मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
19 Jun 2014 - 3:59 pm
गाभा: 

अनेक दिवसांपुर्वी मराठी संस्थळावर एक धागा माझ्या वाचण्यात आला होता. त्याचा विषय मला पडलेले प्रश्न अशा स्वरुपाचा होता. यात धागाकर्त्याने त्याला भेडसावणारे काही प्रश्न विचारले होते व त्याची उत्तरे ही अत्यंत अभ्यासपुर्ण अशी इतर सभासदांकडुन त्या धागाकर्त्याला मिळाली होती तेव्हापासुनच एक तीव्र इच्छा माझ्या ही मनात होती की आपण ही आपल्याला भेडसावणारे/पडणारे प्रश्न विचारुन बघावेत कदाचित आपल्याला ही आजतागायत माहीत नसलेली उत्तरे या निमीत्ताने सापडतील. अखेर आपला अनुभव माहीती ज्ञान हे इतक मर्यादीत आहे की त्यामुळे प्रश्नांना इतर ज्ञानी व्यक्तींसमोर मांडणे व उत्तर मिळतात का बघणे हा एक उत्तम पर्याय आहे. अर्थात मला पडलेले प्रश्न काहींना क्षुल्लक बिनमहत्वाचे वाटु शकतात पण माझ्यापुरते तरी मला त्यांची उत्तरे जाणुन घेण्याच कुतुहुल आहे. हे कुतुहल मिटवण्याच्या आकांक्षेने मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न आपणासमोर मांडतो. जाणकारांनी कृपया उत्तर देउन उलगडा कराव ही नम्र विनंती.

१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?

२-महाराष्ट्राच्या कले च्या इतिहासात लावणी तमाशा या लोककला दिसुन येतात मात्र भरतनाट्यम-कुचीपुडी सारख्या अभिजात शास्त्रीय (ज्यामध्ये सखोल नियमावली-ताल-संगीत-वेशभुषा-साधना-चिंतन अंतर्भुत असते) असे स्वरुप असलेली नृत्य कला महाराष्ट्रात का निर्माण वा विकसीत झाल्या नाहीत?यामागे कुठली मनोसामाजिक कारणे आहेत ?

३-अमेरीकेत एखाद्या कंपनीने लॉबींग करणे कायदेशीर आहे व वॉलमार्टने काही कोटी रुपये भारतात लॉबींग साठी खर्च केले अशी बातमी होती. राडीया टेप्स मधील नीरा ताइ या देखील लॉबींग करत होत्या. तर लॉबींग करता म्हणजे नेमक काय व कस करतात ? याची काही उदाहरणे मिळु शकतील काय ? की लॉबींग म्हणजे गावठी भाषेत संबधीत अधिकारी व्यक्तीचे हात ओले करुन काम फ़त्ते करणे इतकाच साधा असतो? व असे असल्यास तो अमेरीकेत कायदेशीर कसा मानला जातो? व भारतात या लॉबींग वरील खर्चाला मान्यता आहे का ? लॉबींग मध्ये काही चांगल्या अर्थाने ही इतर काही बाबी समाविष्ट असतात का ?

४- संपादित

५-नेसकॉफ़ी च्या व्हेंडीग मशीन मध्ये कॉफ़ी ज्यातुन पडते त्या नळीतुन सतत आत घुसुन साखरयुक्त पावडर खाण्यास चटावलेल्या मुंगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा ?

६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं?

७- हिंदी सिनेमात नायिकेने “ मै तुम्हारे बच्चे की मॉ बननेवाली हु “ असे उच्चारल्यावर नायक तिला नेहमी सच ? अस का विचारतो ? यात स्वनिर्मीती क्षमते बद्दलचा अविश्वास असतो की अजुन काय रहस्य असत ?

८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो?

९- मोटरसायकल मध्ये मागील व पुढील टायर मध्ये हवे चे प्रेशर वेगवेगळे मेंटेन करण्याची सुचना असते. असे वेगवेगळे प्रेशर ने हवा भरण्याच्या सुचनेमागे कोणते शास्त्रेय कारण असते ? याने काय साधले जात असते? दोन्ही टायर मध्ये समान प्रेशरने हवा भरल्याने काय व कशी हानी होउ शकते ?

10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते?

११- फ़ॅशन विक मध्ये एक ड्रेस डीझायनर कलेक्शन सादर करतो त्यानंतर त्याच्या कपड्यांची विक्री कशा पद्धतीने होत असते? म्हणजे हा बिझीनेस कसा चालतो नेमका ? एका कलेक्शन मध्ये समजा एक कुर्ता सादर करण्यात आला तर मग ऑर्डरनुसार त्याच्या अनेक कॉपीज विकण्यात येत असतात की काही वेळेस एखादा एकच पिस बनविण्यात आलेला असतो ? जे खरेदीदार असतात ते कोण असतात ? म्हणजे ते रेडीमेड गारमेंट विकणारया कंपनीचे प्रतिनीधी असतात की आणखी कोण ? व ते ती कंसेप्ट डिझाइन खरेदी करतात की आणखी काही? आणि या धंद्यात पेटंट कींवा कॉपीराइट असतो का ? नसल्यास कोणाचीही डीझाइन कोणीही कॉपी केली तर चालत का ?

१२- आय बी एम कंपनी ही सध्या जो धंदा करते तो नेमका कशाचा करते ? काय बनविते काय विकते काय सेवा पुरविते ? कारण या कंपनीच्या जाहीराती काही काळापुर्वी टीव्ही वर येत असत त्यांचा अर्थ काय होता तो आजपर्यंत फ़ार च कमी लोकांना कळलेला आहे अतिशय गुढ अशा जाहीराती आय बी एम कंपनीच्या होत्या.

१३- मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात येते म्हणजे एक टीम एका रुग्णाचे हार्ट ओपन करते मग दुसरी टीम दुसर काम करते अस काहीतरी .... हे मी केवळ ऐका ट्रेन मधल्या दोन जणांच्या संवादात अर्धवट अइकल होत. अस खरच होत का ? व नेमक कस होत असेल ? मला फ़ार उत्सुकता आहे जाणुन घेण्याची ही ऑपरेशन्स ची कशी पद्धत आहे व यात टीम्स च्या को ऑर्डीनेशन मध्ये चुक होत नसेल का ?

१४- मुंबई च्या सिनेजगतात आता पुरुषांचही लैंगिक शोषण होत आहे का ? व याचे प्रमाण वाढतय असा निष्कर्श आपण सोनु निगम च्या बातमी वरुन काढु शकतो का ? की ही फ़ारच अपवादात्मक अशी बातमी होती ?

१५- टुर डे फ़्रान्स व रेस अक्रॉस अमेरीका या सायकलींच्या रेसमध्ये सर्वश्रेष्ठ रेस कुठली आहे व कुठल्या कारणांमुळे ?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2014 - 4:03 pm | टवाळ कार्टा

मी पयला...आणि २०० तर कुठेच नाहीत :)

ब़जरबट्टू's picture

19 Jun 2014 - 4:27 pm | ब़जरबट्टू

बाकी १९९ पण येतीलच... :)

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2014 - 4:51 pm | टवाळ कार्टा

बाकी १९७ हवेत :)

प्रसाद१९७१'s picture

19 Jun 2014 - 4:52 pm | प्रसाद१९७१

एक एका प्रश्ना वर २०० ची गॅरेंटी आहे.

प्रत्येक प्रश्ना चा एक एक धागा करावा.

१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?

हा प्रश्न मलाही नेहमी पडतो.
"सद्गुरुवाचोनी सापडेना सोय | धरावे धरावे ते पाय आधी आधी" पण तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार?

सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्‍यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?

प्रसाद गोडबोले's picture

20 Jun 2014 - 3:39 pm | प्रसाद गोडबोले

गुरु आणि सद्गुरु ह्यात फार फार फरक आहे !

परत एकदा "दासबोध" पहा हे अतिषय नम्र पणे सुचवु इच्छितो ( एकज्यॅक्ट दशक समास ह्यांचा रेफरन्स नंबर आठवत नाहीये :( )

सध्या तुरुंगात हवा खात असलेले एक प्रसिद्ध "सद्गुरु", नेहमी आनंदात राहण्याच्या सवयीमुळे एका अभिनेत्रीबरोबर आनंदी अवस्थेत कॅमेर्‍यात बंद झालेले एक दक्षिणेतील सद्गुरु, हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणारे निजधामाला गेलेले दक्षिणेतील अजून एक सद्गुरु, भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु हे खरंच सद्गुरु आहेत का?

