शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच
ओमार दादा मिश्ते शेंच्युरी मारो ( कृ भावना को समझो ) ....
९४ रन नाबाद .. शेन वॉटसन चा एक अखुड टप्प्याचा चेंडू .. तो खाली वाकला , पण अपेक्षे प्रमाणे चेंडू उसळलाच नाही ,, चेंडू अगदी बॅट जवळनं गेला .. आमचं अँड्रिनलीन पुन्हा वाढलं ... बराच वेळ गेला (मी तो पर्यंत जरा बाहेरची हवा खाऊन आलो) .. परत आलो तेंव्हा त्याने सोळाव्या कसोटी शतकानंदर माझ्या कडे बॅट दाखवून मला अभिवादन केलं .. मी फारच खुष झालो ... आनंद गगनात मावेना ... म्हंटल वा रे पठ्ठ्या शेवटी जाताना एक जबरदस्त खेळी केलीस ... आम्ही भरून पावलो ..
मित्रांनो ह्या शतकाला त्याच्या बाकी १५ शतकी खेळांपेक्षा नक्कीच जास्त महत्व आहे ..कारण यावेळी तो निवृत्त होणार आहे .. ही त्याची शेवटची खेळी आहे .. नर्व्हस नाइंटिजच टेंशन काय असतं ते तुमच्या पैकी बर्याच जणांनी अनुभवलं नसेल. मी ज्यावेळी गल्ली क्रिकेटपटू होतो (मी आता गल्ली क्रिकेट मधून व्ही.आर.एस. घेतला आहे) , मला नऊ रनांवर असताना नव्हस नाइन(टी)च जाम टेंशन येत असे .. नऊ धावांवर मी नव्वद वेळा बाद झालोय .. कचितच मी १० रन केले की गॅलरीत मॅच (की मला ? आपले गोड गैरसमज हो ) बघत असलेल्या रुपाली कडे लॉर्डस वर शतक केल्याच्या रुबाबात बॅट दाखवत असे. असो .. क्रिकेट कमी ग्लॅमर जास्त हा भारतिय क्रिकेटचा अनुभव आम्ही गल्ली पासनं अनुभवतोय.... तर सांगायचा मुद्दा असा ... आमच्या गांग्या उर्फ गंगोली, दाद्या आणिक बरंच काही ... यानं आज अतिशय क्रिटीकल क्षणी शतक मारून स्वतःचं नाणं खरं केलंच नाही तर ठानठान् वाजवून पण दाखवलं ... त्याने टिव्हीतून एक नजर माझ्यावर टाकली आणि मला म्हणाला " घन्यवाद माझ्या दोस्ता , ९६ च्या विश्वकरंडकापासून तूच एकटा होतास जो प्रत्येक चांगल्या वाईट क्षणी माझ्या बरोबर होतास .. माझा उत्साह वाढवत होतास .. " आता लोक म्हणतील की छ्या .. टार्या काही पण बडबडतोय येड लागलं त्याला .. पण नाही ... भावना को समझो (रुपालीच्या भावनांना मी समजलो पण उमगलो नाही ... पुन्हा खोट्टा पश्चाताप... काय मी एक रन काढला किंवा राहूल द्रविड ष्टाईलने विकेटकपूर कडे ऐटीत बॉल सोडला , तर रुपालीच्या तोंडावरचं कौतूक लपता लपत नसे ... आहाहा !! म्हणून मी २००४ च्या उन्हाळ्याच्या क्रिकेट सिझन मधे एकच गाणं फुल आवाजात बडवायचो माझ्या संगणकावर (माझ्याकडे संगणक आहे , पी.सी. नाही याची कृ घमुद्दीन खाँ आणि (आंबट)चवीने वाचणार त्याला विप्र देणार यांनी कृपया नोंद घ्यावी) . हा तर मी काय सांगत होतो .. मी माझ्या संगणकावर एकच गाणं बडवायचो .. समर ऑफ २००४ .... कारण दोज वर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ ... नंतर रुपालीचा पी.सी आला ... आणि ती पण सेमच गाणं बडवायला लागली ... पण मी कळतंय पण वळत नाय ... पुन्हा असो ...
