पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य ,
पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख ,
पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू ,
पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती ,
पैसा म्हणजे दुधाची वाटी ,
पैसा म्हणजे शाळेची पाटी ,
पैसा म्हणजे तरूणाची लाठी ,
पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी ,
पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी ,
पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती,
पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर,
पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त ,
पैसा म्हणजे इंधन , पैसा म्हणजे वंगण ,
पैसा म्हणजे मित्र, पैसा म्हणजे शत्रू,
पैसा म्हणजे देव, पैसा म्हणजे दानव , पैसा म्हणजे गुरु ,
पैसा म्हणजे प्रतिष्ठा , पैसा म्हणजे ताकद ,
पैसा म्हणजे आशिर्वाद, पैसा म्हणजे तळतळाट ,
पैसा म्हणजे स्वप्न , पैसा म्हणजे ध्येय , पैसा म्हणजे त्याग ,
पैसा म्हणजे आनंद,
पैसा म्हणजे लढाई , पैसा म्हणजे संघर्ष,
पैसा म्हणजे जीवन,
पैसा म्हणजे गरज, पैसा म्हणजे हौस, पैसा म्हणजे खाज,
पैसा म्हणजे पाप, पैसा म्हणजे पुण्य,
पैसा म्हणजे वेळ,पैसा म्हणजे स्थेर्य,
पैसा म्हणजे सवय , पैसा म्हणजे अक्कल ,
पैसा म्हणजे सोय,पैसा म्हणजे माप ,
पैसा म्हणजे संधी, पैसा म्हणजे आव्हानं , पैसा म्हणजे प्रयत्न,
पैसा म्हणजे उर्जा ,
पैसा म्हणजे अनुभव, पैसा म्हणजे असूया , पैसा म्हणजे द्वेष,
पैसा म्हणजे मह्त्वाकांक्षा ,पैसा म्हणजे सृजन ,
पैसा म्हणजे स्वातंत्र्य , पैसा म्हणजे बेडी,
पैसा म्हणजे योगदान,
पैसा म्हणजे वीष, पैसा म्हणजे अमृत
पैसा म्हणजे गूढ ....
प्रतिक्रिया
30 Apr 2014 - 5:42 pm | आत्मशून्य
महोदया संपादक ;)
30 Apr 2014 - 5:44 pm | पैसा
मला उचक्या लागल्या ना!
1 May 2014 - 12:10 am | तुमचा अभिषेक
या निमित्ताने आम्हा (नव)सभासदांना तुमच्या नावामागचे रहस्य सांगा ना. दरवेळी विचार पडतो की आपण या नावाचा आयडी का घेतला?
1 May 2014 - 12:12 am | शुचि
अभिषेक पैसाची माहीती पहा ना राव -
1 May 2014 - 12:25 am | तुमचा अभिषेक
ओह्ह हे पाहिले नव्हते, इथे असे काही सापडेल अशी कल्पना नव्हती.
फार्रफारर वर्षांपूर्वी ऑर्कुटच्या काळात हि अशी सवय होती मला, असे लोकांचे प्रोफाईल धुंडाळत फिरायची ;)
1 May 2014 - 12:27 am | शुचि
मला प्रोफाईल वाचायला आवडते कारण बरेचदा, प्रश्नांना खूप "विटी (चतुर)" उत्तरे दिलेली असतात.
1 May 2014 - 12:31 am | तुमचा अभिषेक
खरेय, मी सुद्धा तेव्हा याच हेतूने बघायचो, सोबतीला त्या व्यक्तीची माहितीही मिळायची.
तसेच माझे प्रोफाईल देखील अश्याच अतरंगी माहितीने सजवले होते. आणि त्याचा हेतू मुलींना ईंम्प्रेस करणे वगैरे मध्ये यायचा.
आता ते कारण तर आयुष्यातून बाद झाले. मात्र इथेही लोक्स वाचत असतात प्रोफाईल हे समजल्याने किमान माहिती तरी लिहितो लवकरच.
1 May 2014 - 12:32 am | शुचि
:) जरुर!!!
30 Apr 2014 - 11:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
साफ चूक... सामान्य सदस्या !!! :-)
30 Apr 2014 - 11:15 pm | पैसा
बराबर बोल्लास!
1 May 2014 - 12:53 am | आत्मशून्य
उचक्या काय म्हटल्यावर लागल्या ?
1 May 2014 - 8:30 am | पैसा
संपादकांना एवढ्या सन्मानाने आठवल्यामुळे उचक्या लागल्या.
30 Apr 2014 - 6:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
पैसा आहे एक दुधारी साधन
ना पांढरा, ना काळा
त्याच्या नोटांचा रंग
बहुदा लाल, हिरवा, निळा
पैसा ना चांगला ना वाईट
ना समजूतदार ना हेकट
ना सज्जन ना शठ
ना हुशार ना माठ
त्याला वापरून काहीही करा
पैसा तसाच राहतो
लाल, हिरवा, निळा...
