अभिनंदन!

राही's picture
राही in काथ्याकूट
16 May 2014 - 10:19 am
गाभा: 

भाजपला पूर्ण आणि स्वच्छ बहुमत मिळाल्याबद्दल अभिनंदन. देशाला बदल हवा होता, तो मिळाला.
आज देशभर उत्सव साजरा होतो आहे. देशभरातच नव्हे तर परदेशातही जिथे जिथे भारतीय आहेत तिथे रात्री जागून लोक दिवाळी साजरी करीत आहेत.
पुढील वाटचालीसाठी मोदींना आणि त्यांच्या नवीन सरकारला मनापासून शुभेच्छा.

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

16 May 2014 - 10:22 am | आत्मशून्य

पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटु लागले आहे :)

एकदा निष्चित झाले की मला सही बदलायची आहे !

आत्ता तर मोजणी चालु झाली आहे.

आनन्दिता's picture

16 May 2014 - 10:39 am | आनन्दिता

मनापासुन भारी वाटतंय.. जनतेला मुर्ख समजणार्या सरकारला जनता जागेवर आणेल हे माहीत होत, पण अगदी तोंडावर आपटेल याची कल्पना नव्हती.

मोदीं ची लाट नाही तर सुनामी होती... मोदींना त्यांच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! जनतेच्या अपेक्षा पुर्ण होवोत ही प्रार्थना..

रात्रीचा १ वाजलाय अन इथे टाईम स्क्वेअर ला जल्लोषाचं वातावरण आहे. *yahoo*

शुचि's picture

16 May 2014 - 6:19 pm | शुचि

मस्त मस्त मस्त!!!! आज सेलिब्रेट करणारच!!!

मधुरा देशपांडे's picture

16 May 2014 - 7:07 pm | मधुरा देशपांडे

अगदी अगदी. आज सकाळी उठल्यापासून लक्ष फक्त निकालाकडेच होतं. आता आज सगळी भारतीय मित्र मंडळी मिळून पार्टी करणार. *clapping*

श्रीरंग_जोशी's picture

16 May 2014 - 10:42 am | श्रीरंग_जोशी

नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
भाजप व सहकारी पक्षांचे अभिनंदन.

नव्या सरकारला शुभेच्छा!!

आजानुकर्ण's picture

16 May 2014 - 11:48 am | आजानुकर्ण

नमोजींचे हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता प्रगल्भ आहे. त्यांच्या विकासाच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजपा सरकारला शुभेच्छा.

हल्ली लोकसत्तातले कुमार केतकरांचे संपासकीय लेख खुप मीस होतात.

त्यांचा आजचा व उद्याचा अग्रलेख वाचायला मजा आली असती

ते दिव्य मराठीत गेलेत. तिथे वाचायला मिळतीलच ;)

आजचा दिव्य मराठीतला अग्रलेख खुपच संतुलीत आहे. टीपिक केतकरी ट्च हरवला आहे. थोडी निराशाच झाली.

विकास's picture

17 May 2014 - 8:32 am | विकास

तिथल्या संपादक महाशयांचा आयडी हॅक झाला आहे का?

जातीय आणि धार्मिकतेत अडकलेल्या समाजाला विकास, सुप्रशासन या मुद्द्यावर आवाहन करून निवडणूक जिंकणे, ही या देशात अशक्यप्राय मानली गेलेली गोष्ट नरेंद्र मोदी यांनी शक्य करून दाखविली आहे.

अग्रलेखात हे वाक्य वाचले आणि भाजपाला स्वबळावर सत्ता काबीज करता येईल ह्या गेल्या २४ तासातील बातमीने पण धक्का बसला नाही इतका धक्का बसला. *yes3*

एकुलता एक डॉन's picture

18 May 2014 - 9:42 pm | एकुलता एक डॉन

http://berkyanarad.blogspot.in/2014/01/blog-post_17.html कुमर केत्कर यानि रजिनम दिला आहे

ऋषिकेश's picture

16 May 2014 - 10:47 am | ऋषिकेश

शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरीकांचे अभिनंदन
भाजपा, एन्डीएच्या मतदारांचे व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन!

एन्डीएच्या मतदारांचे अभिनंदन

तुमचं अभिनंदन करायच का नाही?

मला दोन व्यक्तिं बद्धल आता विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
१) राहुल गांधी :- सध्या ही व्यक्ती कुठे आहे आणि कॉग्रेसच्या कामगिरी बद्धल त्यांचे मत.
२) केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा.

जाता जाता :- अमेठीच्या निकालीची काय स्थिती /अंदाज आहेत ?

आत्मशून्य's picture

16 May 2014 - 11:09 am | आत्मशून्य

बाकी आशा आहे यापुढे देशात विकास व जागतिक सामर्थ्याच राजकारण सुरु होइल.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2014 - 8:11 pm | llपुण्याचे पेशवेll

नाही. आप त्या लायकीचा आहे असे वाटत नाही. मेधा पाटकर पडल्या त्याबद्दल आनंद वाटला. दमानिया, इल्मी पडल्या नाही तर चांगल्या आप्टल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. याबद्दल आनंद झाला. विकास आणि सामर्थ्याचे राजकारण सुरु व्हावे याच्याशी मात्र सहमत.

मानगुटीवर बसतात अगदी.

बाकी लोकांनी विज बिले न्हवती भरली सांगण्यावरुन. सत्ता आल्यावर विजबीलमाफी वगैरे सगळे ठीक आहे हो, पण राजीनामा दिला, सत्ता सोडली आणी विज बिले न भरलेल्यांची अवस्था आता घर का ना घाट का करुन टाकली. १४ पैकी १३ मुद्दे तर जनलोकपाल संबंधी न्हवते ? मग किमान ते सर्व मार्गी लावुन लोकांची/सपोर्टर्सची कुचंबणा होणार नाही अशी वेळ पाहुन जनलोकपालच्या मुद्यावर राजीनामा देता आला असता जनतेचा दुवा मिळाला असता, आता लोकांच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण केलीत, आणे विचारवंताना निवडणुकीत उतरवे.. न्हवे कुजवले. जनतेछा बळी देउन आंदोलन यशस्वी होउ शकते सत्तापद न्हवे. बसा आता बोंबलत. दिल्लीत कोणीच निवडुन आले नाही. समाधान इतकेच आहे जे चार निवडुन आले ते भाजपचा जोर असलेल्या परिसरातुन निवडुन आलेत. रुपेरी किनार ती हीच.

