गेल्या एक-दिड वर्षात वेळेअभावी दुर्ग भ्रमंती जवळपास धूमकेतूसारखी झाली होती . या वर्षी मात्र त्या सर्वाची भरपाई करायची असे मनात होते. जूनपासून कचकून जवळपास प्रत्येक शनिवार-रविवार दुर्गभ्रमंती करायचीच असा संकल्प सोडला नि तो बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.चला….आत्मस्तुती पुरे झाली. मुद्द्यावर येऊ या ... तसे आम्ही मुंबईकर मुद्द्यावर येण्यास जास्त वेळ लावत नाहीच म्हणा ... असो... दुर्गभ्रमंती करायची हौस तर फार भारी पण ती एकट्याने करण्याइतकी माझी इच्छाशक्ती माझ्या काही मित्रांइतकी दांडगी नाही. (थोडक्यात एकटे जायला ….. समजून घ्या). मुंबई हायकर्स संकेतस्थळावर वेळापत्रक पाहून ,बोरिवलीतील एका जुन्या जाणत्या ग्रुपबरोबर जायचा प्लान नक्क्की केला.हरिहर गडापासून नाशिक नि कसारापर्यंतच्या अंतराची लांबी रुंदी किसन भाऊंनी त्यांच्या लेखात दिल्यामुळे येथे लिहिणे टाळत आहे .
२८ जुन च्या रात्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर भेटायचे ठरले . बस प्रस्थान वेळ १०.३० ची जरी असली तरी भारतीय प्रमाण वेळेनुसार आम्ही ११.३० ला प्रस्थान केले. आमच्या ग्रुपबरोबर एक SUV सुद्धा होती. SUV ची मजा पुढे सांगीनच म्हणा ! वाटेत घोडबंदर रोडजवळ एक pickup point होता .हा pickup point अत्यंत महत्वाचा होता. कारण येथे चढणाऱ्या व्यक्तीजवळ बसचे परवाना पत्र होते नि हा पठ्ठ्या ते घरीच विसरून आल्यामुळे halt थोडा लांबला.नंतर जी गाडी सुटली ती थेट कसाऱ्याजवळ एका धाब्यावर . रात्री २.३० वाजता जेवण , चहा नि वेफर्स अर्ध्या झोपेत खायची जी एक मजा असते ती फक्त ट्रेकरच जाणतात . आमचा ग्रुप तसा बऱ्या पैकी मोठा असल्याने सकाळी न्याहारी त्रिंबकेश्वरला करण्याचे ठरले.त्रिंबकेश्वर हे जरी प्रसिद्ध ज्योतीर्लिंग असले तरी भाविकांच्या सोयी (ट्रेकरच्या नव्हे! त्यांना खायला कोंडा नि निजेला धोंडा सुद्धा चालतो ) यथातथाच आहेत .आमच्या ग्रुप मध्ये मुली नि महिला सुद्धा असल्याने त्यातल्या त्यात बऱ्या पैकी हॉटेल निवडतांना जर अडचणच झाली . त्रिंबकेश्वर नि हरिहर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा हे बऱ्या पैकी लांब आहे . जवळपास पाऊण तासाचे बस ने अंतर . त्यामुळे उशीर होऊ नये म्हणून थोडे निरीछेनेच आम्ही त्रिंबकेश्वाराचे दर्शन न घेताच निघालो . नि रस्ता चुकत किमान दीड पाऊणे दोन तासांनी आम्ही निरगुडपाडा ला पोहोचलो . निरगुडपाडा ला उतरल्यावर गडाकडे तोंड करून उभे राहिले असता उजव्या हाताला त्रिंबकेश्वर तर डावीकडे इगतपुरी आहे . किसन भाऊ ज्या वाटेने आले ती वात निरगुडपाडाहून त्रिंबकेश्वरच्या दिशेने गेले असता कोटमवाडी गाव लागते. तर सांगायचा मुद्दा हा कि निरगुडपाडा शाळेच्या थांब्याला उतरले असता उजव्या हाताला हरिहर किल्ला आहे . शेतातून चालण्यास सुरुवात केली असता उजव्या हाताला एक विहीर लागते त्या विहिरीच्या उत्तर दिशेने आपणास चढाई करावी लागते . रस्ता चांगला आहे . थोडेसे वर गेल्यावर एक चकवा आहे . या ठिकाणी आपण उजव्या हातास गेले असता एक ओहोळ लागतो . तो ओहोळ पार केला कि समजावे आपण रस्ता चुकलात !!!!! या किल्लाच्या पठारावर पोहोच्तांना आपणास कोठे हि ओहोळ पार करावा लागत नाही हि खुण गाठ बांधून मार्गक्रमण करावे .