तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
30 Jul 2014 - 12:42 am
गाभा: 

"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही.

हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे...

जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत.

चला तर मग ही टोके आणि त्यांमधील वर्णपटाचे केलेले ढोबळ गट पाहूया...

प्रामाणिक आस्तिक

१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो.

२. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो.

३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत.

४. हे लोक:
(अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा
(आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा
(इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा
(ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात.

म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात.

५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात.

६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्‍या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात.

७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की.

थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.

प्रामाणिक नास्तिक

या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः

१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "विश्वास" असतो.

२. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो.

३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत.

४. हे लोक:
(अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात.
(आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्‍या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात.

म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात.

५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात.

६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की.

थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.

आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...


आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१

एकंदरीत वरची दोन्ही टोके एकूण समाजाचा फार फार लहान भाग असतात. तर मग "ह्या वर्णपटात बसणारे इतर लोकगट कोणते?" असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. चला तर एक एक करत सगळा वर्णपट उलगडून पाहूया...

धूर्त आस्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे:

१. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते.

२. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो:
(अ) चरितार्थ चालणे
(आ) आर्थिक फायदा
(इ) सामाजिक फायदा
(ई) राजकीय फायदा, इ.
आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते.

३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्‍या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते.

४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते.

५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही.

६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते !

थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.

धूर्त नास्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे:

१. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते.

२. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो:
(अ) चरितार्थ चालणे
(आ) आर्थिक फायदा
(इ) सामाजिक फायदा
(ई) राजकीय फायदा,
(उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ.
आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते.

यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात.

३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात.

४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्‍या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो.

५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते.

६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते !

थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.

आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...


आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२

आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व लोकगट अल्पसंख्य आहेत. मग उरलेल्या मोठ्या समूहाचे काय?

धोका प्रबंधक

उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल.

१. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते.

२. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते.

३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात".

४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते.

५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते !

६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे.

थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.

आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...


आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३

पण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गटांनी जरी बहुतेक सर्व लोकसंख्येचे वर्गीकरण झाले असले तरी एक छोटा पण फार महत्त्वाचा गट शिल्लक आहे.

अज्ञेयवादी

आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्‍या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात:

१. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते.

२. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्‍या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते.

३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही.

४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो.

५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते.

६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही.

थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात.

या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:


आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४

सारांश

हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.


आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... आता, तुम्हीच ठरवा तुम्ही कोण ते !

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jul 2014 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११
अगदी चार्वाकांच्या पासून ते आजच्या एखाद्या समाजसुधारक..विज्ञाननिष्ठ..विवेकवाद्यापर्यंत सगळ्यांनी देवाच्या सर्व कल्पना..कल्पित रूपांना..पर्यायानी..त्यांचं समर्थन करणार्‍यांना हेच आणि अशाच तर्‍हेचे सर्व प्रश्न विचारले आहेत. आणि कुणाच्याही साध्या अगर तात्विक प्रश्नांची उत्तरं समर्थकांना देता आलेली नाहीत. मग समर्थकांनी दोन मार्ग वापरले. १) दुर्लक्ष/उपेक्षा यांचा हत्यारासारखा वापर करून आपल्या कल्पिताच्या पडद्याआड दडून रहाणे. २) आपल्याला अनुकूल समाजबळ तयार होताच विरोधकांचा शब्दानी..कपटनिती..आणि शस्त्रबळानी नायनाट करणे.
मी जेव्हढे जेव्हढे समर्थक भेटले त्यांना सावरकरांचा विश्वाचा देव आणि मनुष्याचा देव हा लेख आधी वाचा आणि नंतर नरेंद्र दाभोळकरांचे श्रद्धा/अंधःश्रद्धा या पुस्तकातील जागतल्या सर्व धर्मातल्या परमेश्वरी कल्पनांची केलेली परिक्षा/चिकित्सा वाचा. हा सल्ला सावरकरांकडून मला मिळालेल्या ममत्वानी दिलेला आहे.

