ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली.
पण आता त्याही पूढे जाऊन ड्रुपलमध्ये नुसतेच मराठी लिहिण्याची सोय नसून ड्रुपल स्वत:च मराठीत बोलू लागला आहे.
तांत्रिक बिघाडामूळे तो जे प्रतिसाद उडवतो त्यावर ड्रुपल आता,
' पंचायतीवरील सदस्यांकडे काही सदस्यांनी व्य नि पाठवून तक्रार केल्यामुळे पंचायतीने आपल्या अधिकारांचा वापर करत येथील काही लेखन आणि त्याला आलेले संबंधित प्रतिसाद उडवले आहेत!'
कळावे,
(लोकनियुक्त) मिसळपाव पंचायत समिती
अशी सही देखिल ठोकून देतो. आणि विनातक्रार ड्रुपलच्या ह्या चावटपणावर कितितरी लोकांचा विश्वास देखिल ठेवला जातो. ह्या ड्रुपलवर कुणाचेही कसलेही नियंत्रण चालत नाही. त्याच्या वर कुणीही कसलीही शंका घेतली असता सेकंदात पन्नास आयडी तयार करुन ड्रुपल सदर सदस्याला नामोहरम करतो.
तुम्हाला काय वाटते ड्रुपलचा हा खोटारडेपणा पकडता येणे शक्य आहे का?
ह्या ड्रुपलवर काय इलाज करता येईल ह्याची कुणाला कल्पना आहे का?
मराठी संकेतस्थळांच्या जडणघडणीमध्ये ड्रुपलचा वाटा असामान्य आहे म्हणून आम्ही हा चर्चा प्रस्ताव मांडत आहोत.
प्रतिक्रिया
15 Dec 2007 - 2:31 am | बेसनलाडू
प्रियालीताईंच्या पुढील प्रतिसादावरून ड्रुपलच्या चावटपणाची कल्पना सदस्यांना हळूहळू येत आहे असे वाटते -
२. प्रमोद देवांचे प्रतिसाद उडवले जाणे हे तांत्रिक बिघाड असले तरी विनोदांतील प्रतिसाद उडवून त्यावर पंचायत समितीच्या नावाने टिप येणे हे काही तांत्रिक बिघाडाचे लक्षण वाटत नाही.
(चावट!)बेसनलाडू
15 Dec 2007 - 10:07 am | आजानुकर्ण
मिसळपावाची पत्रिका आताच पाहिली रवी कुंभेत, शनी मकरेत आणि गुरू मसणात असून त्याच्या निराकरणासाठी मालकांनी पारंब्या नसलेल्या वडाला सोवळ्याने १००१ प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे असे आपोआप येणारे प्रतिसाद बंद होतील असे वाटते.
किंवा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें?
15 Dec 2007 - 10:20 am | सर्किट (not verified)
वा द्रुपल विरोधात पोलीस केस करूयात. कसें?
नक्की !
मिसळपावाचे एक सदस्य, आणि मालकांनी ज्यांना घटनासमितीत नेमले आहे, ते श्री. प्रकाश घाटपांडे पोलिसात ड्रुपॅलविरुद्ध केस करण्यात आपल्याला मदत करतील..
कैच्या कैच !
खोटे लिहिण्यास तांत्रिक कारण (मी होमवर्क केले होते गुरुजी, पण मायक्रोसॉफ्ट वर्डने सगळे खाऊन टाकले...) ही कारणे लहान मुले देतात..
प्रकाश काका तुम्हाला सांगतीलच, तांत्रिक कारणे "ऍलिबी" म्हणून दिलीत तर न्यायाधीश किती संतापतात ते..
- (संतप्त न्यायाधीश) सर्किट
15 Dec 2007 - 10:33 am | आजानुकर्ण
मं इथून प्रतिसाद "आपोआप" उडणे आणि काही प्रतिसाद आपोआप "अवतीर्ण" होणे याचे कारण काय?
15 Dec 2007 - 10:41 am | सर्किट (not verified)
आपले मित्र (आदरणीय सरपंच) येथील तांत्रिक सर्वेसर्वा आहेत, त्यांची परीक्षा होऊ द्या आणि मग विचारा की !
ते सांगतील आपल्याला की मानवी दखलांदाजीखेरीज हे होणे शक्य नाही !
(असा आमचा एक अंदाज, बरं का..)
- (मानवी) सर्किट
(ता. क. तुम्हाला एक खाजगी सांगतो, मानवी डोक्यातून जशा कल्पना निघतात, तशा ह्या ड्रुपॅल सारख्या तांत्रिक डोक्यांतून निघत नाहीत.)
15 Dec 2007 - 10:46 am | आजानुकर्ण
सरपंचांनी आधीच निवेदन दिले आहे आणि या विषयावर अधिक काही बोलणार नाही हे स्पष्टही केले आहे. त्या निवेदनावर विश्वास ठेवला
तर इथे होणारे प्रकार हे केवळ "भुताटकी" मध्येच मोडतात. त्यामुळे "भूत दाखवा, १ लाख रुपये मिळवा" या नरेंद्र दाभोळकरांच्या च्यालेंजला आम्ही काउंटर च्यालेंज करत आहोत. कृपया आम्हाला १ लाख रुपये देताना क्याश द्यावी. नसती इन्कमट्याक्सची लफडी नकोत.
15 Dec 2007 - 3:14 pm | ॐकार
ड्रुपलने मराठीत लिहिण्याची सोय करून देऊन जालावरच्या मराठी वापरामध्ये क्रांतीच घडवून आणली.
आक्षेप१: ड्रुपलने अशी सोय दिलेली नाही :).
आक्षेप २: जी सुधारणा, विचार, तंत्र सामन्य माणसापर्यंत पोहोचत नाही त्याला क्रांतीचे लेबल लावण्यात अर्थ नाही :) त्यामुळे ही क्रंती वगैरे नाही :)