणि UPA ला एकूण बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडल्या . पण कोणावर अवलंबून राहण्याची गरज कमी राहिली .

छान लेख.मी स्वतः गोंधळात आहे कि युपीए १ आणि २ मध्ये एवढा फरक का पडला? एवढी अकार्यक्षमता अचानक कुठून आली? घोटाळ्यांच्या आरोपामुळे कि जागतिक मंदीमुळे ? सोनियाच्या हस्तक्षेपामुळे म्हणावे तर तो युपीए १ मध्येही असेलच कि. खर तर २००९ च्या विजयानंतर सिंग अधिक धडाडीने काम करतील अशी अपेक्षा होती. मला तरी काहीच कळले नाही. अर्थात जागतिक मंदीची धग भारताला फारशी लागून न देण्याचे श्रेय युपीए २ ला द्यावेच लागेल.

चौकटराजा's picture

3 Aug 2014 - 4:43 pm | चौकटराजा

भारतात व्यापार व उत्पादन जग खुले केले गेले याचे प्रमुख कारण आमच्या उद्यीगपतींचा वा शास्त्रज्ञांची नालायकी. १९४७ ते १९९१ या सालात आपण साधी लहान बल्बची विजेची स्वस्त माळ निर्माण करायला शिकलो नाही. एन सी एल काढून किती नोबेल मिळाली या काळात ? सबब लोकसंख्येशी स्पर्धा करेल असा उत्पादनाचा दर्जा व पुरवठा दोन्ही ही नव्हते. रिक्षा घ्यायची तर दहा वर्षे वाट पहावी लागायची ही एक महत्वाच्या सर्वजनिक सेवेची अवस्था होती. मुलभूत सशीधनाच्या नावाने एक क्राय्जेनिक इन्जिनाचे सन्मान्य उदा सोडले तर बोंब आहे. आजही भारीभारी सर्जिकल उपकरणे
भारतात तयार होत नाहीत. मॉलमधील बर्याचशा वस्तू दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक नाहीत. ( उदा स्प्रे ) आरोग्य शिक्षण सार्वजनिक वहातुक ई ला पराकोटीचे महत्व येणे गरजेचे आहे पण ही थेट उत्पादक क्षेत्रे नसल्याने त्यावर जीडीपी मधील नगण्य पैसा खर्च होतो.आपले खुल्या व्यापाराचे धोरण स्वीकरणे . खाजगी क्षेत्राला संधी देऊन सरकारी बाबूना खाबूगिरीपासून लांब ठेवून सरकारी उद्योगाचे खाजगीकरण करून जनतेला भांडवल दारांच्या ताब्यात देणे या खेरीज बर्याच देशातील सरकाराना गत्यंतर नव्हते.त्यात नरसिंहरावानी ते केले त्यात वेगळे काही नाही. त्यानी समाजवादाचा
अत्यंविधी केला. त्याचे काही चांगले परिणाम समाजाला दिसत आहेत. श्रीमंत लोकांसाठी थेट द्रुतगति मार्ग झाला तर त्यावरून गरीब माणूस कोल्हापूरवरून परळ ला जाउन शकतो. ही समाजवादी मुव्हच ठरली आहे. म्हणून कदाचित माझी ऐतिहासिक प्रधानमंत्री म्हणून नोंद होईल असे मनमोहन जी म्हणत आहेत. नरेम्द्र मोदी अजून रवीशास्त्री सारखे खेळत आहेत. भारतातील भ्रष्टाचार व जीवनावश्यक वस्तूंची महागाई या बाबत एकही क्रांतिकारी विचार त्यांचेकडे नसावा. सबब ते ही मौनी बाबा झाले आहेत. अजूनही भारतीय माणसाचे सार्वजनिक कॅरॅक्टर एतके खराब दर्जाचे आहे की त्याना त्याच्या लायकीचेच सरकार मिळत आहे मिळणार आहे. जे चांगले वाईट घडत आहे त्याचे श्रेय जनतेला तसेच सर्वसाक्षी काळाला ही आहे.

आवाज नसलेले कळसुत्र बाहुले !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

चित्रगुप्त's picture

3 Aug 2014 - 5:05 pm | चित्रगुप्त

कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते.

शशिकांत ओक's picture

3 Aug 2014 - 7:56 pm | शशिकांत ओक

ऐतिहासिक वाक्य *yes3*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Aug 2014 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी खरी गोष्ट.

