नुकतीच "तुझे आहे तुजपाशी" या सदाहरीत नाटकाची जाहीरात वाचली. श्यामच्या भूमिकेत एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर, डॉ. सतीशच्या भूमिकेत ग्रेसफूल डॉ. गिरीश ओक, काकाजींच्या अजरामर भूमिकेत रवि पटवर्धन, आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर इ. नामावळी होती.
मी हे नाटक १२ वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यावेळी डॉ. सतीशची भूमिका कोणतरी दुसराच अभिनेता करीत होता. बाकी सर्व अभिनेते तेच होते (अभिनेत्र्या वेगळ्या होत्या. गीताचे काम साधना राजपाठक यांनी केले होते व उषाच्या भूमिकेत किशोरी अंबिये होती). आज १२ वर्षानंतर तेच अभिनेते त्याच भूमिका करत आहेत. माझी खात्री आहे की आजपासून १२ वर्षांनी २०२६ मध्ये या नाटकात हेच अभिनेते याच भूमिका करत असतील.
या नाटकातील श्याम ही व्यकिरेखा अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आहे. ही भूमिका गेली अनेक वर्षे खर्शीकर करत आहेत. त्यांचे वय सध्या ६० च्या आसपास असावे (चूभूदेघे). इतक्या वयस्कर व्यक्तीला ही भूमिका अजिबात शोभत नाही. तरीसुद्धा नाटकाच्या निर्मात्यांना या तरूण भूमिकेसाठी दुसरा तरूण अभिनेता सापडला नाही याचे आश्चर्य वाटते. या नाटकातील डॉ. सतीश हा देखील ३० च्या आसपास वय असलेला तरूण आहे. पण याची भूमिका देखील साठी जवळ आलेले डॉ. गिरीश ओक करत आहेत. अविनाश खर्शीकर व डॉ. गिरीश ओक यांच्या अभिनयाबद्दल तक्रार नाही, परंतु निदान आपल्या वयाला साजेशी भूमिका त्यांनी करावी अशी अपेक्षा आहे. निदान नाटकातील व्यक्तिरेखेच्या वयाला आपण शोभू का हा विचार त्यांनी करावा असे वाटते. नाटकाच्या निर्माता-दिग्दर्शकांना इतक्या वर्षात इतर तरूण अभिनेते सापडले नसावेत हे दुर्दैव.
बालगंधर्व उतरत्या वयात रूक्मिणी, सुभद्रा इ. भूमिका करत होते व त्यामुळे त्यांच्यावर कठोर टीका झाली होती असे वाचले होते. अमीरखानने देखील '३ इडियट्स' मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी १८ वर्षाच्या विद्यार्थ्याची भूमिका केली होती. ती त्याला फारशी शोभली नव्हती. 'दुनियादारी' मध्ये अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी इ. प्रौढ अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत. पण सध्याच्या काळातील वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिका करत असताना कोणीच टीका करताना आढळत नाही.
प्रतिक्रिया
13 Jun 2014 - 1:50 pm | अभिजित - १
सुनील बर्वे ने त्याच्या हर्बेरिअम उपक्रमातून नाटकाचे दर वाढवायची नवीन प्रथा सुरु केली. त्यामुळे आता सगळे नट जास्त पैसे मागत असणार "नाईट" चे. मग त्यामुळे हा स्वस्त पर्याय !! - double age, half night !!
13 Jun 2014 - 2:24 pm | मृगनयनी
असहमत !!... :( १८-२० वर्षाचा तो नक्कीच वाटला नाही.. पण ४८ वर्षाचाही वाटला नाही..... डोळ्याभोवतालच्या सुर्कुत्या मेकअप करून लपवल्या गेल्या... पण डोळ्यांतली आणि अभिनयातली चमक मात्र २० वर्षांच्या मुलाला लाजवेल... अशी होती.....
सहमत !!... स्वप्नील जोशी'चा सुजलेला चेहरा, डोक्याला लावलेला विग त्याला फारसा शोभला नाही. जितेन्द्र जोशी त्यातल्या त्यात व्हीलन म्हणून बरा वाटला..... अंकुश चौधरी टायफाईड'मधून बरा झाल्यापासून त्याचा 'चार्म' गेला तो गेलाच... त्यातून त्याची जीभ थोडी जड असल्यामुळे.. त्याचं बोलणं कधीकधी तोतरं वाटतं.....
