भुतेखेते-हडळी अनुभव

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
8 Oct 2008 - 7:11 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "भुते-खेते-हडळी" अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?

मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) X( असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....

तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? ~X(

अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

इथे चर्चा अपेक्षित आहे....

जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही गुढकथा ( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "थरार" व "चकवा" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा...

आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन ;;)

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Oct 2008 - 7:21 pm | अवलिया

हा लेख वाचुन झाला बुवा... (ह घ्या)

नाना वेताळ

येडा खवीस's picture

8 Oct 2008 - 7:24 pm | येडा खवीस

मग बाटलीत भरायला कधी येऊ म्हणता? :))

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 10:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग बाटलीत भरायला कधी येऊ म्हणता?
मग तुम्ही दोघं बाटलीतले मित्र होणार का येख, तुम्ही नानांचा "बोतल का जिन्न" बनवणार? (ह.घ्या)
अदिती

अवलिया's picture

9 Oct 2008 - 12:20 pm | अवलिया

हडळ विचारते खवीसाला - वेताळाला कसे धरणार?

चालु द्या चालु द्या

विजुभाऊ's picture

10 Oct 2008 - 9:48 am | विजुभाऊ

हडळ विचारते खवीसाला - वेताळाला कसे धरणार
वेताळ म्हणतो त्याला संध्याकाळी बाटलीत भरणार

दुपारच्याला मुंजासंगे एक बाटली रिकामी करणार,
हि ओळ आधी घ्यावी.

प्रगती's picture

8 Oct 2008 - 7:45 pm | प्रगती

माझ्या आवडीचा विषय चालू केल्याबद्द्ल धन्यवाद!
माझा स्वत:चा अनुभव काही नाही पण सगळ्यांचे अनुभव वाचायला आवडतील.
आणी तुम्ही मांत्रिक आहात? मला थोडी प्लॅचेट बद्द्ल माहीती सांगाल का ? म्हणजे आत्म्याशी आपण खरंच संवाद साधू शकतो का?

टारझन's picture

8 Oct 2008 - 8:02 pm | टारझन

हम इच कुबड्या खविस हय ... हमको भुतो का क्या डर .. आणि मांत्रिक फिंत्रिक आपला काय बी वाकडा (किंवा सरळ) करू शकत नाय ...

बाकी " एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) " वाचुन करमणूक झाली ...
आपला यावर काय इश्वास नाय .. पण भुतकथा वाचायला हरकत नाय .. चालु द्या भो ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

झकासराव's picture

8 Oct 2008 - 8:33 pm | झकासराव

तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का?>>>
माझा राक्षस गण असल्याने भुत खेत आमच्या वाटेला जात नाहीत. (म्हणे)
माझा एक मावस भाउ मात्र मनुष्य गण असल्याने जरा अनोळखी,निर्जन, अंधार्‍या भागातन जावुन आला की तापान फणफणायचा.
मग त्याला गोळ्या औषधाबरोब्बरच एक उतारा सोडावा लागायचा असा आठवत.
बाकी कायबी अनुभव नाही.
तुम्ही तुमचेच अनुभव लिहा की इथेच. तेवढीच जीवाला करमणुक वो.
अवांतर :
ते भुता खेतांच मिपा वरच खात आंबोळ्याकडे आहे बघा.
त्योच तुमाला काय मदत करतो का ते बघा. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धनंजय's picture

8 Oct 2008 - 8:46 pm | धनंजय

तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का?

नाही.

अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

नाही.

पण कथा-चित्रपट बघायला आवडतात. ("लेकिन" चित्रपट आवडला होता.) लोकांचे अनुभव आणि प्रतिभेचे आलेख वाचायला आवडतील.

लिखाळ's picture

8 Oct 2008 - 9:19 pm | लिखाळ

भूताचा अनुभव अजून काही आला नाही. आणि आला असला तरी कार्य-कारणभावाचे भलतेच तर्क लढवून आम्ही भूतांच्या अस्तिवावर अन्यायही केला असू शकेल.
आपले आणि इतरांचे अनुभव वाचायला आवडतील.
--लिखाळ.

ऋषिकेश's picture

8 Oct 2008 - 10:50 pm | ऋषिकेश

तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का?

तो कसा असतो? म्हणजे आम्हाला त्रास बर्‍याच गोष्टींचा होतो आणि ज्या व्यक्ती तो त्रास देतात त्या जर भूत असतील तर पहिलं भुत म्हणजे माझा पीएम. :) दिवसभर येथेच्छ मेलामेली करून टिममेंबरना भंडावून सोडणं हा याचा छंद

दुसरे भूत, भयंकर वासाची तेले लाऊन ट्रेनमधे येणारे भय्ये! एकतर या भुताची उंची कमी असते आणि दिवसा ढवळ्या भयंकर वासाची तेले लाऊन ट्रेनमधे बरोबर आपल्या पुढ्यातच येऊन उभे..

अजून एक भूत हल्ली त्रास देते ते म्हणजे न्यूज चॅनलवाले.. भुत असल्याने कधीही कुठेही उपटतात आणि समोरच्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात. या भूताची खरी ओळख म्हणजे आगीत जळाणार्‍या, पाण्यात बुडणार्‍या अथवा नुकतेच गोल्ड जिंकलेल्या व्यक्तींना हे भूत एकच प्रश्न विचारते "आपको कैसा लग रहा है?"

जर तुम्हाला या भुतांवर इलाज माहित असेल तर सांङा.. अजूनहि काहि भुते आहेत पण त्याबद्दल वरील भुतांवर उपचार सांगितल्यानंतर विचारू

-(भुतभीत) ऋषिकेश

सहज's picture

9 Oct 2008 - 7:27 am | सहज

मस्त!!!!!!

अनिरुध्द's picture

8 Oct 2008 - 11:11 pm | अनिरुध्द

सर्व प्रथम हा विषय मांडल्या बद्द्ल येडा खवीस :SS यांचे धन्यवाद.
(नाव घेताना सुद्धा भिती वाटते).

माझा मित्राला आलेला हा एक अनुभव. साधारणतः तीन वर्षांपूर्वी ही गोष्ट. आम्ही सगळे मित्र रात्री ११ वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. गप्पांचे विषय देखील रोजचेच होते. (यामधे भुतं-खेतं, ह्डळी यांचे विषय मुळीच नव्ह्ते. आजकालच्या जीवनपद्धतीमुळे म्हणा किंवा शहरातून हे विषय हद्दपारच झालेत.) दुस-या दिवशी प्रत्येकालाच ज्याच्या त्याच्या कामधंद्याला जायचं असल्यामुळे आम्ही ११-१५ पर्यंत घरी गेलो. हा पण त्याच्या घरी गेला. त्याचं घर मोठं असल्यामुळे तो त्याच्याच खोलीत झोपत असे. आणि तसाच तो त्या रात्रीही झोपला. रात्री १ ते २ च्या दरम्यान तो जागा झाला तोच मुळी घाबरलेल्या अवस्थेत. (त्याच्या म्हणण्याप्रमाणे). त्याला एकदम घाबरल्यासारखं वाटत होतं. कानात कोणीतरी अगम्य भाषेत काहीतरी ओरडत होतं. हातपाय कुणीतरी दाबून धरल्यासारखं वाटत होतं. तोंडाला कोरड पडली होती. पाण्याचा तांब्या समोर दिसत असूनही त्याला हालणं अशक्य झालं होतं. कुठ्ल्यातरी विचित्र गोष्टीचा आपल्याला विळखा पडलाय असं वाटत होतं. त्याच्या ताब्यात काहीही नव्हतं. फक्त विचार करायला डोकं शाबूत होतं. ही अवस्था साधारण ४-५ मिनिटं होती. ५ मिनिटांनंतर त्याला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटलं. पण हातापायातलं त्राण नाहीसं झालेलं होत. हा तसाच विचार करत, घाबरलेल्या अवस्थेत पडून राहीला.

