बनारस च्या बाजूला अशा प्रकारची बटाटा+कांदा+टोमॅटो ची भाजी करतात. आमच्या एका बनारसी मैत्रिणीची ही रेसिपी.(मैत्रिणीचे वय असेल ६६,६७-- मैत्रीला मात्र वय नसतं,:))
साहित्य -
५ ते ६ मध्यम आकाराचे बटाटे, २ कांदे,२ टोमॅटो,तेल २ चमचे, हिंग, हळद, थोडे आले, कोथिंबीर
धने पावडर २ चमचे, २ हिरव्या मिरच्या,मीठ
कृती -
बटाटे साले काढून मोठे तुकडे करुन घेणे,कांदे,टोमॅटोचे ही मोठे तुकडे करणे.बटाटा , कांदा, टोमॅटो यांचे मोठ्ठे तुकडे करावे नाहीतर लगदा होतो.एका बटाट्याच्या ४ फोडी आणि कांदा व टोमॅटोचे ही मोठे तुकडे करावे.
तेल गरम करणे,त्यात हिंग घालणे.हळद घालणे.बटाट्याचे तुकडे घालणे.थोडे आले किसून घालणे,धने पावडर घालणे,हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणे,मीठ घालणे,पाउण कप पाणी घालणे. झाकण ठेऊन मंद आचेवर ठेवणे. जेव्हा बटाटे अर्धे शिजतील तेव्हा कांदे व टोमॅटो घालणे व परत झाकण ठेऊन मंद आचेवर शिजवत ठेवणे.पूर्ण एकजीव व्हायला हवे.
आपण नेहमी तेलावर आधी कांदा टाकतो,मग इतर भाज्या..पण इथे मात्र उलट आहे.
वरून कोथिंबीर घालून सजवणे.
प्रतिक्रिया
19 Oct 2008 - 6:45 pm | मीनल
आपण नेहमी तेलावर आधी कांदा टाकतो,मग इतर भाज्या..
यामुळे कांदा तेलावर परतला जातो(फ्राय).
इथे तो रसात शिजतो(कूक) .यामुळे चवीत फरक असतो.
यात मी शेवग्याच्या शेंगा (आधी शिजवून) किंवा गाजर घातलेले पाहिले आहे. तेही चांगले लागते.पण शेंगा मोडल्या की मात्र लगदा होतो.
मीनल.
19 Oct 2008 - 10:47 pm | घाटावरचे भट
मी जेव्हा नुकताच भाजी वगैरे करायचो, तेव्हा माझ्या हातून असं व्हायचं (कांदा टाकायला विसरणे. मग मी नंतर टाकायचो कांदा). पण त्याला उत्तर प्रदेशी भाजी म्हणतात मला माहित नव्हतं!!! :) स्वतःच्या बचावासाठी एक मुद्दा मिळाला असता....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
21 Oct 2008 - 8:40 am | llपुण्याचे पेशवेll
मी पण अशा अनेक चूकातून उत्तर प्रदेशीय गोष्टी निर्माण करत असतो.
उत्तर प्रदेश असा चूकातूनच निर्माण झाला आहे काय असे वाटते.. :)
पुण्याचे पेशवे
21 Oct 2008 - 8:40 am | llपुण्याचे पेशवेll
मी पण अशा अनेक चूकातून उत्तर प्रदेशीय गोष्टी निर्माण करत असतो.
उत्तर प्रदेश असा चूकातूनच निर्माण झाला आहे काय असे वाटते.. :)
पुण्याचे पेशवे
19 Oct 2008 - 8:25 pm | शाल्मली
वेगळीच वाटते आहे कृती..
छान आहे. करून बघायला हवी..
--शाल्मली.
19 Oct 2008 - 8:27 pm | रेवती
करून बघीन एकदा. मी अशी रस्सा भाजी करते पण त्याला वाटण मसाला असतो.
त्यापेक्षा ही भाजी कितीतरी सोपी आहे.
रसही बेताचाच ठेवायचा असं दिसतयं.
रेवती
20 Oct 2008 - 1:08 am | ललिता
भाजी अगदी मंद आचेवरच शिजवली गेली पाहिजे... कांदा व टॉमेटो टाकायचं टाईमिंग अचूक हवं.
- स्वानुभवावरुन
21 Oct 2008 - 5:59 am | रेवती
हो ललिताताई, घाबरले ना मी.;)
कसं जमावं आता अचूक टायमींग.
रेवती
21 Oct 2008 - 12:37 am | विसोबा खेचर
स्वातीवहिनी,
कृपया मिपाचे मुखपृष्ठ पाहा... :)
तात्या.
21 Oct 2008 - 5:43 am | बेसनलाडू
मराठमोळ्या संकेतस्थळावर 'उत्तर प्रदेशीय' भाजी पाहून मौज वाटली. (ह. घ्या.)
ही भाजी करून, चापून कळवतो कशी झाली ते.
(मराठमोळा)बेसनलाडू
23 Oct 2008 - 4:51 pm | दीप्ति
ही भाजी पोली बरोबर खयला हरकत नाही
23 Oct 2008 - 5:43 pm | जैनाचं कार्ट (not verified)
आम्ही रोज खातो... आगदी वैताग आला आहे ;)
आमचा बहाद्दुरला ह्या शिवाय फक्त... तिंड्याचीच भाजी करता येते... !
***
जेवण संकटातून मुक्त होण्यासाठी विवाह करुन घेऊ काय :?
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग