'साप्ताहिक प्याफक्त' विचार धन - १. मच्छराचार्य - खंडनमिश्र शास्त्रार्थ वाद

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
26 Apr 2014 - 10:26 am
गाभा: 

आमची प्रेरणा: 'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

मित्रांनो,
नुकतेच 'साप्ताहिक प्या-फक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे.
'श्री मच्छराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री मच्छराचार्य व खंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते सदाशिवपेठ म्हणजेच पुणे, आणि तेच अखिल विश्वाचे केंद्र, तर खंडनमिश्रांचे मते रविवारादि सर्व पेठा, पाषाण, कोथरूडादि सर्व मिळून होते ते पुणे, तसेच जगातल्या कोणत्याही स्थानास केंद्र मानले जाऊ शकते, त्यात पुण्याची मातब्बरी काहीही नाही' असे प्रतिपादन केले.
'पराभव झाला तर मी चिंचवडातले स्वत:चे मोठे घर सोडून सदाशिव पेठेत भाड्याच्या एका खोलीत शिफ़्ट करेन! असे खंडनमिश्र म्हणाले तर 'या शास्त्रार्थात पराजित झालो तर सदाशिवपेठेतील वेदकालीन पूर्वजांच्या वाड्यातील खोली सोडून पार पुण्याबाहेर कोथरूडादि कोणत्यातरी नीच वस्तीत परांगदा होईन, असे आचार्यांनी म्हटले. आचार्यांच्या दृष्टीकोनातून अखिल विश्वाचे केंद्रस्थान असलेल्या सदाशिव पेठेत रहाणे महत्वाचे तर खंडनमिश्रांचे मते कुठेही राहिले, तरी पोटासाठी धडपड ही करावीच लागते, असे म्हटले गेले. त्या दोघांमधील शास्त्रार्थात मध्यस्थी करण्याचे (म्हणजे निर्णय देण्याचे) उत्तरदायित्व मिश्रांची पत्नी उभयभारतीने स्वीकारले.

बराच रंगलेल्या वाद-विवादानंतर उभयभारती स्वयंपाक करायला उठत म्हणाल्या, 'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'

(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.

पात्रपरिचयः 'मच्छराचार्य' यांचे मूळ नाव मध्या आपटे, बी. ए. (फ़र्स्ट क्लास) असे असले, तरी अगदी पेद्रू शरीरयष्टी, आणि केंव्हाही, कुठेही, कश्यावरही वाद घालण्याची खुमखुमी, यामुळे 'मच्छराचार्य' या उपाधीस प्रप्त झालेले होते. वैदिक काळापासून त्यांचे पूर्वज सदाशिव पेठेत वसती करून असल्याचे पुरावे त्यांजपाशी असल्याचे ते सांगत.

खंडनमिश्रांचे पूर्वज म्हणजे खुद्द पिताश्री लल्लन मिश्रा हे यूपीतील कुण्याश्या कुग्रामातील शेतमजुरीच्या कामाला कंटाळून पुण्यनगरीत आले, आणि गळ्यात टोपली अडकवून बनारसी पान विकण्याच्या कामातून बघता बघता गडगंज होऊन चिंचवडास बंगला बांधून स्थायिक झाले).

...

या पार्श्वभूमीवर आता महत्वाचा प्रश्न असा की या शास्त्रार्थाला आज माझ्या जीवनात काय स्थान आहे? मी हे का समजून घ्यावे?
सदाशिव पेठ म्हणजेच काय ते पुणे असे न मानणारे अनेक जण आजही आहेत. लौकिकार्थे ते सुखी व समृद्ध आहेत. सदाशिव पेठेशी मला काही देणेघेणे नाही, असेच ते म्हणतात. वैयक्तिकरित्या मला त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु सदाशिव पेठ हेच अखिल विश्वातील एकमेव राहण्यायोग्य स्थान नाही , असे त्यांचे मत का असावे? याबाबत मला कुतुहल आहे.

मित्रामित्रांमधे चर्चा होते. त्यावेळी लहान मुुलगा आपल्या मोहल्ल्या बाबत केवढा निरपेक्ष अभिमान व्यक्त करतो. त्यापलिकडे विचार त्याच्या मनाला शिवतही नाही.

