गाभा:
आजकाल जे आर्थिक संकट सर्व जगावर कोसळले आहे,त्यामुळे जगातील खुप देश आर्थिक दिवाळखोरी कडे झपाट्याने जात आहेत.जगातील नामंवत वित्तिय संस्था,विमा कंपन्या आपल्या दिवाळखोरया जाहिर करत असताना भारत ह्याला कसा अपवाद ठरेल?
गेल्या काही महिन्यात आपल्या सरकारने जाहिर केलेल्या सवलती,सबसीडीज ह्यामुळे आपले सरकार पण संकटात येण्याची शक्यता आहे. शेतकरयाची कर्जमाफी,सहावा वेतन आयोग ,प्रेट्रोल-डिझेल वरील सबसिडी ह्यामुळे आपले सरकार नजिक च्या काळात नक्कीच संकटात येणार. आपली विमा कंपनी देखिल मार्केट मध्ये खुप अडकली आहे.
कॄपया आपण आपले मत इथे मांडा.
वेताळ
प्रतिक्रिया
13 Oct 2008 - 12:47 pm | घासू
वेताळजी अजिबात घाबरु नका. आपला देश आर्थिक दिवाळखोरी कडे अजिबात जाणार नाही फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या अनावश्यक खर्चावर नि॑यत्रण ठेवावा लागेल.
13 Oct 2008 - 2:02 pm | सखाराम_गटणे™
मलाही तसेच वाटते,
भारत लवकर दिवाळ खोर होणार नाही.
-----
13 Oct 2008 - 2:07 pm | नाम्या झंगाट
अजुन तरी भारतामध्ये शेअर बाजार सोडता काहिही कोसळलेले नाही आणि अर्थ मंत्री यांनी सांगीतल्यानुसार शेअर बाजाराची चढ उतार म्हणजे Indian Ecomony ची नव्हे. त्यामुळे घाबरु नका.
नाम्या झंगाट (अर्थशास्त्रा मध्ये काहीही माहिती नसलेला)
13 Oct 2008 - 2:14 pm | विजुभाऊ
भारतात महत्वाच्या ब्यान्का सर्कारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे अगदी "आइस लॅन्ड "होणार नाही.
भारताची बाजारपेठ स्थीर आहे/ धक्के पचवु शकेल अशी आहे.
13 Oct 2008 - 2:19 pm | धमाल मुलगा
सहमत!
पण ही स्थिती भारताची आहे....इंडियाची नव्हे! भारतात असाल, जपुन रहा इतकंच...इंडियात असाल तर...देव तुमचं भलं करो....
13 Oct 2008 - 5:26 pm | अवलिया
पण ही स्थिती भारताची आहे....इंडियाची नव्हे! भारतात असाल, जपुन रहा इतकंच...इंडियात असाल तर...देव तुमचं भलं करो....
११० टक्के सहमत.
(भारतीय) नाना
13 Oct 2008 - 2:27 pm | मनिष
ब्येष्ट म्हणजे अगदीच ब्येष्टेष्ट प्रतिसाद!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :)
(देव माझं भल करो!) मनिष
13 Oct 2008 - 3:29 pm | गणेश पाटिल
नमस्कार मित्रांनो
13 Oct 2008 - 4:09 pm | टारझन
नमस्कार नमस्कार ... गणपत पाटिल .. कसे आहात जेवण झालं का ?
अवांतर : भारताची आर्थिक परिस्थीती एवढी नाजुन नाही .. पण माणसिकता नक्कीच आहे.. 'आयसीआयसीआय"चंच उदाहरण घ्या ... एकाने टिंगी सोडली .. सगळे बकरागत एकापाठोपाठ एक पळाले पैसे काढायला ... "अफवा पसरवू नका अफवांवर विश्वास ठेउ नका "
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
13 Oct 2008 - 6:40 pm | अभिरत भिरभि-या
आपली विमा कंपनी देखिल मार्केट मध्ये खुप अडकली आहे.
कोणती कंपनी अडकलीये ? टाटा ए.आय. जी का ???
भारत आणि इन्डियाच्या स्थितीत फरक काही फारा काळ राहणार नाही . फक्त एक जात्यात आहे दुसरा सुपात.
येत्या लो.स. आणि इतर ६ वि.स. निवडणुका पाहता सरकार फार कटु निर्णय घेणार नाही हे नक्की !
13 Oct 2008 - 7:14 pm | कलंत्री
अफवा अनेक वेळेस सत्याच्या जवळ पोहोचतात. सहकारी अथवा प्रायव्हेट बॅकेतले पैसे काढुन घेऊन घरी अथवा राष्ट्रियकृत बॅकेत ठेवणे इष्ट आहे.
