महत्वाची सुचना:
पोरगीपटाव शास्त्रात आणि मी खाली देत असलेल्या विषयात चर्चा करणायत ज्याना रस असेल आणि त्याबद्दल माहिती असेल त्यांनीच आणि तरच या चर्चेत भाग घ्यावा....
चर्चेचा विषयच मुळात पोरगीपटाव शास्त्राशी संबंधीत आहे.
त्यामुळे येथे "पोरगीपटाव शास्त्र खरे की खोटे" किंवा "पोरगीपटाव शास्त्राचा उपयोग होतो की नाही" यावर चर्चा अपेक्षित नाही. तेव्हा खबरदार जर कोणी याविरुद्ध बोलाल तर. मिपाला कुठच्याच विषयाचं वावडं नाही हे ध्यानात ठेवा!! धन्यवाद!!!
चर्चेचा विषय:
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
लग्न तरुणी कडून मिळणारे भाव फळ गोड असते की भाव खाऊ तरुणींकडून?
उदा: तुमचा नंबर लग्न तरुणीच्या लिस्टवर तिसऱ्या स्थानावर आहे पण भावखाऊ तरुणीच्या यादीत तो सत्ताविसाव्या स्थानात आहे (अशी निदान तुम्हाला तरी आशा आहे) तर कोणत्या तरुणीच्या मागे लागून तुम्हाला फळ मिळेल ? भावखाऊ तरुणीच्या मागे लोचटपणा यशस्वी होण्यासाठी पोरगीपटाव शास्त्रात कुठचे उपाय सांगितलेले आहेत?
लग्नासाठी पोरगी , नुसतीच फ्रेंडशिप देणारी पोरगी आणि भावखाऊ पोरगी यापैकी कोणत्या प्रकारच्या तरुणींना पटवावे?
तसेच वरील ३ प्रकारच्या पोरींच्या आसपासच इतर अनेक षोडशवर्ष तरुणी दिसत असतात. त्या नेमक्या कशा व केव्हा पटवाव्यात?
उदा: लिव्हिन नात्यात असताना इतर नॉनलिव्हिन तरुणी कशी पटवायची?
मी या धाग्यात निम्म्यापेक्षा अधिक शब्द चर्चा कोणी करू नये हे सांगितलं असलं म्हणून काय झालं. तुमच्याकडून मात्र कृपया विस्तार पूर्वक चर्चा येथे अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा, पोरगीपटावशास्त्राला एका शब्दानेही बरोबर की चूक विचाराल तर माझ्याशी गाठ आहे. (म्हणजे काय ते विचारू नये, कारण मी काही या धाग्यावर एकही प्रतिसाद देणार नाहीये...)
धन्यवाद!!!
प्रतिक्रिया
29 Jun 2014 - 9:12 pm | एस
मी पयला
30 Jun 2014 - 5:10 am | खटपट्या
शतक नक्की !!
30 Jun 2014 - 6:51 am | धन्या
पोरगीपटाव हे शास्त्र नाही. बाकी चालू द्या.
30 Jun 2014 - 8:29 am | टवाळ कार्टा
तो आण्भव अस्तो ;)
30 Jun 2014 - 9:19 am | चित्रगुप्त
पोरगीपटाव शास्त्र अर्थात 'पोपशास्त्र' हे सुप्रसिद्ध 'कोकशास्त्र' याचा प्रथम अध्याय आहे. भारतीय संस्कृतीत या शास्त्राचा उगम शंकर-उमा यांच्या प्रणयातून झाला, असे समजले जाते.
पाश्चात्त्य संस्कृतीत या शास्त्राचा आद्य पुरुष 'आदम' वा अॅडम हा असून त्याने ईव्ह नामेकरून पोरगीस पटविले, असे त्यांच्या 'ओल्ड टेस्टामेंट' नामक प्राचीन ग्रंथात प्रतिपादित केलेले आहे. पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत, आणि ते लोक 'कोक' नामक पेय पीत. कालांतराने त्यांच्या प्रमुख धर्मगुरूस 'पोप' म्हणू लागले.
.