असो ३० वर्षापुर्वी भाजपचे फक्त २ सिटा आल्या होत्या आपच्या ४ ही काही वाइअट सुरुवात नाही. विरोधी पक्ष आपच हवा हे व्यक्तीगत मत आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 May 2014 - 4:18 pm | llपुण्याचे पेशवेll

मानगुटीवर बसायचा प्रेत्न करतात पण मूळातच हेतू स्वच्छ नसल्याने मार खातात. दमानिया बाई कुठे गायब आहेत आता. मोठ्या संतपदी विराजमान होउ पाहत होत्या. गडकरींनी कोर्टात ललकारल्यावर कुठे गायबल्या? म्हणजे अभ्यासू वृत्तीचा पूर्ण अभाव आणि नुसताच थयथयाट हा लायकिचा क्रायटेरीया म्हणायचा का?
बाकी आपचे आंदोलन म्हणजे रामदेवबाबाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठीच होते असे नेहेमी वाटते.

आत्मशून्य's picture

22 May 2014 - 12:41 am | आत्मशून्य

स्वच्छ हेतूनेच बसतात पण त्यांचाअभ्यास कमी पडतोय म्हणुन केविलवाणे भासवले जातात. कणा हिन् विरोधक ही देशाला लागलेली किड आहे.

केजरीवाल :- नविन नौट़कीचा अंक कुठला सुरु करणार ? शिवाय त्यांच्या पक्षाची भूमिका सुद्धा.
केजुच्या नौटंकीचा नवा अंक सुरु झाला आहे बरं का मंडळी ! ;)
अरविंद केजरीवाल यांची तुरुंगात रवानगी
म्हंटल यांच्या नौटंकीचा नविन अंक अजुन सुरु कसा झाला नाही ? पण...
नक्की काय झाले ?
नितीन गडकरी यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना कोर्टानं माफी मागण्यास सांगितलं... परंतु, अरविंद केजरीवाल आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले आणि त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. सोबतच कोर्टानं अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी 10,000 रुपयांचा बॉन्ड भरण्यास सांगितलं... पण, केजरीवाल यांनी जामीन भरण्यासही नकार दिला.
संदर्भ :- गडकरी अवमान प्रकरणी केजरीवाल दोन दिवस तुरुंगात

अजुन एक प्रकरण कळाले, अर्थात ते केजरीवाल यांच्या बद्धल नसुन, सोनिया गांधी यांच्या बद्धल आहे.
काय आहे हे प्रकरण ? तर या घोटाळ्याचे नाव आहे :- National Herald Scam
आता तुम्हा सर्वांची बघण्याची आणि श्रवण भक्तीची सोय करतो :-

श्रवण भक्तीची सोय इथे :- Congress’s role in National Herald scam

जाता जाता :- केजुच्या नौटंकीचा अंक तर सुरु झाला आहे, आता... तेल तापते तशा जिलब्या पाडतो असे ब्रिद वाक्य मिरवणारे जिलबीवाले बाबा यांच्या नव्या ताज्या घाण्याची वाट पाहुया ! ;)

सुब्रमण्यम स्वामीदेखील बरेचदा ताळतंत्र सोडून आरोपांचा धुरळा उडवण्यात माहिर आहेत.
त्यांच्या टोकाच्या मतांंमुळे आणि आरोपांमुळे "लांडगा आला रे आला" पातळीवरच त्यांची मतं विचारात घ्यावी लागतात.

मदनबाण's picture

27 Jun 2014 - 7:05 am | मदनबाण

National Herald Scam
वरती ज्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, त्यावर काल दिल्लीच्या न्यायालयाने सोनिया गांधी,राहुल गांधी आणि ४ जणांना समन्स पाठवले आहे.
संदर्भ :-Court summons Sonia, Rahul for alleged fraud

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेघा रे मेघा रे... :- प्यासा सावन

मदनबाण's picture

9 Jul 2014 - 10:09 pm | मदनबाण

आजचा अपडेट :-
सोनिया गांधींना आयकर विभागाची नोटीस

आजची स्वाक्षरी :- Sachin Tendulkar Walks Out To Bat At Lord's - Entry Of A Legend कोण शारापोव्हा? ;)

आत्तापर्यंत फक्त बीजेपी = २६८
जे काही जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेय त्यासाठी २७२ फक्त बीजेपी ला मिळायला पाहिजेत. या बहुमताच्या जोरावर बीजेपीने एवढा विकास करून दाखवला पाहिजे कि पुढील १० ते १५ वर्षे दुसरा पर्याय लोकांसमोर नसेल. नाहीतर आप वाले आहेतच बोंबाबोंब करायला. राहुल गांधी तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत. या नाराजीचा बीजेपी ने जर उपयोग करून नाही घेतला तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील.
बीजेपी मधील दिग्गजांना खुश ठेवून मोदिजी मुख्य खाती आपल्याकडे ठेवावी लागतील. मोदींची खरी परीक्षा बीजेपी मधील अंतर्गत राजकारणाला तोंड देण्यामध्ये असेल.

राजेश घासकडवी's picture

16 May 2014 - 11:18 am | राजेश घासकडवी

मोदींचे, भाजपचे आणि एनडीएचे अभिनंदन. भारताचा विकास घडवून आणण्याचं आश्वासन पुरं करण्याची शक्ती मिळो आणि अनुकूल परिस्थितीही मिळो अशी मनोमन सदीच्छा.

ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे शांततमय पद्धतीने सत्ताबदलाबद्दल सगळ्या नागरिकांचे अभिनंदन. भारतीय लोकशाही कुचकामी आहे वगैरे म्हटलं जातं, पण वेळोवेळी जनता आपला कौल देऊन सरकार बदलते आणि ही प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेने आणि पद्धतशीरपणे पार पडते. जवळपास दोन तृतियांश मतदारांनी यावेळी मतदान केलं. ही राजकीय जागृती अशीच राहो.

मोदीजींचे हार्दिक अभिनंदन. !
आम्हा सगळ्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती ईश्वर आपल्याला देवो.!

स्पार्टाकस's picture

16 May 2014 - 11:47 am | स्पार्टाकस

आजचा आनंद साजरा करायला सगळे आहेत
तरी देखील काहीतरी अपुरे अपुरे वाटतय
उणिव भासते फक्त एका गोष्टीची
.
.
.
.
.
.
.
.
.
आज बाळासाहेब हवे होते !