अरे किती विषयांतर करताय तुम्ही लोक ? मी आपल्या दादाच्या दणकेबाज शतका बद्दल बोलतोय ना ? हो .. तर दादा मला म्हणला घन्यवाद ... मी त्याला म्हंटलं ओके ओके . .. चल आता जास्त धावा नको करूस ...धोण्याला थोडी धुलाई करू दे .. तो हरभजन तिकडे ड्रेसिंग रूम मधून बायसेप बेली दाखवून माकडचाळे करतोय .. त्याला येउंन दे पटकन .. आणि याचा प्रूफ पहा ... दादाने माझं ऐकलं आणि १०२ वर गुमान बाद होउन परतला .. पहा पहा .. वैयक्तिक धावांचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही .. दादाने मात्र केवळ माझ्या एका शब्दावर आपली विकेट सोडली .. अशाच प्रकारे मीही माझ्या गल्लीक्रिकेट कारकिर्दीत धावांचा मोह टाळला ... माझ्या नंतर रुपालीचा छोटा भाऊ बॅटिंगला येत असे ना .. मी आपली १० धावांची सेंच्युरी झाली की (एकदा बॅट रुपाली कडे दाखवून) तीच बॅट चपट्याला (रुपालीचा छोटा भाऊ चपट्या :) ) देत असे .. तिथेही एक फिल्मी लुक देण्याचा मोह आवरत नसे .. परत शेकडो कॅमेरे माझ्यावरच रोखलेले असायचे ना .... मग ? पुन्हा विषयांतर ? असू द्या असू द्या .. .असं म्हणत पुन्हा आपले आहेत नवाचे पाढे ... माझ्या माहितीतले बरेच लोक्स आहेत ... "चल आता निघतो मी " म्हणत पुन्हा तसेच बसून रहाणार ... असे करत ते "चल आता निघतो मी लै टाइम झाला " याची पंधरा पारायणे करत ... असो (होय पुन्हा असो )
गांगुलीने अत्यंत दडपणाखाली शतक लावलं याचं कौतूक अभिमान आणिक बरच काही वाटलं .. आता आमचा गांगूली मानाने निवृत्त होईल .. आणि आमच्या जिवंत आत्म्याला जिवंतपणीच थोडी शांती मिळेल ... तेवढी रुपालीसमोर थोडी अशीच शांती मिळाली असती तर बरं होतं ... असो ..
गांगूलीला पुढील आयुक्ष सुखा-समाधानाचे जाओ !!
ता.क.: रुपाली या 'नामा'चा मिवावर कोणी रुपाली असल्यास तिच्याशी काहीही संबंध नाही , असेल तो योगायोग समजावा. ता.क. संपले
----------------------------------------------------------------------------------------(गांगूली आणि रुपाचा फॅन- टौरव टांगूली)
प्रतिक्रिया
18 Oct 2008 - 3:34 pm | श्री
जबरदस्त भारदस्त आढ|वा
मी आपली १० धावांची सेंच्युरी झाली की (एकदा बॅट रुपाली कडे दाखवून) तीच बॅट चपट्याला (रुपालीचा छोटा भाऊ चपट्या ) देत असे ..
पात्र परिचय मस्तच.....
18 Oct 2008 - 3:43 pm | ऋषिकेश
टारोबा! मस्त लेखन.. आवडले..
सौरवचेही अभिनंदन
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
18 Oct 2008 - 3:46 pm | जैनाचं कार्ट (not verified)
टा-या तुझ्या अँड्रिनलीनला कन्ट्रोल मध्ये ठेव बॉ ... नाय तर कधी ऊतू जाईल ;)
दादाचं देखील अभीनंदन !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
18 Oct 2008 - 3:57 pm | लिखाळ
छान लेख..
गल्लीतले क्रिकेट, ग्लॅमर, रुपाली, १० रन्स ची सेंच्युरी हे सर्व आवडले.. मजा आली.
गांगुलीचे सुद्धा अभिनंदन.. त्याने शर्ट काढून गोर्यांचा घेतलेला बदला हा प्रकार फारच आवडला होता .. जशास तसे !
--लिखाळ.
18 Oct 2008 - 5:11 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
अच्छा है अच्छा है
18 Oct 2008 - 5:12 pm | अवलिया
येहिच मै बी बोलता है
18 Oct 2008 - 9:12 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
सर्व रुपाली ९ धावांचे कव्तिक करतील असे नाही. धावा वाढवण्याकरिता वी मध्ये खेळावे.
स्ट्रेट बॅट ने खेळ्णे उत्तम. उगाच रिवर्स स्विप, पेड्ल शॉट खेळू नये. मग १०० धावा नक्की.
स्ट्रेट ड्राईव चा उप्योग करावा. मागे कोणी फिल्डर नस्तो.
18 Oct 2008 - 9:42 pm | छोटा डॉन
=)) =)) =))
प्रभुसर म्हणाजे अशक्य आहेत ....
अक्षरशः मरुस्तोवर हसलो प्रतिक्रीया वाचुन, नशिब आज हापीसात नव्हतो नाहीतर कंपनीवाल्यांनी शांतता भंग केली म्हणुन तंबुचा रस्ता दाखवला असता व आम्ची हिटविकेट पडली असती ....
लगे रहो ...
एक फुक्कटचा सल्ला : डावाच्या सुरवातीपासुनच हाणामारी करु नये, आधी जम बसवु मगच बाकीची इनिंग खेळावी ...
स्वगत : संपादक मंडळ हाणणार आता आम्हाला ...
बाकी टौरव टांगुली, लेख एकदम अप्रतिम !
मनातल्या भावना पोहचवल्यास, हाबिणंदण ....