आजचा ३५ वर्षे वयाचा तरूण त्याच भावनेने सदाशिवपेठेचा चा अभिमान का बाळगत नाही? त्याबद्दल विश्वास व्यक्त करायला का लाजतो? खंडनमिश्रांसारख्या सदाशिव पेठेचे महात्म्य न मानणाऱ्या एका श्रेष्ठ अभ्यासकाला आचार्य जर आपला सिद्धांत पटवून देऊ शकले, तर त्याच आचार्यांच्या शिकवणूकीवर आजचा तरूण का चिंतन करत नाही?
वडिलांची भूमिका बजावणाऱ्या आजच्या ४० व्या वयोगटातील मुलामुलींना सदाशिव पेठेबद्दल काय माहिती आहे? ४५ व्या गटातील आजचा तरूण अनंगरंगरतिशास्त्र, वात्सायनाचे कामसूत्र इत्यादी ग्रंथांचे अभ्यासपूर्ण वाचन का करत नाही? त्यातील आचरण शास्त्र याचा तो अभ्यास का करत नाही? या ग्रंथांचे असे अवमूल्यन करून डेलीमोशन गोसेक्स्पोड इत्यादिंचा अंगिकार का करतो? हजारो वर्षे चालत आलेली आपली दिव्य परंपरा गेल्या ५० वर्षात कालबाह्य झाली असेल का?
तरुणांनी आपले मत, आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करावेत ही नम्र विनंती.

टीप: सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.
वरील विचार त्या लेखकाचे (त्यांचे नाव छापलेले नाही) आहेत. ते फक्त विचारार्थ आम्ही सादर केले आहेत.

प्रतिक्रिया

जेपी's picture

26 Apr 2014 - 10:29 am | जेपी

मी पयला.

प्रचेतस's picture

26 Apr 2014 - 10:50 am | प्रचेतस

=)) =)) =))

एसमाळी's picture

26 Apr 2014 - 10:57 am | एसमाळी

=))

माहितगार's picture

26 Apr 2014 - 11:09 am | माहितगार

=)) आणि केवळ =)) लगे रहो !!

बॅटमॅन's picture

26 Apr 2014 - 11:27 am | बॅटमॅन

ठ्ठो ठ्ठो =)) चित्रगुप्तांची लेखणी काय जी चाललीय, तोड नै!!!!! काय ते शब्दपाटव, काय ते पञ्चेस.. वाह!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2014 - 11:33 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्रे गुप्त ठेवून लिवलेल्या लेखाबद्दल लेखकाचा टीव्र णीशेद !!! =))

टीप : छान छान चित्रे टाकून एडिट केलेल्या लेखाचा डोळ्यांनी स्वाद घेतल्यावर आम्चा प्रोटेष्ट मागे घेतला जावू शकतो.

प्यारे१'s picture

26 Apr 2014 - 1:08 pm | प्यारे१

+११११

छान छान (हा 'छ' हिंदी का येतोय?) चित्रे आलीच पाहिजेत.

बालगंधर्व's picture

26 Apr 2014 - 1:15 pm | बालगंधर्व

खनदन मिसरा हेकाय अहे? अनि तयनचा पुन्याशे कय समबन्दह? मला सदहया चिनचवद जवल अहे. खनदन मिसराचे कहे निशने चिनच्वदला असेल, तर मे पहु शकेन. अनि अचरया पन कोन अहेत, मल सनगाअ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2014 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

तमुचि भशहा वचुन मिसराककानि चिनचवद महदुन पहळ कधला अहे. भशहा सुद्र्ल्यास विहिचाहर कहरुहु अहसाहा निहिरोप दिलाहा आह्हाह्हाहे. सहमहजहलह ?

यशोधरा's picture

1 May 2014 - 6:37 pm | यशोधरा

स्वाक्षरी भारी हो! :)

शुचि's picture

26 Apr 2014 - 5:36 pm | शुचि

अग्गागा बाजार बाजार उठवलाय!!! काय एकेक चौके लावलेत!!!

(हा शास्त्रार्थ-वाद सदाशिव पेठेतील आपल्या खोलीतच व्हावा, असे मच्छराचार्य यांचे मत होते, परंतु तसे झाल्यास अधून-मधून आचार्य "तुम्ही बसा, मी चहा 'घेऊन' येतो" असे म्हणत उठून पडद्यापलिकडील किचनात जाऊन स्वत: चहा पिऊन मिश्या पुसत बाहेर येऊन पुन्हा वादास लागतील , याची खात्री असल्याने उभयभारतीने अत्याग्रहाने चिंचवडातील आपल्या प्रशस्त घरात हा कार्यक्रम घडवून आणला होता.