आनन्दिता's picture

16 May 2014 - 11:50 am | आनन्दिता

+ १ अगदी ..

कवितानागेश's picture

16 May 2014 - 1:23 pm | कवितानागेश

..

ओंकार सुतार's picture

16 May 2014 - 4:57 pm | ओंकार सुतार

खरच हवे होते...
विषेशतः राज , राणे आणि भुजबळांची स्थिती बघण्यासाठी तरी....

प्रसाद गोडबोले's picture

16 May 2014 - 8:04 pm | प्रसाद गोडबोले

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 May 2014 - 12:53 am | निनाद मुक्काम प...

उद्धवा
मोदीमय तुझे सरकार असे नवीन राजकीय गाणे झाले आहे.
भाजपच्या मित्रपक्षाला अकालीदलाला पर्याय म्हणून आप पक्ष पुढे आला त्यामानाने शिवसेनच्या पुढे राज ,राणे , भुजबळ असे दिग्गज होते.
पण शांत ,संयमी नेत्तृत्व , उत्कृष्ट व्यवस्थापन ह्यामुळे शिवसेनेची समाजाच्या सर्व थरात एक वेगळी व सकारात्मक व समंजस प्रतिमा उद्धव ह्यांनी निर्माण केली.
पूर्वीची शिवेसेना राडेबाज आणि त्याच मार्गावर जाणार्या राज ची मनसे ह्यांना मर्यादित यश होते.
भावनात्मक , आक्रमक भाषणाने पूर्वी शिवसेनेने व आज मनसेने गर्दी जमवली मात्र आजच्या उद्धवप्रणीत शिवसनेने
भाजपसह इतर पक्षांची मोट बांधून संघटीत विजय मिळवला आहे.
महाराष्टार्त भाजपच्या खालोखाल जागा मिळवणारा शिवसेनेने आमच्याशी युती करण्यास खरा फायदा आहे हे नमोंना दाखवून दिले.
पुढील विधानसभेत नमो ह्यांना उद्धव शी मसलत करणे अनिवार्य आहे.
शिवसेनेला मात्तबर केंद्रीय मंत्रिपद मिळेल असा माझा होरा आहे, कारण गुणवत्ता प्रमाण मानणारे नमो ह्यांच्याकडे उद्धव गुणी खासदारांचे नाव पुढे करेल ह्यात शंका नाही.
तळटीप
संघाचे बाळकडू घरातून मिळाल्याने भाजपचा कट्टर समर्थक असलेला मी शिवसेनेचा चाहता नव्हतो. किंबहुना
रथयात्रा , बाबरी मशीद ह्या राजकारणामुळे राजकारणातून मन उडाले होते.
नमो ह्यांचे विकास व सुराज्य ह्या संकल्पनेने भाजपशी परत नाळ जोडल्या गेली. उद्धव ह्यांच्या हातात शिवसेना आल्यावर तो पक्ष खर्या अर्थाने गुद्याने नाहीतर मुद्द्यांवर निवडणुका लढवणार पक्ष झाला व माझे त्या पक्षाविषयी अंकुल मत झाले.
उद्धव ज्यांची शेतीतील काही काळात नाही असे म्हणून खिल्ली उडवणारे आज त्याला ग्रामीण भागात प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात असे यश मिळवून स्वताला सिद्ध केले आहे.
राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे.
ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.
मूळ मुद्दा असा आहे की अणु उर्जेवर मोदी ह्यांची काय भूमिका असेल व आता दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का


राणे आता कोकणातील त्यांचे सर्व उपक्रम बंद करणार आहेत असे विधान केले आहे.
ह्या बद्दल कोकण वासियांनी त्यांचे आभार मानले पाहिजे.

कोकण प्रांताचे ग्रहण सुटले म्हणायला हरकत नाही.

वॉल्टर व्हाईट's picture

17 May 2014 - 9:48 am | वॉल्टर व्हाईट

बरोबर आहे निनाद तुमचे, तुमच्यासारखे अनेक मोदींच्या पॉझिटिव ट्च मुळे पुन्हा जोडले जात आहेत.
तसेच मोदींना काळाची पावले ओळखता येतात असे जाणवते, उदा. इंटरनेट आणि सोशल मिडीयावर वावर आणि त्याचा संतुलित वापर.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 1:16 am | निनाद मुक्काम प...

टेक्नोसेवी तरुणाई पुढे देवालये नाही तर शौचालये हवी म्हणणारे गुजरात मधील बेकायदेशीर मंदिरे तोडतांना विहिपी चा रोष ओढवून घेणारे ह्या निवडणुकीत संघ वगळता बजरंग दल व इतर हिंदू संघटना व त्यांच्या नेत्यांना लांब ठेवणारे व विकासाची व सुराज्याची भाषा करणारे मोदी ह्यांना हे यश अपेक्षित होते.
सोशल नेटवर्क वर मोदींना पंतप्रधान मानणारे मोदी भक्त असे म्हणून आम्हाला हिणवणाऱ्या लोकांचे चेहरे त्यांनी सेल्फी काढून येथे टाकावे .
घाबरू नये आम्ही तुम्हाला हसणार नाही
सबको साथ लेके चलना हे भाई

दाभोळ अरबी समुद्रात बुडणार का

तुम्हाला जैतापूर म्हणायचे आहे का? कारण 'अर्थ'पूर्ण चर्चेनंतर दाभोळ एनर्जीला जीवदान मिळाले होते. जैतापूर बाबतीत देखील तसेच होईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 1:22 am | निनाद मुक्काम प...

सुधारणे बद्दल धन्यवाद
हो जैतपूर
उद्द्ध्व ला विधानसभेत राण्यांना हरवायचे आहे. त्यामुळे ह्या प्रकल्पाला विरोध हा असणारच
मोदी ह्यांना अणूउर्जेला विरोध ऐकिवात नाही आणि अपारंपरिक उर्जा ही भारतातील प्रचंड उर्जेची गरज पुरी करू शकत नाही तेव्हा सध्यातरी अणू उर्जेला पर्याय नाही
काय होते ते पाहणे मनोरंजंक आहे
महाराष्टार्त सौर उर्जेचे जाळे पसरणार जर्मन कंपन्यांना बाजारपेठ मिळणार तर महाराष्ट्राला प्रदूषणमुक्त उर्जा
अच्छे दिन ....

llपुण्याचे पेशवेll's picture

20 May 2014 - 4:23 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. मोदींनी प्रगतीच्या आड येणारे पर्यावरण कायदे रद्द करावेत. आतल्या गोटातल्या माहीतीनुसार पुणे कोल्हापूर महामार्ग चौपदरीकरणाचे काम या पर्यावरण वाल्यांनी अडवले आहे. (टोल मात्र वसूल होतो हा भाग वेगळा)
पुण्यातला नदीपात्रातला रस्ता तब्बल १० वर्षे या फालतू पर्यावरणवाद्यांनीच रोखून धरला होता. इतका लांब वळसा पडायचा सायकलवरून जाताना. असो.
जैतापूर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.

