रायआवळ्याचे सरबत

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
29 Apr 2014 - 8:35 pm

sarbat
साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी.
कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे.
उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली. अगदी कैरीच्या पन्ह्यासारखे लागते.
sarbat

प्रतिक्रिया

रेवती's picture

29 Apr 2014 - 8:51 pm | रेवती

वाह! मस्तच!

मधुरा देशपांडे's picture

29 Apr 2014 - 8:51 pm | मधुरा देशपांडे

जीवघेणे फोटो आहेत. तोंपासू.
कधी चुकून दिसलेच रायआवळे इकडच्या ग्रोसरी स्टोअर मध्ये तर करून बघेन.

तोंड आंबट आंबट्/तुरट झालं. :) मस्त असणार अन औषधीही.

अती झालेले आवळे शेवटी टाकुन दिले! आणि तू सरबताची कृ टाकलीस !!
मी आवळे उकडून घेते.आणि गरात आलं,मीठ्,साखर घालुन मिक्सरमध्ये फिरवुन घेते.

वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय. ते आवळे मीठ लावून, कराकरा चावत खायलाही आवडतात अन दुसरे डोंगरी. आई ग! डोंगरी आवळे तर जीव की प्राण आहेत :(

आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे का असेना ते प्रकृतीस उत्तमच असते.

बाकी रायआवळ्याच्या फोडी करुन त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि ते पाणी स़काळी प्यावे. एक वेगळीच चव लागते.

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2014 - 10:09 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पेयाकृती
रायआवळ्यांचे सरबत एकदम रिफ्रेशींग :)

प्यारे१'s picture

29 Apr 2014 - 10:45 pm | प्यारे१

आली, आमची पाककृती आली. ;)

बेष्ट.
बाकी आवळे प्रकृतीस उत्तम हो!

गणपा's picture

29 Apr 2014 - 11:29 pm | गणपा

या आवळ्यांचं सरबत ही करतात महित नव्हतं. आजवर नुसते मीठ लावूनच खाल्लेत.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2014 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/free-party-smileys-775.gif

सुहास झेले's picture

30 Apr 2014 - 12:53 am | सुहास झेले

भारीच :)

लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा राय आवळा अन तिसरा फणस या तीनच झाडांना लागु होतो माझ्या मते.
काय चव असते. अगदी दिल पोपटी पोपटी रंगाच होउन गेलं. वळीवात विशेषतः यांचा सडा पडलेला असायचा झाडाखाली.
सुरेख अनन्न्या!

लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड होतं आणि बोरांचं. झाडावरुन आवळे, बोरं पाडायची मजाच वेगळी. आता कुठे आवळे दिसले की विकत घेऊन करुन पाहीन हे सरबत. धन्यवाद अनन्या.

प्रचेतस's picture

30 Apr 2014 - 9:32 am | प्रचेतस

सुरेख

पैसा's picture

30 Apr 2014 - 9:53 am | पैसा

मस्त आणि आरोग्यदायक कृती.

दिपक.कुवेत's picture

30 Apr 2014 - 11:28 am | दिपक.कुवेत

चला आता आवळे शोधणे आले. ग्लासाला डेकोरेट केलेले ते दोन आवळे तर फारच आवडले.

कवितानागेश's picture

30 Apr 2014 - 3:33 pm | कवितानागेश

मस्स्स्स्त. आवडते पेय. आणि आवडतं फळ. :)

जागु's picture

30 Apr 2014 - 3:53 pm | जागु

अनन्या सरबत मस्तच आहे.

मी एकदा हे आवळे उकडून क्रश करुन त्यात साखर, वेलची, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून सरबत बनवले होते. तेही मस्त लागत होते.

अनन्न्या's picture

30 Apr 2014 - 6:27 pm | अनन्न्या

आवळे इतके फुकट जाताना पाहून चैन पडेना! पण सरबत एकदम आवडले सगळ्याना, आता आवळे संपेपर्यंत रोज ताजे मस्त सरबत!
सर्वांचे आभार!

मदनबाण's picture

30 Apr 2014 - 6:36 pm | मदनबाण

मस्तच ! :)
बाकी राय आवळे म्हंटले की अंबाबाईचे देउळ आठवते... देवळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अनेक स्त्रीया माप घेउन किंवा वाटे घेउन बसलेल्या असतात.

त्रिवेणी's picture

2 May 2014 - 2:30 pm | त्रिवेणी

मस्त ग.
तु दिलेले कोकम सरबत गेल्या आठवड्यात संपले. आणि फणसाचे चिप्स अजुन आठवता आहेत. अजुन पाठव ग.

मुक्त विहारि's picture

2 May 2014 - 3:26 pm | मुक्त विहारि

झक्कास पा.क्रु.

आयुर्हित's picture

4 May 2014 - 12:41 am | आयुर्हित

रायआवळे(संकृत मध्ये लवली)प्रथमच ऐकले व पहिले.
उपयुक्त पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.