असाच अनुभव त्याला त्या घटनेनंतर २-३ वेळेला आला आहे. पण आता तो जास्त सांगत नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भूत सिनेमामध्ये उर्मिला मातोंडकरला जेव्हा पहील्यांदा भूत दिसतं तेव्हा ती घाबरल्यावर जे काही भाव तिने अभिनयातून तिच्या चेहे-यावर साकारलेत, तशीच अवस्था याची झाली होती. फक्त याचा रिएलिटी शो चालला होता.

काय असू शकेल हा प्रकार?

बबलु's picture

8 Oct 2008 - 11:59 pm | बबलु

ऋषिकेश चा प्रतिसाद वाचून हसून हसून खुर्चीवरून खाली पडायची वेळ आली.

दुसरे भूत, भयंकर वासाची तेले लाऊन ट्रेनमधे येणारे भय्ये!
हे खासच.

न्यूज चॅनलवाले.....आगीत जळाणार्‍या, पाण्यात बुडणार्‍या अथवा नुकतेच गोल्ड जिंकलेल्या व्यक्तींना हे भूत एकच प्रश्न विचारते "आपको कैसा लग रहा है?"
हे तर जबराट. :)

....बबलु

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 12:01 am | विसोबा खेचर

या बाबतीत मला मिपाच्या तंत्रमंत्रविभागप्रमूख, तंत्रमंत्रविद्याविभूषिणी आदरणीय भयालीदेवी यांचे विचार वाचायला आवडतील! :)

आपला,
तात्यासमंध.

संदीप चित्रे's picture

9 Oct 2008 - 2:49 am | संदीप चित्रे

दीपिका पडुकोण असेल तर आवडेल :)
(जिज्ञासूंनी 'ओम शांती ओम' पहावा ;) )

तर अजून कुठल्या भुतांची गरज वाटते का? ;)

(खुद के साथ बातां : रंग्या, भुतांना विडंबन येते का रे? का भुते हीच माणसाचे विडंबन असतात? B) )

चतुरंग

स्मित's picture

9 Oct 2008 - 4:14 am | स्मित

तुमच्या मित्राला "sleep paralysis" झाला असणार. अधिक माहिती साटि इथे वाचा........

http://en.wikipedia.org/wiki/Sleep_paralysis

सुक्या's picture

9 Oct 2008 - 5:57 am | सुक्या

आपला ह्या भुता - खेता वर ईस्वास नाय बा. कुठल्या भुता ला बी आपुन घाबरत नाय. तरी पन असावं म्हुन गळ्यात तुळशीची (सास बी कबी भउ वाली तुलसी नाय बरं का) माळ घातली आन एका पीर बाबा चा ताबीज पन बांधला. भुता चा काय भरोसा राव बसलं कदी मानगुटीवर तर काय घ्या.

काल राती टी. वी. वर त्यो भुताचा पोग्राम पायला राव. जाम भ्यालो मी. रामाचा फुटु धरुनच झोपलो.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अमेयहसमनीस's picture

9 Oct 2008 - 7:44 am | अमेयहसमनीस

अनुभव बरेच आहेत (दिल्ली चा अनुभव तर अंगावर शहारा आणणारा आहे)

ते मी कधीतरी नंतर लिहीन.

भूत्या (अमेय)

अनिल हटेला's picture

9 Oct 2008 - 7:44 am | अनिल हटेला

भूत - खेत असतात म्हणे !!!

आपल्याला अनुभव ही नाय, आणी आम्हाला त्रास देणार भूत जन्माला यायचये !!

असो !!

ऋषिकेश चा प्रतिसाद जबरा आहे !!

आजच्या युगात त्याने वर्णीलेली भूते च खर तर जास्त त्रास देतात !!!

बाकी भूत कथा ,चित्रपट पहायला आबडतात !!!

आणी आमचा देखील राक्षस गण असल्यामुळे ,

कुठल भूत पंगा घेणार !!

बाकी चालू देत !!

इतरांचे अनुभव वाचायला आवडतील !!!

(वरीजनल भूत )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Oct 2008 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भूताखेतांवर विश्वास नाही आणि त्यांना घाबरत नाही. पण जिथे भूते असतात तिथे आम्ही जात नाही. :)

येडा खवीस's picture

9 Oct 2008 - 9:34 am | येडा खवीस

बर्याच मेंबरांना मी "मांत्रिक" आहे याचं आश्चर्य वाटलेलं दिसतय्...पण इतर जसे व्यवसाय आहेत तसाच हा देखील माझा व्यवसायच आहे.. आणि मला त्या व्यवसायामधुन प्रचंड रिस्पेक्ट आणि बरा पैसा मिळतोय. ( पैसा घेतल्याशिवाय कामं करायची नाहीत हे धोरण अगदी सुरुवातीपासुन असल्याने)

थोडं गंभीर आणी खरं--- B)

पातंजलींचे योगशास्त्र आणि त्यातील साधनपाद, समाधीपादाचा अभ्यास व नंतर आद्यशंकराचार्य प्रणीत श्रीविद्येचा अभ्यास केल्यानंतर वातावरणातील अदुश्य गुढशक्तिंची स्पंदने कळू लागली व या मार्गाकडे वळलो...आयुष्यात खुप काहीतरी करुन लोकांना अशा समस्यांमधुन व्यवस्थितपणे बाहेर काढल्याचे समाधान आहे ते वेगळेच

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

येडा खवीस's picture

9 Oct 2008 - 9:37 am | येडा खवीस

पतंजली योगसुत्रामध्ये .... ध्यान, धारणा आणि समाधी यांच्या एकत्रिकरणातुन ( त्रयमेकत्र संयम:) संयम साधता येतो आणि पंचमहाभुताचे अवलोकन करता येते मी त्या भानगडीत न पडता संयमाचा आधार घेऊन पंचमहाभुतांपेक्षा नुसत्या "भुतां"च्या अभ्यासावर जोर दिला

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

पदभ्रमण, गिर्यारोहण या निमित्ताने, आत्तापर्यंत जवळपास खूपदा जंगले, दर्‍या-खोर्‍यातून हिंडलो आहे. रात्रीच्या समयी जंगलातून फिरण्याचा आनंद घेतला आहे. विशेष म्हणजे रतनगड, भीमाशंकर [शीडी घाटातुन] , सिद्धगड [मच्छिंद्रगडाच्या बाजुला] अश्या निर्जन परिसरातुन, तोरणा किल्ल्यावर २-३ च्या सुमारास पाणी शोधण्यासाठी भटकंती असे रात्रीच्या प्रवासाचे अनुभव आहेत. तरी सुद्धा भूता-खेताचे अनुभव ईल्ला!!!!!

नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांच्या कादंबर्‍या, कथा नाईट शीफ्ट असताना वाचतो. नाईट शीफ्टला मी, एक सिक्युरीटी आणी अंधार एवढे क्रावूड आमच्या कंपनीत असते.
तरी झोप आवरत नाही.

खवीस यांच्या साठी : उतारा, लिंबु-मिरची, मंतरलेल्या अक्षता यांच्यात काही तथ्य असते का हो?

ह्या दोन घटना आत्मस्तुतीचा रोष पत्करुन देत आहे-

कसबा पेठेत रहात असताना आमच्या सदनिकेच्या दारात कुणीतरी लिंबु उभे कापुन त्यात गुलाल, बुक्का तत्सम गोष्टी भरून ठेवले होते. आमच्या मातोश्रींनी ते बघीतले आणी तारसप्तकात आवाज नेला. तेव्हा मी ते लिंबु उचलले, धुतले आणी ग्लासभर पाण्यात पिळुन ते पाणी पिवुन टाकले.
[नंतर आमच्या कानाखाली गणपती उमटला, ते सांगणे नकोच].
तरी मला काही फरक जाणवला नाही, अगदी एक चांगली गोष्ट घडली, आमच्या आयुष्यात एका प्रेम्-प्रकरणाचा समावेष झाला.
[कसबा पेठेत पवळे चौकातील अलोक नगरी येथे मी एफ बिल्डींग मध्ये रहात होतो. या जागेचे एक वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या बिल्डींगच्या जागी कब्रस्तान होते, आणी ५ फूट खोदल्यावर मजूरांनी घमेली भर भरून कवट्या, हाडे फेकली होती. ]

नंतर शुक्रवार पेठेत रहात असताना, पोर्णिमेला एका बाईने उतारा काढुन सोसायटीच्या दारात ठेवला होता. मी तो लाथाडुन कणकेचा दीवा टाचेखाली चिरडुन फेकला.