30 Jun 2014 - 12:35 pm | प्रसाद गोडबोले
ळॉळ ळॉळ =))))
1 Jul 2014 - 8:04 am | विजुभाऊ
पहिल्या चित्रतील माणुस त्या म्हातार्या माणसाला का उचलतोय ? तो त्याचा होउ घातलेला सासरा किवा त्या खाली पडलेल्या स्त्रीचा पिता आहे का? तज्ञानी अज्ञांना खुलासा करावा
1 Jul 2014 - 8:18 am | चित्रगुप्त
अहो तो म्हातारा दाढीवाला म्हणजे चक्क सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परम दयाळू 'गॉड' आहे, आणि त्यानेच बनवलेल्या आदमने पोपशास्त्रात प्राविण्य मिळवून ईव्हला पटवल्याने संतापून तो त्या दोघांची हाकालपट्टी करतो आहे हेवन मधून. गॉडचे लांबलचक अंगरखे वगैरे सावरायला देवदूत तत्परतेने हजर आहेत. च्यामारी, त्या सर्वज्ञ, सर्वशक्तिमान गॉडास आधीच कसे कळले नाही, हे असले लफडे होणार म्हणून.
1 Jul 2014 - 8:52 am | विजुभाऊ
हे बरीक मजेशीर हो. ज्याला स्वतःचे अंगवस्त्र. अर्र चुकलो अंगरखा सावरता येत नाही त्याला गॉड म्हणायचे?
2 Jul 2014 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
तो म्हातारा त्या बिचार्या स्त्रीच्या डोक्यावर पडू नये म्हणून त्या लहान मुलाचा प्रयत्न चालला आहे असेच दिसते आहे :) ;)
3 Jul 2014 - 12:08 am | एस
अगदी अगदी! मलाही हे चित्र पाहिल्यापाहिल्या असंच वाटलं होतं... *ROFL*
30 Jun 2014 - 9:39 am | राजेश घासकडवी
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या.
आणि आमच्या भावना मरू देत. पण स्वतःला काही अनुभव नाही आला म्हणून शास्त्रच नाकारायचं? हे काही बरोबर नाही.
30 Jun 2014 - 12:47 pm | प्रसाद गोडबोले
धन्या तु वैट्ट वैट्ट आहेस ... आमच्या होमिऑपॅथी ला शास्त्र मानत नाहीस , ज्योतिष शास्त्राला शास्त्र मानत नाहीस ... इथपर्यंत ठीक आहे. पण पोरगीपटाव शास्त्राला तू शास्त्र मानत नाहीस? आमच्या भावना दुखावल्या.
धन्या , थांब तुझ्यावर राखी सावंतच सोडतो *biggrin*
30 Jun 2014 - 9:39 am | श्री गावसेना प्रमुख
सुंदर पण भाव खाऊ तरुणी मध्ये नक्की काय बघायचे असते??
प्रेम आंधळ असत असे म्हनतात,त्यामुळे काहीच बघु नये30 Jun 2014 - 9:48 am | बाळ सप्रे
पोरगीपटाव शास्त्रच आहे पण पोरगी पटवणारे सगळे भंपक आहेत..
बाकी चालू द्या!!
30 Jun 2014 - 4:05 pm | राजेश घासकडवी
सगळे भंपक नाही, काही जण भंपक आहेत. ते शास्त्र कसं वापरायचं हे त्यांना कळत नाही. त्याांना चांगले अनुभव येत नाही. आणि मग त्या गोष्टीतल्या कोल्ह्याप्रमाणे 'शास्त्रच आंबट' म्हणतात.
30 Jun 2014 - 9:57 am | अनुप ढेरे
या शास्त्राची चर्चा करणार्यांना कधीही फलप्राप्ती होत नाही. म्हणजे पोरगी पटत नाही.
30 Jun 2014 - 10:00 am | चित्रगुप्त
आम्ही वरती दिलेल्या दोन चित्रांतून याचे उत्तर मिळावे.
30 Jun 2014 - 11:09 am | मारवा
काय बघायच त्याचा थोडासा अंदाज आलाय चित्रांवरुन पण अहो अस कुणी दाखवत का ?
बघणारे लाख होते कालिंदीच्या तटाला
ज्याला दाखविले प्रेम गोपींनी तो एकच कृष्ण होता.
