हाडंबिंड-दातबीत अनुभव

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
10 Oct 2008 - 4:34 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "हाडंबिंड-दातबीत तुटणे/मोडणे " अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?

मी स्वत: एक व्यावसायिक "डेंडल अँड बोन इंशुरेंस एजंट"(दंत व अस्थी विमा एजंट) असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....

तुम्हाला कधी अशा हाडं तोडणार्‍या आणि दात पाडणार्‍या शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? At Wits End

अशा धांसू शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

इथे चर्चा अपेक्षित आहे....

जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही दंतकथा किंवा अस्थीकथा( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "दात तोडणार दंतवैद्य" व "हाडे मोडणारा अस्थीवैद्य" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा... आणि माझा भाउ पण मला या कार्यात मदत करतो .. जे विमे काढत नाहीत त्यांचा मी व माझा भाउ गनिमी काव्याने व्यवस्थित "पत्ते बिछाके" मग "गेम करतो"

आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन...

कुबड्या खवीस
अस्थी-दंत विमा एजंट (एक्स इगल विंग कमांडर)
सुरध्वनी क्रमांक : +०० ०००० ०० ००००(एक्टेंशन : ०००)
आमच्या शाखा : युगांडा(हेड हापिस्),केन्या, टांझानिया,मॉरिशस्,इथोपिया,घाणा,नायजेरिया, बुरुंडी,रवांडा,
लवकरच भारतात येणार आहोत , पहिले १००० विमे फ्री फ्री फ्री ...
आजच या नाव नमुद करा , आयुष्यभर दात-हाडांची काळजी विसरा ...

कोणत्याही कागद पत्रांची अवश्यक्यता नाहीए .. आमच्या कडून इंश्युरंस काढला की कोणीही तुमची हाड आणि दाताला हात लावणार नाही .. मी आज पर्यंत बर्‍याच लोकांचे विमे काढले, त्यांची सुरक्षित हाडं आणि पांढरे-पिवळे दात पहाताना मला एक समाधान भेटतं .. आज ते माझ्यामुळेच स्वत:च्या पायावर स्वतःच्या हाताने टमरेल घेउन नदी पर्यंत तुळस लावायला जाउ शकतात ... आणि माझ्याच मुळे ते दिलखुलास पणे क्लोज-अप स्माइल देउन ज्यांवर त्यांचा राग आहे त्यांच्या नाकातले केस आपल्या तोंडातला वासाने जाळू शकतात ...
आज मी इतकी लोकं सुखी केलीत याचा मला अभिमान वाटतो ...

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

10 Oct 2008 - 4:44 pm | प्रकाश घाटपांडे


जे विमे काढत नाहीत त्यांचा मी व माझा भाउ गनिमी काव्याने व्यवस्थित "पत्ते बिछाके" मग "गेम करतो"


;)
प्रकाश घाटपांडे

येडा खवीस's picture

10 Oct 2008 - 4:44 pm | येडा खवीस

माझ्याच फोरमची उडविलेली खिल्ली अप्रतिम्...मला खुप आवडली....कीप इट अप

धन्यवाद!!!

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

विजुभाऊ's picture

10 Oct 2008 - 4:48 pm | विजुभाऊ

मला वाटले की मिपा वर कौल घेतात तसे बीड सुद्धा घ्यायला लागले
आणि हाडे मोडण्याचे बीड म्हंजे लैच भारी.
अरे हो आज मे एका ६फूट ६ इंच उंचीच्या भिताडाला भेटलो.
ते आमचा सायेब होता त्यात तो उभा राहुन आणि मी बसुन बोलत होतो.
मला पार वर बघुन बोलावे लागत होते आणि तो आकाशवाणीने येशु च्या जन्माची कथा सांगणार्‍या देवदूतासरखा बोलत होता.

विसोबा खेचर's picture

10 Oct 2008 - 4:51 pm | विसोबा खेचर

हम्म!

चालू द्या...:)

चर्चाविषय चांगला आहे फक्त मस्करीची कुस्करी होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्या, एवढीच विनंती...:)

तात्या.