दुश्यन्त's picture

18 May 2014 - 7:14 pm | दुश्यन्त

बर्याच अंशी सहमत.आत्ताच्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजप बरोबर सेनेला झाला हे खरेच आहे मात्र उद्धवच्या काळात सेना ग्रामीण भागात बर्यापैकी विस्तारली. याचे एक उदाहरण म्हणजे मागच्या २००९च्या लोकसभेत सेनेची मुंबईमध्ये पूर्ण धूळधाण उडाली होती, ठाणे-कोकण मध्ये पण मर्यादित यश होते मात्र उर्वरित महाराष्ट्रात ९ जागा आल्या होत्या (एकूण ११ पैकी ९ मुंबई-ठाणे-कोकण वगळता उर्वरीत महाराष्ट्रात). माझ्या मते असे यश बाळासाहेब भरात असताना पण मिळाले नसावे. सेना- भाजप युती बरोबर आर पी आय, स्वाभिमानी संघटना, रासप यांची मोट उद्धव ठाकरे आणि मुंडेंच्या पुढाकारानेच बांधली गेली आहे. उद्धव यांनी संयमी नेतृत्व सेनेला पुढे नेत आहे हे उशिरा का होईना लोकांना पण समजू लागले आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 May 2014 - 10:41 pm | निनाद मुक्काम प...

ह्या ९ पैकी काही जागा राष्ट्रवादीच्या बालेकील्यातील होत्या. जेव्हा मोदी लाट नव्हती तेव्हा एकहाती उद्धव ने हा पराक्रम गाजवला.
बाळासाहेब ,महाजन , मुंडे व हिंदुत्वाची हवा असतांना व कोन्ग्ग्रेज व राष्टवादी वेगेळे लढले तेव्हा सुद्धा असे आक्रित घडले नव्हते.
मी अचानक उद्धव ह्यांचा खांदा समर्थक वैगरे झालो नाही ,
पण शेट्टी ,आठवले व मुंडे व गडकरी ह्यांना राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो. हे पाहून बंदे मे दम हे असे मला वाटते.

चौकटराजा's picture

20 May 2014 - 6:14 pm | चौकटराजा

राज पेक्ष्या उद्धव आश्वासक वाटतो.
राज ठाकरे यानी सेनेपासून फारकत घेणे व पवारानी कॉग्रेस पासून फारकत घेणे यात साम्य आहे. त्यांच्या दोघांच्याही अंदाजाने आणकी वीसेक वर्षे राजकारण हे एका पक्षाचे न रहाणारे असणार. अशा स्थितीत लहान पक्षाचा प्रमुख असणे मध्यम पक्षाच्या महत्वाच्या नेता असण्यापेक्षा मह्त्वाचे ठरते. मंत्रीपदावर कब्जा मिळविता येतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 May 2014 - 11:50 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व भारतिय मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन !

ही निवडणूक म्हणजे भारतिय लोकशाहीचा विजय आहे !!

भारताला एक सुजाण, पुरोगामी आणि विकसनशील सुशासन मिळून देशाचा खराखुरा विकास व्हावा हीच सदिच्छा !!!

आज प्रत्येक भारतियाची मान अभिमानाने ताठ व्हायला हवी... मग त्याने / तिने मत दिलेला उमेदवार / पक्ष विजयी झालेला असो अथवा नसो.

मुक्त विहारि's picture

16 May 2014 - 12:40 pm | मुक्त विहारि

आवडला....

प्रचेतस's picture

16 May 2014 - 1:45 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

शिद's picture

16 May 2014 - 2:54 pm | शिद

असेच म्हणतो.

पैसा's picture

16 May 2014 - 11:53 am | पैसा

सर्वांचेच अभिनंदन! लोकांनी त्यांचा राग न बोलता मतपेटीतून दाखवला. आणि काँग्रेस हा दबलेला राग जाणून घेऊ शकली नाही. आपल्या एकेक मताने काय होऊ शकते हे भारतीय मतदारांनी दाखवले आहे. यासाठी आनंद!

सर्वांचेच अभिनंदन . जनतेने एकाच पक्षाला सत्तेचा कौल देऊन स्वत: प्रगल्भ होत असल्याचा कौल दिलाय. हे असेच राहावे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 May 2014 - 1:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विजयी उमेद्वारांचे,मोदींचे अभिनंदन. १९७७ सारखेच होते आहे असे दिसतय. त्यावेळी जयप्रकाश नारायण व ईतर होते. ह्यावेळी मोदी.
पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा.

चौकटराजा's picture

16 May 2014 - 5:30 pm | चौकटराजा

मोरारजींचा अवसानघात करणारे मधु लिमये यांच्या सारखे समाजवादी त्यावेळी होते म्हणून जनसंघीयाना पाण्यात पहाण्याचा
प्रयोग त्या वेळी झाला. गेली पाच वर्षे राष्ट्रवादी व कॉंग्रेस हाच एकमेकाना पाण्यात पहाण्याचा प्रयोग करीत सत्ता खात होते.
त्यावेळच्या जनता पक्षाला व आघाडीला मतदारानी धडा शिकवलाय. की सत्तेचा आयडियॉलॉजीचा माज करू नका. ३७० , राम बाजूला ठेवल्यावर काय घडू शकते हे दिसले आहे.आता काही काळ सुषमा स्वरात एल के काहीशी बोंब करतील पण
त्याना गप्प केले जाईल. समाजवाद्यांइतके ते घातकी ( वैचारिक ) नसावेत.

सर्व भारतीयांचे अभिनंदन !

काँग्रेस हा पक्ष यातून संपून न जाता पुन्हा नव्या दमाने नव्या चेहर्‍याने उभा राहील अशी अपेक्षा, लोकशाहीत विरोधी पक्षाचा अंकुशही तितकाच गरजेचा.

