वादविवादाच्या आसमंतातील पोकळी

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
23 May 2014 - 3:58 pm
गाभा: 

मिपावर मागचे ७-८ महिने फार मस्त गेले. नमो>नी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर केली, आणि त्यांची मोहीम चालू झाली, त्यावर आणि एकंदर गुजरात मॉडेल, वगैरे गोष्टींवर साधक-बाधक चर्चा इथेच झाली. मोदींवर अनेक शतकी, द्विशतकी धागे निघाले, घमासान वादळे झाली. वादविवादाची आवड असलेल्या मराठी माणसाला अगदी मन भरेपर्यंत काथ्याकूट झाले.

त्यातच मफलार्धारी>चा जन्म झाला आणि वातावरण पुन्हा ढवळून निघाले, त्यांचे लोकप्रियतेचे दावे, ते बोलणे, ते खोकणे सारेच काही नवे. पुन्हा एकदा मिपामध्ये जान आली, पुन्हा एकदा धागे द्विशतक गाठू लागले, त्यातच निवडणूका जवळ आल्या आणि मग तर मिपावर एकदम तडाखेबंद फलंदाजी सुरू झाली. कधी गोलंदाजांनी विकेट घेतली, कधी षट्कार चोउकार झाले, तर कधी हिटविकेट. अगदी बॉडीलाईन ओलंदाजीपर्यंत सगळा थरार अनुभवायला मिळाला.

पण निकाल लागला आणि सगळे चित्रच बदलले. विश्वचषकाच्या फिनालेमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकड्यांना एकतर्फी हरवावे आणि त्या सामन्यातला आपला आनंद हिरावून घ्यावा असे काहीतरी झाले. उदा. मी माझ्या आत्याकडे त्या दिवशी सकाळी सहजच गेलो होतो. साधारण १० च्या आस्पास त्यांनी टी. व्ही बंद केला. मी आपलं विचारले, काय हो काय झाले? तर म्हणे मजा येत नाहीये. आता बोला.

तर, सध्या माझ्यापुढचा प्रश्न आहे तो, आता पुढे काय? मोदींना एकहाती बहुमत मिळाल्यामुळे वादविवादप्रिय मराठी माणसासमोर अचानक एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निवडणूका, त्यानंतरचा घोडेबाजार वगैरे करमणूकीची साधने मोदींनी हिरावून घेतल्यामुळे मी तर मनातल्या मनात मोदींविरुद्ध एक ठराव पण पास करून टाकला आहे.
माझी मिपाकरांना विनंती आहे की मिपाकरांनी मला आता वादासाठी नवीन विषय सुचवावेत.

प्रतिक्रिया

एस's picture

23 May 2014 - 4:07 pm | एस

*crazy*

कवितानागेश's picture

23 May 2014 - 4:16 pm | कवितानागेश

तुम्ही त्या वेगळ्या पुरुष विभागाची मागणी करा की. लई मजा येते! :P

तो ऑलरेडी आहेच अस्तित्वात. डी ज्यूर नसला तरी डी फॅक्टो आहे. उगा डी ज्यूर करण्याची आम्हांस गरज वाटत नै.

भाते's picture

23 May 2014 - 8:06 pm | भाते

मिपावर काकूसाठी बरेच विषय आहेत. काल्पनिक (?) विषयांवर सुध्दा काकू करण्यास मिपाकर समर्थ आहेत. मिपाकरांचा पिंडच आहे तो! :)
लोकसभा निवडणुका आटोपल्या असतिल तरीही अजुन महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका बाकी आहेत.
नुकतेच वाचलेले राजकारणातले काही विनोद


तेव्हा, काढा धागे आणि होऊ द्या चर्चा.