बाकी मी निर्मल बाबांचा मोठ्ठा फॅन आहे , वरील पॅरामधे त्यांच्यावर ट्रीका केली नाहीस म्हणुन थोडक्यात बचावलास , नाहीतर पुढच्यावेळी भेटल्यावर तुला समोसाच खायला घातला असता तेही हरी चटनी न देता =)) *diablo*

विटेकर's picture

20 Jun 2014 - 4:48 pm | विटेकर

एकज्यॅक्ट दशक समास
दशक ५ समास २
जें जें मन अंगिकारी| तें तें स्वयें मुक्त करी |तो गुरु नव्हे, भिकारी- | झडे आला ||२०||
शिष्यास न लविती साधन|न करविती इंद्रियेंदमन |ऐसे गुरु आडक्याचे तीन| मिळाले तरी त्यजावे ||२१||
जो कोणी ज्ञान बोधी| समूळ अविद्या छेदी |इंद्रियेंदमन प्रतिपादी| तो सद्गुरु जाणावा ||२२||
येक द्रव्याचे विकिले| येक शिष्याचे आखिले |अतिदुराशेनें केले| दीनरूप ||२३||
जें जें रुचे शिष्यामनीं| तैसीच करी मनधरणी |ऐसी कामना पापिणी| पडली गळां| २४||
जो गुरु भीडसारु| तो अद्धमाहून अद्धम थोरु |चोरटा मैंद पामरु| द्रव्यभोंदु ||२५||
जैसा वैद्य दुराचारी| केली सर्वस्वें बोहरी |आणी सेखीं भीड करी| घातघेणा ||२६||
तैसा गुरु नसावा| जेणें अंतर पडे देवा |भीड करूनियां, गोवा- | घाली बंधनाचा ||२७||
जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान| आणी स्थूळ क्रियेचें साधन |तोचि सद्गुरु निधान| दाखवी डोळां ||२८||
देखणें दाखविती आदरें| मंत्र फुंकिती कर्णद्वारें |इतुकेंच ज्ञान, तें पामरें- | अंतरलीं भगवंता ||२९||
बाणे तिहींची खूण| तोचि गुरु सुलक्षण |तेथेंचि रिघावें शरण| अत्यादरें मुमुक्षें ||३०||

चित्रगुप्त's picture

21 Jun 2014 - 8:11 pm | चित्रगुप्त

निर्मल बाबांचा उल्लेख वाचून थर्मल बाबा आठवले:
http://www.misalpav.com/node/24707

चौकटराजा's picture

23 Jun 2014 - 2:25 pm | चौकटराजा

अध्यात्म हे शास्त्रही नाही आणि कलाही नाही. ती एक मनोवृत्ती आहे. त्यात गुरूची गरज नाही. म्हटलेच तर आत्माराम हाच गुरू. संगीताचे तसे नाही ते शास्त्र ही आहे व कलाही. त्यात उत्फूर्तता आहे व तंत्रही. त्यातील उत्स्फूर्तता ही ज्याच्या त्याच्या नशीबाचा भाग आहे. पण तंत्र शिकण्यास गुरू लागतो. तो नसल्या पेक्षा असलेला कधीही चांगला.

कुमारानी संगीतात कसलीही बंडखोरी केलेली नाही.शास्त्राचा अवमान केलेला नाही. आपले गुरू बी आर देवधर यांचे ते ऋणी होतेच ..फक्त राग मांडण्याची पद्धत, घराण्यांची बंधने या बाबत त्यानी नवीन विचार मांडले. ते तसे असने आवश्यकच आहे नाहीतर कला प्रवाही रहाणार नाही.

कवितानागेश's picture

19 Jun 2014 - 5:10 pm | कवितानागेश

५वा प्रश्न सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतोय. त्यावर जरूर चर्चा व्हावी.

६- घरी बनवलेल आईसक्रिम बाजारातल्या आईसक्रीम सारख मउ मउ का बनत नाही ? घरच आईसक्रीम नेहमी बर्फ़ाळ का बनत? घरी आइसक्रीम बनवतांना बाजारातल्या सारख बिनबर्फ़ाळ बनवण्यासाठी काय उपाय आहे ? नेमक काय केल तर आईसक्रीम कमी बर्फ़ाळ बनतं?

मागच्या आठवड्यात केलेली मँगो आईसक्रीमची रेशिपी लवकरच टाकेन. अगदीच बाजारातल्यासारखं नाही, पण कमी बर्फाळ तरी नक्कीच होतं.

बाकीचे प्रश्न प्रचंड रोचक आहेत. तुम्हाला इतके प्रश्न पडण्याइतका वेळ मिळतो हे पाहून कवतिक वाटलं.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jun 2014 - 11:23 am | llपुण्याचे पेशवेll

पॉट आईस्क्रीम यंत्रातून केले तर ते तसेच मऊ व बर्फविरहीत होते. शास्त्रीय कारण माझ्यामते तरी असे आहे की दुधाचे अवस्थांतर होताना त्यातील पाण्याचे स्प्फटीकी भवन होऊन बर्फ वेगळा बनतो त्यामुळे आईस्क्रीम बर्फाळ होते. ते आईस्क्रीम पॉट मधे बनवले तर पॉटमधे आईस्क्रीम फिरवताना पॉटमधील पंखा दुधातून फिरताना त्यात स्फटीकीभवन होऊ देत नाही. म्हणोन ते आईस्क्रीम छान होते. एकदा भाड्याने पॉट आणून करून बघा मस्तं होते.

मला पडलेले काही गंभीर व चिल्लर प्रश्न ???

यातले कुठले गंभीर आणि कुठले चिल्लर प्रश्न आहेत ते स्पष्ट करा म्हणजे गंभीर प्रश्नांना गंभीर आणि चिल्लर प्रश्नांना चिल्लर उत्तरे देता येतील. तोपर्यंत -

१. पास
२. पास
३. पास
४. हा पूर्णपणे त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे. आपल्याला व आपल्या जोडीदाराला काय करायला आवडते ते करावे.
५. घरात अ‍ॅण्टइटर पाळावा किंवा व्हेंडिंग मशीनभोवती ड्युअल साइड टेप लावून बघा.
६. पास
७. संशय 'तुम्हारे' या शब्दावर असतो.
८. त्यांना 'अजूनि यौवनात मी' असे वाटत असावे कदाचित.
९. मोटरसायकल वा सायकल यांच्या फ्रेमची रचना अशी असते की त्यावर बसणार्‍याचे वजन एका विशिष्ट प्रमाणात दोन्ही चाकांवर विभागले जाईल. त्यात मागच्या चाकावर जास्त भार येतो. तसेही मागचा टायर पुढच्या टायरच्या तुलनेत जास्त लवकर रिटायर होतो. म्हणून.
१०. अ) पास, ब) कुणीही असू शकतात. क) पैसा. ड) पोलिसांचे पगार तुटपुंजे असतात. कित्येक अधिकृत खर्चही त्यांना स्वतःच्या पैशांनी करावे लागतात. हेही पोलिसांना चिरीमिरी घ्यावी लागण्याचं एक कारण आहे. इ) पैसा, स्कोअर सेटल करण्यासाठीही, स्वतःवर पोलिसांची तितकी कडक वक्रदृष्टी होऊ नये म्हणून इत्यादी.
११. बापरे, इतके प्रश्न? असो. यातले ग्राहक हे सढळ पैसा खर्च करू शकणारे असतात. ग्राहकाच्या मागणीनुसार कस्टममेड डिझायनर कपड्यांच्या एक्स्लूजिव प्रती बनवण्यात येतात. बाकी प्रश्नांना पास.
१२. धंदा? काय माहीत नाय ब्वॉ.
१३. पास.
१४. पास.
१५. श्रेष्ठत्वाचे माहीत नाही. पण रेस अक्रॉस अमेरिका असावी कारण ती जास्त कठीण आहे असे ऐकून आहे. बादवे, या दोन्हींपेक्षा आपली मुंबई-पुणेच जास्त भारी आहे ;-)

मारवा's picture

19 Jun 2014 - 9:16 pm | मारवा

स्वॅप महोदय
४ था प्रश्न तात्विक होता आणि उत्तरात फेमीनिस्ट चळवळीला तात्विक रीतीने प्रतिवाद करता येउ शकतो का असा होता. त्यामुळे उत्तरात तात्विक उहापोह अपेक्षीत होता मात्र तुमचे उत्तर गुळमुळीत वाटले.

५ व्या प्रश्नाला तुम्ही सुचविलेल्या उपाय योजना अप्रतिम आहेत. आजच वापरुन बघाव म्हणतो.

आणि ७ व्या प्रश्नाच तुम्ही दिलेल उत्तर क्या बात है आपके जवाब का जवाब नही. फारच मार्मिक !
हॅट्स ऑफ टु यु सर फॉर युवर आन्सर !

>>४ था प्रश्न तात्विक होता आणि उत्तरात फेमीनिस्ट चळवळीला तात्विक रीतीने प्रतिवाद करता येउ शकतो का असा होता

तू गंप रांव मरे !! वश्शाड मेलो, मेल्या जनाची नाय तं मनाची तरी धर!!

मैत्र's picture

20 Jun 2014 - 12:05 pm | मैत्र

आपल्याला समानता अधोरेखित करणार्‍या पद्दतीने मूळ उद्देश (पक्षी: आपल्या नावाचे एक कार्टे अस्तित्वात आणणे) हे साध्य होऊ लागले तर नक्कीच समानतेला वाव देता येईल.
जर तो उद्देशच नसेल.. तर जरूर समानतेचा आनंद घ्यावा

एस's picture

20 Jun 2014 - 12:15 pm | एस

या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मागून येणारच होतं. म्हणून दिलं नाही. ;-) अर्थात त्या उत्तरात काही गृहीतके आहेत. मला विचाराल तर फेमिनिस्टांच्या नादी लागू नका. वर मी जे उत्तर दिलंय तेच त्यांना द्यावं.

