सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
28 Jul 2014 - 4:27 pm | प्रसाद१९७१
जालावरुन काय घ्यावे आणि काय घेउ नये ह्याची समज असली तर काहीच अडचण येत नाही.
पुस्तके, मोबाईल, इलेक्ट्रिनिक गोष्टी, शूज्, पडदे अश्या अनेक गोष्टी जालावर मस्त मिळतात.
28 Jul 2014 - 4:27 pm | कविता१९७८
शक्यतो मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम वर फसगत होत नाही हा माझा वैयक्तीक अनुभव
28 Jul 2014 - 4:54 pm | वेल्लाभट
नक्कीच आहे. आणि खरं बघायला गेलं तर धोका प्रत्यक्ष खरेदीतही आहे की. त्यामुळे ऑनलाईन खरेदी म्हणजे मग किती सेफ वगैरे असे प्रश्न एकांगी होतात. तेंव्हा,
१. प्रचलित संकेतस्थळांवरूनच खरेदी करणे
२. संकेतस्थळाचा पत्ता एचटीटीपीएस ने सुरू होतो याची खात्री करणे (पेमेंट गेटवे)
३. शक्यतो सायबर कॅफेतून खरेदी न करणे
या खबरदा-या घ्याव्यात.
आता उरला वस्तूबाबत फसगतीचा भाग. तर मला तरी असा वाईट अनुभव नाही. अन्नेक गोष्टी मी ऑनलाईन घेतो. एक दोन वेळा गोष्ट तुटकी आली होती, वर्णनाप्रमाणे नव्हती, तेंव्हा ती परत केली. तीही प्रक्रीया अतिशय स्मूथ होती. गोष्ट घरून पिकअप करून नेली, व पैसे क्रेडिट झाले (पॉइंट्स च्या स्वरूपात). अर्थात मी इतर गोष्टी घेताना ते वजाही झाले.
बूट्/चपला, कपडे अशा गोष्टी मी घेत नाही. त्यात साईझ चा लफडा होतो. बाकी इलेक्ट्रॉनिक्स, पर्फ्यूम्स, आणि सानस/फिटिंग ची भानगड नसणारं काहीही घेण्यात प्रॉब्लेम नाही उलट सोयच आहे.
28 Jul 2014 - 4:56 pm | वेल्लाभट
१ स्नॅपडील
२ फ्लिपकार्ट
३ अमेझन
४ ईबे
या बेस्ट
28 Jul 2014 - 5:11 pm | धन्या
ही दोन खरेदी-स्थळे अगदी डोळे झाकून खरेदी करावीत ईतपत चांगली आहेत.
आपल्याला उत्तम वस्तू मिळावी याची काळजी जेव्हढी खरेदीदाराला असते तेव्हढीच खरेदीदाराचा आपल्याकडे खरेदी करण्याचा अनुभव सुखद असेल याची काळजी या दोन खरेदी-स्थळांना असते.
मात्र अॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रीटेल" सप्लायर असणार्या वस्तू खरेदी कराव्यात.
28 Jul 2014 - 5:15 pm | NiluMP
<मात्र अॅमेझॉन इंडीयावर खरेदी करताना "आमेझॉन फुल्फिल्ड" आणि फ्लिपकार्टवरुन खरेदी करताना "डब्ल्यू एस रील" सप्लायर असणार्या वस्तू खरेदी कराव्यात.> धन्यवाद
28 Jul 2014 - 6:11 pm | आदूबाळ
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे.
28 Jul 2014 - 6:40 pm | बॅटमॅन
फ्लिपकार्टी =)) =)) धन्य _/\_
28 Jul 2014 - 6:50 pm | धन्या
धंद्याचा विचार करावा लागतो मालक. Amazon Fullfilled वर रकमेचे बंधन नाही कारण त्यांचा अजून भारतीय आंतरजाल बाजारपेठेत जम बसायचा आहे.
29 Jul 2014 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्लिपकार्टी माजली आहेत हल्ली. बारक्या रकमेसाठी फ्री होम डिलिवरी बंद केली आहे.
