===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
...असो आता पुढच्या भागापासून आपण बाहेर पडून भटकायला सुरुवात करूया.
दम्माम (ad-Dammām; الدمام) ही सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या पूर्व प्रांताची (अश् शर्किया उर्फ इस्टर्न प्रॉव्हिन्स)राजधानी आहे. ६७२,५२२ चौ किमी क्षेत्रफळाचा हा प्रांत खनिज तेलाच्या बाबतीत केवळ सौदी अरेबियातला अथवा अरबी आखातातलाच नव्हे तर जगातला सर्वात जास्त समृद्ध प्रदेश आहे. सौदी अरेबियाचे बहुतेक सर्व खनिज तेल या प्रांतातच आहे.
दम्मामचे नाव कसे पडले याबाबत दुमत आहे. काहींच्या मते मच्छीमारी करून परतणार्या होड्यांची सूचना देण्यासाठी वाजविल्या जाणार्या ढोलाच्या आवाजावरून (अरबीमध्ये त्या आवाजाला "दमदमा" असे म्हणतात) हे नाव पडले आहे. तर इतरांच्या मते या जागेशेजारी आखातात असणार्या पाण्याच्या भोवर्यामुळे (अरबीमध्ये "दव्वामा")हे नाव पडले आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एक छोटीशी मासेमारी वस्ती असलेली ही जागा खनिज तेलाच्या शोधामुळे प्रचंड वेगाने एक मोठे विकसित नागरी केंद्र बनले आहे. या शहरात १५ मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळा, २४ विद्यापीठे / विद्यालये आहेत, ३० च्या वर रुग्णालये आहेत.
बृहद् दम्माम (ग्रेटर दम्माम / दम्माम मेट्रोपोलिटन एरिया) मध्ये दम्माम, अल खोबार आणि दाहरान या मुख्य तीन शहरांबरोबर आजूबाजूची काही लहान शहरे आणि गावेही समाविष्ट आहेत. बृहद् दम्मामची लोकसंख्या ४० ते ५० लाख आहे. तेलाच्या अर्थकारणामुळे हे शहर दरवर्षी १२% च्या वेगाने वाढत आहे. हा वाढीचा वेग सर्व अरबी जगतातील सर्वात मोठा वेग आहे.
किंग फाहाद कॉजवे हा जगप्रसिद्ध आखाती पूल सौदी अरेबियातील ग्रेटर दम्मामला बहरेन या देशाशी जोडतो. चार लेनचा हा पूल २५ किमी लांब आणि २३ मीटर रुंद आहे. उत्तम जलदगती रस्ता आणि विमान वाहतुकीबरोबरच दम्माम देशाच्या राजधानी रियाधशी रेल्वेनेही जोडलेले आहे. दम्मामचे किंग अब्दुल अझिझ बंदर अरबी आखातातले सर्वात मोठे आणि अरब जगतातले दोन क्रमांकाचे बंदर आहे (सौदी अरेबियाच्या पूर्व किनार्यावरच्या जेद्दा बंदराचा मध्यपूर्वेत आणि उत्तर आफ्रिकेत पहिला क्रमांक आहे).
खोबर हे शहर तुलनेने नवीन वस्ती आहे. तेथे अनेक उंच इमारती आहेत आणि नीटनेटके एकमेकाला काटकोनात छेदणारे रस्ते आहेत. दाहरान हे मुख्यतः "सौदी अराम्को" या सौदी तेल व्यवसाय सांभाळणार्या एकमेव सरकारी तेल कंपनीचे मुख्यालय आहे आणि ते जवळ जवळ सर्व शहर त्या कंपनीच्या आवाराने व्यापलेले आहे. सौदी अराम्को ही उलाढालीच्या प्रमाणात जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. या विभागातला एकमेव विमानतळ दाहरानला तेल कंपनीच्या सोयीसाठी बांधला गेला होता. आता तो सर्वसामान्य वाहतुकीसाठी वापरात नाही.
दम्माम शहर आडवे पसरलेले आहे आणि तेथे मुख्यतः कमी उंचीच्या इमारती आहेत. मुख्य बाजारपेठ सोडली तर दम्मामचे बरेच विभाग खाजगी घरांच्या वस्त्या आहेत. त्यातली काही तर राजवाडे म्हणता येतील इतकी मोठी आहेत.