History is written by the victor -Churchil-

आणि विजेता हा सत्यवादी किंवा बरोबर असेलचं असं नाही. उदाहरण भारताचा इतिहास.

कोणताही 'इतिहास' म्हटला, तर तो कोणी लिहिलेला, हे आधी बघावे लागते.
"इतिहास लिहण्या आधी तो घडवावा लागतो... जे आपले आत्ताचे प्रंतप्रधान करत आहेत. तसेच कॉमन वेल्थ गेम्स मधे आपल्या देशातील खेळाडुंनी घडवला आहे. :)
नरेंद मोदींचे नेपाळ मधील आजचे भाषण :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

एसमाळी's picture

3 Aug 2014 - 6:04 pm | एसमाळी

मी 2004 ते 2009 या upa 1 च्या काळातील भरभराटीचे श्रेय Nda 1 ला देईन.कारण धोरणाचा परिणाम दिसायला काही वर्षाचा काळ जावा लागतो.upa 2च्या काळातील अधोगती upa1 मध्येच चालु झालती.फरक एवढाच की upa 2 मध्ये सगळ उघड झाल.

कानडाऊ योगेशु's picture

3 Aug 2014 - 8:13 pm | कानडाऊ योगेशु

माननीय मनमोहन सिंग एक उत्कृष्ठ नोकर (एक्प्लॉई वा टीम मेंबर ह्या अर्थाने) नक्कीच होते,परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण (एम्प्लॉयर अथवा टीम लीडर बनण्याची क्षमता) खरोखर होते का? हा कळीचा मुद्दा आहे. तुलना करायचीच झाल्यास त्यांची तुलना मी सचिन तेंडुलकरशी करेन. सचिन एक उत्कृष्ठ खेळाडु होता पण कधीही एक उत्कृष्ठ कप्तान नाही बनु शकला. ही बाब विचारात घेता पुस्तकाचे An Accidental Prime Minister हे शीर्षकच बरेच काही सांगुन जाते.

हुप्प्या's picture

3 Aug 2014 - 8:47 pm | हुप्प्या

आजवरच्या इतिहासात सर्वश्रेष्ट, सर्वात कणखर, भारताला सुवर्णयुगात नेऊन पोचवणारा, ही भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम करुन दाखवणारा, असामान्य वक्ता, कुठलेही भाषण घ्या, ऐकत रहावेसे वाटेल, धीरोदात्त, जनतेशी वरचेवर संवाद साधण्याची हातोटी, अप्रिय असले तर हिताचे निर्णय त्वरित घेण्यात कुठलीही हयगय न करणारा, रिमोटवर चालणारा कळसूत्री बाहुला आहे असा संशयही येऊ नये असा पारदर्शक कारभार, कमालीचा स्वच्छ, कुठल्या सहकार्‍याचे पाऊल वाकडे पडते आहे असा संशय आला तरी तात्काळ त्याची उचलबांगडी करणारा रामशास्त्री बाण्याचा नि:स्पृह.
असा महाप्रतापी नेता भारताला लाभला हे भारताचे अहोभाग्यच. असा धुरंधर काँग्रेस पक्षात निर्माण व्हावा हे त्या पक्षाचे पूर्वजन्मीचे पुण्य असावे.

ह्या महामानवाला माझे कोटीकोटी दंडवत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

निवडणुकीपूर्वीच्या मिपावर्च्या एका लेखमालेची आठ्व्ण झाली आणि एकाएकी ड्वाले पानाव्ले ;) :)

ते मफलरलाल खोकचंद कुठे असतात हल्ली?

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Aug 2014 - 9:23 pm | पुण्याचे वटवाघूळ

नक्की कोणती लेखमाला? गुजरात विकासाचे मृगजळ की सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे की मिपावरील सगळ्यात अजरामर लेखमाला---रूणझुणु रूणझुणु रे भ्रमरा (बेशर्त स्विकृती आठवते का?) :)

आनन्दा's picture

4 Aug 2014 - 12:03 pm | आनन्दा

बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. :)

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Aug 2014 - 11:15 pm | पुण्याचे वटवाघूळ

बाकी यावर्षी आता ३१ जुलै झालेला असल्यामुळे आता ते येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बाकी १६मे च्या धक्क्याची बेशर्त स्वीकृती केलेली असेल तर.. Smile

हहपुवा

पुण्याचे वटवाघूळ's picture

4 Aug 2014 - 10:21 am | पुण्याचे वटवाघूळ

बाकी त्या न्युक्लिअर डिलची काहिही वासलात का लागेना त्या निमिताने त्यांनी बंगालमधील (आणि केरळमधील) स्वतःला ढुढ्ढाचार्य समजणार्‍या लाल तोंडाच्या मस्तवाल माकडांना त्यांची जागा दाखवून दिली हे मनमोहनसिंगांचे श्रेय नक्कीच आहे.

