केवळ महाराष्ट्रात 64 लाख मतदारांची नावे गायब . म्हणजे एकूण साडेआठ कोटी मतदारांपैकी 8% मतदारांची नावे गायब केली आहेत. यामागे फार मोठे कारस्थान असू शकते ,किंबहुना आहेच ! जरा विचार करा की संपूर्ण देशात जर आशा प्रकारे कारस्थान करून सुमारे 8 ते 10 % मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले असेल, तर सत्ताधारी कोंग्रेस पक्षाची फार मोठी खेळी यामागे आहे. देशभरात मोदींची लाट असताना भाजपला मतदान करणार्या मतदारांना मतदान करूच द्यायचे नाही, आणि केले तरी ईव्हीएम मधील घोटाळे करून चुकीचे निकाल लावायचे ,ज्यायोगे भाजप 10% मतांनी पिछाडीवर राहील ,असे हे कोंग्रेस चे काळे कारस्थान आहे.
जर निवडणूक निकालानंतर दुर्दैवाने एनडीए ला अपेक्षित मते मिळाली नाहीत, तर प्रचंड जन-आंदोलन निर्माण करून पुन्हा सर्व मतदारांची नावे समाविष्ट करून घ्यायला आयोगाला भाग पाडावे आणि पुन्हा कागदी मतपत्रिका वापरुन निवडणूक घ्यावी . याचे कारण सध्याची निवडणूक प्रक्रिया ही सर्वसमावेशक नाही, तसेच या अशा कोंग्रेसी कारस्थानांमुळे जनमताचे खरे प्रतिबिंब लोकसभेत दिसत नाही.
जर आयोग / सरकार बधले नाही तर इजिप्त प्रमाणे रस्त्यावर उतरून क्रांति /जन-आंदोलन करावे , ..... या देशाला क्रांतीची गरज आहे .......................मग ती क्रांति मतपेटी द्वारे होवो की जन-आंदोलनाद्वारे !
http://www.ndtv.com/elections/article/election-2014/six-million-voters-n...
प्रतिक्रिया
26 Apr 2014 - 12:55 pm | आशु जोग
हे पहा
https://www.youtube.com/watch?v=n9o-yT048Lg
माहितीपूर्ण आहे
26 Apr 2014 - 10:35 pm | आशु जोग
७४ लाख नावे गायब शक्य आहे हे ?