आडवाटेवरील रियासी

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in भटकंती
1 Jul 2014 - 12:56 am

रियासी हे नाव ऐकून कदाचित डोक्यात प्रकाश पडणार नाही. ते साहजिक आहे, कारण जम्मू-काश्मीरमध्ये असूनही रियासी हे ना तीर्थक्षेत्र आहे ना हिलस्टेशन. किंबहुना, कटरा (वैष्णोमाता मंदिर) हा अतिप्रसिद्ध शेजारी लाभल्यामुळे रियासीचे नाव अधिकच विसरले जाते. पण तरीही एकदा जाऊन पहावी (अगदी दोन दिवस राहून) अशी जागा आहे.
Reasi 1

शिव खोरीच्या रस्त्यावर लागणारे रियासी गाव चिनाब नदीच्या तीरावर वसलेले आहे. पीरपंजाल पर्वतरांगा इथे सपाट मैदानाला येऊन मिळतात. त्यमुळे नदीचा प्रवाह सुसाट असतो. सिंधु पाणीकरारानुसार चिनाबवर धरण बांधता येत नाही. नदीच्या वेगवान प्रवाहावर "राफ्टिंग" करण्याची सोय आहे.
Reasi 2

Reasi 3

फोटो पाहून कदाचित रियासी हे एक थंड हवेचे ठिकाण असावे असा समज झाल्यास नवल नाही. पण तो चुकीचा ठरेल. उन्हाळ्यात येथील तापमान उत्तर भारतातील अन्य शहरांशी स्पर्धा करत ४० डिग्रीच्याही वर जाते. पण त्याही दिवसांत येथील रात्री सुखद असतात.

Reasi 4

रियासीपासून सलाल जलविद्युत प्रकल्प अगदी जवळ आहे. पर्वतरांगांनी वेढलेले हे धरण फारच सुंदर दिसते. विशेष परवानगी घेतल्यास अगदी भूगर्भात पाच मजले खाली बसवलेली जनित्रे पाहता येतात. चिनाब नदीचा प्रवाह एका प्रचंड भुयारातून वळवून, जनित्रांद्वारे विद्युतनिर्मिती करून, ते पाणी ४ किलोमीटर खाली पुन्हा नदीपात्रात सोडले जाते. पण छायाचित्रणावर प्रतिबंध असल्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.

Reasi 5

रियासी गावातून बाहेर पडून चिनाब पार केली की लगेच येते सिहाड बाबाची गुहा. येथील जलप्रपाताची उंची पाहून डोळे फिरतात.
Reasi 6

शहरापासून १० किलोमीटरवर धनसर बाबाची गुहा हे आणखी एक नितांतसुंदर स्थळ आहे. अमाप नितळ पाणी, शांतता आणि स्वच्छता यामुळे मन प्रसन्न होते. (धनसर बाबा मंदिर-गुहा कटरापासून फक्त १५ किलोमीटरवर आहे).
Reasi 7

रियासी गावाला लागूनच भीमगड किल्ला आहे. खरेतर लहानखुरा असल्यामुळे त्याला गढी म्हणणे योग्य होईल. पण दिसायला फार छान आहे. राज्यसरकारने विशेष प्रयत्न करून पर्यटकांसाठी या किल्ल्याची डागडुजी केली आहे. अशा वेळी न चुकता महाराष्ट्रातील किल्ल्यांची दुर्दशा आठवून अफाट वाईट वाटते.

Reasi 8

Reasi 9

Reasi 10

माझ्या लटपटत्या मराठीची अधिक दुर्दशा पाहून मिपाकरांना वाईट वाटू नये, म्हणून इथेच थांबतो आणि राहिलेले वर्णन छायाचित्रांवर मर्यादित ठेवतो..!

इकडे आलात तर जरूर भेटा..! जय माता दी!!!! :) :)

-----

अंतर: कटरापासून ३० किलोमीटर. जम्मूपासून सुमारे १०० किलोमीटर.
प्रवासः रस्त्याने. लवकरच कटरा - उधमपूर रेल्वे सुरू होईल. (रियासीवरून जाते).
हवामानः तीव्र उन्हाळा. अन्य दिवसांमध्ये सुखद हवामान.
जवळपास अन्य पाहण्याजोगे: सिहाड बाबाची गुहा, नौदेवी मंदिर, धनसर बाबाची गुहा, सलाल जलविद्युत प्रकल्प, शिव खोरी.

------

रियासीची काही अन्य छायाचित्रे:

१. बहरलेला आंबा

Reasi 11

२. रंगात आलेला खोखोचा सामना (किल्ल्यावरून काढलेला फोटो)

Reasi 12

३. मधाची शेती

Reasi 13

४. देवाचा पार

Reasi 14

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

1 Jul 2014 - 1:02 am | चलत मुसाफिर

मराठीत लिहिताना अपार कष्ट होतात. अन्य मिपाकरांप्रमाणे सफाईदार लिहिता आले असते तर.. असेही वाटते. शब्दांची टंचाई छायाचित्रांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. गोड मानून घ्यावा ही विनंती..!! :)

एस's picture

1 Jul 2014 - 10:41 am | एस

हे ठिकाण माहीतच नव्हते. ती भीमगडची गढी फारच सुंदर. आपण महाराष्ट्रीय करंटे आहोत हे एकदम मान्य.