याचा माझ्या पुरोहितपणा वर बरा वाइट परिणामही झालेला आहे.
पण चालू समाजपरिस्थितीमधे जो प्रामाणिक आस्तिकांचा गट आहे,त्यानी नाराजी व्यक्त केली.पण आंम्ही ते ही सर्व वाचू अशी खात्रीही दिली...त्यातल्या काहिजणांकडे माझी -त्यांच्या श्रद्धा जश्या समंजस होत व बदलत आहेत..तशी पूजा अर्चनेची धर्मोपदेशाची रीतही मी बदलविली..बदलवतो आहेही. (उदाहरणार्थ:-सत्यनारायण कथेचे पारंपारिक/चमत्कारविरहीत/प्रबोधनवादी ..असे मीच तयार केलेले तीन प्रकार!..हे एक उदा.झालं.असे कर्मकांडात मी बरेच प्रयोग करत वापरत असतोच..पण तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे..असो!) तर..या प्रामाणिक आस्तिकांच्या सद्भावना आणि सहयोगावर मी अत्यंत छोटिशी का होइ ना? काहि नवीन वाट तयार करू शकतो आहे. पण ज्यांना आंम्ही धर्मातल्या चुका काढून..श्रद्धांवर बोटे ठेऊन नक्की काय करू पाहतो आहे? असा फुकाचा भयगंड आहे. किंवा वैयक्तिक अहंता अथवा सरळ लबाडीमुळे जे धर्मसुधारणांच्याच विरोधी आहेत. त्यांना मात्र मी एकच प्रश्न करतो:- "धर्मपुरोहित(गुरु/भटजी.काय हवा तो शब्द घ्या.) ..म्हणजे धर्मात जे जे सांगितलय(मग ते बरं/वाइट कसंही असो) त्या तालावर तुम्हाला हवा तसा नाचणारा असा तुंम्हाला हवा आहे का?" जर उत्तर - हो.. असं असेल.तर मग तुंम्ही प्रॉडक्टबद्द्ल/धर्मसेवेबद्दल/सर्व्हिसबद्दल...तुमच्या अपेक्षा ठेवणारे ग्राहक होता..हे तुंम्हाला मान्य आहे का? पुन्हा उत्तर-हो..असेल.तर मग हे पुरोहिताचं(आमचं..) पद व्यावसायिक होतं..धार्मिक रहात नाही,किंवा फक्त "नावाला" रहातं..हे तुंम्हाला मान्य आहे का??? इथे मात्र त्यांचं उत्तर हमखास नाही! हेच येतं.. (आदर्श दंभ..यापेक्षा वेगळा तो काय??? हा सवाल तेंव्हापासूनच माझ्या मनात निर्माण झालेला आहे..असो!) यांच्यापेक्षा आमच्या एका शालेय-मित्रानी माझी आणि इतर मित्रांची ही मत ऐकून- " देव अस्तित्वात नसला..तरी आंम्हाला तो लागतो..!" हे दिलेलं उत्तर मला शतपटीनी आवडलेलं होतं. काहिही का असे ना..तो त्याचं जे काहि आहे,त्याच्याशी पूर्ण प्रामाणिक तरी होता/आहे. असल्यांसाठी मग आम्हीही प्रामाणिक पणे पायात चाळ बांधू... पण जे भक्तिचा देखावा उभा करून ग्राहकाचा व्यवहार अपेक्षितात,अश्या दुटप्पी आणि दांभिकांशी मात्र आमच्या सारख्यांचं कदापिही जमणार नाही.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 1:18 am | प्रसाद गोडबोले

कुणाच्याही साध्या अगर तात्विक प्रश्नांची उत्तरं समर्थकांना देता आलेली नाहीत. मग समर्थकांनी दोन मार्ग वापरले. १) दुर्लक्ष/उपेक्षा यांचा हत्यारासारखा वापर करून आपल्या कल्पिताच्या पडद्याआड दडून रहाणे. २) आपल्याला अनुकूल समाजबळ तयार होताच विरोधकांचा शब्दानी..कपटनिती..आणि शस्त्रबळानी नायनाट करणे.

हे वाचुन नेहमी प्रमाणे माझे काही सोप्पे प्रश्न

देव म्हणजे काय ?
माणुस म्हणजे काय ?
असणे म्हणजे काय ?
आणि नसणे म्हणजे काय ?

(हे प्रश्न जरी जनेरीक असले तरी उत्तरे वैयक्तिक अपेक्षित आहेत म्हण्जे "माझ्या मते..." अशी काहीशी )

देव हा धर्माच्या कमी आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील जास्त मोठ्ठा इश्शु आहे ! तुम्ही काय गृहीतके घेवुन सुरुवात करता ह्यावरुन तुम्ही कोनत्या अनुमानाला पोहचणार हे ठरते !

रेने देकार्त नावाचा एक महान तत्वज्ञ होवुन गेला युरोपात त्याचे मेडीटेशन्स ऑन फर्स्ट फिलॉसॉफी , तत्त्वज्ञानावरील पहिली चिंतने हे पुस्तक आवर्जुन वाचण्यासारखे आहे .

बाकी समाजात काय चालते , अन देवाच्या नावावर धुर्त आस्तिक लोक भोळ्याबाभड्यांचा कसा गैरफायदा घेतात अन धुर्त नास्तिक लोक बोळ्याभाभड्यांना कसे भडकवुन किंकर्म अवस्थेत नेवुन भंदावुन सोडतात ह्यावर चर्चा करण्यात देवाला इन्टरेस्ट नाही आणि मलाही ! लोल !

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 7:41 am | अत्रुप्त आत्मा

देवाविषयी तुंम्ही विचारलेल्या प्रश्नांची जेनेरिक उत्तरे मिळविण्यासाठी....
सध्या हे वाचा:- http://www.savarkar.org/content/pdfs/mr/vidnyan-nistha-nibandh-kh6-mr-v0...

चित्रगुप्त's picture

31 Jul 2014 - 8:32 am | चित्रगुप्त

@ अतृप्त आत्मा:
सावरकारांच्या 'विज्ञाननिष्ठ निबंध' च्या दुव्याबद्दल आभार. सावकाशीने वाचणार आहे.

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 12:11 pm | प्रसाद गोडबोले

देव म्हणजे काय ?
माणुस म्हणजे काय ?
असणे म्हणजे काय ?
आणि नसणे म्हणजे काय ?