बाकी तुमची चित्र अतिशय सात्विक आणि उत्कट भाव उत्पन्न करणारी अशी आहेत. सत्यम शिवम सुंदरम चा प्रत्यय देणारी व कुठल्याही नियंत्रणाची गरज नसलेली आहेत. याने कुणाच्याही भावना दुखावु शकत नाहीत व ही अश्लील तर मुळीच नाहीत. आणी याने मिपा हे संस्थळ कीती प्रगल्भ सर्वसमावेशक मुक्त आधुनिक लोकशाहीवादी आहे याचा व मला इथे वावरता येते याचा अभिमान वाटतो.
30 Jun 2014 - 2:40 pm | चित्रगुप्त
बघावसं तर वाटतं, पण बघायला मिळत नाही, म्हणूनच चित्र, शिल्प, सिनेमा यातून प्रेक्षक ही हौस भागवून घेत असतात. काही आदिवासी जमातीत सर्व स्त्रीपुरुष अनावृत्त रहातात, ते चित्रे वगैरे काढत नाहीत.
मी आर्टस्कुलात शिकत होतो, तेंव्हा आमचे सक्सेना सर सांगायचे, घरी बसू नका, नदीवर जा, आणि तिथे स्नान करणारांची स्केचेस करत जा.
मंदिरांमधून प्राचीन मूर्तीकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्तींना पुजारी, भक्त वगैरे बटबटीत वस्त्रे चढवून ठेवतात, ते मला अत्यंत अश्लील वाटते, आणि त्या मूर्तीकारांच्या कलेचा अपमान वाटतो.
खालील चित्र बघा: याचे नाव 'Sacred and Profane Love असे आहे, आणि विषेश म्हणजे डावीकडील सवस्त्र स्त्री लौकिक/अपवित्र प्रेमाचे प्रतीक, तर उजवीकडील निर्वस्त्र स्त्री अलौकिक/पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे.
चित्रकारः Titian ( c. 1514) Oil on canvas 118 × 279 cm (46.5 × 109.8 in)
या चित्राबद्दल वाचताना अचानक मला आणखी एक चित्र दिसले, त्याचा या धाग्याशी तसा संबंध नसला, तरी वाचकांनी ते बघावे असे वाटले, म्हणून देतो आहे:
चित्रकारः Joseph Anton Koch (1768 – 1839)
'Jacob Encountering Rachel with her Father's Herds' (1836)
Oil on canvas, 66 x 92 cm -- Österreichische Galerie, Vienna
30 Jun 2014 - 2:49 pm | प्रसाद गोडबोले
१००% सहमत आहे ! काही मंदिरात काकड आरतीला उपस्थिर तहाण्याचा योग आल्याने देवांव्या निर्वस्त्र मुर्ती पाहण्याचे सौभाग्य मिळालेले आहे आणि त्या वस्त्रे घातलेल्या मुर्तींपेक्षा १०० पट जास्त सुंदर असतात ह्यात काहीच शंका नाही !!
अवांतर १: चित्र क्रमा़ंक १ वरुन जे मुलतःच सुंदर नसतात त्यांनाच त्यांची कुरुपता लपवायला कपड्यांची गरज पडते असे अनुमान काढता येईल काय ?
अवांतर २ : दुसरे चित्र लईच सुंदर आहे :)
30 Jun 2014 - 10:48 am | मारवा
राजेश घासकडवी जी
ही चर्चा एसी अक्षरे वर न करता मिसळपाव हे संस्थळ या चर्चेसाठी निवडण्या मागे नेमके कुठले मनो-सामाजिक-राजकीय घटक कार्यरत आहेत यावर कृपया प्रकाश टाकावा.
यामध्ये
१- संस्थळाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण
२- सदस्यांकडे बघण्याचा द्रुष्टीकोण
३- विषय उचलला पाडणे जाण्यासंदर्भातील अदमास.
४- राजकीय भुमिका
५- कप्पेबंद मानसिकता
या वरील खास पैलुंसंदर्भात खुलासा केल्यास संस्थळाकलन वाढीस मदत होइल व सदस्यांचे संस्थळ वाइज आचरण भिन्न का असते याचे ही आकलन होइल.
हा प्रश्न कृपया व्यक्तीगत घेउ नये अनेक सदस्यांचे संस्थळ सापेक्ष वर्तन लेखन बदलते कसे का व कुठल्या घटकांच्या प्रभावाखाली याची एक उत्सुकता मला नेहमीच वाटत आली आहे म्हणुन हा प्रश्न विचारला
पुन्हा एकदा विनंती प्रश्न पातिनिधीक आहे व्यक्तीगत घेउ नये
माणुस पावलो पावली संस्थळी संस्थळी का वेगळा वागतो असा तात्विक आहे.
