मंथूनी नवनीता...व्यर्थ कथा सांडी मार्ग।

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
22 Dec 2010 - 5:17 pm
गाभा: 

सद्ध्या देव, धर्म, ईश्वर, पुराण असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धर आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणात वाढलो गेलो त्यातून आलेली भोळसट श्रद्धा असणारे, सारासार विचार न करण्याची, तसा विचार करु न देण्याची दडपशाहीची, भीतीची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (देवाचे ना करायलाच हवे असे मत, का कशासाठी ते ठाऊक नसले तरी चालेल )

जुन्या भारतीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच वैदिक्/हिन्दू) बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूळाकडे जाण्याची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व मार्गांमध्ये आढळतो. मी कोण, जग्/सृष्टी कशी निर्माण झाली इ.इ. चा शोध मानवाने सातत्याने घेतला. त्यातूनच दृश्य स्वरुपात आढळणारे, अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली. सामान्यांपेक्षा अधिक शक्ति, युक्ति, बुद्धी आणि अगदी नाश करण्याचे सामर्थ्य असलेले हे देव मग 'माणसळव'ण्याचे काम सुरु होऊन त्यांना मनुष्य रुपात आणून त्यांनाच जास्तीचे हात, पाय, डोके इ.इ. जोडले गेले. हाती अनेक शस्त्रे दिली गेली. आणि कृतज्ञतेपोटी त्यांची भक्ति सुरु झाली.

सुरुवातीला अस्सल असलेले हे तत्वज्ञान हळूहळू आलेल्या बर्‍याच कारणांमुळे टिकेचे लक्ष बनले.

काळाच्या ओघात आलेली आणि मजबूत झालेली,जन्म इ. निकष मानून मजबूत केली गेलेली वर्णव्यवस्था ह्यातून धर्म आणि त्याचे ध्येयस्थान असलेला परमार्थ सातत्याने कैदेत राहिले. सातत्याने होणारी परकिय आक्रमणे, गुलामगिरी, अकारण अहिंसा, करुणा यामुळे त्या काळातील समाज खर्‍या परमार्थापासून सतत वंचितच राहिला.

याउप्पर मानवी बुद्धीला जात्याच असलेले आणि कधीही न जाऊ शकणारे भ्रम (इल्यूजन),प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपणा) हे दोष आपल्याला आपल्या मूळ रुपाचा ठाव घेण्यास अटकाव तर करतातच पण त्यातही एखाद्या वर्णाच्या फायद्यापोटी इतर समाजाला तसा अभ्यास करण्यापासूनही वंचित ठेवतात.

असा वंचित, गुलाम, लाचार, झापडे लावला गेलेला, स्वतंत्र विचार न करु शकणारा समाज कर्मकांडांच्या आहारी गेला तर नवल काय? शिक्षण नाही, कुठल्याही प्रकारची मनोरंजनाची साधने नाहीत, माध्यमे नाहीत, ग्रंथ मिळालाच तर पारायणांपलिकडे आणि भरड वाचना पलिकडे त्यातला कूटार्थ कळत नाही अशा परिस्थितीत करणार काय? तेव्हा हे सगळे भाकड सुरु झाले. रुपके सांगताना त्यातला घ्यायचा भाग कुठला ते न कळालेले निरुपणकार, किर्तनकार देखील त्याच त्या अनावश्यक गोष्टी रंगवून सांगू लागले आणि त्यावर विश्वास ठेवला गेला.

खरे तर समोर बसलेल्या व्यक्तिंनुसार, श्रोतृ वर्गानुसार फरक करणे अपेक्षित आहे. पुराणांची, वेदांची मांडणी खरे तर ८०% कर्मकांड, १६% उपासना आणि ४% ज्ञान अशीच केलेली आढळते. समाजातला ८०% भाग हा परमार्थाची माहिती नसलेला असा आहे. त्यांना प्रेमाने, काहीतरी मिळेल असे आमिष दाखवून, काही तरी संकट येईल अशी भीती घालून परमार्थाकडे वळवणे त्यांच्याकडून काही यज्ञ, व्रते, उपास, असे काहीतरी करवून एक सुसूत्रता ये ईल अशा परिस्थितीत आणणे हे कर्मकांडाचे मुख्य काम. त्यानंतर त्यातील टिकलेल्या लोकांना दिलेले नाम, ग्रंथ वाचन, पूजा ही उपासना आणि त्यानंतर ज्ञान कांड असे अपेक्षित आहे.