तरी आत्तापर्यंत सर्व व्यवस्थित चालु आहे. मी असेच नाही, माझे अनेक मित्र ह्या गोष्टी सर्सास करतात. उतारा खाणारे काही माझ्या ओळखीचे आहेत. व्यवस्थित बसून उतारा खातात, लिंबु-मिरचीचे पोहयात वापर करून चवीने खातात. तथ्य असेल तर हे कसे?

येडा खवीस's picture

9 Oct 2008 - 12:07 pm | येडा खवीस

हर्षदराव,

उतारा हा व्यक्तिमधील अशुभ्-अमानवी गोष्टींचे निराकरण करण्यासाठी काढला जातो...त्यात बराचसा भाग हा मानसिकतेचा आहे. उतारा काढताना संबंधित व्यक्तिला आपल्यामध्ये असलेली काहीतरी अशुभ शक्ति गेली आहे असे मानसिक पातळीवर वाटले तरी त्याचा आजार जर तो मनोशारिरीक असेल ( सायकोसोमेटीक) तर बरे वाटु लागते आणि उतारा काढणार्यालाही समाधान मिळते

मात्र जर व्यक्तिला खरोखरच बाधा झाली असेल तर तो आत्मा हा सुक्ष्म वासनादेहात असल्याने त्याच्या वासनेचा क्षय व्हावा म्हणुन काही अन्नपदार्थांचे उतारे काढले जातात
उ.दा.- दहिभात, नारळ, फरसाण, जिलबीसारखा गोड पदार्थ

लिंबु-मिरची-बिब्बा हे शनि पिडेसाठी वापरतात

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

यशोधरा's picture

9 Oct 2008 - 12:26 pm | यशोधरा

हा श्रीविद्येचा अभ्यास केलात म्हणजे काय केलेत? त्याचे काही पुस्तक किंवा पुस्तके आहेत का? कुठून मिळवलीत? पातंजलीचे योगशास्त्र कोणाकडून शिकलात?

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2008 - 1:38 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो...

आपल्या अभ्यासाबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. कधी लिहिताय. आणि आपल्या व्यवसाया निमित्त आपल्याला काही विशेष अनुभव आले असतिल ते पण लिहा.

बिपिन.

चतुरंग's picture

9 Oct 2008 - 4:25 pm | चतुरंग

वाचायला आवडेल. अनुभव लिहावेत.

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Oct 2008 - 6:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या अभ्यासाबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. कधी लिहिताय. आणि आपल्या व्यवसाया निमित्त आपल्याला काही विशेष अनुभव आले असतिल ते पण लिहा.
+१

आणि तुमच्या गोष्टी वाचल्यावर तुम्ही गोष्टी वेल्हाळ आहात हे सां. न ल.

लिवा आमी वाचतो.

(हडळ) अदिती

येडा खवीस's picture

9 Oct 2008 - 4:49 pm | येडा खवीस

साधारण मी टी.वाय्.बी.ए.(तत्वज्ञान) ला असताना असाच मुंबईत फोर्ट एरिआ मध्ये फिरत असताना "श्रीआद्यशंकराचार्यांचे"(श्रीविद्या तंत्र) हे एक दुर्मिळ पुस्तक फुटपाथवर सापडले...खुप जुनी आवृत्ती होती ...दिल्लीचे प्रकाशन होते. सहज विकत घेऊन घरी आल्यावर चाळले तेव्हा त्यात श्रीयंत्र-सिध्दी-साधना अशी प्रकरणे दिसली. ते पुस्तक मी नुसते वाचले नंतर काही काळाने माझे मित्र श्रीविश्वेश दांडेकर यांच्या सहवासात आल्यावर मला त्यांच्याकडुन श्रीविद्येची आणखीन माहीती मिळाली व माझ्यापरिने मी अभ्यास सुरु केला...श्रीविद्येचा मुलमंत्र( गुप्त असतो), श्रीयंत्र यांच्या आधाराने पंचमहाभुते, विश्व असा अभ्यास असतो. त्यात ऐहिक सौख्यासाठी श्रीसुक्ताचाही अभ्यास करावा लागतो पण "श्रीललितासहस्त्रनाम" हे मुख्य स्तोत्र....श्रीविद्येत हादी विद्या आणि कादिविद्या असे दोन प्रकार आहेत...त्यापैकी कादिविद्या ही शुभ कामासाठी आणि संकल्पपुर्तीसाठी वापरायची असते....समांतर पातळीवर माझा पातंजलयोगविद्येचाही अभ्यास मीच करत होतो...कोल्हटकर, नानासाहेब रेळे, ओशो अशा अनेक रेफरन्सेस वर माझा मीच अभ्यास करत गेलॉ..रोज सुरुवातीला २० ते २५ मिनीटे ध्यानावरुन रोज १ ते १.३० तास ध्यान वाढवत गेलो....रहस्य उमगत गेली...त्याचा उपयोग मी शेवटी माझ्या आवडीच्या अशा
"भुतभगाव" या विषयासाठी केला आणी मग पुढे पुढे सवयीने "वाताकर्षण"सारखे तंत्र अवगत करुन भुते काढणे व त्यांना इतरत्र नेऊन सोडणे, गती देणे असले प्रकार व्यावसायिक पातळीवर सुरु केले....लोकांना बाधानिवारण झाल्यावर फरक जाणवत गेले....मी अधिक तयार होत गेलो....
क्रमशः

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Oct 2008 - 6:48 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरदस्त...

उत्सुकता वाढते आहे. तुम्ही लिहाच, मांत्रिक बुवा. आज पर्यंत स्वतः भूत बघितलेली (म्हणजे भूताचे अस्तित्व जाणवलेला) कोणी भेटला नव्हता. सगळे दुसर्‍यांचा / इतरांचा संदर्भ देऊन सांगायचे. एवढे आधिकारवाणीने बोलणारे तुम्हीच बघितले प्रथम. येऊ द्या.

बिपिन.

लिखाळ's picture

9 Oct 2008 - 7:41 pm | लिखाळ

स्वतःचे अनुभव सांगणारे विरळाच.. अनुभव ऐकायला उत्सुक आहोत..
तसेच वर विजूभाऊंनी विचारलेल्या `माणसाचे भूत होते तर प्राण्यांचे का नाही?' या प्रश्नाचे उत्तर सुद्धा जाणून घ्यायचे आहे.
--लिखाळ.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Oct 2008 - 10:34 am | llपुण्याचे पेशवेll

इंग्लंडाच्या पॅलेस मधे तिथल्या कुत्र्यांची भुते रखवालदारांनी पाहील्याचे ओशन ट्रँगल का कोणत्यातरी पुस्तकात वाचल्यासारखे आठवते आहे.

पुण्याचे पेशवे

मन's picture

9 Oct 2008 - 8:49 pm | मन

भुतेखेते-हडळी असतात.
यापुर्वी मी कैक भुतांना झपाटलं आहे.!!!!

पण शिंचे तावडीतुन सटकले आणि कुठल्याश्या खवीस नामक मांत्रिकानं सगळ्यांना वाचवलं...(ह घ्या)
तर सांगायचं म्हणजे भुतं असतात...
ती कुठं असतात?
ती असतात तुमच्या बॉसच्ता डॉक्यात्...तुमच्यावर वक्रड्र्ष्टी ठिवुन.
ती असतात २००३च्या वर्ल्ड कप अंतिम सामन्यात पाँटिंगच्या मनगटात्.......
आणि देतात आपली दाणदाण उडवुन....
ती असतात कॉलेजात...खडुस प्राढ्यापकाच्या रुपात...
ती असतात चौका चौकातल्या "मामा"च्या वेशात...
मनार आलं तर हवं तेव्हा तुम्हाला कापयला..