>>> हे प्रश्न जनेरीक आहेत पण ह्याला ज्याची त्याची उत्तरे भिन्न असु शकतात रादर असतात, मला माझी उत्तरे मिळाली आहेत , मला तुमची उत्तरे अपेक्षित होती /आहेत .

तुम्हाला असे म्हणायचे आहे का की तुमची उत्तरे आणि सावरकरांची उत्तरे सेम आहेत ? तसे असेल तर निबंध वाचतो :)

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 12:47 pm | अत्रुप्त आत्मा

@तुम्हाला असे म्हणायचे आहे का की तुमची उत्तरे आणि सावरकरांची उत्तरे सेम आहेत ? >>> हो...!

प्रसाद गोडबोले's picture

31 Jul 2014 - 12:51 pm | प्रसाद गोडबोले

ओके. निबंध वाचायला घेत आहे :) तसेही सावरकर आपल्याला आवडतातच !!

माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.

हे माझे मत इथे व्यक्त केल्यामुळे बराच गहजब झालेला दिसत आहे. पण ते माझे स्वत:चे मत आहे व ते इतरांवर थोपवण्याचा मी मुळीच प्रयत्न करत नाही. पण मला ह्या विषयावर संवाद झालेला आवडेल व माझ्या मताशी विरुद्ध असलेली मतेहि जाणून घ्यायला व ती मला पटली तर स्वीकारायला आवडतील. कारण माझं आता असलेलं मतहि काही माझ्या जन्मापासून बनलेलं नाही. इतर पुष्कळ जणांसारखं अज्ञाताचा वेध घ्यायला मला आवडतं आणि आतापर्यंतच्या ह्या प्रवासात ह्या मताप्रत मी आलो आहे. अत्रुप्त आत्मा ह्यांच्या प्रतिसादातले विधान "कल्पिताच्या पडद्याआड दडून रहाणे." मला उद्देशून नसावे असे मानतो , कारण मी फक्त माझे मत ह्या धाग्याच्या अनुषंगाने व्यक्त केले.

फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व

येथे मला विश्व किंवा ब्रम्हांड असे म्हणायचे आहे. ज्यामधील बर्‍याच गोष्टी माझ्यासाठी अनाकलनीय आहेत पण त्या एका पद्धतशीर प्रणालीमध्ये कार्यरत आहेत. उदा. गुरुत्वाकर्षण, ग्रहांच्या कक्षा व गति, चुंबकीय शक्ती, सजीवांची शरीर रचना वगैरे. हि प्रणाली चालवणारी एक उर्जा आहे, त्या उर्जेलाच "देव", निसर्ग" इ. नावे मिळाली आहेत.

एक्का साहेब तुमचे प्रश्न खरच खूप चांगले आहेत व मलाहि पडत आलेले आहेत. पण हि शक्ती अगदीच झाडाचे पान अन पान नियंत्रित करत आहे असे नाही. ह्या बाबतीत मला पटणारा एक मतप्रवाह आहे कि स्रुष्टीनिर्माता व नियंत्रक आहे पण त्याचबरोबर प्रत्येकांस इच्छा व निवडीचे स्वातंत्र्य हि आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग किंवा दुरुपयोग होउन चांगल्या किंवा वाईट घटना घडतात.
मीही अजून काही उत्तरांच्या शोधात आहे व ह्या चर्चेतून मिळणारी वेगवेगळी मते जाणून घ्यायला आवडतील.

अर्धवटराव's picture

30 Jul 2014 - 11:15 pm | अर्धवटराव

या अक्ख्या स्पेक्ट्रममधे आम्हाला जागाच नाहि :( बरं वाटलं :)

एक्कासाहेब, हल्ली प्रवासाचा कंटाळा येतोय कि काय ? तुम्हाला हो कशाला आणि कधिपासुन ट्यार्पी धाग्यांची गरज पडायला लागलीय ??

अर्धवटराव's picture

30 Jul 2014 - 11:16 pm | अर्धवटराव

;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jul 2014 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा पण एक प्रवासच आहे... मनाचा... अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जाण्याच्या प्रयत्नाचा, अर्धवटरावसाहेब !

हा धागा प्रामाणिक आहे... टीआर्पीसाठी नाही. मोकळ्या मनाने वाचा, कुठेना कुठे तुमची जागा नक्की मिळेल असा विश्वास आहे.

अर्धवटराव's picture

31 Jul 2014 - 12:45 am | अर्धवटराव

तुमच्या प्रवासाच्या हौसेचे आम्हि तसेही जबरी फॅन आहोत. आणि तुमच्या प्रवास वर्णनात वाचक म्हणुन, प्रतिसादक म्हणुन आम्हाला जागा आहे हेच पुरे आमच्याकरता.

आमची आस्तिक-नास्तिकतेची व्याख्याच मुळात वेगळी असल्यामुळे (किंवा, आस्तिक-नास्तिक हा कन्सेप्टच मुळात मान्य नसल्यामुळे) तुम्ही दिलेल्या स्पेक्ट्रममधे आम्हाला जागा दिसत नाहि. असो.