छायाचित्रणाच्या दृष्टीने एक उदाहरण भीमगडाच्या एका फोटोत सापडलं त्याबद्दल दोन शब्द लिहितो. पहिल्या प्रतिमेत आडव्या गेलेल्या विद्युतवाहिनीच्या तारा इथे वेगळ्याच दिसताहेत. हा परिणाम डिजिटल कॅमेर्‍यांमध्ये जाणवतो. ह्याला म्वॉरं (Moire) असे म्हणतात. :-)

चलत मुसाफिर's picture

1 Jul 2014 - 5:33 pm | चलत मुसाफिर

तुम्ही डकवलेला दुवा पाहिला. पण तो परिणाम या फोटोमध्ये दिसतो आहे असे वाटले नाही. अधिक माहिती देऊ शकता काय?

मस्त लिहीलंयत!! नवीन असलात तरी लिखाणात चुका अशा दिसल्या नाहीत. पुलेशु.

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Jul 2014 - 7:01 am | लॉरी टांगटूंगकर

टेंन्शन नका घेऊ, मस्त जमतय. धागा आवडला. लिहीत रहा

चलत मुसाफिर's picture

1 Jul 2014 - 5:38 pm | चलत मुसाफिर

मिपावर छायाचित्रे डकवता येत नसल्यामुळे ती माझ्या व्यक्तिगत ब्लॉगवर टाकून दुवे इथे घेतले आहेत. मूळ ब्लॉग इथे पाहता येईल.

पैसा's picture

1 Jul 2014 - 9:31 am | पैसा

लिखाणावरून तुम्ही तिकडे रहाता असं दिसतंय. आणखी येऊ द्या! कधी तिकडे जायचा विचार केला तर तुम्हाला संपर्क करेन हे नक्की!

चलत मुसाफिर's picture

1 Jul 2014 - 5:34 pm | चलत मुसाफिर

अवश्य संपर्क करा.

प्रचेतस's picture

1 Jul 2014 - 10:01 am | प्रचेतस

जाम भारी आहे हे.

दिपक.कुवेत's picture

1 Jul 2014 - 11:41 am | दिपक.कुवेत

काश्मीरचा हा वेगळा भुभाग आवडला. फोटो पण छान आलेत.

चलत मुसाफिर's picture

1 Jul 2014 - 5:35 pm | चलत मुसाफिर

बायकोच्या हौसेखातर घेतलेला कॅमेरा आहे. फोटोही बरेचसे तिनेच काढलेले आहेत हे नमूद करायला विसरलो होतो.

चलत मुसाफिर's picture

1 Jul 2014 - 5:40 pm | चलत मुसाफिर

रियासी हे जम्मू भागात, म्हणजे पीरपंजाल पर्वतरांगेच्या अलिकडे आहे.

चलत मुसाफिरजी, आपले टंकन, लेखन अतिशय उत्तम आहे.

मधुरा देशपांडे's picture

1 Jul 2014 - 1:51 pm | मधुरा देशपांडे

छानच. फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Jul 2014 - 5:50 pm | अत्रुप्त आत्मा

छान फोटू.. आणी वर्णन!

सखी's picture

1 Jul 2014 - 7:26 pm | सखी

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडलं, विशेषतः जलप्रपाताचा फोटो एकदम वेगळा, या जागेची कल्पना नव्हती. लिहीत रहा :)

निखळानंद's picture

1 Jul 2014 - 7:45 pm | निखळानंद

जेवढं लिहिलंय तेवढं अगदी व्यवस्थित जमलंय की !
उगाच हात आखडता घेऊ नका..
आम्हाला अश्या आड वाटेवरची आणखी गुपितं जाणायची आहेत तुमच्या कडून..
फोटो़ज सुरेख !
चलत मुसाफिर मोह लिया रे रियासी वाली गढिया !

मदनबाण's picture

2 Jul 2014 - 6:59 am | मदनबाण

वाह... नविन ठिकाण कळाले. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रिमझिम गिरे सावन... :- मंझिल

बॅटमॅन's picture

2 Jul 2014 - 11:02 am | बॅटमॅन

हैन दणका!!!!! भारीच की ओ. :)

नंदन's picture

2 Jul 2014 - 11:06 am | नंदन

फोटो आणि वर्णन आवडलं. मराठीच्या दुर्दशेची भीती अनाठायी आहे :), अधिक लिहित चला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2014 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त ठिकाण आहे. सुंदर फोटो.

बर्‍याच वेळेला असा अनुभव येतो की भरपूर जाहिरात झालेले ठिकाण बाजारू बनलेले असते, पण बाजूचे असे कमी गजबजाटीचे एखादे ठिकाण न विसरणारा अनुभव देऊन जाते. उदा. दार्जिलिंगपेक्षा त्याच्या शेजारचे कॅलिमपाँग अनेक पटींनी जास्त सुंदर आहे.

शुचि's picture

2 Jul 2014 - 8:52 pm | शुचि

वॉव!!!

वेल्लाभट's picture

2 Jul 2014 - 11:07 pm | वेल्लाभट

सुसाट !!!!!!!!
गढी जबर ! धबधबा तर.......... कायच्याकाई
प्रत्यक्ष बघायला मजा येईल यात दुमत नाही.

यशोधरा's picture

3 Jul 2014 - 8:51 am | यशोधरा

सुरेख फोटो. रियासीची ओळख आवडली.

लव उ's picture

7 Jul 2014 - 3:04 pm | लव उ

मस्त वर्णन आहे.