तर चला पडूया आवाराबाहेर आणि मारूया फेरफटका दम्माम परिसरात...
.
दम्माम शहर
.
.
.
.
.
बोटीच्या आकाराची इमारत असलेला एक मॉल
.
दम्मामचे रात्रीचे एक विहंगम दृश्य
.
किंग फाहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
.
दम्मामचा किंग फाहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रफळाच्या मानाने (७८० चौ किमी) जगातला सर्वात मोठा विमानतळ आहे. हे क्षेत्रफळ शेजारच्या बहरेन या देशाच्या एकूण क्षेत्रफळाइतके आहे ! इथल्या तीन मजली कार पार्कमधे जवळ जवळ ५,००० चारचाकी उभ्या राहू शकतात ! विमानतळ शहराबाहेर २५ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे सहा लेनच्या रस्त्याने जाताना सौदी वाळवंटाचे दर्शन होते...
.
विमानतळापासून साधारण आठ-दहा किलोमीटर वरूनच सर्व विमानतळावर लक्ष ठेवणारा ८५.५ मीटर (तीस मजली इमारतीएवढा) उंच नियंत्रण मनोरा दिसू लागतो. या मनोर्यावरच्या कार्यालयांचे एकूण क्षेत्रफळ ७,९६० चौ मीटर (८५,६८१ चौ फूट) आहे. विमानतळापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर पोचलो की त्याची वैशिष्ट्यपूर्ण इमारत नजरेच्या टप्प्यात येते. लांबून नीट अंदाज येत नाही पण जवळ आल्यावर तिची भव्यता जाणवू लागते...
.
.
विमानतळाचा दर्शनी भाग (जालावरून साभार)
.
विमानतळाच्या मुख्य इमारतीतले विशाल कारंजे (जालावरून साभार)
.
चेक-इनची गर्दी ओलांडून आत शिरलो की मग विमानतळाचा प्रत्येक विभाग प्रशस्त आहे. सुरुवातीच्या भागांत थोड्या कालापूर्वीच सुरू झालेल्या ड्यूटी-फ्री दुकानांची आणि छोट्या रेस्तराँची गर्दी लागते...
.
.
.
तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो ! विमानांत नेणार्या व्दारांकडे नेणारे मार्ग...
.
फुटबॉल खेळता येईल इतके मोठे पण मोजकीच गिर्हाईके असलेले पहिल्या मजल्यावरचे रेस्तराँ...
.
पारंपरिक अरबी रेस्तराँ
.
पाश्चात्त्य पद्धतींची हॉटेल्स आणि रेस्तराँ तर जगभर पहायला मिळतात. पण सौदी सांस्कृतिक मंत्रालयाने गौरवलेल्या एका खास पारंपरिक रेस्तराँची भेट विशेष होती. चला त्याची ओळख करून घेऊया. (अंधुक प्रकाशामुळे रेस्तराँच्या प्रकाशचित्रांची पातळी निकृष्ट आहे. क्षमस्व.)
रेस्तराँचा दर्शनी भाग
सर्वप्रथम दर्शनी भागातल्या एका खास विभागात जमिनीवरच्या पारंपरिक बैठकीवर बसून पारंपरिक पद्धतीने बनवलेली सौदी काहवा (अरबी कॉफी) देण्यात आली...
.
.
रेस्तराँच्या मुख्य बैठकीच्या भागांपैकी काही...
.
.
रेस्तराँमधली एक पारंपारिक पद्धतिने सजवलेल्या खिडकीची प्रतिकृती
सौदी परंपरेप्रमाणे जमिनीवरच्या बैठकीवर बसवून खास सौदी जेवण घेताना उत्तर अमेरिकेतून आलेल्या नामवंत पाहुण्यांची बर्यापैकी गडबड उडाली होती !
पुढच्या भागापासून आपण दम्माम शहरातून बाहेर पडून आजूबाजूला हिंडणार आहोत.
क्रमशः
===================================================================
सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९...
===================================================================
प्रतिक्रिया
16 May 2014 - 1:32 am | संग्राम
इएंच्या पोतडीतून आणखी एक सुंदर लेखमाला !!!
16 May 2014 - 1:59 am | मुक्त विहारि
ये तो हमनें देखाइच नहीं, क्यों की मरेकू मालूमच नहीं था.सिर्फ वो मॉल में गया और ए.सी. में घूम के आया.