किंवा आजकाल 'व्हर्चुअल'सुद्धा
मात्र ते साधन वापरणारा
त्याला कमावण्यासाठी
त्याला साठवण्यासाठी
त्याला लपवण्यासाठी
त्याला वापरण्यासाठी
वापरतो ती पद्धत असते
बरी नाहीतर वाईट
म्हणजेच केवळ वाच्यार्थाने...
पांढरी नाहीतर काळी
उगाच पैशाला दोष लागतो
आपण त्याला पांढरा-काळा म्हणतो...
या जगात सत्याकडे बघायला वेळ आहे कुणाला ???
30 Apr 2014 - 6:34 pm | अर्धवटराव
एक्का साहेबांची प्रतिभा म्हणजे खणखणीत नाणं.
30 Apr 2014 - 7:52 pm | शुचि
1 May 2014 - 9:15 am | प्रचेतस
मूळ कवितेपेक्षाही एक्काश्रींची कविता भारी.
1 May 2014 - 9:44 am | धन्या
आवडली ही कविता.
30 Apr 2014 - 6:50 pm | रेवती
मला वातलं पैसाताईच्या कामाबद्दल आभार मानायला काकू काढलाय की काय. असो. पैशाला आलेले जास्तीचे महत्व लेखनातून व्यक्त झालेले दिसत आहे.
एक्कासाहेबांची कविताही तसेच काहीसे सांगणारी.
30 Apr 2014 - 6:54 pm | शुचि
पैसा पाण्यासारखा आयुष्यात येत असतो असे वाचलेले. बांध घालून त्याला अडवून ठेवायचे काम आपले. हा जल"निधी" दुष्काळात मदतीस येतो.
30 Apr 2014 - 7:50 pm | भाते
इतक छान मुक्तक लिहिलंय मग ते काथ्याकूट सदरात कशाला? काव्य सदरात टाकायचे होते ना!
धाग्याचे शिर्षक वाचुन संपादकांविषयी आभारप्रदर्शन आहे का असे वाटले.
एक्काकाका,
तुम्हीसुध्दा छान लिहिलंय. मस्तच.
30 Apr 2014 - 7:57 pm | नानासाहेब नेफळे
पैसा मंज्जे सापै ...( साप आहे साप, साऽऽऽप.. आपला तो लांबड्या नागाचा भौ.)
जेव्हा बार्टर सिस्टिम सुरु झाली, तेव्हाच माणसाची अधोगती सुरु झाली. त्या आधी सगळं फुकटात होतं.रानात जा कीती ही कंदमुळं खा.
30 Apr 2014 - 7:58 pm | यशोधरा
पैसा म्हंजे आमची पैसाताई. हाकानाका.
30 Apr 2014 - 11:14 pm | शुचि
+१
1 May 2014 - 12:06 am | तुमचा अभिषेक
एक दिवस येईल जेव्हा पैश्याला काहीच किंमत उरणार नाही !
लवकरच तो एक दिवस येईल जेव्हा आठ आण्याचे नाणेही चलनातून गायब होईल आणि सारे व्यवहार रुपयांमध्येच करावे लागतील !
1 May 2014 - 12:23 am | आयुर्हित
काय नुसते पैसा पैसा करून राह्यले राव?
हा घ्या आणि पहा पैसा ये पैसा .....!
1 May 2014 - 6:37 am | स्पंदना
ह्म्म्म!
कविता छान आहे.
1 May 2014 - 10:03 am | प्रकाश घाटपांडे
सब पैसे कू है मान जगत मे पैसा बना भगवान! ही ताशा संबळ व सुंदरी या वाद्यवृदांवर गावाकडे मिरवणूकीत वाजवल जायच त्याची आठवण येते.
1 May 2014 - 11:42 am | संजय क्षीरसागर
माझी इथली पहिली पोस्ट याच विषयावर होती अणि त्यात सुरुवातीला या ओळी होत्या:
श्वासात अडकला पैसा, पैश्यात अडकला श्वास;
श्वासने सार्थक पैसा की, पैश्याने चाले श्वास?
1 May 2014 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा
स्वप्न

व्यवहार


सत्य
1 May 2014 - 3:24 pm | सस्नेह
पैशाने माणूस विकत घायल, पण माणुसकी ?
पैशाने बेड विकत घ्याल, पण झोप ?
पैशाने औषध विकत घ्याल, पण आरोग्य ?
पैशाने नाती विकत घ्याल, पण प्रेम ?
1 May 2014 - 8:20 pm | नानासाहेब नेफळे
ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो त्यालाच हे तत्वज्ञान रास्त वाटते.
1 May 2014 - 8:23 pm | शुचि
पैशाने औषधे मिळतात हे लई लई भारी वाटतं :)