१०० ट्क्के सहमत.
-दिलीप बिरुटे
28 Jul 2014 - 4:58 pm | आदूबाळ
कोणाला गमट्री या वेबसाईटचा अनुभव आहे का?
(आयला! स्वसंपादन!)
28 Jul 2014 - 5:06 pm | पिलीयन रायडर
खरं की काय?!
खरंच की!!!!
28 Jul 2014 - 6:12 pm | आदूबाळ
गेलं आता. इट वॉज टू गुड टू बी ट्रू...
28 Jul 2014 - 6:45 pm | पिलीयन रायडर
खरंच की काय???
(ह्याच्या खाली खरंच की! अशी ओळ असेल तर.. सॅडली इट्स ट्रू)
28 Jul 2014 - 6:46 pm | पिलीयन रायडर
नसेल तर*...
द्या की राव संपादन.. बरं नव्हतंच द्यायचं तर थोडावेळ तरी कशाला सुरु केलं?
28 Jul 2014 - 6:51 pm | बॅटमॅन
नै तं काय? उगा एस एस पी डी (स्वसंपादन पे धोका) केला राव आमचा.
28 Jul 2014 - 7:37 pm | सूड
>>एस एस पी डी
__/\__
28 Jul 2014 - 8:18 pm | विअर्ड विक्स
online खरेदीसाठी Filpkart बेस्ट... वेल्लाभट यांनी सांगितल्याप्रमाणे Sizecha घोळ होतो खरा... पण मला Quechua चे shoes ची Size replacement दोन दिवसात कोणताही खर्च न करता मिळाली. याचे कारण FLIPKART चे स्वतःचे Logistics आहे.
28 Jul 2014 - 8:26 pm | एसमाळी
online shopping चा चांगला अनुभव आहे.
amazon and homeshop18 चा चांगला अनुभव आहे.
cash on delivery चा पर्याय कायम आवडतो.
28 Jul 2014 - 8:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
होमशॉप १८ वरुन शक्यतो खरेदी करु नका. डुप्लिकेट वस्तु गळ्यात मारतात. बाकी फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्नॅपडिल्स मस्त आणि विश्वासार्ह आहेत. शक्यतो कॅश ऑन डिलीव्हरीच घ्या.
28 Jul 2014 - 9:38 pm | NiluMP
अगदी बराबर.
28 Jul 2014 - 8:44 pm | vrushali n
आलाय,मिंत्रा.कॉम , फ्लिपकार्ट. कॉम आणि जॅबाँग.कॉम नेहमी ३७ % ते ४०% ओऑफ देतात् +अऑथेंटीक प्रॉड्क्ट्स
मज्जानु लाइफ
28 Jul 2014 - 9:33 pm | रेवती
अॅमेझॉनने माझी दोन छोटी पार्सले एक ८ महिन्यांपूर्वी व दुसरे ३ महिन्यांपूर्वी मागवलेले अजून दिले नाहीये. त्या वस्तू ष्टॉकमध्ये नाहियेत म्हणे!
29 Jul 2014 - 6:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्यांच्या संमंला...आपले कस्टमर केअरला इचारून बघा ना.
29 Jul 2014 - 6:29 pm | पिलीयन रायडर
उडणार बहुदा!!
पण तरी... खिक्क!!!
29 Jul 2014 - 7:21 pm | रेवती
त्यांच्या संमंने ष्टॉक आला की पाठवतो, हितं दुसरी कामं न्हैत काय? सारखं इच्चारायचं काम नै, आपल्याला आसलं आयकून घ्याची सवे न्हाई! असं उत्तर पाठीवलय.
29 Jul 2014 - 7:23 pm | प्यारे१
सगळीकडं एकाच दुकानातनं एकाच मजकुराचे श्ट्याम्प जातेत काय? ;)
29 Jul 2014 - 7:26 pm | रेवती
हाव! तसं ट्रेनिंगच आस्तय! नाईतर लोकं जगू द्याची न्हाईत!