कवितानागेश's picture

30 Jul 2014 - 11:55 pm | कवितानागेश

मूळात "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात>
अशी धारणा असणारे भोळे (?) आणि काहीसे भित्रे असे लोक असतात. त्यांना 'आस्तिक' म्हणता येइल का, शंका आहे. उद्या जर मोठ्या प्रमाणावर ' देव नाही' असा धर्म उभा राहिला, तर अशी धारणा असलेल्या व्यक्ती तोच धर्म भोळेपणानी (पक्षी: सोय म्हणून) आचरतील.
तथाकथित 'धार्मिक' असणं आणि 'believer' असणं यात फार मोठा फरक आहे.
माणूस जेंव्हा खरोखर "I believe" म्हणतो तेंव्हा तो निर्भय होतो. (येशूसारखा किंवा जनकासारखा)
चिरंतन चैतन्याचा अनुभव आलेली व्यक्ती तथाकथित 'धर्म' या गोष्टीला थारा देत नाही. (ज्ञानेश्वरांसारखी किंवा इतर कुठल्याही संतासारखी)
माझ्या मते जगात 'believer' ५% सुद्धा नसतील.
आणि ९५% लोक 'स्वतःच्या सोयीप्रमाणे वळणारे' या वर्गात मोडतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

माणसाची उघड / दृश्य कृती मनातल्या खर्‍या विचाराव्यतिरिक्त सद्य परिस्थितीवर आणि त्या माणसाच्या धोका पत्करण्याच्या मानसिकतेवर (risk tolerance / aversion) अवलंबून असेल.

उदा:

(अ) प्रामाणिक आस्तिक त्याच्या व्याख्येप्रामाणेच प्रत्येक परिस्थितीत त्याच्या देवावरचा आहे तो विश्वास, आहे तसा, उघडपणे व्यक्त करेल. तसे करताना शक्य असलेल्या धोक्यांची पर्वा करणे त्याला आवश्यक वाटणार नाही. तर,

(आ) धूर्त आस्तिक एखाद्या परिस्थितीत आस्तिक 'दिसण्याने' फायदा होत असेल तर अगदी प्रामाणिक आस्तिकापेक्षा जास्त आस्तिक असल्याचे नाटक करेल; आणि

(इ) धोका प्रबंधक माणूस त्याचे विचार नास्तिकतेकडे जास्त झुकणारे असले व ते व्यक्त करणे धोकादायक असले तर वार्‍याची दिशा पाहून आस्तिक असल्याचे नाटक करून वेळ मारून नेईल.

वरवरची एखादी कृती पाहून माणसाच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे कठीण आहे.

म्हणूनच, लेखातील गटांचे गुणधर्म माणसाच्या मनात असलेले खरे विचार गृहीत धरून लिहीलेले आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 12:30 am | डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मते जगात 'believer' ५% सुद्धा नसतील.

प्रामाणिक आस्तिकांचा ५% हा आकडासुद्धा खूप मोठा वाटतो... १% पेक्षा कमीच असावा.

९५% लोक 'स्वतःच्या सोयीप्रमाणे वळणारे' या वर्गात मोडतात.
याच्याशी सहमत

चौकटराजा's picture

31 Jul 2014 - 7:18 am | चौकटराजा

मेरेरेकू ऐसाच लगता है जैसा मय हूं नास्तिक वईसेच ठिक है .लेकिन मय हरदिन पुजा करता है ! क्या है, उदबत्तीका , फूलोंका बास मस्त आता हय और सबके सब परशाद चव के हिसाबसे मस्त रयते है ! मजा रहता है नास्तिक आदमी की
भी पूजामे .

बाळ सप्रे's picture

31 Jul 2014 - 11:17 am | बाळ सप्रे

उदबत्तीचा वास आवडतो तर उदबत्ती लावा, शिरा आवडतो तर शिरा करुन खा, फुलं आवडतात तर फुलं आणून आत्मूगुर्जींसारखी सजावट करा, घंटा वाजवायला आवडत असेल तर घंटा वाजवा.. त्याला देव/ पूजेच निमित्त कशाला हवय???

हे सारं करताना समोर देवाची मूर्ती नसेल तर तो फील येत नाही.

बाळ सप्रे's picture

31 Jul 2014 - 1:29 pm | बाळ सप्रे

तो फील नक्की कशामुळे येतोय ते शोधायचा प्रयत्न करा तुमच्यासंदर्भात.. कदाचित केवळ एखादं सुंदर शिल्प/ फोटो सुद्धा तो फील देउ शकेल..
की त्यातला देवच (रुढार्थानं) महत्वाचा आहे ते पहा.. शेवटी तो देवच महत्वाचा वाटतं असेल तर मी नास्तिक आहे पण उदबत्ती, प्रसाद आवडतो म्हणून पूजा करतो असं म्हणून स्वतःला फसवू नका !!

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 1:34 pm | कवितानागेश

शी बाबा!! :(
सप्रेकाकांशी सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

@शेवटी तो देवच महत्वाचा वाटतं असेल तर मी नास्तिक आहे पण उदबत्ती, प्रसाद आवडतो म्हणून पूजा करतो असं म्हणून स्वतःला फसवू नका !! >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif ज्जे बा.....त! http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif यैच बोलने आया था!

हे माझ्याबद्दल नाही हो. मी इन जनरल लिहिलं होतं. आपलं आणि देवाचं काही घेणं देणं नाही.

