बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in काथ्याकूट
2 May 2014 - 11:11 am
गाभा: 

नमस्कार मंडळी.
लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई. चा खर्च मिळुन प्रोजे़क्ट कॉस्ट १ कोटी ६६ लाख +- ५ लाख अशी मिळत आहे.
आता भांडवलासाठी मी जी माहीती गोळा केलीये, त्याप्रमाणे सिडबी ही संस्था नव्या उद्योजकांना १० लाख ते १० कोटी ह्या मर्यादेमधे कर्ज देते. (सिडबी, शासकीय बँकानकडुन कर्ज मंजुर करुन घेते आणि उद्योजकांना देते.). ६ महिने ते १ वर्षाचा मोराटोरियम पिरिअड धरुन कमीत कमी ३ वर्ष ते जास्तीत जास्त ७ वर्षांमधे कर्जफेड अपेक्षित आहे (व्याजदर १३.५०%). माझ्या अंदाजाप्रमाणे १ वर्षाचा मोराटोरीअम पिरिअड धरुन आणि व्यवस्थित नफा मिळवुन सहा वर्षात कर्जफेड सहज शक्य आहे. सिडबी च्या चिंचवड येथील कार्यालयात चौकशी केली असता मला अशी माहिती मिळाली की प्रोजे़क्ट एस्टिमेटच्या कमीत कमी २५% आणि जास्तीत जास्त ३३% रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करायला लागेल. (सो मच फॉर एनकरेजिंग यंग एन्टर्प्रिनर्स). एवढी रक्कम स्वहिस्सा म्हणुन उभी करणं मला एकट्याला अशक्य आहे. हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे. उद्योग मंत्रालय कोलॅटरल सिक्युरिटीची हमी घेतं. पण ज्यानी माहिती दिली त्याला जास्त माहीती नाही असं त्याच्या बोलण्यावरुन जाणवत होतं. सिडबीच्या संकेत स्थळावर स्वहिश्श्याविषयी कुठलीही माहीती मला आढळली नाही.
ह्यावरती मला स्वतःला दोन उपाय दिसत आहेत.

१. पब्लिक लिमिटेड स्थापन करुन २५ ते ३३% भांडवल गोळा करणं.
२. एकुण ३३% रक्कम कंपनीमधे भागीदार घेऊन करणं. (शक्यतो हे नकोय).

ह्याबाबतीत अनुभवी मिपाकर मार्गदर्शन करु शकतील काय? माझे प्रश्ण असे आहेत.
१. नव-उद्योजकांसाठी (मॅन्युफॅक्चरींग सेक्टर) काही योजना कोणाला माहीत आहेत का?
२. सबसिडीच्या काही शक्यता आहेत का?
३. सिडबी मधे कमीत कमी किती स्वहिस्सा लागतो?
४. सी.आय.आय. चा कोणी सभासद इथे आहे का?

सिडबी किंवा अजुन कुठली अशी संस्था कोलॅटरल फ्री कर्ज देते का जिथे स्वहिस्सा हा गौण भाग आहे?

प्रतिक्रिया

यातली माहिती नाही पण शुभेच्छा देतो .

तुमचा इमेल आय-डी व्यनि करा म्हणजे मग काही कॉन्टॅक्टस देता येतील.

१.६० कोटीचा करणं धोक्याचं आहे कारण त्यात तुमचा हिस्सा ४० लाख असेल.

सर्व प्रथम स्वतःचा हिस्सा खरा आणि मर्यादित ठेवा. यात तीन गोष्टी आहेत : १) कोणत्याही प्रकारची वाढीव बिलं घेऊन स्वतःचा हिस्सा त्यातून वसूल करु नका. २) स्वतःचा हिस्सा प्रामाणिक असेल तर कर्जाची रक्कम आवाक्यात राहाते ३) कर्जाची रक्कम आवाक्यात असल्यानं उलाढालीची व्याप्ती, खर्चाचं प्रमाण आणि एकूण व्यावसायिक व्यवहार, संपूर्ण नियंत्रणात राहातात. थोडक्यात धंद्यात (सुरुवातीपासूनच) लफडी होण्याची शक्यता संपते.

कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेकडे (पण शक्यतो जिथे तुमचा आजतागायत व्यवहार आहे तिथे, कारण त्यांना तुमची सर्व माहिती असते आणि तुम्हाला फॉलो-अपला त्रास पडत नाही) कर्जाची मागणी करा.