हहा हहा... सगळ्यांत भारी तो शेवटच्या सीनमधल्या -म्हातार्या उर्मिला कानेटकरचा म्हातारा नवरा!!!.. =)) =)) =)) =)) स्वप्नील जोशीला श्रद्धांजली वाहायला जेव्हा तिचा नवरा पुढे येतो... त्याला पाहून "त्या" प्रसंगाचं गांभीर्यच नष्ट होऊन जातं.... =)) =)) =)) अरे.. एवढी सगळी स्टारकास्ट जमवली, तर मग शेवटी उर्मिला'चा म्हातारा नवरा म्हणून त्या आदिनाथ कोठारे'चेच केस पांढरे करून त्याला घ्यायचं ना!.... कोण कुठलं बुजगावणं आणून ठेवलं!!!!...
13 Jun 2014 - 6:12 pm | शशिकांत ओक
आणि तडाखेबंद तोफबाजी.... मृगनयनी...
पोट सुटलेले नायक व थोराड बांध्याच्या नायिका यांना पाहून पाहून कॉलेज कुमार असेच असतात असे वाटून कॉलेज काळात मी व्यायाम करायचे सोडून दिले होते! असो...
13 Jun 2014 - 6:39 pm | अत्रुप्त आत्मा
@कोण कुठलं बुजगावणं आणून ठेवलं!!!!...>>> अगागागागागागागा!!!
13 Jun 2014 - 3:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नाटक न बघण्याचे स्वातंत्र्य आहे रे गुरुजी.
13 Jun 2014 - 3:40 pm | गवि
अशोक सराफ यांना अनेक दशके कॉलेजयुवकाच्या वयोगटात पाहिल्याची आठवण झाली. अगदी ब्लॅक & व्हाईट जमान्यापासून कलरमधे पण.
मला वाटतं धूमधडाका सिनेमातही अशोक सराफ कॉलेजवयीन दाखवला आहे. (आठवणः तो नायिकेला कॉलेज सोडताना आठवण / पार्टिंग गिफ्ट म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देतो असा सीन. चूभूदेघे.)
.......
परफेक्ट शाळा / कॉलेजच्या वयोगटातले खरोखर "असणारे" आणि त्याचवेळी गल्ला खेचतील इतके प्रसिद्ध नट / नट्या मिळणं अवघड असू शकेल हे खरं. कारण सेटल होईपर्यंत स्ट्रगलरची तिशी आलेली असू शकते. पण अर्थातच साठीच्या घरातही तीच भूमिका खेचणं हे अगदीच केविलवाणं आहे.
मला आताच्या काळात प्रशांत दामलेच्या "एका लग्नाची गोष्ट" बद्दल असं वाटायला लागलं आहे. लग्नाळू नवतरुण असं वय त्या भूमिकेला अपेक्षित आहे. त्या नाटकाच्या जाहिरातीत नटनटीचा फोटोही किमान एक दशक जुना टाकतात असं दिसतंय.
13 Jun 2014 - 4:08 pm | इरसाल
फक्त दुनियादारीवर बोलाबसं वाटतं......हुम्म्म्म्म्म काय करावे (सुस्कारा टाकत असलेली/ला बाहुली/ला)
पुस्तक नाय पिच्चर वर. दुनियादारी आणी भुताची दुनियादारी(नवी दुनियादारी) ;)
13 Jun 2014 - 4:40 pm | विकास
नाटकात पण बघवत नाही, पण एकवेळ चालेल असे वाटते. पण जेंव्हा घोडनवरे कसले घोडआजोबा विशीतल्या वयाचा अभिनय करत तरूणीमागे पळू लागतात तेंव्हा शिंग मोडून वासरात जाणे अथवा जरठबाला विवाह वगैरे शब्दप्रयोग आठवतातः
(खालील गाण्यात दिलीप कुमार ५३-५४ तर लिना चंदावरकर २३-२४ असावी)
13 Jun 2014 - 4:45 pm | योगी९००
मला यावरून यल्गार हा (वि)चित्रपट आठवला...फिरोजखान मुलाच्या भुमिकेत आणि त्याच्यापेक्षा वयाने वीस वर्ष लहान असलेला मुकेश खन्ना (शक्तिमान) त्याच्या बापाच्या भुमिकेत.....!!!