टारझन's picture

10 Oct 2008 - 4:54 pm | टारझन

लेखणाचं उद्दिष्ट्य केवळ मनोरंजन आहे.. सगळ्यांनी मजा घ्यावी .... श्रीमान येडा खविस यांनी "हलकेच घेतल्याने" मी त्यांचा फार ऋणी आहे.
कवितांच विडंबन होतं ... मला कविता येत नाहीत .... म्हणून मी धड्यांच विडंबण केलं ...

कळावे
लोभ असावा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2008 - 4:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... आणि माझ्याच मुळे ते दिलखुलास पणे क्लोज-अप स्माइल देउन ज्यांवर त्यांचा राग आहे त्यांच्या नाकातले केस आपल्या तोंडातला वासाने जाळू शकतात ...
=))
टारू, आज तू माझा नातू आहेस ते सिद्ध करतो आहेस (हे उगाच)! ;-)

अदिती

अवलिया's picture

10 Oct 2008 - 4:53 pm | अवलिया

=))

लगे रहो टारझन भाय...

(स्वगत - का कोण जाणे पण माझा न्युनगंड वाढत चालला आहे. त्यावर काही इलाज शोधावाच लागेल लवकरच)

नाना

अनिल हटेला's picture

10 Oct 2008 - 4:55 pm | अनिल हटेला

>>युगांडा(हेड हापिस्),केन्या, टांझानिया,मॉरिशस्,इथोपिया,घाणा,नायजेरिया, बुरुंडी,रवांडा,
लवकरच भारतात येणार आहोत , पहिले १००० विमे फ्री फ्री फ्री ...

टा-या लेका एकदम ढींकच्याक ढींग ,काय !!!

(१०००लोकामधी माझ नाव नाय ना रे बाबा ?)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ऋचा's picture

10 Oct 2008 - 5:01 pm | ऋचा

काय भारी लिवलस रे...
खर नाय वाटात तु लिवलस त्ये...... :D

मी आज पर्यंत बर्‍याच लोकांचे विमे काढले, त्यांची सुरक्षित हाडं आणि पांढरे-पिवळे दात पहाताना मला एक समाधान भेटतं .. आज ते माझ्यामुळेच स्वत:च्या पायावर स्वतःच्या हाताने टमरेल घेउन नदी पर्यंत तुळस लावायला जाउ शकतात

बेक्कार!!! =))

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

खर नाय वाटात तु लिवलस त्ये.....

वा वा .. स्तुती कम टोमणा :) .... आज मी मानले तु पक्की पक्की पुणेकर ...
हे घे सर्टिफिकेट ...
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

ऋचा's picture

13 Oct 2008 - 6:19 pm | ऋचा

म्या आणि पुणेकर :?
मी पुण्यात युन तीनच वर्स झाली ...
इतक्यात कसा बॉ गुण लागला??? @)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

10 Oct 2008 - 5:03 pm | विजुभाऊ

धड्याम्च्या विडम्बनाला "गधडा" असे म्हणु शकता

चतुरंग's picture

11 Oct 2008 - 10:01 am | चतुरंग

(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या विजूभौंमधे भावी विडंबकाचे सगळे सुप्त गुण दिसताहेत का रे?)

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

10 Oct 2008 - 5:08 pm | मेघना भुस्कुटे

बेक्कार!!!

=))
=))
=))

लय मजा आली... लगे रहो!

मनस्वी's picture

10 Oct 2008 - 5:12 pm | मनस्वी

लोकांचं राहू दे हो.. तुम्ही आधी तुमच्या अस्थि आणि ३२ दंत शाबूत असल्याचे पुरावे द्या (एक्स-रे सुद्धा चालतील. त्यावर कोणाकोणाचे ऍटेस्टेशन हवे आणि आणखी इतर कोणती कागदपत्रे हवीत ते श्री.डान्या सांगतीलच.)

एक ऑफर (ह्याचा पुराव्याशी संबंध नाही): आमच्या कुकींग क्लासेसमधली १००० गिर्‍हाईके कमिशनवर!!!