कुसुमावती's picture

16 May 2014 - 2:48 pm | कुसुमावती

नमोंच्या हातुन भारताचा विकास होवो. पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.

अमोल केळकर's picture

16 May 2014 - 3:06 pm | अमोल केळकर

अभिनंदन

अमोल केळकर

विकास's picture

16 May 2014 - 5:04 pm | विकास

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. मोदींनी "हा भारताचा विजय आहे" असे म्हणून आणि नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आईचा आशिर्वाद घेऊन पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात कृतज्ञता आणि कृतर्थता दिसते... असेच आता या सत्ताधारी आघाडीचे पाय जमिनीवर राहोत आणि भारताला मोठे करण्यासाठी भारतीयांना संधी प्राप्त होतील असे कार्य घडोत ही शुभेच्छा!

राजीव गांधींना याहून मोठा विजय मिळाला होता पण ती सहानभुतीची लाट होती. नाहीतर आठवते त्याप्रमाणे जर इंदीराजी हयात असत्या तरी कदाचीत त्या जिंकल्या असत्या पण इतक्या मताधिक्याने नाही. त्यामुळे हा विजय पोलरायझेशनचा विजय आहे असे वाटत नाही. तर खर्‍या अर्थाने त्रासलेल्या आणि केवळ सामान्य इतकीच ओळख असलेल्या बिनचेहर्‍याच्या जनतेने दिलेला एक आशावादी कौल आहे.

मनःपूर्वक शुभेच्छा!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 1:31 am | निनाद मुक्काम प...

२००९ साली सुद्धा जनता ह्या सरकारला विटली होती पण त्यांच्यापुढे समर्थ पर्याय नव्हता, रथ यात्रा करणारे , तडफेने भाषण करणारे प्रत्यक्षात कृतीशून्य महाजन , वाजपेयी ,अडवाणी ह्यांचा पर्याय जनतेला मान्य नव्हता
कारण शायनिंग इंडिया म्हणून काही होत नाही त्यासाठी तुमचा मतदारसंघ , तुमचे राज्य शायनिंग असले पाहिजे.
मोदी ह्यांचे गुजरात मॉडेल उत्तर प्रदेशाला हवेसे वाटले .ह्यात जनतेचा व्यवहारी दृष्टीकोन आहे , त्यांना भावनिक रीत्या च्यु बनवायचा हेतू नव्हता.
मोदी हा तत्कालीन सरकार विरुद्ध समर्थ पर्याय होता मात्र बंगाल व तामिळनाडू मध्ये मोदी लाट चालली नाही कारण
तेथे दोघी मा, अम्मा खमक्या होत्या.
अकाली दलावर नाराज जनतेने आपला मत देणे अनपेक्षित होते ह्याच पार्श्वभूमीवर आप , राज ला पुरून उरणारा उद्धवचे कर्तुत्व मोठे वाटते.

चौकटराजा's picture

18 May 2014 - 8:50 am | चौकटराजा

माझ्या मते त्या बाबा चव्हाण यांच्या पेक्षा चांगल्या मुख्यमंत्री आहेत.

दुश्यन्त's picture

18 May 2014 - 7:22 pm | दुश्यन्त

एक दुरुस्ती २००९ ला महाजन हयात नव्हते तर वाजपेयी आत्तासारखेच थकलेले होते त्यामुळे वाजपेयी प्रचारपासून दूर होते. आडवाणी तसेच जेटली, स्वराज वगैरे लोक तेव्हा भाजपची आघाडी सांभाळत होते.

बॅटमॅन's picture

16 May 2014 - 5:15 pm | बॅटमॅन

हबिणंदण!!!

मात्र लै मोठ्या जबाबदार्‍या आहेत मोदीवर. कसा पार पाडतो ते पाहणे महत्त्वाचे आहे. मोदी व समस्त सर्कारमधील घटकांना पुनरेकवार शुभेच्छा!!

बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.

संपत's picture

16 May 2014 - 5:57 pm | संपत

बाकी या निवडणुकीनंतर प्रचाराची तंत्रे आमूलाग्र बदलून जातील असे वाटते.

पूर्णपणे सहमत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 1:32 am | निनाद मुक्काम प...

गेली आहेत
ऑलरेडी
स्वतंत्र भारतात जन्मलेला व एकसंघ जर्मनीत राहणारा
निमुपोज

अत्रुप्त आत्मा's picture

16 May 2014 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा

विजय
http://www.sherv.net/cm/emoticons/flags/waving-indian-flag-smiley-emoticon.gif

राही's picture

16 May 2014 - 5:56 pm | राही

आजची सकाळ खरोखरीच ऐतिहासिक आणि क्रांतिकारी होती. टीवीच्या पडद्यावर नाट्य उलगडत होते आणि ह्यूस्टन, न्यू जर्सी, पीट्स्बर्ग, लंडन्, सिडनी इथल्या निरोपांच्या देवाणघेवाणींनी कंप्यूटरचा पडदा भरून गेला होता. काळवेळ जणू थांबला होता.
असा ऐतिहासिक क्षण या पूर्वीही एकदा अनुभवायला मिळाला होता. १९७७ साली. लहान वयामुळे त्या क्षणाचे ऐतिहासिक मूल्य तितके लक्षात आले नव्हते. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी वातावरणातला जोश, उत्सुकता, थरार बघितला होता. शनिवारवाड्यावर, गायकवाड्यासमोर, सकाळ कचेरीसमोर जमलेला बेभान जमाव, निवडणूकपूर्व प्रचाराच्या मुंबईच्या लहान-लहान गल्ल्यातही रंगलेल्या सभा, सारे आठवतेय. पु.ल देशपांड्याची सभाही आठवतेय आणि त्याला मिळालेला तुडुंब प्रतिसादही. शब्द लक्षात नाहीत पण लोकांचा उत्साह आठवतोय.
पण काही दिवसांतच हे सोनेरी स्वप्न भंगून गेले आणि लोकांचा पराकोटीचा हिरमोड झाला.
आता तसे न होवो. ज्या बदलासाठी हा शांततामय कौल दिला गेला आहे, तो वास्तवात येवो. लोकाभिमुख सरकार आणि सुप्रशासन भारतात अवतरो. नागरी शिस्त आणि सार्वजनिक चारित्र्य भारतीयांमध्ये बाणो.
एव्हढे तरी होवो. आमेन.