बाकी पुर्वीच्या काही चित्रपटात जितेन्द्र आदी कलाकारांनी कॉकू च्या भुमिका केल्यात. पण त्यात विषेश वावगे असे क्धीच वाटले नाही..
13 Jun 2014 - 9:15 pm | आशु जोग
हे भारी
13 Jun 2014 - 9:18 pm | आशु जोग
व्यक्तिगत जीवनातही सायराआंटी दिलीप अंकलपेक्षा खूप लहान आहेत... २५ वर्षाने असेल,
बाकी गिरीश ओक यांचे बाकी काही अपडेट्स !
13 Jun 2014 - 9:44 pm | भृशुंडी
क्लर्क मधला मनोजकुमार.
एक तर मनोजकुमार, त्यात कॉलेजमधे, त्यात पुन्हा तरूण.
माणसानं किती काय सहन करायचं त्याची मर्यादा हीच असावी.
14 Jun 2014 - 4:53 am | निनाद मुक्काम प...
आपली मराठीवर हे नाटक पहिले आहे ,
गांधीवादावर उत्तम भाष्य करणारे त्याला कोपरखळ्या मारणारे आहे ,
सावरकर ह्यांच्याशिवाय आचार्य ही कल्पना सहन होत नाही ,
मात्र बाकीच्या भूमिकांच्या साठी अनेक होतकरू नवीन कलाकार मिळू शकले असते ,
टीव्ही वर दोन चार मालिका केल्यावर अचानक काहींच्या आतला अभिनेता उचल खातो मग एका मुलाखतीत आता पुढील वर्ष
मालिका बंद व नाटक चालू असे सांगितले जाते.
तेव्हा तरुण कलाकारांना काहीच तोटा नाही ,
गुरुजींनी त्यांच्या मनातील ड्रीम टीम कोणती ह्याचा खुलासा केला तर मग इतर सुद्धा आपापल्या आवडीनिवडी सांगतील.असे वाटते.
14 Jun 2014 - 7:37 am | चौथा कोनाडा
सहमत. योग्य मुद्दा! यात निर्मात्यांची मजबुरी असावी. नाववाले वयस्क अजूनही गर्दी खेचतात. त्यांच्या नावावर बुकिंग होते हे कारण असावे. नवि नावे पाहिल्यावर लोक पहायला टाळाटाळ करतात.
14 Jun 2014 - 9:07 am | विकास
अवांतराबद्दल क्षमस्व, पण...
नवीन लेखन सुचीमधे मी आत्ता ह्या धाग्याचा संदर्भ वाचताना सगळे खाली दाखवल्याप्रमाणे एकत्र वाचले आणि क्षणभर गोंधळलो! :)
वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत श्रीगुरुजी
14 Jun 2014 - 9:19 am | नानासाहेब नेफळे
गुरुजींनी तिकिटविक्रीचा व्यवसाय चालू केला असावा असा माझा अंदाज आहे.
14 Jun 2014 - 11:51 am | मदनबाण
लेखकाच्या भावनेशी सहमत !
मॄग्गाकडे याबाबतीतला चांगला डेटाबेस दिसतोय ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gori { A Band OF Boys }
14 Jun 2014 - 4:46 pm | तुमचा अभिषेक
बाकी बरेच लोकं जळतातही हा, जेव्हा फोर्टी प्लस नायक २० वर्षाची हिरोईन कवेत घेऊन नाचतो तेव्हा.
खास करून तीस-पस्तीशीच्या वयात पोहोचलेल्यांना जेव्हा जाणीव होते की आता आपल्याला वीस-बावीस वर्षांच्या पोरी भाव देत नाहीत तेव्हा त्याचवेळी आपल्यापेक्षा जास्त वय असणारे कलाकार मात्र तिथे पडद्यावर (आणि अर्थातच शूटींगच्या करताना खरोखरही) तरुणींबरोबर रोमान्स रंगवत आहेत हे बघणे नक्कीच त्रासदायक असावे.