मनस्वी

टारझन's picture

10 Oct 2008 - 5:27 pm | टारझन

तुम्ही आधी तुमच्या अस्थि आणि ३२ दंत शाबूत असल्याचे पुरावे द्या
पुरावा आहेच ... असल्यास कोणत्याही निर्मुलन केंद्रात चाचणी द्यायची तयारी आहे ... ज्यांची इच्छा असेल त्यांना माझी हाडं आणि दात शाबुत असल्याचे पुरावे प्रत्यक्ष देऊ ... आणि विश्वास नसलेल्यांनी आमच्या खरड वहीतला फोटू पहावा !!

फळ-भाज्यांना ना हाडं असतात ना दात .. त्यामुळे ते आमच्या विमा अटींखाली येत नाहीत ...

आमच्या कुकींग क्लासेसमधली १००० गिर्‍हाईके कमिशनवर!!!
ऑफर मान्य आहे ..आम्ही विम्यांच आउटसोर्सिंग करतो , तुम्हाला आमची एजंसी देउ ,
तुम्ही आजपासून सबएजंट मनस्वी , अभिनंदन , आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Oct 2008 - 7:25 pm | llपुण्याचे पेशवेll

ज्यांची इच्छा असेल त्यांना माझी हाडं आणि दात शाबुत असल्याचे पुरावे प्रत्यक्ष देऊ ... आणि विश्वास नसलेल्यांनी आमच्या खरड वहीतला फोटू पहावा !!

फोटोतून चरबीचा अंदाज येतो हाडांचा नाही... 'हाडा'ची मजबूती कशी ओळखावी... बाकी हाडे नसलेल्या भागांचे (उदा. जीभ, कान,..... इ.)विमे तू काढत नाहीस का रे टार्‍या?

पुण्याचे पेशवे

टारझन's picture

13 Oct 2008 - 7:37 pm | टारझन

फोटोतून चरबीचा अंदाज येतो हाडांचा नाही...

फक्त चरबीचाच अंदाज येतो का ? तोंड कसं आहे, उंची किती आहे , कपडे कोणते , बॅकग्राउंडला काय आहे .. अशा गोष्टींचा पेशव्यांनी अंमळ दुर्लक्ष केलेलं दिसतंय
लेका ... ज्यांनी विमा काढला नाही ते "ख.व." सारखा फोटू काढूच शकत नाहीत .. अगदी स्टेनलेस स्टील फिटींग करून सुद्धा !!

'हाडा'ची मजबूती कशी ओळखावी...

ते बबुल वाल्यांना विचारा ... तो आमचा भाग नाही .. आम्ही मजबुत आणि फुसकी दोन्ही हाडं तोडू शकतो ...

बाकी हाडे नसलेल्या भागांचे (उदा. जीभ, कान,..... इ.)विमे तू काढत नाहीस का रे टार्‍या?

नाही ... आमची स्पेशॅलिटी केवळ दंत एवं अस्थी विभागात आहे ...

सल्ला : फोटूतुनही खात्री पटत नसल्यास आम्हाला प्रत्यक्ष भेटावे .. सगळ्या शंका दुर होतील.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2008 - 5:43 pm | बिपिन कार्यकर्ते

टार्‍या, जबरदस्त विडंबन.... बेक्कार.

=)) =))

तुझ्या आज्जीशी सहमत. उगाचंच.... बाकी घराण्याचे नाव काढलंस हो पोरा.

बिपिन.

मुक्तसुनीत's picture

10 Oct 2008 - 6:28 pm | मुक्तसुनीत

बाबौ !
मिष्टर टारझन ,
आम्ही इतकी विडंबने इथे वाचली आणि त्याना मनसोक्त दाद दिली. पण तुझ्या या पोस्टच्या बाबतीत "अमर अकबर अँथनी" मधल्या अमिताभच्या भाषेत सांगायचे तर ..." साला एक मारा , लेकिन सॉलीड मारा के नही ! " :))

आमच्यासारख्या तुझ्या सर्व आजीआजोबांना आज धन्य धन्य झाले असेल !! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2008 - 6:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आमच्यासारख्या तुझ्या सर्व आजीआजोबांना आज धन्य धन्य झाले असेल !!