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 9:41 am | बाळ सप्रे

ओक्के..
मग उत्तरही इन जनरल घ्या.. *good*

चित्रगुप्त's picture

31 Jul 2014 - 7:40 am | चित्रगुप्त

मय हूं नास्तिक वईसेच ठिक है

नास्तिक बोले तो ? जरा एस्पिलेन करना मंगता है.

हा हा. हो जान्दो एक बार काका लोग का भी चर्चा. :)

चौकटराजा's picture

31 Jul 2014 - 1:11 pm | चौकटराजा

खरे तर माझ्या स्मरणाप्रमाणे नास्तिक च अस्तिक याचा तत्वज्ञातील अर्थ आपण जो अर्थ समजतो त्यापेक्षा खूप वेगळा
असल्याचे एके ठिकाणी वाचले आहे. पण हे जग सहेतुकपणे एक शक्ति वा व्यक्ति चालवते असे काही नाही असे समजणारा
तो नास्तिक असे फारतर म्हणता येईल. हे सगळं असार आहे फक्त मानव वंश आपल्या प्रगत बुदद्धीच्या अस्तित्वामुळे
आकलन व भ्रम यांच्या दरम्यानचा खेळ करीत टाईम पास करीत असतो.

यशोधरा's picture

31 Jul 2014 - 10:34 am | यशोधरा

१५०.

सुधीर's picture

31 Jul 2014 - 11:04 am | सुधीर

लेख आणि मृत्यूंजय यांचा प्रतिसाद आवडला.
देवाप्रमाणे भूता खेतांवर विश्वास असेल्/नसेल तर क्ष-य चौकडीत मी कुठे येतो ते तपासतोय ;)

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 11:57 am | कवितानागेश

भूतांसाठी वेगळा धागा काढूयात. मजा येइल.
.
.
.
.
अवांतरः मी आजपर्यंत पाहिलेले सगळेच्या सगळे नास्तिक भूतांना घाबरतात!! =))

एस's picture

31 Jul 2014 - 12:03 pm | एस

अवांतरः मी तुम्हांला घाबरत नाही. तसेही तुम्ही मला पाहिलेले नाही. ;-)

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 12:09 pm | कवितानागेश

मी भूत नाही. तसंही मला तर काळं कुत्रंसुद्धा घाबरत नाही. ;)

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 12:45 pm | बॅटमॅन

नीट पहा, गोरं कुत्रं घाबरत असेल. रादर काळंच कुत्रं घाबरून गोरं झालं असेल.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 12:53 pm | अत्रुप्त आत्मा

@रादर काळंच कुत्रं घाबरून गोरं झालं असेल>>>. http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 1:35 pm | कवितानागेश

haha

काळ्या मांजराला रजनीकांत आडवा जातो तेव्हा त्या मांजराची ट्रकशी टक्कर होते तो व्हिडिओ आठवला. पूर्ण व्हिडिओच खंग्री आहे, पण त्यात हा शीन शेवटाला आहे.

www.youtube.com/watch?v=I2ac8sHzzGY

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jul 2014 - 3:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

ती सगळी कार्टून मालिका मस्त आहे: https://www.youtube.com/watch?v=fdGqV_IlsHc&list=RDfdGqV_IlsHc&index=1

बॅटमॅन's picture

31 Jul 2014 - 3:06 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 2:36 pm | प्यारे१

चो च्वीट!

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2014 - 4:14 pm | अत्रुप्त आत्मा

https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRE0ldTIlvLSqWe565xYNTAdD7Wu-kurCRKCVDCgkukGktZdhtK http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif

मौ तै...फटू बगून वारल्या ग्येलो आहे! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

सुधीर's picture

31 Jul 2014 - 4:02 pm | सुधीर

भूता-खेताचा विचार माझ्या डोक्यात अ‍ॅग्नोस्टिसिझम (Agnosticism) मुळे आला.

अवांतरः बाकी करीरोडला अख्ख बालपण गेलं, पन धनाजीरावांसारखा अनुभव आला नाही. (रात्रीअपरात्री आता जरा राम-राम म्हणत जावे लागेल)

सुधीर's picture

31 Jul 2014 - 4:16 pm | सुधीर

स्पाभाऊंसारखा अनुभव असं म्हणायचं होतं.

हुप्प्या's picture

31 Jul 2014 - 8:32 pm | हुप्प्या

बहुतेक धर्मातील देवांच्या प्रार्थना, कवने वगैरे वाचली तर देव हा अत्यंत डोकेफिरु, जुलमी हुकुमशहा आहे आणि भक्त हा त्याच्या राज्यातील एक नाडलेला, असहाय्य नागरिक आहे असे वाटत रहाते. तूच माता, तूच पिता, तूच जगाचा त्राता, तूच कर्ता आणि करविता वगैरे वगैरे. जर काही चुकून कमीजास्त बोललो तर हा खवीस आपली वाट लावेल अशा भीतीने भक्ती केली जाते असे वाटते. रामरक्षा, अथर्वशीर्ष वगैरे स्तोत्रातही अशीच वारेमाप, अवाच्या सवा स्तुती केलेली आढळेल.
तर देव हा असा हुकुमशहा आहे का? अशी घाबरून केलेली भक्ती मला तरी नको वाटते.

