गाभा:
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे.
घर शोधुन देणार्या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे
अपेक्षा :
१. शहर : पुणे
२. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर)
३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK)
४. २४ तास पाणी
५. आर्थिक क्षमता : ७००० भाडे/ १५०००अनामत रक्कम
१ जुन पासुन नविन घरात राहावयास जाणे करणेचे असलेने लवकरात लवकर मदत अपेक्षित आहे.
यशस्वीरित्या घर शोधुन देणार्या मिपाकराचा नविन घरी बोलवुन यथोचित सन्मान करण्यात येईल.
प्रतिक्रिया
15 May 2014 - 7:58 pm | पैसा
पुणेकर लोक मदत करू शकतात. बाकीच्यांचा काही उपयोग नै!
15 May 2014 - 8:41 pm | टवाळ कार्टा
पुणेकर लोक मदत करू शकतात. ... जर तत्वात बसत असेल तर ;)
15 May 2014 - 8:11 pm | जेपी
पुणेकर पण काय करु शकतील असे वैयक्तीक अनुभवावरुन वाटते. एजंटच गाठा.
15 May 2014 - 9:30 pm | यसवायजी
तुमच्या तत्वात केएफ्फ ष्ट्रॉन्ग बसत असेल तर मदत करायचा प्रयत्न केला जाईल.
16 May 2014 - 1:26 am | मुक्त विहारि
मिपाकरांना जमेल तितकी मदत करणे, हेच आमचे तत्व असल्याने, आमच्या तत्वात ही वस्तू बसते.
तुम्हाला पण मिपाकराने हवी ती वस्तू दिल्याशी कारण...(आम खाव्,पेड मत देखो.)
16 May 2014 - 7:57 am | यसवायजी
आम खाव्,पेड मत देखो
मेरेकु येहिच पेड हुना. ;)
अहो ते असंच,जुने स्कोअर सेटल करायचं चाल्लंय.
निल्या दोस्त हय अपना.
16 May 2014 - 1:27 pm | मुक्त विहारि
मग चालू द्या....
(अवांतर....
स्कोर सेटल करण्यात जाम मजा आहे.....)
16 May 2014 - 2:30 pm | बॅटमॅन
अगदी सहमत. ;)
16 May 2014 - 8:26 am | चौकटराजा
चकट फू मधे एका साईटवर आपली गरज प्रसिद्ध करण्याची सोय आहे. www.magicbricks.com
तिथे जाहिरात देऊन पहा. एजंट हा जंत टाळता येईल.
16 May 2014 - 8:50 am | पाषाणभेद
अच्छा तर घर शोधण्यासाठी मदत हवी आहे तर. धाग्याच्या शिर्षकावरून काही अर्थबोध होत नाही हो.
16 May 2014 - 1:02 pm | बॅटमॅन
ओएलएक्स, क्विकर, सुलेखा, इ. ठिकाणी ट्राय करून पहा. जरा वेळ लागेल पण नक्की मिळेल.
http://pune.olx.in/
www.quikr.com
http://classifieds.sulekha.com/pune.htm
19 May 2014 - 3:53 pm | पियू परी
कॉमनफ्लोर.कॉम नावाच्या साईटवर शोधा. एक सोडून हजार ऑपशन्स मिळतील.
शिवाय तुमचा इमेल आयडी रजिस्टर करून ठेवलात (जो डिसप्ले होत नाही) तर तुमच्या अपेक्षांमध्ये बसणार्या घराची नवी एंट्री आली कि तुम्हाला मेल येतो.
मला आत्तापर्यंत ९८ नवीन घरे सुचवली कॉमनफ्लोरवाल्यांनी.
आणि सगळ्यात चांगले म्हणजे लॉगिन वै. करावे लागत नाही.
19 May 2014 - 10:08 pm | पाषाणभेद
परी ग परी पण कॉमनफ्लोर.कॉम नवीन घर विकत घेण्यासाठी तसेच असलेले घर भाड्याने देण्यासाठी आहे ना? आपल्या निलेशला तर घर भाड्याने हवे आहे. आता काय करावे बरं?
19 May 2014 - 10:40 pm | दादा कोंडके
हौसींग ड्वाट इन म्हणून एक नवीन साईट छान आहे. आपल्याला हव्या त्या एरिया मधलं घर बघायची म्यापवर सोय आहे. फोटो वगैरे अपलोड केलेले असतात. गुगलवर हौशींग ड्वाट इन विदाउअट ब्रोकरेज असा सर्च मारा. एजंटांना टाळा, प्यारासाईट्स साले.