30 Jun 2014 - 1:37 pm | दिनेश सायगल
लेखकमहोदयांना या विषयावर चर्चा अपेक्षित होती. तुम्ही मिपाकर वैट्ट आहात. भलत्याच गोष्टींबद्दल चर्चा करत बसलाय! शिवाय लेखकमजकूरांचं मिपावर किती प्रेम आहे हे विसरलात काय? ते एकवेळ स्वतःच्या सायटीवर लॉग इन करणार नाहीत, पण मीपावर नक्कीच करतात!
30 Jun 2014 - 4:00 pm | राजेश घासकडवी
याचं उत्तर सोपं आहे. मिपावरच्या लेखाचं विडंबन करायचं तर ते मिपावरच करावं या मताचा मी आहे. एक म्हणजे इथल्या मूळ लेखाचे, त्यावर झालेल्या चर्चेचे संदर्भ इथेच ताजे असतात. दुसरं म्हणजे इतरत्र विडंबन केलं तर त्याला 'इथली धुणी तिथे धुण्याचा' वास येतो. माणूस संस्थळी संस्थळी वेगळा का वागतो याचं कारण प्रत्येक संस्थळाची प्रकृती वेगळी असते.
असो, अवांतर आणि गंभीर चर्चा फार झाली. तुम्हाला पोरगीपटावशास्त्राबद्दल काही बोलायचं असेल तर बोला. नाहीतर या चर्चेपासून दूरच रहा. धन्यवाद.
30 Jun 2014 - 4:45 pm | सुहास..
हाहाहाहाहाहा
30 Jun 2014 - 11:25 am | नगरीनिरंजन
भारतीय सुसंस्कृत तारुण्य हे भारतीय पहरावावरून पाहिले जाते. तसेच व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आईवडिलांचे जे चारित्र्य असते तेच त्या व्यक्तीचे जन्म चारित्र्य समजले जाते.
मात्र इंग्रजी चित्रपटांमधे जे लैंगिक/सामाजिक/भावनिक वगैरे तारुण्य येते त्यामधले चारित्र्य इंग्रजी संस्कृतीच्या धारणांवरुन ठरते.
त्यामुळे भारतीय सुसंस्कृत तारुण्य आणि पश्चिमात्य तारुण्य यांच्यात सुसुत्रता असण्याची काही शक्यता असते का? तार्किकदृष्टया विचार करता ती तशी नसणार हे उघड आहे. मात्र काही सांगड घालणार्या बाबी असतील तर त्या जाणून घेण्यास उत्सुक आहे.
30 Jun 2014 - 2:02 pm | थॉर माणूस
पश्चिमात्य संस्कृतीत जर ५० घटकांचा विचार होत असेल तर भारतीय संस्कृतीत ५०० घटकांचा विचार होत असतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीत फारच सर्वंकश विचार होतो असे वाटते.
फक्त गुणमिलनाचा(फीचर्स) विचार करणे म्हणजे फक्त ठराविक घटक विचारात घेणे होय.
पोरगीपटाव शास्त्र कोणत्या भाषेत आहे त्या पेक्षा सल्ले कोणी आणि कोणता आधार मानून दिले आहेत हे महत्वाचे आहे.
उदा: सल्लुमियां हे गुणमिलन आधार मानुनच पोरी पटवितात.
1 Jul 2014 - 1:42 am | राजेश घासकडवी
हा प्रतिसाद किमान तीनदा यायला हवा होता, श्री थॉर माणूस. त्याशिवाय पुरेसा सर्वंकश विचार होत नाही.
भारतीय संस्कृतीत गुणमीलनाचा विचार लग्न तरुणीच्या बाबतीत केला जातो. बाकीच्या तरुणींबाबत निव्वळ मीलनाचा विचार केला जातो. पोरगीपटावशास्त्राचे साधक अनेक वेळा याचमुळे असफल होतात. आणि मग शास्त्रालाच दोष देत बसतात.
1 Jul 2014 - 10:47 am | थॉर माणूस
आय माय स्वारी बरं का... हे लक्षातच आलं नाही आमच्या.