२१ व्या शतकात उपलब्ध माहिती, चांगल्या वाईटाचा किमान व्यवहारात विचार करण्याची आलेली क्षमता यामुळे या पुराणातल्या गोष्टी /वानग्या तिथेच रहाव्यात असे वाटले तर नवल ते काय? पण त्यापुढचे टप्पे आहेत आणि ते अत्यंत तर्कशुद्ध आहेत हेही समजून घेतले पाहिजे.

दुरितांचे तिमिर जाओ। विश्वस्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांच्छील तो ते लाहो। प्राणिजात॥

प्रतिक्रिया

आपले जवळजवळ सगळे मुद्दे पटतात .. छान लिहिले आहेत ..

मी देवांच्या बाबतीत खुप गोंधळलेला आहे ( खाली जमेल तसे लिहितो .. कृपया कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतु नाही .. जे देवाला माणतात ते माझ्या घरच्यांसारखेच आहे असे मला वाटते ,. आणि जे या सृष्टीला .निसर्गाला प्राधान्य देतात ते माझ्या मनासारखे आहेत असे मला वाटते .. .. २-३ दिवस झाले काम खुप कमी आहे त्यामुळे कोठे लिहिले नाहियेत म्हनुन माझे विचार मी लिहित आहे, पुन्हा नेक्स्ट विक मध्ये खुप लोड आहे म्हनुन लिहिल्यावर आनंद मिळतो म्हणुन माझ्या मनातील घालमेल लिहित आहे )
------

मी ही बराच विचार केला आहे अश्या गोष्टींवर ..
बर्याचदा विचार येतो ... मी डार्विन चा सिद्धान्त शिकलो , उत्क्रांती शिकलो , एका पेशीपासुन नंतर अनेक प्राणी कशे निर्माण होत गेले हे शिकलो ...
मग मला प्रश्न पडतो .. देवाने माणुस निर्माण केला असे कसे म्हणता येइल? मग देवाला पण आई-वडिल असतातच म्हणजे गणपती कींवा इतर देव .. मग शंकाराचे आई वडिल कोण ? पार्वतीचे आई वडिल कळतात पण विष्णुचे आई वडिल कोण ?
चर्चेत ही मित्रांकडुन बर्याचदा उत्तर येते तु नास्तिक आहे बहुतेक .. काय बोलणार ? (आध्यात्मात मी शुन्य आहे त्यामुळे असे प्रश्न येत असतील ही ..)

पण तसे नाहिये .. मी माझ्या घरच्यांसाठी जरी देव वगैरे सगळे आस्तिकाप्रमाणे करतो .. तरी एक शक्ती आहे ती असे नक्की जाणवले आहे.
म्हणुन मग मी पुन्हा विचार केले .. काही लोकांच्या च्रचेतुन ही मत बनवले की ..
माणसाला बर्याच गोष्टी करताना कोणी आधाराला असले की जास्त बरे वाटते .. काम जोमाने आणि पटकन होते ..
तसेच कोणी आधारासाठी देव या संक्लपेणेचा आधार घेतला असेन नक्की .. देव म्हणजे एक शक्ती , ती शक्ती मनाचीच असते अशी माझी धारणा आहे , त्याला कसलेही रुप दिले भले गणपती .. दत्त .. शंकर तरी ती मनाचीच शक्ती आहे असे मला वाटते ..

वयक्तीक मला गणपती आणि दत्त खुप आवडतात .. कारण नवनाथ कथासार आणि गणपती च्या गोश्टी लहानपणापासुन घरात मी वाचत आलो आहे ऐकत आलो आहे ...
दत्त जयंतीला आणि चतुर्थीला मी ही उपवास धरतो .. मलाच प्रश्न पडतो मग मी नक्की कोण नास्तिक की आस्तिक की आणखि कोणी ?

जसे सूर्य- चंद्र हे देव मआणले गेले तसेच इंद्र, यम , असे वेगवेगळे राजे येथे झाले ही अस्तील खुप पुर्वी आणि त्यांच्या इथल्या पराक्रमावरुन त्यांचे स्थान आपण मआणत आलो असेन .. अआणि हळु हळु ते देवतांसमान मआणले जावु लागले असतील असे वाटते ..

एक ताजे उदा. देतो .. माझ्या आजोळी (लोणी भापकर, बारामती) येथे संपुर्ण वस्तीचा पुर्वज म्हणुन तात्याबाचे मंदिर आहे, यात्रेला त्याला निवेद्य आम्हीही घेवुन जातो , तेथे गेल्यावर.. ते खुप कडक होते म्हणुन सगळे साफ सुत्रेपणा लागतो असे ऐकुन आहे .. हळु हळु आता तेथे दुसरे देव बाजुला आले आहेत आणि त्या बरोबर याण्चीही पुजा होते ..

