आजकाल विदेशी माध्यमांत काही बातम्या मुद्दाम हेतुपुरस्सर धडधडितपणे चुकिच्या पद्द्तिने छापल्या जात आहेत,जेणेकरुन भारतीय राज्यव्यवस्था व अखंड एकता याला सुरुंग लावला जाईल.
उदाहरणादाखल काही बातम्या:
१)दी आयरिश टाईम्स Modi on first trip to disputed Kashmir amid tight security
हिच बातमी सकाळ टाइम्सने अशी छापली आहे:Our priority is to win the hearts of every citizen, says Modi at Katra
२)टाइम नियतकालीकातील ही बातमी Indian Politician Arvind Kejriwal Wins TIME 100 Readers’ Poll
ह्या बातमीचे शिर्षक आधि काय होते याचा सर्व तपशिल (केजरीवाल जगातील प्रभावी व्यक्तीमत्व ठरल्याने...) या धाग्यावर आलेले आहेच.
जाग्रुत मिपाकारांच्या मदतीमूळेच टाइम नियतकालीकातील शिर्षक बदलले जाणे शक्य झाले होते.
हा असला घाणेरडा प्रकार करणारे विदेशी माध्यमांना भारतियांनी त्यांची जागा दाखवुन दिलीच पाहीजे असे वाटते.
प्रतिक्रिया
7 Jul 2014 - 1:10 pm | आनन्दा
साहेब, दे आर पेड फॉर इट..
7 Jul 2014 - 1:56 pm | मदनबाण
ह्म्म्म... बर्याच प्रमाणात सहमत ! विदेशी मिडीयाने आपल्या देशाचे चित्र त्यांना हवे तसे रंगवुन ठेवले होते,आणि आजही अनेक फिरंग्यांना हिंदूस्थान म्हणजे गायी आणि हत्ती असणारा देश वाटतो... इथे जेव्ह्या त्यांचे पैसे बाजारात ओतुन नफा मिळवायचे असते तेव्हा ते आपल तोंड भरुन स्तुती करतात्,आणि नफ्याचा ओघ आटला की कोणती इंडिया असे म्हणतात...
यावेळी सुद्धा लोकसभेच्या निवडुकीच्या वेळी परदेशी प्रसार माध्यमांनी जेव्हढे कव्हरेज करायला हवे तितके केले नाही, निदान मला तरी तसेच जाणवले. अनेक न्यूज चॅनलवर {परदेशी} या विषयांवर जास्त काही बोलले केल्याचे दिसले नाही,अमेरिकन मिडिया ने तर जवळपास बॉयकॉट केल्या सारखेच भासले.
काही दुवे :-
British comic blasting western media for ignoring Indian elections goes viral
How Western media reacted to Narendra Modi’s victory
The Indian election and the lessons the west can take from Narendra Modi's popularity
जाता जाता :-
आपल्या मिडीयाला सुद्धा जरा कोणी नीट वर्तांकन कसे करावे याची शिकवणीच दिली पाहिजे. कुठलीही चर्चा ही चर्चा न वाटता,शाब्दिक हाणामारी आणि नुसती आरडा-ओरड वाटते.ब्रेकिंग न्यूच चे खुळ आणि आम्ही ही बातमी पहिल्यांदा तुम्हाला दाखवली/दिली हा खुळचटपणा बंद केला पाहिजे.त्याजागी बातम्या सविस्तर आणि मुद्देसुद देण्यावर भर घालण्याची गरज आहे.एकच विषय दिवस बसुन रवंथ करणे हे लोक कधी बंद करणार ? उदा. शंकराचार्य आणि साईबाबा विवाद ! अख्खा दिवस अक्षरशः पिडलं या लोकांनी ! अरे देशात त्या दिवशी हा विषय सोडुन इतर कुठल्याच घटना या देशात घडल्याच नाहीत ? थोडक्यात सांगायच झाल तर पोरकटपणा बंद करुन प्रोफेशनली बातम्या देणे सुरु करायला हवे.
7 Jul 2014 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
आयरिश टाइम्स किती लोक वाचतात ? वाचकातल्या किती जणांना भारत किंवा काश्मीरबद्दल माहिती / कळकळ आहे? त्यांचा भारताच्या जागतीक छबीवर किती परिणाम होऊ शकेल?
"...Sales of The Irish Times fell 7.1 per cent in July-December 2013 compared with the same period in 2012. Print circulation stands at 82,059, a drop of 6,297 copies."
केवळ पाश्चिमात्य आहे यासाठी "सगळ्याच पाश्चिमात्य माध्यमांना" उगाच महत्व देण्याची सवय आपण सोडली पाहिजे. यामुळे आपणच त्यांचे महत्व निष्कारण वाढवत असतो. हे केवळ पाश्चिमात्य गोरा आहे म्हणून जॅनिटरला साहेब म्हणण्यासारखे आहे.
अर्थात योग्य ठिकाणी, योग्य तर्हेने विरोध करायला ना नाही हेवेसांन.
7 Jul 2014 - 2:08 pm | विजुभाऊ
या बातम्या " ठाणेवैभव" मधे कशा दिलेल्या आहेत हे पहायला हवे ;)