फिर एक बार जाना पडेंगा.
एक्का साहेब,
आता परत कधी येत आहात?त्या इदच्या सुट्ट्या सुरु व्हायच्या आत आलांत तर बरे.सध्या आम्ही इथे ३ मिपाकर आहोतच आणि जुबेलला पण एक मिपाकर आहेच.आम्हा ४ जणांना दम्माम्,खोबार फिरवून आणाच.काय गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू.
(अवांतर,
तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.)
16 May 2014 - 2:37 am | रेवती
दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.
तिथेही त्यांना शांतता मिळाली नसती. एक्कासाहेब आपल्याला मक्का ते काशीदर्शनही घडवतीलच. त्यांना पाहून मालकांना "जाये तो जाये कहाँ" असे वाटेल.
16 May 2014 - 4:15 pm | मुक्त विहारि
आणि मदिनाचे देखील...
बाकी वाक्याच्या भावार्थाशी सहमत...
(अवांतर... शब्दाचा कीस काढण्यापेक्षा, भावार्थ घेणे उत्तम)
17 May 2014 - 11:00 am | डॉ सुहास म्हात्रे
:)
20 May 2014 - 7:34 pm | बारक्या_पहीलवान
सुन्दर लेखमाला, मी जुबेलला असतो. गाडी-घोडा-तेल-पाणी लागेल ते आम्ही बघू पन दवा दारु सोडुन बोला. सौदी विशयी गैर्समज दुर करा या लेखातुन.
22 May 2014 - 8:05 am | नरेंद्र गोळे
तुम्ही डॉ. पेशा सोडून पर्यटन व्यवसायात शिरला नाहीत, ते बरेच आहे.त्या बाकीच्या यात्रा कंपन्या कधीच बंद पडल्या असत्या आणि दुकानाला टाळे लावून त्यांचे मालक तीर्थयात्रेला गेले असते.>>>>> नक्कीच.
मी तर एक्का साहेबांनी ह्या योजनेचा गांभीर्याने विचार करावा असे सुचवेन.
माझ्या तरी पाहण्यात, एवढ्या बारकाईने आणि नेमकेपणाने कुणी विश्वदर्शन करवून दिल्याची उदाहरणे नाहीत!
16 May 2014 - 2:35 am | रेवती
फोटू बघतिये. पारंपारिक पद्धतीने बैठक मारून स्वयंपाक करवणारी उपहारगृहे आपल्याकडेही हवीत. तो प्रकार मला सोयिस्कर वाटला. विमानतळ अतिभव्य आहे. सफर नेहमीप्रमाणेच चांगली चालूए.
16 May 2014 - 7:00 am | यशोधरा
पारंपारिक उपहारगृह आवडले. असं मस्तपैकी बसून आरामात खायला प्यायला, गप्पा, गाणी, जवळची नातेवाईक मंडळी आणि मित्रमंडळ हवं! और क्या मंगताय! :)
काश्मिरी काहव्याची (चहा) आठवण झाली..
ती खिडकी काय देखणी आहे!
16 May 2014 - 4:04 pm | प्रचेतस
मस्त झालाय हा भाग. देखणं आहे विमानतळ. शहराच्या अगदी लगेचच बाहेर रूक्ष वाळवंट दिसतेय.
दम्माम हे वाळवंटातले मरूस्थळ आहे का तिकडची झाडी/ हिरवळ ही कृत्रिमरित्या तयार केली गेलीय?
17 May 2014 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे
दम्माम शहर वाळवंटातच वसले आहे. पण शहरात झाडेझुडुपे बरीच लावली आहेत. रस्त्यांचे दुभाजक आणि काही ठिकाणी रस्त्यांच्या कडांना हिरवळींनी बनविले आहे.
सौदीत मोठी मरुस्थळेही आहेत. त्यापैकी काहींना आपण भेट देणार आहोतच.
17 May 2014 - 1:23 pm | प्रचेतस
धन्यवाद.
16 May 2014 - 4:18 pm | प्यारे१
मस्तच!
बाकी सौदी आवडत नाही.(शक्यतो) जाणार नाही कधीच्च! ;)
17 May 2014 - 11:03 am | डॉ सुहास म्हात्रे
कधीच्च! च्च! च्च! ?