29 Jul 2014 - 7:28 pm | धन्या
तुमी आमेरिकेत हाव ना. मंग सू करा ना त्याना.
त्याना सांगायचा, मी आर्डर ठेवली तवा तुमच्या शिष्टीमनी वस्तू हायेत म्हनून दाकवलान. आता ष्टॉकमदी नाय तं तो तुमचा प्रॉब्लेम हाय.
29 Jul 2014 - 7:48 pm | रेवती
आरे भावा, ३ $ चे मिक्सरचे झाकण आणि अशीच दोन की तीन डॉलरची एक मिक्सरची रिंग (गास्केट) एवढेच र्हायलेय म्हणून गप्प बसलेय. एकदा तर अनेक वस्तूंबरोबर मागवलेली सन ग्लासेसची केस ५$ असून त्यांनी चायनातून पाठवली. वाईट वाटले की त्याच्या प्याकिंगवर जास्त खर्च केला होता त्यांनी. आता बहुतेक मिक्सर मोडणार आणि नवा घेतल्यावर यांच्या वस्तू येणार. जाऊ दे! क्यानसल करते.
29 Jul 2014 - 7:53 pm | धन्या
तुमचा हा प्रतिसाद वाचून मला मनाच्या श्लोकांमधली "दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू ॥" ही ओळ आठवली. :)
29 Jul 2014 - 7:55 pm | प्यारे१
धन्या, लग्न झालं की कळेल.
दीनाचा दयाळू की नव्याचा आशाळू ते. ;)
29 Jul 2014 - 8:04 pm | रेवती
प्यारे काकांना आज लैच गफ्फा मारायच्यात जनु!
29 Jul 2014 - 8:12 pm | प्यारे१
ईद मुबारका जी ईद मुबारका! ;)
29 Jul 2014 - 8:03 pm | रेवती
छे! कनवाळू काय? ५$ च्या वस्तूला इतके प्याकिंग होते! किंवा अनेक वस्तूंबरोबर पोष्टाची तिकिटेही मागवली. तर ८ लहान वस्तूंची ८ छोटी बॉक्सेस आली. काय उगीच वाया घालवायचं! असं वाटलं. पोस्टाच्या तिकिटांच्या एका पट्टीला एक साधे पाकीट, दोन जाड पुठ्ठ्याची पाकिटे आणि हे सगळे एका बॉक्समध्ये! हे म्हणजे पार्सल नको पण पॅकिंग आवर म्हणावेसे वाटते. ;) शूज मात्र ऑनलाईन मागवायला आवडतात कारण तिथे जास्त व्हरायटी असते. दुकानात इतके प्रकार बघायला मिळत नाहीत.
28 Jul 2014 - 10:17 pm | मदनबाण
ऑनलाईन खरेदीचा काही अनुभव अजुन तरी नाही...
पण या ऑनलाईन खरेदीच्या मागे असणार्या सिस्टमवर थोडे फार काम केलं आहे, ज्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट { TMS } आणि इआरपी असे म्हणतो ... अमेरिकेतली मोठी आणि जगातल्या सगळ्यात मोठी होलसेल टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट डिस्ट्रुब्युटर असलेल्या कंपनीसाठी हे काम केल आहे, त्यामुळे अॅमॅझॉन किंवा फ्लीपकार्ट बॅक एंड ला कसे काम चालते याचा थोडाफार अंदाज आहे... अगदी उदा. द्यायचे असेल तर ख्रीसमस असेल, थॅक्स गिव्हींग असेल किंवा फलाणा फलाणा ऑफर चालु असेल तर नेहमीच्या वस्तुंचे दर हे कमी केलेले असतात, आता हे दर कुठे तरी अपडेट केले जातात, हे ज्या ठिकाणी केले जातात त्या सिस्टीमचा किंचीतसा भाग मी पाहिला आहे...
