तसे आपण अनेक नवीन जुने पदार्थ करून खातोच पण मला काही पदार्थ एकाबरोबर एक आवडतात...
त्यांना विशिष्ट काही नावे नाहीत ....कदाचित तुम्ही हे करून खात असाल...तसे असेल तर फारच उत्तम ....पण नसाल तर खाऊन बघा आवडतात का आणि तुम्ही पण असे काही करत असाल तर सांगा...
१. उत्तम बासमती तांदुळाचा भात + मेतकुट + तूप +साय+ दुध ...त्यावर दह्याची मोठी खाप + एक उकडलेला बटाटा +किंचित मीठ
२. दही, दुध भाताला उत्तमपैकी तूप जिर्याची आणि लाल तिखटाची फोडणी बरोबर पाव भाजीची भाजी
३. पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा
४. माणिक पैंजण + गोड ताक + ताज्या कैरीच्या लोणच्याचा खार
५. कुस्करलेली शिळी भाकरी त्याला ज्यास्त तेल मोहोरिची फोडणी बा SSSS रिक चिरलेला कांदा
६. ४ अंडी + अर्धा कप दुध + मीठ / मिरपूड एकत्र फेटून तूप/बटर वर खरपूस लाल फ्राय केलेले आम्लेट
७. चितळ्यांची बाकरवडी कुस्करून त्यावर घुसळलेले सायीचे दही किंवा टाक
८. उकडून जाडसर कुस्करलेला बटाटा + भाजलेल्या दाण्याचे कुट + तिखट मीठ;+ तूप जिर्याची फोडणी.
९. माफक उकडलेली बारीक चिरलेली फरसबी + दही + जिरेपूड + मिठाची कणी
-----------सगळ्यात डेडली ---- आता मी खात नाही पण ---तरीही
उत्तम प्रतीचे श्रीखंड त्यावर पातळ केलेले भरपूर तूप आणि वर चमचाभर पेरलेली बारीक पिठीसाखर .......
इत्यलम
प्रतिक्रिया
25 Jul 2014 - 10:09 pm | कवितानागेश
कुठलाही गोड पदार्थ+ आईस्क्रीम :)
25 Jul 2014 - 10:26 pm | रेवती
तूप मेतकूट भात + मोठा चमचा हेवी क्रीम+ लिंबाचे गोडे लोणचे. (डाएटची ऐशी की तैशी)
क्र. ६ व ७ कसे लागतील हे समजत नाहीये व श्रीखंडावर तुपाचे आकर्षण वाटले नाही.
गार गार श्रीखंड किंवा बासुंदी व गरम पुर्या, बटाटा भाजी हे डोक्यात फिट्ट बसलेय. आता एक ओळखीचे श्रीखंड व ग्लुकोजची बिस्किटे खातात ते वेगळे!
एका मैत्रिणीने सांगितलेली पाव भाजण्याची वेगळी कृती अशी की बटरात पाभा मसाला, बारीक वाटलेला किंचित लसूण, कांदा बारीक चिरून असे लावून भाजणे. मी कधी करून बघितले नाही व खाऊनही बघितले नाहीये.
ताक पिताना त्यात कुस्करलेले बाखरवडीचे कण घशाला लागले तर ठसका लागायचा.
26 Jul 2014 - 1:02 am | प्रभाकर पेठकर
त्याला 'मसाला पाव' असे म्हणतात.
पावभाजी करायचा सर्व 'मसाला' मस्त फ्राय करून त्यावर ते पाव दाबून परतायचे. उरलेला मसाला पावाच्या आत आणि वरुन लावायचा. सजावटीसाठी कोथिंबीर.
26 Jul 2014 - 5:32 am | सानिकास्वप्निल
पण "मसाला पावाचा" जो मसाला आहे त्यात कांदा, लसणाबरोबर टोमॅटो आणि ढब्बू मिरची ही बारीक चिरून पाभा मसाला घालून फ्राय करतात ना? कॉलेजला असताना अनेकवेळा मसालापाव आवडीने खाल्ला होता.