माझ्या माहिती प्रमाणे सध्या SEZ सोडता कुठेही सबसिडी वगैरे नाही, त्यात SEZ ला STP रजिस्ट्रेशन लागतं, ते इंजिनिअरींग व्यावसायाला मिळत नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच बँक खातं ठेवून, एकूण एक व्यवहार (तुमचं पहिलं कॅपिटल काँट्रिब्यूशन घालण्यापासून) त्यातूनच करा. त्यामुळे सगळे हिशेब व्यवस्थित राहातात (कारण ते बँक खातंच तुमचा सर्व हिशेब दर्शवतं). अकाऊंटस हा धंद्यातला सर्वोच्च महत्त्वाचा (पण सदैव दुर्लक्षित आणि रेंगाळत ठेवला जाणारा) भाग आहे. रोजच्या रोज हिशेब ठेवणं आवश्यक आहे कारण तो धंदा कसा चालला आहे याचा आरसा आहे. अकाऊंटसची माहिती नसेल तर सर्वप्रथम ते काम आग्रक्रमानं करा, नाही तर पैसे कसे आले आणि कुठे गेले याचा पत्ता लागणार नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 May 2014 - 1:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही कुठल्याही प्रकारची वाढीव बिलं घेणार नाहीये.
अकाऊंट्स ची फार माहीती नाही पण तुमचा सल्ला लक्षात घेऊन लवकरचं त्यातही लक्ष घालीन.
तुम्ही म्हणताय तसा स्वहिस्सा मर्यादित ठेवायसाठीच कुठली संस्था कमीत कमी स्वहिश्श्यात तेवढी अमाऊंट मान्य करतीये ह्याचाच शोध घेतोय. कारण २५ टक्के (१/४) आणि ३३% (जवळ-जवळ ३३.३३%) स्वहिस्सा उभा करणं माझ्या एकट्यासाठी शक्यचं नाहीये.
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

स्रुजा's picture

18 Jul 2014 - 7:24 am | स्रुजा

मला manufacturing industry बद्दल माहिती नाही पण घरची software कंपनी असल्याने व्यवहार साधारण माहिती आहेत

एक तर संजय जी नी सांगितल्याप्रमाणे अकौन्ट्स आधी शिका निदान त्या खात्याचा कारभार कुणा अनुभवी पण विश्वासू माणसाकडे सोपवा. घरचं कुणी असेल तर अगदीच उत्तम.
दुसरं म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट १ कोटींचा घेऊ नका असं मी म्हणणार नाही. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राचा अनुभव आहे ही एक जमेची बाजू शिवाय तुम्ही तुमचा काही विचार केला असेल. पण that said ही एक फार मोठी जबाबदारी आहे हे मात्र मला नमूद करावसं वाटतं. त्या ही बाबतीत सं . क्षी . शी एकमत.

तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात. याचा फायदा हा कि जितके पैसे वापरलं त्यावर च डेली रेडयुसींग व्याज लागतं. तुम्ही ज्या दिवशी जितके पैसे भराल त्यावर तितक्या दिवसांचं व्याज धरून उरलेली रक्कम ठरते.

हा पर्याय मला पूर्ण एक कोटी घेऊन ठेवण्यापेक्षा बरा वाटतो. एक कोटीपर्यंत चं कर्ज मंजूर आणि पैसे उचलत नाही तो पर्यंत व्याज नाही हा तसा मानसिक स्वास्थ्य देणारा पर्याय आहे .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 7:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण अश्या कर्जावर व्याजआकारणी पर्सनल लोन च्या व्याजदरानी होत असेल ना?

व्याज दर निश्चित माहिती नाही पण तुमचा अंदाज बरोबर आहे . हा थोडा चढा असतो पण पर्सनल लोन इतका जास्त नस्तो. तो वाचवणं आपल्या हातात राहतं

तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात.

एक लाख भरुन एक कोटी कॅश क्रेडिट देणारी भारतातली फक्त एक बँक सांगा! तुम्ही म्हणाल तितके अर्जदार उभे करतो.

न तुम्हाला टर्म लोन आणि कॅश क्रेडिट मधला फरक माहिती, न व्याजाचे दर. तारण कशाला म्हणतात आणि मार्जिन मनी काय असतो याचा काही पत्ता नाही, उगीच सल्ला कशाला देतायं?

शैलेन्द्र's picture

20 Jul 2014 - 12:51 am | शैलेन्द्र

+११

अहो, १५-२० CR चा टर्ण ओव्हर आहे मित्राचा.. त्याला साधी १ CR ची CC नाही मिळत, कारण को लॅटरल नाही..

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 2:43 pm | संजय क्षीरसागर

की एका लाखात एक कोटी मिळतायंत म्हटल्यावर, तिथे दुनिया उलथून पडेल.