अवो सुनीतभौ, आज माजा बाळ कुटे जरा बरं लिवायला लाग्ला तर तुमी तेला चोरुनच नेता, "माजा नातू, माजा नातू" म्हनून! त्यो फकस्त माजाच नातू हाये आन मी फकस्त त्येचीच आज्जी हाय! ;-)

अदिती आज्जी

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Oct 2008 - 6:42 pm | बिपिन कार्यकर्ते

अवो सुनीतभौ, आज माजा बाळ कुटे जरा बरं लिवायला लाग्ला तर तुमी तेला चोरुनच नेता, "माजा नातू, माजा नातू" म्हनून!

सुनितभौंचा जाहिर निषेध. सुनितभौ हाय हाय.

त्यो फकस्त माजाच नातू हाये

मान्य आहे.

मी फकस्त त्येचीच आज्जी हाय

एकदम झूट. तू जगआज्जी हाये. (काही लोक कसे जगमित्र असतात ना, तशी तू जगआजी). आज्जे, फेस द रिऍलिटी. ;)

बिपिन.

प्राजु's picture

10 Oct 2008 - 7:02 pm | प्राजु

तुझी विवेक बुद्धीला मानलं बाबा..
कोपरापासून दंडवत..
चालूदे. फक्त ही मस्करिच राहुदे ही अपेक्षा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भास्कर केन्डे's picture

10 Oct 2008 - 7:50 pm | भास्कर केन्डे

ह ह लो पो...

मस्त विडंबन. टारु भाऊ, येऊ द्या अजून. बरेच लेख आहेत ज्यावर असले भयान लेख सुचु शकतील तुमच्या भन्नाट डोक्यातून.

आपला,
(नतमस्तक) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मला दात-हाडंपार्टी खराब करायची नाही ; पण या बाबतीत बोललेच पाहिजे.

एकविसाव्या शतकात , इन्टरनेटवरील एका फोरम मधे आपण दात-हाडं तोडण्याचे एजंट अहोत तर आपले हे म्हणणे विनोदी वाटेल . तसे ते सर्वांच्या बुद्धीमत्तेचा अपमान करणारे आहेसुद्धा ; पण दुर्दैवाने ते सामाजिकदृष्ट्या दंगे वाढवणारे , नडलेल्यांचे पोषण करणारे , आणि एकंदर समाजाला अज्ञान आणि अनाठायी भीतीच्या दहशतीमधे लोटणारे आहे. या दृष्टीने , कुबड्या खवीस यांसारखे लोक हे अल्पशिक्षित , गरीब , नाडलेल्या माणसांच्या दातांतील किड्यांना खतपाणी घालणारे , त्यांच्यातील ठिसुळपणाचा फायदा घेणारे ठरतात.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तुम्हाला तुमचा व्यवसाय , त्यातील अनुभव वगैरे मांडण्याचा अधिकार आहेच. पण या व्यवसायाला एक गंभीर अशी नैतिक बाजू आहे हे इथे नमूद व्हायला हवे.

दात, हाडे वगैरे तुटाण्याबद्दलचे किस्से आणि चर्चा या गोष्टी रंजनाच्या आहेत. त्याबाबत कुतुहल वाटणे , त्याबद्दल काय वाटते ते सांगणे इ. इ. गोष्टी या सामान्य बाबी आहेत. पण "व्यावसायिक दंत-अस्थीमंजन" सारख्या गोष्टींबद्दल मी माझा तात्विक विरोध व्यक्त करतो. जो व्यवसाय तुम्ही उपजीविका म्हणून निवडला आहे तो हिंसेची , अनाठायी भितीची कास धरणारा , लोकांना फोडणारा आहे असे मला वाटते. दंतचिकित्सा मलन समितीच्या समोर तुम्ही आपल्या व्यवसायातील तथ्य सिद्ध करावे असा सल्ला देतो.

-(मुक्त) ऋषिकेश

संबंधितांसाठी एकच स्मायली: ;)

मुक्तसुनीत's picture

10 Oct 2008 - 11:06 pm | मुक्तसुनीत

(मुक्त) ऋषिकेश व तत्सम...