26 Jul 2014 - 9:21 am | प्रभाकर पेठकर
हो. इतर गोष्टीही त्यात असतात. पण नियम असा कांही नाहीये. आपापल्या आवडीनुसार त्यात फरक करता येतो.
25 Jul 2014 - 11:40 pm | सानिकास्वप्निल
मीसुद्धा बटरात पाभा मसाला भुरभुरून पाव भाजते ( हे माझ्या मैत्रीणीने सांगितले होते) पण लसूण, कांदा घालून भाजला नाही कधी.
बाकी श्रीखंडावर तुप!! नको नको.. कल्पना पण करवत नाही.
काहीजणं आमरसाबरोबर पुपो ही खातात तर काही पुपोबरोबर आंब्याचे लोणचं (ते मस्तं)
माझ्या साबांना शिर्याबरोबर आंब्याचे लोणचं खायला आवडतं.
गुरगुरट्या भातात लसणीची चटणी + तूप कालवून घ्यायचे व तोंडीलावायला लिंबाचे गोड लोणचे , मला हे काँबि खूप आवडतं.
चिकनचा रस्सा उरला असल्यास त्यात कुस्करलेली पोळी किंवा भाकरी, त्यावार बारीक चिरलेला कांदा.
26 Jul 2014 - 12:17 am | मुक्त विहारि
१. बटाट्याचे वेफर्स, बियर मध्ये बुडवत-बुडवत खाणे.
२. उकडलेला बटाटा + तिखट+ तेल व थोडेसे मीठ, पोळी बरोबर खाणे.
३. वांग्याच्या भाजी वर तेल + लसूण चटणी घालणे.
४. पुरण-पोळी + आमरस (तो पण फक्त केशर आंबा असेल तरच) + चांदीच्या वाटीत साजूक पातळ तूप.
५. सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की बरोबर खारे काजू किंवा खारे पिस्ते किंवा खारे दाणे.
ब्लेंडेड स्कॉच व्हिस्की असेल तर चिकन तंगडी कबाब.
भारतीय व्हिस्की असेल तर तळलेली कोलंबी आणि भरलेले पापलेट.
६. थालीपीठ असेल तर, ताक्+मीठ्+तिखट. (थालीपीठ आणि लोणी एकदाच खावून बघीतले.थालीपीठाच्या खमंग पणाला लोणी किंवा दही मारक ठरते, असे माझ्या जीभेला जाणवले, तेंव्हापासून ते खाद्य-मिश्रण बाद...)
७. गवारीची भाजी असेल तर, आंब्याचे लोणचे आणि दाण्याची चटणी (आमची सौ. गवारीची भाजी करतांना दाण्याच्या कुटात हयगय करत नाही पण मला अज्जून दाण्याचा कुट हवाच असतो.)
बादवे,
हे "माणिक पैंजण" काय आहे?
26 Jul 2014 - 12:59 am | प्रभाकर पेठकर
फोडणीचा भात आणि कुस्कुरा (फोडणीची पोळी)
26 Jul 2014 - 2:22 am | बहुगुणी
Manik painjan असा गूगल वर शोध घेतला याच पाककृतीच्या अनेक व्हेरिएशन्स दिसतायेत. पण मीही 'माणिक पैंजण म्हणजे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे' असं ऐकलेलं आठवतं आहे....
26 Jul 2014 - 8:03 am | अत्रन्गि पाउस
हे फोडणीच्या पोळीचं रसिक नाव आहे अशा अर्थीच मी मानतो...बाकीची व्हेरीयेश्न्स बघतोच :)
23 Sep 2015 - 11:39 am | बोका-ए-आझम
मनोहारी असा शब्द सांगितला - फोडणीच्या पोळीसाठी. नाशिक - त्र्यंबकेश्वर भागात खूप प्रचलित आहे.
26 Jul 2014 - 1:13 am | बहुगुणी
माणिक पैंजण या पदार्थाची एक कृती इथे आहे.