पायथ्यापासून तासा-दीड तासात आपण गडाच्या पठारावर पोहोचतो .आमच्या जनतेतील 25% जनता हि दुर्ग भ्रमंतीचा आज पहिला नारळ सोडणार होती. त्या मुळे येथे पुन्हा एकदा छोटी न्याय्हारी झाली . पठारावरून फक्त कॅमेराने निसर्ग सौंदर्य बंदिस्त करावेत अशी अनेक ठिकाणे आहेत . छायाचित्रातून व ८० degree च्या वर्णातून जितकी धडकी भरते तितक्या त्या पायऱ्या, नाशिक range मध्ये नियमित ट्रेक करणाऱ्यास नक्कीच भयावह नाहीत . याउलट येथे प्रत्येक पायरीस डाव्या नि उजव्या बाजूस पकडण्यासाठी खोबणी दिली आहे .ज्यांना उंचीची भीती वाटते त्यांनी उतरतांना सुद्धा पायऱ्या कडेच तोंड करून उतरल्यास काही अवघड वाटत नाही . स्वानुभवावरून सांगतोय .. आमच्या ग्रुप मधल्या दोन महिला ४०च्या अससतील , व आयुष्यातील हा त्यांचा पहिलाच दुर्गानुभव होता तरीसुद्धा त्यांना काही अडचण आली नाही . पायर्या वर चढून गेल्यावर गणपतीचे नि बहुचर्चित नेढ्याचे दर्शन होते . नेढ्याला पार करून थोडासा एक अवघड patch पार केल्यावर खरी सुरुवात होते भयावह पायऱ्याची ..... या पायऱ्या जवळपास गुढघाभर उंचीच्या आहेत .नशीब एवडेच कि या पायऱ्या कातळात कोर्ल्यामुळे दोन्ही बाजूला कातळ असल्याने जोराचा वारा नि पावसात सुद्धा नैसर्गिक सरंक्षण लाभून सावकाश उतरता येते . गडावर पाण्याची वानवा नाही . आम्ही जुनच्या तिसर्या आठवड्यात जेव्हा उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या सावलीत होता ( अजूनही आहे !) तेव्हासुद्धा गडावर भरपूर पाणी होते .गडावर एक इमारत आहे . या इमारतीच्या जवळपास अनेक पाण्याची कुंडे आहेत, पण ती पिण्यालायक नाहीत. त्यापैकी एका कुंडाची आमच्या ग्रुपप्ने थोडी फार सफाई केली . या कुंडात एक पाण साप सुद्धा आहे. (वाटेत जातांना मण्यार बघितली ती वेगळी ! एक trek नि २ snake. साप दिसणे हे ट्रेकर शुभ शकुन मानतात ;) ). गडावर वानर सेना पण आहे , पण संख्या तुरळक नि नाथ पंथीयाच्या सहवासाने थोडी विनम्र वाटत होती .(हातातल्या वस्तूंच्या मागे अधाश्यासारखे पाहून खेचाखेच करत नाहीत ).इमारतीजवळ उभे राहिले असता गडाचे वर एक टोक दिसते , जेथे भगवा मानाने फडकतांना दिसेल . त्या टोकावर उभे राहिल्यास त्या टोकाला समांतर एक कुंड आहे . ह्या कुंडाचेच पाणी प्यावे .ह्या कुंडाजवळ चिखल असला तरी त्या चिखलाचे पाय त्या कुंडात धूउ नये . ( एका दुर्गाडूची दुसर्या दुर्गाडूला नम्रावजा सूचना ). गडावर मस्त पेटपूजा झाल्यावर परतीचा रस्ता धरला .आम्हाजवळ स्वताचे वाहन असल्यामुळे आम्ही हरिहर -कावनई अशी दुहेरी मोहीम करायचे ठरवले होते . परंतु वेळेचे नियोजन चुकल्याने आम्ही केवळ कावनई गडाजवळील कुंडाचे दर्शन घेतले . सिंहस्थ कुंभ मेळ्यात येथे अनेक भाविक येतात . कुंडातील पाणी पाहून हे कुंड का डबके असा मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही .कावनई किल्ल्यावर चढाई बाकी राहिली . परंतु पायथ्याहून त्याचे डोळे भरून दर्शन घेतले.तिथल्या गडावर घोंगावणाऱ्या मधमाश्या नि मधाचे पोळे पाहून जैत रे जैत मधल्या आगाशेंची आठवण आल्यावाचून राहणार नाही .सिनेमात दाखविलेल्या डोंगरावर जशी मधाची पोळी दिसतात तशीच हुबेहूब किंवा त्याहून जास्तीच पोळी कावनई वरती आहेत .
