विठ्ठलराव गाडगीळ यांच्या बद्दलच्या लेखाकरीता माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
25 Apr 2014 - 7:03 pm
गाभा: 

विकिपिडियावर माजी खासदारांची नावे चाळताना विठ्ठल गाडगीळ यांच्या बद्दल माहितीचा अगदीच अभाव असल्याचे लक्षात आले. मराठी विकिपीडियावर "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. फेब्रुवारी ६ इ.स. २००१ रोजी त्यांचे निधन झाले." एवढीच ओळ आहे. इंग्रजी विकिपीडियावर त्यांच्या नावाचा लेखही आढळला नाही.

१) जन्म

२) व्यक्तीगत जीवन

३) कारकीर्द

४) लेखन आणि भाषणे

या संबंधाने माहिती हवी आहे.

नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन विकिकरता असल्यामुळे प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जाईल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

बॅरीस्टर विठ्ठलराव, राजीव गांधींच्या कारकिर्दीत "माहीती आणि नभोवाणी" खात्याचे मंत्री होते. त्यांच्या काळात मुंबई दूरदर्शनचे दुसरे चॅनल चालू झाले होते. त्यांचे बोलणे (सॉर्ट ऑफ वक्तृत्व) चांगले होते तसेच मिष्कील देखील. जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन... वडील काँग्रेसमन काकासाहेब गाडगीळ.

गाडगीळासंदर्भातच पण विकीसाठी योग्य नसल्याने अवांतर - आचार्य अत्र्यांच्या भाषणाची ध्वनीफीत माझ्याकडे आहे. त्यातून हा प्रसंग. थोडक्यात अत्र्यांच्या नावावर खपवले जाणार्‍यातला विनोदातला नसून, वास्तवात घडलेला प्रसंग

अत्र्यांच्या साठी निमित्त पुण्यात सत्कार सोहळा होता. त्याला त्यांचे कडाक्याचे भांडण असलेले ना.सी फडके देखील व्यासपिठावर उपस्थित होते. (तो एक वेगळाच मुद्दा आहे. परत कधितरी). त्यावेळेस अत्र्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी विठ्ठलरावांवर होती. अत्रे विनोदी बोलतात, इतरांच्या (शाब्दीक) टपलीत मारतात तसाच आपण देखील अत्र्यांवर मिष्कीलपणे विनोद करावा असे विठ्ठलरावांना वाटण्याची चूकच म्हणा, झाली. :)

व्यवस्थित ओळख करून दिल्यावर जाता जाता ते श्रोत्यांना उद्देशून (या अर्थाचे) म्हणाले, "अत्र्यांना आपल्या भाषणात अतिशयोक्ती करायची सवय आहे. तेंव्हा तेव्हढे लक्षात ठेवून त्यांचे भाषण ऐका." पब्लीक हसले.

मग अत्रे सत्कार सोहळ्यास उत्तर देण्यास उठले आणि म्हणाले, "आत्ताच, आमची ओळख आमचे परममित्र कै. काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, (मग पॉज घेऊन, विठ्ठलरावांकडे बघत) - यात काही अतिशयोक्ती नाही ना?..." ;)

माहितगार's picture

25 Apr 2014 - 8:03 pm | माहितगार

धन्यवाद माहिती आणि (बोनस) विनोदाकरताही !

माहितगार's picture

25 Apr 2014 - 8:08 pm | माहितगार

माहिती लगोलग मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्ट केली.

विकास's picture

25 Apr 2014 - 9:11 pm | विकास

अजून किंचीत...

"संसदमार्ग - लोकशाहीचा राजमार्ग" लेखक: विठ्ठलराव गाडगीळ, प्रकाशकः प्रेस्टीज प्रकाशन

माहितगार's picture

25 Apr 2014 - 11:29 pm | माहितगार

अरे वा तुम्ही दिलेला उल्लेख गूगलवर शोधला तर लोकसत्तात ग.प्र.प्रधानांनी केलेले परिक्षणही मिळाले. गाडगीळांच्या लेखनाच्या उजव्या बाजू मांडताना इंदीरा गांधींबाबत लिहीताना मात्र गाडगीळांची लेखणी अडखळत असे अशी रास्त टिकाही ग. प्र. प्रधानांनी केली आहे.

संदर्भा साठी धन्यवाद.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

25 Apr 2014 - 8:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

एक अभ्यासू व इंदिरा,राजीव ह्यांच्या खास विश्वासातला एक मराठी ब्राम्हण नेता.माझ्या/ह्यांच्या आठवणीप्रमाणे ते सल्लागाराचेही काम करत.त्यांचे भाषण मात्र शुद्धलेखन घातल्यासारखे-खूप मोठे पॉझेस.

माहितगार's picture

25 Apr 2014 - 11:32 pm | माहितगार

खूप मोठे पॉझेस म्हणजे ऐकणार्‍यांची परीक्षा ? सॉरी हं, मी स्वतः कधी त्यांना पाहील ऐकल नाहीए.

श्रीरंग_जोशी's picture

25 Apr 2014 - 11:54 pm | श्रीरंग_जोशी

स्व नरसिंहराव पंतप्रधान असताना स्व विठ्ठलरावांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषवले होते. त्याकाळी दूरदर्शनच्या हिंदी / इंग्रजी बातम्यांमध्ये त्यांची छबी बरेचदा दिसायची.

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2014 - 12:08 am | श्रीरंग_जोशी

http://www.zoominfo.com/p/V.N.-Gadgil/90764320

येथे आपल्याला स्व विठ्ठलरावांच्या कारकिर्दीविषयी मोलाची माहिती मिळेल अशी आशा आहे.

वाव ग्रेट नेमक्या माहिती साठी अनेक धन्यवाद

आशु जोग's picture

26 Apr 2014 - 1:18 pm | आशु जोग

>> जन्मापासून विश्वासू काँग्रेसमन.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते ना ते

माहितगार's picture

26 Apr 2014 - 1:41 pm | माहितगार

बरे झाले आठवण केलीत, मला वाटते त्यांचे या विषयावरचे संसदेतील भाषण गाजले होते. त्यांच्या संसदीय भाषणाचे काही ऑनलाईन दुव्यांच्या उपलब्धते बाबत कुणास ठाऊक असल्यास त्या बद्दलही कल्पना द्यावी.

विठ्ठलराव गाडगीळांनी केवळ संसदेतच भूमिका मांडली का संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता ?
या निमीत्ताने विठ्ठलराव गाडगीळांनी काँग्रेसच्या मुख्य भूमीके पासून हटके अन्य काही भूमीका घेतल्या का ? आणीबाणी बाबत त्यांनी कधी काही जाहीर वाच्यता केली होती का ? या बाबतही कुणी माहिती देऊ शकल्यास आवडेल.