अर्थात हा एक अंदाज आहे जो निरीक्षणाने आणि तर्काने आला आहे, माझे मार्केट अजून डाऊन झाले नसल्याने स्वानुभव नाही बोलू शकत. ;)
14 Jun 2014 - 4:54 pm | तुमचा अभिषेक
आमीर खान त्यात शोभला नव्हता याच्याशी प्रचंड असहमत
स्वप्नील, सई, दिघ्या शोभले नव्हते याच्याशी अंशता सहमत.
अशंता सहमत या साठी की शोभले नव्हते तरी हिट झाले होते.
या दोन्ही चित्रपटांचे व्यावसायिक यश पाहता प्रेक्षकांनी त्यांना स्विकारले होते.
तसेच यांच्या जागी इतर कोणाला घेतले असते तर कदाचित, कदाचित काय नक्कीच या चित्रपटांनी एवढी कमाई केली नसती.
एक साधासरळ हिशोब आहे, हा व्यवसाय आहे बॉस, यहा पे जो बिकता है वही टिकता है, लोकांनी स्विकारणे बंद केले की आपसूक ते अश्या भुमिकांमधून बाद होतील.
अवांतर - कोणी हे वयाचे लॉजिक सौथेंडियन लोकांना रजनीकांतच्या बाबत पटवून देईल तर मी त्याच्या ढेंग्यातून जाईल :)
15 Jun 2014 - 12:49 am | कपिलमुनी
रजनीकांत आणि लॉजिक... फार भिन्न गोष्टी आहेत
16 Jun 2014 - 12:47 pm | तुमचा अभिषेक
पण हिट्ट आहे ना, ते महत्वाचे.
तुम्ही आम्ही बुद्धीवादी बोलून काय फायदा, पब्लिक डोक्यावर घेतेय तोपर्यंत हे चालणारच, आणि यात काही गैर नाही. जसे सचिन (महागुरू पिळगावकर नाही हं, मास्टर ब्लास्टर तेंडुलकर) हा शेवटाला वय होऊनही चाचपडत एकदिवसीय सामन्यात खेळत होता तेव्हा टिका होणे साहजिकच होते, कारण भारतीय संघाचे नुकसान होत होते, पण इथे निर्माता दिग्दर्शकाला फायदाच होत असेल तर आपल्या आक्षेपांना विचारतोय कोण...
15 Jun 2014 - 1:16 am | भृशुंडी
@सौथेंडियन लोकांना म्हणजे तमिळ का?
रजनीकांत - तमीळ. जाऊ दे, त्याची गोष्टच वायली आहे!
मोहनलाल - मल्याळम (पण तो वयानुसार भूमिका करतो)
चिरंजीवी- तेलुगू, पण रिटायर.
कन्नड - कोणी पुरातन स्टार ऐकीवात नाही.
14 Jun 2014 - 5:14 pm | नानासाहेब नेफळे
अमिरकडे बघून कॉलेजातले तरुण चाळीस वर्षांचे असतात असा टेम्पोररी समज करुन घेऊन थ्रिइडीयट चित्रपटाचा आनंद प्रेक्षक घेतील इतपत पुण्य अमिर खानने कमावले होते.खर्शिकरने व गिरीश ओकने एवढे पुण्य कमावलेले नाही.
14 Jun 2014 - 5:21 pm | पैसा
जुने कलाकार स्वस्तात उपलब्ध असावेत आणि त्यांच्या नावावर नाटक्/सिनेमा चालू शकतो ही निर्मात्यांची खात्री असावी. शिवाय नाटकांच्या बाबतीत भूमिका पाठ असणे, अभिनय नव्याने गिरवून घ्यावा न लागणे हे फायदे असावेत. जुन्या लोकाना एखाद्या तालमीनंतर नाटकाचा प्रयोग सुरू करणे शक्य व्हावे, पण नवीन मुले घेतल्यास संपूर्ण नाटक नव्याने बसवावे लागत असेल.
दुनियादारी पाहिला नाही. आमीरखान तरी बराच सुसह्य वाटला. मात्र अमिताभचे मधल्या काळातले काही सिनेमे (कूली शहनशाह इ.इ.)आणि शाहरुखखानाचे आताचे दिसणे भयावह आहे.