ते बघा ते एक भूत :- काथ्याकुट टाकणारं.
हे बघा ते एक भूत :- त्याला प्रतिसाद देणारं
ते बघा ते एक भूत :- तुमच्या मागे उभं राहुन पासवर्ड टिपणारं
ते बघा ते एक भूत :- तुमची मौल्यवान माहिती/विदागार नष्ट करुन "व्हायरस च्या नावनं मिरवणारं."
ते बघा ते एक भूत :- विविध आय डी बनवुन मिपाकरांना त्रस्त करणारं.
ते बघा ते एक भूत :- चांगलं भूत....
मिपकरांच्या सोयीसाठी त्या भो***चा बंदोबस्त करणारं.
ते बघा ते एक भूत :- व्यानि च्या नावनं डोकं संत्रस्त करणारं.
ती बघा ती हडळ :- खरडीच्या रुपात येउन भल्त्याच लिंक देउन तुमचं वाट्टोळं करणारी हडळ.

गमतीचा भाग अलहिदा, पण प्रत्यक्ष आयुष्यात माझे कधीच भूत्-खेत्-प्रेतात्मा अशा प्रकाराशी गाठ पडली नाही. तरीही अमाशेच्या रात्री अंधारात एकटं फिरताना माझी लै
टरकते.
त्यामुळं इथं चर्चा विषयात भर घालु शकणार नाही. पण इतरांचं वाचायला आवडेल.

आपलाच,
भुतांना झपाटणारा
मनोबा

वृषाली's picture

10 Oct 2008 - 4:47 pm | वृषाली

हे एकदम झकास

मीनल's picture

9 Oct 2008 - 9:13 pm | मीनल

हॅलोविन जवळ येत आहे .
त्यासाठी हा विषय एकदम योग्य.
पण मी घाबरट.
मी एक ही वाचणार नाही .
मीनल.

मुक्तसुनीत's picture

9 Oct 2008 - 10:51 pm | मुक्तसुनीत

मला भूताखेतांची पार्टी खराब करायची नाही ; पण या बाबतीत बोललेच पाहिजे.

एकविसाव्या शतकात , इन्टरनेटवरील एका फोरम मधे आपण भूतप्रेत घालवणारे व्यावसायिक मांत्रिक आहोत हे म्हणणे विनोदी वाटेल . तसे ते सर्वांच्या बुद्धीमत्तेचा अपमान करणारे आहेसुद्धा ; पण दुर्दैवाने ते सामाजिकदृष्ट्या काळोख वाढवणारे , नाडलेल्यांचे शोषण करणारे , आणि एकंदर समाजाला अज्ञान आणि अनाठायी भीतीच्या दहशतीमधे लोटणारे आहे. या दृष्टीने , 'येडा खवीस' यांसारखे लोक हे अल्पशिक्षित , गरीब , नाडलेल्या माणसांच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे , त्यांच्यातील अज्ञानाचा फायदा घेणारे ठरतात.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तुम्हाला तुमचा व्यवसाय , त्यातील अनुभव वगैरे मांडण्याचा अधिकार आहेच. पण या व्यवसायाला एक गंभीर अशी नैतिक बाजू आहे हे इथे नमूद व्हायला हवे.

भयकथा, प्लँचेट , भूताखेतांबद्दलचे किस्से आणि चर्चा या गोष्टी रंजनाच्या आहेत. त्याबाबत कुतुहल वाटणे , त्याबद्दल काय वाटते ते सांगणे इ. इ. गोष्टी या सामान्य बाबी आहेत. पण "व्यावसायिक मांत्रिकी" सारख्या गोष्टींबद्दल मी माझा तात्विक विरोध व्यक्त करतो. जो व्यवसाय तुम्ही उपजीविका म्हणून निवडला आहे तो अज्ञानाची , अनाठायी भितीची कास धरणारा , लोकांना फसवणारा आहे असे मला वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समोर तुम्ही आपल्या व्यवसायातील तथ्य सिद्ध करावे असा सल्ला देतो.

मानस's picture

10 Oct 2008 - 1:24 am | मानस

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे "भूत दाखावा, पाच लाख रूपये मिळवा" हा उपक्रम आजही कोणी मोडला नाही. माझ्या माहितीप्रमाणे सध्या ५ लाखाचा आकडा आता १० लाखाच्या घरात गेला आहे.

वर हर्षद आनंदी यांनी म्हण्टल्या प्रमाणे मी सुद्धा पदभ्रमण, गिर्यारोहण या निमित्ताने मनसोक्त भटकंती केली आहे. साधारण १९८० ते १९९८ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्र, हिमालय, सिक्किम्,नेपाळ, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे पदभ्रमण, गिर्यारोहण केले आहे. त्यानंतर युरोप, अमेरिका येथेही मनसोक्त भटकंती केली आहे. बर्‍याच वेळेस रात्री, अपरात्री मैलो-न-मैल चालावे लागायचे. भूताखेतांचे कित्येक किस्से ऐकले, पण शेवटी भूताला भेटायची इच्छा अजुनही अर्धवटच आहे.

एकदा "गोरखगड" ला मी व माझा मित्र दोघेच गेलो होतो, त्यात तो काही कारणामुळे पुढे गेला (एकटाच) आणि मी शेवटची एसटी पकडुन रात्री ९ वाजता गोरखगड चढायला सुरुवात केली. तेव्हा गावकर्‍यांनी भूताखेताच्या विविध कहाण्या सांगुन माझी मोठी करमणूक केली होती व मी बहुतेक जिवंत परत येणार नाही असे भाकितही केले होते. दुसर्‍या दिवशी त्याच गावकर्‍यांबरोबर सकळची न्याहारी केली तेव्हा कदाचित मीच भूत झालो असं त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल रात्री गडावर गेलेला हाच तो इसम का? असं विचित्र भाव त्यांच्या तोंडावर दिसत होते.

असो, असे अनेक किस्से आहेत. भूत पाहिलेल्यांना मनःपूर्वक अभिनंदन, न पाहिलेल्यांना प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर.

प्राजु's picture

10 Oct 2008 - 2:52 am | प्राजु

भूत पाहिलेल्यांना मनःपूर्वक अभिनंदन, न पाहिलेल्यांना प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर.

प्रयत्नांती परमेश्वर कसं.. इथे प्रयत्नांती भूत हवं ना! ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मानस's picture

10 Oct 2008 - 7:13 am | मानस

यू सेड इट!!

प्रयत्नांती भूतच!! :)

बाकी पुरुषांना हडळ आणि स्त्रियांना मुंजा वगैरे भेटतात असा काही भूता-खेतांचा नियम आहे का?

टारझन's picture

10 Oct 2008 - 3:09 pm | टारझन

बाकी पुरुषांना हडळ आणि स्त्रियांना मुंजा वगैरे भेटतात असा काही भूता-खेतांचा नियम आहे का?
नैसर्गिक नियम आहे तो :) कधी अपवाद असू शकतील ... पण त्यात गैर नाही .. हे व्यक्तिगत प्रश्न आहेत , हडळ व मुंजांचे ..

मुंजा खवीस

आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

येडा खवीस's picture

10 Oct 2008 - 8:54 am | येडा खवीस

मुक्त सुनीत व तत्सम...