30 Jun 2014 - 2:45 pm | चित्रगुप्त
इथे कोणते 'पश्चिमात्य तारुण्य' अभिप्रेत आहे, सुसंस्कृत की असंस्कृत ?
30 Jun 2014 - 11:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुसंस्कृत की असंस्कृत ? असा प्रश्न तुम्हाला का बरे पडला. दोन्हीं शब्दांची "संस्कृत" हीच जननी आहे हे तर त्या शब्दांवरून सिद्ध होते आहे. ते तारुण्य आहे एवढेच आताच्या धाग्यावर व्दिशतक करायला पुरेसे नाही काय ? मग ते 'अ' किंवा 'सु' काहीही 'असु' देत. काय फरक पडतो ???
1 Jul 2014 - 8:11 am | विजुभाऊ
इस्पिकचा एक्का भाउ. खूप मोठा फरक पडतो हो.
सु किंवा अ असल्यामुळे
हेच घ्याना. सुंदर आणि अंदर हे दोन काय समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नाहिय्येत. आपण म्हणताना ती कन्या सुंदर आहे असे म्हणतो. ती कन्या अंदर आहे असे म्हंटले तर वेगळाच अर्थ होतो.
किंवा मग सुदूर दृष्टी आणि अदूरदृष्टी.
लहानमुलाना लघवी करायची का असा प्रश्न विचारताना आया "सु " जायचे का असेच विचारतात." अ" ला जायचे का असे नाही विचारत.
तात्पर्य काय सु आणि अ हे दोन स्वतन्त्र उपसर्ग आहेत त्यात गल्लत करुन चालणार नाही.
30 Jun 2014 - 11:33 am | मारवा
पोपशास्त्रात अत्यंत प्रवीण असलेल्यास 'पोप' असे म्हणत
तुम्ही पोप या शब्दाचा उलगडुन दाखविलेला अर्थ तर तुमच्या कलाकाराच्या खास दुर्मिळ अशा अनिर्बंध कल्पनाशक्तीचा अविष्कार च आहे याने सर्व ख्रिश्चन बांधव साइभक्तांसारखे आनंदुन जातील
फादर फ्रान्सीस दिब्रीटों व सिसीलिया कार्व्हालो यांचा तर पोप या शब्दाची ही नविन व्युत्पत्ती वाचुन उर आनंदाने अभिमानाने भरुन येइल अशीच आहे. पोप या शब्दाला तुम्ही दिलेला हा नविन पवित्र आयाम तर सर्व ख्रिश्चन बांधवांना तुमच कायमच प्रेम मिळवुन देइल.
शिवाय तुमचा सेन्स ऑफ ह्युमर ही परत एकदा वाखाणला जाइल
शिवाय याने मिपा या संस्थळाची सर्वधर्म समभावा प्रति असलेली जाणीव जागरुकता व संवेदनशीलता पण दिसुन येइल.यानंतर मिपा च्या लेखनातील सेन्स ऑफ ह्युमर ला कोणीही आव्हान देउ शकणार नाही
आफ्टर ऑल ह्युमर इज द ग्रेटेस्ट रीलीजन इन द वर्ल्ड
30 Jun 2014 - 12:47 pm | ब़जरबट्टू
मिपाचा दर्जा खालावतोय का हो ?
तुर्त एव्हढेच...
30 Jun 2014 - 1:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
ब्यान केला जाण्याची शक्यता वर्तवुन माझे दोन शब्द संपवतो...सं.म. ना दिवसपाळीच्या शुभेच्छा
30 Jun 2014 - 2:17 pm | सूड
पोपशास्त्रावर धागा येणार। मिपाकर ते थोतांड मानणार॥
नेहमीची वादावादी होणार। राघा अडणार निश्चित॥
-शास्त्रज्ञ
30 Jun 2014 - 2:21 pm | एस
स्त्रियांना अशी भोगवस्तू बनवणं काय पटलं नाय बुवा. पोरगी पटवणंबिटवणं काय? तरुणीला प्रेमाची गळ घालणं असं सांस्कृतिक बोला की. पोरी पण माणूसच असतात की. त्यांच्या मनाचा काय विचार हाय का नाय?