एका दिवसात बँकेची सगळी लोन लिमीट इक्झॉस्ट होईल, आणि ती खबर लागताच, सगळे ठेवीदार बँक डोक्यावर घेतील... आणि बँकेचं दिवाळं वाजेल!

धन्य त्या सदस्या आणि महान त्यांचे सल्ले!

त्यावर कडी म्हणजे प्रश्नकर्त्यानं भांडवलासाठी इतकी वणवण (अडीच महिने झालेत) केलीये की किमान त्याच्या तरी लक्षात यायला हवं, पण तो विचारतोयं, व्याजाचा रेट काय?

मायला, एक कोटी मिळाल्यावर लोक पॅरिस-बँकॉक-पटायाला जातील का बँकेत व्याज भरायला?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Jul 2014 - 3:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

I am nit saying 100000 in current acc will give me 1cr. No bank is stupid to do so.

I am only considering the fact of interest rate.

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 4:16 pm | संजय क्षीरसागर

तर व्याज दराचा प्रश्न कुठून येतो?

शैलेन्द्र's picture

20 Jul 2014 - 5:45 pm | शैलेन्द्र

ईंटरेस्ट रेट हा बँकेने तुम्हाला कर्ज देताना घेतलेल्या जोखमीच्या समप्रमाणात असतो. जर तुम्ही टर्म लोन घेतले तर त्यावर तारण म्हणुन जी मशीनरी असेल त्याची किंमत, शिवाय तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टमधे किती "जोखिम" बँकेला वाटेल त्यानुसार तुमच्या कर्जाचा व्याजदर ठरेल.

लॉरी टांगटूंगकर's picture

2 May 2014 - 2:36 pm | लॉरी टांगटूंगकर

व्यवसायाला शुभेच्छा!!!
काही मित्र या व्यवसायात आहेत, माहीती मिळाल्यास व्यनि करतो.

वैनतेय's picture

2 May 2014 - 3:05 pm | वैनतेय

Angel Investor किंवा Seed Investor यांचा शोध घ्या. नफ्यात भाग असेल पण व्यवसायास आवश्यक ते सर्व सह्कार्य मिळण्याची खात्री (technical expertise ते marketing)

बाकी व्यवसायास हार्दिक शुभेच्छा !!!

आदूबाळ's picture

2 May 2014 - 3:52 pm | आदूबाळ

कप्तान

व्यनि केला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 May 2014 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माहिती इथे आणि व्य.नि.वर देणार्‍या सर्वांचे हार्दिक आभार.

शैलेन्द्र's picture

5 May 2014 - 1:02 pm | शैलेन्द्र

मला दोन मार्ग सुचतात.

१) इन्वेस्टर शोधा
सिड्बी, बँक इत्यादी तुम्हाला इतके सहज कर्ज देतील असे वाटत नाही. त्यात तुमच्या नावावर अजून एकही व्यवसाय नाही किंवा व्यवसायाचा अनुभव नाही. इतकी मोठी जोखीम वित्तसंस्थेने का घ्यावी? तसेच पब्लीक इश्यु आणूनही काही फायदा होणार नाही, मागचा इतिहास नसताना इतकी मोठी जोखीम भाग धारकांनी का घ्यावी? त्यापेक्षा तुम्ही पुर्ण वित्तीय बाजू सांभाळणारा भागीदार निवडा. त्याला अर्थातच मोठा हिस्सा द्यावा लागेल. पण तुमची जोखीम काहीच असणार नाही. २ करोडच्या प्रोजेक्ट्मध्ये फक्त स्वतःच्या कल्पनेपोटी ३०% भागिदारी मिळाली तरी तुम्ही ६० लाखाचे मालक होता.. उद्योग नीट चालला तर त्या हिश्याची किंमत वाढतच जाईल.

२) आउट्सोर्स- तुमच्या मनात जे प्रॉडक्ट आहे ते इतर कोणी बनवतय का? तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्मध्ये काही सुधारणा हव्यात का? शक्य असल्यास सुरवातीला हे प्रॉडक्ट बाहेरुन तयार करून घ्या व तुम्ही फक्त मार्केटींग व विक्री संभाळा. पण हे करताना बिलींग तुमच्या कंपनीच्या नावावरच करा. तुमच्या डिझाईनचा प्रॉडक्ट सदर कारखाण्दार फक्त तुमच्यासाठीच बनवेल असा करार करा. शक्य असेल तर असा प्रॉड्क्ट तीन-चार भागात बनवुन असेंबल तुम्ही करा. ट्रेडिंगमध्ये पैसे जमले की स्वतःच्या कारखान्याचा विचार करा.