या जगात नैतिक-अनैतिक अशी बंधने असलेले व नसलेले अनेक व्यवसाय आहेत. नैतिकता हाच जर पोईंट असेल > तर आज तमा बीअर शोप्स, दारुचे गुत्ते आणि पब, जुगाराचे अड्डॅ बंद व्हायला हवे होते. विषय टारूच्या प्रोफेशनल दंतास्थिहिंसेचा आहे न तर तो व्यवसाय कुठेही कागदपत्रि नोंद केलेला व्यवसाय नाही तो फक्त केलेल्या कामाचे पैसे घेतो आणि ते सुध्दा समोरच्या व्यक्तिला ( त्याला अपेक्षित असलेला) अनुभव आला तरच्....बरोबर्....दंतचिकित्सा मलन वगैरे लोकांना त्यांची हाडे आणि दात तोडून सिध्द करायला टारूला वेळ नाही, आणि हौसही नाही ( त्यामुळे त्याला ढोंगी-पाखंडी म्हणले तरी त्याचा आपण सगळे निर्लज्जपणे स्विकार करूया. )

टारूने कोणता व्यवसाय करावा...त्यात काय करावे...किती नैतिक्-अनैतिकतेची बंधने पाळावी हे त्याला कोणाकडुनही शिक्ण्याची गरज नाही!!!

टारू वाटेल ते मी करणार्....वाट्टेल ते तोडणार....ज्याला जमेल त्याने वाचवावे, कवळ्या नि प्लास्टर बसवावे अन्यथा विषय सोडावा किंवा काय वाट्टेल ते करावे

बाय द वे!!! वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना हाडे नि दात तोडून घेण्याबाबत किती कुतुहल आहे ते लक्षात आले असेलच तुम्हाला....

टारझन's picture

10 Oct 2008 - 11:25 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =))

मेलो आता ... बाय द वे .. आता याला एक खवाट प्रतिक्रिया येउन माझ्याही विडंबणाचं कोणी तरी विडंबण लिहिणार ... अरे देवा असं किती दिवस चालणार .....

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

ऋषिकेश's picture

11 Oct 2008 - 9:04 am | ऋषिकेश

ठ्ठोऽऽऽऽ
=)) =))
मजा आली :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय's picture

11 Oct 2008 - 1:08 am | धनंजय

विडंबनावर उपविडंबनावर उप-उप-विडंबन!
डेरिव्हेटिव्हवर उप-डेरिव्हेटिव्हवर उप-उप-डेरिव्हेटिव्ह!
(विडंबन-डिफॉल्ट-स्वॉप चा बाजार सुरू करायला हरकत नाही.)

चतुरंग's picture

11 Oct 2008 - 9:57 am | चतुरंग

टारझनच्या साथीत एक कंपनी, धन्याशेठ? 'लेहमन ब्रदर्स' सारखीच 'टारमन ब्रदर्स'! ;)
नीट मार्केटिंग केलेत तर लोक हल्ली काहीही घेतात! :D

चतुरंग

प्रमोद देव's picture

11 Oct 2008 - 1:04 pm | प्रमोद देव

'टारमन ब्रदर्स' च्या ऐवजी टार्रंगा(टार+रंगा) ब्रदर्स.... असे करा.
टारुशेठ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)

टारझन's picture

11 Oct 2008 - 1:15 pm | टारझन

'टारमन ब्रदर्स' च्या ऐवजी टार्रंगा(टार+रंगा) ब्रदर्स.... असे करा.

स्वर बास'कर काका , आपने मेरे मुह की बात छिन ली !!!

टारुशेठ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बेक्कार .... =)) =)) =)) तुम्ही कौलाला शिमेंट पुरवठा करताय :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

अनिल हटेला's picture

11 Oct 2008 - 9:08 am | अनिल हटेला

आता लेखाचे विडंबन ,त्याच्या प्रतीसादाचे विडंबन आणी .

त्या सगळ्याच परत विडंबन ?????

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

झकासराव's picture

11 Oct 2008 - 9:44 am | झकासराव

:))

प्रतिसाद आणि लेख भारीच की.
विजुभाउ "गधडा" सहीच आहे. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

मृगनयनी's picture

13 Oct 2008 - 5:58 pm | मृगनयनी

मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "हाडंबिंड-दातबीत तुटणे/मोडणे " अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?