26 Jul 2014 - 10:00 am | चौकटराजा
पुरणाची पोळी ही दुधाबरोबर व तुपाची धार न लावता व्हिस्कीत बुडवून खाणे. ( सिम्बोयसिस चे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळणार ! )
26 Jul 2014 - 10:19 am | टवाळ कार्टा
:)
26 Jul 2014 - 12:51 am | मयुरा गुप्ते
एक ठरलेला मेन्यु..कुठल्याही ताज्या अथवा उर्वरीत मटकी, मुग किंवा मसुर्याच्या उसळींची मिसळ, मस्त बारिक कांदा, थोडं अधिक तिखट, घालुन एक झणझणित मिस़ळ चापावी.
चिकन किंवा मटणाच्या उरलेल्या रश्यात उकडलेली अंडी टाकुन एक उकळी आणावि..अंडाकरी तय्यार.
कोबीच्या भाजीत भाजणीचे पीठ घालुन, त्याची थालिपीठे किंवा छोटे पॅटीस...झक्कास.
कानवले करुन झाल्यानंतर उरलेल्या काताच्या खरपुस शंकरपाळ्या...
चिवड्या वर कांदा व लिंबु..
--मयुरा.
26 Jul 2014 - 1:06 am | प्रभाकर पेठकर
चव ही व्यक्तीगणीक बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाची अनंत खाद्य मिश्रणे असु शकतात. त्यामुळे ह्या धाग्याला प्रतिसादांची वानवा भासणार नाही.
26 Jul 2014 - 1:06 am | यशोधरा
पुरणपोळी + ताक. ताकात बुडवून खायची.
जिलबी + ताकात बुडवून.
26 Jul 2014 - 1:07 am | यशोधरा
शंकरपाळे + चहा. चहात डूबु़क करुन.
तसेच चुरमुरे चहामध्ये घालून गरम चहाबरोबर.
26 Jul 2014 - 8:53 am | किसन शिंदे
मलाही सेम टू सेम अशीच सवय आहे!
28 Jul 2014 - 8:51 pm | vrushali n
पातळ (चिवड्याचे )पोहे+ चहा
पातळ श्रीखंड + तुप = vanilla आइसक्रीम
26 Jul 2014 - 1:13 am | सूड
मला मेथीचा लाडू चहात बुडवून किंवा लाडवाच्या घासाबरोबर एक घोट चहा असं खायला आवडतं.
26 Jul 2014 - 7:00 am | चित्रगुप्त
साधे वरण + भात् + तूप + लिंबू ... आणि त्यावर दाट लच्छेदार (मिक्सितून काढलेला नव्हे) आमरस.
26 Jul 2014 - 7:59 am | अत्रन्गि पाउस
थांबणे आले वर्षभर ....
28 Jul 2014 - 7:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर्षभर थांबायची गरज नाही. हल्ली हापूस आमरस पॅकेटमध्ये वर्षभर मिळतो :)
28 Jul 2014 - 8:34 pm | सखी
पण तो दाट लच्छेदार नसतो ना? मिक्सीमधुनच काढलेला असतो ना म्हणुन ते थांबायला लागते म्हणाले असावेत. बाकी तुमच्या दु:खावर याने फुंकर बसेल :)
३,५,७ वर्षे हापुससाठी थांबलेली
सखी
26 Jul 2014 - 8:07 am | खटपट्या
भडंग + अवाकाडो
दुपारी केलेली भाजी रात्री तेलावर परतून पोळीबरोबर खाणे.
मटन दुसऱ्या दिवशीच छान लागते (वयक्तिक मत )
26 Jul 2014 - 9:25 am | अत्रुप्त आत्मा
बुंदिचा लाडू फोडून त्यात आंबट दही घालून खाणे.
26 Jul 2014 - 9:36 am | कविता१९७८
पुरणपोळी आणि दुधाची घट्ट साय , खुप छान लागते.