असेच इंद्र सगळ्यांवर राज्य करीत असेन म्हनुन तो सर्व देवांचा पण नेता असेन .. यम डायरेक्ट मृत्यु देत असेन मह्णुन त्याची तशी निर्मीती केली गेली असेन असे मला वाटत राहते ..
कदाचीत हेच बरोबर ही असेन पण चुकच आहे असे ही कोणी ठाम पणे कसे सांगु शकतील .. ?

पण पुढे तसे विचार केला की मग वाटते ज्ञानेश्वरी .. तुकारामांचे अभंग हे आपल्यापुढे आहे.. ह्या थोर संतांनी पण पांडुरंगाची आराधना केली आहे .. मग नक्की काय बरोबर .. मग मी विचार करणेच थांबवतो ..

मग हळुच साईबाबा, स्वामी समर्थ आठवतात .. तसे हे माणुसच .. अगदी साईबांबाचा फोटो पण अवेलेबल आहे , अलिकडचेच आहेत ते .. मग आपणच त्यांना देव केले नाही का आता.. ते खरेच खुप ग्रेट होते, माणसांचे खुप कष्ठ ते कमी करत होते .. मदत करत होते .. पण ते देव नव्हते हे मला वाटते .. पण आज नंतरच्या तीन पिढ्यांना शिर्डीचे साइबाबा हे देवाचे अवतार्च होते हेच माहित असणारच आहे असे वाटते ..

शेवटी काही माणसांची शक्ती खुप मोठी असते .. त्यामुळे ते आपल्या सामन्य माणसापेक्षा खुप मोठे वाटतात आपल्याला तेंव्हा त्या शक्तीला आपण वंदन करतो आणि तीच शक्ती देवरुप माणतो असे माझे मत ..
म्हणजे देव नाही असे माझे मत नाही पण देवपण म्हणजे काय हे ही कळाले पाहिजे ..
अंद्धश्रद्धा म्हणजे नक्कीच देव नाही .. श्रद्धा म्हणजे पण फक्त रुढी-परंपरा नाही हे ही जाणले पाहिजे असे वाटते ...

धन्यवाद

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2014 - 3:39 pm | प्रसाद गोडबोले

मिपावर कमीत कमी प्रतिसाद असलेला काथ्याकुट असा एक रॅन्डम सर्च करत होतो आणि हा धागा सापडला ...

प्यारेजी आपाण जिंकला आहात

अध्यात्माच्या धाग्यावर चक्क तब्बल एकच प्रतिसाद ! अहो आश्चर्यम !!

"आमच्या वेळेचं मिपा राहिलं नाही आता "

तुषार काळभोर's picture

4 Jul 2014 - 4:57 pm | तुषार काळभोर

विशेष म्हणजे, ४ वर्षापुर्वीचा हा लेख, अजूनही तितकाच, असाच्या असा, लागू पडतो.

कवितानागेश's picture

4 Jul 2014 - 5:09 pm | कवितानागेश

पण वाचने ७००च्या वर आहेत, तरीही दंगा नाही....... गेले ते दिन गेले!

यशोधरा's picture

4 Jul 2014 - 5:10 pm | यशोधरा

आता होईल! *dance4*

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 5:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ?

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

4 Jul 2014 - 5:18 pm | तुषार काळभोर

अगदी असंच वाटतं

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2014 - 5:22 pm | प्रसाद गोडबोले

देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ?

माझ्या मते देव वगैरे काही नसतं , जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !!

बाकी सारे आपल्या मनाच्या आनंदासाठी निर्माण केलेले भ्रमच ! पण भ्रम असल्याने काय फरक पडतो ...आपला संबंध तर फक्त आनंदाशी आहे ! येथोनि आनंदु रे आनंदु !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 5:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> माझ्या मते देव वगैरे काही नसतं
कशावरुन ज्याला लोक देव म्हणतात अशी एक सुप्पर पॉवर नाही, असं वाटतं ?

>>>जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !!