तुमचे घोडे आवरा (म्हंजे होल्ड युवर हॉर्सेस, हो ;) ). संपूर्ण लेखमालेचा आखोदेखा हाल पहा आणि मग मत काय ते बनवा. काय म्हंताव ?
16 May 2014 - 4:32 pm | तुमचा अभिषेक
तेथून पुढे निघाल्यावर मात्र इमारतीच्या भव्यपणामुळे विमानतळ ओकाबोका वाटू लागतो !
प्रतिसादात हेच लिहिणार होतो, बरेचसे फोटो पाहून असेच वाटले. लोकसंख्येची घनता कमीच जाणवली. स्त्रिया देखील बुरखेधारी..
रेस्टॉरंट मात्र छान, हटके, संस्कृती दाखवणारे ..
28 May 2014 - 11:25 am | विजुभाऊ
अभिशेख. तुम्हाला कोणत्या फोटोत बुरखेधारी स्त्रीया दिसल्या ?
16 May 2014 - 4:44 pm | सूड
पुभाप्र
17 May 2014 - 10:54 am | डॉ सुहास म्हात्रे
संग्राम, मुक्त विहारि, रेवती, यशोधरा, वल्ली, प्रशांत आवले, तुमचा अभिषेक आणि सूड : सहलितल्या सहभागासाठी धन्यवाद !
17 May 2014 - 11:27 am | भाते
इथे जमिनीवर बैठक मारून अरबी कॉफीचा आस्वाद घेत मिपाकरांबरोबर एक कट्टा करायला हरकत नाही. :)
17 May 2014 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे
जरूर ! मी येणार !!
17 May 2014 - 11:30 am | अत्रुप्त आत्मा
17 May 2014 - 11:45 am | डॉ सुहास म्हात्रे
17 May 2014 - 1:55 pm | आत्मशून्य
20 May 2014 - 1:04 pm | दिपक.कुवेत
आवडला.
20 May 2014 - 1:46 pm | कुसुमावती
खास अरेबिक उपहारगृह आवडलं. *ok*
पुभाप्र.
20 May 2014 - 2:00 pm | मदनबाण
वल्ला ! क्या क्या एक एक चीज दिखती ! बहोत खुबसुरत लगती... :)
इतना पैसा मिलती फिर भी उसका बराबर इस्तमाल करती...इसको बोलती समझदारी ! :)
{मदन-वल-प्रेमी-वल-आषिक-बिन-बाण } ;)
20 May 2014 - 2:23 pm | सौंदाळा
झक्कास
20 May 2014 - 2:25 pm | बिपिन कार्यकर्ते
इस्पिकचा एक्का यांना एक विनंती :
दम्माम-खोबार हायवे जिथे खोबारमधे उतरतो, तिथे एअरलाइन सेन्टर नावाची उंच इआरत आहे त्या चौकातून थोडे खोबारच्या दिशेने गेल्यास, अल मक्तबा नावाचे एक मोठे दुकान आहे. त्या इमारतीचा फोटू देता येईल का? मी तिथेच रहायचो. आमच्या वेळी क्यामेरे फारसे कोणी बाळगत नसे व अशी उघडपणे फोटोग्राफी करायची पद्धतही नव्हती.
20 May 2014 - 4:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आठ वर्षांपूवी तेथे पोचलो तेव्हा इकडे फोटो काढू नको, तिकडे फोटो काढू नको असे म्हणून तेथल्या स्थिरस्थावर झालेल्या मंडळींनी भर गावांत फोटो काढू दिले नाही. जेव्हा मी स्थिरस्थावर झालो तोपर्यंत "शहरासारखे शहर. काय फोटो काढायचे" म्हणून मी काढले नाहीत. आता लेख लिहिताना ती उणीव जाणवतेय... विषेशतः कॉर्निश, काही इमारती आणि पुलांचे फोटो संग्रही असते तर बरे झाले असते असे वाटते. तेव्हा क्षमस्व :(
20 May 2014 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते
:(
20 May 2014 - 4:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
आत्मशून्य, दिपक.कुवेत, कुसुमावती, मदनबाण आणि सौंदाळा : अनेक धन्यवाद ! सहलीत असाच सहभाग असू द्या.
20 May 2014 - 6:10 pm | अनन्न्या
सुंदर फोटो!
23 May 2014 - 9:41 pm | पैसा
वाळवंटातलं सौंदर्य!
26 May 2014 - 2:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनन्न्या आणि पैसा : धन्यवाद !