26 Jul 2014 - 10:15 am | अर्धवटराव
१) सणासुदीला पातळभाजी (सहसा पालक किंवा धोपा + चणा डाळ+ शेंगदाणे), सुकी भाजी (सहसा कोबी + बटाटा), कोहळ्याची रस्सा भाजी, कढी, पंचामृत, कोरडी डाळीची चटणी, कोशिंबीर, भजे, वडे आणि बरच काहि बनतं. हे सगळं + साधं वरण + भात..वर भरपूर तूप. अगदी सेमीलिक्वीड लगदा झाला पाहिजे. असं हे पूर्णब्रह्म ताटभर झालं पाहिजे. आणि मग महाराज पुढील अर्धा तास मस्त भुरके मारत गट्टम करायचं. आहाहा. त्यानंतर पैजेचे लाडु किंवा करंजी, जे काहि गोड असेल ते हाणायचं. मग हात धुवुन फस्क्लास विडापान जमवायचं...कात, चुना, शोप, कतरा सुपारी, विलायची, थोडं गुलकंद किंवा सहद...आणि पान लवंग लावुन बंद करायचं. कसलं भन्नाट.
२) गोपाल काला + हिरवी मिर्ची
३) कच्चा चिवडा + हिरवी मिर्ची + कडक चहा... मिर्चीच्या तिखटपणावर चहाचा घोट घ्यायचा.
४) पुरणपोळी + भरपूर तुप एक घास, कढी + भजे दुसरा घास. पण त्याअगोदर कमीतकमी २ पुरणपोळ्या भरपूर तूप लावुन मटकवायच्या.
५) झुणका/उसळ + भाकरी, दर तीन घासानंतर एखादी गाजर किंवा बिट चकती, लिंबूरसात मुरवलेल्या मिर्च्या
६) आपल्या अत्यंत खात्रीच्या समोसेवाल्याकडुन ३ गरमागरम समोसे, त्यानंतर १० गरम जिलब्या+मसाला दूध
७) औदुंबराच्या पारावर दत्तगुरुंचं चरणतीर्थ आणि प्रसादाचा चौतकर केशरी पेढा.
आणखी अनेक काँबी आहेत राजा... नुसत्या आठवणीने बेजार होतोय.
28 Jul 2014 - 11:13 pm | कवितानागेश
यातले 'भाजी, उसळ वगरै जे असेल ते सगळं + साधं वरण + भात' आणि दही असं होस्टेलवर असताना रोज जेवलेय. तेपण एक मैत्रिण कालवून द्यायची. आपोआप जेवण उतरायचं घशाखाली. :)
29 Jul 2014 - 7:18 am | यशोधरा
क्रमांक १ चा काला आपला पण फेवरिट!
26 Jul 2014 - 10:25 am | ज्ञानोबाचे पैजार
अंडे भरपुर फेटुन त्यात थोडेसे तिखट, मीठ,हिरवी मिरची व हळद घालुन मग या मिश्रणात शिळी इडली बुडवुन तव्यावर तेल घालुन फ्राय करावी किंवा इडली कुस्करुन या मिश्रणात घालुन ऑमलेट बनवुन घ्यावे. लोणी आणि सॉस सम प्रमाणात एकत्र करुन त्या बरोबर खावी. मस्त लागते.
उरलेल्या दोनतीन भाज्या (तयार भाजी) एकत्र करुन त्यांचा वाटीने दाबुन चांगला लगदा करायचा झेपत असेल तर आणि झेपत असेल तेवढा हिरव्या मिरचीचा ठेचा त्यात घालायचा (दुसर्या दिवशी सकाळचा विचार अजिबात करायचा नाही) व हा लगदा कणकेच्या गोळ्यात भरुन जाडसर पोळी करायची. हि पोळी तव्यावर न भाजता गॅसवर ग्रील टाकुन खरपुस भाजायची व गरम असतानाच खाउन टाकायची.