सदगुरुला देव म्हणायचं की आणखी कोणी रमेश पांडुरंग गोखले याला देव म्हणायचं हे ठरविण्याअगोदर मला देवाचा शोध घेतला पाहिजे असे वाटते. देवापर्यंत पोहचायला अशी कोणाची कोणाला मदत लागू नये असे वाटते. कृष्णाने आवाज दिला की दिलीप बिरुटे कोण आहे की आपण हात वर केला पाहिजे, आणि आपण मथुरेचा कृष्णदेवराय यादव यांचं हेच घर आहे का तर लोकांनी कृष्णाचं घर दाखवलं पाहिजे, आणि घरातून आपल्या स्वागतासाठी कृष्ण बाहेर आला पाहिजे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

4 Jul 2014 - 5:38 pm | बॅटमॅन

'मला असं असं वाटतं'

यातच उत्तर आहे असं नै वाटत का ओ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुणाला एकाला वाटून उपयोग नाही. सुर्य म्हटलं की सर्व लोकांना दाखवता येतो, तो बघा सुर्य.
मला एकट्याला तो सुर्य आहे असे वाटता कामा नये. सर्वांना (देव आहे आणि देव नाही असं म्हणना-यांना) तो सुर्य वाटला पाहिजे आणि दाखवता आला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

ते इतक्या सोपेपणे दाखवता आलं असतं तर काय पाहिजे होतं ओ. पण असो. भोंदू नसलेले काही लोक म्हणतात की देव किंवा तत्सदृश काही आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो इतकेच. काहींना ते पटते, काहींना नाही. काहींचा स्वरूपाबद्दल मतभेद असतो तर काहींचा अस्तित्वाबद्दलच. अगदी शंकराचार्य असले म्हणून त्यांच्या काळात नास्तिक लोक नसतीलच असं नाही. फार तर मायनॉरिटीत असतील एवढेच. एखादी गोष्ट सर्व लोकांना पटेलच असे नाही, अन तेवढ्यावरून त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचे फार कारण मला दिसत नाही इतकेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 6:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तस्मात शास्त्रं प्रमाणं ते- एक तर शास्त्रानुसार चला किंवा ते सर्व सोडून चला. भोंदु काय म्हणतो आणि विज्ञान काय म्हणतो ते सोडून द्या. देवाच्या मार्गाने जाणार्‍यांना जाऊ द्या. आणि 'यावत जीवेत सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : '' असा विचार करणार्‍यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. . आपण कसं कोणाला सांगू शकतो की अमुक अमुक मार्गानेच जा. कोणता तरी एकच मार्ग निवडण्यासाठी सत्य शोधलंच पाहिजे. हे की ते असं करु नये नै का ?

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

4 Jul 2014 - 5:25 pm | कवितानागेश

बिरुटे सरांचा आवलेकाकांना अल्जिरियातून थेट काश्मिरकडे नेण्याचा प्रयत्न!! ;)
एक सोप्पं सांगू का, आहे असे वाटेल तेन्व्हा चिन्ता सोडून आपलं काम करावं, नाही असं वाटेल तेन्व्हा त्यची पर्वा न करता निवांत आपल्या कामाला लागावं. (तसेही आता तुम्ही इथलं काम वाढवून ठेवताय) :P

ऑन अ सिरियस नोटः...अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली.
हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच.
ती भावना नसली आणि भोगवाद बोकाळला की नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली जाते.
अंतिमतः आपलीच हानी होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली.
हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच.

अगदी मान्य...! पण विविध धार्मिक ग्रंथातून देवांचा आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख येतो
लेखक कोण रचनाकार कोण ते जाऊ द्या, पण खर्रच असं काही असतं का ?
एवढाच माझा प्रश्न आहे.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 9:41 pm | प्यारे१

>>> खर्रच असं काही असतं का ?

असतं. :)

(ते मिळण्यासाठी/ सापडण्यासाठी तयारी करावी लागते. जनरली आपली ती नसते.)
हा विषय झालाय बर्‍याचदा. त्यामुळं पुन्हा नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2014 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजिबात तसं काही नसतं ! आपल्याला मिळविण्यासाठी ती तयारी करावी लागते ही पळवाट आहे.
हा विषय झाला असेल तरी मी वाचलेलं नाही, प्लीज पुन्हा लिहा.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 10:28 pm | प्यारे१

>>>> अजिबात तसं काही नसतं !

झालं की मग! चला, बसू. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2014 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असो, विषय संपवताहेत असं वाटतं असो.

-दिलीप बिरुटे

देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे???

बर्‍याचदा होतं काय की मला, माझ्या सोयीनुसार, मला हवं तेव्हा, मला हवं ते, नि मला हवं तसं मिळालं नाही की मी देव नाही ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो.

त्या बरोबरच देव मला, माझ्या सोयीनुसार, मला जेव्हा हवा तेव्हा, मला हवा तशा रुपामध्ये दिसणं हे सुध्हा अपेक्षित असतं. तसं दिसलं नाही की गडबड होते. आपल्या श्रद्धाच तेवढ्या डळमळीत असतात. कारण त्यांना पुरेसा पोषक नि योग्य विचार मिळालेला नसतो.