खी: खी: खी:

'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'

फुटले!!! वाचवा!!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Apr 2014 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा

@सदाशिव पेठ हेच खरे पुणे, आणि ते अखिल ब्रम्हांडाचे केंद्र होय, हे ज्यांना मान्य असेल, त्यांच्यासाठी ही विचारणा आहे. ज्यांना ती अद्याप अमान्य आहे त्यांना या चर्चेत रस नसावा. कारण आचार्यांच्या वरील शास्त्रार्थातून खंडन मिश्र यांचा पराभव झाला व त्यांनी आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. आचार्यांचे मत ज्यांना मान्य आहे परंतु त्याकडे विचार करायला आजचा तरूण वर्ग उदासीन का? हा प्रश्न आहे.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/roflmao.gif

पैसा's picture

26 Apr 2014 - 6:56 pm | पैसा

बाजार उठवलाय!

मी साधारणपणे आपल्या मतांशी सहमत असल्याची मखलाशी करून विचारू इच्छितो की- आपला वरील लेख हा वैयक्तिक हल्ल्याचा प्रकार समजला जाइल का?
(कृपया गैरसमज करून घेउ नये. मी नवीन सदस्य आहे. मी इथल्या नियमांचा अभ्यास आधीच केलेला आहे, परंतू तरीही मला हा प्रश्न पडला आहे...)

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 8:04 pm | आत्मशून्य

हां हल्ला नाही, प्रत्युत्तर आहे. बिनधास्त लिहा.

मनीषा's picture

26 Apr 2014 - 8:30 pm | मनीषा

पण मी काय म्हणते .....

सदाशिव पेठ हेच पुणे आणि तेच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र स्थान आहे यात शंका घेण्यासारखे आहेच काय?
व्युत्पन्न महर्षि आणि आचार्यांनी ते आधीच सिद्ध केले आहे. आपण फक्तं त्यावर विश्वास ठेवायचा आहे.
तुम्ही कधी अनुभूती घेतली आहे का? तुम्ही स्वतः पुण्यात या सदाशिव पेठेत रहा मग तुम्हाला अशी शंका येणारच नाही.
आणि जर तुम्ही स्वतः अनुभूती घेऊनही तुम्हाला शंका येते आहे तर तुमच्या विचारधारणेत काहीतरी चूक आहे किंवा ती दिव्य अनूभूती येण्याइतका तुमच्या बुद्धीचा आवाका नाही.
तेव्हा मान्यं कराच की सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे केंद्र आहे.

आत्मशून्य's picture

26 Apr 2014 - 10:17 pm | आत्मशून्य

सदाशिव पेठच अखिल ब्रम्हांडाचे
केंद्र आहे.

हे वाक्यच सुपर डुपर ल्याइक केल्या गेल्या आहे.

बालगंधर्व's picture

1 May 2014 - 12:08 pm | बालगंधर्व

सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

चित्रगुप्त's picture

1 May 2014 - 1:23 pm | चित्रगुप्त

सदाशिव पेत बददल तुमज्या पुर्न ना झलेल्या ज्य्या अपेकशा होत्या, तया कोनट्या, हे सामगाल तर आमाली बी कलएल सदासिव पेत बद्डल.

डुआयडी कळाला बरे का कुणाचा आहे तो ;)

सदाशिव पेत बददल मज्या फार अपेकशा होत्या. पन त्या पुर्न झलया नहेत. म्ह्नुन तुअम्हा सर्वाना सदाशिव पेथ बददल जे कहे वटते, तेवडे मला वाटत नहे.

हे वाक्य विडंबन म्हणून लाइक केल्या आहे, कठीण आहे राव. एकाक्षरी प्रतिसादातुन गैरसमज होउ शकतात हे एकवेळ मान्य, पण हे म्हणजे...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2014 - 8:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आर.ओ.एफ.एल.

एल.एम.ए.ओ. (ह्याला कोणी शुद्ध मराठी प्रतिरुप शोधील काय?)