पावाच्या कडा कडक / चिवट असतील तर त्या काढुन त्याचे लहान तुकडे करायचे. ते तव्यावर थोडेसे बटर टाकुन लालसर भाजुन घ्यायचे. तव्यावर ते भाजलेले तुकडे जरा लांब लांब पसरुन मग त्यावर ऑमलेट चे मिश्रण (फेटलेली अंडी, कांदा, कोथींबीर, मिठ हिरवी मिरची इत्यादी) घालायचे व खरपुस भाजुन खायचे. लैभारी लागते.
पैजारबुवा,
26 Jul 2014 - 10:58 am | तिमा
पाव भाजीचा अतिबटर लावून भाजलेला पाव + चहा
यांत चहाच्या ऐवजी साखर घातलेले दूध + भाजी न लावलेला अतिबटर पाव खाऊन पहा. पावभाजी खाल्यावर माझी शेवटची राऊंड यासाठी राखीव असते.
28 Jul 2014 - 3:21 pm | राजेंद्र मेहेंदळे
कल्याणला दूधनाक्यावर पहाटे २.३० वाजल्यापासुन ५ वाजेपर्यंत मलईपाव नावाचा प्रकार मिळतो (५ ला तो संपतो :) )
एक बशीभर दाट साय+बचकाभर साखर हे पावाबरोबर खायचे...कस्ली जबरी टेस्ट लागते
29 Jul 2014 - 12:48 pm | स्पा
पाया पाव पण मिळतो त्या बाजूला ;)
30 Jul 2014 - 3:04 pm | राजेंद्र मेहेंदळे
आणि खिमापावसुद्धा..पण त्यात काय काय मिक्स केले असेल अशी शंका येते :)
28 Jul 2014 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
१.पावभाजी मला पावापेक्षा ताकभात कालवुन त्याबरोबरच खायला जास्त आवडते...कालची शिळी/मुरलेली पावभाजी असल्यास अजुनच उत्तम
२.कालवलेल्या वरणभातात प्रत्येक घासाला चिवडा किंवा फरसाण मिक्स करुन खाणे.
३.बरेच सौदिंडीयन मित्र बिर्याणी किंवा भाताबरोबर ऑम्लेट खाताना बघितलेत.
४.उकडीच्या मोदकांचे नाक फोडुन त्यात तूपाची धार सोडुन खाणे..मोदक गरम असणे मस्ट्..सोबतीला गोडं वरण भात आणि बटाटा भाजी (आहा...एकच महीना राहीला ना गणपतीला?)
28 Jul 2014 - 4:03 pm | कंजूस
१)पुरणपोळी ताटात ठेवून त्यावर दुध ओतायचे आणि सावकाश चमच्याने तोडून खायची .
२)शेंगदाणे चटणी ,दही आणि गरम पोळी .
३)पाव आणि टेंढल्याची परतून भाजी .
४)ज्वारीची भाकरी आणि भाजलेलं वांगं .
५)शिळी ज्वारीची भाकरी आणि दूध .
६)चीज सैनविज बशीत ठेवून गरम चहा वर ओतायचा ,सुरी चमच्याने खायचे .
28 Jul 2014 - 5:13 pm | अनन्न्या
बरके गरे आंब्याचे लोणचे लावून खातात, मी कधी खाऊन पाहिले नाही.
पूर्वी देवळात उत्सवाला गावजेवण असे. त्यावेळी खवय्ये मंडळी जिलबीचे ताट आणि त्याबरोबर चहा घेत असत. पूर्ण भरलेले जिलबीचे ताट आणि शेजारी चहाची किटली!
रव्याचे लाडू कुस्करून त्यावर साजूक तूप घालून, वीस पंचवीस लाडू सहज संपत.
हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिलय, पण खाण्याची हिंमत नाही झाली कधी!
आता मात्र असे जेवणारे आणि ते पचवणारे लोक शिल्लक नाहिइत.
बरक्या गय्रांच्या रसात भाकरीचे पीठ भिजवून भाकरी करतात, ती मलापण आवडते.