आता हा ऑनलाईन शॉपिंगचा विषय असल्याने ४ ओळी खरडण्याचे कष्ट घ्यावे म्हणतो... ;)
तर जालावर सध्या चर्चा आलु आहे ती म्हणजे अलिबाबाची... अलिबाबा आणि चाळीस चोरवाला हा अलिबाबा नव्हे बरं का...
तर या अलिबाबाचा आयपीओ येणार आहे, जो सध्या काही काळ लांबणीवर गेल्याची चर्चा आहे....या आयपीओ मधुन अलिबाबा १५ ते २० बिलीयन युएस डॉलर्स जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेण्या आणि ठेवण्यासारखे आहे की एकट्या अलिबाबाचा सेल्स हा अॅमॅझॉन + ईबे सारख्या कंपन्यांपेक्षा जास्त आहे.
आता... इथे बरेच खिलाडी आहेत...त्यात गुगल सुद्धा आहे. {गुगल कुठे नाही ? ;) } मध्यंतरी गुगले ने त्यांचा सर्च अल्गोरिदम बदलला होता आणि त्याचा फटका ईबे ला बसला होता. हे सगळं झालं ते गुगल ने पांडा ४.० रोलआउट केल्यामुळे.
हे सगळ असं का झालं ? या सगळ्या बद्धल इथे माहिती मिळेल :-
Deconstructing eBay.com’s Organic Loss Using SEMrush
How Google's Latest Algorithm Update Hurt eBay
बरं ईबे ची स्थिती अजुन एका गोष्टीमुळे खराब झाली होती की त्यांच्या जवळपास १४५ मिलीयन युजर्सची अकाउंटस हॅक केली गेली, आणि ईबे ला आपल्या युजर्सनी त्यांचे पासवर्ड बदलावे ही सांगण्याची वेळ आली.
संदर्भ :- EBay asks 145 million users to change passwords after cyber attack
बरं इथे अलिबाबाचे वेगवेगळे डील करण्याचे उध्योग चालुच आहेत त्यातलीच एक याहु बरोबरची रिस्ट्रक्चरींग्ची डील.
संदर्भ :- Alibaba ClosesUS$7.6 BillionShare Repurchaseand Restructuring of Yahoo! Relationship
थोडक्यात :- चीनी अलिबाबा येत आहे. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu
28 Jul 2014 - 10:18 pm | खटपट्या
वर धान्याने सांगितल्याप्रमाणे अमेझोन वर डोळे झाकून खरेदी करावी.
29 Jul 2014 - 10:11 am | श्रीमान
होमशॉप ग्राहक सेवेचा वाइट अनुभव आहे, फक्त आश्वासने देतात, तसेच नकारात्मक रिवव्हू पोस्ट करत नाहित.
कोनतिहि online खरेदि करन्यापुर्वि http://www.mouthshut.com वर वस्तु किंवा साईट चे रेटिंग व रिव्हू तपासुन पहा उपयोग होतो.
flipcart, amazon, infibeam चा अनुभव उत्तम, shopclues, tradus वस्तु हलक्या quality च्या असतात.
29 Jul 2014 - 12:07 pm | पिलीयन रायडर
फ्लिपकार्ट्चा अनुभव उत्तम.. चक्क २४ तासात सुद्धा पुस्तकं मिळाली आहेत.. किमती पण कमी असतात..
29 Jul 2014 - 1:32 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. अॅमेझॉनचाही अण्भव अत्युत्तम. आम्रविका आणि भारत दोन्हीकडून पुस्तके मागवली. ऑनलाईन वर्णनास सुसंगत प्रॉडक्ट होता.
29 Jul 2014 - 2:27 pm | मोग्याम्बो
पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर flipkart पेक्षा amezon खूप स्वस्तात पुस्तके विकतात.
बाकी online shopping करताना सर्व संकेत स्थळांवर वस्तूची तुलना करून ती विकत घ्या. Flipkart सध्या खूप महाग दरात वस्तू विकत आहे.