कवितानागेश's picture

31 Jul 2014 - 8:58 pm | कवितानागेश

ओक्के!! डन!!
तुम्हाला चालत नाही तर आम्ही कुणीही तुमची अशी भक्ती वगरै करणार नाही. :)

यशोधरा's picture

31 Jul 2014 - 9:11 pm | यशोधरा

हुप्प्या बाप्पा आहेत मौ?

प्यारे१'s picture

31 Jul 2014 - 10:17 pm | प्यारे१

नकोच असली भक्ती. ...!
:-/

प्रेमात पडल्यावर भीतीची गरजच काय ती? माणूस प्रेमापोटीच करेल काय करायचं ते.

प्रेरणा पित्रे's picture

31 Jul 2014 - 10:40 pm | प्रेरणा पित्रे

मी प्रामाणिक आस्तिक या प्रकारात मोडेन.. नुसता विश्वासच नाहिये तर अनुभव आणि प्रचिती बर्याच वेळा आले आहेत..मी नुसतेच डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण न करता डोळस भक्तीने मनःशांती अनुभवते आहे..
असो..
बर्याच लोकांचे उड्वाउडवीचे प्रतिसाद बघुन वाइट वाट्ले..

एका कंपनीला एक नवीन प्रोजेक्ट चालू करण्याइतपत पैसे मिळाले. त्यांनी एका बिल्डिंग मध्ये एक खोली विकत घेतली. त्यात ४ table आणली, ४ काचेची कपाट आणली आणि ४ उंदीर आणले. एका उंदराच्या आसपास हिरवी चित्र ठेवली, एकाच्या आसपास वाळू ठेवली, एकाच्या शेजारी पाणी ठेवलं.

आता जसजसं बजेट वाढेल तश्या जास्त सोयी उंदरांना द्यायला सुरवात केलि. सुरवातीला खूप उंदीर छोट्या छोट्या कारणाने मेले. मग त्यांचा मेंदू विकसित केला. हळू हळू उंदरांना हुशार बनवलं. उंदीर पण वाढवले,

प्रत्येकाला काही ना काही समस्या देवून ठेवली. आजारपण, पैसे नसणे, मुलं नसणे असली तर त्यांच्या काही कटकटी (त्यांची आजारपणं, अभ्यास न करण, व्यसनं, ई ई ), कोणाला मानसिक त्रास. त्याचा अभ्यास केला.

काही चांगल्या गोष्टी पण दिल्या - यश, शारीरिक मानसिक स्वास्थ्य, गरजेच्या गोष्टींचा भरपूर पुरवठा, आणि त्यांचाहि अभ्यास केला. हे सगळं मिळालेले उंदीर कसे वागतात.

मग मध्येच काही उंदरांना धार्मिक पणाचा इंजेक्शन टोचलं, कोणाला कुठलीतरी अस्मिता दिली, कोणाला गणितात गती तर कोणाला संगीताचा. त्याचा पण अभ्यास केला.

उंदरांना नेहमी वाटायचं कि हा त्रास मलाच का, पण इट्स just random sorting. काही उंदरांना चांगलं आयुष्य काहीना वाईट.

budget जसजसं वाढला तसं उन्द्रन्बारोबा इतर प्राणी पण आणले, त्यांचा पण अभ्यास सुरु केला. एक दिवस प्रोजेक्टच बजेट संपलं. उन्दिरांसकट सगळ्या प्राण्यांना मारून टाकलं. खोली बंद केली.

मला नेहमी वाटतं कि देव म्हणजे एक "Well funded प्रोजेक्ट मधला scientist " आहे. प्रोजेक्ट संपण म्हणजे बिग बँग / प्रलय. आपण एक उंदीर. आयुष्यात त्रास असतील आनंद असेल पण हे आपल्या बरोबरंच का हे कधीच माहित नसेल कोणालाच.

थोडं विस्कळीत आहे, पण नेहमी असंच वाटतं की देव किंवा जी कुणी शक्ती आहे तिला ५-१० गोष्टी उंदरावर टेस्ट करायच्या असतात. काही उंदरांना चांगल्या गोष्टी मिळतात काहीना वाईट.

आता हा जो कोणी करतो त्याला पण कोणीतरी बनवलेलं असेलच, पण मला तो कोण आहे हेच कळत नाहीये तर त्याला बनवणारा कोण हे कसं कळणार.

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 5:41 pm | प्यारे१

अजून दोनशे नाहीत????????????????????

(चला गाजरं किसायला घेतो.)

हाडक्या's picture

2 Aug 2014 - 5:46 pm | हाडक्या

घ्या आमचा पण हातभार..
(आम्ही गाजर हलवा करायला घेतो..)