या जगात नैतिक-अनैतिक अशी बंधने असलेले व नसलेले अनेक व्यवसाय आहेत. नैतिकता हाच जर पोईंट असेल >:P तर आज तमा बीअर शोप्स, दारुचे गुत्ते आणि पब, जुगाराचे अड्डॅ बंद व्हायला हवे होते. विषय माझ्या प्रोफेशनल मांत्रिकईचा आहे न तर तो व्यवसाय कुठेही कागदपत्रि नोंद केलेला व्यवसाय नाही मी फक्त केलेल्या कामाचे पैसे घेतो आणि ते सुध्दा समोरच्या व्यक्तिला ( त्याला अपेक्षित असलेला) अनुभव आला तरच्....बरोबर्....अंनिस वगैरे लोकांना मी भुते दाखवुन सिध्द करायला मला वेळ नाही, आणि हौसही नाही ( त्यामुळे मला ढोंगी-पाखंडी म्हणले तरी त्याचा निर्लज्जपणे स्विकार करेन)

मी कोणता व्यवसाय करावा...त्यात काय करावे...किती नैतिक्-अनैतिकतेची बंधने पाळावी हे मला कोणाकडुनही शिक्ण्याची गरज नाही!!!

मला वाटेल ते मी करणार्....वाट्टेल ते लिहिणार्....ज्याला जमेल त्याने वाचावे, उत्तरे द्यावीत अन्यथा विषय सोडावा किंवा काय वाट्टेल ते करावे

बाय द वे!!! वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना किती कुतुहल आहे ते लक्षात आले असेलच तुम्हाला....

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

सहज's picture

10 Oct 2008 - 9:08 am | सहज

>>वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना किती कुतुहल आहे ते लक्षात आले असेलच तुम्हाला!

ये.ख. तुमच्या यशस्वी धंद्यामागचे कारण दिसले व तेच दु:ख. शेवटी झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये तुन्ना तुन्ना. बरोबर ना?

मुक्तसुनीत's picture

10 Oct 2008 - 9:18 am | मुक्तसुनीत

तुमचे पोस्ट वाचले . माझे मत तुम्हाला झोंबलेले दिसते . असे असले तरी त्याचा प्रतिवाद तुम्ही केला आहे असे वाटत नाही. तुमच्या व्यवसायाबद्दल नेमके काय आक्षेपार्ह आहे हे मी लिहिले आहे. आता (तुमच्याच भाषेत सांगायचे तर ) कशाचाही निर्लज्जपणे स्वीकार करायचाच म्हण्टले तर मग कसला आलाय वाद नि कसला आलाय प्रतिवाद म्हणा :-)

तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करणार आणि वाटेल ते लिहीणार यात काही नवे नाही . येथील प्रत्येक जण त्याला वाटेल तेच लिहीत असतो/असते :-) प्रश्न इतकाच आहे , की जे लिहीले जाते ते आक्षेपार्ह आहे का ? तर तुमच्या बाबतीत आहे. त्याबद्दलचा माझा निषेध मी व्यक्त केला आहे. तो काही बदलत नाही.

राहता राहिले "वरच्या पोस्ट वाचल्यावर लोकांना किती कुतुहल आहे " या बाबत. मी याआधीच लिहील्याप्रमाणे भूतप्रेतादि गोष्टींबद्दलचे कुतूहल , त्याबद्दलच्या चर्चा , कथा-कहाण्या या सामान्य बाबी आहेत. परंतु या गोष्टींचा बाजार करून वर त्याबद्दल "मला वाटेल ते मी करणार्....वाट्टेल ते लिहिणार्...." वगैरे मुक्ताफळे यातून तुम्ही आपली यासंदर्भातली तार्किक भूमिका (किंवा कुठल्याही तार्किक भूमिकेचा अभाव ) दाखवता. असो.

बाकी "अन्यथा विषय सोडावा " वगैरे भाषा आपण आपल्या खाजगी हद्दीत करणे बरे . :-) सार्वजनिक ठिकाणी अशी वृत्ती तुमच्या धंद्याला काही पोषक नाही. कसे म्हणता ?

टारझन's picture

10 Oct 2008 - 3:21 pm | टारझन

मुक्तसुनीत राव .. तुमचे विचार मुक्तपणेच लिहा ... बरोबर गोष्टींच्या आम्ही नेहमीच सहमतात आहोत ... इथे करमणूक म्हणून लिहीले असते तर ठिक ... पण इथे धंद्याची जाहिरात करणे चुक ... कुठे तरी प्रभु (जय हो प्रभुदेवा) लिहिलं होतं आज काल दुनिये मधे भिती दाखवून काहीही खपवता येतं. उदा. मृत्युची भिती दाखवा, विमे विका, अजुन कसली भिती दाखवा गोळ्या विका , ई.ई.
येड्या खविसाचा हा एक येडा प्रयत्न वाटतो .. सुरूवातीला मी प्रतिक्रिया दिली तेंव्हा इथे उघड उघड व्यवसायिकतेच्या गोष्टी सुरू होतील असं वाटलं नव्हतं .. तिकडे कोणी तरी पैसे घेउन नाड्या विकतोय !! अरे चाल्लय काय ? आम्हाला काय शेंबुड चाळे समजता काय ? मागे तात्यांना कोणी तरी व्यनी करून लेख प्रसिद्ध करण्यासाठी पैसे मागितल्याचं आठवतय ... आता तो "अबक कोण?" या बाबतीत आमची पाल चुकचुकते आहे ... असो ...

.ज्याला जमेल त्याने वाचावे, उत्तरे द्यावीत अन्यथा विषय सोडावा किंवा काय वाट्टेल ते करावे .
आमच्या प्रतिसादा नंतर आमच्या नावानेही सेम खरड निघेल .. पण उत्तर आधिच .. पण सुनित ष्टाईल नव्हे .. कुबड्या खविस ष्टाईल ...
असल्या बाता "तिर्थरुप रोड" वर जाउन कराव्यात .. इथे नाहीत . इथं जे लिहाल ते सार्वजनिक आहे .. आणि सगळ्यांना बोलायचा तितकाच हक्क जितका लिहिणार्‍याला ...

बाकी सुनित रावांच्या मुद्द्यांवर जो प्रतिवाद केला आहे .. त्यावरून पळकुटे पणा दिसला .. इथे पोस्ट आणि लेख टाकायला रिक्कामटेकडे पणा आहे .. पण अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांकडे आपला खरेपणा सिद्ध करायला वेळ नाही ? व्यावसायिक बाजु लक्षात घेतली तर अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांचं सर्टिफिकेट लाउन आमची तोंड बंद करा आणि मग हवा तेवढा धंदा करा (मिपा वर नाही)
फुकटचा सल्ला : पुड्या सोडू नयेत ..

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...

विसोबा खेचर's picture

10 Oct 2008 - 4:26 pm | विसोबा खेचर

तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करणार आणि वाटेल ते लिहीणार यात काही नवे नाही . येथील प्रत्येक जण त्याला वाटेल तेच लिहीत असतो/असते प्रश्न इतकाच आहे , की जे लिहीले जाते ते आक्षेपार्ह आहे का ? तर तुमच्या बाबतीत आहे. त्याबद्दलचा माझा निषेध मी व्यक्त केला आहे. तो काही बदलत नाही.

मुक्तरावांशी सहमत आहे...

मिपावरील सर्व सभासदांना अगदी भरपूर लेखनस्वातंत्र्य दिले आहे तरीही त्याचा अर्थ 'वाटेल ते..!' असा होत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी...

तात्या.

यशोधरा's picture

10 Oct 2008 - 9:41 am | यशोधरा

भूताखेतांबद्दल कुतुहल म्हणण्यापेक्षा श्रीसूक्त, श्रीललितासहस्त्रनाम स्तोत्र , श्रीयंत्र, योगशास्त्र इत्यादींचा नामोल्लेख आल्याने कुतुहल वाटले.

मुक्तसुनीत यांचे म्हणणे बरोबर वाटले. मी असेच करणार वगैरे भाषा करण्यापेक्षा, जर तथ्य असेल तर समजावून देण्यात काही तोटा नाहीच. भूत पळवले असे लोकांना वाटण्याचा संबंध लोकांच्या मानसिकतेशी असू शकेल का?? म्हणजे तुम्ही जे काही मंत, तंत्र इत्यादी त्यांच्यासमोर करत असाल, ते पाहून तशी एक मनोभूमिका तयार होत असावी...