चित्रगुप्त's picture

30 Apr 2014 - 5:06 pm | चित्रगुप्त

@ मन उधाण वार्‍याचे:
आर.ओ.एफ.एल. म्हणिजे काय
एल.एम.ए.ओ. म्हणिजे काय
मज निरोपावे.

शुचि's picture

30 Apr 2014 - 5:33 pm | शुचि

Rolling On FLoor

Laughing My Ass Off

स्मायलीवाले यात कसे काय सामिल झाले बुवा ?

सुहास..'s picture

28 Apr 2014 - 1:34 pm | सुहास..

ब्ब्बाब्बौ ..............!!

अग्गाअयायाया !!

बाप्पा रे !!

अरे काय डोक हाय का हिरवागार मळा . ऐन्ह उन्हाळ्यात शब्द-पावसाळ्यानी अध्यात्म गारेगार झाल्यागत वाटलं की !!

__/\__

लल्लन का भाई जल्लन !! ;)

बाळ सप्रे's picture

28 Apr 2014 - 1:43 pm | बाळ सप्रे

ज्यांना पिणे हे व्यसन वाटते त्यांच्याबद्दल या धाग्यावर न लिहिलेलेच बरे!!

एस's picture

28 Apr 2014 - 7:03 pm | एस

आता घाटपांड्यांच्या ह्या प्रतिसादाचेही कुणीतरी विडंबन करा. (सध्या घाईत आहे म्हणून - आमचा खंबा वाट पाहतोय हो! ;-) )

बदकांबरोबर पोहलात तर शिकाल केव्हा पाण्यात बुडायचे ,केव्हा चालायचे आणि केव्हा दहा हजार किमी दूर उडत जायचे .खरा स्माट पक्षी .

एस's picture

1 May 2014 - 4:02 pm | एस

अच्छा?

प्रसाद गोडबोले's picture

29 Apr 2014 - 12:10 am | प्रसाद गोडबोले

ळॉळॉळ =))))

सस्नेह's picture

1 May 2014 - 4:15 pm | सस्नेह

'हा पूर्ण खंबा आणि चखणा ठेवते. शेवटी आडवे होताना ज्याच्या ग्लासात उरलेली असेल, तो हरला असे समजले जाईल. तुमचा शास्त्रार्थ चालू दे.'
a

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2014 - 9:33 am | ज्ञानोबाचे पैजार

हे वाचायचेच राहिले होते. एका महत्वाच्या विषयाला चित्रगुप्त काकांनी हात घातला आहे.

सदाशिव पेठ पुणे ३० हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही.

काही विद्रोही हेच केंद्र डोंबिवली येथे आहे असा सुर लावताना दिसतात.

पण मांजराने डोळे मिटुन दुध प्यायले तरी उजाडायचे रहात नाही.

चित्रगुप्त's picture

3 May 2014 - 1:03 pm | चित्रगुप्त

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे -- आणि हेच समग्र विश्र्वाचा केंद्र आहे यात तिळमात्रही शंका नाही.

........ शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत आमच्या मच्छराचार्यंनी जनसामान्यांना सहज आकलन होईल अश्या किती सोप्या भाषेत, नेमकेपणाने मांडला आहे, हे बघून कुणालाही कौतूक वाटावे. शेवटी खंडनमिश्रांना देखील हा सिद्धांत मान्य करावाच लागला, हा खंबायत-प्रभाव नसून वैश्विक सत्याचा झालेला विजय होय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 May 2014 - 3:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

सदाशिव पेठ -- म्हणजेच पुणे

नाही.. नाही..

पुणे म्हणजेच सदाशिव पेठ

या जगात जे काही आहे ते सदाशिव पेठेत आहेच.
सदाशिव पेठेत नाही ते जगातच नाही.

चित्रगुप्त चि. वि. जोशी बनू पाहात आहेत .सदाशिवपेठकरांतर्फे निषेध .

चित्रगुप्त's picture

5 May 2014 - 10:04 am | चित्रगुप्त

अहो, आम्हाला सदाशिव पेठ नेमकी कुठे आहे, हे सुद्धा ठाऊक नाही, तरीपण 'चि. वि. जोशी बनू पाहाणे' हा फार मोठा सन्मान बहाल केल्याबद्दल दिलसे शुक्रगुजार.