व्य.नी केलात तर अजुन काही माहितीची देवान घेवाण करता येइल.

आत्मशून्य's picture

5 May 2014 - 2:53 pm | आत्मशून्य

आर्थिक जोखीम मोठी आहे, भले ऑन पेपर सर्व परफेक्ट भासतं असले तरी. तसेच आपल्या अंदाजा पेक्षा वेळ आणी खर्च नेहमीच जरा जास्त जातो.

विकास's picture

7 May 2014 - 12:28 am | विकास

आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा! आपण खर्चाचा अंदाज केला आहे ते समजते. पण गिर्‍हाईकं (कस्टमर्स) कोण आहेत, त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहेत का आणि जे काही उत्पादन करणार आहात, त्यातून (तुमच्या पगारासकट) सर्व खर्च वगळता किती उत्पन्न (पक्षि: नफा) होईल याची काही ताळेबंदी केली आहेत का? कारण त्यावर बरेच काही अवलंबून राहील...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2014 - 6:07 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्य.नि. केलाय :).

अमेरिकन त्रिशंकू's picture

7 May 2014 - 6:06 pm | अमेरिकन त्रिशंकू

तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन तयार केला आहे का?
नसल्यास पहिल्यांदा तो करणे आवश्यक आहे.
काही उदाहरणे हवी असतील तर इथे बघा.

https://www.google.com/search?q=business+plan&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 May 2014 - 6:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

कच्चा आराखडा तयार आहे. काही बदल मला अपेक्षित आहेत त्यावर विचार चालु आहे. अपेक्षित बदल कसे करता येतील हे ठरल्यावर फायनल बिझनेस प्लॅन तयार होईल.

:). तुमच्या माहीती आणि दुव्याबद्द्ल आभारी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वाचतोय :)

मराठी कथालेखक's picture

17 Jul 2014 - 11:19 am | मराठी कथालेखक

पब्लिक लिमिटेड पॅक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडणे सोपे जाईल कारण पब्लिक लिमिटेड मध्ये कमीत कमी सात लोक सहभागी हवेत शिवाय त्यातल्या औपचारिकताही जास्त असतात.
पण एकुणातच लिमिटेड कंपनी उघडुन व्यवसाय करणे चांगले कारण त्यात 'लिमिटेड लायबेलिटी' असते, तुमच्या खासगी मालमत्तेवर कधीच टांच येवू शकत नाही.
बाकी तुम्हाला सगळ्या औपचारिकता पुर्ण करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीची (पुर्ण वेळ नेमण्याची गरज नाही) मदत घेणे सोयीस्कर राहील.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 7:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रा.लि. करतोय. जर भांडवल जमलं नसतं तर प.लि. करण्यावाचुन पर्याय नव्हता. :)

आणि प्रायवेट लिमीटेडची उस्तवार (Cost of Formation, Company Law Procedures & Income Tax implications), तुम्ही माहिती करुन घेतली आहे काय?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 2:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

Taking info spoon by spoon.

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2014 - 5:08 pm | संजय क्षीरसागर

प्रायवेट लिमीटेड हा पैसे गोळा करण्याचा मार्ग नाही, तो स्वतःची संपती प्रोटेक्ट करण्याचा उपाय आहे. (आणि ती तुमच्याकडे नाही!)

शून्य उद्योजक-कारकिर्द असल्यानं तुम्ही पब्लिक लिमीटेड फ्लोट करु शकत नाही.

तुम्हाला चुकीचा सल्ला मिळतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jul 2014 - 8:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सं.क्षी. तुमच्या महत्त्वाच्या माहीतीबद्द्ल धन्यवाद. अजुन काळजीपुर्वक पावलं टाकीन. :)

संजय क्षीरसागर's picture

19 Jul 2014 - 1:08 am | संजय क्षीरसागर

प्रायवेट लिमीटेड फॉर्म करणं (पार्टनरशिप पेक्षा) खर्चिक तर आहेच शिवाय कंपनी कायद्याच्या अटी जाचक आहेत, ज्यांची पूर्तता कंपनी सेक्रेटरीच्या मदती शिवाय तुमच्यानं होणं अशक्य आहे. कंपनी अकाऊंट्स आणि टॅक्सेशन यासाठी तज्ञाची मदत लागेल आणि खर्च सतत वाढत जाईल. लक्ष धंद्यावर कमी आणि कायदेशीर पूर्ततांवरच जास्त केंद्रित होईल. परिणामी खर्च वाढीव आणि फायदा शून्य!

शैलेन्द्र's picture

20 Jul 2014 - 1:00 am | शैलेन्द्र

limited liability company (LLC) का नाही करत?