येडा खवीस's picture

10 Oct 2008 - 10:04 am | येडा खवीस

माझ्या बोलण्याने जर काही दुखापत झाली असेल तर मनःपुर्वक क्षमा!!!

अहो काय आहे!! विषय जरा नाजुक आहे, त्यामुळे टेक्निकली सिध्द वगैरे करणे कसे शक्य आहे....मी काम करत रहाणार, लोकांची सेवा करणार आणि लिहीत रहाणार्...याला पर्याय नाही

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

प्रकाश घाटपांडे's picture

18 Jul 2010 - 5:50 pm | प्रकाश घाटपांडे

जादूटॊणा मंत्रतंत्र यावर मानसोपचार तज्ञ डॉ.सुधीर कक्कर यांची पुस्तके वाचनीय आहेत.त्यांचे एक पुस्तक औषधं , उतारे आणि आशिर्वाद हे डॉ श्रीकांत जोशी यांनी अनुवादित केले आहे.
अंधश्रद्धा ही लोकांची मानसिक गरज आहे. त्यामुळे मांत्रिक तांत्रिक रहाणारच. लोक स्वतः बदलत नाहीत त्याऐवजी बाबा बुवा बदलतात. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
असे आम्ही मनोगतात म्हटले आहेच.
(फलज्योतिष चिकित्सा मंडळ)
प्रकाश घाटपांडे

अध्यात्मिक मांत्रिक आहात?
वेताळ

अभिज्ञ's picture

10 Oct 2008 - 10:39 am | अभिज्ञ

येडा खवीसजी,आपण एक मांत्रिक आहात हे वाचून काहि शंका विचारु इच्छितो.
तुमचे दरपत्रक इथे देउ शकाल का?म्हणजे एक भुत काढायला साधारण किती पैशे घेता?
वेताळ,मुंजा,संमंध,हडळ ,चुडेल,पिशाच्च...... ह्यात सर्वात डेडली भुत कुठले?
भुताला धर्म असतो का? म्हणजे मुसलमानाचे भुत जास्त डेंजरस कि हिंदुंचे?
भुत काढण्याबरोबरच तुम्ही एखाद्याला भुताने झपाटवायची सुपारी घेता का?असल्यास त्याचा दर काय?

अभिज्ञ.

आंबोळी's picture

10 Oct 2008 - 12:42 pm | आंबोळी

भुत काढण्याबरोबरच तुम्ही एखाद्याला भुताने झपाटवायची सुपारी घेता का?असल्यास त्याचा दर काय?

=)) =)) =)) =)) =))

(धारी)आंबोळी

विनायक प्रभू's picture

10 Oct 2008 - 2:47 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मला बोलवा. फुकट्ला दरपत्रक नसते. असा डोक्यावर बसतो कि सांगता सोय नाही.

ये.. आये वं..मले लयं भ्याव वाटत्ये हाय !
इथं सारी भुतभुत खेल खेला लागलीत वं आये...
मिपाच्या लोकाईले भुतानं झपाटलं वाटतं...!

मनीम्याऊ...

आंबोळी's picture

10 Oct 2008 - 3:32 pm | आंबोळी

.

मृगनयनी's picture

10 Oct 2008 - 11:38 am | मृगनयनी

या भुतांचा "असंभव" मधील "सुपर नॅचरल पॉवर"शी काही संबंध असु शकतो का?

(जर कोणाला खरच भूतबाधा झाली असेल, तर जवळच्या नाडी-जोतिष- केन्द्रात आपली ज.प. घेऊन जावे. आपणास योग्य तो उतारा मिळेल. नक्की कोणाचे भूत का बरे त्रास देत आहे, याचे ही रहस्य उलगडु शकेल...)

हरि ओम|

अवलिया's picture

10 Oct 2008 - 2:39 pm | अवलिया

पातंजल योगशास्त्र अर्थात भारतीय मानसशास्त्र असे कोल्हटकरांचे ढवळे प्रकाशनाचे पुस्तक आहे. अतिशय प्रौढ भाषा अन अनुभवसिद्ध लेखकाने लिहिलेले असुन केवळ याच एका गोष्टीमुळे त्यांना पुणे विद्यापीठाने डी लिट पदविने गौरविले आहे. केवळ दहावीपर्यतच शिकलेल्या मनुष्याला अशी पदवी मिळण्याची ही पहीलीच वेळ होती. नंतर यशवंतराव चव्हाण वगैरे नामवंतांना पण असेच गौरविण्यात आले होते.

पातंजल योगाचा अभ्यास ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे किंवा ज्यांना लग्न करुन संसार करायचा आहे त्यांनी कृपया करु नये असे मला वाटते. कारण हैव ही जायचे अन दैव ही जायचे असे नको...

केवळ वाचन करुन काय आहे हे समजुन घेण्याची उत्सुकता असेल तर जरुर सर्वांनी वाचावे.

बाकी भूत वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या केवळ मानसिक संतुलन बिघडल्यामुळे होतात. त्यातील ५० टक्के ह्या स्वतः त्या पिडीत व्यक्तीनेच केलेले ढोंग असते. फोलपटाने झोडुन काढले की सरळ होतात. ज्या केसेस अशा सरळ होत नाहीत त्याचे विवक्षित समस्या समाधान झाले की नीट होते. केवळ मानसिक असंतुलनच असते.

म्हणुन पुर्वापार आपल्याकडे देवाची प्रार्थना वगैरे गोष्टी मन स्थिर रहाण्या करता सांगितल्या होत्या. पण आजकाल असे झाले आहे की देवाची प्रार्थना करणे हे बुरसटलेले समजले जाते. असो.

(निर्विकल्प समाधीची आस लागलेला) नाना

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2008 - 1:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत.

यावरून आठवलं, कोणी Ghostbusters (गोस्टबस्टर्स, इंग्रजांकडे "घ" हा उच्चार नाही) हा चित्रपट पाहिला आहे का? एकदम शॉल्लेट धमाल आहे!!
याचा दुसरा भागही आहे, पण मी तो पाहिला नाही आहे.

अदिती

अवलिया's picture

10 Oct 2008 - 2:36 pm | अवलिया

गोस्टबस्टर्स, इंग्रजांकडे "घ" हा उच्चार नाही

इग्रज गेले तेल लावत... शेवटचा १९४७ सालीच गेटवे औफ इंडिया तुन हाकलला.

गेंगस उच्चार आमच्याकडे नाही. ते आमच्या परमप्रिय गंगामैयाला गैंगस म्हणतात तेव्हा तुम्ही हटकता का त्यांना..उगाच आम्हाला हटकु नका.. हे बरोबर की ते चुक... आम्ही घोस्ट म्हणू किंवा गोस्ट किंवा अजुन काही...उच्चारस्वातंत्र आहे आम्हाला.. तसेच लेखन स्वातंत्र्य पण.

आशा आहे आमच्या भौना तुमाल्या समजल्या असतील. नाही समजल्या ती फरक पडत नाही. समजुन घ्यावे ही अपेक्षा पण नाही.

नाना देशी (जिस देश मे गंगा बहती है )

विनायक प्रभू's picture

10 Oct 2008 - 2:43 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
क्रिप्टीक घोस्ट फुकट मध्ये मिळते. फुकट्मध्ये. बोला कोणाला पछाडू?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Oct 2008 - 3:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

गेंगस उच्चार आमच्याकडे नाही. ते आमच्या परमप्रिय गंगामैयाला गैंगस म्हणतात तेव्हा तुम्ही हटकता का त्यांना..उगाच आम्हाला हटकु नका.. हे बरोबर की ते चुक... आम्ही घोस्ट म्हणू किंवा गोस्ट किंवा अजुन काही...उच्चारस्वातंत्र आहे आम्हाला.. तसेच लेखन स्वातंत्र्य पण.