आपण आपली देवाची व्याख्या सांगा. आणि 'असं काही असतं का अथवा नसतं का ' चा नेमका अर्थ देखील स्पष्ट करा. लिखित अथवा शाब्दिक सुद्धा संभाषणांच्या मर्यादा असतातच.
(उत्तर सवडीनं देईन. इतरांनी लगेच भुई थोपटणं सुरु केल्यास अथवा न केल्यास देखील माझी अजिबात ना नाही)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jul 2014 - 10:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे???
अहो, आम्हाला काय माहिती. पण आम्ही ’क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु’ अशा गुणसमुहाच्या व्रुत्तीला देव म्हटलं पाहिजे, असं आम्ही म्हणतो. अशी आमची व्याख्या.

उत्तर सवडीने अवश्य द्या. एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू. हाय काय अन नाय काय.
काही संदर्भ ग्रंथ...आजचा आधुनिक विचार अशी काही मांडणी केली आणि देव कसा आहे हे सिद्ध केल्यास मला आनंदच वाटेल.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 11:20 pm | प्यारे१

>>> क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु

थोडं मराठी अर्थ अथवा स्पष्टीकरण केल्यास बरं होईल. इकडं चटकन अर्थ कळून घेण्यास अवघड आहे. शाळेमध्ये संस्कृत कधीच नव्हतं. संस्कृत येत नाही. (काही स्तोत्रांचे अर्थ सोड्ल्यास)

संजय क्षीरसागर's picture

7 Jul 2014 - 11:43 am | संजय क्षीरसागर

एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू.

या पोस्टवरचधावती भेट . . . . गणपती बाप्पाची ! ! ! खरं तर, खुलासा झाला असता. पण त्या चर्चेत, ऐन मोक्याच्या वेळी, आपण हा प्रतिसाद दिलात!

मी गणपतीला साकडं घालीन नै तर म्हसोबाला साकडं घालीन.
मला काय करायचं ते मी करीन. तुम्हाला कशाचा निषेध करायचा तो करा.

-दिलीप बिरुटे
(धार्मिक )

यशोधरा's picture

4 Jul 2014 - 5:27 pm | यशोधरा

मला वाटतं की प्रत्येकाला आपापली मतं बनवायचा अधिकार आहे. माझं मत तुमच्यापे़क्षा वेगळं असू शकतं. ते तस असलं म्हणून काही बिघडत नाही. त्यावरुन गोंधळ कशाला घालायचा? किंवा तुमच्याशी माझं मत पटत नसलं तर मी चूकच आहे, हा प्रतिवाद तरी कशाला? :)

कवितानागेश's picture

4 Jul 2014 - 5:35 pm | कवितानागेश

मला तर हल्ली जे वाचेन ते चुकीचं वाटतं!! स्वतःचा प्रतिसाद्देखिल चुकीचा वाटतो. या सगळ्यापेक्षा वेगळीच कुठलीतरी दहाहज्जार्राव्वी शक्यता खरी असावी आणि मांडल्या जाणार्या सगळ्याच शक्यता खोट्या असाव्यात असंही वाटतं...
तेपण प्रत्येक विषयात! :D

पटकन एक कल्ट काढ. यशस्वी भव! मी तुला मिळणार्‍या सगळ्या देणग्या गोळा करेन *yahoo*

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मतं पटू नयेत पटावीत हा भाग वेगळा. व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही. (आपल्याला उद्देशुन नै हं हे) तुम्हाला वाटतं देव आहे तर असू द्या. आम्हाला नै लागला शोध आणि तो कोणाच्या प्रतिसादातून लागणार असेल तर लागू द्या ना. तेव्हा आपलं मत मांडाच. आपल्याला देव कुठे दिसल ते सांगा ? आता तो श्री संत तुकाराम महाराजांमधे दिसला. मोग-याच्या फुलात दिसला. सोनचाफ्यात दिसला. इतकं सांगू नका बा...!

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

4 Jul 2014 - 5:45 pm | यशोधरा

व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही.

हेच म्हटलं आहे की मी :) तुमचं मत मांडताना, माझं मत पटल नाही/ आवडलं नाही हे म्हणा, पण तुम्हाला पटत नाही म्हणजे माझं मत चुकीचं कसं आहे आणि त्या मताची टिंगल व्हायची गरज नाही, इतकंच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2014 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमान पंचवीस प्रतिसादातून वाद प्रतिवादातून पटवून देता आलं पाहिजे.
छ्या प्लीज इतक्या लवकर सहमतीला येऊ नका.