विकास's picture

16 May 2014 - 7:55 pm | विकास

वास्तवीक माझ्या मध्यरात्रीच एनडीटिव्हीवर प्रणव रॉय यांनी खात्रीने एनडीएला बहुमत मिळेल हे सांगितले. तरी झोपायला जावतच नव्हते. तसाच ३ पर्यंत बसलो आणि ऐतिहासीक क्षण अनुभवला.

१९७७ ची मला देखील आठवण झाली. मृणाल गोरे, दुर्गा भागवत, सुब्रम्हण्यम स्वामी, जॉर्ज फर्नांडीस, आदींची भाषणे ऐकल्याचे आठवते. अर्थात मी तेंव्हा फारच लहान होतो. मृणाल गोरेंच्या भाषणाला आईने नेल्याचे आठवते! नंतर निवडणूक निकालाची रात्र आली आणि रेडीओवर अचानक मध्यरात्रीच्या आसपास, "जाने कहां गये वो दीन..." गाणे लागले. आमचे शेजारी, "इंदीरा गांधी पडल्या" म्हणतच घरात आले. विश्वास बसला नव्हता.

नंतर घरावरून रामभाऊ म्हाळगींची मिरवणूक जाताना पाहीली, त्यांनी काँग्रेसच्या पा.शि. देशमुखांना हरवले होते, "चंद्रभागेला आला लोंढा, पाणी आले ठाण्याला, इंदीरा म्हणते यशवंताला, पाशि माझा बुडाला" म्हणत जोरात मिरवणूक गेली... नंतर दुर्दैवाने म्हाळगी मला वाटते त्यांची टर्म संपायच्या आधीच कॅन्सरने गेले. दुसरीकडे "संजीव-राजीव वात्रट कार्टी निवडून आणा जनता पार्टी!" ला प्रचंड प्रतिसाद मिळून देखील जनतापार्टीने सत्ताधिशांपेक्षा विरोधीपक्षाचेच काम चालू ठेवले आणि अंतर्गत लाथाळ्यांमधे सोनेरी स्वप्न भंगून गेले. :( १९८४ साली कदाचीत परत विरोधकांना संधी असती पण सहानभूटीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. सारे देशमे एक भिकारी, अटलबिहारी अटलबिहारी असे ओरडत काँग्रेसचे पब्लीक फिरत होते. पण तरी देखील भाजप पक्ष म्हणून भंगला नाही. मतभेद नक्कीच झाले असतील, पण त्यातील प्रमुख नेत्यांनी कधी वेगळी चूल मांडली नाही. हे नक्कीच वैशिष्ठ्य वाटते. असो.

असा निवडणूक निकालांचा अनुभव नंतर अमेरीकेत बुश विरुद्ध गोर च्या वेळेस रात्रभर जागून आणि नंतर सततच्या बातम्या ऐकून घेतला. ज्या दिवशी गोरने हार मान्य केली त्या दिवशीचे त्याचे भाषण ऐकताना सामान्यांना जाउंदेत काही प्रसिद्ध माध्यमातील प्रसिद्ध अँकरमन्सना देखील वाईट वाटल्याचे दिसत होते.

ओबामाच्या पहील्या निवडणुकीच्या वेळेस इतिहास घडला. पण नंतर त्याचा आत्यंतिक द्वेष करून बदनामी करणारे विचारवंत आणि राजकारणी पाहीले (कदाचीत तेच मोदींच्या बाबतीत झाले). दुसर्‍या वेळेस त्याच्या विरोधात रॉमनी उभा होता. तेंव्हा असेच उत्कंठावर्धक होते.

असो.

तुमचा अभिषेक's picture

16 May 2014 - 11:36 pm | तुमचा अभिषेक

वाह, भावनिक पोस्ट, आवडली, तुमची आणि वरची राहींची देखील ..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2014 - 8:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नरेंद्र मोदींचे हार्दिक अभिनंदन. आता इथुन पुढे १०-१५ वर्ष देशात भा.ज.पा. आणि मित्रपक्षांना पर्यायच उरला नाही पाहिजे.
काँग्रेसच्या तोंडावर 'पंज्या'चा जोरदार फटका देऊन पराभव केल्याबद्दल समस्त मतदार बंधुं-भगिनींचे आभार.

आता गेल्या १० वर्षात यु.पी.ए. १-२ नी केलेले झोल बाहेर काढुन जावै बापु, बिटियारानी, मम्मा, पप्पु, सगळे "माजुर्डेवादी" ई.ई. ना कृष्णजन्मस्थान यात्रा घडवावी हीचं ईच्छा.

मनमोहनसिंग यांनी कृपया राजकारणातील घाणीतुन बाजुला व्हावे आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!

प्रसाद गोडबोले's picture

16 May 2014 - 9:21 pm | प्रसाद गोडबोले

आणि सन्मानाने जगावे हीचं ईच्छा!!

=))))

मदनबाण's picture

16 May 2014 - 10:40 pm | मदनबाण

एक मुद्दा राहिलाच की...
माझ्या आनंदाचे अजुन एक कारण म्हणजे...अमेरिकेची होणारी गंमत ! मोदींना व्हीसा नाकारणारा माजुरडा देश ! आता काय करतील ?

विकास's picture

16 May 2014 - 11:47 pm | विकास

चमत्काराशिवाय नमस्कार होत नसतो, पण चमत्कार करून दाखवला की..

White House, U.S. Senate Congratulate Narendra Modi on His Win in India

हुप्प्या's picture

17 May 2014 - 6:17 am | हुप्प्या

खरोखरच चमत्कार म्हटला पाहिजे. एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही. ह्या भारताच्या सुपुत्राला माझा सलाम! कितीही मतभेद असले तरी ह्या माणसाने ह्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे ह्याविषयी शंका नसावी.

आणि ही सगळी प्रक्रिया ९०% शांततेत पार पडली (अजून तरी!) हे एक मोठेच अप्रूप म्हटले पाहिजे.

कलंत्री's picture

17 May 2014 - 9:39 am | कलंत्री

प्रक्रिया १०० % शांततेत पार पडली.

प्रसाद गोडबोले's picture

17 May 2014 - 10:15 am | प्रसाद गोडबोले

एक सामान्य घरातील गुजराथी मुलगा जो लहानपणी स्टेशनावर चहा विकायचा तो निव्वळ स्वकर्तृत्त्वावर इतका मोठा होतो की त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या पक्षाला भारतातील इतिहासातील एक दैदीप्यमान विजय मिळवून देतो. एक थक्क करणारे कर्तृत्व यात शंकाच नाही.