विनोद१८'s picture

4 Aug 2014 - 11:21 pm | विनोद१८

मला वाटते म.मोंना आपल्या एकुण कर्तबगारीचा व पदाचा परिणामकारक असा प्रभाव पाडता आला नाही चांगली १० वर्षे संधी मिळुनसुद्धा, ते नेहमीच कुणाचेतरी ओशाळ्यासारखे असे वागताना दिसले, मक्खपणे वावरले. त्यांनी काही राजकारण केले व आपल्याच पक्षाला आपल्या प्रभावाखाली घेउन त्याचे व देशाचे समर्थपणे नेत्रुत्व पंतप्रधान म्हणुन केले असे भासले नाही, त्यांचा खंबीर असा आधार कधीच कुणाला वाटला नाही, नेहमीच आश्रितासारखे वाटायचे, वागण्यात मोकळेपणा नव्हता. किंबहुना मी या खंड्प्राय देशाचा सामर्थ्यसंपन्न पंतप्रधान आहे हे ते विसरले होते किंवा असे म्हणता येइल ते या देशाचे सर्वशक्तिमान नायक आहेत असे सर्वसामान्यजनांच्या मनावर बिंबवण्यात अयशस्वी ठरले, अगदी बरीच चांगली कामे करुनसुद्धा.

अर्धवटराव's picture

5 Aug 2014 - 12:53 am | अर्धवटराव

इतीहास ममोंचं योग्य परिक्षण करु शकेल असं वाटत नाहि. कर्तबगारीशुण्य राजपुत्र आणि असमाधानी राणि यांची मर्जी सांभाळत एका हुषार आणि सज्जन प्रधानाचं जे व्हायचं तेच झालं. अशी परिस्थिती निकट भविष्यात यायचे चान्सेस कमि आहेत. त्यामुळे ममोंवर सर्वात अधिकृत कमेण्ट्स त्यांच्या सहकार्‍यांचीच असतील, व सध्यातरी ति वाईट आहेत.

बहुगुणी's picture

5 Aug 2014 - 2:48 am | बहुगुणी

द इकॉनॉमिस्ट या अमेरिकन नियतकालिकातील भारताविषयीचे जवळजवळ सर्वच लेख (आणि भारतीय नावाच्याच लेखकांनी/ लेखिकांनी लिहिलेले!) भारतद्वेष्टे (India-bashing) या प्रकारात मोडत असल्याचं माझं मत आहे, पण त्यांचा ३ मे २०१४ चा अंक याबाबतीत किंचित अपवाद वाटला. त्यातला Man out of time या लेखात काही मुद्दे चांगले मांडले आहेत. एक माणूस म्हणून नि:स्वार्थी असलेल्या मनमोहन सिंग यांचं एकीकडे राज्यकर्ता म्हणून काय चुकलं, किंवा दुसरीकडे त्यांनी घेतलेले कोणते निर्णय दूरदृष्टीचे / देशाच्या दृष्टीने भले होते, याचं विश्लेषण वाचनीय आहे.

निवडणू़क निकाल जाहीर व्हायच्या आधी आठवडाभर आलेल्या या लेखात ही telling वाक्ये होती: "Mr Singh keeps a characteristic silence, but is an inevitable target for the BJP. The most spiteful critics, though, come from his own party. Congress expects a heavy defeat when national election results are broadcast on May 16th. It needs a scapegoat."

अर्थात, सर्वच मुद्दे मला पटले नाहीत, पण शेवटी 'द इकॉनॉमिस्ट मधलं लिखाण आहे' म्हणून सोडून दिलं, discount :-)

याच लेखावर आलेल्या प्रतिक्रियादेखील वाचनीय आहेत.

स्पार्टाकस's picture

6 Aug 2014 - 10:00 am | स्पार्टाकस

मनमोहन सिंग यांची काही खास वक्तव्ये :-

"देशातील साधनसंपत्तीवर सर्वप्रथम अधिकार अल्पसंख्यांकांचा आहे.

नानावाटी आयोगाने १९८४ च्या दंगलीत जगदीश टायटलर दोषी आहेत हे जाहीर केल्यावर
"जगदीश टायटलर निर्दोष आहे. मी त्यांना मंत्रीमंडळातून मुळीच काढणार नाही."