बाकी मतांची टिंगल होऊ नये याच्याशीही सहमत.

-दिलीप बिरुटे

त्याच ट्रेनिंग अजून घेतलेलं नाहीये. *help*

प्रभाकर पेठकर's picture

6 Jul 2014 - 9:31 pm | प्रभाकर पेठकर

बिरुटे सर,
कुठेतरी वाचले आहे. एकदा एक बस घाटातून जात असताना बसचे गतीरोधक (ब्रेक्स) बिघडातात आणि चालकाचा ताबा जाऊन बस दरीच्या दिशेने जाऊ लागते. आता त्या बसला खोल दरीत पडण्यापासून कोणीच वाचवू शकत नसतं, 'सर्वांनी बसच्या बाहेर उडी मारून आपापला जीव वाचवावा' असे ओरडून बसचालक बसच्या बाहेर उडी मारण्याच्या तयारीत असतानाच, रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या एका दगडाला चाक अडकून बस थांबते आणि सर्वांचेच जीव वाचतात. त्या कथेत म्हंटले होतो तो 'दगड' म्हणजेच देव.

देव, पाप-पुण्य ह्या संकल्पना (त्या काळातल्या) अज्ञ माणसाला सद्विचारांच्या मार्गावर ठेवण्यासाठी, संकटकाळी सगळीकडून मदत नाकारली गेली असताना 'देव' सर्वांची मदत करतो ह्या दृढ भावनेपोटी मानसिक बळ मिळून स्वतःच संकटावर मात करणं प्रत्येकाला साध्य व्हावं अशा हेतूने निर्मिल्या गेल्या असाव्यात. अज्ञात शक्तीला मानणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. सर्वसामान्यांना मन केंद्रित करण्यासाठी 'मूर्ती' लागते. म्हणून देवांच्या, राक्षसांच्या मूर्ती बनविल्या गेल्या. त्यांना चिकटविलेल्या गुणधर्मांनुसार देवांच्या सुंदर आणि राक्षसांच्या क्रूर, विद्रुप प्रतिमा निर्मिल्या गेल्या.

सांगोवांगी (माऊथ पब्लीसिटी) देवांच्या आणि राक्षसांच्या अस्तित्वाच्या कथा पसरत गेल्या तर कांही स्वार्थासाठी पसरविल्या गेल्या. संसारातील कटकटी, आजारपणं, महागाई, बेरोजगारी, मुलींची लग्न, संतती प्राप्ती, सामाजिक असुरक्षितता वगैरे वगैरे अनंत समस्या आणि निरसन करता येऊ न श़कणार्‍या शंका-कुशंकांनी कर्मकांडांना जन्म दिला आणि अतिशयोक्ती वगळता कर्मकांडं म्हणजेच अध्यात्म ही धारणा पसरली आहे.

विज्ञानाच्या प्रगतीने अंधश्रद्धा आणि कर्मकांडं मागे पडतील असा एक विश्वास होता. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक बदलाला वेग आला आणि व्यावसायिक स्पर्धेतून असुरक्षिततेची भावना बळावली. ह्याची परिणीती सुशिक्षितांच्या वाढत्या कर्मकांडात झाली.

मानसिक बळ प्राप्त होण्यासाठी, कोणीतरी आपला वाली आहे ह्या विश्वासासाठी (जो आवश्यक असतो), देवावर, पाप-पुण्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवावा पण कर्मकांडापासून दूर रहावं असं माझं वैयक्तिक मत आहे.

यशोधरा's picture

6 Jul 2014 - 9:35 pm | यशोधरा

सुरेख प्रतिसाद!

देव मानणार्‍या लोकांचे मोठे गट वरील कारणांमुळं देव मानतात.
अगदीच स्पेसिफिक बोलायचं तर
१. भीती आणि ठराविक विपरीत प्रसंगी अचानक अनुकूलता निर्माण होऊन त्यातून बाहेर पडणं
२. नीती अनितीच्या कल्पना.
३. आत्यंतिक जिज्ञासेपोटी प्रश्न उत्पन्न होऊन सत्यान्वेषणाचा प्रयत्न.
४. निव्वळ कृतज्ञता नि प्रेम अथवा भक्ती.

ह्या मार्गांनी देवाकडं झुकण्याचा कल तयार होतो. तो टिकवून वाढवणं आपापल्या हातात आहे. असो!