यापुढे सुरु होतो दुर्ग भ्रमंतीचा कंटाळवाणा भाग !!!! परतीचा प्रवास . नाशिक Range मध्ये ट्रेक करतांना मुंबईकरांचा सर्वात नावडतीचा भाग म्हणजे परतीचा प्रवास . जितकी वाहन सुलभता पुणे मार्गावर आहे तितकी नासिक मार्गावर नसल्याने अक्षरशः काही वेळेस केविलवाणी अवस्था होते . परंतु आमचे स्वतःचे वाहन असल्याने ती चिंता नव्हती . अखेरीस परतीचा प्रवास सुरु झाला . वाटेतील टोलनाक्यावर अंक म्हणजेच ( अलंग मदन नि कुलंग हे दुर्गा डूंचे त्रिदेव दिसले व येत्या December मध्ये दुर्गभेटीचा मानस करून घराचा रस्ता धरला .
अरेच्चा !!!!! SUV ची गम्मत सांगायचीच राहिली. तर झाले असे कि महाशय पूर्ण रात्र driving करत असल्यामुळे त्यांनी दुर्ग भेट टाळून दुर्ग पायथा निद्रा पत्करली. गाडीत संगीत लावून गाडी ऑटो lock मोडवर ठेवून त्यांना लघुशंकेला जावे लागले नि घात झाला . माणूस बाहेर नि चावी आत. परत गाडी महागडी असल्याने नासिखून सराईत वाहन कारागीर मागवावा लागला. या फंदात गाडी चालू राहिल्याने battery दोव्न. Battery charging नि कारागिराची संध्याकाळी वाट पाहण्यात थोडा वेळ मोडला खरा पण ट्रेकला सर्वच प्लान केल्याप्रमाणे होत नाही त्यामुळे काही हरकत नाही...
या दोन भिंती ज्योतिर्लिंगाच्या जवळच आहेत. चढाइचे उत्तम ठिकाण
हरिहर किल्लाहरिहर किल्ला
wikimapia - किल्ला हरिहर आणि पायथ्याचे गाव
ता. क. - खरी माझी मोहीम तिकोना ,कलावंती नि तिसरा हरिहर अशी होती. पण किसन भाऊंचा लेख वाचून माझ्या आळशी पणाची लाज वाटली नि पहिला लेख हरिहर साठी हर हर शम्भो करीत लिहिला.
प्रतिक्रिया
26 Jul 2014 - 12:23 am | मुक्त विहारि
आवडला...
26 Jul 2014 - 9:47 am | कंजूस
छान आहे .
१)नाशिककडचा प्रवास यावर एक लेख होऊ शकतो इतक्या अडचणी येतात .पटले .खास नाशिकला सकाळी जाणारी रेल्वे नाही .इतर उप्रच्या गाड्यांबद्दल न लिहिलेच बरे .येतानाचे हाल विचारू नका .
२)शहापूर एसटी डेपो हे एक वेगळेच प्रकरण आहे .प्रत्येकवेळी एकतरी झटका असतोच .एसटी बसला सहा टायरस ,एक डिजेल इंजेन आणि पासिंजरना फक्त टेकण्यासाठी शिटा असतात हा शोध इथेच लागला .
28 Jul 2014 - 3:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
हरीहर मस्तच...बाकी कावनईपण छान आहे बरं का.मागच्या बाजुने चढाई करताना एक छोटी दिंडी/चिमणी लागते तिकडे फाटते जरा.
कपिलधारातीर्थसुद्धा एकदा भेट द्यायला छान आहे(ती तळ्यातली घाण जाउदे)
28 Jul 2014 - 4:36 pm | वेल्लाभट
कड्डक्क !
लई बेश्ट... जाणे मश्ट
28 Jul 2014 - 4:36 pm | वेल्लाभट
कड्डक्क !
लई बेश्ट... जाणे मश्ट
28 Jul 2014 - 4:37 pm | वेल्लाभट
शीर्षकाचा 'गदर - एक प्रेम कथा' वाला सूर बहुत्त्त आवडला
28 Jul 2014 - 5:01 pm | किसन शिंदे
ओहो!! तुम्ही आमच्या आधी गेला होतात म्हणजे.
वर्णन खासच.!
29 Jul 2014 - 6:58 pm | इनिगोय
खूपच थोडक्यात आवरलात लेख..
mumbaihikers.com का .org?
30 Jul 2014 - 2:19 pm | विअर्ड विक्स
धन्यवाद चूक दाखवल्याबद्दल.... com नाही org आहे ते... माझ्या बुकमार्क मध्ये असल्यामुळे com का org हे लक्षात नव्हते.
किसन भाऊंनी माझ्या आधीच लेख लिहिला होता.. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भरपूर गोष्टी लिहिण्याच्या टाळल्या.....
26 Jun 2015 - 3:59 pm | Rocky
good wrighting &enjoyful trek