१५ वा प्रश्न मी एका सायकलपटूला विचारला. त्याचं उत्तर त्याच्याच शब्दांत (अनुवादित):

"हे म्हणजे क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय की ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात कोणता सर्वश्रेष्ठ हे ठरवण्यासारखं आहे. [सायकल शर्यतींचे हे] दोन्ही प्रकार महान आहेत व दोन्हींची आपली स्वतःची काठिण्यपातळी आहे. पण दोन्ही अगदी भिन्न प्रकारच्या शर्यती आहेत. टूर दे फ्रान्स ही '३३०० किमी - २१ दिवस' अशी शर्यत आहे. प्रत्येक दिवशी १०० ते २०० किमीचा एकेक डोंगराळ अथवा समतल टप्पा असतो. ही [शर्यत] शुद्ध व्यावसायिक स्पर्धात्मक [प्रकारची] असून प्रत्येक टप्प्यात सरासरी ४०-४५ किमीप्रता असा वेग [राखायचा] असतो. एकदा टप्पा संपला की तुम्ही त्या दिवशी उरलेल्या वेळात आराम करू शकता, जेवण घेऊ शकता, [शरीराला] मसाज करून घेऊ शकता, भरपूर झोप घेऊन दुसर्‍या दिवसासाठी तयार होऊ शकता. असे एकवीस दिवसांपर्यंत चालते. इट्स मेन फोकस ऑफ ऑल स्पॉन्सर्स [... हे वाक्य मला कळले नाही.] या [शर्यती] त प्रचंड बक्षीस असते - दशलक्षावधींचे. पण तुम्हांला ५० किमीप्रता असा सरासरी वेग सातत्याने राखू शकणारा उत्तम सायकलपटू व्हावे लागते. हौशी सायकलपटू ते करू शकत नाहीत. त्यामुळे भारतातून अजून कुणीही सायकलपटू 'टूर दे फ्रान्स' मध्ये सहभागी होऊ शकलेला नाही.

दुसर्‍या बाजूस, RAAM (रेस अक्रॉस अमेरिका) ही हौशींसाठी आहे. त्यात बक्षिसाची रक्कम वगैरे नसते - अगदी विजेत्यालासुद्धा नाही. ही '४८०० किमी - १२ दिवस' अशी [शर्यत] आहे. एकदा घड्याळ सुरू झाले की ते बारा दिवसांनी थांबते, अथवा तुम्ही शर्यत पूर्ण केल्यावर - यापैकी जे आधी घडेल ते. तुम्ही रात्रंदिवस सायकल चालवता. रोज फक्त एक-दोन तास झोपता."

रच्याकने, मला सर वगैरे म्हणू नका. मिपावर तरी निदान सर्व आयडी समान असतात. खिक्क्. ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2014 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/blue-face/feeling-sleepy-smiley-emoticon.png

यातले गंभीर कुठले नि चिल्लर कुठले ह्याबाबत मार्गदर्शन कुठे मिळेल?

मैत्र's picture

20 Jun 2014 - 12:10 pm | मैत्र

लेखकाला काय गंभीर आणि चिल्लर वाटतं हे समजलं तर त्याप्रमाणे गंभीर आणि चिल्लर उत्तरे देता येतील..

मला अतिशय गंभीर वाटणारा प्रश्न आपल्या लेखी चिल्लर असु शकतो आणि व्हाइस व्हर्सा. हा उल्लेख टायटल मध्ये अशासाठी केला की गंभीर प्रश्नाला टाळणारयांना भिणारयांना एक सोपी पळवाट असावी की अरे काय फालतु चिल्लर प्रश्न आहे. याने मग मनाची स्थिर सुरक्षित अवस्था साधता येते. अशा निश्चिंत सोप्या निश्चल ज्यात संशयाचा एकही तरंग कधी उठतच नाही अशी असामान्य अध्यात्मिक अवस्था गाठता येते.
त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न अडचणीचे वाटतील तेच चिल्लर आहे असे धरुन चला
आणि हो कीप स्मायलींग आमचे गुरुजी डबल श्री म्हणतात काहीही प्रॉब्लेम आला ताण वाढला तर काही करायच नाही जस्ट
कीप
स्मायलींग !!!
जय गुरुदेव

खटपट्या's picture

19 Jun 2014 - 9:32 pm | खटपट्या

माझ्या धाग्यातून स्फूर्ती घेतली असेल तर

१. माझे मन खूप उचंबळून येतंय
२. अंगावर मुठभर मास चढलय
३. उगाच कोण तरी मोठा झाल्यासारखे वाटतंय

माझ्या धाग्यातून स्फूर्ती घेतली नसेल तरी "खूप छान लिहिले आहे" तुमच्या धाग्यातून स्फूर्ती घेवून लिहिण्याचा प्रयत्न करेन….

बाकी चालुद्या

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Jun 2014 - 9:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मी हा धागा वाचला.. प्रतिसाद पण दिला. सांख्यिकीकारांनी नोंद घ्यावी.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jun 2014 - 10:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

१२- आय बी एम कंपनी ही सध्या जो धंदा करते तो नेमका कशाचा करते ? काय बनविते काय विकते काय सेवा पुरविते ? कारण या कंपनीच्या जाहीराती काही काळापुर्वी टीव्ही वर येत असत त्यांचा अर्थ काय होता तो आजपर्यंत फ़ार च कमी लोकांना कळलेला आहे अतिशय गुढ अशा जाहीराती आय बी एम कंपनीच्या होत्या.
आय बी एम ही कंपनी अनेक

धंदे करते. त्यांची अनेक देशात डाटासेंटर आहेत त्यात ते क्लायंट्ना त्यांचे इन्फ्रा होस्टिंग करुन देतात. म्हणजे तुमचे डाटासेंटर आय बी एम च्या जागेत असते आणि तुमची जागा वाचते शिवाय ईतर मेन्टेन्न्स वगैरे तेच करतात.
आय बी एम ची क्लाउअड सर्विस आहे ज्यात ते तुम्हाला अमुक टेराबाईट स्पेस सिक्युरिटि अ‍ॅव्हेलेबिलिटिच्या गॅरंटीसह देतात.
आय बी एम चे अनेक प्रकारचे सर्वर आहेत ते विकणे आणि मेन्टेन करणे
याशिवाय डेस्कटॉप आणि लॅपटॉप बिझ्नेसमध्ये आय बी एम होती पण आता बाहेर पडली
आयडिया मॉबाईल चे सगळे इन्फ्रा आय बी एम मेन्टेन करते शिवाय त्यांचे बिलिंग सुद्ध्ह्हा...आणि अशा अनेक
क्लायंटचे प्रोजेक्ट आय बी एम बघते....

वर दिलेली उदाहरणे केवळ हिमनगाचे टोक समजावीत एव्हढी ईतर कामे आय बी एम करते.

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2014 - 1:27 am | संजय क्षीरसागर

१-भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे ? दोन्ही त अनुक्रमे बंडखोरी करणारे जे.कृष्णमुर्ती व कुमार गंधर्व हे एकेकटे च असामान्य अपवाद आहेत का? गुरुविना आध्यात्मिक बोध व संगीतात नैपुण्य मिळविणे अशक्य आहे का ? यामागे असणारी लाचारी डीपेंडंस मुळात सर्जनशील अभिव्यक्तीला बाधा आणत नसेल का ? गुरु सेवा गुरु आज्ञापालन गुरु दास्यत्व गुरु समर्पण हे मुळ साधनेपेक्षा कायम अधिक महत्वाच आहे असे प्रतिपादन या क्षेत्रातील व्यक्तींकडुन नेहमीच केले जाते असे का?

कोणतिही गोष्ट आत्मसात करण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. एक, त्यातल्या दर्दी व्यक्तीकडून ती गोष्ट समजावून घेणं (जे सगळ्यात सोपं आहे) किंवा, दोन, स्वतःच्या निरिक्षण, वाचन, चिंतन यातून कोणाच्याही मदतीविना ती गोष्ट आत्मसात करणं. दुसर्‍या मार्गातही अनुसरण आहेच पण ते एका गुरुऐवजी अनेक स्त्रोतातून, जसा मार्ग सापडेल तशी वाटचाल करणं आहे. त्यामुळे दुसर्‍या मार्गात वेळ आणि श्रमाचा अपव्यय संभवतो.

एकदा गोष्ट पूर्णपणे आत्मसात झाल्यावर गुरु आणि शिष्य यात फरक राहात नाही. तस्मात, लाचारी आणि परावलंबित्व या अज्ञानमूलक धारणा आहेत. एखादी गोष्ट समग्रतेनं आत्मसात केल्यावर सर्जनशिलता ही आपसूकपणे येणारी व्यक्तिगत कौशल्याची परिणिती आहे. उदाहरणार्थ एकदा यमन रागावर हुकूमत आली की गुरुविषयी कृतज्ञता राहाते पण गुरुसदृश गाण्याची गरज नाही. शिष्य त्याच्या सर्जनशिलतेनं यमन सादर करतो.

अध्यात्मातही तसंच आहे, एकदा सत्य समजल्यावर ते स्वतःच्या शैलीत मांडण्याची अंगभूत क्षमता शिष्यात येते. इथेही मी ओशोंशी सहमत आहे, ते म्हणतात सत्याचा उद्घोष उत्क्रांतीवादी आहे. याचा अर्थ सत्य समजलेली पुढच्या पिढीतली प्रत्येक व्यक्ती त्याची आणखी तरलतम आणि सुसस्पष्ट अभिव्यक्ती देत जाईल.

(संपादित)

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2014 - 8:38 pm | संजय क्षीरसागर

धाग्याचा तावच गेला *nea* आता फक्त चिल्लर उरली!

निराकार गाढव's picture

21 Jun 2014 - 7:57 am | निराकार गाढव

धाग्याचा तावच गेला...

माझंपण अगदी तुमच्याचसारखं आहे. मला पण फक्त ताव मारायला आवडतो.
>>

निराकार गाढव's picture

21 Jun 2014 - 7:35 am | निराकार गाढव

व्वा! क्काय ब्ब्रोबर है...

... गुरु आणि शिष्य यात फरक राहात नाही...

. येला म्हनत्यात खोल आन् मौळीक इचार.
.