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 6:04 pm | कवितानागेश

मूळात विश्वात चाललेलं सगळंच आपल्याला कळेलच असा हट्ट का धरायचा हेच मला कळत नाहीये. आणि पुन्हा कळतय तितकंच "खरं" असं तरी आपण कुठल्या आत्मविश्वासावर म्हणू शकतो?
आपल्या पोटातल्या जंतांना कुठे कळत असतं, की आपण कुणाच्यातरी पोटात आहोत, आणि हे सगळं मॅनेज करणारी कुणीतरी व्यक्ती आहे!
ते आपले हावरट्पणानी 'सिस्टम' ओरबडत असतात... आपण पृथ्वी ओरबाडतो तशीच...
आपल्याला तरी कळायला काय मार्ग आहे... की आपण नक्की कुठे आहोत आणि हे सगळं नक्की काय सुरु आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2014 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

असाच विचार मानवजातीने केला असता तर आपल्यात आणि पोटातल्या जंतांत फार फरक पडला नसता ना :)

आपण मिपावर लिहीण्यासाठी कलफलकावर बोटे नाचवण्याऐवजी हंटर-गॅदरर अवस्थेत कुठेतरी कंदमुळांसाठी खोदकाम करत असतो किंवा एखाद्या प्राण्याच्या शिकारीसाठी त्याच्या मागावर धावत असतो ना ! ;)

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 6:22 pm | कवितानागेश

जंतेदेखिल उत्क्रांतीत त्यांच्या खालच्या पायरीवर असलेल्यांबद्दल अस्साच विचार करत असतील!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2014 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

शक्य आहे ! सद्या माणसाच्या मानसिकतेचा विचार चालू आहे !! जंताच्या मानसिकतेचा विचार कोणीतरी हाती घेईल तेव्हा काहीतरी समजेलच :) ;)

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 6:40 pm | प्यारे१

ह्याचा व्यत्यास घेऊ या का?

माणसांबद्दल सर कसा विचार करत असतील ????????? =))
विचार करत असतील तर? ;)

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 11:31 pm | कवितानागेश

पण जंताला आणि माणसाला, एकमेकांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं शक्य होईल का?
अजून तर आपल्याला आपल्या बरोबरचे इतर प्राणी समजत नाहीत. अगदी 'माणूस' देखिल नाही. तिथे जंत कुठे समजणार? आणि 'देव' म्हणून कुठली सिस्टम असेल तर तीतरी कशी काय समजणार?

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून तर आपल्याला आपल्या बरोबरचे इतर प्राणी समजत नाहीत. अगदी 'माणूस' देखिल नाही. तिथे जंत कुठे समजणार? आणि 'देव' म्हणून कुठली सिस्टम असेल तर तीतरी कशी काय समजणार?

या प्रतिसादानं तुम्ही आपण सारे अज्ञानी आहोत हे जाणलंत :)

"आपल्याला एखाद्या गोष्टीचे काहीच / संपूर्ण ज्ञान नाही" हे समजणे ही त्या गोष्टीचे सखोल ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी असते. अर्थात त्याच पायरीवर न थांबता ज्ञानार्जनाचे / शोधाचे प्रयत्न चालू ठेवले तरच आपण ज्ञानाच्या वरवरच्या पायर्‍यांवर जाऊ शकतो... पण, शिखरावर पोहोचू किंवा नाही हे तेथे गेल्याशिवाय कळणार नाही.

थांबला तो (वैचारिक / बौधीक / आध्यात्मिक / धार्मिक / इ सर्व संदर्भात) संपला !

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 3:34 pm | प्यारे१

ज्ञान की माहिती?
सगळ्यातली सगळी माहिती मिळणं सोडाच, एकाच विषयातली देखील १००% माहिती कुणाला असेल असं मला वाटत नाही. बरं ती मिळाली तरी त्याचं काय करायचं हे जोवर 'उमग'णार नाही तोवर उपयोग शून्य.

असो!

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 3:44 pm | कवितानागेश

सध्या आपण 'माहिती'लाच ज्ञान म्हणत आहोत.
खरे ज्ञान म्हणजे काय समजण्यासाठी धागा काढता येणार नाही. ती ज्याची त्यानी निस्तरायची गोष्ट आहे. :)

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 4:07 pm | प्यारे१

'तरण्याची गोष्ट' जास्त बरं काय गं?

तू ज्ञानी आहेस असं सरांच्या बोधीवृक्ष क्लासमध्ये अर्धवटराव यशोधराला सांगताना मूकवाचकनं पाहिलं असं धन्या प्रगो आणि बॅमॅ बरोबर चहा पिताना म्हणाला. स्नेहा, इ ए, चौरा, अ आ सगळे चहाची ऑर्डर देऊन चहा यायची वाट बघत होते. ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 4:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

आतापर्यंत माहिती असणे ही पहिली पायरी आणि तिचा खरा अर्थ माहित होणे म्हणजे ज्ञान असेच समजत आहे.

माहितीविना कैचे ज्ञान ?

(ज्ञानात माहिती अध्याहृत असते असे समजणारा आणि त्याबाबतीत उगा केशदुभंग करत न बसणारा) इए :)

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 4:35 pm | प्यारे१

माहिती नसूनही ज्ञान 'होतं' कारण ते आत 'असतं'. माहिती शिवाय सुद्धा ज्ञान मिळू शकतं.

बाकी ज्ञानात माहिती असते ह्याबाबत दुमत नाही.

उदाहरणार्थः एखादा एकदम जंगलातला छान गाणारा आदिवासी असला तर त्याला तालासुराची माहिती नसली तरी ज्ञान असतं.

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 5:00 pm | कवितानागेश

बरं मग?