उकडीचे मोदक, सांदण, खांडवी, पुरण पोळी, सांज्याची पोळी याबरोबर नारळाचे दूध मस्त लागते.
28 Jul 2014 - 5:16 pm | धन्या
कुठलाही खादयपदार्थ + चवीपुरतं मीठ
28 Jul 2014 - 6:18 pm | शिद
१. कुठल्याही चिवडा/फरसाण मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व एखादी हिरवी मिरची.
२. घरी बनवलेलं साजूक तुप लावलेली पुरणपोळी कोमट दुधाबरोबर.
३. मस्त मस्का लावलेल्या स्लाईस ब्रेड मध्ये फरसाण भरुन टोस्ट करायचा. मस्का नसेल तर मग एखादी चिजची स्लाईस व फरसाण.
४. रात्रभर भिजत घातलेले काळे/हिरवे चणे सकाळी तव्यावर फक्त मीठ लावून भाजून खाणे.
५. फोडणीचा भात, लोणचे व भरपुर फरसाण.
६. पारले-जी बिस्किट फक्त पाण्याबरोबर.
७. मटण/चिकनच्या रश्श्यात १५-२० मि. ठेवलेली भाकरी. दोन्ही आदल्या दिवसाचं असेल तर उत्तम.
८. साबूदाणा खिचडीत भरपूर दुध घालून ५ मि. मायक्रोवेव मध्ये गरम करुन खाणं.
९. थंडगार बिअर भरलेल्या पाणीपुरीच्या पुर्या.
१०. क्रमशः
28 Jul 2014 - 6:27 pm | प्रसाद गोडबोले
बेक्ड अॅप्पल + मध + ड्रायफ्रूट्स असे एक विचित्र वाटणारे कॉम्बिनेशन खाल्ले होते ते फारच आवडले होते :)
पण माझे सर्वात आवडची काँबीनेशन म्हणजे सिंगल माल्ट प्रीमीयम स्कॉच / व्हिस्की 'नीट' आणि एकांत आणि आपल्या आवडीचे संगीत :)
28 Jul 2014 - 8:00 pm | सस्नेह
शिळी बाजरीची भाकरी वर लोण्याचा गोळा आणि वरण्यावान्ग्याची मसालेदार भाजी !
28 Jul 2014 - 8:55 pm | सखी
वरती काहींसारखेच
चिवडा फरसाण मध्ये
हे असचं फक्त यातलं पोळी सोडुन माझी आई चुरमुरे+बा.कांदा+दाणे घालुन एकत्र करायची, तशी चव परत काही या मिश्रणाला येत नाही :(
28 Jul 2014 - 11:20 pm | भिंगरी
मटणाचा रस्सा आणि भात कालवून त्यात आमरस खाणारा मी पाहिलाय.
म्यांगोलात हिमक्रिम खूप छान लागतं.
मऊ भात + तळलेलं कारलं
29 Jul 2014 - 8:03 am | कंजूस
सैनविजमध्ये १)चना चोर गरम /२)बटाटा जाळी वेफरस घालून
29 Jul 2014 - 11:28 am | दिपक.कुवेत
आणि ईथे आलेले प्रतिसाद तर त्याहुन!!! कधी काळि मी फरसाण चहात घालुन खायचो ह्याची आठवण झाली. फर्साण संपलं कि तो तिखट झालेला चहाहि प्यायला मजा यायची.
23 Sep 2015 - 1:50 pm | अदि
हा प्रकार अजून आवड्तो. त्यात उरणच्या साठे चं फरसाण असेल, तर मज्जाच मज्जा!!
23 Sep 2015 - 2:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
डाळीच्या पिठाचे फरसाणही चवीला चांगलच लागत.
पैजारबुवा
.
29 Jul 2014 - 12:41 pm | Mrunalini
माझे आवडते प्रकार.
१. चहा आणि साधे पोहे
२. सुक्या भेळीमधे मटकीची उसळ, कांदा, टोमॅटो आणि कैरीचे तुकडे टाकुन खायचे. मस्त लागते.