योगी९००'s picture

20 Jun 2014 - 11:04 am | योगी९००

माझाही प्रश्न विचारून घेतो...

हिंंदी चित्रपटात समजा एखादे भारदस्त व्यक्तीमत्व दाखवले असेल (उदा : कभी खुशी कभी गम किंवा मोहबते मधला अमिताभ, बर्‍याच चित्रपटात प्राण (खलनायकाचे रोल सोडून),). हे असले व्यत्किमत्व पुर्ण चित्रपटभर एक bearing घेऊन वावरत असते आणि मेरे उसूललोंके खिलाफ मै भी नही जा सकता अशा टाईपचे संवाद असतात.

माझा प्रश्न असा की काही चित्रपटात अशा भारदस्त व्यक्तीमत्वाच्या तोंडात "मै झुठ से सक्त नफरत करता हू " असा डायलॉग असतो. आता तुम्ही सांगा की हे काय सांगण्यासारखे आहे? जगाच बहूतेक सर्वांनाच दुसर्‍याच्या खोटेपणाचा आवडत नाही. स्वतः खोटे बोललो तर चालते पण दुसर्‍याने नेहमी खरेच बोलावे अशी अपेक्षा असते. तर मग या डायलॉग्चे प्रयोजन काय? केवळ चित्रपटाची लांबी वाढवायला की उगाच भारदस्तपणा आणि वाढवायला?

10- पोलिसांचे खबरी असतात व ते अनेक गुन्हेगारांविषयी गुन्ह्यांविषयी महत्वाची अशी माहीती पोलीसांना पुरवित असतात असे ऐकुन वाचुन आहे. ते स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुळात हे काम का करतात ? ही कोण लोक असतात ?त्यांना या मोबदल्यात काय मिळते? व हा मोबदला पोलिस देतात तर ते स्वत:च्या पगारातुन देतात का ? ही खबरयांची यंत्रणा कुठल्या मोटीव्हेशनने ही धोकादायक कामे करते?

अ. पैशासाठी.

ब. जिथे बातमी तयार होण्याची सर्वाधिक शक्यता असते, तिथे नैसर्गिक रीत्या असणारे लोक, ज्यांचे असणे टोचत नाही असे लोक- उदा. वेटर, फेरीवाले, भिकारी, इ.

क. पैसा

ड. नाही. हे बघा- http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Additional-Rs-1cr-for-sec...

इ. अशी 'यंत्रणा' कशी असेल? खबरी वैयक्तिक असतात. पैशासाठी ते धोका स्विकारतात.

बॅटमॅन's picture

20 Jun 2014 - 12:45 pm | बॅटमॅन

अपेक्षाभंग कै झाला नै. ;)

तो सद्गुरु काय लायकीचा आहे हे कसे कळणार

बरोबर आहे. त्यासाठी सद्गुंची १६ लक्षणं भगवद्गीतेत सांगितली आहेत . त्या सगळ्या टेस्ट करण जर शक्य नसेल तर निदान ज्याच्याकडे आपण जातोय त्याबद्दल खालील प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करावा. सामान्य माणसाला ह्यातून खर्या सद्गुरूंची खात्री पटू शकते . खालच्या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तो गुरु होण्याच्या लायकीचा नाही हे समजावं
१. ह्या गुरुचे मोठमोठाले आश्रम आहेत का ? ह्याचे भरमसाठ शिष्य आहेत का? कारण

भक्तांनी फोटोशॉपचा यथायोग्य वापर करुन प्रसिद्ध झालेले सद्गुरु

भक्त काय लायकीचे आहेत हे सद्गुरु बरोबर ओळखतात . उठ सुठ कोणालाही दीक्षा देत बसत नाहीत .
२. देणगीच्या नावावर पैसे उकलले जातात का ? १ जरी पैसा मागितला गेला तर हा भोंदू आहे हे ओळखून सटकायचं तिथून.
३. हा बाबा लोकांसमोर चमत्कार करून दाखवतो का ? कारण गुरु चमत्कार करत नसतात शिष्याच्या भल्यासाठी चमत्कार घडवून आणतात .
हवेतून श्रीमंताच्या हाती सोन्याची अंगठी आणि गरीबाच्या हाती राख देणं असले चमत्कार शिष्याच्या किवा लोकांच्या काहीही उपयोगाचे नसतात .
४. लोकांना स्वताची सेवा करायला सांगतो का ?मुलींना , स्त्रियांना एकांतात सेवा करायला बोलावतो का?
५. सार्वजनिक संपत्ती , नैसर्गिक संपत्ती ह्यांचा काहीतरी फालतू कारणासाठी अपव्यय करतो का ?
६. साधना , मंत्रजप , ईश्वरसेवा ह्या गोष्टी सोडून स्वताचीच टिमकी वाजवतो का ? हे मी केलं , हे माझ्यामुळे झालं असं सगळं श्रेय स्वतः कडे घेतो का? ईश्वराची सेवा सोडून माझी सेवा करा असं सांगतो का
७. विनाकारण लोकांना भूतकाळ आणि भविष्य सांगत बसतो का .
८. सगळ्यात महत्वाच म्हणजे हा मनुष्य किती अहंकारी आहे हे onserve करण आणि सध्याच्या जगात खरे सद्गुरु अत्यंत दुर्मिळ आहेत हे सत्य स्वीकारणं . त्यामुळे कोणीही सोम्या गोम्या स्वताला गुरु म्हणवत असेल तर ते शक्य नाही . येवढा common sense आपल्याकडे असायला हवा

खरे सद्गुरु स्वतःच सिद्ध आणि सामर्थ्य संपन्न असल्यामुळे त्यांना वरील कोणत्याही गोष्टींची गरज नसते . ते शिष्यांना साधना कशी करायची , मंत्रजप , ईश्वरसेवा , दुखातून सुटण्याचा मार्ग आणि अध्यात्मिक प्रगतीमध्ये मार्गदर्शन करतात .

भारतीय संस्कृतीत खास करुन अध्यात्म व शास्त्रीय संगीत या क्षेत्रात गुरु या संस्थेचे इतके अतिरेकी स्तोम का आहे

संगीतातलं माहित नाही पण अध्यात्मातल सांगता येइल. आपण जे करतोय ते बरोबर आहे का ? आपण योग्य मार्गाने जात आहोत का ? काय करायचं आणि काय नाही ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी गुरु आवश्यक असतात .
चुकीचं काही झालं तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात . दिव्याने दिवा पेटवावा तसा शिष्यावर अनुग्रह करून गुरु त्याला उच्च पदावर नेतात . म्हणून सद्गुरूंना शरण जाणं आवश्यक आहे म्हणून सांगितलय .

विटेकर's picture

20 Jun 2014 - 2:01 pm | विटेकर

हेवी पोटेन्शियल वाला धागा

१-भारतीय संस्कृतीत "गुरु" हे एक "तत्व" म्ह्णून सांगितले आहे आणि योग्य गुरुच्या कसोट्याही सांगितल्या आहेत . टर्म्स न वाचता आय आग्री चेक केले की असे प्रश्न पडतात.

२-मूळात लावणी अभिजात नाही असे तुम्हाला का वाटते ? अस्तु , मनोसामाजिक कारण असे की परकीय आक्रमणे सतत उत्तर भारतावर होत राहीली आणि महाराष्ट्रापर्यन्त पोहोचली ती महाराष्ट्राने बर्‍यापैकी आडवली देखील. त्यामानाने दक्षिण बर्‍यापैकी सुरक्षित राहीली, मंदीरे सुरक्षित राहिल्याने त्याभोवती कला विकसित होत गेली. त्यामुळे महाराष्ट्रात वीररसपूर्ण (पोवाडा)आणि शृंगार ( लावणी - सैनिकाना रिझवण्यासाठी )या प्रकारची कला विकसित झाली.
३-अमेरीकेतील आपल्याला काही माहीत नाही - पास
४-प्रश्न कळला नाही ( त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही )
६- घरी बनवलेल आईसक्रिम - मूळात घरची आणि बाजरची अशी तुलना करु नये. उत्तम हवे असेल तर घरीच बनवावे. घर बांधणारे कुल्कर्णी वीटा सुद्धा घरी पाडून घेतात.
७- हिंदी सिनेमात प्रश्न विचारतात? आम्ही डोके घरी ठेऊन सिनेमाला जातो.
८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना - ही वासना आहे ती मनात असते . गात्रे थकली तरी वासना संपत नाहीत.फिरुन पुन्हा पुढच्या जन्मात येतात
९- मोटरसायकल मध्ये मागील व पुढील टायर मध्ये हवे चे प्रेशर - कारण दोन टायर वेगवेगळ्या मेकचे किंवा टायपचे असतात. म्हणजेच वेगेवेगेळे वॉल थिकनेस आणि थ्रेड प्याटर्न असतात त्याला वेगेवेगळे प्रेशर लागते.एकूण टायर हा गहन विषय आहे .
10- पास
११- गेली अनेक वर्षे हाफिसात काळी(शेडची) प्यांट आणि पांढरा( शेडचा) शर्ट आणि बाहेर जीन आणि कुर्ता इथेच आमच्या कप्ड्याचे ज्ञान संपते.तस्मात पास
१२- आय बी एम कंपनी - बाकीच्या आय टी कंपन्या तरी नेमक्या काय करतात हा मला प्रश्न आहे ( खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?)
१३- मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट - याला मास प्रॉदक्शन असे म्हणतात . हेनरि फोर्ड त्याचा जनक आहे.
१४- पास
१५- पास

सूड's picture

20 Jun 2014 - 2:53 pm | सूड

>>४-प्रश्न कळला नाही ( त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही )

खरंच कळला नसेल तर गुगलून बघा. *mosking*

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2014 - 10:05 pm | संजय क्षीरसागर

(त्यावरील संक्षींचे उत्तर ही अज्याबात कळले नाही)

आणि आता तर उत्तर निष्कासित होऊन प्रश्नच नामषेश झाला!
(संपादित)

प्रसाद गोडबोले's picture

20 Jun 2014 - 3:30 pm | प्रसाद गोडबोले

४- (संपादित)

५-नेसकॉफ़ी च्या व्हेंडीग मशीन मध्ये कॉफ़ी ज्यातुन पडते त्या नळीतुन सतत आत घुसुन साखरयुक्त पावडर खाण्यास चटावलेल्या मुंगळ्यांचा बंदोबस्त कसा करावा ?