ओ ... त्यात काय विशेष ? आमचे पट्टेवाले सुध्दा गृहमंत्री झालेच होते की ... औंदाची इलेक्शन जिंकली असती तर घरगुती पंतप्रधानही होण्याचा योग होता =))))

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 May 2014 - 10:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आजचे लोकसत्तातले संपादकिय छान आहे.सत्तेत असूनही 'मी बिचारा,मी चहा विकायचो,मी ओ.बी.सी.' हे सांगण्यात मोदी व संघ यशस्वी झाले.अर्थात त्यांना गुजरातमधल्या केलेल्या कामाची जोड होतीच.नुसते काम करून भागत नाही तर त्याची व्य्वस्थित जाहिरात्बाजीही करावी लागते. मोदींनी हे संघाला शिकवले आहे असे म्हणावे लागेल.
गुजरातमध्ये केलेले काम,एन.आर.आय.प्राध्यापक्,आय.टी.तज्ञ्,सोशल मिडिया,अंबानी,अडानींचा गडगंज पैसा,संघाची
आखणी ह्या आधारावर मोदींनी भाजपाला विजय मिळवून दिला.
मोदींचे हार्दिक अभिनंदन.

प्यारे१'s picture

17 May 2014 - 11:17 pm | प्यारे१

क्या माई तुम भी? मजाक कर रे क्या?

चाय का किटली कौन निकाला? मोदी खुद निकाला? गुजरात एक छटाक भर राज्य. त्याची आक्ख्या देशापुढं काय महती? काँग्रेसनं देशभर केलेलं काम लोकांना का नाही दिसलं गं माऊली? जाहिरातबाजीसाठी मोठ्ठं कंत्राट दिलेलं ना कुणाला?
मोदी कडं अडाणी होता तर काँग्रेसकडं डीएलएफ नि पुन्हा अंबानी पण होताच की.
जयराम रमेश, शशी थरुर, अहमद पटेल, मीरा कुमार, कपि सिब्बल्ल (होतं कधी कधी एखादं अक्षर इकडं तिकडं) खूप शिकलेली आणि मातब्बर माणसं की! सोशल मिडीया वर लिमिटेड बंदी आणायचा विषय पण झालेला की कधी मधी...!

राहुल बाबा पण जातच होता की अधून मधून गरी बांच्या घरी चहापाणी, जेवणखाणाला.

चीटिंग नै करायची बाबा अशी. जिंकला तर जिंकला. बघायची वाट थोडे दिवस आता. 'अच्चे दिन आयेले हय' :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 May 2014 - 11:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अरे बाबा चिटिंग कसली?.माझे आधिचे प्रतिसाद पहा.नरेंद्रच पंतप्रधान व्हावा असे मलाही वाटत होते़.
कॉन्ग्रेसनेही प्रचाराची सर्व हत्यारे वापरली असणारच पण तरीही ह्यांच्या तुलनेत ते नक्कीच कमी पडले. शिवाय रोजची भ्रष्टाचाराची प्रकरणे,मनमोहनांचे प्रसिद्ध मौन हे घटक कारणीभूत होतेच.

आत्मशून्य's picture

17 May 2014 - 11:49 pm | आत्मशून्य

बघुन त्यांना विपश्यना टिचर बनवा अशी मागणी जोर धरु लागली आहे ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 May 2014 - 12:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो विपश्यनेत पण एवढं शांत नसतं बसायचं असतं.

प्रभाकर पेठकर's picture

17 May 2014 - 9:43 am | प्रभाकर पेठकर

बिजेपीने मिळविलेले दैदिप्यमान यश नक्कीच कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे मोठ्ठाल्ले घोटाळे, आमचं कोण काय वाकडं करू शकतो हा माज आणि महागाईने ग्रस्त सामान्य जनता ह्या सर्वाचा परिपाक म्हणूनच काँग्रेसची ह्या निवडणूकीत अक्षरशः वाताहात झाली.

बिजेपीच्या हाती सत्तेची मशाल आली आहे. त्यांनी देशाला भरभराटीच्या मार्गावर नेऊन सोडावे. शिक्षण, पिण्याचे पाणी, वैद्यकिय सेवा, रस्ते आदी मूलभूत गरजा स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनीही दारूण अवस्थेत आहेत त्या सुधारून भारताची लाज वाचवावी.

नरेन्द्र मोदी १० वर्षे पंतप्रधान राहतील आणि भारताच्या इतिहासातला हा सुवर्णकाळ असेल अशी भविष्यवाणी कोणीतरी उच्चारली आहे ती खरी ठरो.

सस्नेह's picture

17 May 2014 - 2:56 pm | सस्नेह

तेव्हा करायचे जेव्हा नूतन सरकारकडून काही लोकहिताची देशहिताची कामे होतील. खरे आव्हान पुढेच आहे.
म्हणून तूर्त मोदी सरकारला शुभेच्छा !

लोकहो पण अजून सगळे संपले नाही. विधानसभा निवडणुकाही तोंडावरच आहेत. केंद्रात मोदी आला म्हणून सगळं संपलं नाही. मोदीकडे बघून लोकांनी लोकसभेला मतदान केलं पण विधानसभेत तेवढं पुरं पडणार नाही. अधिक लोकलाईझ्ड मुद्यांवर बीजेपी एट ऑल काय करतात ते पाहणं उद्बोधक ठरेल. त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

आत्मशून्य's picture

17 May 2014 - 11:01 pm | आत्मशून्य

त्यांची खरी कसोटी तिकडे लागणार आहे.

हीच लोकशाहीची खरी मजा आहे. सगळ्यांना व्यवस्थीत तव्यावर ठेवता येते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 May 2014 - 1:41 am | निनाद मुक्काम प...

ह्या अभिनंदांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आगामी निवडनुकीसाठी महायुतीची घोषणा काय असेल
अब की बार .....
अवांतर
मायलेक राजीनामा देत आहेत
हे वाचून जीव गलबलला
त्यांची भाषणे म्हणजे निर्भेळ करमणूक
त्याला कपिलरात्रीचा सवंग पणा नाही
आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे
हास्यकवी संमेलन
मम्मी तुसी ना जो
रीयंका लावो , पार्टी बचाव
प्रियंका इज इंडिया

विकास's picture

18 May 2014 - 4:26 am | विकास

निर्भेळ करमणूकच हवी असल्यास येथे पहा:

http://whycongresslost.in/ :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2014 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आहेत विनोद ! काही तर अगदी ज्युनियर बुशच्या तोडीचे आहेत !!