टार्‍या.......... माजा दात तूऊऊऊऊऊऊऊऊऊटला........
:-?
आपण तो पुरुन टाकुया.म्हणजे १ मोठ्ठा सोन्याचा दात उगवेल....
मी बायो-लोजी च्या लॅबमधुन अजुन काही दात चोरेन..... म्ग मागच्या अंगणात ते पुरेन..... म्हणजे खूप सारे सोन्याचे दात उगवतील.....आणि तुझ्या भारतातल्या आगमनाच्या वेळी मी ते तुला गिफ्ट देइन....(कोशी वातली माजी आयलिया???)
=)) =)) =))

:) :D :D :D :)

मी स्वत: एक व्यावसायिक "डेंडल अँड बोन इंशुरेंस एजंट"(दंत व अस्थी विमा एजंट) असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....

मी तुझा परत परत आदर करते......(((.आभार प्रदर्शन करण्यासाठी आता मलाच आफ्रिकेला यावे लागणार बहुधा!!!!!))))) :)

तुम्हाला कधी अशा हाडं तोडणार्‍या आणि दात पाडणार्‍या शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? At Wits End

नाय बॉ.... (आमच्चा नाड्डीवाल्ला ख्खूप्प च्चंगला आहे........त्तो अस्से त्रस अम्हाल्ला होऊ नाय्य देत्त......)

अशा धांसू शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

इथे "धांसू" या शब्दाचा अर्थ नक्की काय अभिप्रेत आहे? :-?
=))

भडकमकर मास्तर's picture

14 Oct 2008 - 12:38 am | भडकमकर मास्तर

विडंबन, आणि प्रतिसादाचे विडंबन , पुन्हा पुन्हा त्याचे विडंबन ...
अगायाअयाया.... :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

14 Oct 2008 - 9:40 am | पिवळा डांबिस

त्यातील "दात तोडणार दंतवैद्य" व "हाडे मोडणारा अस्थीवैद्य" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....

आमी गन बाळगतो...
(आभारः अमेरिकेची दुसरी घटनादुरुस्ती!!)
आम्ही पंचवीस फुटांवरूनच तुमचा एक मांसाचा (भलामोठा!!!) ढीग करू शकतो!!!
आता बोला पेहेलवान!!!!
:)

टारझन's picture

14 Oct 2008 - 10:31 am | टारझन

आमी गन बाळगतो...(आभारः अमेरिकेची दुसरी घटनादुरुस्ती!!)
अर्रे वा !!! बाळगने आणि चालवण्याचा गुडदा असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ... आणि कोणी सांगितलं आमच्या कडं गन नाय ?
आम्ही पंचवीस फुटांवरूनच तुमचा एक मांसाचा (भलामोठा!!!) ढीग करू शकतो!!!
आमच्या समोर माणसे २५ फुटावरुन बिना गन नेच ओली करतात असा अनुभव आहे .. मांसाचा भलामोठा गोळा होणे फारच लांब .. आम्ही गनिमी कावा जाणतो .. तुमच्याकडे गन राहिल पण दिवाळीतली , टिकल्यांवाली =))

आता बोला पेहेलवान!!!!
तुम्ही आम्हाला पेहेलवान समजुन त्यात गाफिल रहावं हेच आमचं यश

न आवाज करता "गेम करणारा"
-- टार्स बाँड
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

विजुभाऊ's picture

14 Oct 2008 - 11:38 am | विजुभाऊ

अर्धा तुटलेला दात नाडीने बान्धुन ओढल्यास तो पूर्ण बाहेर येतो.
( वापरताना नाडी स्थानीक बोली भाषेतलीच असावी)
(वरील कामासाठी पट्टी वापरल्यास त्या ओळीतले सर्व दात सरळ होतात.)

शेखर's picture

24 Feb 2010 - 1:00 am | शेखर

टार्‍याच्या ह्या धाग्यावर माझा प्रतिसाद कसा काय राहिला. :?
म्हणून हा प्रतिसाद. :)

शेखर