>>>उत्तरे राहुद्या , तुर्तास ह्या दोन प्रश्नात काही कोरीरिलेशन ...परस्परावलंबित्व आहे का ह्याचा विचार करतोय ...

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2014 - 10:47 pm | संजय क्षीरसागर

नेमका प्रश्न तिथे शिल्लक होताच!

इरसाल's picture

20 Jun 2014 - 4:00 pm | इरसाल

अस करा सुरुवातीला कॉफी/चहा घेताना रिंझ करुन घ्या पहिली काही धारेने, असलेले कंटॅमिनेशन (मुंग्या) निघुन जैल.

क्वालिटी कंट्रोल- इरसाल

खरा प्रश्न त्यांना इत्का गलेलठ्ठ पगार देणे कसे परवडते हा आहे ?

आमच्या प्रोजेक्ट मध्ये १ तासाला एका माणसाचे ३१ dollars कंपनीला मिळतात . म्हणजे एक महिन्याचे ८३७० $ म्हणजे ५२७३१० रुपये एका माणसामागे मिळतात . मग त्यातले महिन्याला आम्हाला ४०००० रुपये पगार द्यायला न परवडायला काय झालंय त्यांना

इरसाल's picture

20 Jun 2014 - 4:53 pm | इरसाल

image/jpeg;base64,/9j/4AAQSkZJRgABAQAAAQABAAD/2wCEAAkGBxQSEhQUEhQVFRUUFRQUFRQUFBQVFBUUFBQWFhQUFBUYHCggGBolHBQUITEhJSkrLi4uFx8zODMsNygtLisBCgoKDg0OGxAQGCwmHx8sLCwsLCwsNy0sLCwsLCwtLy8sLCwsLCwsLCwsLCwsLDQsLDQsLCw3LCwsLDcsLCwsLP/AABEIAOEA4QMBIgACEQEDEQH/xAAcAAEAAgMBAQEAAAAAAAAAAAAAAwQCBQYBBwj/xAA/EAACAQIEAgcFBgUBCQAAAAAAAQIDEQQFITESQQZRYXGBkaETIjKxwQcUUtHh8CNCYnLxshUkMzRjc4KSov/EABoBAQACAwEAAAAAAAAAAAAAAAABAgMEBQb/xAAsEQEBAAICAQMCBAYDAAAAAAAAAQIRAwQSITFBBVETIjKhcYGRscHhFTNh/9oADAMBAAIRAxEAPwD7iAAABhUqxju0gMwVXmEOv0Cx8OsLeGX2WgRwrxezRIFdaAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAcp0n6VqhJ06fxLeVr2fUjjq3SeUneTk/NFnP6Vq1Ti345erZqJRRL0fU4eLHjl8f5tlh+kdLafH4Sj8jcYPGUKukKrT6m7P1WpyrwsZckVquWOOsG4+q8vyHozZcfFl82O+nGrDWMuJev6kuDzyUdziMB0irUWoVNVyb1T7n9GbuGY062vwy6+T7wwZ9S6/NJZ9473BZnGa3/faXz51Rryg97NHSZdna4Xxclfv7iHM5+ncPXH1joTxyS3OZxfSG7aXoUv9qTk/dVwpj0uSzd9HZe0XWvM9TOJqZhUi7NtMzo51Nb2YWvRz16V2gNBhOkCfxO3ebR5jTUeNySitXK64Uu1hrZ8OeF1YtgpU82oy+Gal/beXyJqeLhLRPzuvmFLhlPeJwAFQEM8TFbvyIXmMOv5BaYZX4XAVY5hB8/kTRrRfMIuNnvEgACAAAAAAAAHBfaHgOGUaq2no/wC5L8vkcJKsz7TneXrEUZ03u1eL6pLWL/fWfF8XQcJOLVmm012rdEx3/pvNM+PwvvP7M6WJZsKGJuaO5aw0g3eTCVssZhIzi9NzV4acqcuF6227V+ZZlmTWkI8fovDrLFPDOo4ylHha31vfwtoItweeP6vZ0mXYNypri711r99RlRovicdGtn1WMqd5RSctLbJWX6lrAVIpPiaVubstA0M88vWuWqYqzvzTcZdkotp+drm8yzN6XCop2fO+l32HIZzV4ak5LWM5SlbrjOTkr9WjRqZYhrVO8Xs+af4ZE6b14ceXCbfTKubUJOzafft5lHFVae8JeH6nFUMbfmXqWJGjHqTD2tdAsQXMFmUqbvF965M52GIJ6dcjRnwSzVjvsJmcaiunqt4vdfmib72jicLi3FqS5eqNpVqc4v3XqvHkQ5fJ05MvT2dLHExJVXvpf1OQ+8NcySnjZEsd6d+K6qUUzV5jlyeq4l3e8vFblShmbRsqGZRe5DH+HycV3HM1ouPO6607r9DPD5nOG0tOp6o6PF4GFTVe7L8S5/3LmczmeAlB6q3U18L7uruDe4eXj5fy5T1dNlOeqdk9OuO9l+KPZ2HQnyehiJRkuTWx9NyrFKrShNc1r3rR+qDQ7/WnFZlj7VbAAc8AAAAAD599oeSWl94gtJWVS3KXKXivl2n0EhxeGjUhKE1eMk013/UM/X5rw5zKPglSOpOk0uFbvfsXI3eZdHKkK8qai5cOt9ouL+Ft8k/ozKOSyjdylG731e/kS9Nhy8eWrtSwOEUdXubGLMPYNciSKtv5Bkyu17CVLI1+a5haLS57s8xGJ0NJjalyZFcOGb3WmxuNakY4fERk9LJvRr+WS6n1EGN7TV+1s9CdNjw+zb14ODur2e3Wv6X2lrDYshwFZVYuL1a9Vy8UV6lJwfZun1gl+K31OuWqVY0NCuX6NUFb3D1Ta4LFpXhLZppdjWsX6teJzuHqFydT4SrVzwmV1W5cjFzMcOuJk2LpxS3SIYvSXSP2gVUp+0MlUDJ4NjSzGpHaXgXaOb8S4amqelmk0aNVD24YsuDDL4X8wyu/vU9VvbmvzX77Tp+hl/u+vKcvocvgMc4tXeny/Q7XJKsXD3dHdtrtfMOb3vOYeOXrPu2IADlAAAAAAGwarPsbwR4VvLfuC2GNyuo0fSXOEry5K0YpbyfJfM0dar1meLqJu7SdtU3y7V1FGpK4d/rcPhCdQhnMxrzdnbeztfa9tLmkySlWjGcsRJuU2mo8XEopX25K99l1Ilub1lMde/7NlXmazEst1ZlDESLNnFqq9NN67X1KONUY3Udusv12azFIlaz1MrrcNRdT08zoY2k2vHz3RyalZpnSYWd5p9av5kVXKbTrCK+xYpUkiWxnFEMVtSUYlh6tFbiPVXCk3a2Uax5KoVI1DL2gZvFPxmSmVuM9UwaWlUJYVCkpEkZBSxdvzN/0bzHgkk9tvD9Dm6cyxhqvDJFWpz8czwuNfVAUcmxPtKSfNaPw29C8Hmspq6oAAgAAGM5JJt7JXfgcRm2M45t/vsR0vSDE8FO3OXyX7RxGJmHQ6PFu+SvWlcq1JklaVilUmTHc44xqSIKkj2cyCcyzYkYVJFOsyapIq1WF4pV0a+rE2VVFWdMsu1s6Ztsrxij7s/B/QrSgROiQpZt0axsPxLzPHmEeTv3HPKmWMPSsRpWccbf705bFikyjRiW4ML+Mi3GZmplZMzUghOpGSkQKR6pBCzGRJGRVjImjIKZLdORYuUoMs0mRWvm7Xobir3i+a9V+h1R896LV+GrH+5Lz0PoRV57uYePLf/QABqgBSzLMoUVq/eey+r7AnHG5XUaXpE3Kb6lovr6nLYy6Zs8dm/E277mnxNfiDv8AU4csMZLFOvMp1Jk9dmvqTLunjjp7ORBORjUqkbmF9PJyK9Rmc5EMmFoikYNEjRi0SlC4mPATtHlgI4wJYo9SDCYs0yeLKtORNGQKnTMlIhTMkyFKmTMlIiTMkwhMmSwkV4skiwpVuEi1SZRpst0WQwZtrlErTPp6Z8wype8fTaPwruXyKuF3/wBcZgANBFiq6hCU3tFN+RwuNbm3Oespa9i6kdR0pnbDy7XFet/ofPMBmHE6nPgnwPXnb87kxvdSanl826/ywxk7MqfeCfG1FK9tzSVqtmWjv9e7mqv4usntp3vU1tWoYzrlWdUltyaStkcpkbmYuQGUpGDZhxnjYWSXPGYoSYQwkz1MjZnYlZnc8kzw8kyERLBk0WVqbJosUqaLJEyCLJEyFalTM0yNGaCqSLJYkMSWKClTwLdAqU0XaCIYM63GVr3kfS6asl3I+eZJSvOK62l5n0Uq4Heu84AANJrekdLiw9RdST8mm/Q+V5ZheD7xv71Vvvvd6eDR9knBNNPZpp9zPnedYCVKcovbk+tcmS3epq2S/F3+2nFYWq3i6sXsopLu4eL5lfM9Gbt4FKq6vNx4bcu/y0KGOo3uTHY6cywuXl823+TRSqmDmbH7nHqMHgkW26X4kVOIcZsY0UlaxjUoJ8htX8SNa2Llipg+orTg1uGSWVkmJMjZ4SnT1mZGZBLI8YAQ8RYiyGLJEQVMmSRZFFMnhSZCtrKLJYxEKZNGIYrkQiTRieRiSRRDHazgi9holWkjZYSmRWDkvo6Xoth71I9mvl+tjszR9F8NwwcuvRfN/Q3hDz3Yy8uSgADAFTMsvjWjwy8HzRbATLZdxwOY9HqlNv3eKP4o6+a3RzeNwbXI+xFHMsvjUi/di33K77Lh0OH6hljfzR8anSRG6R1+aZVDXhVjnq2HcWWldni58eSbjXumYyiWnEjlEMqq4kcqdy1KJG4hKnPCoglhHyNi4nnCTteZ1rPurMlhWbDhHCNp/EqisIzJYUu8I4Rs86qRwyJo0V1EtjKxCPKsFAzijJIyjEKkUSxiIokjEK15YkhE9jEnpwCtrKhTN7leFcmkubRRwlC523RvLuFcb/8AH8ytc/tc3hi3WFoqEFFcl/klADhAAAAAAAAOf6Q5do5xWn8y6n1nE4+kfVZK+j2OO6SZK4XlFXi//nsYb/U7HjfGuEqohkW8XTsylJlo7+F3HjMGjK55clk0wcTzhJBYCPhHCSI9sBFwnvCSWDRAjse2MrHoGKRJGISM0CvYokSMUZxQUqSCLmHp3IKMDosiy/2k0v2lzZFrW5uSYTdX+j+U8bu/hW7+h2MY2VlsjChRUIqMdl+7khDz3Ny3ky3QABiAAAAAAAADyUU1Z6p7pnoA+d9MMHRpVLKXDdXs9k3yucliaLRvPtQhKNe7+GcU468klF6d/wAz58s0nS+F3X4Xt+hMj03RwyvFMpdt22Y8RSoZvTnv7kup7eEvzLMidt7fxUnGPaFZzPOMlbSaWIMfvJDNx56eJHKtD8S8wtLiuRxJJGsa+NSL2kvNEqdgWYryqGSmUVVPfbBHivKZ6plB4gqYnMbaLcEw3W5liEiN4pvbQ0cMVcn+98KuNFwkbqjVUdWztOgGM4q9nzhK3o/ofL4YltnU9Fsf7KrCfVJX7nuRWl3OK58dny+0g8TuelXlQAAAAAAAAAAAABRzfKKOKhwV6cZx5X0lFtWvCS1i+1NHF5h9kuFmv4davTfLWFRePFG78z6EAycfNycf6MrP4V8nX2LrW+Nl2fwI+vvkUvshxEP+Dj1b8M6Gn+pr0ProDLe5z33zr5RmH2fVqGHnUlWhVlBcTUKTp+6viabm9ld7cjicWmlpofoucE009U0012Pc+DZ5gXSqVKL3pyce9cn4qz8RHV+m9rPk3jnd6cpW37/EjaZeq0jFUzLt25UWHibfB3tr1FOlSNjSpN2hBOU5tRjFatuTskitqmdYYbC1K0uGjTnUfVCEpW77LRdrNxS6D5hK3+7uKf46tFeLSm2vI+s9EsjWDw0KWnG/fqSX81SW/gtIrsSNyU24XN9Xz8rOOTT4b0g6DYvC0HWlwTUfjVKTbpxs7zfEleK522vfa7XAOr/n9T9YNHDdIPsqwOJk5wU8NNu7eHajBvrlSknDySZMukcH1fPH/sm/4PhUKhcoVrqzPoeK+xWaX8LG6/8AUoX9YzXyI6X2N4hPXGUmuyjNO/8A7u5byb//AC3Xvvv+ji8NStz0N7lKfEktW9ElrdnWYX7JGl7+Mk3/AEUYx/1SkdLkHQPD4WUJ8VWrUg7qc5uKT/7dPhi13pkWsPN9V4dXx3a6LL4ONKmpfEoQT71FJlgAq8/bu7AAEAAAAAAAAAAAAAAAABx/Tboe8W41KDhGotJqd1GceTvFO0l3arTkjsAF+Pky48vLG6r4fjuhOOg7PDOf9VKpTkvWUZehqpZFiYvXCYvq/wCXqNX70rep+hQTt0Mfq3PPt/T/AG+D4ToxjZu0cHWXbNQp+s5L0PoHQfoZLDz9viVH2iX8OEXxcF1ZylK2srNrTRJvV307gEMXN9Q5uXHxt1L9gABogAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAAP//Z

