फेसबुकवरील जुन्याचर्चा कशा शोधाव्यात ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
21 Jun 2014 - 3:32 pm
गाभा: 

फेसबुक मध्ये ग्रूप्स, पेजेस आणि टाईमलाईन अशा तीन ठिकाणी चर्चा करता येते. पण या चर्चा तशा वाढत जातात. माझ्या सारखी व्यक्ती क्वचीतच फेसबुकवर जाते. आपण आपापसात केलेली जुनी चर्चा कशी शोधावी. ?

विशीष्ट ग्रूप्स, पेजेस, टाईम लाईन आणि ज्या दोन सदस्यांमध्ये चर्चा झाली त्यांची नावे देऊन जुनी चर्चा शोधता येते काय याची माहिती हवी आहे.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

21 Jun 2014 - 4:18 pm | कवितानागेश

मलापण. मी पूर्वी केलेली IQ टेस्ट शोधायचीये. :)

कुणाचा आयक्यू काढलास गं माऊ????? ;)

S.प्रशांत's picture

22 Jun 2014 - 1:59 pm | S.प्रशांत

go to your fb profile find "Activity Log"
click on link
you will get all your liks ,comments etc from the day you joned fb

माहितगार's picture

23 Jun 2014 - 11:28 am | माहितगार

निश्चित करून बघतो. साहाय्यासाठी धन्यवाद

अक्शु's picture

22 Jun 2014 - 4:21 pm | अक्शु

मला मिपाच्या संदर्भात हेच विचारायचं.
मिसळपाव वर देखील जुने लेख कसे शोधावेत हा प्रश्नच आहे.उदाहरणार्थ मी मिपा सुरुवातीला वाचायचो पण सदस्य नव्हतो. तेंव्हा एक धमाल लेख वाचला होता ज्यात टिपिकल बोलीवूड प्रेमकथांचा विनोदी अंगाने समाचार घेण्यात आला होता आणि मिपावरील सर्व धमाल धाग्यांप्रमाणेच मूळ लेखापेक्षा प्रतिक्रिया फारच भारी होत्या. पण लेखाचे किंवा लेखकाचे नावच आठवत नसल्याने धागा शोधणे शक्य झाले नाही.

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2014 - 4:55 pm | टवाळ कार्टा

फारएन्ड :)

अक्शु's picture

23 Jun 2014 - 11:06 am | अक्शु

धन्यवाद

चेपु वापरत नसल्याने या बद्धल शून्य माहिती ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dick Dale & The Del Tones"Misirlou" 1963