"कॉमनवेल्थ खेळांमध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही."

"ए. राजा निर्दोष आहे."

"अण्णा हजारेंनी निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे आणि मग जनलोकपाल आणावा!"
स्वतः मनमोहन सिंग राज्यसभेचे सभासद आहेत.

"राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी सर्वाथाने योग्य आहेत!"

"शिबू सोरेन, लालू यादव यांना मंत्रीमंडळातून काढणार नाही!"

"चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही!"

"महगाईसाठी शरद पवार जबाबदार आहेत!"

विरोधाभासाचा सर्वोत्कॄष्ठ नमुना!
"मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे मला भ्रष्टाचाराविरुध्द काही करता येत नाही!"
"मी दुर्बल नाही, कणखर आहे!"
"मी कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही!"

दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक. सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी केल्यावर,
"या प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण दोषी आहेत! मी नाही!"

"नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे देशास घातक!" हे राजकीय विरोध म्हणून सोडून देता येईल.

मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते. परंतु त्यांनी राबवलेल्या निर्णयांचं श्रेय नरसिंहराव यांचं काहीच नाही का? नरसिंहराव यांच्या काळात गांधी घराण्याची लुडबूड राजकारणात नव्हती त्यामुळे आर्थीक उदारीकरणाचे निर्णय राबवताना अन्न सुरक्षा योजनेसारख्या आतबट्ट्याच्या व्यवहाराला केवळ आले सोनियाच्या मना म्हणून राबवावे लागले नव्हते.

परंतु, पंतप्रधान म्हणून त्यांनी फक्त 'येस बॉस!' इतकेच आपले इतिकर्तव्य मानले.

प्रसाद१९७१'s picture

7 Aug 2014 - 6:10 pm | प्रसाद१९७१

मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे.
१९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे.

ममोंनी बरीच पदे भुषवली पण कुठल्याच पदावर लक्षणीय काम केले नाही.

एकेकाळी ममो सरकारीकरणाच्या बाजुला होते कारण इंदीरा गांधी पंतप्रधान होत्या. नंतर उदारीकरणाच्या बाजुने झाले कारण राव साहेब आले. त्यांना स्वताचे काही मत नाही आणि सत्व पण नाही. वरुन हुकुम आला की कागद्पत्र फक्त तयार करायची.

प्रतापराव's picture

7 Aug 2014 - 6:46 pm | प्रतापराव

मनमोहन अर्थतज्ञ म्हणून निश्चीतच अनुभवी आणि कर्तबगार होते >>>>>>>>>> हे मिथ आहे.
१९९१ च्या सुध्हरणांचे श्रेय राव साहेबांचे आहे. >>>>> नाही हो इतकही कमी लेखू नका त्यांना रावांशी त्यांची तुलना करू नका. माझ्या समजुतीप्रमाणे रावांवर हर्षद मेहताकडून एक कोटी रुपये घेतल्याचा आरोप होता त्या काळात ती बरीच मोठी रक्कम होती. ममो ह्यांच्यावर असले आरोप कधी झाले नाहीत.

काही अपवाद वगळता, वरच्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मनमोहन सिंग यांचे फक्त युपीए १ आणि २ या काळातले मुल्यांकन केले आहे.
वरच्या प्रतिक्रिया वाचुन 'इतिहास मनमोहन सिंग यांचे (पंतप्रधान म्हणुन) मूल्यमापन कसे करेल ?' असे धाग्याचे शीर्षक आहे का अशी शंका आली.

पंतप्रधान म्हणुन त्यांना कितीही नावे ठेवली तरी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (१९८२ - ८५) पासुन, भारताच्या योजना आयोगाचे ऊपाध्यक्ष (१९८५ - ८७), भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार (१९९० - ९१) आणि नरसिंहराव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री ही त्यांची कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे.

पुतळाचैतन्याचा's picture

10 Aug 2014 - 10:06 pm | पुतळाचैतन्याचा

इतर अनेक लोक उपलब्ध असताना ..इतिहास या माणसाचे अनालिसिस करन्यत वेल घालवेल असे वाटत नाहि.

पिंपातला उंदीर's picture

11 Aug 2014 - 2:18 pm | पिंपातला उंदीर

धाग्यावर Score Settling होत आहे का ?