सौरव आहेच शेर, प्रॄव्ह करायची गरज नाही तरी बिनडोक टिकाकार न निवडसमीतीला चांगलीच चपराक मारली ...
आम्हाला आनंद झाला ...
शेर म्हातारा झाला तरी आपल्याच टेचात व फोर्मात राहतो हे मात्र नक्की पुन्हा सिद्ध झाले ....
शिवाय "टेंपररी फॉर्म आणि क्वालिटी" यांची व्याख्या पुन्हा एकदा स्पष्ट केली ....
छोटा टॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Oct 2008 - 10:31 pm | फटू
मस्त चान्सपे डान्स किया की... आयला काय जबरदस्त साम्य शोधलंत...
मालक, सगळीकडे तुम्हाला "तेच" दिसतं का हो ? =)) =)) =))
बाकी टारू साहेबांनी दादाला दिलेली सलामी मनाला भावली...
(क्रिकेट फारसं न आवडणारा वायझेड)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
19 Oct 2008 - 11:24 am | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
मी क्रिकेट वर धावा वाढव्ण्याकरिता सर्वमान्य सल्ला दिला. त्यात तुम्हाला कशाबरोबर साम्य दिसले बॉ?
19 Oct 2008 - 12:49 pm | फटू
हे म्हणजे अगदी "मी नाही त्यातली आणि..." असं झालं... किंवा अगदी असंही असू शकतं की, आमच्याच डोक्यात भलते सलते किडे वळवळत आहेत...
(साम्य शोढणारा)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
20 Oct 2008 - 8:57 pm | झकासराव
=)) =)) =))
विप्र
टारु मस्त रे.
गांगुल्याने शतक मारल्याने त्याची निवृत्ती शानदार होणार.
शिवाय मॅच जिंकल्याचा बोनस उद्या मिळेलच. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
18 Oct 2008 - 9:24 pm | अनिता
आधी वाट्ले की सांम॑तकाका॑चा लेख आहे...छान लिहीले आहे दद्दा बद्दल..
20 Oct 2008 - 1:42 am | टारझन
अनिताजी आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. आपल्या प्रतिक्रीयांना मला लिहायला हुरूप येतो.
अजुन १००० लेख लिहू आणि आपल्याला असाच आणंद देऊ .
सौरव्,सचिन,राहुल काय असाल तां ....
- टार्कृष्ण टारंत
( सामंत सर आदरणीय आहेत , कृ.प्रतिक्रीया हलकी घेणे)
18 Oct 2008 - 11:32 pm | सागर
टारझन महाराज .... की जय...
एकदम मनातले शब्द तुम्ही उतरवलेत....
आपण तर सौरव गांगुलीचा पहिल्यापासूनचा फॅन आहे. खर्या वाघासारखा लढला मर्द.त्याच्याविरुद्ध बोलणार्यांची तोंडेच बंड करुन टाकली पट्ठ्याने... जियो मेरे शेर जियो....
आता ज्यांनी त्याला बाजूला केले तेच त्याच्यामागे फिरतील रिटायरमेंटचा निर्णय बदलावा म्हणून.
पण सौरव वाघाची अवलाद आहे , तो आला, त्याने सिद्ध केले आणी तो गेला... असेच होईल.
परत तो कोणाची मेहेरबानी मिळवण्यापेक्षा मानाचे निवृत्तीचे आयुष्य जगणे पसंत करेन.
भारताचा सर्वात यशस्वी आणि आक्रमक कप्तान आणि एक यशस्वी झुंझार फलंदाज म्हणून क्रिकेट जगतात त्याचे नाव अजरामर झाले आहे यात शंका नाही.
सौरव दा .... तुम हमेशा हमारें दिलमें रहोगे ..
(सौरव फॅन) सागर
19 Oct 2008 - 11:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
टारुबाळ, तू काय लिहून ठेवला होतास की काय लेख, कंप्यूटरवर नाही तर डोक्यात? एकदम चोक्कस आहे. आणि राहून राहून डोक्यात विचार येतोय की तू हा लेख रूपालीसाठी लिहिलास का दादासाठी? :-D
आणि आतातर जेनपण तुझा लेख वाचू शकते! ;-)
टारू आणि लिखाळपंत, गांगुलीचे सुद्धा अभिनंदन.. त्याने शर्ट काढून गोर्यांचा घेतलेला बदला हा प्रकार फारच आवडला होता .. जशास तसे
याचा अर्थ असा का की गांगुलीनी शर्ट काढणं हे एवढं त्रासदायक असतं की त्यामुळे इतरांचा बदला घेता येतो? ;-)
विप्रकाका, तुमचे पाय धरायचेच आहेत. पुढच्या आठवड्यात ठाण्याला येतच आहे मी!
अदिती (/आज्जी)
19 Oct 2008 - 12:11 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
काकु पण तुझी वाट बघते आहे.
20 Oct 2008 - 9:04 pm | mina
मस्तच लेख लिहला आहे..आपल्याला छान वाटला..लयं भारी..
आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)