राहूल आणि त्याच्या लेखनिकांना "स्टँड अप कॉमेडी"चे मैदान मारण्याची प्रचंड संधी आहे. आता हे सगळे विनोद "भोगायला" न लावता त्यांचा देशाच्या जनतेला निखळ आनंदाने आस्वाद देता येईल... आणि गाठी दोन पैसेही पडतील आणि लोक त्यांना "बेकार आहेत" असे म्हणात नाहीत... फार फार तर विनोद बेकार आहेत असे म्हणतील ! =))

कवितानागेश's picture

20 May 2014 - 6:47 pm | कवितानागेश

भयंकर आहेत! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2014 - 12:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नरेंद्र मोदींचे अभिनंदन, एकहाती सत्तेवर येणे काय म्हणतात ते नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. पक्षातल्या जेष्ठ नेत्यांची नाराजी असूनही एकट्याने सभा घेणे, माध्यमांचा योग्य वापर, काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेला आपण आणि भाजपाच योग्य पर्याय असल्याचे दाखवून दिले. त्याचबरोबर, लोकशाहीचा प्रगल्भपणे वापर करणा-या जनतेचेही मनःपूर्वक अभिनंदन.
भारत नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व दृष्टीने अधिकाधिक विकास करेल आणि एक आदर्श सरकार बनेल अशी कामनाही व्यक्त करतो.

भारतीय लोकशाहीचा विजय असो.

-दिलीप बिरुटे

दुश्यन्त's picture

18 May 2014 - 7:49 pm | दुश्यन्त

महाराष्ट्रातील जनतेचा केंद्रातल्या सरकारपेक्षा जास्त राग राज्यातल्या कॉंग्रेस आघडी सरकारवर होता/आहे. १५ वर्षापासून कॉंग्रेस एनसीपीचे राज्य आहे. सिंचन घोटाळा, आदर्श, जमिनी हडपणे,गारपीट, शेतकरी आत्महत्या आदी बाबींत दाखवलेली सरकारी अनास्था, गुंडागर्दी (राणे-भुजबळ- तटकरे-अजित पवार वगैरे),महागाई, बेताल वक्तव्ये यामुळे या आघाडी सरकारचे जाणे अटळ आहे मात्र महायुतीने हुरळून न जाता एकजुटीने, जोमाने प्रचार करणे आवश्यक आहे.

बॅटमॅन's picture

18 May 2014 - 8:29 pm | बॅटमॅन

विधानसभेत आघाडी सरकारचा पराभव झाला तरच त्यांचे डोळे उघडतील, नैतर आहेच पुन्हा धरण, लघवी आणि शाई.

मला त्या दिव्य कुकेचे सांत्वन करायचे आहे ते कसे कुणी सांगु शकेल काय ??
मोदी व भाजपच्या या भव्यदिव्य यशाबद्दल.

राही's picture

20 May 2014 - 5:37 pm | राही

आता २१ तारखेला मंत्रिमंडळाचा चेहरा जाहीर झाला की पुढच्या धोरणांचा काहीसा अंदाज येईल.
आता आणखी उत्सुकता आहे ती महाराष्ट्र विधानसभेसाठी असणार्‍या युतीबद्दल. जागांच्या संख्यावाटपासाठी वाद होणारच. भाजप आता सेकंड फिडल वाजवण्यावर संतुष्ट राहीलच असे नाही.

चौकटराजा's picture

20 May 2014 - 6:06 pm | चौकटराजा

काल एकाने पराभूत या शब्दाचा अर्थ असा सांगितला
प पवार
रा राणे
भू भुजबळ
त तटकरे

मो दी चा अर्थ
मो मोठ्या
दि दिमाखात

विकास's picture

21 May 2014 - 3:15 am | विकास

खालील व्हिडीओ हा ८ मिनिटांच्या किंचीत आधीपासून बघा. हेडलेस चिकन या शब्दाचा अर्थ समजेल. :)

प्रदीप's picture

21 May 2014 - 8:22 am | प्रदीप

tosh
noun Chiefly British Informal.
nonsense; bosh.

त्यावरून हे कॉश!!

हुप्प्या's picture

21 May 2014 - 9:32 am | हुप्प्या

मग केतकर असले मुद्दे काढून आकाश पाताळ एकत्र करणार. नेहरूंचे नाव नाही घेतले, गांधींचे नाव नाही घेतले, आंबेडकरांचे नाव नाही घेतले वगैरे ट्यँव ट्यँव ट्यँव चालू.
काँग्रेसचे लोक टिळकांचे नाव किती घेतात? ते नसते तर काँग्रेसच बनली नसती. दादाभाई नौरोजी? लाला लजपतराय? बिपिनचंद्र पाल?

मदनबाण's picture

21 May 2014 - 6:45 am | मदनबाण

केतकरांचा तोल { कोणता ते समजलंच आहे म्हणा ! } केव्हाच ढासळला आहे !

सुमार शेटकर अगदीच वाया गेलेत *dirol*

विकास's picture

21 May 2014 - 7:43 am | विकास

इलिनॉय मधील काँग्रेसमन (/खासदार)Aaron Schock यांनी युट्यूबवर नरेन्द्र मोदींचे केलेले अभिनंदन! :)

क्लिप आवडली, बर्‍याच जणांशी शेअर केली.

राही's picture

21 May 2014 - 11:52 pm | राही

क्लिप आवडली, बर्‍याच जणांशी शेअर केली.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 May 2014 - 1:23 pm | निनाद मुक्काम प...

चेपू वर शेअर करण्यासारखे आहे. करत आहे.

जयनीत's picture

26 May 2014 - 11:00 am | जयनीत

विजेत्यांचे अभिनंदन आणि आपल्या मुद्द्यां आणि निष्ठेसाठी साधनांची कमतरता असूनही नेटाने निवडणूक लढवणा-या काही पक्ष आणि त्यांची खंद्या कार्यकर्त्यांचेही मनपूर्वक अभिनदन.
झालेल्या बदलातुन देश आणि लोकशाही समृद्ध होइल हीच अपेक्षा.

जेपी's picture

26 May 2014 - 11:02 am | जेपी

१००
पयला माझा नंबर...........

राही's picture

27 May 2014 - 7:34 pm | राही

अभिनंदनात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद. सुप्रशासन येवो ही शुभेच्छा आणि सदिच्छा.