शेवटी या वणव्यात सर्वसामान्य माणूस होरपोळतो हे विसरु नये.
13 Oct 2008 - 10:37 pm | सागर
भारताला तरी आर्थिक मंदीचा काहीच धोका नाही .
भारतात रिझर्व बँकेचे जे बँका आणि वित्तीय संस्था यावर नियंत्रण आहे, तितके कार्यक्षम नियंत्रण विदेशात खास करुन अमेरिकेत अजिबात नसल्याकारणाने त्यांच्या चुकांची मुक्ताफळे ते भोगत आहेत इतकेच. खरे म्हणजे गुंतवणुकदारांनी अमेरिकेत एक बातमी आली की आख्खे शेअर मार्केट पणाला लावण्याचे काहीच कारण नाही.
तिकडे बाजार कोसळला की झाले... सगळे आपले सुरुच होतात. अरे ज्या कंपनीचा अमेरिकेच्या कारभाराशी काही संबंध नाही त्या सगळ्या कंपन्यांनी का भोगावे हे सगळे?
का आपली ही मानसिकता आहे? आला रे आला रे म्हटले की लांडगाच समजायचं का?
सर्वांनीच जागरुक होणे ही आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्याची गरज आहे.
एक सांगू इच्छितो, विदेशात मजबूरीमुळे वाकोव्हिया, मॉर्गन स्टॅनले यांसारख्या संस्था दुसर्या संस्थांत विलीन होतात.
पण गेल्या काही महिन्यांत भारतीय कंपन्यांनी बर्याच कंपन्या टेक्-ओव्हर केल्या आहेत हेही सगळ्यांना माहीत आहेच. तो मात्र त्या कंपन्यांची क्षमता असल्याचा मोठा पुरावा आहे.
तेव्हा "लांडगा आला रे" या मानसिकतेतून बाहेर येऊन सर्व गुंतवणुकदारांनी आपल्या मजबूत अर्थव्यवस्थेचे बळ ओळखणे गरजेचे आहे असे मला तरी वाटते.
परवाच मी लिहिले होते की १०,००० च्या खाली सेन्सेक्स जाईल असे स्पष्ट संकेत असतानाही शेअरबाजार १०,००० च्या खाली जाणार नाही. आज बाजार ११,००० च्या पार गेला हे त्याचेच द्योतक आहे. अर्थात आत्ताच माझा आडाखा योग्य आहे असे भाष्य करणे म्हणजे मोठी घाई होईल. आगामी ३-५ आठवडे खूप महत्त्वाचे आहेत बाजाराच्या दृष्टीने. त्यातून बाजाराने १३५०० ची मर्यादा ओलांडली की थोडेफार स्थिरावल्याचे समाधान मिळेल
गुंतवणुकदारांनी अजिबात घाबरू नये :)
- सागर
16 Oct 2008 - 7:51 pm | विकास
थोडेफार याच संदर्भात २००५ साली मी गुरूमुर्थींशी बॉस्टन मधे बोललो होतो आणि त्यातील काही भाग नंतर येथे प्रकाशीत झाला होता.
ज्यांना इच्छा असेल त्यांनी तो जरूर वाचावा. मी येथे त्यांची माझ्या प्रश्नावरील काही विधाने जशीच्या तशी इंग्रजीत चिकटवत आहे:
वरील वाक्यातून भारतातील गुंतवणूक आणि अमेरिकेतील गुंतवणूक यातील फरक जाणवेल... अगदी आता ती टक्केवारी थोडीफार बदलली असली तरी! गेल्या आठवड्यात वॉलस्ट्रीट का फायनॅन्शियल टाईम्स मधे वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था आजही स्थानीक मागणीवर जास्त अवलंबून आहे, परीणामी बाहेरचे धक्के आपण बर्यापैकी पचवू शकतो. परकीय दबावाला बळी पडलो असलो तरी, सुदैवाने नुसत्या पाश्चात्यकरणाऐवजी अधुनिकीकरण पण झाले आहे. अर्थात याचा अर्थ सारे काही आलबेल आहे असा नाही. सावध रहावे लागेलच कारण तेल मुख्यत्वे बाहेरून येते...
पण एकंदरीत उद्योग आणि बाजारातील मागणी-पुरवठा यांचा विचार केल्यास - उदंड लेकुरे झाल्याने लक्ष्मी भारतातल्या भारतात रहाण्यास मदत होत आहे असे एकंदरीत तत्वाला विरोधाभास असणारे पण वास्तव चित्र आहे :-)