धन्या's picture

6 Jul 2014 - 9:57 pm | धन्या

अगदी मोजक्या शब्दांत बरंच काही लिहिलंत काका तुम्ही.

गेले ते व्यष्टी, समष्टी, अंत्येष्टीवर चर्चा करण्याचे दिवस!! आमच्यावेळचं मिपा राह्यलं नाही. ;)

मा. प्रसाद गोडबोले, ज्येष्ठ संपादक्स आणि मित्रजनांनी आमच्या ह्या जुन्या धाग्याला ह्याठिकाणी हे जे पुनरु-अहंहं (घसा घसा)- पुनरुज्जिवित अशा पद्धतीनं केलं किंवा ह्याठिकाणी जो तुत्य (बरोबरे ना?) प्रयत्न जो असा छान केलेला आहे त्याबद्दल त्याठिकाणी मी आपणा सर्वांचा हार्दिक आणि अंतःकरणपूर्वक आभारी आहे.

अशा पद्धतीनं जर सगळ्या दूरलक्षित धाग्यांचा ह्या ठिकाणी विचार झाला तर मिसळपाव हे एक अतिशय लोकप्रिय संस्थळ ठरेल ह्या बाबत मला तिळमात्र शंका नाही. (खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली. असो.)

जय हिन्द जय महाराष्ट्र!

पैसा's picture

5 Jul 2014 - 3:07 pm | पैसा

प्यारेकाकांचा धागा चावडीमधे हलवा नायतर प्यारेकाकांनाच संपादकांच्या कंपूमधे हलवा.

प्यारे१'s picture

5 Jul 2014 - 3:10 pm | प्यारे१

>>> संपादकांच्या कंपूमधे

युंकी ये कौन बोला?
हमने तो कुछ नही कहा था.... कस्समसे!

पैसा's picture

5 Jul 2014 - 3:16 pm | पैसा

कंपू असणं चांगलं. कंपूबाजी वैट्ट. असं हल्लीच एका जालीय वजनदार व्यक्तिमत्त्वाने लिहिलेलं वाचलं आहे. (मिपावर नव्हे.)

प्यारे१'s picture

5 Jul 2014 - 3:24 pm | प्यारे१

>>> जालीय वजनदार व्यक्तिमत्त्वाने लिहिलेलं वाचलं आहे. (मिपावर नव्हे.)

तेच्च का ते? ;)

बाकी आम्ही मिपा सोडून कुठ्ठं नसतो बरं :P

स्वगतः धागा काय प्रतिसाद काय, कॅय्य चॅल्लंय कॅय्य?

पैसा's picture

5 Jul 2014 - 3:28 pm | पैसा

तेच्च ते!!

आम्ही सर्वसंचारी. यत्र तत्र सर्वत्र परमेश्वराप्रमाणे नीरिक्षण करत असतो. आता विचारा देव हाय का नाय! कुठे आहे अवांतर?

जालं तुटलं नाय? व्यक्तिमत्व वजनदार असल्याने गो... बाकी असं कोणाला म्हणू नाई.. वजनदार वगैरे गं.

कवितानागेश's picture

5 Jul 2014 - 8:23 pm | कवितानागेश

त्रिवार सहमत!!
हलवा हलवा हलवा!!
ताबडतोब हलवा!!
=))

मदनबाण's picture

6 Jul 2014 - 9:00 am | मदनबाण

झालं माउ चा डोळा बरोबर हलव्यावर गेलाच ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

पैजारबुवा,

सस्नेह's picture

6 Jul 2014 - 11:02 pm | सस्नेह

देव ,म्हणजे व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. तस्मात कर्मकांडातून प्रवृत्ती बदलत असेल तर देव भेटायला हरकत नसावी.

कवितानागेश's picture

6 Jul 2014 - 11:24 pm | कवितानागेश

पण असं काही 'आहे की नाही?' असं कन्फ्युजन मूळात का निर्माण होतं?

प्यारे१'s picture

7 Jul 2014 - 1:19 am | प्यारे१

कारण माणूस हाच फक्त अशा पद्धतीचा विचार करु शकतो.
नि तसा विचार करताकरता कधीकधी 'मी कर्ता' असा सुप्त विचार निर्माण होतो. त्यामुळं आहे की नाही हे कन्फ्युजन निर्माण होतं.