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 5:52 pm | प्यारे१

चहाचं बघा जरा. लय झाल्या गफ्फा. त्याबरोबर काही च्याऊमाऊ पण. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Aug 2014 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

उदाहरणार्थः एखादा एकदम जंगलातला छान गाणारा आदिवासी असला तर त्याला तालासुराची माहिती नसली तरी ज्ञान असतं. :)

चित्रगुप्त's picture

3 Aug 2014 - 5:12 pm | चित्रगुप्त

'आपणासि जाणावे आपण, या नाव ज्ञान'
... येर ती पोट भरायाची विद्या... असे समर्थ सांगून गेलेत.

प्यारे१'s picture

2 Aug 2014 - 6:25 pm | प्यारे१

'मेन इन ब्लॅक' मधली मांजरीच्या गळ्यात अडकवलेली गॅलक्सी आठवली. :)

अर्धवटराव's picture

3 Aug 2014 - 7:37 pm | अर्धवटराव

हेज् पार्टीकल शोधणार्‍या टीमने कल्पनातीत मेहनत करुन थेरॉटीकल फिजीक्स आणि एक्सपेरीमेण्टल फिजीक्सची अफलातून सांगड घालुन सर्न प्रयोगशाळेत एल.एच.सी बनवला. प्रोटॉनबीमचा मारा करुन हेज् पार्टीकल शोधुन काढले देखील.

हे पार्टीकल जी.इ.व्ही युनीट मधे मोजतात. या मुलकणांना केंद्राशी ठेवुन इतर पार्टीकल तयार होतात व त्यापासुन पुढे सब-अ‍ॅटोमीक पार्टीकल-अ‍ॅटम, आणि विश्व अशी साधारण रचना भौतीकशास्त्राने मांडली आहे.

यात गंमत अशी, कि जर हे मूलकण ११४ युनीटचे असतील तर तर त्यापासुन आपलं 'युनी'व्हर्स तयार व्हायची शक्यता असते आणि जर ते १५०च्या जवळपास असतील त्यापासुन 'मल्टीव्हर्स'ची शक्यता असते (संशोधकांच्या शब्दात सांगायचं तर आजवरचं सगळं फिजीक्सचं मुसळ केरात गेलं...सर्व मांडानी नव्याने करायला लागणार)
प्रयोगांती हे मुलकण १२५ युनीटचे निघालेत (सध्यातरी). आजघडीला फीजीक्स एका दुभंगलेल्या रस्त्याच्या जोडबिंदुवर उभं आहे... युनीव्हर्स कि मल्टीव्हर्स हा आता पुढील शोध असणार आहे. पण नोंद घेण्यालायक एक गिष्ट अशी आहे कि १२५ युनीटचे असल्यामुळे हे मूलकण अजीबात 'स्टेबल' म्हणवता येत नाहि. त्यामुळे विश्व सतत ऑन द व्हर्ज ऑफ डीस्ट्रक्शन उभं आहे.
आता त्या टीम मधला एक वैज्ञानीक म्हणतो कि याचा अर्थ काय असावा ? कुणीतरी 'मुद्दाम' या युनीटला हे पार्टीकल्स सेट केलेत, व आपल्याला जगायची संधी दिलीय? कि हि केवळ अपघातांची एक मालिका आहे (आणि तसं असेल तर इट्स ऑल क्रॅप... असं तो म्हणतो). अर्थात, त्यांच्याकरता हा केवळ थेअरीचा भाग...

मिपावर सुरु असलेल्या घनघोर चर्चेमुळे हे सगळं आठवलं :)

कवितानागेश's picture

3 Aug 2014 - 8:50 pm | कवितानागेश

कदाचित आधी पुष्कळ वेळा वेगळी युनिट्स तयार होउन सगळी रचना पुन्हा पुन्हा कोसळली असेल आणि आता ह १२५ चा पुन्जका स्टेबल राहिल्यानी आहे ते तसे दिसतय आपल्याला....
पण तरीही ही थ्री डिमेन्शन्समधली युनिवर्स/मल्टिवर्सची थिअरी झाली.
३च्या वरच्या डिमेन्शन्सबद्दल अजून आपल्याला काहीही माहित नाही. (निदान मला तरी नाही!!) ;)
शिवाय डिरॅकची अ‍ॅन्टीपार्टिकल थिअरी आहेच पुन्हा सगळे अश्याच 'ऑन द व्हर्ज ऑफ डीस्ट्रक्शन' वर आणून सोडायला.

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 9:03 pm | प्यारे१

ए मी बोलू, मी बोलू?

'उपजे ते नासे' म्हणजे ज्याची उत्पत्ती झाली आहे त्याचा नाश होणार आहे हे जुन्या अडाणी लोकांना आधीच माहिती होतं. म्हणून समजा तुमचं युनिव्हर्स काही बिलियन वर्षं जरी टिकलं तरी ते जाणार असल्यानं त्यात आम्हाला इन्टरेस्ट नाही असं हे जुने अडाणी म्हणालेत.

आम्हाला काही 'परमनंट' गोष्ट सांगा असं ते म्हणतात आणि नुसते म्हणत नाहीत तर आम्हाला त्याची अनुभूति आली आहे असंही म्हणतात. नवलच की!

हे मिपावर शेजारी चित्रं लावलेले दोन अडाणी त्यातलेच.

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2014 - 9:24 pm | टवाळ कार्टा

4th dimention is Time