शक्यतो cash on delivery चा पर्याय निवडा. जर credit / debit / internet banking वापरले असेल तर browser ची history मात्र न विसरता delete करा.
29 Jul 2014 - 2:46 pm | धन्या
सहमत.
याच्याशीही सहमत. Flipkart ऑनलाईन खरेदी करताना ती वस्तू आमेझॉन इंडीया वर उपलब्ध आहे का पाहावे. अॅमेझॉनवर वस्तू फ्लिपकार्टपेक्षा स्वस्त मिळतात असा माझा आमेझॉन इंडीया सुरु झाल्यापासूनचा अनुभव आहे. :)
हे कशासाठी?
29 Jul 2014 - 7:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>हे कशासाठी
मनाचे समाधान. शिवाय वेब applications कशी चालतात याबद्दलचे गैरसमज वगैरे वगैरे.
29 Jul 2014 - 2:50 pm | पिलीयन रायडर
अॅमेझॉन वर बाकी वस्तु पण चांगल्या मिळतात का?
29 Jul 2014 - 3:13 pm | धन्या
आम्ही आमच्या एका भटजी मित्रासाठी मोटो ई फोन मागवला होता. चांगला चालतोय म्हणे.
पुस्तके खरेदीसाठी अॅमेझॉन इंडीया सारखे दुसरे खरेदीस्थळ नाही.
29 Jul 2014 - 3:28 pm | प्रचेतस
मोटो इ फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव आहे. तुम्हास तो अमेज़न वर कसा काय मिळाला?
29 Jul 2014 - 3:44 pm | पिलीयन रायडर
हाच प्रश्न पडला...
29 Jul 2014 - 4:07 pm | धन्या
माफी असावी. गडबड झाली.
29 Jul 2014 - 6:07 pm | चौकटराजा
भटजी कडे असलेल्या तोफखान्याला फ्लिप्कार्ट घाबरले व त्यानी एक्स्क्लूजिव्ह चा क्लेम सोडून दिला अशी शिंव्हगड रस्ता नेटवर्क वर न्यूज आहे म्हणे.
29 Jul 2014 - 5:22 pm | उदय के'सागर
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे फ्लीपकार्ट आणि अमेझॉन चा चांगला अनुभव आहे - विश्वासार्ह अश्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स.
स्नॅपडिल चा मात्र अनेकदा वाईट अनुभव आला आहे. त्यांच्या प्रोडक्ट च्या किमती तुलनेने कमी असतात पण क्वॉलीटीशी फार कॉम्प्रमाईज करून घ्यावं लागतं. अत्ता पर्यंत मागवलेले क्वील्ट, पर्स काही खेळण्या फार कमी दर्जाच्या आहेत. हिम्मत करून एकदा मायक्रोव्हेव मागवला तर अक्षरशः एका बाजूने तो चेपला होता. अर्थात हे कुरीयर वाल्यांकडून झालं असावं पण तो परत करता करता आणि 'रिफंड' मिळवता मिळवता नाकी नऊ आहे आणि हाती काही न येता खूप काम वाढ्लं (ते डॅमेज प्रोडक्ट चे फोटो काढा, पाठवा, फोन वर फॉलोअप घ्या, त्यांच्या दिवसातून येणार्या ४-४ कॉल्स ला तीच तीच उत्तरं द्या) .. त्या अनुभवा नंतर स्नॅपडील चं नाव यादीतुन कायमचं वगळलं.
कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा, जेबाँग शिवाय 'झोवी' zovi ह्या साईट वर ही चांगला अनुभव आला. फास्ट डिलीवरी आणि एक्स्चेंज्/रिटर्न खुप सोप्प विना कटकट :)
30 Jul 2014 - 3:42 pm | शिद
आजच्या म.टा. मधील बातमी: ऑनलाइन शॉपिंगमध्ये ‘फ्लिपकार्ट’चं लय भारी!
31 Jul 2014 - 11:04 am | विअर्ड विक्स
Group on deals चा अनुभव असल्यास कृपया share करा.....