कवितानागेश's picture

7 Jul 2014 - 9:15 am | कवितानागेश

म्हणजे इतर प्राण्यांमध्ये असं कन्फ्युजन नसतं असं म्हणता येइल.
गुड! ;)

सुबोध खरे's picture

7 Jul 2014 - 10:23 am | सुबोध खरे

शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्यात आठ माकडे एका पिंप सदृश्य उंच नळकांड्यात ठेवली आणि त्यातले एक जरी माकड वर चढून बाहेर येऊ लागले तरी त्यांच्यावर बर्फाच्या अत्यंत थंड गार पाण्याचा शिडकावा होईल अशी व्यवस्था केली. माकडांची आतमध्ये खाणे पिणे इ उत्तम व्यवस्था होती. काही दिवसांनी ती माकडे हे "शिकली" कि आपल्यापैकी एक जरी माकड वर चढू लागले तरी आपल्याला बर्फाच्या पाण्याचा मारा होतो. त्यामुळे आता ती माकडे त्यांच्या पैकी एक जरी वर चढू लागले तरी किंचाळून आणि चावे घेऊन त्या माकडाला खाली खेचू लागत. असे काही दिवस गेल्यावर त्यांनी तो बर्फाच्या पाण्यचा मारा बंद केला आता एक जरी माकड वर चढू लागले कि इतर ७ माकडे त्याला खाली खेचत असत. काही अवधीनंतर त्यांनी यातील एक माकड बाहेर काढले आणि त्या जागी दुसरे माकड आणले. हे नवीन माकड जेंव्हा वर चढू लागे तेंव्हा इतर सर्व माकडे त्याला चावून आणि किंचाळून खाली खेचत असत. काही दिवसांनी ते माकड पण शिकले कि कोणीही वर जाऊ लागला तर त्याला खाली खेचायचे.

शास्त्रज्ञांनी हळूहळू एक एका करत सर्व मूळ माकडे काढून दुसरी माकडे तेथे रुजू केली. आता तेथे एकही माकडाला बर्फाच्या पाण्याच्या माऱ्याचा अनुभव नव्हता पण एक जरी माकड वर चढू लागले तरी इतर माकडे त्याला चावून किंचाळून खाली खेचत असत.

शेवटी कार्यकारण भाव जरी नाहीसा झाला तरीही श्रद्धा,परंपरा,किंवा कर्मकांड कसे चालू राहते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
( या प्रयोगाची विदा माझ्याकडे नाही पण हा प्रयोग यशस्वी झाला असावा अशी मला खात्री आहे)

याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. केवळ बाबा वाक्यम प्रमाणं म्हणून स्वीकारू नये.

आयुर्हित's picture

7 Jul 2014 - 10:50 am | आयुर्हित

१००% सहमत

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 11:01 am | अत्रुप्त आत्मा

@याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. >>>> तेच तर खरं! पण समजून आणि विशेषत: उमजून घेतलं.. तर धर्मवेड कमी होतं .. अनावश्यक धर्माभिमानही गळुन पडतो. पण ज्यांना या 'सगळ्याची' झींग चढलेली असते.. ते स्वत: टाइट होतातच.पण जे सुजाण यात मर्यादेत राहू पहातील..किंवा पूर्ण बाजुला होऊन आपल्या बळावर जे मिळेल..ते स्वीकारुन जगू लागतील.. त्यांना ही-माकडं 'खाली ओढतात'..जागोजाग शिव्याशाप देत..आणि उपदेशाचे डोस पाजत..बळचकर टोचत फिरतात...यांचं काय करायच?
आमचे एक व्यवसाय बंधु असेच एका पंथाच्या आध्यात्मिक टोळीचे गेली दहा वर्ष शिकार झालेले होते..होते म्हणायचं,कारण त्यांना मी वारंवार या मायाजालाबद्दल सांगायचो..ते ऐकत नव्हतेच.पण ३ महिन्यापूर्वी त्यांची या टोळीकडून अशी जबर कोंडी झाली..की वैतागून त्यांनीच हा नाद सोडला. त्यामुळे ही मंडळी 'फटका-बसल्याशिवाय' सरळ होत नाहित..हे माझ्या लक्षात आलं..पण तोपर्यंत हे जे दुसय्रांना लस लावत फिरतात.. त्याला कायद्यानी अटकाव बसेल अशी काही योजना करायला हवी का नको???

डॉक्टर साहेब, कंडीशनिंगचे छान उदाहरण दिलेत तुम्ही. श्रद्धेच्या बाबतीत माणसंही या प्रयोगातील माकडांप्रमाणेच वागतात.

तीन चार हजार वर्षांच्या "कंडीशनिंग"चा प्रभाव एकदम नाहीसा होणार नाही. तो हळूहळू माणसांना आंजारुन गोंजारुन कमी करावा लागेल.