चुकीची माहिती चुकीचा अर्थ!
इंग्रज गंगेला गैंगस नाही गँजीस म्हणतात; आणि माझ्यासमोर कोणीही गँजीस म्हटल्यावर मी त्यांना "रिव्हर गंगा" आहे "रिव्हर गँजीस" नाही असं सांगितलं होतं. गँजीस हा शब्द बर्‍याचदा गंगेच्या खोर्‍याच्या बाबतीत वापरलेला ऐकलेला आहे.
आणि मी तुम्हाला किंवा कोणालाही "घोस्ट" म्हणू नका "गोस्ट"च म्हणा असं अजिबात म्हटलेलं नाही. इंग्रजांकडे "घ" हा उच्चार नाही ही माहिती दिली आहे. इंग्लीश भाषेत जिथे gh या क्रमाने येतात तेव्हा त्याचे वेगवेगळे उच्चार होतात, उदा: high (gh चा उच्चार य किंवा अनुच्चारित?), laugh (gh चा उच्चार फ) किंवा इथे ghost (gh चा उच्चार ग). इंग्लीश भाषेत अनेक भाषांतून शब्द आले आहेत म्हणून असं असावं, भाषाशास्त्रज्ञ त्यावर उजेड टाकतीलच. आणि या ghost सारख्या शब्दांमधे gच्या पुढे लगेचच h असला की त्या g चा उच्चार ग असा करावा ज असा नाही असं कळतं.

आणि याचाशी संबंधित दुसरा प्रश्नः त्यांना नीट उच्चार जमत नाहीत म्हणून मला येत असूनही मी विचित्र उच्चार करणार असा संकुचित विचार का? आपल्या भाषेत, लिपीतही, अनेक जास्त उच्चार आहेत, वैविध्य आहे ते (उदा: आणि हे दोन वेगवेगळे उच्चार देवनागरी-मराठीत आहेत)! त्याचा उपयोग आणि फायदा सोडून, दुसरा नीट बोलत नाही म्हणून मीही बोलणार नाही हा संकुचित विचार का? (लहान मुलं सोडून) समोरचा माणूस बोबडा असेल तर तुम्हीही त्याच्याशी तसेच बोलता का हो?

इग्रज गेले तेल लावत... शेवटचा १९४७ सालीच गेटवे औफ इंडिया तुन हाकलला.
तरीही आज इंग्लीश येत नसेल तर अनेक ठिकाणी घोडं अडतं आणि इंग्लिश येत असेल तर अनेक ठिकाणी उपयोग होतो, आपल्या देशातही हे विसरु नका. आणि आज फक्त आपल्या देशापुरतं पाहू म्हणण्याएवढं जग लहानही राहिलेलं नाही तेव्हा इंग्लिश येणं गरजेचं झालं आहे.
वैर कोणाशी, ज्या देशातल्या नागरिकांच्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांवर राज्य केलं त्यांच्याशी का त्यांच्या भाषेशी? त्याच भाषेतलं वाघिणीचं दूध पिऊन आपल्या देशातल्या अनेक लोकांनी समाजसुधारणा केल्या, स्वातंत्र्याचा लढा उभा केला.

आणि तुम्हाला उच्चार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य देणारी मी कोण? गुलामाला स्वतंत्र करता येऊ शकतं, ज्याला आपण गुलाम आहोत असं उगाचच वाटत रहातं त्याला कोणीही स्वतंत्र करु शकत नाही.
इंग्लिश नीट बोलता येणं हे इंग्ऱजांचं लांगूलचालन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मला ते समजून घेण्याची इच्छा नाही. तुम्ही तुमच्या कूपातून लवकरच बाहेर याल (अगदी "लगे रहो... " मधल्या Get well soon सारखी) अशी मी आशा ठेवते.

हे विषयाशी फारच अवांतर आहे, तेव्हा आपण यापुढे स्वतंत्र धाग्यावर किंवा खरडवह्यांत चर्चा करु शकतो.

sanjubaba's picture

10 Oct 2008 - 3:26 pm | sanjubaba

खवीस.......हे नाव वाचून मला वाटायच..........हे नाव काही तरी विचित्र आहे भुताच्या बाबतीत मला पण थोडा अनुभव आहे तो मी स्विस्तार
सागेन.......पण तुमचे लिखाण वाचताना फार भीती नाही वाटली पण आवडले.............

अभिरत भिरभि-या's picture

10 Oct 2008 - 4:16 pm | अभिरत भिरभि-या

चांगल्या भयकथा वाचायला मिळतील असे वाटले होते. पण काय हे .. अनिस, इंग्रजी, गंगा ??? ..

ऑल डिकराज, डिकरीज अने डुकराज,
कम टू द पाईंट

समस्त मिपाकर आणि माझे टिकाकार यांना विनम्र अभिवादन..

१) "मांत्रिक्"म्हणले की आपल्या डोळ्यसमोर कवड्यांच्या माळा घातलेला, काळे कपडे घातलेला एक विचित्र व्यक्ति उभी रहाते. बेसिकली मी मांत्रिक म्हणजे (मननात त्रायते इति मंत्रः अशी ज्याची व्याख्या केलेली आहे अशा मंत्रशास्त्राचा जाणकार आहे तो मांत्रिक आहे) मी माझ्या कार्यक्षेत्रात इमेज ब्रेकर असल्याने अत्यंत स्वच्छ, सुंदर कपडे परिधान करतो. जीन्स्-टि.शर्ट , डिझायनर घड्याळ, परफ्युम्-डियो असा माझा एकंदर थाट असतो त्यामुळे माझ्याकडे बघुन माझा "अशा"काही क्षेत्राशी संबंध असेल याची दुरान्वयानेही शक्यता समोरच्याला दिसत नाही.

२) मांत्रिक म्हणजे मंत्र विद्येच्या सहाय्याने इतरांचे प्रश्न सोडविणे हे कार्य माझे सद्गुरु श्रीनृसिंह सरस्वती महाराज्(गाणगापुर), श्रीस्वामी समर्थ( अक्कलकोट) यांच्या कृपाप्रसादाने, अत्यंत व्यवस्थितपणे करत आहे. तुमच्या शास्त्रिय भाषेत त्याला परामानसशास्त्र की काय म्हणतात ते सुध्दा हे असु शकेल. माझा पुर्णवेळ व्यवसाय हा नसुन मी ज्योतिष मार्गदर्शक, भाग्यरत्नांचा व्यवसायिक असुन माझा मुख्य फेमिली बिझनेस हा "परफ्युम्स्"चा आहे

३) रहाता राहीला भुतांचा प्रश्न....मला एखादी विद्या माहीती असल्याने त्या सहाय्याने मी भुतेखेते किंवा तत्सम अदृश्य गुढशक्तिंचे निवारण करतो. हा भाग खुपच वैयक्तिक पातळीवरचा असल्याने इथे सिध्द करुन दाखवा असा प्रश्नच येत नाही ( वेळही नाही)

४) या व्यवसायात मी नैत्तिकतेचे पुर्ण अधिष्ठान ठेवलेले आहे..

-ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com

शैलेन्द्र's picture

11 Oct 2008 - 8:53 am | शैलेन्द्र

"माझा पुर्णवेळ व्यवसाय हा नसुन मी ज्योतिष मार्गदर्शक, भाग्यरत्नांचा व्यवसायिक असुन माझा मुख्य फेमिली बिझनेस हा "परफ्युम्स्"चा आहे"

तुमच्या मुख्य फॅमिली बिझनेस बद्द्ल जाणुन घ्यायला आवडेल.

Nile's picture

12 Apr 2009 - 4:11 am | Nile

आता ह्या "भुता"ला कोण काढ्णार?

अनिरुध्द's picture

11 Oct 2008 - 9:34 am | अनिरुध्द

तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का?

अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

इथे चर्चा अपेक्षित आहे....