30 Jun 2014 - 2:34 pm | बॅटमॅन
तरुणीला प्रेमाचा गळ टाकून ओढून घेणे हे रूपकच मुळात स्त्रीद्वेष्टे आणि पुरुषप्रधान आहे. स्त्रिया जणू कुठल्या तलावात तरंगत असतात आणि पुरुष क्रूरपणे त्यांना या पाशात ओढून घेतात हे रूपक हिंसक पुरुषी वृत्ती दर्शविते. तुम्ही ते
'द सेकंड केक्स' वाचा, सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना समजून जाईल बघा.. ;)
30 Jun 2014 - 4:39 pm | धन्या
तू पुर्ण वाचले का ते पुस्तक? :)
30 Jun 2014 - 4:40 pm | बॅटमॅन
होय. पण वाचल्याला बरीच वर्षे झालीत, पुन्हा एकवार नीट वाचले पाहिजे.
1 Jul 2014 - 10:40 am | सामान्यनागरिक
परत एकदा अशी पुस्तके वाचायचा प्रयत्न करताय म्हणजे चाळीशी म्हणजे दुसरी जवानी आली की काय ? पण हल्लीच्या पोरी जरा अवघडच असतात हे ध्यानांत घ्यावे ! 'चल भिडु , पुढे जाण्यापूर्वी एकदा टेस्ट ड्राईव्ह करु या' म्हणाली तर तयारी आहेका?
1 Jul 2014 - 12:14 pm | बॅटमॅन
वय आणि चष्मा या दोन्हीही अर्थी आम्ही चाळिशीपासून कोसो दूर आहोत. बाकी टेस्ट/स्ट्रेट/कव्हर ड्राईव्हचे काय ते आम्ही आणि तरुणी पाहून घेऊ ना, तुम्हांला भारी चवकशा? टेस्ट ड्राईव्हच्या प्रपोजलने घाबरलेलात की काय ओ तुम्ही?
30 Jun 2014 - 2:35 pm | प्रसाद गोडबोले
अवांतर :
खरयं...पोरी पण माणूसच असतात ... मन आणि स्वभाव चांगले असले की झाले
ह्यावरुन , कॉलेजात असताना पोरं "मन" आणि "स्वभाव" हे दोन शब्द द्वयर्थी वापारायचे त्याची आठवण झाली ;)
30 Jun 2014 - 2:37 pm | बॅटमॅन
च्यायला =))
30 Jun 2014 - 3:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
ते दोन शब्द "स्वभाव" आणि "जबाबदारी" असे आहेत :)
30 Jun 2014 - 11:08 pm | वाडीचे सावंत
वरील शब्दांच्या अर्थाचा सांकेतिक भाषेत खुलासा कराल का ? नाही म्हणजे माझा सार्थ शब्दसमूह वाढेल..
30 Jun 2014 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा
१)एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन हसत असेल तर ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;)
२) एखादी स्त्री आपल्याकडे पाहुन गप्प बसत असेल तर (मग) ती कोणत्या स्थानात आहे...असे समजावे? ;)
30 Jun 2014 - 4:28 pm | प्रमोद देर्देकर
अरे आत्मु :-
इथे सुध्दा ती स्त्री नाही तर पहाणाराच कोणत्या स्थानात आहे हेच पहायला हवे. आठव तो धागा आठव ना स्त्रीची काहीच चुक नसते.
30 Jun 2014 - 4:34 pm | यशोधरा
ते कदाचित तुमच्याकडे पाहून असे नसू शकते. तुम्हांला पाहून असे असू शकते! *pardon*
हलके घ्या अ आ!
30 Jun 2014 - 10:53 pm | खटपट्या
मुलीच्या हसण्यावर आणि कुत्र्याच्या शांत बसण्यावर कधी विश्वास ठेवू नये.
1 Jul 2014 - 10:45 am | सामान्यनागरिक
कुत्र्याला फिरायला नेणारी पोरगी पटवण्याचा प्रयत्नं करु नये ! पोरी आधी कुत्र्याला पटवावे लागते हे माहीत असावे लागते !
30 Jun 2014 - 4:17 pm | मृत्युन्जय
त्युमची शास्त्राची व्याख्या काय ते सांगता का?
30 Jun 2014 - 5:04 pm | राजेश घासकडवी
मूळ लेखात डिस्क्लेमर देऊनही शास्त्राबद्दलच शंका घेणं थांबवलेलं नाही. काय म्हणावं याला? तुम्हा नास्तिकांचा नसेल विश्वास तर सोडून द्या. पण ज्यांना विश्वास ठेवून चर्चा करायची आहे त्यांना तर करू द्यात!