३. डाळ-तांदुळाच्या खिचडीवर शेंगदाण्याचे कच्चे तेल टाकुन.
४. चहा आणि शंकरपाळे
५. चिकन मसला किंवा मटण फ्राय केल्यावर, कढई संपल्यावर त्यातच थोडा भात टाकुन, मस्त मिक्स करायचा आणि खायचे. अप्रतिम लागते.
६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे आणि त्या सोबत ज्वारीची भाकरी. (इथे मला मेथीच मिळत नाही :( )
29 Jul 2014 - 2:00 pm | उदय के'सागर
अगदी!!! माझा आवडता प्रकार. ह्यात आम्ही दाण्याचा कूट पण घालतो - फारच चव येते जेवणाला :)
29 Jul 2014 - 2:03 pm | सूड
>>६. मेथीची पाने खुडुन त्यात बारीक चिरलेला कांदा, कच्चे तेल, तिखट, मिठ हे मिक्स करायचे
हे आजोळी गेलं की खायला मिळतं, तेही आजीच्या हातचं!!
30 Jul 2014 - 5:31 pm | Maharani
Aha methicha same combination with good masala
29 Jul 2014 - 1:49 pm | सुहास झेले
१. चहा / कॉफी + फरसाण / शेव
२. मोनॅको टोपिंग्स (ह्यात चीझ पासून शिळी भाजी/फोडणीचा भात काहीही)
३. नाणेघाट ट्रेकला पाव आणि श्रीखंड खाल्ले होते. अप्रतिम लागले होते.
४. घराचा चिवडा त्यात मस्त कढी किंवा कुठल्याही भाजीजी ग्रेवी (चिकन/मटणसुद्धा)
;-)
29 Jul 2014 - 1:58 pm | उदय के'सागर
१. मॅगी टॉपड विथ शेंगदाणा चटणी - अप्रतिम लागतं. मसाला मॅगी (प्लेन) असेल तर उत्तमच :)
२. साबुदाणा खिचडी किंवा फोडणीच्या भातावर (लाल तिखट घालून केलेला फोडणीचा भात) साय (आणि सायीला लागून आलेलं थोडं दुध) मस्तं लागतं.
३. दही भातावर थोडा फोडणीच्या वरणाचा शिडकावा
४. माझे बाबा साधं वरण (वरणाचा घट्ट गोळा) आणि कढी असं कॉम्बीनेशन करतात, गरम-वाफाळत्या भातावर ते फार छान लागतं चवीला.
29 Jul 2014 - 2:40 pm | निश
नं १ मध्ये बासमती तांदुळाऐवजी आंबे मोहर तांदुळाचा भात...ऐव्हढाच बदल बाकी मेनु तोच. अजुन आंबे मोहर तांदुळाचा भात+ शेवग्याच्या शेंगा घालुन केलल पिठल+ हिरवी मिरची + मडक्यातल घट्ट दही व शेंगदाण्याची चटणी.
29 Jul 2014 - 2:49 pm | पाणीपुरी
तोंडाला पाणी सुटले वाचुन ! या मधले काही options try केले आहेत . आजुन एक झटपट पाककला सांगते .
झटपट पोहे - (कांदा न घालता )
१. फोडनि करायची,त्यात मोहरी,जिरे ,कडीपत्ता मिरच्या,दाणे टाकायचे
हवा असल्यास बारीक फोडी करून बटाटा .
२.एकिकडे पोहे भिजवुन त्यात लिंबू पिळायचे,मिठ आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेतकुट घालायचे आपल्या चवी नुसार ,थोडा दाण्याचा कूट .
३.हे मिश्रण नीट हलवून फोडनित घालायचे .
४.निट हलवून एक वाफ आणायची थोडी चवीपुरती साखर घालायची .