कॅप्टन जॅक स्पॅरो, उद्योग व्यवसाया बद्दल धागा काढला गेला हे निश्चित अभिनंदनीय अशा चर्चा अधिक व्हावयास हव्यात. प्रत्यक्ष व्यवसाय चालू झाल्या नंतर व्यवसायेतर उद्दीष्टासाठी संकेतस्थळांना सातत्यानी भेटी देणे शक्य होत नसणार, तरीही कॅप्टन जॅक स्पॅरो, आणि इतरांनीही आपापले बरे वाईट अनुभाव शेअर करीत राहील्यास बरे पडेल मराठी लोकांना अधीक माहिती मिळेल. कॅप्टन जॅक स्पॅरो यांचा धागा मे महिन्यातला आहे त्यांचा गेल्या दोन अडीच महिन्यातील अनुभव ऐकण्यास आवडेल.

फायनान्स उभा झाला आहे का अद्याप व्हावयाचा आहे ? एक माणूस जॉब सोडून गेला तर त्याची जागा घेऊ शकणारा माणूस आधीच जसा शोधून ठेवला पाहीजे तसे फायनान्स उभा झालेला जरी असेल तरी कमीत कमी अटी वाला कमीत कमी दराचा रिलायेबल आर्थीक संकटात संयम बाळगणार्‍या फायनान्सचे पर्यायी स्रोतांसाठीचे नेटवर्कींग सातत्याने चालू ठेवावे.

जरासे अनाहुत अवांतर: फायनान्सच्या जाहिराती पाहण्यात येतात त्यातील बर्‍याच जाहीरातीत राहत्या जागेवर फायनान्सच्या गप्पा असतात ते मात्र टाळावे. मोठे घर विकून एका खोलीत राहणे ठिक पण डोक्यावरचे छप्पर आपल्या कुटूंबीयांच्या मालकीचे राहील हे पहावे ते गिरवी ठेऊ नये असे आग्रही मत आहे.

अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2014 - 2:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माहितगार,
माझा अनुभव सांगायला नक्कीच आवडेल. सर्वात आधी आदित्य पानसे (आदुबाळ), मंद्या, पु.पे., संजय क्षिरसागर, विकास, विनायक देशपांडे,वैनतेय, मनिष आणि माझे नाव अधिक आडनावबंधु अन्या दातार ह्यांची अतिशय मोलाची मदत झाली. कोणाचं नाव चुकुन राहुन गेलं असेल तर चु.भु.दे.घे. त्याबद्द्ल मी त्यांचा अतिशय आभारी आहे.
सगळ्यात आधी मी व्यवसाय अहवाल तयार केला, त्यात माझी स्वतःची वर्क प्रोफाईल, अनुभव, ५ वर्षात अपेक्षित असणारी टारगेट्स, बजेट, काम कुठुन आणि किती प्रमाणात मिळु शकेल ह्याचा अंदाज, मशिन्स, इस्ट्रुमेंट्स स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टी टाकल्या. सिडबी च्या नियमाप्रमाणे २५% भांडवल आपलं लागत असल्याने एंजल इन्व्हेस्टर्स चा शोध घ्यावा लागला. ४ ते ५ एन्जल्स शी बोलणी करुन आणि फिसकटवुन पदरात पडलेली माहीती अशी की, गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात ते व्यवसायात स्लिपिंग पार्टनर्स राहाणार. ही अट मला मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. शेवटी १८% रक्कम पुर्ण कर्जाऊ देणारा ईन्व्हेस्टर मिळालाय. त्याला काही % व्याजानी ३ वर्षात सगळे पैसे परत करायचे आहेत. शिवाय तो काही टक्के प्रॉफिटच्या बदल्यात त्याचे वर्क सोर्सेस ओपन करायला तयार आहे. त्याच्याबरोबर लेखी करार करायचा आहे.

त्यावर जशी काही प्रगती होत राहील ती इथे टाकीनचं.

माहितगार's picture

19 Jul 2014 - 4:32 pm | माहितगार

एकुण प्रपोजल पुढे सरकतं आहे ही आनंदाची गोष्ट, २५ % तुमची साईडवाल भांडवल अजून रिलॅक्स साईड देणारे पर्याय हाताशी असू द्यावेत, कारण एकुण सारीच रक्कम कर्जावू होते आणि हि बाब बँकेसाठी नव्हे तर किमानस्तराच्या प्रॉफीटॅबिलीटी साठी अंशतः जोखिमीची होते. एकालाच ५० ला. गुंतवायचे म्हटलेतर मराठी माणसासाठी कठीणच दहा वाले २-३ विश्वासातल्या कौटूंबिक मीत्र परिवारातून अधिक कालावधी साठी येऊ शकले तर हात मोकळा राहणे सोपे जाईल. इन एनी केस सर्वात महत्वाची बाब खेळत्या भांडवला बाबत अत्यंत शीस्तबद्ध राहणे सर्व साधारण व्यवसायातही महत्वाचे असते पण व्यक्तीगत भांडवल कमी असेल तर खेळत्या भांडवलाच्या सुयोग्य वापरा बद्दल कमालीची दक्षता घेणे जरूरी आहे त्यात व्यावसायिक-चातुर्याची खरी कसोटी असते.