मनमोहन २००९ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मत घेऊन का निवडून आले याचे तटस्थ विश्लेषण करण्यात कुणालाच रस नाही का ? कारण इथे अनेक लोक जस म्हणत आहे तसे मनमोहन अकार्यक्षम , कळसूत्री बाहुले असते तर लोकांनी त्यांना सलग दुसरी टर्म दिलीच नसती . अटलजींना (सलग २ पूर्ण काळ टर्म ) पण हि संधी लोकांनी दिल्या नाहीत मात्र भारतीय जनतेनी हा विश्वास मनमोहन यांच्यावर दाखवला . कुछ तो बात होगी .

मी स्वतहा मोदी यांचा 'भक्त ' नाही . पण त्यांचे मूल्यमापन अजून ५ वर्षांनी केल्या जावे असे माझे मत आहे . चांगल्याला चांगले म्हण्याला काय हरकत आहे . नाहीतर आंधळेपण पोटी मोदी भक्तांनी जेखालच्या पातळीचे bashing केल ते आणि मोदी यांच जे हनन चालू आहे ते याच्यात फारसा गुणात्मक फरक नाही असे मला वाटते .

बाकी हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे . यापूर्वी त्यांनी इंडिया shining चा भोपळा फोडला होता मोदी अपयशी ठरले त्यांना पण जनता बाहेरचा रस्ता दाखवेलच .

चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते

हा खंडप्राय देश खूप सुज्ञ आहे ह्याच्याशी सहमत. गेल्या काही निवडणुकांचे निकाल हा विश्वास बळकट करणारे आहेत. बाकी युपीए १ चे यश मी वर नमूद केले आहे. त्याचे श्रेय मनमोहन सिंघना देण्याचे नाकारणे अयोग्य आहे.

चौकटराजा's picture

11 Aug 2014 - 4:40 pm | चौकटराजा

चर्चा आता मनमोहन यांच्या उपलब्धी आणि अपयश यांच्याकडे वळावी असे वाटते ] आपले हे वाक्य मोलाचे आहे.
या धाग्यात मी वर दिलेला प्रतिसाद काय सांगतो ? त्यातूनही मला वाटते की यातील यश काळाचे व अपयश हे मनमोहन यांचे आहे. कारण ते काय किंवा जाणता राजा(?) शरद पवार यांचे आरोग्य, शिक्षण, न्यायदान व निवडणूक प्रक्रिया या बाबीवर अजिबात लक्ष नाही. हे अनेक कॉंग्रेसी व भाजपा नेत्यांचे असेच आहे. भाजपा चा कारभार दगडापेक्षा वीट मऊ इतपतच ठीक चालेल. व हे कट्ट्रर भाजप वाल्यानाही ठाउक आहे. कारण सलमान गजाआड जाउ नये अशीच न्यायव्यवस्था हवी असाच दोघांचा अप्रोच आहे.

विवेकपटाईत's picture

16 Aug 2014 - 6:59 pm | विवेकपटाईत

देशाच्या विकासासाठी लागणाऱ्या तीन मूलभूत बाबी , सडक, रेल्वे, कृषी साठी लागणारी सिचाई सुविधा या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाजपायी सरकार ने ५ वर्षात जितके कार्य केले त्याचा १/४ कार्य ही गेल्या १० वर्षात झाले नाही. वाजपायी सरकार जर पुन्हा जिंकले असते तर चतुर्भुज योजना केंव्हाच पूर्ण झाली असती.dfc चे कार्य ही पूर्ण झाले असते. काही नदी जोड प्रकल्प ही पूर्ण झाले असते. रोजगार आणि देशाचा आर्थिक विकास कित्येक पट वाढला असता. मनमोहन सरकारने सर्वप्रथम नदी जोड प्रकल्पाला कचरा पेटी दाखविली आणि सडक आणि रेल्वे दोन्ही आधार भूत बाबींवर खर्च कमी केला. का? याचे उत्तर कोण देणार. आज ८० टक्के माल रस्त्यावरून न्यावा लागतो आहे त्या मुले वाहतूक खर्च कित्येकपट वाढला. देशाचा बिकास खुंटला.

UPA-I मधेच मूलभूत बाबींवर दुर्लक्ष करण्यात आले. सर्व बाबतीत पीछेहाट झाली तरीही UPA पुन्हा जिंकली कारण विरोधी पक्षात नेतृत्वाचा अभाव होता. बाकी निवडणूक जिंकायचे म्हणाल तर केजरीवाल सारखा व्यक्ती ही निवडणूक जिंकू शकतो. बाकी अधिक बोलू शकत नाही.