५.मग कोथिंबीर आणि असल्यास ओले खोबरे भुरभुरून गट्टम करायचे
29 Jul 2014 - 3:06 pm | बाळ सप्रे
थंडगार निरशा दुधात बुडवून राजगिर्याचा लाडू
चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो. :-)
चकली भरपूर लोण्या बरोबरही छान लागते किंवा ताज्या ओल्या खोबर्याबरोबरही मस्त लागते.
चिवडा थोडासा मौ झाला तर त्यात कांदा, टॉमेटो, ओलं खोबरं घालून मस्त लागतो . किंवा कालच्या उरलेल्या उसळीत (कुठलिही उसळ) घालूनही मस्त.
क्रॅकजॅकसारख्या खारट बिस्कीट्सबरोबर चीजडिप .
दहीभाताला साजूक तुपाची जिर्याची लाल मिरचीची फोडणी त्यात खूपसारे काजू.
ऑम्लेटवर ब्लॅक ऑलिव्ह्ज, मशरूम्स, अॅलॅपिनोज ओरीगानो ( डॉमिनोजच्या ऑर्डरच्याबरोबर खूप एक्स्ट्रॉ घेउन ठेवावित) आणि खूप चीज.. झकास..
गुलाबजामुन किंवा गाजर हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम..
29 Jul 2014 - 3:58 pm | सूड
>>चहात चकलीचे तुकडे बुडवुन थोडे मौ झाले की मस्त लागतात आणि मग गरम चहा तिखट लागतो.
पावसाळ्यात चहा करत असताना मी कधीकधी आल्यासोबत अगदी चिमूटभर लाल तिखट घालतो. मस्त तिखट झणका तर येतोच, पण बाहेर पाऊस पडत असल्यासमुळे तो झणका अगदी सही वाटतो.
29 Jul 2014 - 3:14 pm | मधुरा देशपांडे
साधं वरण + कढी + तुप + भात
आमटी भात आणि साखरआंबा
मॅगी विथ हेवी व्हिपिंग क्रीम
कच्चा चिवडा आणि मेतकूट
29 Jul 2014 - 3:55 pm | पिलीयन रायडर
रात्रीची पावभाजी पावात भरुन कच्छी दाबेली सारखी भाजुन...
पुदिना चटणी + गरम मऊ भात + भरपुर तुप..
गरम मॅगी वर चीज टाकुन..
चुरमुरे + तेल+ तुखट + मीठ + असल्यास कैरीच्या बारिक फोडी
कोणतीही उसळ + फरसाण + कांदा
तळलेली पोळी , तिखट - मीठ भुरभुरून..
असंच जाता जाता साय साखर / लोणी साखर...
खारवड्या / पापड्या , शेंगदाणे ,कांदा (बुक्कीने फोडलेला)
भुरका + पोळी
22 Sep 2015 - 6:16 pm | बोका-ए-आझम
घट्ट वरण, भात, गवारीच्या भाजीचा रस्सा, कैरीचं तिखट लोणचं आणि जिरं
सावजी मटणाचा रस्सा (पीसेस नाहीत) + भात + लसणीची चटणी
पोप टेट्स मध्ये मिळणारा चिकन+प्राॅन जम्बालया (एक त-हेचा तिखट भात) + भरपूर टाबॅस्को साॅस + थोड्या फ्रेंच फ्राईज + हल्दीराम आलू भुजिया.
पुणेरी स्टाईल मसालेभात + कटाची आमटी.( स्वर्ग.)
24 Sep 2015 - 11:58 am | _मनश्री_
लसूण शेंगदाण्याची चटणी कणकेत भरून त्याचा पराठा आणि जोडीला दही आणि कैरीच लोणचं
मारी बिस्किटांवर मिक्स फ्रुट जॅम लावायचं आणि वर घट्ट साय
शिळी भाकरी कुस्करून ताकात घालायची त्यात तिखट ,चवीपुरत मीठ टाकायचं आणि वरून तेलात हिंग, हळद ,कढीपत्ता व शेंगदाणे घालून फोडणी
शेवटी थोडी कोथिंबीर जोडीला लोणच , अफाट लागत