असो, पोरगीपटावशास्त्राची व्याख्या अशी नाही, पण गेली लाखो वर्षं या शास्त्राचे अभ्यासक मनोभावे त्याच्या सूत्रांचं पालन करत आलेले आहेत. किंबहुना जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का ते तुम्ही आधी सांगा! मनुष्यजात सोडाच, पण या शास्त्राची तत्त्वं अत्यंत मूलभूत पातळीवर सगळेच जीव (काही आत्मसंतुष्ट जीव सोडले तर) पाळतात.
एवढं असूनही शास्त्राची व्याख्या करत बसण्याची हौस आहे तुम्हाला. मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या. मग आपोआप तुमचे प्रश्न दूर होतील.
30 Jun 2014 - 5:45 pm | अत्रुप्त आत्मा
तां संगलां जांव द्या! :-/ आदी मी वर दोन प्रश्न इचारले तेचा उत्तर द्या! :-/
जल्लां धांगा कारतांव तों कांरतांव ... आनी उत्तर पन नाय सांगत??? :-/
30 Jun 2014 - 5:46 pm | यसवायजी
जर हे शास्त्रच नसतं तर मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली असती का
मनुष्यजात पिढ्यानपिढ्या टिकली ती पोरगीपटावशास्त्रामुळे? आमच्या मास्तरनं जीवशास्त्रात कायतरी वेगळं सांगीतल्यालं. फकस्त पटवून काय उप्योग? :))
मी म्हणतो थियरी मरो, प्रॅक्टिकल करा, प्रॅक्टिकल. अनुभव घ्या
हे बराबर..1 Jul 2014 - 8:16 am | विजुभाऊ
श्री घा.क. काका
एखाद्या विषयाला शास्त्र म्हंटले किंवा नाही म्हंटले तरी त्याची प्रगती थाम्बत नाही.
उर्टचा ढग आहे म्हंटल्यावर त्याचे आस्तित्व मागणारे इथे बसून उर्टचा ढग दाखव नाहीतर अमान्य कर असे म्हणतात.
तुम्ही त्याना उर्टच्या ढगात पाठवायची व्यवस्था करा म्हणजे किमान तुम्हाला २० , ३० पिढ्या तरी तसल्या शंकासुराम्चा त्रास होणार नाहीत.
एक शंका: सुर आणि सुरा यांच्यात काही बदरीकाष्ठजन्य सम्बन्ध उद्भवतो का? तज्ञानी अज्ञांना मार्गदर्शन करावे.
1 Jul 2014 - 9:47 am | बाळ सप्रे
एक राहिलं..
अनुभव महत्वाचा.. तुमचे प्रश्न, तर्क गेले चुलीत !!
1 Jul 2014 - 10:12 am | थॉर माणूस
'मिसळ्पाव' हे संस्थळ पोरगीपटावशास्त्र या विषयावर चर्चा करण्यासाठी नाही हे एव्हाना आपल्या लक्षात यायला हवे होते.
खास पोरगीपटावशास्त्रासाठीचे असे काही नावाजलेले (पांचट , बेशिस्तबद्ध ,अनियंत्रित) चर्चा समुह आस्तित्वात आहेत ('मचाक' नाही !), ज्या ठिकाणी फक्त पोरगीपटावशास्त्र या विषयावरच चर्चा होते, आपले प्रश्न तिथे उपस्थित केल्यास चांगली अभ्यासपूर्ण उत्तरे नक्कीच मिळू शकतील. आपण विचारलेले प्रश्न त्या संस्थळांवर आधिच विचारले गेले आहेत व त्यावर बरीच चर्चाही झालेली आहे , ती जरी वाचली तरी आपले शंका निरसन होईल.
ही संस्थळे जगातल्या सर्व भाषांत आहेत त्यामुळे आपल्याला ती अडचण भासणार नाही.
1 Jul 2014 - 10:43 am | टवाळ कार्टा
काय प्रॉब्लेम आहे???
2 Jul 2014 - 10:41 pm | भिंगरी
आपण सारेच वाचलेले दिसतंय,आपला अभ्यास आपल्यासारखाच थॉर