मंडली, तुमाला काय अनुभव अशेल तर हितं लिवा म्हंजे लोकान्ला सगल्या ष्टो-या वाचताना लयच मजा येईल नि तुमचा पन मन रिकामा होयील. जर कायवंच अनुभव नशेल तर नुस्ता वाचा हो. आपला इशय -हायला बाजूला ना उगाच भलती चर्चा कशाला? काय?

तर लिवा, तुमचा नशेल तर दुस-याचा लिवा. आमी वाचू.

भडकमकर मास्तर's picture

14 Oct 2008 - 12:33 am | भडकमकर मास्तर

हिते काय भुताच्या घोष्टी नाय राव वाचायला मिलाल्या... :(
मिल्ते तं मझा अली अस्ती नं...
कय भंडन तंटे करुन र्‍हाइल्ये राव ह्ये लोग...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Jul 2016 - 12:07 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

नविन लोकांसाठी धागा वर काढत आहे ,अनुभव टाका ,वाचायला मजा येईल.

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Jul 2016 - 12:17 am | माम्लेदारचा पन्खा

परवाच एक त्रस्त समंध पिडून गेलाय......उपाय अजूनही सापडलेला नाही...

माझीही शॅम्पेन's picture

23 Jul 2016 - 11:22 am | माझीही शॅम्पेन

खिक्क पत्ता दिला कि नाही मग :)

नाखु's picture

23 Jul 2016 - 11:35 am | नाखु

मापं खिशात तीन तीन कॅट (अर्थात पत्यांचे) घेऊन फिरतोय असं म्हणतात.(मागीतला पत्ता की दे एक ठेऊन तोंडावर फक्त पत्ताच)

खखो टका जाणे...

मा पं अगदी हलके घेणे

मांप लेखन नितवाचक नाखु

असा रोकडा अनुभव आहे.....

जाणकारांनी प्रकाश टाकावा !

हॅत्त तेरी ती! धागा व प्रतिसाद वाचून अपेक्षाभंग झाला.

ज्योति अळवणी's picture

23 Jul 2016 - 11:02 am | ज्योति अळवणी

अनुभव नाही पण कथा वाचायला आणि लिहायला आवडतात.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 Jul 2016 - 2:47 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

च्यायला ,मिपा एवढे संमृद्ध आहे,पण एकाचाही जबरा अनुभव नाही या धाग्यावर,कुठं नेऊन ठेवलाय मिपा माझा.

पैसा's picture

23 Jul 2016 - 4:31 pm | पैसा

http://www.misalpav.com/node/19247 हा धागा बघा.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2016 - 6:41 pm | अत्रुप्त आत्मा

पांडूऊऊऊऊऊऊ....
ये रे ये! =))

अरेरे, किती हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक आहे ही? येईल, तुमच्या हाकेला तो ओ देतोच!! =))

हि वेबसाईट बंद आहे.. sachinparanjpe.wordpress.com is no longer available.
मला मदत हवी आहे तुमचा पर्सनल ई-मेल id द्या

sachinparanjpe.wordpress.com is no longer available.

The authors have deleted this site.
=================================================

दुर्गविहारी's picture

31 Jul 2016 - 7:56 pm | दुर्गविहारी

मायबोली वरचा हा लेख बघा. मागे हा धागा न सापडल्याने प्रतिक्रीया उशिरा देत आहे.
अमानवीय...?

मायबोली वरचा हा लेख वाचला ..मला यातील माहिती असणारा हवा आहे ..जसे प्रेषक, येडा खवीस, याना माहिती हाती तशी ... येडा खवीस,

मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) X( असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....

तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? ~X(

अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

इथे चर्चा अपेक्षित आहे....

जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही गुढकथा ( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "थरार" व "चकवा" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा...

आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन ;;)

nanaba's picture

3 Aug 2016 - 1:39 pm | nanaba

Link please if mipa policy allows it.

सुबोध खरे's picture

3 Aug 2016 - 1:44 pm | सुबोध खरे

मला पण भूत, खवीस आणि हडळ पाहायची आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

1 Aug 2016 - 5:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

सॅम पार्निया हे emergency medicine मधील तज्ञ आहेत.अमेरीका ,युरोप आणि ऑस्ट्रेलियातील हॉस्पीटल्समध्ये एक प्रयोग केला गेला ,ज्याचे रिझल्ट्स असे दाखवतात की मृत्युनंतरही काही काळ awareness असतो,म्हणजे ती व्यक्ती मृत्युनंतरही जागृत असते काही काळ ,हा पुर्णपणे सायंटीफीक डिसिप्लीनमध्ये झालेला स्टडी आहे म्हणुन मी इथे देतो,एकदा लिंक उघडून बघावी.युट्युबलाही व्हिडीयो आहेत.

First hint of 'life after death' in biggest ever scientific study

D eath is a depressingly inevitable consequence of life, but
now scientists believe they may have found some light at
the end of the tunnel.
The largest ever medical study into near-death and out-of-
body experiences has discovered that some awareness may
continue even after the brain has shut down completely.
It is a controversial subject which has, until recently, been
treated with widespread scepticism.
But scientists at the University of Southampton have spent
four years examining more than 2,000 people who suffered
cardiac arrests at 15 hospitals in the UK, US and Austria.
Dead could be brought back to life in groundbreaking
project
And they found that nearly 40 per cent of people who
survived described some kind of ‘awareness’ during the
time when they were clinically dead before their hearts were
restarted.
One man even recalled leaving his body entirely and
watching his resuscitation from the corner of the room.
Despite being unconscious and ‘dead’ for three minutes, the
57-year-old social worker from Southampton, recounted the
actions of the nursing staff in detail and described the
sound of the machines.
“We know the brain can’t function when the heart has
stopped beating,” said Dr Sam Parnia, a former research
fellow at Southampton University, now at the State
University of New York, who led the study.
“But in this case, conscious awareness appears to have
continued for up to three minutes into the period when the
heart wasn’t beating, even though the brain typically shuts
down within 20-30 seconds after the heart has stopped.
“The man described everything that had happened in the
room, but importantly, he heard two bleeps from a machine
that makes a noise at three minute intervals. So we could
time how long the experienced lasted for.
“He seemed very credible and everything that he said had
happened to him had actually happened.”
Of 2,060 cardiac arrest patients studied, 330 survived and of
140 surveyed, 39 per cent said they had experienced some
kind of awareness while being resuscitated.
Although many could not recall specific details, some
themes emerged. One in five said they had felt an unusual
sense of peacefulness while nearly one third said time had
slowed down or speeded up.
Some recalled seeing a bright light; a golden flash or the Sun
shining. Others recounted feelings of fear or drowning or
being dragged through deep water. 13 per cent said they
had felt separated from their bodies and the same number
said their sensed had been heightened.
Dr Parnia believes many more people may have experiences
when they are close to death but drugs or sedatives used in
the process of rescuitation may stop them remembering.
“Estimates have suggested that millions of people have had
vivid experiences in relation to death but the scientific
evidence has been ambiguous at best.
“Many people have assumed that these were hallucinations
or illusions but they do seem to corresponded to actual
events.
“And a higher proportion of people may have vivid death
experiences, but do not recall them due to the effects of
brain injury or sedative drugs on memory circuits.
“These experiences warrant further investigation. “
Dr David Wilde, a research psychologist and Nottingham
Trent University, is currently compiling data on out-of-body
experiences in an attempt to discover a pattern which links
each episode.
He hopes the latest research will encourage new studies into
the controversial topic.
“Most studies look retrospectively, 10 or 20 years ago, but
the researchers went out looking for examples and used a
really large sample size, so this gives the work a lot of
validity.
“There is some very good evidence here that these
experiences are actually happening after people have
medically died.
“We just don’t know what is going on. We are still very
much in the dark about what happens when you die and
hopefully this study will help shine a scientific lens onto
that.”
The study was published in the journal Resuscitation.
Dr Jerry Nolan, Editor-in-Chief at Resuscitation said: “Dr
Parnia and his colleagues are to be congratulated on the
completion of a fascinating study that will open the door to
more extensive research into what happens when we die.”