चिल्लर जमा करायला कामात येईल.

मारवाजी , तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळोत न मिळोत तरीही तुमचे प्रश्न फारच भारी आहेत आमच्या आत्मु गुरु़जीना झोप यायला लागली म्हंजे तुमच्या धाग्याची ५० नक्की

मदनबाण's picture

20 Jun 2014 - 8:36 pm | मदनबाण

४- संपादित
अच्छा... अच्छा... अच्छा. आकडेमोड झालेली दिसतय ! अथवा इस विषय में मौन ही उचीत है ?
---------------
--------------
-------------
------------
-----------
----------
---------
--------
-------
-----
----
---
--
-
नाही समजले ? छ्या. काय हा अरसिकपणा ! असो... आता वर दिलेल वाक्य खाली पहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Jun 2014 - 8:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

८- अनेक म्हातारया व्यक्तींमध्ये जिभेतील टेस्ट बड्स कमजोर होउनही सारख चटकदार चमचमीत पदार्थ खाण्याची वासना का वाढीस लागते? त्यांना या खाण्याचा आनंद टेस्ट बड्स ची साथ नसतांनाही कसा घेता येतो?

या प्रश्नामध्ये बरीच गृहीतकं आहेत, जी ग्राह्य आहेत असं नाही. उदा - टेस्टबड्स कमजोर झाल्यावर चटकदार पदार्थांची चव समजत नाही. हे उलट आहे. ज्यांची टेस्टबड्स तीक्ष्ण आहेत अशा लोकांना कमी मीठ, साखर, तिखट, मसाला पुरतात.
दुसरं असं की उतारवयामुळेच टेस्ट बड्स क्षीण होतात असं नाही. ती तरुण वयातही मसालेदार, तिखटजाळ खाण्यामुळे झालेली असतात. आणि सगळ्याच माणसांचं शरीर वयामुळे एकसारख्या प्रकारेच बदलेल असंही नाही.

प्रसिद्ध लेखिका सिमोन दी बोव्हार तिच्या 'Old Age' नावाच्या पुस्तकात असं काहीसं म्हणते की उतारवयामुळे आपसूकच अधिक शहाणपण, समजूत येते असं नाही. ज्या लोकांना तरुण वयात काही शिकता, समजून घेता येत नाही ते लोक वयाने मोठे झाले म्हणून (आपल्याला हवे तसे) बदलतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

ज्यांना मुळातच तिखट, मसालेदार, चमचमीत खायला आवडतं ते लोक फक्त वयामुळे बदलण्याची शक्यता कमी आहे. अगदी तब्येतीनेच असहकार पुकारला, उदा - मधुमेह झाला तर गोड आवडणारे वयस्कर लोक, त्याबद्दल किती हळहळतात याची बरीच उदाहरणं आसपास दिसतील. याउलट मोजूनमापून खाणारे तरुण लोक, विकार नसले तरीही जपूनच खातील.

सुबोध खरे's picture

23 Jun 2014 - 11:35 pm | सुबोध खरे

अदिती ताई
मी आपल्या म्हणण्याशी सहमत नाही
कारण वयाप्रमाणे आपली वासाची (आणि कमी प्रमाणात चवीची) क्षमता कमी होत जाते . पण चव आणि स्वाद यात फरक आहे
मी यावर एक लेख लिहिला होताhttp://www.misalpav.com/node/25432 & http://www.misalpav.com/node/25466
वयाप्रमाणे वासाची संवेदना कमी झाल्याने वयस्कर माणसे जास्त गोड किंवा जास्त मीठ घालून पदार्थ खाऊ पाहतात त्यामुळे मधुमेह किंवा रक्तदाब हे विकार बळावू शकतात. कॉफी चा स्वाद हा त्याच्या वाफेतून आपल्या नाकात जाणार्या गंधाने द्विगुणीत होतो. मग जर त्यांची वासाची संवेदना बोथट झाली तर वयस्कर माणसे एकतर जास्त गरम कॉफी पितात किंवा जास्त स्ट्रॉंग. ते पण अपायकारक होऊ शकते.
खालील दुवे वाचून पहा (गुगलून पाहिल्यास बरेच दुवे मिळतील)
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2579627/
http://www.nytimes.com/2012/12/06/booming/sense-of-taste-changes-with-ag...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2014 - 2:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बहुदा मी योग्य शब्दांमध्ये ते लिहीलेलं नाही. माझ्या प्रतिसादाच्या पहिल्या भागाचा अर्थ असा -

सगळी माणसं एकाच (गुणसूत्रांच्या, रोग-विकारांच्या) साच्यातून निघालेली नसतात त्यामुळे सगळ्यांची चव, वास, स्वाद यांच्या जाणीवा कमी होतीलच आणि झाल्या तरीही एकाच वेगाने कमी होतील, असं नाही हे एक. आणि दुसरं सगळेच वयस्कर लोक या जाणीवा कमी होण्यामुळे, अधिक चमचमीत, झणझणीत किंवा गोड खातीलच असंही नाही. लक्षपूर्वक जगणारे अनेक वृद्ध लोक स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या काही विकारानंतर तेल, तिखट, मसाले, साखर कमी करूनही आनंदात जगताना, खाण्यापिण्यातला आनंद लुटताना दिसतात. अर्थात याला वयाचं बंधन नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

20 Jun 2014 - 10:09 pm | अविनाशकुलकर्णी

अंघोळी नतर केस कसे वाळवता???
त्याना डोक्यावर वाळु देता?
टोवेलच्या सहाय्याने?
कि ड्रायर च्या मदतिने?