नवागत मराठी लोकांच्या प्रा.लि. साठी पहिले दहा वर्षतरी कंपनी-सेक्रेटरीअल, लिगल आणि अकाऊंटीग सपोर्ट सोपा जावा म्हणून सपोर्ट मेकॅनीझम उपलब्धची असण्याची गरज आहे. बाकी सर्वच स्टेक होल्डर कॉन्फिडन्स साठी प्रालि अधिक चांगली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2014 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे

लेखातल्या उदाहरणात सोल प्रोप्रायटरशिप (sole proprietorship) उपयोगी पडू शकेल काय?

जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल?

सोल प्रोप्रायटरशिप कशी सुरु करणार? The Best option for him is Partnership. He has to find a person who can trust him & ready to invest in the Project.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Jul 2014 - 2:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी फायनल झाली आहेत. लिगल टर्म्स वर काम चालु आहे. मला लिमिटेड टाईम पार्टनर्शिपच हवी आहे. जेणे करुन त्यांचा हिस्सा फिटुन गेल्यावर व्यवसायाचा एकमेव मालक मी असीन. स्लिपिंग पार्टनर (टारगट मि.पा.करांसाठी सुचना, अयोग्य अर्थ काढु नये) परवडत नाही.

मग वर हा प्रतिसाद कशाला दिलायं ? :

प्रा.लि. करतोय. जर भांडवल जमलं नसतं तर प.लि. करण्यावाचुन पर्याय नव्हता

त्यामुळे निष्कारण चर्चा वाढली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2014 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या प्रतिसादांवरून तुमच्या मनात कंपनीचे सुरुवातीचे स्वरूप "सोल प्रोप्रायटरशिप" असे असावे असाच अंदाज होता. आता या प्रतिसादाने ते जरा जास्त स्पष्ट झाले आहे असे वाटते आहे.

जरी तुम्ही पार्ट्नर हा शब्द वापरत असलात तरी तुमच्या मनात केवळ "कंपनीच्या सुरुवातीच्या काही काळाकरीता तारणाशिवाय काही अटींवर आणि / किंवा व्याजाने आर्थिक मदत देणारा माणूस / एंटिटी" आहे असे दिसते... त्याला पार्ट्नर म्हणता येणार नाही... कर्जदार म्हणू शकू.

'एंजल इन्व्हेस्टर'ला गुंतवणीबद्दल केवळ 'मुद्दल+व्याज' असा परतावा नाही तर कंपनीच्या 'फायद्यातला + वाढीतला' भाग (बहुतेक समभागांच्या हक्काच्या किंवा इतर काही स्वरुपात) देणे गृहीत असते.

आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या कंपनीने खालील दिशेने प्रवास करणे योग्य होईल असे वाटते:

सोल प्रोप्रायटरशिप : यात सरकारी नियमांचा व्याप सर्वात कमी असला तरी कंपनीच्या सर्व कर्जांचा {लायेबिलीटिज} बोजा तुमच्या खाजगी मालमत्तेवर असतो हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे

---> प्रायव्हेट लिमीटेड कं : या प्रकारच्या कंपनीसाठी असणार्‍या नियमांचा व्याप सांभाळणे आणि संबंधीत खर्च करणे योग्य वाटेल इतकी कंपनीची उलाढाल वाढल्यावर हे पाउल उचलणे योग्य होईल

---> पब्लिक लिमीटेड कं : कंपनीच्या उलाढालीची व्याप्ती खूप वाढल्यावर आणि तुम्हाला न ओळखणार्‍या लोकांना केवळ तुमच्या कंपनीच्या नावावरूनच तुमच्या कंपनीचे समभाग {शेअर} विकत घेणे फायदेशीर वाटू लागेल तेव्हा हे पाऊल उचलणे योग्य होईल.

अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?

माहितगार's picture

19 Jul 2014 - 8:07 pm | माहितगार

कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !

सहमत, विशेषतः एकदा करार-मदार झाले की भांडवल विषयक माहिती शेअर करताना अधीक चोखंदळ असावे. तरी सुद्धा चर्चेही स्वतःचे फायदे असतात नाही असे नाही, ट्रांसपरंसी ने तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होण्यात सोपे जाते हि जमेची बाजू असते, तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला.

खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.

संजय क्षीरसागर's picture

19 Jul 2014 - 11:36 pm | संजय क्षीरसागर

अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?

एकतर प्रश्नकर्ता स्वतःची ओळख दडवून आहे. दुसरं म्हणजे कुणीही काहीही सल्ला दिला तरी सूज्ञ त्याच्या अक्कल हुशारीनंच काम करतो. कारण इथली मदत मोफत आहे त्यामुळे, (मी सर्व प्रतिसाद जवाबदारीनंच दिलेले आहेत, तरी) तो कुणाला जवाबदार धरु शकत नाही.

जिथे प्रश्नकर्त्यानं अर्धवट माहिती दिली होती, तिथे त्याची चूक निदर्शनास आणून दिली गेली आहे. तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे.

बाकी दुसर्‍या प्रतिसादकांना निव्वळ माहिती गोळा करण्याचा छंद आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांच सगळंच `योग्य' वाटतं आणि विषयातलं काहीही गम्य नसतांना सल्ला द्यावासा वाटतो.

त्यात पुन्हा वरती हे :

तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला.

आयला, म्हणजे आम्ही इथे गोट्या खेळतो काय? कोणताही मदतीचा धागा काढून पाहा, इथले सर्व सदस्य, इतरांना स्वतःच्या माहितीतून आणि योग्य असेच प्रतिसाद देतात. .

आणि वरती हा भंपकपणा :

खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.

एकतर प्रश्नकर्ता अ‍ॅनॉनिमसच आहे आणि त्यात पुन्हा `मित्राचा व्यावसाय' वगैरे फालतूपणा करायला गेला तर फुल फाट्यावर मारला जाईल, धागा आणि आयडी दोन्हीही!

संजय क्षीरसागर's picture

19 Jul 2014 - 11:44 pm | संजय क्षीरसागर

मदत कशी ओपनली (थोडक्यात प्रामाणिकपणे!) मागावी, आणि मग सदस्य ती किती मनापासून करतात यासाठी सध्या बोर्डावर असलेला हा धागा उदाहरण म्हणून पाहा : नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 12:44 am | डॉ सुहास म्हात्रे

१. "नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो. तो फरक सहज कळावा अशी अपेक्षा होती... पण, न कळल्यास हरकत नाही. (ही चर्चा इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !)

२. पुरेश्या माहितीशिवाय दिलेल्या आर्थिक (किंवा इतर कोणत्याही) सल्ल्यात अनेक तृटी राहू शकतात आणि त्या नंतर खूप त्रासदायक होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा. (ही चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!)

३. एकाच विषयांवर एकापेक्षा जास्त मते असू शकतात अणि त्यातली एकापेक्षा जास्त मते बरोबर असू शकतात. स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे. अर्थात, या बाबतीतही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे मतभेद असू शकतात. पण यावरची चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!!)

असो. धागाकर्ता सुज्ञपणे त्याला योग्य ते विचार उचलून योग्य तो निर्णय घेईलच. त्यासाठी शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 1:36 am | डॉ सुहास म्हात्रे

तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे.

तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो.

कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 1:40 am | डॉ सुहास म्हात्रे

कृपया, "...सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल." ऐवजी "...सरळ मनाने वाचल्यास त्याचा अर्थ कळेल." असे वाचावे.

नवोद्योजकाला मदत व्हावी म्हणून दिले आहेत. प्रश्नकर्त्यानं त्याबद्दल दोन-तीन वेळा आभार देखिल मानले आहेत. किती माहिती उघड करावी हे प्रश्नकर्त्याला समजतं आहेच. तस्मात, वरचा प्रतिसाद दिला आहे.

आपण लिहीलंय :

"नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो.

मदत मागतांना जितक्या गोष्टी सुस्पष्ट व्हाव्या लागतात, तेवढ्याच प्रश्नकर्त्यानं दिल्या आहेत. आणि प्रश्नात सुस्पष्टता नसेल तर मदत मिळण्याची शक्यता शून्य, मग ती नोकरी असो धंदा की इतर काही अडचण.

कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. (प्रश्नकर्त्याचे प्रतिसाद पाहा.)

स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे.

आपली रेष छोटी कशानं झाली? प्रश्नकर्त्याला उपयोग होतोयं आणि रेषांच्या भानगडीत मला काहीएक स्वारस्य नाही.