14 Jun 2014 - 9:54 pm | रेवती
शिनेमात काम करून करून पुरेसा चोथा झालेला असला तर लोकांनी फेकून देण्याआधी आपणच आवरते घ्यावे हे त्या शारूख्खानला जेंव्हा कळेल तो सुदिन! नैतर चक्क आजोबा भूमिका घ्याव्यात. चेन्नै यक्सप्रेसमध्ये दिपिका ही शारूकची मुलगी वाटत होती. हे सगळं आपल्याला वाटतं पण निर्मात्यांची आर्थिक गणिते वेगळीच असतात आणि ती बरोबर येतातही.
आमिर तीन इडियटसमध्ये बरा शोभला होता शिवाय नानासाहेब म्हणतात तसे पुण्य कमावले असल्याने काम भागले पण आता आवरते घेण्यास वाव आहे. ;) मला वाटले की सत्यमेव जयतेच्या पयल्या सिझननंतर हा बोवा राजकारणात एंटरतो की काय! पण अजून तरी काही बातमी नाही.
15 Jun 2014 - 3:07 am | प्रभाकर पेठकर
एखाद्या चित्रपटात कुठले कलाकार घ्यावेत ह्या बाबत अर्थदात्याच्या (Financier) अटीही कांही प्रमाणात प्रभाव पाडत असाव्यात.
15 Jun 2014 - 10:02 pm | स्वप्नाचीदुनिया
लोक काय अपेक्षा ठेउन अशा नाटक्/सिनेमाला येतात त्यावर त्याचे व्यावसाईक यश ठरते.. म्हणुन तर गल्लाभरु चित्रपट ही सन्कल्पना आलीय.. आणी लोकांनी डोकी घरी ठेउन यायचे असा अलिखित नियम आहेच कि सिनेमाला लागु...
17 Jun 2014 - 4:24 pm | तिता
काही महिन्यांपूर्वी हे नाट्य दुबईत बघितले. दुर्दैवाने पुढील रांगेत होतो. नाटक बघवत नव्हते. इतके सगळे म्हातारे कॉलेजमधील समजणे फारच अवघड होते. अतीव निराशा.
17 Jun 2014 - 8:51 pm | श्रीगुरुजी
+१
17 Jun 2014 - 8:58 pm | श्रीगुरुजी
३ दिवसांपूर्वी 'यू टर्न' हे नाटक बघितले. डॉ. गिरीष ओक त्यांच्या सध्याच्या वयोमानानुसार ६०-६२ वयाचे वाटतात. हेच डॉ. गिरीष ओक या आठवड्यात 'तुझे आहे तुजपाशी' मध्ये २८-३० वय असणार्या डॉ. सतीश ची भूमिका करणार आहेत याचा खेद वाटतो. त्यांचा अभिनय व सादरीकरण कितीही उत्तम असले तरी ही भूमिका त्यांच्या वयाला अजिबात शोभत नाही.
२-३ वर्षांपूर्वी 'सुंदर मी होणार' या नाटकाची चित्रफीत पाहिली होती. त्यात सुद्धा दीदीचे काम (भूमिकेचे वय २८-३०) वंदना गुप्ते यांनी, बेबीचे काम (भूमिकेचे वय २० च्या आसपास) कविता लाड-मेढेकर यांनी व कवी संजयचे काम (भूमिकेचे वय ३० च्या आसपास) डॉ. गिरीष ओक यांनी केले होते. ही कामे सुद्धा फारशी शोभणारी नव्हती.
19 Jun 2014 - 10:37 am | बबन ताम्बे
मला वाटते मराठी रसिक अभिनयाचे चाहते आहेत. अभिनेत्याच्या वयाकडे ते दुर्लक्ष करतात.उत्क्रूष्ट उदाहरण म्हणजे "तो मी नव्हेच" हे नाटक. श्री. प्रभाकर पणशीकर उतार वयापर्यंत यात मुख्य भूमिका करत होते. त्यानंतर डॉ. गिरीश ओकांनी लखोबा लोखंडे सादर केला. प्रयोग हाऊसफुल जात असत. दिवाकर दातार मुलगी बघायला येतो तेंव्हा दोघेही लग्नाचा मुलगा वाटत नाहीत. पण प्रेक्षकांनी ते चालवून घेतले.