प्यारे१'s picture

20 Jun 2014 - 10:33 pm | प्यारे१

१६ मे नंतर मिपा फारच सोवळं झाल्याचं जाणवतंय. ;)
'अच्छे दिन' आले की काय? =))

मारवा's picture

20 Jun 2014 - 10:37 pm | मारवा

हर चारागर को चारागिरी से गुरेज थॉ
वर्ना हमे जो गम थे वो लादवॉ ना थे.

अनेक आभार !!!

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2014 - 10:49 pm | संजय क्षीरसागर

निघालात का?

इरसाल's picture

21 Jun 2014 - 12:46 pm | इरसाल

प्रत्येक चारा साठवणार्‍याला चार्‍याबद्द्ल आत्मीयता होती, पण आम्ही होतो की जे दुखःमुळे चारा लादुन नेवु शकलो नाही. *lol*
*लालु प्रसाद यादव चारावाले पटनी*

अरे चारागर म्हणजे उपचारक इलाज करणारा चारागिरी म्हणजे उपचार इलाज आता त्याला गुरेज होता म्हणुन तो उपचार करायलाच तयार नाहीये सोल्युशन प्रोव्हायडर इज रीलक्टंट टु प्रोव्हाइड सोल्युशन हीज अनविलिंगनेस टु ट्रीट इज पिनपॉइंटेड हीअर. वर्ना हमे जो गम थे वो लादवॉ न थे आमच्या ज्या वेदना दु:ख होती त्यावर इलाज नक्कीच उपलब्ध होता सोल्युशन ही होत आमची दु:ख ला-दवॉ म्हणजे ज्यावर इलाजच नाही अशी नव्हती प्रश्न उपचारकाच्या अनिच्छेचा होता.
आपण नाही म्हणत का की तु मनावर घेतल ना तर तुला नक्की शायरी चा आनंद घेता येइल,
हा शेर मी एफ टी आय आय पुणे च्या भिंतीवर लिहीलेला पाहीला होता फिल्म इन्स्टीट्युट ची पोर व्यवस्थापना वर काही कारणाने नाराज होती त्याच्या निषेधार्थ हा शेर भिंतीवर रंगविलेला होता.
असो. आता हा सोपा शेर घे चघळायला
कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता
मुलाकात का दिन बदलते बदलते.
असो

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2014 - 11:45 pm | संजय क्षीरसागर

अगर कोई वादा खिलाफ़ी की हद है
हिसाब अपने दिलसे लगाकर तो देखो
कयामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता
मुलाक़ात का दिन बदलते बदलते.

मरीजे़ मुहोब्बत उन्हींका फ़साना
सुनाता रहा दम निकलते निकलते

सुबोध खरे's picture

21 Jun 2014 - 9:54 am | सुबोध खरे

उत्तर १३ )---- एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये एकाच वेळेस तीन तीन रुग्णांवर डॉक्टरांच्या तीन टीम कडुन शस्त्रक्रिया करण्यात तेंव्हा पहिला गट पहिल्या रुग्णाची छाती उघडतो त्याच वेळी त्या रुग्णाच्या डाव्या हातावर शल्यचिकीत्सकाचा दुसरा काम करीत असतो. डाव्या हाताची रक्त वाहिनी काढून त्याचे सर्व फाटे बंद केले जातात. त्याचा आतील पृष्ठ भाग साफ केला जातो आणि त्यातील रक्त प्रवाह सुरळीत आहे का ते पाहीले जाते.या वेळेपर्यंत पहिल्या गटाने छातीच्या त्वचेला छेद देऊन छातीचा पिंजरा करवतीने कापलेला असतो. छातीच्या फासळयाना रक्त पुरवठा करणारी रक्त वाहिनी( Internal Mammary Artery-LIMA / RIMA)वेगळी केलेली असते. हृदयाच्या आजूबाजूचे अवयव चिमट्यानी बाजूला केलेले असतात. या दोन्ही गोष्टी संपल्या कि डॉक्टर पांडा किंवा डॉक्टर प्रद्योत रथ हे येतात आणी LIMA/ RIMA आणी हाताची रक्त वाहिनी यांना हृदय चालू असताना हृदयाच्या रक्त वाहिनीला जोडतात. हे काम फार कौशल्याचे आहे आणी जगात फार थोडे शल्यचिकित्सक चालू हृदयावर काम करू शकतात ( जगभरात शंभर पेक्षा कमीच). त्यांचे हे काम चालू असे पर्यंत पहिला गट ज्याने हाताच्या रक्तवाहीनीवर काम केलेले आहे तो दुसर्या बाजूच्या शाल्य्क्रीयागृहामध्ये दुसर्या रुग्णाच्या हातावर काम सुरु करतो. आणी छाती उघडणारा गट त्याच्या छातीवर शल्यक्रिया चालू करतात. पहिल्या रुग्णाच्या रक्त वाहिन्या जोडण्याचे काम संपले कि डॉक्टर रथ किंवा डॉक्टर पांडा दुसर्या रुग्णावर रक्त वाहिन्या जोडण्याचे काम सुरु करतात. जर सर्व रुग्ण "चांगले" असतील. (चांगले --मधुमेह नाही, मूत्रपिंडाचा किंवा मेंदूचा विकार नाही वय त्यामानाने कमी-साठीच्या आतील ई ई )तर दोघे मिळून एक दिवसात आठ ते नऊ शल्यक्रिया सहज करतात. (सकाळी आठ ते रात्री आठ).
रुग्ण जर दुसर्या बायपासचा असेल( उदा. डॉ मनमोहन सिंग तर आधीच्या शल्यक्रीयेचे परिणाम ( हृदय किंवा रक्तवाहिन्या छातीच्या पिंजर्याला चिकटलेल्या असतात ते फार काळजीपूर्वक वेगळे करावे लागतात) तर दुपटीपेक्षा जास्त वेळ लागतो. हे म्हणजे जुन्या घराच्या फळ्या काढून साफ करून परत नवीन घरात वापरण्यासारखे जिकीरीचे असते.
वरील सर्व हकीकत चक्षुर्वाई सत्यं आहे कारण मी मुंबई च्या एशीयन हार्ट इन्स्टीट्युट मध्ये दोन वर्षे क्षकिरण शास्त्राचा विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. आणी या सर्व रुग्णांना श्ल्याक्रीयेच्या आधी आणी नंतर पाहिलेले आहे दोन वर्षात साधारण ३,००० रुग्ण मी पाहीले आहेत. अर्थात गेल्या चार वर्षात यात काही अत्याधुनिक नवीन तंत्र आले असेल तर मला माहित नाही.(माझ्या माहितीप्रमाणे तरी नाही)

एस's picture

21 Jun 2014 - 11:11 am | एस

सुबोध खरे आणि अदिती यांचे प्रतिसाद आवडले.

रुस्तम's picture

22 Jun 2014 - 12:34 pm | रुस्तम

+१११

संपादनाचे एका अर्थाने स्वागत. काही आकडे घेऊन थोडा चिल्लरपणा सुरू झाला होता. पण यानिमित्ताने मिपावर वेगळा पुरुषविभाग व्हायला हवा का याबाबतीत थोडे जास्त गांभीर्याने आणि सकारात्मकपणे विचारमंथन व्हावे का असे वाटू लागले आहे.
नको असल्यास हा प्रतिसाद उडविण्यास माझी हरकत नाही.

बॅटमॅन's picture

23 Jun 2014 - 2:38 pm | बॅटमॅन

अहो पुरुषविभागात थिल्लरपणा सोडून होणार काय नै का? शिवाय काही झालं तरी पुरुषांची थट्टा कुणी करत नाही. त्यामुळे पुरुषविभागाची मागणी ही बाय डेफिनिषण चुकीची आहे.

जर अनाहिता हे दालन इतक्या प्रगल्भपणे चालू शकते, तर पुरुषविभाग म्हणा किंवा जे म्हणायचेय ते म्हणा, तिथे मात्र फक्त कंबरेखालच्याच टवाळक्या, कुचाळक्या चालतील आणि संस्थळाच्या शूचिर्भूततेवर शिंतोडे उडतील असा पूर्वग्रहदेखील तितकाच चुकीचा आहे असे नमूद करतो. (अनाहिता कसे चालते हे माहीत नाही, उगाच तेवढ्या सुतावरून कुणी स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नये.)