प्रकाश घाटपांडे's picture

23 May 2014 - 8:22 pm | प्रकाश घाटपांडे

>>माझी मिपाकरांना विनंती आहे की मिपाकरांनी मला आता वादासाठी नवीन विषय सुचवावेत.<<
मिपाच उत्खनन करा लई विशय सापडतील. आता ते नवीन नसतील पण शतकानुशतके चालणारे असतात. उदा. श्रद्धा अंधश्रध्दा अस्तिक नास्तिक परामानसशास्त्र

पैसा's picture

23 May 2014 - 9:33 pm | पैसा

अध्यात्माचा विषय का काढला म्हणून डोकं आपटून पळून जायची वेळ आलीच पायजे!

*lol* काढावी तर का काढावी काढू नये तर का काढू नये?

मित्रहो

विकास's picture

24 May 2014 - 3:08 am | विकास

विषय महत्वाचा आहे... फक्त किंचित वेगळ्या पद्धतीने सुचवतो: "नरेन्द्र मोदींनी दाढी ठेवण्यामागे काय हेतू असावा?" *unknw*

म्हणजे समर्थक आणि विरोधक दोघेही मुद्दे मांडू शकतील...

मित्रहो's picture

24 May 2014 - 10:10 am | मित्रहो

*lol*

कारणे
- हा व्यक्तीमत्वाचा प्रश्न राहू शकतो. तेंव्हा दाढीने व्यक्तीमत्वाचा विकास कसा होतो हा पण एक विषय आलाच.
- हा कदाचित श्रद्धेचा भाग असेल.
- कारण कदाचित एकॉनॉमिक पण असेल.
- किंवा हा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही कोण उपटसुंभ असले प्रश्न विचारनारे.
- कदाचित हेलिकॉप्टर मधे आरसा नसेल किंवा सुरक्षेच्या कारणाने त्यात दाढीचे ब्लेड न्यायला परवानगी नसेल. केवळ तीन महिन्यात भारत भ्रमण करनाऱ्या या माणसाकडे वेळ कुठे असनार आहे हो. हॅटस ऑफ टू हीम.
- किंवा तरुणांना दाढी ठेवा असा संदेश असेल. अमित शहानी त्या पावलावर पाउल ठेवलेच. विचार करा थोड्याच दिवसात आपले गडकरी किंवा मुंडे पण रुप पालटतील.

-मित्रहो

विकास's picture

24 May 2014 - 3:15 am | विकास

युक्रेनमधे निवडणुका चालू आहेत. त्यावर चर्चा करूयात का? खालील उमेदवार राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे आहेत. उद्यापर्यंत यातील कुठला उमेदवार चांगला आणि का योग्य आहे यावर किमान १००० शब्दात येथे प्रतिसाद द्यावात....

Olha Bogomolets (independent)[37] (supported by the Socialist Party of Ukraine)[69]
Yuriy Boyko (self-nominated)[37]
Mykhailo Dobkin (Party of Regions)[37]
Andriy Hrynenko (independent)[37]
Anatoliy Hrytsenko (Civil Position)[70]
Valeriy Konovalyuk (independent)[37]
Vasyl Kuybida (People's Movement of Ukraine)[37]
Renat Kuzmin (independent)[37]
Oleh Lyashko (Radical Party)[37]
Mykola Malomuzh (independent)[37]
Petro Poroshenko (independent)[37] (supported by UDAR)
Vadim Rabinovich (independent)[37]
Volodymyr Saranov (independent)[37]
Serhiy Tihipko (self-nominated)[37]
Oleh Tyahnybok (Svoboda)[37]
Yulia Tymoshenko (Batkivshchyna)[37]
Dmytro Yarosh (Right Sector, self-nominated)[37]

विकास's picture

24 May 2014 - 5:49 am | विकास

तुम्हाला सध्याचे लोकसत्ताचे अग्रलेख आवडत असोत अथवा नसोत. पण आजचा एका अर्थी या चर्चेसंदर्भातील अग्रलेख हा सर्वांनी वाचावाच असा आहे.

जल्पकांचा उच्छाद

आनन्दा's picture

24 May 2014 - 4:40 pm | आनन्दा

हो.. छानच आहे.