तुमची प्रवास वर्णनं आवडतात तेंव्हा त्यावरही भरभरुन प्रतिसाद दिलेत. आणि हा व्यावसायिक सल्ला आहे, तेव्हा इथेही तितकीच मनापासून मदत केली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 3:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.

तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण,

१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.

२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.

३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.

४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.

माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.

असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.

प्यारे१'s picture

20 Jul 2014 - 3:23 pm | प्यारे१

__/\__

अप्रतिम प्रतिसाद.

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 4:13 pm | संजय क्षीरसागर

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.

या चर्चेत, सीए विषयतज्ञ नाही काय?

१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.

तुमची मतं खोडली गेली याचा अर्थ तुम्ही, `मी अट्टाहास करतोयं' असा काढतायं.

२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.

असांसदीय भाषा आणि अध्याहृत अर्थ कुठे आहे? मी तर सरळ, साधं आणि तुमच्या प्रतिसादाला धरुनच लिहीलंय.

३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.

विषयाला धरुन प्रतिसाद द्यावा हे बरं! या चर्चेवर मी `कुणाचं काय समजावून घेतलं नाही' आणि कुणाला `बरंच काही समजलंय' ते दाखवा.

४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.

रेषा लहान-मोठी करणे वगैरे सारखं आडून लिहीण्यापेक्षा, जे आहे ते खुलेपणानं मांडण्यात असांसदीय काय आहे? तुम्ही जर मोकळ्यामनानं चर्चा वाचली तर धागाकर्त्याला माझ्या सर्व प्रतिसादांचा उपयोग झाला आहे, हे लक्षात येईल.

वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो...

ओपननेस तर माझ्याकडेही आहे, पण स्वतःची (अनुभवसिद्ध) मतं ठामपणे मांडणं आणि शिकण्याची तयारी असणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत.

असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.

तुमच्यासारखी `मनोधारणा' असणारे इथे अनेक आहेत. मी कुणाविषयी काही मत बनवत नाही. जो विषय असेल त्याला अनुसरुन प्रतिसाद देतो आणि मुद्दा तिथे संपतो. आणि अशा मानसिकतेला, मी ओपननेस म्हणतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

मी सर्वज्ञ आहे किंवा माझा जन्म सर्व जग सुधारायला झाला आहे असा माझा अजिबात समज नाही. त्यामुळे...

समोर दगडी भिंत आली तर त्यावर डोके आपटून ती फोडण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी तिला वळसा घालून पुढे जाणे योग्य असते, असे मला वाटते.

कारण, वेळ व श्रम वाचतात आणि डोकेही शाबूत राहते :)

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 7:30 pm | संजय क्षीरसागर

चर्चा जमत नाही म्हटल्यावर लोक (नेहमी) काय स्टँड घेतात ते माहितीये, त्यामुळे आता घालतो वळसा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 7:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

बघा, बघा... म्हणता म्हणता तुम्ही कोण्या दुसर्‍याशी सहमत झालात :) इतकं कठीण नाही ते ;)

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 8:24 pm | संजय क्षीरसागर

निरुत्तर झालेल्याला सतावू नये हा माझा शिरस्ता आहेच.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2014 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच मी वर अगोदरच सांगितलेय ना वेगळ्या शब्दांत ! बघा परत एकदा सहमत झालात ! :)

माहितगार's picture

20 Jul 2014 - 4:41 pm | माहितगार

मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.

आपल्या मनातले कुणी बोलले की कसे छान वाटते तसे हे वाक्य वाचून वाटले. अर्थात मी सहसा 'अभ्यासक' असा शब्द सुचवतो/वापरतो म्हणजे त्यात अगदी चाहते/विद्यार्थी ते तज्ञ सार्‍यांचाच समावेश 'अभ्यासक' मध्ये होतो. बाकी आपल्याशी बहुतांश सहमत म्हणून +१

धन्यवाद

माहितगार's picture

20 Jul 2014 - 11:51 am | माहितगार

बाय द वेऽऽऽ........आमचा पास ! ;)

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 2:13 pm | संजय क्षीरसागर

योग्य वेळी रिटायरमेंट घेतली ते!

हेमन्त वाघे's picture

8 Apr 2015 - 9:59 am | हेमन्त वाघे

कॅप्टन जॅक स्पॅरो हा आपला येक जुना धागा आहे .. तर सध्या काय चालले आहे ? आपला व्यवसाय सुरु झाला का? कारण मी पण येक startup - net based धडपडत आहे . तरी उपयोग होईल..
हेमंत

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 10:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करतो थोड्या वेळाने.