मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांची माहिती हवी (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स)

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jul 2014 - 11:41 am
गाभा: 

मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोलीच्या स्थापनेला जवळपास १८ वर्षे होत आली आहेत. मराठी संस्थळांना तंत्रज्ञान, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यामध्ये मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांनी (वेब आर्कीटेक्ट्स/ डिझायनर्स /डेव्हेलपर्स) महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे.

उल्लेखनीय मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांबद्दल आणि मराठी संकेतस्थळे विकासात कार्यरत व्यावसायिक आस्थापनांबद्दल माहिती हवी आहे.

* या माहितीत (पूर्ण) नाव , जन्म दिनांक, कार्यक्षेत्र, (असल्यास) पुरस्कार आणि गौरव,व्यक्ती परिचयः बालपण आणि शिक्षण, कारकीर्द: नौकरी विषयक कारकीर्द, मराठी संकेतस्थळ रचना आणि कारकीर्द आणि संबंधीत अनुभव आणि त्यांच कार्य तुम्हाला उल्लेखनीय का वाटत ? (वेगळेपण) ,ते हौशी विकसक/रचनाकार आहेत का व्यावसायिक दृष्ट्या कार्य करतात?, विकसीत केलेली/सेवा दिलेली प्रमुख संकेतस्थळे, (आस्थापना उभारली असल्यास आस्थापनेचे नाव आणि स्थापना वर्ष), इतर क्षेत्रातील कार्य, आक्षेप अथवा टिका आणि भूमीका. उपलब्ध असल्यास माध्यमात प्रकाशीत वृत्ते आणि संदर्भ दुवे

**(धागा प्रतिसादांच्या माध्यमातून प्रती व्यक्ती किमान चार परिच्छेद तरी मजकुर गोळा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आवश्यक नाही पण जिथे माहितीस संदर्भ नाहीत तेथे अजून एखाद्या प्रतिसादकाकडून दुजोरा प्राप्त झाल्यास बरे पडेल)

* सर्वच मराठी संस्थळ रचनाकारांची नावे मला आत्ता लगेच आठवणार नाहीत आठवली सूचली तशी देईनच, ती तुम्हीही देऊ शकता, चर्चा चालू करण्या साठी या क्षणी आठवणारी नावे म्हणजे अर्थातच मायबोलीचे अजय गल्लेवाले, माधव शिरवळकर, प्रसाद शिरगावकर, आपले मिपाचे नीलकांतजी आहेतच अजूनही नावे येऊद्यात.

* प्रताधिकारमुक्त छायाचित्रे विकिमीडिया कॉमन्सवर चढवून येथे दुवा द्यावा.

* धागा मुख्यत्वे विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे अर्थातच आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमूक्त गृहीत धरला जाईल.

* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

31 Jul 2014 - 11:12 pm | पैसा

पण या विषयावर धाग्याच्या स्वरूपात माहिती मिळणे जरा अवघड दिसते. त्यापेक्षा तुम्ही त्या त्या संस्थळाच्या चालक्/मालक यांना थेट व्यनि कराल तर जास्त माहिती मिळू शकेल. मायबोली, मिपा याबद्दल तुम्ही लिहिलंत, तसेच मीमराठीचे राज जैन, ऐसी अक्षरेचे चालक मंडळ (मुक्तसुनीत, राजेश घासकडवी, ३-१४ विक्षिप्त अदिती, याशिवाय इतर कोणी असल्यास माहिती नाही) याशिवाय मनोगत आहे, उपक्रम आहे. उपक्रमचेच आणखी एक लहान संस्थळ आहे, त्याचे नाव आठवत नाही. मिपाचे पुस्तकविश्व आहे. आणखीही बरीच संस्थळे असावीत.

माहितगार's picture

1 Aug 2014 - 8:41 am | माहितगार

त्यापेक्षा तुम्ही त्या त्या संस्थळाच्या चालक्/मालक यांना थेट व्यनि कराल तर जास्त माहिती मिळू शकेल.

हम्म तसेच काहिसे करावे लागेल असे वाटते. एखादी प्रश्नावली बनवून पाठवावी लागेल असे दिसते. अर्थात या सर्व संकेतस्थळांचे सदस्यत्वे घेणे मग व्यनी पाठवणे एक वेगळा प्रकल्पच होतो. एका पक्षा अधिक संकेतस्थळांचे सदस्य असलेल्या मंडळींनी एकेका संकेतस्थळाबद्दलची माहिती पाठवली असती तर काम जरा हलके झाले असते. पण तसे झाले नाही तेव्हा आपण म्हणता तोच मार्ग योग्य दिसतो हे खरे.

प्रतिसादासाठी धन्यवाद