आणि पुरुषविभागच का? इथे असेही प्रश्न येऊ शकतात ज्यात वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतरच्या सर्वच व्यक्तींचे हित असू शकते. शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव होऊ शकण्याइतपत प्रगल्भपणा आणि समंजसपणा समाजात आला असेल तर मिपाने त्यापेक्षा अलिप्त भूमिका का घ्यावी असाही प्रश्न मनात आला आहे. पुन्हा एकदा, अशा ठिकाणी लैंगिक चर्चाच झडतील असेही ठसवणे अयोग्य आहे. वायफळाचे पीक उगवल्यास ते नखलून टाकण्यास संपादक मंडळ समर्थ आहेच.

म्हटलं तर तात्यांची 'रौशनी' किंवा रामदासांची 'पीसीजेसी' देखील सोज्वळतेच्या निकषांवर बसत नव्हत्या. पण तिथे कुचाळक्या किती झाल्या आणि लेखांचे स्वागत किती झाले हेही तपासून पहायला हरकत नाही. पुरुष म्हटला की तो थिल्लरपणाच करणार ह्या समजाला माझा विनम्र आक्षेप आहे.

असो.

टवाळ कार्टा's picture

23 Jun 2014 - 9:34 pm | टवाळ कार्टा

+११११११११

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 11:33 am | बॅटमॅन

काही असो. पुरुषविभागाच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या जातील. माझे म्हणणे खोटे ठरले तर त्यावेगळा दुसरा आनंद नाही.

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 11:57 am | पिलीयन रायडर

चक्क सहमत..!

पुरुष विभाग उघडला तर (उघडा..न उघडा.. मला काहीही फरक पडत नाही हे आधीच नम्रपणे नमुद करुन ठेवते..) तिथे केवळ आणि केवळ थिल्लरपणाच चालेल असं म्हणणं चुक ठरेल ह्याच्याशी सहमत..

इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.

तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..

इथला "तो" प्रश्न संपादित का झाला ते कळाले नाही. त्या अनुषंगाने इथे काही असभ्य चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.

आणि

तसंही जर थिल्लरपणा करायचा असेलच तर "तसलेच" विषय निघण्याची कुणी वाट पहात नसतं हे ही खरंच..

या दोन्ही मुद्द्यांशी सहमत. मलाही हेच म्हणायचं आहे. असो.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2014 - 2:17 pm | टवाळ कार्टा

+११११११११११

प्रसाद गोडबोले's picture

24 Jun 2014 - 1:04 pm | प्रसाद गोडबोले

चौथा प्रश्न का संपादित केला गेला हे कळायला मार्ग नाही .

मिपावर कामशास्त्राविषयी चौकशी करायला बंदी आहे का ? कामशास्त्र हा थिल्लर पणा आहे का ?

समजा उद्या मी वात्सायनाच्या कामसुत्रावर अभ्यासपुर्ण आणि सचित्र लेख लिहायचे ठरवले तर तोही संपादित केला जाणार का ?

अवांतर १: हिप्पोक्रसी ह्या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय आहे ?
अवांतर २: र.धो. कर्वे ह्यांचे साहित्य इन्टरनेटवर उपलब्द आहे काय ?
अवांतर ३: व्हजायना मोनोलोग चे मराठी (अपुणेरी) भाषांतर कुठे वाचायला मिळेल ?

बॅटमॅन's picture

24 Jun 2014 - 1:08 pm | बॅटमॅन

अवांतर १: ढोंगीपणा.

अवांतर २: बहुतेक नाही.

अवांतर ३: बहुतेक तसे अजून कुणी केलेले नाही.

बाकी कामशास्त्र एट ऑल बद्दल सहमत आहे. त्या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असावीत असेच वाटते एकूण होरा पाहता.

इरसाल's picture

24 Jun 2014 - 1:54 pm | इरसाल

तुमच्या त्या अकिलीसच्या पुढच्या भागाचे काय झाले ?

सध्या पुढील भागाचे अध्ययन सुरू आहे. माफ करा पण विषय फार मोठा आहे ओ. लिहायला वेळ लागतो त्याहीपेक्षा वाचायला वेळ लागतो. सध्या अगोदर ओडीसीपर्यंतची कथाच संपायला ४-५ भाग अजून लागतील. पुढचे तर अजून किती कायबाय आहे........

पण ओडिसीला या महिन्याअखेरीपर्यंत हात घालणार हे नक्की.

टवाळ कार्टा's picture

24 Jun 2014 - 2:18 pm | टवाळ कार्टा

पण ओडिसीला या महिन्याअखेरीपर्यंत हात घालणार हे नक्की.

वाट बघतोय :)

हाडक्या's picture

26 Jun 2014 - 2:25 pm | हाडक्या

अवांतर ३ च्या उत्तराबाबत असहमत. मला वाटते 'योनीच्या मनीच्या गुज-गोष्टी' हे नाटक त्यावर बेतलेले आहे.

संजय क्षीरसागर's picture

26 Jun 2014 - 2:43 pm | संजय क्षीरसागर

ते नाटकाचं नांव पेपरला नेहमी येतं हो, पण निदान या धाग्यावर तरी तो शब्द वर्ज्य दिसतोयं, म्हणून जरा सांकेतिक प्रतिसाद दिला होता *biggrin*

हाडक्या's picture

26 Jun 2014 - 5:05 pm | हाडक्या

सॉरी शक्तिमान.. आमाला माहित नव्हते हो.. *biggrin*

( जल्ला मेला मिपावरच नव्हे या दुनियेतच हा लोचा आहे. कुठे काय वर्ज्य त्येचा कंफुजन होतंय सारखा.. ;) )

याचं मला ही कुतुहल आहे. या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला आणि चर्चा सुद्धा विधायक (पण रोमांचक) झाली. सो आय वंडर. प्रश्न पुनर्प्रकाशित होऊ शकतो का असा विचार मनात आला.

>>या लेखाचा विषय (तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते) तर शीर्षकापासून संमत झाला

पुलंनी म्हटलंय, काय म्हटलंय पेक्षा कुणी म्हटलंय याला महत्त्व असतं. तसंच इथेही काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हा क्रायटेरिया असावा. तुम्ही नमूद केलेला धागा स्त्रीसदस्याने काढलेला असल्याने त्यात संबंधित मंडळींना निरागस भाव दिसला असावा. वरचा चौथा प्रश्न एका पुरुष आयडीने (पुरुष आयडी असल्याचं वाटतंय तरी) मांडला असल्याने तो थिल्लरपणा करण्यासाठीच काढला आहे असं वाटल्यास नवल नाही. ;)

तस्मात सम आर मोअर इक्वल हे एकदा लक्षात ठेवलंत की मिपावर वावरताना असले प्रश्न पडणार नाहीत.

सूडशी सहमत. सम आर मोर ईक्वल- नॉट ऑल गेट टु परेड देअर शॉव्हिनिझम अ‍ॅज़ "अनबायस्ड पोझिशन".

संजय क्षीरसागर's picture

24 Jun 2014 - 4:03 pm | संजय क्षीरसागर

पोझिशन्स वरंच तर आक्षेप आहे!

तिथला हा प्रतिसाद पाहा :

जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे.

आणि त्या खालचा हा उपप्रतिसाद !

"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच. [इच्छुकांनी व्यनी करावा.]

चित्रगुप्तांनी तिथे फोटो पण एकदम भेदी टाकलेत. बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?

बिभित्सतेला आक्षेप असावा हे मान्य, पण रोमँटिसिजम या जीवनाच्या सौंदर्यशाली परिमाणावर दुजाभाव कसा होऊ शकतो?

अहो, एकदा का सम आर मोर ईक्वल हे ठरलं तर मग आमचा तो रोम्यांटिसिझम अन तुमचा तो पर्व्हर्ट बीभत्सिझम असंच होणार की. तुम्ही काय बोलता हे महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही बोलता हे आणि हेच्च महत्त्वाचं असतं तिथे.

संजय क्षीरसागर's picture

24 Jun 2014 - 4:28 pm | संजय क्षीरसागर

अगदी संक्षींचा प्रतिसादही नॉर्मल वाटला होता.

हे वाक्य, आणि तेही पिरानं म्हटलंय, म्हणजे प्रश्नोत्तरं सभ्यतेचे संकेत पाळून चालली असावीत असं वाटतं.

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:31 pm | पिलीयन रायडर

काका तो तुमच्या साईडनीच बोल्तोय! आणि ह्या वेळेस चक्क मी पण..!!

सभ्यतेचे संकेत पाळले जात होते हे मान्य आहे! पण काही प्रतिसाद उडाले वगैरे असतील तर माहीत नाही..

लेखातूनच संपादित झाल्यानं तदनुषंगिक संपादन माझ्या आणि इतरांच्या प्रतिसादात झालंय.

बाकी पुणे कट्ट्याचे फोटो पाहता, मी काका कॅटेगरित (कोणत्याही अंगानं) बसत नाही!

पिलीयन रायडर's picture

24 Jun 2014 - 4:48 pm | पिलीयन रायडर

मी तुमच्या "अपीअरन्स" ला काका नाही म्हणाले..

असो...

संजय क्षीरसागर's picture

24 Jun 2014 - 9:11 pm | संजय क्षीरसागर

*yes3*

मस्त कलंदर's picture

24 Jun 2014 - 9:38 pm | मस्त कलंदर

हिप्पोक्रसी- दांभिकपणा. ढोंगीपणा म्हणजे pretentiousness.

`सोनीच्या मनीच्या गोष्टी' नाटक पाहा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Jun 2014 - 4:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

संक्षी आणि बॅटमॅनची कमाल आहे...जुगलबंदी जोरदार चाल्लेय